झराळीयेथील बीकेफार्महाऊसयेथील मा.आ.चंद्रकांत रघुवंशीयांनी झराळीपंपिंग स्टेशनवरीलशौचालय ताबडतोबहटवावे

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • नंदुरबार शहरा लगत असलेल्या झराळी येथील बीके फार्म हाऊस येथील विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी झराळी पंपिंग स्टेशनवरील शौचालय ताबडतोब हटवावे, किंवा शौचालयाचा वापर तत्काळ थांबवावा शहराला होतोय दूषित पाणीपुरवठा, माजी नगरसेवक आनंद माळी यांच्यासह नगरसेवक माजी नगरसेविका पुत्र लक्ष्मण माळी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून मागनी केली आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणाच्या काठी झराळी येथे, विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बांधलेले बिके फार्म हाऊस अतिक्रमणच असून ते त्यांनी स्वतःहून त्वरित हटवले पाहिजे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचा निकाल लागायचा तेव्हा लागेल, परंतु नागरिकांनी रघुवंशी यांना दिलेल्या भरभरून प्रेमाला आणि विश्वासाला जागावे आणि लोकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी, नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनपासून अवघ्या चाळीस मीटर अंतरावर बांधलेल्या या फार्म हाऊसच्या शौचालयाला ताबडतोब काढून टाकावे, व शहराला घाण मिश्रीत पाणी पुरवणे थांबवावे, अशी जाहीर मागणी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका सिंधुबाई माळी यांचे पुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी व भाजपाचे माजी गटनेते आनंदा माळी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे, यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष वसईकर, भाजपाचे माजी शहर प्रमुख माणिक माळी व अन्य उपस्थित होते, लक्ष्मण माळी व आनंद माळी यांनी सांगितले की, नंदुरबार शहराला पूर्वी दिवसातून दोन वेळेस पाणीपुरवठा नगरपालिकेच्या माध्यमातून केला जात होता नंतर तो क्रमाने कमी होऊन आधी एक दिवसाआडनंतर दोन दिवसाआड आता तीन-चार दिवसा नंतर केला जात आहे, अशातच जवळपासच्या 10 गावांना विरचक धरणातील पाणी देण्याचे नियोजन शासनातर्फे करण्यात आले आहे, वाढती लोकसंख्या आणि वाढणारे शहर लक्षात घेता वीरचकला पर्यायी पाणी योजना आवश्यक ठरते, त्यादृष्टिकोनातून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नवीन तापी पाणी योजना आकाराला आणत आहे, असे असताना केवळ झराळी येथील फार्म हाऊस वाचवण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे त्या योजनेला विरोध करीत आहेत, लक्ष्मण माळी यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, रघुवंशी यांचे झराळी येथील फार्म हाऊस अतिक्रमण आहे, नंदुरबार मध्यम प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी आणि न्यायालयाने सुद्धा फार्म हाऊसचे अतिक्रमण हटवण्याचे सांगितलेले आहे, परंतु वेगवेगळ्या कारण दाखवून त्यांनी त्याला वेळोवेळी स्थगिती मिळवत आहे, परंतु जबाबदार लोकप्रतिनिधी नात्याने न्यायालयीन निकाल लागेल तेव्हा लागेल तो पर्यंत त्यांनी फाॅमहाऊस वरिल शौचालयाचा सार्वजनिक वापर थांबवावा, याचबरोबर लक्ष्मण माळी व आनंद माळी यांनी पत्रकारांना सांगितले की, संपूर्ण शहराला ज्या झराळी पंपिंग स्टेशनवरून पाणीपुरवठा होतो त्या पंपिंग स्टेशन पासून अवघ्या चाळीस मीटर अंतरावर फार्म हाऊसचे शौचालय बांधलेले असून, धरणाचे पाणी दूषित होत असते तेच पाणी शहराला पुरवले जाते, ही अत्यंत चुकीची किळसवाणी गोष्ट आहे, नंदुरबार वासियांनी रघुवंशी यांच्यावर विश्वास दर्शवून अनेक वर्षे भरभरून प्रेम दिले आहे, त्याला जागून रघुवंशी यांनी लोकांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा प्रकार ताबडतोब थांबवावा, असे लक्ष्मण माळी म्हणाले आहे, दरम्यान, अधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीसीची प्रत पत्रकारांना देण्यात आली, नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय कार्यालयातर्फे कार्यकारी अभियंता यांनी 16 नोव्हेंबर 23 रोजी बजावलेल्या त्या नोटीस मध्ये झराळी येथील फार्म हाऊसचे बांधकाम अतिक्रमण असल्याचे नमूद करताना म्हटले आहे की, शिवण मध्यम प्रकल्पाच्या बुडीताखाली बटेसिंग कन्हैयालाल रघुवंशी नंदुरबार यांचे मौजे टोकरतळे नंदुरबार शिवारातील गट नंबर 128 चे क्षेत्र 10 . 29 हेक्टर आर क्षेत्र भुसंपादन प्रस्ताव एसआरक्र 15/99 (मविशेष भुसंपादन अधिकारी क्र.2, नंदुरबार) अन्वये संपादित झाले असुन सदर संपादित क्षेत्राची अंतिम निवाडयाची रक्कम रु.12 लक्ष 62 हजार 058 मात्र जमीन मालकास विशेष भुसंपादन अधिकारी क्र.2, नंदुरबार यांच्या कार्यालयाकडुन अदा करण्यात आलेली आहे. सदरचे संपादीत क्षेत्र सन 2001 पासुन शिवण विरचक मध्यम प्रकल्प- कार्यकारी अभियंता, नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक, नंदुरबार-तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांच्या नावे आहे, तदनंतर सदर क्षेत्रावर झराळी येथील नंदुरबार नगरपालिकेच्या पंपहाऊस शेजारी वास्तुचे बांधकाम केलेले निदर्शनास आले असुन ते भुसंपादन केलेल्या जागेवर 'अतिक्रमण' आहे, कृपया सदरील अतिक्रमण आपण ही नोटीस प्राप्त झाल्याच्या दिनांकापासुन 1 महिन्याच्या आत स्वखर्चाने काढावे, असे त्या नोटिसीत म्हटलेले आहे.

Komentáře • 2

  • @dajigavit9500
    @dajigavit9500 Před měsícem +6

    भैया साहेब संडास व लगवी करून नंदूरबार जनतेला पाणी पाजत आहे हे नदबार जनतेचे दुर्दैव