लक्ष्मीनारायण मंदिर मांडवगण | भाग १ | मांडवगण | श्रीगोंदा | मांडव्य ऋषी | Lakshmi Narayan mandir

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 03. 2022
  • लक्ष्मी नारायण मंदिर, मांडवगण, श्रीगोंदा, अहमदनगर
    सरस्वती नदीच्या तटावर वसलेले श्रीपुरनगर अर्थात श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गाव नगर शहरापासून ३० किमी अंतरावर आहे. आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका हा साधुसंतांची भूमी असलेला आणि दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो, याच तालुक्यातील मांडवगण या गावात मांडव्य ऋषी ची तपोभूमी आणि संजीवन समाधी आहे म्हणून या गावाला मांडवगण असे नाव पडले. पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या गावातील लक्ष्मीनारायण मंदिर पुरातत्त्व विभागाने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
    मांडवगण गावातून कटाक्ष आणि वटाक्ष या दोन नद्या एकत्र येऊन संगम पावतात याच नदीच्या काठावर सिद्धेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, होळकरांचा वाडा आणि हे पुरातन लक्ष्मीनारायण मंदिर आहे. श्रीगोंदा तालुक्यात अनेक लक्ष्मी मंदिर आहेत त्यापैकी एक शहरांमध्ये शिंपी गल्ली मध्ये अगदी दुरावस्थेत असलेले यादवकालीन लक्ष्मी मंदिर, तसेच पांडे पेडगाव भुईकोट किल्ल्यातील म्हणजेच आजच्या धर्मवीर गडावरील लक्ष्मीनारायण मंदिर आणि हे मांडवगण येथील लक्ष्मीनारायण मंदिर, याच मंदिराला गावातील लोक गढी आईचे मंदिर म्हणून ही ओळखतात.
    मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरा समोर एक दगडी दिपमाळ नजरेस पडते. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या व गर्भगृहाच्या अशा दोन्ही द्वारशाखेवर उत्कृष्ट शिल्पांकन केलेले आपल्याला दिसून येते. मंदिरातील मुख्य लक्ष्मीनारायणाची मूर्ती यवन आक्रमणकारांनी खंडित केलेली दिसते. सध्या मंदिर हे पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून त्याची उत्तम प्रकारे डागडुजी व काळजी पूर्वक पुनर्बांधणी होत आहे.
    मंदिराचा पौराणिक संदर्भ काही सापडत नाही, मंदिर यादव कालीन असल्याचे समजते, मंदिराला पूर्वी तटबंदी होती, तसेच सद्यस्थितीत आणण्यासाठी पुरातत्व खात्याला मंदिराभोवती उत्खनन लेपण प्रक्रिया करावी लागली. गावात अनेक पुरातन मंदिरे असून गावाला यादव कालीन आणि पेशवेकालीन पार्श्वभूमी देखील आहे. गावाला भेट देण्यासाठी एकदा नक्की या.
    लेखक - रोहन गाडेकर, राहता
    #लक्ष्मीनारायण_मंदीर_मांडवगण
    #लक्ष्मीनारायण_मंदीर
    #lakshminarayan_mandir
    लक्ष्मीनारायण मंदिर..
    धन्यवाद
    जय महाराष्ट्र 🙏🚩

Komentáře • 41

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety

    Khoop. Sundar..

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 Před 2 lety

    Khup chhan🙏

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 Před 2 lety

    छान उपक्रम

  • @vandanashinde5274
    @vandanashinde5274 Před rokem +2

    जन्म गाव आहे या शाळेत मी शिकले या मंदिरामध्ये मधल्या सुट्टीत आम्ही सर्व मैत्रिणी दर्शनासाठी रोज जायचो 🙏🙏🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद घरी बसून दर्शन दिल्याबद्दल

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před rokem

      मनापासून आभार ताईसाहेब 😊🙏🚩

    • @vedantjeurkar1885
      @vedantjeurkar1885 Před 7 měsíci

      मी पण इथेच जन्माला आले व इथेच शिकले आहे माझे आवडते गाव आहे याला पूर्वी gaddhiaaiche मंदिर mhanat आम्ही इथे खेळायचो kranti jeurkar🙏🙏

  • @girishkubde3432
    @girishkubde3432 Před 2 lety +1

    Nice bhau ekch number

  • @rscmathsacademy317
    @rscmathsacademy317 Před 2 lety +1

    अत्यंत उपयुक्त माहिती देण्याचा छान उपक्रम आहे आपल्या पुरातन ठेव्याची माहिती देण्यासाठी खुप खुप धन्यवाद

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 Před 2 lety

    छान जय लक्ष्मीनारायण

  • @ganeshhinge6783
    @ganeshhinge6783 Před 2 lety

    मस्त 👌 भावा

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +1

      मनापासून धन्यवाद दादा लवकरच भेटू 🙏🚩

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद दादा 🙏🚩

  • @10th.user-for_study
    @10th.user-for_study Před 2 lety +2

    Part 2 jaldi dalo bro

  • @gdchannel1750
    @gdchannel1750 Před 2 lety

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ. 👌👌👌

  • @sohamingale1942
    @sohamingale1942 Před rokem +1

    Mandirat javun detat ka darshanala...Karan video chya survatila mandirache gate band hote

  • @user-lh7tu7ch8u
    @user-lh7tu7ch8u Před 2 lety

    बंधू अप्रतिम जय हिंदुराष्ट्र🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @vsenterprises877
    @vsenterprises877 Před 2 lety

    खूप छान दादा 🙏🏻🚩

  • @niteshpimplevlogs
    @niteshpimplevlogs Před 2 lety

    अप्रतिम 👌👌

  • @vijaykhendake7040
    @vijaykhendake7040 Před 2 lety

    Khup chan dada

  • @balirathod83
    @balirathod83 Před 2 lety +1

    Jago hindu🕉️ jago...

  • @mayurjadhav8127
    @mayurjadhav8127 Před 2 lety +1

    V Nice 👍

  • @kishorraut370
    @kishorraut370 Před 2 lety

    Kdkk bhava 👍

  • @happyworld33
    @happyworld33 Před 2 lety

    Nice video 👍👍👍

  • @10th.user-for_study
    @10th.user-for_study Před 2 lety +1

    Nice

  • @vishalpatil4780
    @vishalpatil4780 Před 2 lety

    nice video

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin Před rokem

    Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/73CUfQCD4H4/video.html
    Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/oNXdBVe--w0/video.html
    Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/5Taed5aYcqw/video.html
    Kanheri caves, Mumbai:
    czcams.com/video/VaqWBSUpCXk/video.html
    Lothal-Indus Valley Civilization:
    czcams.com/video/Gw_gluB0gyg/video.html
    Dholavira- Kutch Sindhu culture:
    czcams.com/video/xrxliZ7eZuM/video.html
    Karle caves, Lonavala:
    czcams.com/video/kOxBIkb3mPo/video.html

  • @user-jr6uk3oe4b
    @user-jr6uk3oe4b Před rokem

    तुमचा नंबर व्हाट्सअप टेक्स्ट मेसेज नी पाठवा