Dhyan for complete physical & mental wellbeing - संपूर्ण शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी ध्यान

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 05. 2022
  • According to our ancient Shastras (holistic sciences), humans are capable of moving towards eternal bliss while engaged in Karmayog (path of action). A healthy body is this first step in this endeavour. Dhyan (meditation in which attention is focussed on the object of concentration) is a powerful technique of moving towards complete health by keeping the mind joyful. What happens when we express gratitude towards our parents, Guru and the Parameshwar (cosmic consciousness)? How exactly does Dhyan help in maintaining physical and psychological health? What is the role of Dhyan in disseminating the cosmic energy across all organs and cells? How does the Saman Mudra (specific finger arrangement) help the Panchtatvas (five basic elements) in the body? What are the benefits of getting rid of worries, stress, dejection and negativity entrenched in the mind? Explore the path to complete health while practising Dhyan with Dr Amruta Chandorkar from Niraamay. Do watch this video and share it with those seeking a disease-free life!
    -----
    संपूर्ण आरोग्यासाठी ध्यान
    कर्ममार्गावर असतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे हे मनुष्य जन्मात शक्य आहे असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. या कामी सशक्त शरीर ही पहिली पायरी आहे. मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. आई-वडील, गुरु व परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याने काय होते? शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा कसा उपयोग होतो? प्रत्येक अवयव व पेशींपर्यंत उर्जा पोहोचविण्यात ध्यानाची भूमिका कोणती? समान मुद्रेचा शरीरातील पंचतत्वांना काय लाभ होतो? मनातील चिंता, ताण, निराशा व नकारात्मकता गेल्याने कोणते फायदे होतात? निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करताना संपूर्ण आरोग्याचा मार्ग समजून घ्या. सदर व्हिडीयो नक्की पहा व निरोगी आयुष्य इच्छिणाऱ्या सर्वांना पाठवा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #Dhyan #Completehealth #prachinshastra #holistic #science #bliss #Meditation #Karmayog #concentration #cosmicenergy #samanmudra #Panchtatvas #stress #dejection #negativity #NiraamayWellnesscenter #Niraamay #DrAmrutaChandorkar #Dryogeshchandorkar #holisticwellness
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 2,5K

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Před 11 měsíci +17

    मॅडम तुम्ही किती भावपूर्ण शब्दात बोलता तुम्ही आम्हाला सांगितलेली प्रार्थना परमेश्वराशी नक्कीच पोहोचली असे वाटले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci +2

      मनापासून धन्यवाद 🙏,
      तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न.

    • @surekhajadhav6435
      @surekhajadhav6435 Před 9 měsíci +1

      ​@@NiraamayWellnessCenter😮😮

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Před 9 měsíci +5

    मॅडम तुमचे किती आभार मानले तरी कमीच आहेत मनाला उभारी येते स्वामीतुमचे कल्याण करोत्त न

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 9 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद !
      तुमच्या शुभेच्छा हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      असाच स्नेह कायम ठेवा. अशाच सदिच्छा कायम राहू देत. 🙏🙏

  • @nutanmore5771
    @nutanmore5771 Před rokem +86

    नमस्कार ! मी नुतन हळदणकर . मलाही खुप छान अनुभव आला आहे. मी वयाच्या ४५व्या वर्षी माझ्या बाळांची आई होऊ शकले. डाॕ.वानखेडे मॕडम च्या सांगण्याप्रमाणे उपचार (ध्यान) करत राहीले.आॕफिसला येता जाता, बसमध्ये, ट्रेनमध्ये वेळ असेल त्या प्रमाणे निरामय चे व्हिडिओ बघून उपचार घेत होते. त्याचा मला खूपच छान अनुभव आला आणि आज माझ्या मुली ६ महिन्याच्या आहेत. खूप छान, निरोगी आणि आनंदी आहेत. निरामयच्या संपूर्ण परीवाराचे खूप खूप आभार. असेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक व्हिडिओ येत राहू दे. डाॕ. योगेश सर आणि अमृता मॕडमच्या मार्गदर्शनाने सर्वाँचे जीवन आनंदी होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना . धन्यवाद !

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +4

      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      धन्यवाद 🙏

    • @sadhanawadkar4359
      @sadhanawadkar4359 Před 6 měsíci +2

      धन्यवाद धन्यवाद मॅडम 1:02

    • @nilimakulkarni797
      @nilimakulkarni797 Před 4 měsíci

      ​@@NiraamayWellnessCenterछान.

    • @sumitdeshmukh9506
      @sumitdeshmukh9506 Před 3 měsíci

      🙏🙏

    • @sumitdeshmukh9506
      @sumitdeshmukh9506 Před 3 měsíci

      @@NiraamayWellnessCenter 🙏🙏

  • @01Pranita
    @01Pranita Před rokem +11

    मन शांत आणि प्रसन्न होते...आम्ही मागच्या 2 आठवड्यापासून रोज meditation करतो आहोत...खूप छान वाटते.... मॅडम तुमचा आवाज ऐकूनच अर्धा त्रास कमी झाल्यासारखा वाटतो.....असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा... खुप खुप धन्यवाद 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +2

      मनःपूर्वक आभार 🙏
      नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा आणि इतरांना देखील शेअर करा.

    • @rekhaathalye5422
      @rekhaathalye5422 Před 5 měsíci +1

      मन सुखावून जाते.दिवसभर शांत व प्रसन्न वाटते 🙏🙏

    • @anitachavan7946
      @anitachavan7946 Před měsícem

      मॅडम सर्वप्रथम तुम्हाला माझा नमस्कार 🙏 तुमचा गोड आवाज मनाला भावून जातो मन प्रसन्न करतो. तुमचे व्हिडिओ बघून खूप छान वाटते. मॅडम माझा एक प्रॉब्लेम आहे मी डॉक्टर कडे गेले की माझा बीपी वाढतो मला खूप भीती वाटू लागते मॅडम असे का होत असेल? माझा आत्मविश्वास कमी कमी होत जातो आणि शरीर आपोआपच थरथरूम लागते. मला बीपीचा त्रास आहे पण मी घरी एकदम नॉर्मल असते पण डॉक्टर कडे गेले की अचानक माझा बीपी वाढतो काय कारण असावे.मॅडम प्लीज मार्गदर्शन कराल? मी तुमच्या मला नाही सेंटरला भेट देऊन पाच सहा आठवडे झाले. रोज तुमचा व्हिडिओ पाहून मेडिटेशन करीत आहे. 🙏

  • @sulbhajog9253
    @sulbhajog9253 Před 7 měsíci +3

    भावपूर्ण निरूपण,मन शान्त वाटते।धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 7 měsíci

      🙏🙏नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis8622 Před 2 lety +7

    खूपच छान आणी शांत वाटलं असंच सांगत राहा ताई. तुम्हाला ऐकल्यावर फारच शांत आणी गोड वाटतं. 🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

    • @yasmeendarwajkar6013
      @yasmeendarwajkar6013 Před rokem

      मी केले हिलींग मला खूपच छान वाटतयं सर्वच स्टाफ खूप सपोर्ट करणारे आहेत त्यामुळे करण्याची इच्छा होते फरक पडतो व्हिडिओ शेयर पण काले

    • @yasmeendarwajkar6013
      @yasmeendarwajkar6013 Před rokem +1

      व्हिडिओ शेयर केले माफ करा लिहताना चुकले जरा पहिल्या मेसेज मध्ये

  • @tejashree2730
    @tejashree2730 Před 14 dny +2

    नमस्कार, मी माझ्या आई साठी meditation करत आहे फक्त 2 दिवसात मला खूप फरक जाणवतोय. तुमचे जेवढे आभार मानावे ते कमी च आहेत... शब्द नाहीत बोलायला.... thank u ❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 13 dny

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला व आपल्या आईलाही मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.

  • @sanjaysawant8403
    @sanjaysawant8403 Před 4 dny

    नमस्कार,
    खूप सुखद अनुभव,
    सोनेरी प्रकाश चमकला..धन्यवाद ,आभारी आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 16 hodinami

      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 Před 9 měsíci +3

    क्षणांमध्ये मला खूपच रिलॅक्स वाटले. Piece full meditation.......Thank u so much Amruta madam❤❤❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 9 měsíci

      You're welcome 😊. ध्यानाचा खूप छान अनुभव घेत आहात.
      नियमित ध्यान करत राहा. नियमित ध्यान केल्याने आरोग्य मिळेल, मनशांती मिळेल आणि आत्मविश्वास देखील वाढेल.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.

  • @suchitajain35
    @suchitajain35 Před 2 lety +6

    Yah prathna dene ke liye mam aapka बहुत-बहुत dhanyvad 🙏, bahut dino se yah vichar uth rahe the ki jab bhi hum treatment ke liye baithe iss tarah ki prathna hamare sath Ho taki hamare swasthya ko aur Bal mile, aapke Shabd aur bhav antar man tak Dil Ko chhu jaate Hain, Dhyan ki gehraiyon mein utarna ho pata hai mam, itna Sundar nimitt banne ke liye aapka कोटि-कोटि dhanyvad 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, असेच पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा आणि आपला अनुभव जरूर कळवा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @taradaga5335
      @taradaga5335 Před rokem

      Khoob Achcha video

  • @archanakapileshwari8154
    @archanakapileshwari8154 Před rokem +1

    मला तुमचे असे व्हिडिओ बघताना खूप रडू येते मी डोळे बंद करून हे ऐकू लागले की खूप मन हळवे होते काय कारण असावे
    तुमचा चेहरा आवाज देवी चा भास होतो खूप खूप शांत वाटते थँक्यू very much mam God bless you always ❤️

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
      अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा. माणसानं हळवे असावे पण त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी आपण निरामयचे इतरही video मन निरामयच्या भागात पाहू शकता.

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 Před 11 měsíci +1

    ताई मी आज पासून हा व्हिडिओ ऐकण्यास सुरुवात केली अन् पहिल्याच दिवसी positive परिणाम दिसू लागला , खुप खुप धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      वा! खूपच छान..
      जेवढा ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि असेच आपले अनुभव आम्हाला कळवत राहा.
      धन्यवाद 🙏

  • @yogininaik9039
    @yogininaik9039 Před rokem +12

    12.02 Rejuvenating experience.❤The genuineness and intensity in your voice touched my heart and that is what makes this meditation unique.
    Thank you so much Dr Amruta ma’am!🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +2

      Well said!
      Your welcome.

    • @yoginikulkarni3979
      @yoginikulkarni3979 Před rokem

      Khup chan v prassan vatte video iklyavar.
      👌👍🙏🙏

    • @prabhakarravrane9760
      @prabhakarravrane9760 Před rokem

      ध्यान चालू केल्यापासून चांगला फरक वाटत आहे.
      विचार मात्र येत राहतात. त्यामुळे मुद्रा मध्येच सुटते. सर्दीचा त्रास कमी आहे. परंतु खोकला वाढला आहे. कफ पडतो.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      सर आपण नियमित उपचार घेताना दिसत आहे परंतु उपचाराची संख्या थोडी कमी पडत आहे असो सर्दीचा त्रास देखील कमी होईल. आपण निरामयच्या तज्ञांना जेव्हा Follow up ला भेटाल तेव्हा अवश्य पुन्हा या त्रासाबद्दल सांगू शकता.
      धन्यवाद.

    • @nalinithombare6964
      @nalinithombare6964 Před 10 měsíci

      ​@@prabhakarravrane9760g sp b

  • @pradnyajadhav4256
    @pradnyajadhav4256 Před 6 měsíci +4

    Amazing experience... Today is the 2nd day of this treatment.. My anxiety has issue has reduced nd now my mind is at peace.. Feeling much better after listening to this audio... Gratitude to you Ma'am 🙏❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात, त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे.असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 .

  • @chandrashekharthakur5030
    @chandrashekharthakur5030 Před 3 měsíci

    मी आपल्या सूचनेप्रमाणे पहिल्यांदा झोपेतून उठल्यावर ध्यान केले . त्यामुळे मला फरक जाणवला तो असा की उठताना मला झोप व्यवस्थित न होण्यामुळे जो तजेला freshness शरीराला हवा असतो तो मिळत नसे ; पण ह्या समान मुद्रे मुळे तो अनुभवता आला . त्यामुळे शांतपण, मनस्वास्थ्य वाढवेल ही खात्री झाली . आज ही सुरुवात केली ती नित्य करीन .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      वा! खूपच छान अनुभव आहे.असेच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद 🙏

  • @virajvitonde7075
    @virajvitonde7075 Před měsícem

    मी अलिकडे च तुमचे व्हिडिओ पाहा यला लागले आहे. खूपच छान आणि प्रसन्न वाटत. मी हा मुद्रा व्हिडिओ आत्ता झोपण्यापूर्वी बघितला. आणि तुमच्या बरोबरच प्रतेयक शब्द उच्चारून, तुमच्या बरोबरच त्या ईश्वराला प्रार्थना केली. आणि मला खात्री आहे की, मला शांत झोप लागेल. मी झोपण्यापूर्वी रोज हे मुद्रा ध्यान हा व्हिडिओ बघून करीन. खर तर मला डॉ. अमृता ताईंना भेटायची इच्छा आणि खूप गरज आहे. मला माझ्या समस्येतून लवकर बाहेर पडायचे आहे. माझी लवकर त्यांच्याशी भेट होऊदे अशी देवाजवळ प्रार्थना करते मला त्यांची apoinment मिळत नाही.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      नमस्कार,
      तुमच्या समस्येतून लवकर बाहेर पडण्यासाठी अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. कृपया आपण आपला फोन क्रमांक आम्हास पाठवावा आपल्याला संपर्क करता येईल किंवा नितीन सरांशी दुपारी ३.०० नंतर पुढील क्रमांकावर संपर्क करू शकता.
      शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @ganpatrasal2975
    @ganpatrasal2975 Před 10 měsíci +5

    Really this meditation makes me feel calm and fresh.Thanks mam.

  • @aaryaingawale8860
    @aaryaingawale8860 Před 9 měsíci +4

    Relax and refreshing meditation thanks madam may god bless u with good health 😊

  • @pallaviparandekar6001

    ही मुद्रा मी व्हिडीओ बघीतल्यापासून रोज करते आणि आपला हा व्हिडीओ लावून आपल्या बरोबर प्रत्येक शब्दाचा-प्रार्थनेचा उच्चार करून मुद्रा करते झोपण्यापूर्वी. खूप शांत वाटते आणि शांत झोप लागते. 🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      फारच छान!
      तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमितने आणि सातत्याने करा आणि पूर्णपणे बरे व्हा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @sangitakhole6384
    @sangitakhole6384 Před rokem +1

    खूप छान वाटते मी रोज ध्यानाच्या वेळेस हा व्हिडिओ लावते खूप समाधान मिळते शांत वाटते धन्यवाद मॅडम.गुरू पौर्णिमा म्हणून नमस्कार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏
      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      पुढे येणारे मन निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 Před 2 lety +7

    Very good Dhyan for complete physical & mental wellbeing.

  • @neelesh752
    @neelesh752 Před rokem +2

    Amazing feeling thank you 🙏🏻

  • @freeguy1604
    @freeguy1604 Před rokem +1

    पूर्ण मन आणि तन मोकळं झाले, खूप छान व मदतगार व्हिडिओ आहे हा 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. सशक्त शरीर ही पहिली पायरी आहे. नियमित ध्यान करत जा.निरोगी आयुष्य इच्छिणाऱ्या सर्वांना पाठवा!
      धन्यवाद 🙏.

  • @yasmeendarwajkar6013
    @yasmeendarwajkar6013 Před 4 měsíci

    निरामय वेलनेस सेंटरचे डाॅक्टर आणि उपचारक यांना आमच्या सर्व परिवारांकडून नववर्षाच्या शूभेच्या💯🎊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      आपणास आणि आपल्या परिवारातील सर्व सदस्यांना देखील निरामय परिवाराकडून इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @arundhatiraval9687
    @arundhatiraval9687 Před rokem +4

    Mam i get very strong vibrations while listening to this and taking healing! Its a feeling which i cant express, the strong vibrations come from within and expands throughout the body. It is an amazing feeling. Those vibrations come in waves not constantly but frequently. I hope this is normal and helping me heal!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      वा! खूपच छान अनुभव आपण या ध्यानाच्या माध्यमातून घेत आहात. असेच नियमित ध्यान करत राहा. ध्यानाची नियमितता आपणास जरूर निरोगी राहण्यास मदत करेल.
      धन्यवाद🙏.

    • @sandhyashirke8775
      @sandhyashirke8775 Před rokem

      खूप छान अनुभव येत आहे मनामध्ये

  • @rasshmigupte1231
    @rasshmigupte1231 Před rokem +5

    🙏 grateful for such a peaceful experience .

  • @yasmeendarwajkar6013
    @yasmeendarwajkar6013 Před rokem

    निरामय वेलनेस सेंटर मुळे मला खूप आधार मिळाला मला अस वाटते माझे हे माहेर आहे बहिनीला जसे समजवतात तसे मला समजावल मी सर्व टिमची खूप आभारी आहे मला शक्ती ,बळ मिळाले मला खूप फरक पडला आहे निरामय सेंटर 👍👌🙏💯

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      फारच छान! नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा .

  • @shailajamandale9389
    @shailajamandale9389 Před 8 měsíci +1

    काल पासून ऐकते आहे, आत्मविश्वास वाढला आहे, खूप छान वाटत आहे, thank u Dr Amruta Madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 8 měsíci

      खूप खूप आभार 🙏,
      सशक्त शरीर ही पहिली पायरी आहे. मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. त्यामुळे जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवत राहा.

  • @chandrikakamath3336
    @chandrikakamath3336 Před rokem +3

    It’s too good an experience becoming healthy happy , god bless your team for all time success

  • @user-nt8jc6rx7d
    @user-nt8jc6rx7d Před rokem +6

    Excellent experience thanks mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏

    • @vinodgujar7782
      @vinodgujar7782 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter A very soothing experience of dhyan while taking treatment
      Just marvelous & heart touching experience for me due to this improving very fast Amruta Mam
      Your voice has mother touch feelings

  • @jayashrikulkarni1323
    @jayashrikulkarni1323 Před rokem +2

    धन्यवाद रश्मी Kulgod ,तुझ्यामुळे मी इथे आले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      रश्मीजी पूर्वीपासूनच निरामय परिवाराच्या सदस्य आहेत आणि आता आपणही.. 👍

  • @ashachaudhari1973
    @ashachaudhari1973 Před rokem +1

    खूपच छान वाटते आपला आवाज परमेश्वर शी मन जोडतो धन्यवाद

  • @meerasolanke101
    @meerasolanke101 Před 2 lety +7

    Very soothing and peaceful meditation. Thank you so much.

  • @kshiprajawdekar9719
    @kshiprajawdekar9719 Před 2 lety +25

    Best line which is most important part of this dhyaan: Maza majhya varcha vishwaas dhrudh houde. Parmeshwara, maza tujhya varcha vishwaas dhrudh houde. Hyanich swathala confidence yeto!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +3

      होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

    • @madhukarsapkal548
      @madhukarsapkal548 Před 2 lety +1

      🙏🙏🙏🙏🙏

    • @madhukarsapkal548
      @madhukarsapkal548 Před rokem

      🙏🙏🙏🙏🙏

    • @vaidehimukhedkar652
      @vaidehimukhedkar652 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter khup chan vatle

    • @savitakokare1992
      @savitakokare1992 Před rokem

      Very nice . Feeling so relax and peaceful. Starting little stress-free. 🙏🙏🌼🌼

  • @pallavimarathe4110
    @pallavimarathe4110 Před 3 měsíci

    नमस्कार!एक वर्ष होऊन गेले. मी नियमीतपणे समानमुद्रा आणि पृथ्वी मुद्रा करत आहे. मला खूप चांगला अनुभव आला. असेच मार्गदर्शन मिळावे ही प्रार्थना!धन्यवाद!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      मनःपूर्वक आभार ! असेच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @alkajadhav5540
    @alkajadhav5540 Před 22 dny

    उत्साह वाटते.मन आनंदी राहते. तुम्हाला पाहून मन प्रसन्न होते.

  • @gaurishetye5170
    @gaurishetye5170 Před 2 lety +10

    Wah wahhh masttt ...my sister enjoyed listening to the sweet soothing voice and also hopefully followed the instructions, she is usually restless but the video helped her focus ... mother too felt relaxed , being guided made sitting for the 10 mins healing prayers happily ... Thank you dear , God bless you lots ...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +2

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

    • @gautamijadhav1033
      @gautamijadhav1033 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter 000000000000000000000000000000000000000000000000000000000000

  • @ratnmalabotre9214
    @ratnmalabotre9214 Před 4 měsíci

    खूप छान वाटले.मी यापूर्वी trtement घेतली होती आणि मला खूप छान रीजल्ट आला होता .आज मे परत ट्रीटमेंट सुरू करते आहे.आणि मला.निरामय आरोग्य लाभणार आहे.🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      वा! खूपच छान. असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před 11 měsíci

    मेडिटेशन चालू असताना विचार येत राहतात.
    सर्दी, खोकला प्रमाण कमी आहे. त्याबद्दल निरामय टीमचे फार फार आभार!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      निरामय परिवाराकडून आपणास धन्यवाद 🙏,
      मेडिटेशन चालू असताना विचार येत राहतात यासाठी जुन्या गोष्टी मनातून काढणे गरजेचे आहे. म्हणजेच मनाची स्वच्छता गरजेची आहे. त्यासाठी खाली दिला गेलेला ध्यानाचा व्हिडीओ जरूर पहावा. जो पर्यंत मनातील विचारांची स्वच्छता होत नाही तो पर्यंत हे ध्यान करत रहावे.
      czcams.com/video/05qYo0_Oid4/video.html
      आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते.

  • @nilimaashtaputre2130
    @nilimaashtaputre2130 Před 3 měsíci

    ध्यान खूप छान वाटलं.मन प्रसन्न होते.परत परत करते.अमृता ताईंचा हसरा व आनंदी चेहरा मनाला भुरळ घालतो.शब्द व गोड आवाज कानाला सुखद वाटतो.धन्यवाद.🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      खूप खूप आभार 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @pramodsaykhedkar6437
    @pramodsaykhedkar6437 Před 7 měsíci

    खरोखरच आपला स्टाफ अत्यंत प्रेमळ पूर्वक उत्तर पुढील कारवाईसाठी हेच आमचं भाग्य आहे आणि आणि जो काही आजार आहे तो लवकरात लवकर प्रयत्न शिल असतात हेच आमचं मोठं भाग्य आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 7 měsíci

      नमस्कार,
      संपूर्ण निरामय परिवाकडून आपणास धन्यवाद🙏
      आपणही निरामय परिवाराचे सदस्य आहात आणि आपणही सकारात्मकतेने उपचार घेतच आहात आपलेही कौतुक.
      असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      निरोगी आणि आनंदी राहा. 👍

  • @vishakhajikamde8088
    @vishakhajikamde8088 Před 2 měsíci

    मॅडम, मनाला खूपच शांत आणि स्थिर तसेच अतिशय उत्साह वर्धक वाटले हे meditation केल्यावर.आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      मनःपूर्वक आभार 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @varshadongare7814
    @varshadongare7814 Před 4 měsíci

    नमस्कार अमृता मॅडम, मी केमो व रेडिएशन ट्रीटमेंट चालू असताना याचा मला खूप फायदा झाला.मी खूपच दुःखी आणि निराश होते परंतू निरामयच्या उपचार व ध्यानातून सकारात्मक विचार करणे, आनंदी रहायला लागले.आता मी या सगळ्यातून व्यवस्थित बाहेर पडले.माझी विचार करण्याची पद्धत पूर्ण बदली...डाॅ.अमृता मॅडमची बोलून तर खूप छान वाटतंय. धन्यवाद सर्व निरामय टीमला...😊😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      वा! खूपच छान. सातत्याने सकारात्मक विचार करून तुमच्यामधली सकारात्मकता वाढली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      धन्यवाद 🙏.

  • @vasudhadiwan8320
    @vasudhadiwan8320 Před rokem

    शरीर एकदम हलके झाले शांतीची अनुभूती आली व त्यांच अवस्थेत रहावे वाटले. वसुधा दिवाण

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @yasmeendarwajkar6013
    @yasmeendarwajkar6013 Před rokem

    निरामय टिम फार फार छान आहे खूप फरक पडला माझ्यामध्ये , पेशंटला समजून घेतात गोड बोलल्यामुळे फार फरक पडतो व्हिडिओ मध्ये शक्ती आहे मी बरी होणार ही खात्री आहे मी पूर्ण बरी होणार हीच माझी दृढ इच्छा आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      फारच छान! नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा .
      निरामयचे उपचार आणि तुमची सकारात्मकता यातून तुम्ही बरे होत असता .
      रुग्णाचा स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते. आणि आपली इच्छा शक्ती हीच असल्यामुळे आपण पूर्ण बरे होऊ शकता.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @suhasapte2257
    @suhasapte2257 Před měsícem

    मी निरामय कडुन डायबिटिक रेटिनोपथी साठी ट्रीटमेंट घेत आहे ५ दिवसा पासुन. खुप विश्वासाने आपणाकडे आलो आहे आणि माझे दोन्ही डोळे परत चांगले होतील अशी खुप खुप अपेक्षा आहे. 🙏🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      नमस्कार,
      निरामयचे उपचार आणि तुमची सकारात्मकता यातून तुम्ही बरे होत असता.
      आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते.
      नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @maxfairytail9642
    @maxfairytail9642 Před rokem

    खूप छान वाटले मॅडम मी तुमची treatment घेतलेली आहे. सरांकडे येत होती .तुमचे बोलणे सांगणे खूप छान आमची पूर्ण फॅमिली होती .नशिकवरून मुंबईला येणे एकदिवस यावे लागते.मग फोनवरून घेत होते सर्वजण .छान आहे.dhanywad🙏🙏

  • @prakashmajalkar8082
    @prakashmajalkar8082 Před 5 měsíci

    मी प्रकाश माजलकर...
    मागील काही दिवसांपासून मी आपल्या ध्यानांचा सराव करीत आहे ..
    फारच छान वाटतय .
    आपल्यातील दोष घालवणे .
    आपले आरोग्य आणि मन चांगले करण्यासाठी , अशी ध्यान फारच प्रभावी आहेत...परीणाम कारक आहेत..
    परंतू मला अजूनही काही सल्ले विचारायचं होतं ...
    ते कसं साध्य होईल...
    आपले आभार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      नमस्कार,
      अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते.
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अपॉईंटमेंट घेऊन भेटण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @dharikakunte3117
    @dharikakunte3117 Před rokem

    निरामय केंद्राचे चे प्रथम अभिनंदन. उपचार खूप प्रभावी आहेत. हे रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या शारिरीक आणि मानसिक समस्यांपासून कायमचे आराम देते. धन्यवाद 🙏🏻

  • @snehalpandit9757
    @snehalpandit9757 Před 7 měsíci

    चांगले वाटले .दुखरी डोकेदुखी कमी झाली आहे. डोळ्यावरचा ताण कमी झाला आहे..
    धन्यवाद मॅडम .....

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 7 měsíci

      मनःपूर्वक आभार 🙏,
      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @01Pranita
    @01Pranita Před rokem +1

    खूप सुंदर...खूप हलकं...आणि खरोखर देवाशी संवाद करतोय की काय असेच भास झाला...धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏
      नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @premchandsaijwani2340
    @premchandsaijwani2340 Před 2 měsíci

    हा व्हिडिओ ऐकल्याने
    माझ्या पोटाचा आजार कमी जानू राहिला
    फार फार आभारी आहे निरामय टीमचे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      वा! खूपच छान. नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @vidyavivek3718
    @vidyavivek3718 Před 10 měsíci

    डॉ. योगेश सर आणि अमृता मॅडम यांना मन:पूर्वक धन्यवाद !!

  • @bhavanasonawane2039
    @bhavanasonawane2039 Před rokem

    अतिशय सुंदर अद्भुत अनुभव आहे. संपूर्ण निरामय टीम चे मनापासून आभार. माझा 25 जानेवारी ला accident झाला होता डावा हात fracture झाला अशा वेळी मानसिक शारीरिक अवस्था खूप अस्थिर असते. पुणे येथील माझी लहान बहीण जयश्री टोकनेकर ने माझ्यासाठी निरामय ला registration करून साधना मिळाली. रोज कधीही फोन केला तरी अतिशय प्रेमळ पद्धतीने निरामय च्या टीम कडून रिस्पॉन्स मिळतो. आज निरामय चे मी खूप खूप आभारी आहे ताई इतक्या सुंदर शब्दात साधना सांगता की आतून खूप शांत वाटते आपल्याला होणारा त्रास सुद्घा विसरून जातो. एक चैत्यपूर्ण वातावरण तयार होते. खूप सुंदर खूप खुप धन्यवाद आपल्या सगळ्याचे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      खूप खूप आभार 🙏, तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. आपण नियमित पणे उपचार घेत आहात त्याचबरोबरीने उपचाराची संख्या पूर्ण केलीत तर अधिक लाभ मिळू शकेल .

  • @pracheehadke8570
    @pracheehadke8570 Před rokem

    खूप खूप धन्यवाद मला आज या ध्यानाची फार आवश्यकता होती आणि परमेश्वरानी माझ्या पर्यंत तुमच्या माध्यमातून पाठवली, पुन्हा एकदा धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप आभार 🙏
      मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो. निरोगी राहण्यासाठी नियमित ध्यान करत रहा. आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @vidyapatil8112
    @vidyapatil8112 Před rokem

    Me first treatment घेतली just 🙏 khup sunder अनुभव आहे. मी निरामय सेंटर ल काल visit दिलाय पण आज treatment chalu keli.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूपच छान.
      नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 Před rokem

    नमस्कार ताई . खुप च उत्तम आहे .आपला आवाज , आपले कर्मचारी यांची वागणुक छान वाटली ‌. 11/03/23 ला मी प्रथमच चिंचवड आफीस ला आले . उत्कृष्ट कार्य आहे . मनाला शांती , समाधान, उत्साह प्राप्त होतो . धन्यवाद , धन्यवाद धन्यवाद ताई .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏 नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा .

  • @nilaambekar4706
    @nilaambekar4706 Před 6 měsíci

    खुपच छान वाटत आहे आज प्रथमच व्हिडिओ चालु करुन ध्यान केले व थेरपी घेतली म्हणुन लक्ष विचलित होऊ शकले नाही
    आपले सगळ्या निरामय टीमचे खुप खुप आभार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      वा! खूपच छान. असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या , ध्यान करा आणि पूर्णपणे बरे व्हा.
      धन्यवाद 🙏

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před 11 měsíci +1

    फार फार आभारी आहे निरामय टीमचे ! प्रक्रुतीत चांगला फरक पडत आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      वा! खूप छान. 👍 खूप खूप धन्यवाद 🙏.
      असेच निरोगी आणि आनंदी राहा. 👍
      नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा .

  • @milindpalkar2645
    @milindpalkar2645 Před rokem

    प्रदुषण कमालीच वाढलं आहे . सध्या साधं सदीऀपडसं हा प्रकार कमी झालायं .
    प्रचंड डोकं दुखणं नाकातून पिवळे
    गठ्ठे पडणं , अशी माझी सदीऀ फक्त
    दोन दिवसांच्या ध्यानानं अगदी कमी झाली .
    यत्किंचित अतिशयोक्ती नाही .
    " निरामय कुटुंबाचा " कसा उतराई होऊ .
    शुभेच्छांसहीत धन्यवाद !!
    मिलिंद पालकर .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏

  • @vijayabhide3110
    @vijayabhide3110 Před rokem

    अमृताताई, तुम्हा उभयतांचे खूप खूप आभार आणि कोटी,कोटी कृतज्ञता

  • @santoshkhadke1063
    @santoshkhadke1063 Před rokem

    खूप छान वाटले ध्यान करून एकाच ध्यानाने माझी साईटीका आजार ठीक झाला मलाचालायला येत नव्हते लंगडे चालतहोतो दोनवर्ष आत्ता चालायला येत आहे खूप आभारी आहे आहे मँडम आपला खूप खूप धन्यवाद मला समजले वात विकार आजार नसून वात / पित्त/कफ चे संतूलन बिघडलेले आहे त्यामुले वेदने कडे लक्ष लागून ध्यान लागुन राहायचे हिच मोठी समस्या होती मनस्वास्य ठीक झाले समाधान वाटले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @jyotiskitchen1174
    @jyotiskitchen1174 Před rokem

    छान वाटतं ध्यान लावल्यावर अगदी आई आपल्या मायेनं जवळ घेऊन सांग त आहे असे वाटतं अगदी सगळ नवीन आहे असे वाटतं धन्यवाद मॅडम

  • @anjalirisbud3076
    @anjalirisbud3076 Před rokem

    नमस्कार डॉक्टर
    आपले व्हिडिओ खूपच छान आहेत
    मी आपल्या बरोबर ध्यान करते व खूप समाधान वाटते
    धन्यवाद

  • @sanjivanisatpute9725
    @sanjivanisatpute9725 Před rokem

    धन्यवाद ताई खुप खुप छान वाटते.प्रत्येक वेळेस सकारात्मकता द्विगुणित होते.आपल्या मुळे आयुष्याचा शेवटचा टप्पा सहजपणे पार करता येईल.

  • @mayureshdhekane6234
    @mayureshdhekane6234 Před rokem +1

    खूपच छान experience होता. मनाला आणि देहाला अतिशय सुंदर अशी अनुभूती मिळाली.
    धन्यवाद अमृता मॅडम आणि संपूर्ण निरामय स्टाफ.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      तुम्ही सकारात्मक आहात. त्यामुळे मन आणि शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल. आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला.अशाच सदिच्छा कायम राहू देत.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Před rokem

    नमस्कार मॅडम मला तुमच हे फार आवडत कधीही शंका विचारली तर पटकन उत्तर पाठवता खुप खुप धन्यवाद आणी म्हनुन च खुप विश्वास वाढतो आणी करावस वाटत आजचाच अनुभव सांगते आज कंबर लचक भरली आणी तुम्ही सांगितलेली शुन्य मुद्रा केली आणी खरच आराम पडला

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप छान, निरोगी आणि आनंदी रहा.
      खूप खूप आभार 🙏

  • @mamatapage2626
    @mamatapage2626 Před rokem +2

    Thank u so much Dr. Mi tumchyakadun treatment ghete aahe, for back pain..
    Ani atta ajun 4-5 ch divas zale aahet pan farak janavatoy
    Ani tumchya hya video ne tar Meditation khup ch deep and soothing zala
    Khuup khuup thanks Dr... U r Angel !!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @smitagadgil4106
    @smitagadgil4106 Před rokem

    हे ध्यान करायला लागल्यापासून माझ्यात खूप छान बदल झाला मुली म्हणतात आई तू बदलली आहेस खूप छान

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      फारच छान! बदल होतआहे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मनाची ताकद अत्यंत आवश्यक असते. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल .
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @technikalgyanchann5321
    @technikalgyanchann5321 Před 9 měsíci

    तुमचे मेडिटेशन एकून माझे मन शांत झाले शरीरात हलके पणा वाटतो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 9 měsíci +1

      खूप छान!!!!👍
      नियमित ध्यान केल्याने मन शांत होते,आत्मविश्वास वाढतो,आरोग्यदेखील मिळते. त्यामुळे जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
      धन्यवाद 🙏

  • @saikale9880
    @saikale9880 Před 10 měsíci

    ताई.हे ध्यान करताना डोळ्यावर प्रकाशझोत येतोय.अस वाटत.खूप छान वाटलं..हे करायला लागल्यापासून मी खूप आनंदी रहाते.आणी आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 10 měsíci

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @smitabarve9379
    @smitabarve9379 Před 27 dny

    ताई खूप छान व्हिडिओ 👌👌आपले विचार ऐकून खूप प्रसन्न वाटलं🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 26 dny

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते.

  • @charushilajagtap2248
    @charushilajagtap2248 Před rokem

    खूप छान व्हिडिओ आहेत शरीराच्या त्रासाबरोबर मनाच्याही त्रास कमी होत आहेत मन एकदम शांत राहते झोपही छान लागते खूप खूप धन्यवाद अमृता मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! हे खूपच छान आहे मग नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @ushabaljekar2993
    @ushabaljekar2993 Před 2 měsíci

    Mi usha.aj pahilyach divsli mi 2 vela dhyan kele khup chan vatle.parat pahate 4 vajta mi dhyan karnar aahe patat sunder anubhav ghyava asa vichar aahe.Ashirwad asava.🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      अरे वा! खूपच छान. मग असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @sugandhasabnis6260
    @sugandhasabnis6260 Před rokem

    ताई तुमचे खुप आभार तुम्ही खुप छान बोलता मी हे ध्यान रोज करते खुप छान वाटते तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप आभार 🙏, नियमित ध्यान करून निरोगी आणि स्वस्थ रहा. आपला अनुभव जरूर कळवा.

  • @anitachavan7946
    @anitachavan7946 Před měsícem

    मॅडम, तुमचे व्हिडीओ पाहून खूपच समाधान मिळते. तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीम चे मनापासून आभार. 🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

    • @anitachavan7946
      @anitachavan7946 Před měsícem

      मॅडम, तुम्हाला भेटायचे असेल तर कधी यायचे? तुमच्याशी मनमोकळे पणे बोलायचे आहे. मनातील चलबिचल कमी करायची आहे. प्लीज सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      नमस्कार,
      अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. आपण online देखील भेटू शकता. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @anitachavan7946
      @anitachavan7946 Před měsícem

      मॅडम, मला अजून तुमची अपॉइंटमेंट मिळाली नाही. कधी मिळेल?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 28 dny

      नमस्कार,
      आपण आपला संपर्क क्रमांक आम्हास पाठवू शकाल का?
      निरामय परिवाराकडून आपणास अपॉइंटमेंट बद्दलच्या सविस्तर माहितीसाठी फोन येईल किंवा आपण You Tube Reference देऊन पुन्हा वरील क्रमांकावर संपर्क करून Mr. नितीन शिंदे यांच्याशी बोलून Appointment घेऊ शकता.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před rokem

    फार आल्हाददायक, अजून निसर्गाशी एकरुप व्हावेसे वाटत होते. तुमचे व तुमच्या टीमचे फार आभार. असाच अनुभव सर्वांना यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před 11 měsíci

    छान वाटले. हार्दिक आभार!तुमच्याकडून अशीच सेवा व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

  • @jyotysaindane2164
    @jyotysaindane2164 Před rokem

    खुप छान वाटते सारखं एकत रहावसं वाटत मन शांत होतं अमृता मैडम तुमचा आवाज खूप गोड आहे मना पासून सुबेछ्या 🙏🏼🙏🏼🌹🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @geetakannadkar9615
    @geetakannadkar9615 Před rokem

    तुमचा आवाज खुप अश्वासक आहे शांत वाटते खुप धन्यवाद मैडम🙏🙏🌷🌷

  • @prafullachandrajoshi4794

    मी हे ध्यान करुन फक्त ३आठवडे होत आहेत आणि मला जादुई (miraculous) results येण्यास सुरुवात झाली आहे. मी तुमचे आफळे व्याख्यान मालेतले भाषणही ऐकले आणि येणाऱ्या स्वानुभवाच्या निकषावर ते पूर्ण पटले. धन्यवाद. आपण बोलूच. नमस्कार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      फारच छान !!! आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      मनःपूर्वक आभार 🙏

  • @smitasarnaik1786
    @smitasarnaik1786 Před 6 měsíci

    खूप छान वाटलं मन शांत वाटतयं शुगर लेव्हल पण आटोक्यात येऊ लागली आहे त्यामुळे आनंद झाला . संपूर्ण निरामय टीमला मनापासून धन्यवाद 😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @madhuripardesi7331
    @madhuripardesi7331 Před rokem

    फार छान अनुभव आला मन शांत होऊ लागल आहे.दोनच दिवसात चांगला फरक पडला आहे ❤धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप आभार ,
      खूप छान.नियमित आणि मनापासून ध्यान केल्याने आपणास खूप छान अनुभव येत आहे . आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.🙏

  • @pravinrandive6660
    @pravinrandive6660 Před 5 měsíci +1

    Dole zaklyavar ek vilakshan adbhut awajane mantramugdh hot veglich aanubhuti yete...Thanks Madam

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před rokem

    ध्यान ट्रीटमेंट चालू केल्यापासून मला बरं वाटत आहे.
    निरामय टीमचे आभार !

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूपच छान.
      नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा .
      खूप खूप धन्यवाद 🙏.

  • @rajashreemokal8352
    @rajashreemokal8352 Před 10 měsíci

    खुप छान मेडिटेशन मॅडम . प्रसन्न वाटले. ध्यान सांगण्याची पद्धत एकदम मस्त. 🙏🙏

  • @devpriyanaik429
    @devpriyanaik429 Před rokem

    मी तुमचा हा video पहिल्यांदाच attend केला.खूप relax वाटलं .खूप छान .धन्यवाद....

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप आभार 🙏,
      जेव्हा जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 यामुळे मनही शांत होईल आणि शरीरदेखील निरोगी राहण्यास मदत होईल.
      धन्यवाद 🙏

  • @yoginikulkarni3979
    @yoginikulkarni3979 Před 9 měsíci

    खूप छान व मन प्रसन्न होते हे ऐकून.🙏🙏
    पॉसिटीव्ह wives मिळत आहेत.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 9 měsíci

      धन्यवाद 🙏.
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @manasighule2730
    @manasighule2730 Před 10 měsíci

    खूप छान स्टाफ मिळाला आहे. अतिशय गोड बोलण आहे. मनाला खूप आनंदी वाटते.केव्हाही फोन करा काम करण्यासाठी तयार असतात.👍👌

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před 11 měsíci

    निरामय टीमचे आभार! ध्यानात डुलकी. लागत होती.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      नमस्कार,
      ध्यान किंवा मुद्रा करत असताना आपणांस झोप,डुलकी जाणवली तरी काही हरकत नाही, त्यावेळेस झोपेमध्ये आपले शरीर आराम करते तेवढा अधिकतम वेळ शरीराने वापरलेली उर्जा परत मिळवण्यासाठी मिळतो.

  • @SwaritShorts27
    @SwaritShorts27 Před rokem

    Khup uttm anubhav tumche videos mi bghte ani aj mi khup month natr bghitla mediation madun relax v shant vate 7 chakr tyche sudha mediation mi karyche but roj follow nhi hote pn tumchy avjat mruduta v ek mansik shantat vate tumcha always prasnna face ek vegli positive vibes deun jato khup chid chid zali hoti but 2minuets mdhe relx thank u so mucha tumhla bghun nehmi ekhadya devich rup vate thnk u and God bless you madam🙏🤗

  • @nilkanthtapole1044
    @nilkanthtapole1044 Před 11 měsíci +1

    मी आभारी आहे 🙏निरामय मुळे माझा पुनर्जन्म झाला आहे 🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      नमस्कार,
      फारच छान! आपण स्वयंपूर्ण उपचार अगदी नियमित आणि सकारत्मकतेने घेत आहात त्यामुळे आपणास शरीराकडूनदेखील सुरेख प्रतिसाद मिळत आहे. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @pratikshaparihar5843
      @pratikshaparihar5843 Před 6 měsíci

      Purn experience share Karu shakta ka ?

  • @vijaysinghpawar325
    @vijaysinghpawar325 Před 10 měsíci

    आजचा पहिला दिवस एक नवीन अनुभुती /अनुभव
    सुंदर /उपयोगी आहे आपले सर्वाचें आभार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 10 měsíci +1

      धन्यवाद 🙏,
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @adityajoshi4975
    @adityajoshi4975 Před 2 měsíci +1

    खूप प्रसन्नतेची अनुभुती आली

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @vinayakkumbhar7104
    @vinayakkumbhar7104 Před měsícem

    अतिशय छान अनुभव, दिवसाची छान सुरुवात होते माझी या ध्यानामुळे 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @simpkn947
    @simpkn947 Před rokem

    मनापासून धन्यवाद अमृता ताई..तुमचे आभार मानण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत..पण खरोखरच मनापासून धन्यवाद🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      मनःपूर्वक आभार 🙏 ,
      खरे तर तुमचे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.

  • @sanjitagawde6319
    @sanjitagawde6319 Před rokem

    खुप शांत आणि सुखद अनुभव येतो. तुमचे साधे व्यक्तिमत्त्व आणि प्रभावी बोलणे त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. धन्यवाद मॅडम🙏🙏

  • @medinirotkar7519
    @medinirotkar7519 Před 6 měsíci

    Thank you Dr Amruta mam,tumhala pratyasha bhetun khup aatun aanand zalay ajunahi to hangover gela nahi,dhyanala baslyavar tumcha aashwasak aawaj janavto bhovati ,khup paani yetay dolytun asa vatala tya divashi mala je aatun pahije aahe kinva vhava asa vatatay tech tumhi bolay hotya sankalpat ,khup daivi aahe tumcha kaam sakshat lakshi Saraswati parvati aahat tumhi,sir v tumhi he shivshakti rupach aahe, love you, manapasun namaskaar

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
      आपला हा भाव आपले प्रेम दाखवते. हा बंध वृद्धिंगत होवो, हे प्रेम अविरत राहावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हीच सदिच्छा.नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      धन्यवाद 🙏.

  • @snehalkatkar8790
    @snehalkatkar8790 Před 19 dny

    Aaj khup chhan man ekagrh zal.. khup mastttt wtl.. 😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 18 dny

      अरे वा! खूपच छान. मग आता नियमित जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @jaykumardere3541
    @jaykumardere3541 Před 9 měsíci

    अतिशय उत्तम प्रकारे मुद्रा व ध्यान समजावून सांगितले आहे, आभारी आहोत.👍💐💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      सर्वांनी नियमित ध्यान व मुद्रा करून निरोगी आणि आनंदी राहावे यासाठी निरामय परिवाराकडून केलेला हा प्रयत्न. आपणही नियमित ध्यान व मुद्रा करून निरोगी आणि आनंदी राहा.