सर्वांचे आभार माना आणि सर्वांची माफी मागा - Say Thank You & Sorry to all

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 09. 2022
  • Our ancient Shastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life, while walking on the path of action (Karmayog). It is said that the human birth is a unique tool to achieve this. Good wishes and blessings from people and the natural world play a vital role in achieving this. Expressing gratitude and apology to all is a sure fire way of gaining the same.
    What exactly is meant by Karma? What is the link between one’s destiny and Karma? What is the principle behind the give and take from several births and the people whom we meet? How to end this series of exchange of good and bad experiences? How do the various encounters with people help in our progress? What happens by thanking and apologizing to all? Learn the secret of everlasting pace of mind while practising Dhyan with Smt. Amruta Chandorkar from Niraamay! Watch the video for details and share it with those who seek growth by discharging their duties, while not getting caught in the fruits of action.
    सर्वांचे आभार माना आणि सर्वांची माफी मागा
    आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे असे मानले जाते. हे साध्य करण्यासाठी निसर्गातील शक्ती आणि लोकांच्या शुभेच्छा व आशीर्वाद महत्त्वाची भूमिका बजावतात. कृतज्ञता व्यक्त करणे व क्षमायाचना करणे यातून ते नक्कीच मिळविता येतात.
    कर्म म्हणजे नक्की काय? भाग्य व कर्म यांचा काय संबंध आहे? जन्मोजन्मीची देणी-घेणी व आपल्याला भेटणारी माणसे या मागे कोणता सिद्धांत आहे? ही चांगले-वाईट देण्या-घेण्याची मालिका कशी संपवायची? लोकांकडून येणारे विविध अनुभव आपल्या प्रगतीत कसा हातभार लावतात? सर्वांचे आभार मानल्याने व क्षमा मागितल्याने काय होते? निरामयच्या श्रीमती. अमृता चांदोरकर यांच्यासोबत ध्यान करताना चिरकाल टिकणाऱ्या मनःशांतीचे गुपित जाणून घ्या! अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा आणि कर्मफळामध्ये न गुंतता कर्तव्य पार पाडत प्रगती करू पाहणाऱ्यांना नक्की पाठवा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #thankyou #sorry #Meditation #Dhyan #holisticsciences #bliss #energyhealing #energy #ancientShastras #Meditation #Swayampurnaupchar #Karmayog #wellbeing #niraamay #niraamaywellnesscenter #Karmayog #success
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 125

  • @user-jh2xg2wd9k
    @user-jh2xg2wd9k Před 2 měsíci +5

    मॅडम तुम्ही बोलायला सुरुवात केली कि असे वाटते कि गोड अमृताचा झरा वाहतोय तुम्ही बोलतच राहावे आणि आम्ही शांत चित्ताने फक्त एैकतच रहावे आपण कुठे तरी वेगळ्याच विश्वात गेल्या सारखे वाटते एक वेगळीच मन शांती मिळते हे तुमचे मधूर मधासारखे गोड बोलणे कधीही संपूच नये असे वाटते🙏💐👌👌❤😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci +1

      खूप खूप धन्यवाद 🙏
      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत.

    • @sanjaysawant6042
      @sanjaysawant6042 Před 21 dnem

      तुमच्या वाणीतून देवी सरस्वती बोलत आहे.

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před rokem +7

    समोरचा कसा वागतोय किंवा कसा बोलतोय यापेक्षा आपण चुकत नाही ना ह्याची काळजी घ्यावी. तुमच्या बोलण्या मुळे संपूर्ण गत आयुष्य आठवले , ऋणानुबंध जोडणारे माणसं आठवलीत. खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Před dnem

    ❤❤❤❤

  • @prasadkale6594
    @prasadkale6594 Před rokem +4

    खूप हलक वाटल.. मनात पूर्वग्रह व काही प्रमाणात कोणा बद्दल राग होता तो तात्काळ कमी झाला ...नियमित अस ध्यान लावून बसल तर द्वेष भावना नक्कीच कमी होईल...आणि छोट्या छोट्या गोष्टीच रागच येणार नाही...अशी स्थिती येईल..🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +2

      निसर्गातील शक्ती आणि लोकांच्या शुभेच्छा व आशीर्वाद महत्त्वाची भूमिका बजावतात. कृतज्ञता व्यक्त करणे व क्षमायाचना करणे यातून ते नक्कीच मिळविता येतात. नक्की करा, फायदा होईल आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @vijayadahake8302
    @vijayadahake8302 Před měsícem

    ताई फार धन्यवाद

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem +1

    🙏🌹

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před rokem

    🙏🙏🙏

  • @svlifestyle6685
    @svlifestyle6685 Před rokem

    🙏🙏

  • @shailendrapatil7111
    @shailendrapatil7111 Před rokem

    🌻🙏🌻
    गुरु मां को शतषः प्रणाम

  • @pradnyapawar5662
    @pradnyapawar5662 Před rokem +2

    मनातील सर्व चुकीच्या भावना नष्ट होऊन सगळ्याची माफी मागते आणि सर्वांना माफ करते खूप छान हलके वाटत आहे,सर्व खूप छान होत आहे,धन्यवाद ताई🙏🌹सर्वांचे आभार ज्यांनी मदत केली त्यांचे पण आणि ज्यांनी मदत नाकारली त्यांचेही मनापासून आभार🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      वा! खूपच छान! नियमित करा ,आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @varshajagdale1282
    @varshajagdale1282 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Před rokem

    🙏👏🌹🚩

  • @jyotibhosale5268
    @jyotibhosale5268 Před rokem

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹

  • @mayanavathar2169
    @mayanavathar2169 Před rokem

    Thanks a lot God

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 Před rokem

    खूपच सुंदर ध्यान मनापासून आभार🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
      धन्यवाद

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před rokem

    Very relax🙏🙏

  • @claredsouza8141
    @claredsouza8141 Před rokem

    Thank you Madam

  • @karunajangale5375
    @karunajangale5375 Před 5 měsíci

    धन्यवाद.

  • @ajinkya0212pawar
    @ajinkya0212pawar Před rokem

    Manapasun abhar 🙏🙏🙏🌹🌹

  • @nehamusicnikumbh449
    @nehamusicnikumbh449 Před rokem

    खूप खूप धन्यवाद🙏🌹🙏

  • @ashwinijadhav9788
    @ashwinijadhav9788 Před 5 měsíci

    मॅडम खूप छान सांगितल तुम्ही यासाठी तुमचे मनःपूर्वक धन्यवाद ❤❤

  • @kedarpatkar998
    @kedarpatkar998 Před rokem

    अप्रतिम, आपणास मनपूर्वक धन्यवाद आणी आशीर्वाद

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 Před 11 měsíci

    धन्यवाद 🙏

  • @pramodnagrale1097
    @pramodnagrale1097 Před rokem

    Thankyou tai ekat astanna sopp vatte

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před rokem +3

    मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @alkameher2514
    @alkameher2514 Před 2 měsíci

    धन्यवाद, श्रीराम ❤❤❤

  • @rohinipande
    @rohinipande Před 7 měsíci

    खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @ajinkya0212pawar
    @ajinkya0212pawar Před rokem

    🙏🙏🙏🌹🌹🌹👌👍

  • @gaurikotwal7045
    @gaurikotwal7045 Před rokem

    मनापासुन धन्यवाद mam....

  • @supriyajadhav2005
    @supriyajadhav2005 Před rokem

    खुपच सुंदर ध्यान, मनापासून आभार मॅडम 🙏🙏👌👌👌

  • @surendraladgaonkar7279
    @surendraladgaonkar7279 Před 6 měsíci

    Like very much

  • @vaijayantibirdawde1398
    @vaijayantibirdawde1398 Před 8 měsíci

    Thnx madam.sadguru bless yu lot.

  • @pushpagarule8610
    @pushpagarule8610 Před rokem

    अप्रतिम ताई

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 Před rokem

    आत्मा नमस्ते 🙏❤️

  • @aniljoshi5133
    @aniljoshi5133 Před rokem

    सुंदर अनुभव

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Před rokem

    खरचं खूप मन:पूर्वक धन्यवाद
    अतिशय सुंदर ध्यान घेतले 🙏🌹

  • @rajendrakolvankar6187

    खुप उत्तम मार्गदर्शन 🙏

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před rokem

    खूप सुंदर 🙏 मनापासून धन्यवाद ताई

  • @bhagyashreehegde6801
    @bhagyashreehegde6801 Před rokem

    Namskar.khup khup aabhar

  • @rajaninaik7057
    @rajaninaik7057 Před rokem

    Khoop chhan Doctor

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 Před rokem

    Khup chhan 👍🏽🙏👌

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před rokem

    Dhanywad mam Khup Chan vatle 🙏🙏🙏kiti Chhan kam kartay 👌👍

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 Před rokem

    Jaysdguru

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před 10 měsíci

    Thanks for helping 🙏🙏🙏🙏

  • @sarojanigawande6021
    @sarojanigawande6021 Před rokem

    Khupach chan

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 Před rokem

    Khup chan🙏🏼

  • @vinaypathare3527
    @vinaypathare3527 Před rokem

    Your best video I liked Thanks

  • @pradnyapawar5662
    @pradnyapawar5662 Před rokem

    खूप खूप धन्यवाद ताई ,नक्कीच मार्ग मिळेल तुमच्या संगण्यातून🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏,
      होय , नक्की करा, फायदा होईल आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 Před rokem +1

    खुपच छान, समाधान मिळालं. मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर 🙏🙏🌹🌹

  • @neetashelatkar6651
    @neetashelatkar6651 Před rokem

    खुप छान माहिती सांगितली धन्यवात माम्...💐👌

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 Před rokem

    Very good Dhyan.Nice Video.

  • @jayashreephanse1585
    @jayashreephanse1585 Před rokem

    नमस्कार, कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी चा उत्तम उपाय सुचवलात.खूप खूप धन्यवाद, आणि तुमचेही मनापासून आभार .

  • @gangamainarawade465
    @gangamainarawade465 Před 8 měsíci

    Thank you, thank you, thank you so much, Tai khup chan halake halake vatale 😊❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 8 měsíci

      खूप खूप आभार 🙏,
      आपण Video च्या माध्यमातून ध्यानाचा चांगला लाभ घेत आहात. आपण सकारात्मक आहात त्यामुळे जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @poojakamble6525
    @poojakamble6525 Před rokem

    Tai jadaci sagali pane Khali padatana pahun khup halk vatal Mana varil varv ozi nahisa jhalai💙 Thank you Tai 💙🦋✨⭐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूपच छान. नियमित करा आणि निरोगी रहा.
      धन्यवाद 🙏

  • @pradnyapawar5662
    @pradnyapawar5662 Před rokem

    खूप छान माहिती ,खरंच आहे ,शब्द नाही सांगायला

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před rokem

    It's true information given by Doctor 💊🏥 Amruta Chandorkar madam, he dhanyawad and kshama prarthana karane jarurette aahe, mazya kadhun Roz hote and mann prasanna and shant rahate

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूपच छान. नियमित करत राहा आणि निरोगी रहा.

  • @rupalikadam8751
    @rupalikadam8751 Před 2 měsíci

    Mazi mulagi swara Tila Spinal Muscular Atrophy (SMA) ha tras aahe tyamule Tila proper chalayla uthayla jamat nahi yavar kahi upay aahe ka.plz sanga yavar kahi aapnan treatment hoil ka tiche aata age 11 years aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @shreeshpatil1697
    @shreeshpatil1697 Před rokem

    Ka kunas thauk radu aal he yogya aahe kay ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा.

  • @kanademanasi
    @kanademanasi Před 13 dny

    मेडिटेशन ला बसल्यावर अंगाला खाज सुटते 😢😢 एरवी नाही सुटत 🙏🏻🙏🏻सल्ला अपेक्षित

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 dny

      सतत खाज येण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे वात आणि दुसरे म्हणजे शरीरातील अग्नी वाढला असेल तर कोरडेपणा येतो त्यामुळे देखील खाज येऊ शकते. वायू तत्वाचा गुणधर्म आहे चंचलता. त्यामुळे ध्यानाला जेव्हा तुम्ही शांत होऊन बसण्याचा प्रयत्न करता तेव्हा खाज येणे त्वचा कोरडी होऊन खाज येण्याची शक्यता असू शकते.

  • @chandashah3147
    @chandashah3147 Před 5 měsíci

    डोके दुखी साठी कोणती मुद्रा करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      नमस्कार,
      मुद्रा ही पंचतत्व संतुलनाची क्रिया आहे, यामध्ये डोकेदुखीचे कारण, अपुरी झोप असू शकते, पित्त असू शकते, सायनस असू शकते, आपले कारण काय आहे हे शोधावे आणि त्या अनुरूप पुढील लिंक वर क्लिक करून मुद्रा विषयीची अधिक माहिती घ्यावी त्या अनुसार मुद्रा करू शकता.
      १) मुद्राशास्त्र - czcams.com/play/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A.html
      किंवा कोणती मुद्रा कधी कराल? हा Video पाहून अधिक माहिती घेऊ शकता.
      २) कोणती मुद्रा कधी कराल? - czcams.com/video/OikZWUVM36o/video.html

  • @reshmadabhade2692
    @reshmadabhade2692 Před 3 dny

    किती वेळा करावे दिवस भरात

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 dny

      नमस्कार,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @purvaguney4390
    @purvaguney4390 Před rokem

    0 अवस्था कधी येते .जेव्हा मनात एकही विचार सकारात्मक किंवा नकार रातmak..येत नाही तेव्हा .उत्तर सांगा .......

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      अगदी बरोबर! जेव्हा मनात कोणताही विचार नाही अशी निर्विचार निर्विकार स्थिति म्हणजे शून्यावस्था. ती मिळविण्यासाठी आधी मनाची स्वच्छता आणि शुद्धता झाली पाहिजे. त्यासाठीही वेगवेगळे ध्यान प्रकार याच प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. धन्यवाद 🙏