पाण्याला मोठी लागली तहान! Incredible Marathi Episode-7. Water Special!

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • पाण्याला मोठी लागली तहान!
    Incredible Marathi episode -7
    Research by Dr Sameera Gujar.
    Edit by Aniket Phene.
    Ganga Poojan-Ganga Saptami (14 May)
    Water Special!
    Do not miss!
    #culture #motivation #marathiinfo #marathi #marathipedia #news #incredible #history #rare #education #language #knowledge #information #informative #water #ganga #blessings #entertainment #litreture #story #storytelling #phrases #fun #infotaining #rain #mustwatch

Komentáře • 85

  • @timepixels2696
    @timepixels2696 Před 3 měsíci +5

    खुपच सुंदर मराठी भाषा किती समृद्ध आहे ना आपली भाषा 🙏🌹

  • @geetapanchal7097
    @geetapanchal7097 Před 3 měsíci +4

    "नाथाच्या घरची उलटी खूण..पाण्याला मोठी लागली तहान" हा अभंग संगीत बया दार उघड या नाटकात सादर करायचो...देवदत्त साबळे यांचे अप्रतिम संगीत आणि तेजस्विनी इंगळे हिचा सुमधूर आवाज. मधुरा, तू खूपच महत्त्वाचे काम सोपे करून सादर करते आहेस. अशा नवीन नवीन विषयांवर लिहिण्यासाठी खूप शुभेच्छा."पाण्यासारखी" कार्यरत रहा...❤❤❤

    • @vaibhavjangam1011
      @vaibhavjangam1011 Před 2 měsíci

      आत घागर बाहेर पाणी पाण्याला पाणी आले मिळूनी...*नाथांच्या घरची उलटी खूण|*
      *पाण्याला मोठी लागली तहान||*
      *आत घागर बाहेरपाणी| पाण्याला पाणी आले मिळोनी ||*
      *आज मी ऐक नवल देखिले वळचणीचे पाणी आढयाला लागले||*
      *शेतकर्याने शेत पेरिले राखणदाराला त्याने गिळिले || हंडी खादली भात टाकिला *बकऱ्यापुढे देव हा कापिला|| एका जनार्दनी मार्ग हा उलटा जो जाणे तो गुरूचा बेटा ||*
      संत एकनाथांचा हा कोडे! या प्रकारातील प्रसिद्ध अभंग आहे या अभंगात ते म्हणतात "नाथांच्या घरची उलटीच खून आहे. पाण्याला मोठी तहान लागली आहे. घागर पाण्यात बुडाली आहे.घागरीत पाणी आहे. आणि घागरीच्या बाहेरही पाणी आहे. हे घागरीतील पाणी बाहेरच्या अथांग पाण्यात मिसळून गेले.मी आज एक नवल पहिले. वळचणीला असणारे पाणी अढयाला गेले .
      शेतकऱ्याने शेत पेरले. पण त्या शेताने राखणदाराला गिळून टाकले ?
      खापराच्या हंडीत भात शिजवला पण जीवाने भात टाकून हंडी खाल्ली ? बकऱ्यापुढे देवाचा बळी दिला. हा मार्ग उलटा आहे हे वास्तव ज्याने जाणले तो गुरूचा बेटा होय.
      या अभंगातील भावार्था मागे अध्यात्मिक अर्थ दडलेला आहे.तो अर्थ समजला की अभंगातील कोडेही उलगडते. परमेश्वर सर्व पिंडापिंडात भरलेला आहे. त्याला न ओळखता जीव देहात अडकला आहे. देहाचा संकुचीतपण संपला कि ईश्वरी चैतन्याचा अनुभव यावा लागतो.
      म्हणजे जीवरूपी पाण्यला समष्टीरूप पाण्याची तहान लागते .जिवातील चैतन्याला देहाचे बंधन आहे. म्हणून त्याला घागरीतील पाणी सर्वस्व आहे. असे वाटते हे . घागर अथांग पाण्यात बुडाली तर घागरीच्या आतही पाणी असते आणि बाहेरही वळचणीचे पाणी आढयाच्या पाण्याशी म्हणजे विश्वात्मक चैतन्याशी एकरूप झाले. शेतानेच राखणदाराला गिळून टाकले. म्हणजे काय? विधात्याने हे विश्व निर्माण केले.त्याने विश्वरूप शेताची पेरणी केली म्हणून अनेक जिवांची निर्मिती झाली .तो देहाच्या शेताची राखणदारी करतो. पण अज्ञानामुळे जीव ईश्वराला विसरला. त्याने ईश्वररुपी राखणदाराला गिळून टाकले. असे म्हटले आहे. देहरूपी खापराच्या हंडीत भात शिजवला. सुज्ञान माणुस भात खाऊन हंडी फेकून देतो.पण मायामोहामुळे जीवाचा विवेक सुटला. ईश्वररुपी भात टाकून देहरूपी हंडी तो खात बसला.नेहमी देवापुढे बळी दिला जातो. पण येथे जीवाने उलटेच काम केले. म्हणजे बकऱ्या पुढे देवाचा बळी दिला जातो. जीवाने अंगिकारलेला उलटा मार्ग टाकून सरळ मार्गाने चालण्याची जाणीव झाली की गुरुचे बळ मिळाले असा अर्थं होतो. त्याच्यावर गुरूची पूर्ण कृपा होते.एकेक शब्दाचा गूढ अर्थ जसजसा स्पष्ट होत जातो तसतसे अभंगातील कोडे उलगडते. मनाला एका वेगळ्याच समाधानाची अनुभूती येते.

  • @vasudhajoglekar6825
    @vasudhajoglekar6825 Před 3 měsíci +2

    खुप निरनिराळे विषय हाताळता आहात - अगदी सुबोधपणें.एखद्या विषयाची माहिती घेणं आणि ती सुसुत्रतेने श्रोत्यांना पोचवण - हे आपलं कौशल्य वादातीत !! खुप छान !अभिनंदन !!

  • @anjalipatankar2855
    @anjalipatankar2855 Před 3 měsíci +2

    वा वा मधुरा खूप छान
    एकूणच मराठी भाषेच पाणी लय खोल हाय ( कोल्हापूरी बोलीत वापरतात)
    पालथ्या घड्यावर पाणी.

  • @veenapatankar7966
    @veenapatankar7966 Před 3 měsíci +2

    व्वा..फार सुंदर..
    आपल्या मराठी साहित्यात कितीतरी छान लेख कविता आहेत ना...
    आपल्या भाषेची गोडी अवीटच आहे

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 Před 3 měsíci

    वा! मस्तच.. किती समृद्ध आहे आपली मराठी ❤❤

  • @onkarkadale1248
    @onkarkadale1248 Před 3 měsíci +1

    👌👌👌
    1)कुठंतरी पाणी मुरणे.
    2)पालथ्या घड्यावर पाणी.
    3)पाण्याला आग लावणे.

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 Před 3 měsíci +1

    पाण्याची माहिती किती सखोल पाण्यात पाण्यात आहे ते कळले...

  • @ashwinipatil5538
    @ashwinipatil5538 Před 3 měsíci +1

    खूपच छान मधुरा

  • @prishaskumar6094
    @prishaskumar6094 Před 3 měsíci +2

    खूप छान!
    अश्या प्रकारचे अजून videos बघायला आवडतील 😊

  • @pramodkhataokar5892
    @pramodkhataokar5892 Před 3 měsíci +1

    वा खूप छान तुम्ही आम्हांला प्रेरणा दिली आहे , प्रत्येक मराठी माणसाने ऐकावेच 🙏👍

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před 3 měsíci

    अजून एक वाक्य शालेय "जीवना "तील --लढाईवर गेलेल्या सैनिकांचे जीवन म्हणजे अळवावरचे पाणी

  • @007ashdDesai
    @007ashdDesai Před 2 měsíci +1

    पाण्याला पाणी खेचते

  • @neetabapat6952
    @neetabapat6952 Před 3 měsíci

    वाह मस्त. अळवावरचे पाणी

  • @sujatalimaye6814
    @sujatalimaye6814 Před 3 měsíci +1

    खूप छान

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 Před 3 měsíci +1

    सौ. मधुरा ताई , खरंच Incredible ❤, ताई, आपल्या " मराठी " भाषेच्या पाण्याची खोली किती अथांग आहे , हे " समजावणारी " ही
    " पाणिदार " उदाहरणे आपल्या " पाण्या सारख्या " नितळ वैखरीतून ऐकतांना आम्ही श्रोते ज्ञानरूपी सरोवराच्या पवित्र पाण्यात डुंबून गेलो !
    अप्रप्रप्रतीम ❤️❤️❤️❤️

  • @shraddhagadad2800
    @shraddhagadad2800 Před 3 měsíci +1

    खूप छान ❤❤

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 Před měsícem

    मनमोहक

  • @geetanjalijoshi1
    @geetanjalijoshi1 Před 3 měsíci +1

    खूपच आवडला पाणी ह्या विषया वरचा भाग ....काही गोष्टी आधीच माहिती होत्या पण काही नव्याने माहिती झाल्या....खूप छान
    जिवाचे पाणी पाणी झाले अशा अर्थाने पण पाणी शब्दाचा वापर केला जातो

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 Před 3 měsíci +1

    मधुराजी ,खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ. मराठी भाषेची जपणूक ,प्रचार ,प्रसार करण्यासाठी तुम्ही हे कष्ट घेत आहात.खूप स्तुत्त्य उपक्रम आहे.तुमचं आणि सर्व टीमचं खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. पाणी शब्दाचे विविध अर्थ काहीबाबतींत नव्याने कळले. अजून काही पाणी शब्द वापरुन म्हणी ,वाक्प्रचार आत्ता तरी लक्षात येत नाहीत. -सौ. मेघना लिमये.

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 Před 3 měsíci

    तुझं बोलणं पाण्यासारखं तरल वाटले 🌹

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 Před 3 měsíci +1

    मराठी भाषेची समृध्दी लक्षात आणून दिली.

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 Před 2 měsíci

    चहा पाणी !
    मस्त भाग ❤

  • @ManjushaPatankar-bj3mv
    @ManjushaPatankar-bj3mv Před 2 měsíci

    Chchan khup chchan

  • @umadalvi8587
    @umadalvi8587 Před 3 měsíci +1

    मराठी भाषेतील सौंदर्य अधिकच खुलवून दाखवलस 👌👌

  • @vaishalideshmukh5078
    @vaishalideshmukh5078 Před 3 měsíci +1

    मधुरा, तू केवळ अप्रतिम.
    विषय कोणताही असो लिलया हाताळतेस.

  • @KathaMehfil_by_Sharmishtha
    @KathaMehfil_by_Sharmishtha Před 3 měsíci +1

    वाह!! खूप सुंदर!
    मधुरा आणि समीरा गुजर खूप अभ्यासपूर्ण माहिती दिलीत .... पाण्याचा इतका विचारच केला नव्हता 😅
    पाणी जोखणे, पाणी पाजणे , पाण्या तुझा रंग कसा ...ज्याला जसा हवा तसा

  • @swatilele1858
    @swatilele1858 Před 3 měsíci +1

    खूप छान....
    १.कोण किती पाण्यात आहे.
    २.पाणी पाजणे.
    ३. जीवाचे पाणी पाणी होणे.
    आगामी उपक्रमांसाठी शुभेच्छा!!

  • @prachikolhatkar7951
    @prachikolhatkar7951 Před 3 měsíci +1

    वळणाचं पाणी वळणावर जातं!
    खूप सुंदर व्हिडिओ!

  • @VinodPathare-uv5zr
    @VinodPathare-uv5zr Před 3 měsíci +1

    👍 खूप छान. मराठी भाषा किती समृध्द आहे याचे उत्कृष्ट सादरीकरण.

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Před 3 měsíci +1

    पाणी पाणी झालं जीवाचं
    पाण्यात पाहणे

  • @aparnahemant
    @aparnahemant Před 3 měsíci

    गार पाण्यानं अंगावर काटा येतोम्हणून कोमट पाण्याला काटामोड पाणी म्हणत असतील

  • @shubhadesai3216
    @shubhadesai3216 Před 3 měsíci +1

    फारच सुंदर.

  • @shrutiparanjape6480
    @shrutiparanjape6480 Před 3 měsíci +1

    पाण्यात राहून माष्याशी वैर

  • @ashoksamel9463
    @ashoksamel9463 Před 3 měsíci

    Uttam

  • @vinayamanohar3667
    @vinayamanohar3667 Před 3 měsíci +1

    खूपच छान!

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 Před 3 měsíci

    मस्त

  • @shivajisatam7336
    @shivajisatam7336 Před 3 měsíci

    अप्रतीम ….. किती गोड गमतीशीर आहे आपली “माय” My मराठी 🥰🥰🥰👌👌👍👍❤️❤️💪🏾💪🏾💪🏾

  • @sangeetarane4944
    @sangeetarane4944 Před 3 měsíci

    👌👌👌👍

  • @jyotsnaphatak5872
    @jyotsnaphatak5872 Před 3 měsíci

    खुपच सुंदर , अप्रतिम,
    लाजे नी पाणी पाणी झाले .
    खुप पाऊस आला ,पाणी, पाणी झाले .
    अन्यथा न ले ,

  • @lataballal9122
    @lataballal9122 Před 3 měsíci

    फारंच रंजक भाषा आहे आपली! . छान सांगतेस ! कूटप्रश्न तर भारीच!
    पाणी जोखणे .ही म्हणतात.

  • @user-tp6ik4zi9i
    @user-tp6ik4zi9i Před 3 měsíci

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम. अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत विषयातलं सातत्य राखलय.
    खूप छान.

  • @shubhadaaghor1152
    @shubhadaaghor1152 Před 3 měsíci

    खूपच सुंदर! मराठी भाषा किती समृद्ध आहे याचे अप्रतिम सादरीकरण!

  • @madhavileparle
    @madhavileparle Před 3 měsíci

    पाण्यात पाहणे,पाणचट, पाणउतारा करणे

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před 3 měsíci

    किती वेगवेगळ्या म्हणी आहेत मराठीत हे समजले. वा छान.

  • @dr.vivekgavaskar
    @dr.vivekgavaskar Před 20 dny

    जल जो ना होता तो ये जग जाता जल

  • @AppaWadhavkarMusicalJourney
    @AppaWadhavkarMusicalJourney Před 3 měsíci

    Waa...Madhura khup mast.....malaa Nehemich aawadtaar tube vedio

  • @asawaribhat8916
    @asawaribhat8916 Před 3 měsíci +1

    अळवावरचं पाणी

    • @asawaribhat8916
      @asawaribhat8916 Před 3 měsíci

      पोटातील पाणी ही न हलणे

    • @asawaribhat8916
      @asawaribhat8916 Před 3 měsíci

      पाण्यावर लिहिलेली अक्षरे

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 Před 3 měsíci +1

    very unique and interesting topic : enjoyed it 🙌 I always admire the writing style .

  • @sharvarijoshi4217
    @sharvarijoshi4217 Před 3 měsíci +1

    हे पाणी येगळच हाय...😅

  • @user-lj2ju5df1c
    @user-lj2ju5df1c Před 3 měsíci +2

    एखाद्याला पाणी पाजणे, हे मधुरा चर्चेत आलं आहे का ?

  • @samirkale246
    @samirkale246 Před 3 měsíci

    खरच मस्त आणि मजेदार माहिती 👌👌 छान उपक्रम 👍🏻 तुझ्याकडून

  • @vaishalikarandikar8510
    @vaishalikarandikar8510 Před 3 měsíci

    Chan mahiti panyache artha khop samjaun dele

  • @prajaktapatil3778
    @prajaktapatil3778 Před 3 měsíci

    खूप सुंदर!! लाजेने पाणी पाणी होणे!

  • @anitakarandikar4158
    @anitakarandikar4158 Před 3 měsíci

    शेवट जास्त आवडला

  • @snehavengurlekar4940
    @snehavengurlekar4940 Před 3 měsíci

    कित्ती ही पाण्याची महती!
    U r really great...❤

  • @shashigokhale9052
    @shashigokhale9052 Před 3 měsíci

    मधुरा वेलणकर My favorite, God bless you

  • @akshay5823
    @akshay5823 Před 3 měsíci

    अतिशय सुंदर सोप्या शब्दात सांगितलं ताई ❤️🙏😊

  • @lovyoutube
    @lovyoutube Před 3 měsíci

    Kupach sunder ❤episode Madhura. Kind regards. All the best! 😊Milind.

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 Před 3 měsíci

    गाई पाण्यावर येणे...

  • @sharvarijoshi4217
    @sharvarijoshi4217 Před 3 měsíci +1

    हे असलं काही करू नकोस हा...बाबा चिडले तर तुझी बिनपण्याने करतील हा..(हजामत)😅😅

  • @AnushkaDeshmukh-xi3rg
    @AnushkaDeshmukh-xi3rg Před 3 měsíci

    सुरेख! रंजक आणि माहितीपूर्ण!

  • @S712P611
    @S712P611 Před 3 měsíci

    Loved the topic!
    तोंडचे पाणी पळणे.

  • @shashigokhale9052
    @shashigokhale9052 Před 3 měsíci

    उत्तम.
    जिवाचे पाणी पाणी होणे.

  • @geetagupte5057
    @geetagupte5057 Před 3 měsíci

    खुप छान् आणि रंजक 😊

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi7301 Před 3 měsíci

    रंजक माहिती आहे.

  • @AnilKeBolSabkiPolKhol
    @AnilKeBolSabkiPolKhol Před 3 měsíci

    वाह खूप सुंदर 👍

  • @snehagosavi5295
    @snehagosavi5295 Před 3 měsíci

    फारच छान😊

  • @stayfitwithdr.neelakshikuc4570

    किती सुंदर 😍😍

  • @nitijasave1329
    @nitijasave1329 Před 3 měsíci

    खूप छान.

  • @yoginis1
    @yoginis1 Před 3 měsíci

    Maam proud of you

    • @renuvarde1214
      @renuvarde1214 Před 3 měsíci

      जल है तोह कल है

  • @manoharsarvankar1731
    @manoharsarvankar1731 Před 3 měsíci

    पाणीग्रहण.

  • @rajanideshpande9051
    @rajanideshpande9051 Před 28 dny

    Lath marin tithe Pani kadhin

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Před 2 měsíci

    पाण्याचा काटा मोडणे? असे नसून न तापवलेले पाणी अंगावर घेताना आपल्या अंगावर थंडीने काटा उभा राहतो तो काटा मोडण्याइतके पाणी गरम करणे म्हणजे कोमट/किंवा लुकवर्म वॉटर😅

  • @suvarna76
    @suvarna76 Před 3 měsíci

    ऐकून छान वाटले...... हल्ली मराठी म्हणी ऐकायला मिळत नाहीत

  • @AppaWadhavkarMusicalJourney
    @AppaWadhavkarMusicalJourney Před 3 měsíci

    Tuze vedio

  • @sajireesareesandbeyondfash6539

    खुप छान ❤