जिल्हापरिषद स्थायीसमितीची सभाजलजीवन मिशनप्रश्नासमवेत,शिक्षण,आरोग्य, महिलाबाल कल्याणच्याविषयांवरगाजली

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जलजीवन मिशनच्या प्रश्नासमवेत, जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, महिला बाल कल्याण विभाग, यांच्यासह विविध विषयांवर स्थायी समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष यांना धारेवर धरले होते, एकंदरीतच आज झालेली स्थायी समितीची सभा दुपारी दोन वाजता सुरू होणार होती, परंतु अध्यक्षांना येण्यास उशीर झाल्याकारणाने ती तब्बल एक ते दीड तासांनी उशिराने सुरू झाली, दुपारी दोन वाजेची सभा ही अध्यक्षांच्या वाट पाहण्यात जवळपास सव्वा तीन वाजेच्या सुमारास सुरू करण्यात आली. आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, कृषी सभापती हेमलता शितोळे, शिक्षण सभापती गणेश पराडके, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी एस कोल्हे, जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे सदस्य विरोधी पक्षनेते राया मावची, समिती सदस्य रतन पाडवी, विजय पराडके, मोहन शेवाळे, गटनेते सीके पाडवी, ऐश्वर्या रावल यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे खाते प्रमुख सभेस उपस्थित होते, आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत समितीची सभा सुरू होण्याच्या पहिले तब्बल सव्वा ते दीड तास उशिराने सुरू झालेल्या सभेबद्दल समिती सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, व सभेच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील 138 अंगणवाडींचे बांधकाम बाबत सदस्यांनी तक्रारीचा पाढा वाचला, नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील मुंदलवड येथील अंगणवाडी ही 35 वर्षे होऊनही अजूनपर्यंत झाली नाही, तर तेथील बालके ही अंगणवाडी इमारतीविना घराच्या अंगणात बसत असल्याची गंभीर तक्रार सदस्य विजय पराडके यांनी केली, तर नवापूर तालुक्यातील थुवा येथील अंगणवाडी घराच्या ओट्यावर भरते, तेथे इमारतीची मागणी करण्यात आली, धडगाव जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दुरावस्था झाली असून दहा वर्ग खोल्यांची देखील दुरुस्ती करणे आवश्यक आहे, त्या नादुरुस्त अवस्थेत आहेत व कधीही पडझड होऊ शकते व त्या ठिकाणी शिक्षकांची भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली, तर शहादा तालुक्यातील तर्हाडी जिल्हा परिषद शाळेला पुरेसे शिक्षक नसल्याची तक्रार करण्यात आली, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात तातडीने शिक्षकांची भरती करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील 3054 च्या कामांचा अद्याप न्यायालय कडून निर्णय आल्याने त्यावर कोणताच निधी नाही, असे सदस्यांनी सांगितले त्यामुळे तो निधी तात्काळ वितरित करण्यात यावा, नंदुरबार जिल्ह्यात शिक्षकांची बदली होऊन जाते परंतु ज्या प्रमाणात बदली होऊन जातात त्या प्रमाणात येणाऱ्यांची संख्या मात्र कमी असते, त्यादृष्टीने नंदुरबार जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा या मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याची खंत यावेळी सदस्यांनी केली, तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य विभागातून दोन तरंगते दवाखाने नर्मदा काठावर देण्यात आले असून ते दोघेही दवाखाने बंद आहे, तरंगता दवाखाना व जांगठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी काम करीत असल्याची तक्रार करण्यात आली, तर या केंद्रात खाजगी ठिकाणाहून औषधे खरेदी करण्यात आली असल्याची तक्रार करण्यात आली, 11 हजार 600 बॉटल आल्या होत्या त्यापैकी 8000 बॉटल वाटप करण्यात आलेत, त्यासाठी जिल्हा नियोजनाचा निधी वापरण्यात आला, उपकेंद्रात एकही अधिकारी व कर्मचारी राहत नसल्याची तक्रार करण्यात आली, तर मांडवी येथील नवीन इमारतीत एकही अधिकारी कर्मचारी राहत नसल्याची तक्रार करण्यात आली, त्या इमारतीला काटे लावून ठेवल्याची तक्रार करण्यात आली, त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात बांबूलन्स द्वारे झोळीतून रुग्ण आणणाऱ्यांसाठी मानधन देण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केली होती, या संदर्भात सदस्यांनी आक्षेप घेत जिल्ह्यात आत्तापर्यंत किती बांबूलन्सद्वारे रुग्ण वाहून आणणाऱ्यांना मानधन दिले यावर प्रश्न विचारला असता, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपण विचाराधीन असल्याचे यावेळी स्पष्टीकरण केले, तर भविष्यात अशाप्रकारे रुग्ण वाहून आणणाऱ्यांना मानधन देण्याचे प्रयोजन असल्याचे त्यांनी सांगितले, जिल्ह्यातील 534 पैकी 302 एएनएमच्या जागा रिक्त असल्याची यावेळी सांगितले, जलजीवन मिशनमध्ये धडगाव तालुक्यातील पालखा येथे पाण्याची टाकी बांधणाऱ्या ठेकेदाराच्या बिलावर आक्षेप घेण्यात आला, इंजिनिअर पैसे घेऊन सह्या करत असल्याची तक्रार जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी केली, संबंधित ठेकेदारीची कुवत नसताना त्याला कामे देण्यात आले आहेत, एका ठेकेदाराकडे दहा ते बारा कामे देण्यात आले आहेत त्याच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली, जलजीवन मिशनमध्ये खोदलेल्या रस्त्यांची चौकशी अद्यापपर्यंत पूर्ण का केली नाही? फक्त पाईपलाईन टाकण्यात आली तर त्यास नळ का लावण्यात आले नाही? असा घनाघात आरोप यावेळी सदस्यांनी केला, त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील झामणझर व खांडबारा येथील ग्राम पंचायतीत ग्रामसेवक येत नसल्याची गंभीर तक्रार करण्यात आली, त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेचे मस्टर हे भरले जात नाही, तर रोजगार सेवक ही या ठिकाणी उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांचे हप्ते वेळेवर मिळत नाही, अशी गंभीर तक्रार यावेळी करण्यात आली, त्याचप्रमाणे झामणझर व खांडबारा येथील ग्रामसेवकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली, यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध विकास कामाचा आढावा घेण्यात आला.

Komentáře • 3

  • @arjunvasave8300
    @arjunvasave8300 Před 22 dny

    कामे अपूर्ण आहे

  • @crockrochgames6443
    @crockrochgames6443 Před 23 dny +1

    kahi kame honar nahi.... adhyaksha madam files var sahi karayla tayar nahiyet .

    • @manishvalvi6520
      @manishvalvi6520 Před 23 dny

      मग हिला तोंड बघायला बसवले आहे का