देवाचा कौल मिळाला तरच इथे पोळ्याचा सन साजरा होतो | शिरपुंजे भैरवगड | शिरपुंजे | shirpunje bhairavgad

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 06. 2022
  • ##maharashtradesha
    #maharashtra
    #shirpunjecha_bhairavgad
    शिरपुंजेच्या भैरवगडाविषयी... shirrpunje bhairavgad
    महाराष्ट्रात एकूण सहा भैरवगड आहेत. त्यापैकी २ भैरवगड हे हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत आहेत. हरिश्चंद्रगडावर टोलारखिंडीमार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड आहे, तर राजूरमार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंज्याचा भैरवगड आहे. शिरपुंजे गावाच्या मागे असलेल्या भैरवगडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा भरते. डोंगरयात्रेदरम्यान पायथ्याच्या गावात, गडावरच्या गुहेत नेहमी भेटणारे देव आणि या देवांच्या नावांमुळेच गडाला ही ओळख मिळालेली आहे. काही ठिकाणी तिथल्या देवांच्या नावानेच गडाला नावे पडलेली आहेत. त्याचप्रमाणे एक शिरपुंज्याचा भैरवगड. Shirrpunjecha bhairavgad डोंगरयात्रा करताना गिरिशिखरांची चढाई करताना, निबिड अरण्यातल्या वाटा तुडवताना अनेक देव-देवतांचे आपल्याला दर्शन घडते. अन्य देवदेवतांच्या नावे नसणारे काही गडकोट मात्र या भैरवदेवाच्या नावाने ओळखले जातात. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याला निसर्गाचे वरदान आणि सह्याद्रीच्या गडकोटांचे कोंदण लाभले आहे. लोभस भंडारदऱ्याच्या धरणाच्या अवतीभोवती नांदणारे गड म्हणजे सह्याद्रीभक्तांचे जीव की प्राण. या तालुक्यात कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही दिवशी या, इथला निसर्ग तुम्हाला वेड लावल्याशिवाय राहणार नाही. इथल्या शिरपुंजे गावात असंच एक गडरत्न उभे आहे. हे रत्न संपूर्ण पंचक्रोशीतल्या भाविकांचं श्रद्धास्थान असून क्षेत्र shirrpunje bhairavgad भैरवगड म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळेच इथे नेहमीच वर्दळ असते. या वर्दळीतल्या काहींना ध्यास दर्शनाचा, तर काहींना डोंगरचढाईचा. या सगळ्यात समान धागा एकच भैरवगडाचा माथा.shirpunjecha bhairavgad
    शिरपुंजे shirrpunje bhairavgad गावात आलो, की चहुबाजूंना डोंगररांगांचे तांडव सुरू असलेले दिसते. अंगावर आलेले, कातळांनी सजलेले. सुंदर आणि रौद्र अशा या डोंगरांचे संमेलन जणू डोंगरयात्रींना खिजवतेय की काय, असे वाटून जाते. डोंगरांच्या कुशीत अलगद पहुडलेल्या या देखण्या शिरपुंजे गावातून भैरवगडाकडे अत्यंत प्रशस्त आणि मळलेली वाट गेली आहे. थोडी मान वर करून पाहिले, तर तीन डोंगरांच्या नाकाडाच्या मध्ये शिखरापाशी भैरवाची गुहा अन् वाऱ्याच्या झोतासरशी फडकणारे झेंडे दिसतील. हीच ती ओळखीची खूण आणि आपले लक्ष्य. मग आपण चालू लागतो वाट ती थेट भैरवाकडेच. पायथ्याच्या कमानीपासून तासाभराच्या खड्या चढाईनंतर आपण येतो ते लोखंडी रेलिंगपाशी. इथे भक्तांचा नेहमीच राबता असल्यामुळे वनखात्याने अशा धोक्याच्या ठिकाणी ही रेलिंग लावलेली आहेत. ही रेलिंग पार करून आपण भैरवगडाच्या आणि शेजारच्या डोंगराच्या मधोमध असणाऱ्या खिंडीत येतो. या खिंडीत आल्यानंतर पलीकडे एक गाव दिसते. आंबित असे त्याचे नाव आहे. या आंबित गावातूनही एक वाट निघून या खिंडीत येऊन मिळते. खरेतर या खिंडीतून पुढे महाराष्ट्रातील तीन नंबरचे शिखर घनचक्कर आहे. खिंडीत आलो, की मग या भैरवगडाचे गडपण उलगडायला लागते. या खिंडीतूनच खड्या चढाईच्या आणि काहीशा गोलाकार कातळकोरीव पायऱ्या आपल्या समोर येतात.shirpunje bhairavgad
    खिंडीच्या वरच्या अंगाला एक टाके आहे. पुढे कातळात कोरलेल्या सुंदर पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून आल्यावर गडाची तटबंदी आणि उत्तराभिमुख उद्ध्वस्त प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली चार टाकी आहेत. त्याच्या पुढे एक कोरडे टाके आहे. ते पाहुन गुहेकडे (दक्षिणेकडे) जाण्याऱ्या पायवाटेने चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला खांब टाके आहे. टाक्यापर्यंत जाण्यासाठी असलेला मार्गही कातळ कोरून बनवलेला आहे. या टाक्याच्या बाजूला एक रांजण खळगा कोरलेला आहे, तर टाक्याच्या वरच्या बाजूला तीन रांजण खळगे खोदलेले आहेत. टाके आणि त्यावरील रांजण खळगे पाहून पुन्हा पायवाटेवर येऊन गुहेच्या दिशेने जाताना उजव्या बाजूला कातळात कोरलेली चार टाकी आहेत. त्याच्या वरच्या बाजूस आणखी चार टाकी आहेत. टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेली गुहा आहे. या गुहेला कमान असलेले प्रवेशव्दारही आहे. टाके आणि गुहा पाहून पुन्हा पायवाटेवर येउन उत्तरेला भैरोबाच्या गुहेकडे जाताना उजव्या बाजूला एक साडेचार फूट उंचीचा वीरगळ आहे. पुढे डाव्या बाजूला गुहेच्या वरच्या बाजूला एक वीरगळ दिसतो. या वीरगळाच्या चारही बाजू कोरलेल्या आहेत. वीरगळाजवळ गणपतीच्या झिजलेल्या मूर्ती शेंदूर लावून ठेवलेल्या दिसतात. त्या पाहून कातळात खोदलेल्या पायऱ्या उतरून कड्याच्या टोकावर कोरलेल्या भैरोबाच्या गुहेत जाताना बाहेरच्या बाजूला एक वीरगळ दिसतो, तर गुहेत भैरोबाची अश्वारूढ मूर्ती आहे. भैरोबाच्या गुहेच्या बाजूस असलेल्या गुहेत दहाजण राहू शकतात. गुहेच्या कड्याच्या बाजूला रेलिंग लावलेले आहे. इथून शिरपुंजे गाव आणि परिसर दिसतो. या रेलिंगच्या एका बाजूला फाटक बसवलेले आहे. तिथून खाली उतरण्याचा मार्ग आहे. खालच्या बाजूला एक गुहा आहे. तिचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा. भैरोबाचे दर्शन घेउन गुहेच्या वरच्या बाजूला येऊन डाव्या बाजूला वर चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेले एक टाके पाहायला मिळते. हे टाके पाहून गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेल्या दोन गुहा आहेत. दोन खांबावर तोललेल्या मोठ्या गुहेत आता मात्र पाणी साठल्यामुळे ती एखाद्या टाक्यासारखी दिसते. मोठ्या गुहेच्या उजव्या बाजूला छोटी गुहा आहे. ती ही पाण्याने भरलेली आहे. गुहा पाहून किल्ल्याच्या माथ्यावर जाणाऱ्या पायवाटेने पाच मिनिटांत आपण गड माथ्यावर पोहोचतो. इथे कातळात कोरलेली पाण्याची तीन टाकी आहेत. गडमाथ्यावरून दक्षिणेला हरिश्चंद्रगड आणि पाबरगड हे गड दिसतात.shirpunje bharavgad
    ता : अकोले , जि : अहमदनगर
    मार्ग : पुणे-नाशिक फाटा- -राजगुरूनगर-नारायणगाव-आळे फाटा -घोटा-कोतूळ -कोथळा -खडकी -आंबीत -शिरपुंजे.

Komentáře • 12

  • @ganeshdarekar5627
    @ganeshdarekar5627 Před 2 lety +1

    ♥️♥️

  • @ombelsare1439
    @ombelsare1439 Před 2 lety +1

    🙏🙏

  • @Shivsuryajaal
    @Shivsuryajaal Před 2 lety +1

    🚩🚩🙏🏻🙏🏻🧡🧡🧡

  • @Samadhan96
    @Samadhan96 Před 2 lety +1

    मस्तच..!!

  • @evnddhindale3800
    @evnddhindale3800 Před rokem

    🙏🙏👌👌

  • @yogesh_kale
    @yogesh_kale Před 2 lety +1

    Apratim nisarg ❤️

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin Před rokem

    Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/73CUfQCD4H4/video.html
    Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/oNXdBVe--w0/video.html
    Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/5Taed5aYcqw/video.html
    Kanheri caves, Mumbai:
    czcams.com/video/VaqWBSUpCXk/video.html
    Lothal-Indus Valley Civilization:
    czcams.com/video/Gw_gluB0gyg/video.html
    Dholavira- Kutch Sindhu culture:
    czcams.com/video/xrxliZ7eZuM/video.html
    Karle caves, Lonavala:
    czcams.com/video/kOxBIkb3mPo/video.html

  • @prashantpimpale2198
    @prashantpimpale2198 Před 2 lety +1

    Dada khup chaam channel aahe tumcha vele mule jast pahan hot nahi pn jevdh bggel te khup ch chaan ast ngar madhe asun ashyabkahi goshti mahiti nahi te tumhi dakvun deta nust dakvun nahi tr sakhol mahiti samor anta hindu dhrm kiti shresth aahe yatun prahiti yete dhy

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      दादाराव मनापासून धन्यवाद 😍🙏🚩