महाराष्ट्रातील एकमेव निद्रिस्त गणपती मंदीर | आव्हाणे बुद्रूक | Aavhane Budruk | Aavhane Budruk |

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2022
  • #ganesh #ganeshchaturthi #ganpati_bappa #ganpti_bappa_4k_full_screen_status #ganpati #trending
    संभाजीनगर : खुलताबाद येथील निद्रिस्त अवस्थेतील भद्रा मारुती बहुतांश भक्तांनी बघितला आहे. मात्र, त्याच सारखा निद्रिस्त गणपती आहे. हे वाचून आपल्याला आर्श्चयाचा धक्का बसला असेल; पण हे तेवढेच सत्य आहे. पैठणपासून अवघ्या ३० कि.मी. अंतरावर आव्हाणे या गावात श्रीगणेशाचे मंदिर आहे. असे म्हणतात की, देशातील ही गणरायाची निद्रिस्त अवस्थेतील एकमेव मूर्ती आहे. ती सुमारे ५०० वर्षे जुनी असल्याचे म्हटले जाते. आव्हाणे बुद्रूक येथील निद्रिस्त गणपती मंदीर
    ऐकावे ते नवलच... असेच उच्चार आपल्या मुखातून बाहेर पडले असतील. यंदाच्या गणेशोत्सवात निद्रिस्त श्रीगणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेणे गणेशभक्तांसाठी पर्वणीच ठरणार आहे. पैठणपासून ३० कि.मी, तर शेवगावपासून १३ कि.मी. अंतरावर आव्हाणे (बुद्रुक) नावाचे छोटेशे खेडे आहे. याच ठिकाणी निद्रिस्त अवस्थेतील दक्षिणमुखी गणपतीची स्वयंभू मूर्ती आहे. पूर्वी येथे छोटेशे मंदिर होते. राज्य सरकारने २००५ मध्ये या मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्राच्या यादीत केला. त्याद्वारे मिळालेल्या ४४ लाख रुपये निधीतून मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला. येथे आता चिरेबंदी मंदिर उभे राहिले आहे. जमिनीपासून तीन फूट खोल असलेली गणपतीची मूर्ती तीन बाय अडीच फुटांची व शेदरी रंगातील तिही दक्षिणमुखी आहे. वरील बाजूस काचेचे तावदान केले आहे. आत मूर्ती दिसण्यासाठी छोटासा लाईटही बसविण्यात आला आहे. ही श्रीमूर्ती पाहून प्रत्येक गणेशभक्त लीन होतो. आव्हाणे बुद्रूक येथील निद्रिस्त गणपती मंदीर. Aavhane Budruk ganpati mandir
    या मूर्तीच्या पाठीमागील बाजूस भिंतीमध्ये मोरेश्वराची मूर्ती ठेवण्यात आली आहे, तर बाजूच्या गाभाऱ्यात आणखी एक गणेशमूर्ती आहे. उल्लेखनीय म्हणजे एकाच मंदिरात वेगवेगळ्या आकारातील तीन गणेशमूर्ती आपणास पाहण्यास मिळतात. निसर्गरम्य परिसरात, प्रसन्न, शांत व निवांत वातावरणात भाविक हरखून जातात. Aavhane Budruk ganpati mandir
    स्वयंभू गणेशमूर्ती निद्रिस्त गणपती मंदिराचे पुजारी प्रदीप भालेराव यांनी सांगितले की, दादोबा देव हे गणेशभक्त होते. दरवर्षी ते मोरगावच्या मोरेश्वराच्या दर्शनाला पायी जात. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र गणोबा देव हे शेतात नांगरणी करताना नांगराचा फाळ एका वस्तूला लागून अडला. उकरल्यावर एक स्वयंभू गणेशाची निद्रिस्त अवस्थेतील मूर्ती दिसली. ही घटना ५०० वर्षे जुनी आहे. त्याच ठिकाणी आता भव्य मंदिर बांधले आहे.
    Music 🎼🎶 -
    • Ganpati song - He Gaja...
    धन्यवाद
    जय महाराष्ट्र मंडळी 😍🙏🚩

Komentáře • 19

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Před rokem +1

    Chan🙏🚩🚩

  • @AkhandBharatAB1
    @AkhandBharatAB1 Před rokem +1

    छान व्हिडिओ👍

  • @BikerBade
    @BikerBade Před rokem +1

    नेहमी प्रमाणेच दमदार व्हिडिओ 🚩🚩🚩🚩

  • @sunilmate6720
    @sunilmate6720 Před rokem +1

    छान व्हिडीओ..!!

  • @yogesh_kale
    @yogesh_kale Před rokem +1

    ||गणपती बाप्पा मोरया||

  • @vikrantmali2594
    @vikrantmali2594 Před rokem +1

    खुप छान बंधू .. 🚩 जय शिवराय जय जिजाऊ 🚩

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před rokem

      खुप खुप धन्यवाद बंधू 😍🥰🙏🤗🚩
      जय शिवराय 🙏🚩

  • @thepandit8747
    @thepandit8747 Před rokem +1

    👌 खूप छान व्हीडीओ & माहीती मिळाली 🙏🏻

  • @kailaspawar598
    @kailaspawar598 Před rokem +1

    धन्यवाद बंधु..... खुप छान माहिती दिली... प्रथम वंदन करतो श्री गणेश देवा

  • @aniketgundale1165
    @aniketgundale1165 Před rokem +1

    Pratham naman ganrayala busy khup Chan bhau hey Thikan kuthey aahye

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před rokem

      अ.नगर जिल्हा, शेवगाव तालुका, आव्हाणे बुद्रूक गाव

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin Před rokem

    Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/73CUfQCD4H4/video.html
    Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/oNXdBVe--w0/video.html
    Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/5Taed5aYcqw/video.html
    Kanheri caves, Mumbai:
    czcams.com/video/VaqWBSUpCXk/video.html
    Lothal-Indus Valley Civilization:
    czcams.com/video/Gw_gluB0gyg/video.html
    Dholavira- Kutch Sindhu culture:
    czcams.com/video/xrxliZ7eZuM/video.html
    Karle caves, Lonavala:
    czcams.com/video/kOxBIkb3mPo/video.html