नंदुरबारलोकसभा निवडणुकीतकाँगेसचेएड.गोवाल पाडवी यांनीभाजपच्याडॉ.हिना गावितांचादिडलाख मतांनीदारुणपराभव

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 06. 2024
  • नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या निकालाअंती महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी यांनी दोन टर्म निवडून आलेल्या, महासंसदरत्न महायुतीच्या भाजपच्या उमेदवार विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांचा एक लाख 59 हजार एकशे वीस मतांनी दारुण पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नंदुरबार लोकसभेच्या निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे एडहोकेट गोवाल पाडवी यांनी महायुतीच्या भाजपाच्या विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावितांचा दारुण पराभव करत, काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेतला आहे, काँग्रेसचे एडवोकेट गोवाल पाडवी यांना 7 लाख 45 हजार 998 मते मिळाली, तर भाजपाच्या डॉक्टर हिना गावितांना 5 लाख 86 हजार 878 मते मिळाल्याने, 1 लाख 59 हजार 120 मतांनी महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी विजयी झाले आहेत, राहुल गांधीची भारत जोडो न्याय यात्रे पाठोपाठ, काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची झालेली विक्रमी महासभा आदिवासी मतदारांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी झाल्याने, एडवोकेट गोवाल पाडवी यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला, भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेवून संविधान बदल, मणिपुर अत्याचार घटनेबाबत असलेला आदिवासी समाजामधील रोष आणि त्यात महायूतीच्या घटक पक्षामधील नाराजी नाट्य, यामुळे भाजपाच्या डॉक्टर हिना गावितांनी हॅट्रीक साधता आली नाही, उमेदवारी बदलापासून भाजपासोबत मित्र पक्षांचे सुरु झालेले नाराजी नाट्य, थेट शिंदे गटाच्या रघुवंशी गटाने काँग्रेसचा केलेला प्रचार, भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूकीकडे हेतू पुरस्कर फिरवलेला डोळा, आणि जिल्हा परिषदेची भाजपाकडे असलेली सत्ता आणि त्यातील बोकाळलेला कारभार, याचा थेट फटका डॉक्टर हिना गावितांना बसल्याचे दिसून आले, डिस्लीटिंग बाबत झालेला मोर्चाने ख्रिश्चन मतदारांची नाराजी, मुस्लीम समाजाला जोडण्यात भाजपाला आलेले अपयश, या सार्यांचे परिणाम एकंदरीत मतदानाच्या आकडेवारीतून दिसून आले आहेत, तिसर्या क्रमांकाची सर्वाधीक मते ही नोटाला मिळाली असून 14123 मतदारांनी नोटाला पसंती दिली, विधानसभा निहाय पाहता एडवोकेट गोवाल पाडवी यांना नवापूर मधून सर्वाधीक म्हणजे 65,008 मतांचे मताधिक्य, साक्री मधून 52 हजार 505 मताधिक्य, शहादा विधानसभे मधून 45 हजार 766 मताधिक्य तर अक्कलकुवा मतदारसंघातून 45 हजार 412 मताचे मताधिक्य मिळाले आहे, डॉक्टर हिना गावितांना नंदुरबार विधाससभा क्षेत्रातून 33 हजार 931 मताधिक्य तर शिरपुर मतदारसंघातून 15 हजार 728 मताधिक्य मिळाले आहे, तर लोकसभेसाठी उभ्या असलेल्या 11 पैकी 09 उमेदवारांना आपली अनामत रक्कम ही वाचवता आलेली नाही.

Komentáře • 1

  • @ganeshmarathe1618
    @ganeshmarathe1618 Před 20 dny

    बाय पास रस्ते दुरुस्त करावा आपघात होत आहेत तरी लवकर सुधारणा करावी