भंडारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय - एक माहितीपट | Bhandari Samaj's traditional trade

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • भंडारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय - एक माहितीपट | Bhandari Samaj's traditional trade
    वसईत विविध समाज शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. ह्या सर्व समाजाचे अनेक पारंपरिक व्यवसाय आहेत. काळाच्या ओघात बरेच व्यवसाय नामशेष झालेले आहेत तर उरलेले व्यवसाय येणाऱ्या काही वर्षांत काळाच्या पडद्याआड जाणार आहेत.
    वसईतील एक मुख्य समाज म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेला व शूरवीर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातदेखील नावाजला गेलेला भंडारी समाज. ताडी काढणे हा ह्या समाजाचा एक पारंपरिक व्यवसाय. ताडी सोबतच ताडावरून फळे उतरवून त्यातून ताडगोळे काढणे हादेखील या व्यवसायाचा एक मुख्य भाग.
    रेल्वेतील आपली नोकरी सांभाळून नित्यनेमाने हा पारंपरिक व्यवसाय करणारे व निवृत्तीनंतर वयाच्या सत्तरीतही दररोज ८०-८५ फुट उंच झाडावर लीलया चढून शेकडो फळे उतरवणाऱ्या व हा पारंपरिक व्यवसाय नेटाने पुढे नेणाऱ्या भालचंद्रकाका राऊत नामक अवलियाचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.
    विशेष आभार:
    भालचंद्र काका, सुषमा काकू, भूषण व समस्त राऊत कुटुंबीय
    भंडार आळी, गिरीज, वसई
    ९०४९३ ०९६१९
    गुगल मॅप लोकेशन:
    maps.app.goo.g...
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    ...
    व्हॉट्सॲप चॅनल लिंक
    whatsapp.com/c...
    वसईच्या पारंपरिक व्यवसायाबाबत व्हिडिओचा संच
    • Traditional trades पार...
    #vasaitradition #vasai #bhandari #taadgole #Vasaikars #vasaibhandari #vasaikarbhandari #bhandarisamaj #iceapple #traditional #tradition #vasaitradition #vasaiiceapple #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

Komentáře • 675

  • @sunildmello
    @sunildmello  Před 9 měsíci +38

    भंडारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय - एक माहितीपट | Bhandari Samaj's traditional trade
    वसईत विविध समाज शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. ह्या सर्व समाजाचे अनेक पारंपरिक व्यवसाय आहेत. काळाच्या ओघात बरेच व्यवसाय नामशेष झालेले आहेत तर उरलेले व्यवसाय येणाऱ्या काही वर्षांत काळाच्या पडद्याआड जाणार आहेत.
    वसईतील एक मुख्य समाज म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेला व शूरवीर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातदेखील नावाजला गेलेला भंडारी समाज. ताडी काढणे हा ह्या समाजाचा एक पारंपरिक व्यवसाय. ताडी सोबतच ताडावरून फळे उतरवून त्यातून ताडगोळे काढणे हादेखील या व्यवसायाचा एक मुख्य भाग.
    रेल्वेतील आपली नोकरी सांभाळून नित्यनेमाने हा पारंपरिक व्यवसाय करणारे व निवृत्तीनंतर वयाच्या सत्तरीतही दररोज ८०-८५ फुट उंच झाडावर लीलया चढून शेकडो फळे उतरवणाऱ्या व हा पारंपरिक व्यवसाय नेटाने पुढे नेणाऱ्या भालचंद्रकाका राऊत नामक अवलियाचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.
    विशेष आभार:
    भालचंद्र काका, सुषमा काकू, भूषण व समस्त राऊत कुटुंबीय
    भंडार आळी, गिरीज, वसई
    ९०४९३ ०९६१९
    गुगल मॅप लोकेशन:
    maps.app.goo.gl/uwYQJF9oikwsemk2A
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==
    व्हॉट्सॲप चॅनल लिंक
    whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
    वसईच्या पारंपरिक व्यवसायाबाबत व्हिडिओचा संच
    czcams.com/play/PLUhzZJjqdjmN2X3tQ8G8tKEUjaoEQXCaw.html&feature=shared
    #vasaitradition #vasai #bhandari #taadgole #Vasaikars #vasaibhandari #vasaikarbhandari #bhandarisamaj #iceapple #traditional #tradition #vasaitradition #vasaiiceapple #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323 Před 9 měsíci +25

    फार जुन्या बालपणीच्या आठवणी ,50 वर्षापूर्वीच्या , गिरगावात रहायचो ,गोड असा भंडारी समाज ,त्यांचा प्रेमळ ,लाघवी ,दुसर्यावर विश्वास ठेवणारा , नात नसतानाही नात्यात बांधून ठेवणारा ,.मी सांगलीत स्थायिक झाले अन् सर्व काही दुर्लभ झाले ,ताडगोळे सुद्धा ..आता उरल्या फक्त गोड आठवणी ...आणि डोळे पाणवतात...मायेने अधिकार गाजवणारा भंडारी माणूस 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci +2

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सत्वशिला जी

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 Před 9 měsíci +63

    सुनील, रस्त्यावर विकत घेतलेल्या ताड गोळ्याच्या मागे इतके कष्ट आहेत हे आज समजले. 30 वर्ष, आणी वयाच्या 70 नंतरही असे काम करणे, म्हणजे कमाल आहे !! सुनील तुम्हाला मनापासून धन्यवाद .

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci +2

      अगदी बरोबर बोललात, विवेक जी. खूप खूप धन्यवाद

    • @vandanadamre3771
      @vandanadamre3771 Před 4 měsíci +1

      खरोखर काका काकूंच्या कष्टांना,आवडीला,वडीलांची परंपरा जपण्याला सलाम.सुनीलदादा आणि अनिशाताई तुमची शोध मोहीम 1 no.त्यामुळे आपल्या खऱ्या संस्कृतीची ओळख होते.

    • @viveknaralkar6007
      @viveknaralkar6007 Před 4 měsíci +1

      @@sunildmello धन्यवाद. एकदा वसई मध्ये २-३ राहून तुमच्याबरोबर परिसर बघण्याची खूप इच्छा आहे..

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 měsíci

      @@vandanadamre3771 जी, खूप खूप धन्यवाद

  • @bhagyashreejadhav1534
    @bhagyashreejadhav1534 Před 9 měsíci +32

    सुनील भाऊ, आमच्या संपूर्ण भंडारी समाजाच्या वतीने आपले आभार मानते जय भंडारी

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci +1

      खूप खूप धन्यवाद, भाग्यश्री जी

    • @avadhutkhot8682
      @avadhutkhot8682 Před 6 měsíci +2

      जय भंडारी

    • @pravinmayekar6169
      @pravinmayekar6169 Před 5 měsíci +2

      खरोखर अभिमान आहेत काकांचा
      जय भंडारी
      धन्यवाद सुनील भाऊ

    • @riteshrajwadkar615
      @riteshrajwadkar615 Před 5 měsíci +1

      जय भंडारी 🎉

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 Před 6 měsíci +5

    जय भंडारी.
    खुपच सुंदर.
    मीही लहान पणीच ४थीत शीकत असतानाच नारळाच्या झाडावर चढून नारळ काढायचो.
    नारळाच्या झाडाची माडीही एक पोषक द्रव्य आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 6 měsíci

      खूप खूप धन्यवाद, अवधूत जी

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 Před 9 měsíci +18

    फार छान व्हिडिओ बनवला. परमेश्वर काकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगले आरोग्य देवो हीच प्रार्थना.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी

    • @sagardhumal1624
      @sagardhumal1624 Před 4 měsíci

      😢​@@sunildmello

  • @hemendrarautRaut
    @hemendrarautRaut Před 9 měsíci +18

    धन्य वाद सुनील भाऊ आमच्या समाजातील लोकांची मेहनत दाखविल्या बद्दल

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, हेमेंद्र जी

  • @MAITREE-by5wt
    @MAITREE-by5wt Před 9 měsíci +11

    जय भंडारी. मी भंडारी आहे. भंडारी माणूस जेवढा प्रेमळ तेवढा तो दयाळू आहे. जर त्याची तुम्ही कळ काढलं तर तेवढाच तो खतरनाक आहे. भंडारी माणूस हा इमानदार आणि शूर आहे. सुनील आपण येवढ्या प्रेमाने बोलता तुमचा प्रेमात कोन्ही पडेल. म्हणून मी तुमचा fan आहे. आपले संपूर्ण कुटुंब प्रेमळ आहे. सुनील your one ऑफ the best block तो मनाला आनंद देवून गेला. Thank You So Munch. God bless you & your family.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci +1

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मैत्री जी

    • @bharatgawad6588
      @bharatgawad6588 Před 7 měsíci +1

      Jay bhandari

    • @sanjayrajwadkar9737
      @sanjayrajwadkar9737 Před 5 měsíci

      मैत्रीत दिला तर जीव देऊ आणि जर कोणी आमच्या वाकड्यात येत तर त्याचा जीव घेण्यात आम्ही जरा ही मागे होत नाही.
      जय भंडारी भावा ❤❤❤❤❤

  • @gajananmundaye6290
    @gajananmundaye6290 Před 9 měsíci +19

    सुनिल जि आपण ताडगोळे संदर्भात फारच सुंदर माहिती दिली , भंडारी समाजांत ५ उपजाती आहेत हेटकरी भंडारी ,कित्तेभडारी ,दैवज्ञ भंडारी,चौधरी भंडारी,गावंड भंडारी खरं तर महाराज्यांच्या राज्यात बंडहारी बंडाने पेटुन उठणारे असं होतं आता त्याच भंडारी झालं मुळचे राजस्थान असे म्हणतात महाराणा प्रताप यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या रजपूता पैकी धाडसी इमानदार तेथूनच हा समाज जास्तीत जास्त समुद्र किनारी विसावला आहे,

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci +1

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, गजानन जी

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 Před 9 měsíci

      बरोबर आहे.पालघर, ठाणे जिल्ह्यात समुद्र किनारी वसलेले वाडवळ,भंडारी,आगरी, कुणबी,व इतर हे राजस्थाना तुन देवगिरी ला आले, तेथिल राजा बिंबदेव याने 13 व्या शतकात कोकण प्रांत केळवे-माहीम वर स्वारी करताना आपल्या बरोबर काही कुळे आणली.तेच आजचे इथले स्थानिक वाडवळ, कुणबी, भंडारी, आगरी व इतर होत.

    • @darshanamanjrekar7833
      @darshanamanjrekar7833 Před 9 měsíci +5

      Bhandari samaj ha premal Ani manase japanara samaj aahe tyatalyatat ratnagiri kadachi bhandari manase hi manus bholi Ani jivala jiv denari aahet adasarasarakhi baherun kaamkajasati kadak Ani aatun agadhi Mau asanari bhandari hey kast karanyas magepudhe pahat nahit pramaanik pane kaamkaranare bhandari aata sarv tikaani vikhuralele aahet parantu bhandari samaj aapali bandilaki ajun tikawun aahe mala maza bhandari asanacha raast abhimaan aahe jay Maharastra

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci +1

      @@darshanamanjrekar7833 जी, खूप खूप धन्यवाद

    • @pravinvartak3147
      @pravinvartak3147 Před 2 měsíci

      आमच्या वसईत शेषवंशी भंडारी समाज पण आहेत.

  • @yeshwantkulkarni1080
    @yeshwantkulkarni1080 Před 6 měsíci +5

    सुंदर ! अप्रतिम ! इथून पुढच्या पिढीला हे दिसणार नाही ह्याचे वाईट वाटते काकांना सलाम ! कधी तिकडे येणे झाले तर भेट द्यायला नक्की आवडेल ! काकूंच्या आदरातिथ्यालाही नमस्कार !

    • @sunildmello
      @sunildmello  Před 6 měsíci

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, यशवंत जी

  • @nilimawalinjkar6428
    @nilimawalinjkar6428 Před 9 měsíci +8

    ताडगोळे झाडावरून काढण्यासाठी खूप मेहनत, कौशल्य आणि जिद्द लागते. ती माझ्या भावामध्ये (भालचंद्र राऊत - वय ६८ वर्षे) आहे. सुनिल तुझे आभार तू माझ्या भावाचा व्हिडिओ काढला. व्हिडिओ संपता संपता तूम्ही बोलतात की यांच्यावर व्हिडिओ काढण्यात यावा अस सुचवल होत त्या सुनीता महाजन आहेत.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नीलिमा जी. कृपया सुनीता जीं ना देखील धन्यवाद कळवा.

  • @shuhasinigawade7379
    @shuhasinigawade7379 Před 4 měsíci +3

    Chan Chan video
    👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 měsíci

      धन्यवाद, सुहासिनी जी

  • @Manju........444
    @Manju........444 Před 3 měsíci +2

    खुप छान माहिती दिलीत सुनिल दादा आणि काकांच्या चपळतेला आणि कौशल्याला सलाम🙏👍🚩

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद, मंजू जी

  • @shubhangisawant5480
    @shubhangisawant5480 Před 8 měsíci +7

    काका काकू सॅल्यूट तुमच्या कष्टाला 🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 8 měsíci

      खूप खूप धन्यवाद, शुभांगी जी

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Před 8 měsíci +5

    भालचंद्र काकांचे वय 70 आहे.येवढ्या वयात ते तरुणाला लाजवेल येवढ्या चपळाईने झाडावर चढून ताडगोळे काढतात, सोलातात हे पाहून अजब वाटते. सौ. काकूंची सुध्धा त्यांना मोलाची साथ आहे.खरच कमाल आहे.सुनिल तुझ्या मुळे आम्हाला ह्या सर्व प्रकाराची विविध माहिती घर बसल्या मिळते आहे त्या बद्दल तुझे खूप आभार.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 8 měsíci

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी

  • @vandanadamre3771
    @vandanadamre3771 Před 4 měsíci +3

    खरोखर काका काकूंच्या कष्टांना,आवडीला,वडीलांची परंपरा जपण्याला सलाम.सुनीलदादा आणि अनिशाताई तुमची शोध मोहीम 1 no. त्यामुळे आपल्या खऱ्या संस्कृतीची ओळख होतेय.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 měsíci

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वंदना जी

  • @dnyaneshshiudkar8203
    @dnyaneshshiudkar8203 Před 7 měsíci +4

    खुपच सुंदर विडीओ

    • @sunildmello
      @sunildmello  Před 7 měsíci

      धन्यवाद, ज्ञानेश जी

  • @supriyatodankar4445
    @supriyatodankar4445 Před 9 měsíci +5

    मस्त आवडला व्हिडिओ आम्ही पण भंडारी रत्नागिरी खूप खूप छान

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी

  • @nikhilmande1687
    @nikhilmande1687 Před 4 měsíci +4

    खूप छान माहिती मिळते दादा तुमच्या व्हिडिओ मधून 👌❤️🌹🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 měsíci

      खूप खूप धन्यवाद, निखिल जी

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 Před 5 měsíci +3

    अतिशय सुंदर दादा ... आपण सर्वानी मिळून फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे .... त्यातच सर्वांचा फायदा आहे .... मागच्या १० वर्षात गरीब मजूर व्यापारी शेतकरी सर्व सुखी झाले आहेत ... अजून १० वर्ष चान्स द्यायला हरकत नाही .... बाकी फडणवीस साहेब ज्याच्या पाठीशी तो किती इथं बनतो हे सगळ्यांना माहितीय ....

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 měsíci

      धन्यवाद, जेनिश जी

  • @priyatondlekar9766
    @priyatondlekar9766 Před 8 měsíci +3

    सुनील दादा खुप छान व्हिडिओ आहे मी पण भंडारी आहे आणि माझे आजोबा पण असेच माडी काढायची मुरूड ला असताना,जय भांडारी

    • @sunildmello
      @sunildmello  Před 8 měsíci

      खूप खूप धन्यवाद, प्रिया जी

  • @user-rz3hw7mg3n
    @user-rz3hw7mg3n Před 5 měsíci +6

    जय शिवराय
    जय भंडारी
    भंडारी असल्याचे अभिमान आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 5 měsíci

      धन्यवाद, राजेश जी

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil2925 Před 5 měsíci +3

    ताडगोळे व ताडी ह्या पेयाची सखोल माहिती उत्तम माहिती आणि ह्या काका काकूंना ती व्यवस्थित माहीत करून दिल्या बद्दल आभार

    • @sunildmello
      @sunildmello  Před 5 měsíci

      खूप खूप धन्यवाद, दिवाकर जी

  • @MalvaniLife
    @MalvaniLife Před 9 měsíci +8

    सुंदर.... जय भंडारी❤

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद दादा!

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 Před 7 měsíci +3

    एक अऩोखा व्यवसाय, त्यातील कष्ट आणि कौशल्य ह्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 7 měsíci

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वैशाली जी

  • @dominiclopes1553
    @dominiclopes1553 Před 9 měsíci +14

    छान! खरोखर भंडारी समाज म्हणजे महाराष्ट्राची शान आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, डॉमणिक जी

  • @ajitraut3331
    @ajitraut3331 Před 8 měsíci +4

    सुनिल भाऊ नमस्कार,
    धन्यवाद आमच्या भंडारी समाजाची मेहनत अणि कष्ट्ट करणेची हिम्मत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सर्व दूर पोचवली , भंडारी समाजाची मेहनत करणेची तयारी आजही आहे .
    हे भालचंद्र राऊत अणि मी आम्ही
    शेशवांशी शत्रिय भंडारी समाज आहोत
    मी स्वतः नालासोपारा (उम्राले) येथील रहिवाशी आहे.
    जय भंडारी

    • @sunildmello
      @sunildmello  Před 8 měsíci

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अजित जी

  • @geetanjalighongade9450
    @geetanjalighongade9450 Před 7 měsíci +3

    Bhandari kaka is real hero, काकू पण खूप प्रेमळ आहेत.Nice video 👍 keep it up 👏🎉💐💐💐

    • @sunildmello
      @sunildmello  Před 7 měsíci

      अगदी बरोबर बोललात, गीतांजली जी. खूप खूप धन्यवाद

  • @SK-of8fm
    @SK-of8fm Před 9 měsíci +8

    सलाम काकांना, या वयात सुद्धा इतक्या उत्तमरीत्या काम करत आहेत.
    सुनील दादा आपल्या व्हिडिओ नेहमीच अतिशय उत्तम असतात. माहितीपूर्ण आणि उत्तम प्रकारे सादर केलेल्या व्हिडिओ बघायला नेहमीच छान वाटतं.
    तुम्ही सर्व वसईकर खूपच नशीबवान आहात कारण मुंबईच्या इतक्या जवळ राहूनसुद्धा इतका निसर्गाचा सहवास लाभला आहे. सगळी बागायती आणि शेती बघून माझ्या गावची म्हणजे मालवणची आठवण झाली.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci +1

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @manoharpatil5731
    @manoharpatil5731 Před 9 měsíci +3

    या वयातही काका एखाद्या तरूणाला लाजवतील इतके चपल आणि निडर आहेत.आज पहिल्यांदा ताडी आणि निरा मधला फरक समजला.धण्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @mangeshangre6549
    @mangeshangre6549 Před 9 měsíci +8

    सुनील दादा तुझा प्रत्येक video मी आवरजून बघतो तुझे explaination एकदम समर्पक असते thank you अशा संस्कृती उजागर करण्यासाठी आणि आमच्या पर्यंत हा ठेवा पोहचवण्यासाठी..

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @vinodgadade6484
    @vinodgadade6484 Před 7 měsíci +4

    धन्यवाद आपण आमच्या समाजातील काकांची मेहनत सगळ्यांसमोर दाखविली

    • @sunildmello
      @sunildmello  Před 7 měsíci

      खूप खूप धन्यवाद, विनोद जी

  • @abhijeetwaghadhare
    @abhijeetwaghadhare Před 7 měsíci +5

    जय भंडारी....💪💪🚩🚩

    • @sunildmello
      @sunildmello  Před 7 měsíci +1

      धन्यवाद, अभिजित जी

  • @udaysatav4440
    @udaysatav4440 Před 9 měsíci +5

    शहाळ्या सारखीच गोड माणसे ❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      अगदी बरोबर बोललास, उदय जी. धन्यवाद

  • @veer5657
    @veer5657 Před 8 měsíci +4

    कष्टदायक व्यवसायाची आत्यंत सखोल माहीती दिलीत " धन्यवाद 👍🍀🌷

    • @sunildmello
      @sunildmello  Před 8 měsíci

      खूप खूप धन्यवाद, वीर जी

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 Před 9 měsíci +6

    खूप मस्त व्हिडिओ बनवलाय काकांची महिनत ही‌ खूप आहे याच्यापुढे ही बाग त्यांची पिढी संभालत राहावं thanku Sunil dada ❤

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci +1

      खूप खूप धन्यवाद, अंकुश जी

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 Před 9 měsíci +13

    काका तब्येत राखून आहेत,या वयात ही ते इतके फिट आहेत,शंभरी जरुर पार करणार

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      अगदी बरोबर बोललात, विजिथ जी. धन्यवाद

  • @sharadp4178
    @sharadp4178 Před 6 měsíci +5

    Jay bhandari 🎉

    • @sunildmello
      @sunildmello  Před 6 měsíci +1

      धन्यवाद, शरद जी

  • @prakashpawar5531
    @prakashpawar5531 Před 9 měsíci +14

    To get recruited in military and police it's compulsory to go for 5 pull ups
    Here 70year old person stepping for 85feet tree truelly admirable
    Real heroes of Chatrapati Shivaji Maharaj
    Salute to Bhandari peoples

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      Thank you, Prakash Ji

    • @smitasawant3037
      @smitasawant3037 Před 8 měsíci

      हे सर्व पुढे पाहायला कोणी आहे का.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 8 měsíci

      @@smitasawant3037 जी, ह्या व अशा बऱ्याच पारंपरिक उद्योगधंद्यांच्या बाबतीत आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने 'नाही' असे आहे. धन्यवाद

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 Před 9 měsíci +6

    सुनिलभाऊ तुमचे अभिनंदन
    आमच्या मेहनती समाजबांधवाचीदखल घेवून
    जगासमोर आणला आणि भंडारी समाज हा
    समुद्र किनार्‍यावर वसलेला आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, शुभदा जी

  • @vikrantpatil5761
    @vikrantpatil5761 Před 3 měsíci +1

    जय भंडारी खुप छान माहिती आमच्या समाज्याच्या पारंपरिक व्यवसाय बद्दल Dmello सर आपण तुमच्या चॅनल च्या माध्यमातून युवा पिढीला जाण करून खुप खुप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 měsíci

      खूप खूप धन्यवाद, विक्रांत जी

  • @amolsharma704
    @amolsharma704 Před 9 měsíci +3

    सुनील जी शब्द नाहीत तुमचे कौतुक करायला....सर्व शब्द वापरून झालेत नेहमी प्रमाणेच अती सुंदर.......

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, अमोल जी

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před 9 měsíci +2

    सुनिल जी फारच छान माहिती मिळाली ताड व माडाच्या शेतील पोषक वातावरण आहे.... तरुण पिढी ने यात लक्ष घालून माडाची शेती केली पाहिजे. शेती तंत्रज्ञान प्रगत झाले आहे ..त्याचा वापर . केले तर योग्य होईल...

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, दीपक जी

  • @yaminiborkar5993
    @yaminiborkar5993 Před 9 měsíci +3

    सुनिल तुमचे विडिओज खुपच छान असतात.तुम्ही खूपच आत्मीयतेने व समरसून मुलाखत देणारया माणसांशी बोलून त्यांना बोलतं करता,स्वतःही त्यांच्या कामात रस घेवून ते काम करता,ते मला खूप आवडते, भावते. अतिशय आदर्श,प्रेमळ,रसिक असे तुम्ही तरुण आहात.तुम्हाला अनिशाचीही साथ लाभली आहे.कुणीही तुमच्या दोघां पासून प्रेरणा घ्यावी असे वाटते.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, यामिनी जी

  • @vaibhavkulkarni3233
    @vaibhavkulkarni3233 Před 9 měsíci +2

    लोकांना शहराचे खूप आकर्षण असते पण खर खुर आयुष्य हे गावाकडे असते हे गाव सोडलेल्या तरुण मुलांना खूप उशिरा समजते
    खूप छान आयुष्य जगत आहेत हे काका
    त्यांच्या मुलांची जस जमेल तसं ही पारंपरिक कला कौशल्य जपले पाहिजे

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, वैभव जी

  • @Sanjoo_Mumbai
    @Sanjoo_Mumbai Před 9 měsíci +2

    मला वाटतं "शब्दांच्या पलीकडले"
    एवढीच प्रतिक्रिया पुरेशी आहे!

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी

  • @rupeshbhekare5116
    @rupeshbhekare5116 Před 9 měsíci +3

    काका, काकू, आणि भूषण दादा खूप छान 👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप शुभेच्छा, रुपेश जी

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 Před 9 měsíci +3

    अलीशा वहिणींची आज खुप मज्या आली असणार.खुप माहीतीपुर्ण व्हीडीओ होता.भविष्यात ताडगोळे खायला काय पहायला सुद्धा मीळणार नाहीत ऐकुन मन हेलाऊन गेल.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, आशा जी

  • @anandjoshi1414
    @anandjoshi1414 Před 3 měsíci +2

    सुनिल तुमची भाषा एकदम शुद्ध मराठी आहे. ऐकायला छान वाटते. मराठी शब्द बरोबर वापरता. अनिशिताईंची तर मजाच चालली आहे..साखरी ताडगोळे खात आहेत..मलासुद्धा हेवा वाटतो...😂

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 měsíci

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, आनंद जी

    • @shradhaindalkarmagic111
      @shradhaindalkarmagic111 Před měsícem

      Bhandari samajachi kuldevi konti ahe​@@sunildmello

  • @sadanandkothavale8509
    @sadanandkothavale8509 Před 6 měsíci +2

    चांगला उपक्रम

    • @sunildmello
      @sunildmello  Před 6 měsíci

      धन्यवाद, सदानंद जी

  • @shundi5
    @shundi5 Před 4 měsíci +2

    कौतुक या व्यवसाय अजून सुरू आहे आणि आम्हाला ताडगोळे मिळत आहेत🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 měsíci

      धन्यवाद, शुंडी जी

  • @RP_creation_79
    @RP_creation_79 Před 25 dny +1

    Kaka Kaku ekdam mast vatla,
    Sunil bhau khup chaan video,
    Mi Rajesh pedanekar Mumbai
    Baryach Generation ethech but mulche aamhi Pedne Goa ,mi pan yach samajacha, Abhiman vatato evdh Dhadsi kaam baghtana, mazha mama suddha Madi kadhto Gavi jaitapur Ratnagiri, tadgolya sarkhach ha video God God vatla ,once again tnx Sunil bhau and anisha vahini,
    Jai Bhandari, Jai Maharashtra
    Jai Shivray❤🎉

    • @sunildmello
      @sunildmello  Před 22 dny

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजेश जी

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Před 8 měsíci +2

    तुमचे व्हिडिओ नेहमीच वैशिष्टपूर्ण असतात...🎉🎉

    • @sunildmello
      @sunildmello  Před 8 měsíci +1

      खूप खूप धन्यवाद, माणिकलाल जी

  • @vipulraut2900
    @vipulraut2900 Před 9 měsíci +3

    चांगली माहिती दिलीत भंडारी समाजाबद्दल 👍👌🏻👍👌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, विपुल जी

  • @nayannarvekar7198
    @nayannarvekar7198 Před 9 měsíci +4

    Mast episode apratim 👌👌👌👌 Mi hi bhandari aahe👍👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, नयन जी

  • @sharada_dance
    @sharada_dance Před měsícem +1

    khoop bhari

    • @sunildmello
      @sunildmello  Před měsícem

      धन्यवाद, श्रद्धा जी

  • @All-is-Maya
    @All-is-Maya Před 9 měsíci +3

    Hello. Hetkari Bhandari here. Original from Bhutnath Vairee, Malvan. Last two generations in Mumbai. Grand Father was a Mamlaydar. Father was in IAS. I retired from the Corporate World. Ancestors were farmers. Education changed everything for us.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      What a success story. Thank you for sharing this with us, Ramana Ji

    • @maheshmule2369
      @maheshmule2369 Před 7 měsíci +1

      Sashakta sharirbandha purvichi juni manse asech hote kastalu amhi malvanche hetkari bhandari tondavali che ♥️ ahot

  • @user-ie9su2hx6y
    @user-ie9su2hx6y Před 9 měsíci +2

    Sunil khup chan video,Raut bhau he maze bhau ahet,thank u tumhi tyancyavar video banvala.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद

  • @manoharlavate2129
    @manoharlavate2129 Před 9 měsíci +2

    तुमचे आपल्या वसई चे सर्व व्हिडिओ सुंदर असतात
    व्हिडिओ पाहून खूप आनंद होतो वसई ची विविध प्रकारची माहिती होते
    वसई मध्ये असूनही पाहीले नाही तुमच्या व्हिडिओ माध्यमातून पाहतो
    माधुरी

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधुरी जी

  • @precillamachado6793
    @precillamachado6793 Před 9 měsíci +3

    खुप छान माहिती मिळाली काकांचे कौतुक करावं तेवढे कमीच आहे. सुनिल डिमेलो तुम्हांला खुप छान माणसं भेटली आहेत. तुम्हां सर्वाचे आभार. काकांना चांगले आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हिच प्रभू चरणी प्रा रथना.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रेसीला जी

  • @jacinthapinto7839
    @jacinthapinto7839 Před 9 měsíci +6

    village life and hardworking people, gob bless them always... very nice 👌👌👌👌

  • @Aagri838
    @Aagri838 Před 7 měsíci +1

    Mast sunil Dada 🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Před 7 měsíci

      खूप खूप धन्यवाद

  • @user-zb8rw4hz1k
    @user-zb8rw4hz1k Před 5 měsíci

    सुनील भाऊ तुझ्या प्रत्येक व्हिडिओ ला त्या त्या गावचा एक मातीचा सुगंध असतो.and realy we feel that oroma. धन्यवाद सुनील जी.देव तुझे भले करो.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 5 měsíci

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyou Před 9 měsíci +5

    मस्त सूनिलभाऊ
    नेहमी सारखा एपिसोड रंगला
    You are doing great work.
    Keep it up.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, अजित जी

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Před 9 měsíci +2

    Khup chhan padhatine taad gole kadhatana pahayla milale aani atishay premal distat Raut family mhanje tighehi hasat mukhane tumchya barobar vagle..hyalach mhantat sadi , saral manse 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci +1

      अगदी बरोबर बोललात, सरिता जी. खूप खूप धन्यवाद

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před 9 měsíci +2

    सुनीलजी नेहमीप्रमाणे छान व्हिडीओ 👍खूपच छान माहिती दिलीत..काकांना नमस्कार.... धन्यवाद...

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @sanjogpatil9681
    @sanjogpatil9681 Před 9 měsíci +6

    Thank You Sunil brother.... M a proud BHANDARI

  • @aabiddalait8371
    @aabiddalait8371 Před 6 měsíci +1

    It's unbelievable yar. 70 yrs uncle climbing & coming down. Really it's amazing. Hat's of to uncle for his confidence & strength. God bless him.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 6 měsíci

      You said it right, Aabid Ji. Thank you

  • @arunapatil7255
    @arunapatil7255 Před 6 měsíci +1

    अप्रतिम खरच खूप सुंदर व्हिडिओ बनवता आणि खूप छान बोलता तुम्ही तुमचे बरेच व्हिडिओ मी बघीतले धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Před 6 měsíci

      खूप खूप धन्यवाद, अरुणा जी

  • @ursulasequeira3971
    @ursulasequeira3971 Před 9 dny +1

    Thanks while watching this all my childhood memories came alive. And the owner (kaka) I know him personally: it was nice watching him .

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 Před 9 měsíci +1

    सुनील तुम्हाला सलाम.... आपल्या भागातील सर्व प्रकारची ऊत्तम आणि मुद्देसूद माहिती देता...

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, विजय जी

  • @bhushanraut3226
    @bhushanraut3226 Před 7 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद सुनील जी हा व्हिडिओ केल्याबद्दल 🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Před 7 měsíci

      धन्यवाद, भूषण जी

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Před 9 měsíci +4

    ग्रामीण भागातील शुद्ध मातीची भांडी, माठ बनविणारे कारागीर यांचा विडिओ, वसई तालुक्यातील नामशेष होणारे तांदूळ शेती करणारे शेतकरी यांचा विडिओ बनवावा.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      पारंपरिक पद्धतीने मातीची भांडी बनवणारे कोणी असतील तर कृपया संपर्क द्या. धन्यवाद, राजीव जी

  • @Birdsnaps
    @Birdsnaps Před 9 měsíci +1

    खूप छान व्हिडिओ. मनापासून धन्यवाद 💐

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद

  • @veronicadmello6363
    @veronicadmello6363 Před 9 měsíci +1

    सुनील, खूप छान छान विषय तू हाताळत असतो, तुझे व अनिशा चे खास अभिनंदन आजचा व्हिडिओ मनाला खूप भावला .

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वेरोनिका जी

  • @prakashparab5789
    @prakashparab5789 Před 9 měsíci +2

    सुनीलजी नेहमीप्रमाणेच vlog उत्तम ... ❤

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी

  • @jyotichiplunkar2654
    @jyotichiplunkar2654 Před 5 měsíci +1

    सुनील वसईची भाज्या अतिशय चवदार असतात. आणि ताडगोळे पण अप्रतिम आहेत.दादरला मिळतात .पण पनवेल ला रहायला गेल्या पासून मिळत नाहीत.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 5 měsíci

      खूप खूप धन्यवाद, ज्योती जी

  • @sudeshnirulkar227
    @sudeshnirulkar227 Před 9 měsíci

    गोड दृश्य मेजवानी😋!! ताडगोळे फेवरेट!!
    सुनील तुझं मराठी ऐकणे ही सुद्धा तृप्त करते कानाला!! राऊत काकांना सलाम!!

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुदेश जी

  • @bandumumbaikar
    @bandumumbaikar Před 8 měsíci

    सुनील तु काका ,काकी आणि अनिशा सुद्धा ग्रेट

    • @sunildmello
      @sunildmello  Před 8 měsíci

      खूप खूप धन्यवाद, बंडू जी

  • @shobhawavikar9301
    @shobhawavikar9301 Před 9 měsíci +1

    खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला.मी पहिल्यांदा हा ताड गोला पाहिला.thank you Sunil brother.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, शोभा जी

  • @suvarnapawar5715
    @suvarnapawar5715 Před 9 měsíci +1

    Great video.... खूप कष्ट आहेत यात.. तुलनेने पैसे कमी मिळतात.. त्यामुळे मुलं इतर option शोधतात

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सुवर्णा जी

  • @vasantis_kitchen
    @vasantis_kitchen Před 9 měsíci +3

    Excellent video! So good to see Anisha!
    Thanks for sharing these stories! Hats off to kaka! Stool war chadaych ki chakkar yete!

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci +1

      खूप खूप धन्यवाद, वासंती जी

  • @inasgonsalves2147
    @inasgonsalves2147 Před 9 měsíci +6

    Great Window to the World experience. Good that still the traditional work is seen in our area. Good cover up of Bhandari tradition and work.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci +1

      Thanks a lot for your kind words, Inas Ji

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před 9 měsíci +1

    Great Great Sir
    Apratim Apratim
    Khupp Mehanat Aahe
    Salam Uncle Aante Yana
    Sunil Sir Dhnywad
    👌👌👌👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप शुभेच्छा, सुधा जी

  • @satyapalgavhane7649
    @satyapalgavhane7649 Před 9 měsíci +2

    Khupch chaan mahtey deta bhai tumhi❤

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, सत्यपाल जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 Před 9 měsíci

    खूप छान माहिती मिळाली .ताटगोळा सगळ्यांना आवडतो.एक खाऊन मन भरत नाही .काका जे म्हणाले ते विचार करण्यासारखे आहे.आपण आपल्या मागच्या पिढीला काय देणार आहोत.काकांच्या हिंमतीला सलाम आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. खूप खूप धन्यवाद

  • @josephmachado3977
    @josephmachado3977 Před 9 měsíci +1

    सुनीलजी आपण फार सुंदर माहिती आम्हाला देत आहेत आमच्या जवळ भालचंद्र रहात असून आम्हाला जी माहिती नाही ती आपण शोधून देत आहेत आपले आपली पत्नी व भालचंद्र व कुटुंबीय ह्यांचे खास अभिनंदन ७०च्या वयात ऊन्च झाडावर चढून ताडाची फळे काढणे तसेच त्या फळातून ताळगोळे काढणे सोपी गोष्ट नाही पुन्हा एकदा अभिनंदन
    ज्यो मच्याडो सध्या वास्तव्य लन्डन येथे आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, ज्यो अंकल

  • @PMantri6194
    @PMantri6194 Před 9 měsíci +1

    सुंदर ब्लॉग. Keep it up 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, मंत्री जी

  • @mayurkamble6621
    @mayurkamble6621 Před 6 měsíci +1

    खरच खुप, प्रेमळ आहेत काका, आणि,काकु,आता आसे प्रेमळ मानसे खुप,,कमी अढळतात 👌👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 6 měsíci

      अगदी बरोबर बोललात, मयूर जी. धन्यवाद

  • @Happiness394
    @Happiness394 Před 9 měsíci +4

    *हे "ताडगोळे" आणि "लीची" खायची माझी मागील दिड वर्षा पासूनची तीव्र-तीव्र-तीव्र ईच्छा आहे... माहित नाही कधी पूर्ण होईल😢 आमच्या सोलापूर भागात यातलं एकही फळ पहायला मिळालं नाही...अजून तरी !!* 😢😢

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      वसई, मुंबई परिसरात कधी आलात तर ही इच्छा नक्की पूर्ण होईल. धन्यवाद

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 Před 9 měsíci +1

      ताड वृक्ष हा उत्तर कोकण ते गुजरात बॉर्डर या भागात पहावयास मिळतो. तो इतर भागात सहसा वाढत नाही.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      @@mangeshraut2209 जी, ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद

  • @sujitsharma9409
    @sujitsharma9409 Před 8 měsíci +1

    आम्ही विदर्भात राहतो त्यामुळे हा फळ कधीही खाल्लेलं नाही, परंतु वसई ला कधी जाणं झालं तर नक्कीच खाऊ. खूप छान. 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 8 měsíci

      आवडेल तुम्हाला. धन्यवाद, सुजित जी

  • @shreyassarmalkar6620
    @shreyassarmalkar6620 Před 9 měsíci +5

    ❤Thank you ! Sunil sir for sharing our anscseterial tradition..Jai Bhandari...Shreyas Sarmalkar from vasai east.😊

  • @Allinonezzz
    @Allinonezzz Před 3 měsíci

    kaka khup bhari, juni loka nhemi manuski japun astat

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 měsíci

      खूप खूप धन्यवाद

  • @ajitgadkari3988
    @ajitgadkari3988 Před 9 měsíci +2

    खूप सुंदर माहिती जर आपण शाळेत असे विडिओ दाखविले तर मुलांना माहिती मिळेल व आपला महाराष्ट्र समजेल.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अजित जी

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Před 9 měsíci +1

    सुनील तुमचे विडिओ " एकापेक्षा एक " असतात...........ग्रेट.......

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, राजीव जी

  • @kavira48
    @kavira48 Před 9 měsíci +1

    Khupach sundar aani informative video. God bless🙌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      धन्यवाद, कविरा जी

  • @harivadanmadur8893
    @harivadanmadur8893 Před 6 měsíci +1

    सुनिलजी आपले निसर्गरम्य VDO's खूप छान असतात.
    धन्यवाद !! 🎉🎉

    • @sunildmello
      @sunildmello  Před 6 měsíci

      खूप खूप धन्यवाद, हरीवदन जी

  • @rajeshreepereira2447
    @rajeshreepereira2447 Před 9 měsíci +1

    तुमच्या कडून पुन्हा एकदा छान माहिती मिळाली.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      धन्यवाद, राजेश्री जी

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 Před 9 měsíci +1

    काकाना सलाम.सुनिल सर तुम्हाला धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, सुजित जी

  • @abhijitwethekar6352
    @abhijitwethekar6352 Před 9 měsíci +1

    Khup chaan savistar mahite.. Good going sunilji.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      सुप्रभात, खूप खूप धन्यवाद, अभिजित जी