नंदुरबारजिल्हा परिषदेच्या जलजीवनमिशन योजनेच्या कामांच्याचौकशीसाठी 16जुलैला जिल्हापरिषदेवर धरणेआंदोलन

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 08. 2024
  • नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांच्या चौकशीसाठी 16 जुलैला जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करणार, सभागृहात मुद्दा उपस्थित करणार, आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदर ॲडहोकेट गोवाल पाडवी यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेतून केले. नंदुरबार जिल्हाभरात जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, व इतर अनेक योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचार प्रश्र्नी सर्वपक्षीय नेत्यांनी रणशिंग फुंकले असून, 16 जुलै रोजी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्याचा इशारा अजित करण्यात आलेल्या सर्व पक्षीय पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे, आंदोलनात 10 हजार पेक्षा अधिक नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले, जलजीवन मिशनमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्या लोकसभेत मांडणार आहे, अशी माहिती देत आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदर ॲडहोकेट गोवाल पाडवी यांनी केले आहे, यावेळी खासादर पाडवी म्हणाले, गत काही कालावधीपासून जिल्हा परिषदेत योजनांमध्ये भ्रष्टाचार व अनियमितता झालेली आहे, जलजीवन सारख्या महत्त्वकांशी योजनेत देखील मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत, योजनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी 16 जुलैला आंदोलन करण्यात येणार आहे, आंदोलनात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, सर्वसामान्य नागरिकांची जलजीवन मिशन योजना असल्याने लोकसभेत मुद्दा उपस्थित करू, नंदुरबार नगरपरिषदेचा स्व.अटल बिहारी वाजपेयी सभागृहात खासदर ॲडहोकेट गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली होती, यावेळी माजी आमदार उदेसिंग पाडवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य ॲडहोकेट राम रघुवंशी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, शहादा कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी आदी उपस्थित होते, यावेळी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी सांगितले की, कुठलाही सण उत्सव, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती नसतांना जिल्हा प्रशासनाने आंदोलन दडपण्यासाठी मनाई आदेश जारी केला होता, आता मनाई आदेश जारी केला तरी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत, असा इशारा दिला, बांधकाम व इतर विभागातील कामांच्या अतिशय महत्त्वाच्या प्रशासकीय मान्यतेच्या मूळ नकला मुख्य कार्यालय व्यतिरिक्त लोकप्रतिनिधींच्या घरून वितरित होत आहेत, कृषी विभागांतर्गत झालेल्या सौरदिव्यांच्या निविदा प्रक्रियेत देखील अनियमितता झाली असून,त्याची चौकशी व्हावी, असे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी सांगितले, कुठलीही योजना जनतेने दिलेल्या करातून राबविण्यात येत असते, योजनेत जनतेची दिशाभूल झालेली आहे, त्यामुळे जोपर्यंत जल जीवन मिशन योजनेच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहू देऊ असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य ॲड राम रघुवंशी यांनी सांगितले.

Komentáře • 30

  • @avinashvalvi32
    @avinashvalvi32 Před 25 dny +14

    शबरी घरकुल आवास योजनेची चौकशी झाली पाहिजे.

  • @baluvalvi3522
    @baluvalvi3522 Před 25 dny +6

    शबरी घरकुल आवास योजनेशी चौकशी झाली पाहिजे

  • @amarvalvi3795
    @amarvalvi3795 Před 24 dny +3

    अस्तंबा गावाचे रस्ताची ही चौकशी करावे ही विनंती आहे गोवाल दादा साहेब

  • @devakokani9310
    @devakokani9310 Před 25 dny +8

    गावातील सर्व रस्ते खराब झाले आहेत जल जीवन मुळे

  • @Hpsertre147
    @Hpsertre147 Před 24 dny +2

    Ek number dada
    Shobri gharkul va जल जीवन मिशन योजनेची चौकशी करण्यात यावी.
    ग्रामपंचायत Pimpalkhunta ची चौकशी करण्यात यावी दादा.

  • @ambikathakre8426
    @ambikathakre8426 Před 24 dny

    गोवाल दादा जल जीवन मिशन योजनेची चौकशी रस्ताची चौकशी

  • @dilipgavit409
    @dilipgavit409 Před 24 dny +2

    रस्त्यांची चौकशी केली पाहिजे

  • @abrahamgavit3251
    @abrahamgavit3251 Před 24 dny +2

    आमच्या गावात सुध्दा जलजीवन चे कामे केली आहेत,नळ, पाईप लाईन केली आहेत,पण त्या नळामध्ये पाणी येत नाही, मग असे कामे करून काय फायदा.
    चौकशी व्हायला हवी..

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před 23 dny +1

    टव्केवारी भेटली नाही का,, पाणीपुरवठा मंत्री हां शिंदे गटांचे आहे,, खासदार साहेब, तुमच्या सोबत बसलेले, रघुवंशी याचं मुलगा हेही, शिंदे गटांचे आहे ना,, सरकार मंत्री तुमच्या पक्षाचे आहे ना,, कसलं नाटक करतं आहे,,,

  • @SanjaypawaraValvi
    @SanjaypawaraValvi Před 24 dny

    आमचा -
    गाव वडगांव गोवाल साहेब आमचा गांव सडास भाथ रुम पण ठेकेदारानी गिळून घेतले आता सरपंच वग्रामसेवकांना विचारतात तर आता तुमच्या नाही होणार असं सांगतात साहेब यांचे हि चौकशी करा चौकशी करा असे आमचे विनंती आहे गाव वडगाव तालुका शहादा जि जिल्हा नंदुरबार

  • @nandavasave2431
    @nandavasave2431 Před 24 dny

    जल जीवन मिशन योजनेची चौकशी व्हावी ग्रामपंचायत वडफळी

  • @user-dt8yz2et7m
    @user-dt8yz2et7m Před 25 dny

    योजना झाली पण आपण हेही लक्षात घ्या, ज्या गावात वीज पुरवठा नाही त्याठिकाणी ठेकेदारांना व्येठीस धरु नका. तुम्ही राजकारण करत बसा.

  • @soma_adhal_pailwan
    @soma_adhal_pailwan Před 24 dny

    सगळ्यात आधी हा विषय बिरसा आर्मी महाराष्ट्र राज्य या संघटनेने उचललेला आहे

  • @anantpawara9188
    @anantpawara9188 Před 24 dny +1

    योजना येणार भ्रष्टाचार होणार त्यामुळे आंदोलन , चौकशी दोषींवर प्रकिया होणार त्यामुळे कोणताहा फायदा नाही. कोणतीही योजना, बांधकाम असेल तर संबंधित ठेकेदार अधिकारी यांनी त्यांच्या जबाबदारीने प्रामाणिक पणे काम केले तर चौकशीचा प्रश्न येणारच नाही.

  • @ROHITPATIL-ug5fl
    @ROHITPATIL-ug5fl Před 24 dny

    Sir nal lavle te pan tutun gelet asetar kam kele ahet

  • @gautamnaik6200
    @gautamnaik6200 Před 18 dny

    गोवल दादा आच गांवा कडे या बियामाळ याल गांवा ते रसेते पान नाही आहे काय विकास केलें नाहीं आहे आमदार पन सपटा नहीं आहे तालुका तळोदा या गांवात

  • @ambikathakre8426
    @ambikathakre8426 Před 24 dny

    ग्रामपंचायत वरुळ

  • @sunilvalvi7890
    @sunilvalvi7890 Před 24 dny

    Road Pani light mere gaon mein bus dusra kuchh nahin kolvimal bodipada yaa gavat ok sir

  • @abhimanthakare8314
    @abhimanthakare8314 Před 22 dny

    *नंदुरबार जिल्हा परिषद, नगरपालिका आणि लोकसभा*
    मा.गोवाल पाडवी साहेब आपण वडीलांच्या किंव्हा काँग्रेसच्या पुण्याईने निवडून आला नाहीत, तर केंद्रातील बिजिपी सरकारचे संविधान विरोधी धोरण,मणिपूर,
    MPच्या मुद्यावर माजी खासदारांची आदिवासी विरोधी भूमिका,डी लिस्टिंग, घराणेशाहीच्या विरोधात जनतेचा आक्रोश होता आणि यामुळेच नंदुरबारच्या जनतेने विशेष करून आदिवासी समाजाने भाजपच्या विरोधात मतदान गोवाल पाडवी यांना केल्याने म्हणजेच *जनतेकडे तिसरा मजबूत विकल्प नसल्यानेच गोवाल पाडवी साहेब तुमच्या जागेवर काँग्रेसने कोणताही उमेदवार दिला असता तरी तो निवडूनच आला असता,*
    *काही दलबदलू स्व:ताला किंग मेकर टायगर म्हणवून घेत असेल तर तो त्यांचा श्रेय घेण्याचा बालिशपणा असू शकतो,*
    *असोत*
    मा. गोवाल पाडवी साहेबांना नंदुरबार जनतेच्या विशेष करून तमाम आदिवासी समाजाच्या वतीने सामाजिक अपील विनंती आहे,
    की तुम्हांला जी बोनस मद्ये संधी मिळाली आहेत,
    तिचा या मतदार संघातील जो बॅकलोक आहेत, आदिवासींचे हजारो प्रश्न आहेत, जे की तुमचे वडील के.सी.पाडवी साहेब, देखील सोडवू शकले नाहीत , आदिवासींचा रोजगाराचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न,
    शेती सिंचन, MIDC, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,रस्ते,आरोग्य, शिक्षण असे हजारो प्रश्न विकासाचा बॅकलोक आहेत, आणि जनतेच्या तुमच्या कडून खूप खूप अपेक्षा देखील आहेत,
    विशेष म्हणजे *तुम्हीं पेसा अंतर्गत नोकर भरती, अनुसूची 5नंदुरबार जिल्ह्यात लागू करावी म्हणून संसदेत आवाज उठवला पाहिजे म्हणून* *जनतेने बोनस मद्ये निवडून दिले असल्याने* तुम्हीं संसदेत आवाज उठवण्या ऐवजी कोण्या धूर्त, स्व: स्वारर्थी, दलबदलू लोकांच्या आएकुन जिल्हा परिषदच्या सत्तेच्या विरोधात आंदोलना साठी पत्रकार परिषद घेऊन आंदोलन करणार आहात,
    *तुम्हीं काय पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य नाहीत,*
    *तुम्हीं खासदार असल्याने कोणाच्या तरी आएकुन सर्वउच्च पदाची गरिमा कमी करीत आहात असे वाटत नाहीत का???* जिल्हा परिषद सत्तेच्या विरोधात जे आंदोलन आहेत ते फक्त % टक्केवारी मिळाली नाहीत म्हणून आहेत, तसा तर नंदुरबार नगरपालिकेत देखील ब्रष्टाचार झाला आहेत, नोव्हेंबर पासून तीन ते चार दिवसांनी जनतेला पाणी पुरवठा होत आहे, तापी बुराई प्रकल्प, बारा गांव पाणी पुरवठ्याचे बारा वाजले आहेत,
    बिगरआदिवासींनी आदिवासींच्या हजारो एकर जमिनी कवडीमोल दराने हडप केल्या आहेत, वाढू माफिया मुळे बेकसुर लोकांचे बळी जात आहे,
    त्यांच्या विरोधात देखील आंदोलन केली पाहिजे,
    अजून एक मुद्या आठवण करून देत आहोत,की वर्तमानात नंदुरबारच्या जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहेत ती तुमच्या काँग्रेसच्याच दल बदलू, स्व:स्वारर्थी सदस्यांनी भाजपला पाठींबा दिल्यामुळेच जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता गेली हे मा.के.सी. पाडवी साहेबांना चांगलेच माहीत आहेत,
    मा.गोवाल पाडवी साहेब तुम्हांला समाजाच्या वतीने अपील विनंती आहे, की तुम्हीं संसदेत मतदार संघाच्या विकासासाठी आवाज उठवा! एवढीच अपेक्षा......!!
    नाहीतर भाजपच्या माजी खासदार महासंसद रत्न ताई साळी-चोळी, गॅस-शेगड्या, गाई-बकऱ्या वाटप करून मी विकास केला म्हणत होत्या तसे आपण हि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गेटवर आंदोलन करणे योग्य आहेत का??????
    👆मी या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन जनतेला काँग्रेस- शिंदेगट आणि भाजपच्या षडयंत्राचा पर्दापाश करू शकतो......
    *क्रमशः*
    *🙏जोहार जय संविधान*
    *रोहिदास वळवी*
    (नंदुरबार लोकसभा)

  • @sandipmali9307
    @sandipmali9307 Před 24 dny

    सगळ्यात मोठा भ्रष्टाचार शबरी घरकुल योजना सरपंच सदस्य यांच्या घरात लाभ घेतात एक घरात पती पत्नी असे दोघं लाभ घेतात तर शबरी आवाज गरीब लोकांसाठी नाहीये योजना सगळे पुढारी साथी
    आहे

  • @SaysingvalviValvi-oj4rt

    1oo%peki 10% kame keli jatat yashyakade najar theva .........

  • @K.P.VOFFICIAL505
    @K.P.VOFFICIAL505 Před 24 dny

    Sbri garkul cokasi payje😊😊

  • @royal_264
    @royal_264 Před 24 dny +1

    गोवल दिसला 😂😂😂😂

  • @sandipmali9307
    @sandipmali9307 Před 24 dny

    काही होणार नाही आज बोलतील उद्या आठवण राहणार नाही इतके दिवस भ्रष्टाचार झाला तेव्हा विरोधाक कुठे होती आत्ता झोपेतून जाग आली आता सगळे नवीन चमत्कार दाखवतात नंतर दिसणार नाही

    • @akz_gavitofficial8686
      @akz_gavitofficial8686 Před 24 dny +1

      तेव्हा गावीत साहेबांचे चेले जास्त होते आता नाही