वसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai cha Keliwala - A documentary

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024

Komentáře • 3K

  • @sunildmello
    @sunildmello  Před 4 lety +141

    मंडळी, मला कल्पना आहे की हा व्हिडीओ मोठा आहे व आपणापैकी बऱ्याच लोकांना पूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी पुरेसा वेळ नसणार म्हणून खालीलप्रमाणे व्हिडिओची विभागणी आपल्यासाठी दिलेली आहे.
    ०१:२९ ते ११:४३ केळ्यांची निवड व कापणी
    ११:४४ ते १९:५७ केळी पिकवायची पारंपरिक पद्धत
    १९:५८ ते २०:३३ कुक्कुटपालन
    २०:३४ ते २९:२६ केळ्यांची बांधणी
    २९:२७ ते ३४:०६ विरार ते दादर रेल्वे प्रवास
    ३४:०७ ते ३५:४८ दादर स्टेशन ते हिंदू कॉलनी पायी प्रवास
    ३७:३९ ते ४४:३४ केळीविक्री व ग्राहकांचे अभिप्राय
    ४४:५६ ते ४५:१२ इराणी हॉटेलात नाश्ता
    ४५:१३ ते ४५:५३ दादर ते विरार रेल्वे प्रवास
    ४५:५४ ते ४६:५० मायकल काका व त्यांच्या सहचारिणीचे आभार

    • @shobhanatejwani8261
      @shobhanatejwani8261 Před 4 lety +5

      Me time kadun tuza vidio purn bhagate. karan me samvedi brahman samajatali ahe. maza intercast marriage zala ahe. hya mazya old memories ahet. so mala tuze sagale vidio avadatat.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +2

      खूप खूप धन्यवाद, शोभनाजी. तुमच्या कमेंट्स आम्हाला नवनवीन व्हिडीओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात.

    • @sachinjadhav3154
      @sachinjadhav3154 Před 4 lety +3

      तुमचे खुप खुप आभार.

    • @prafullgovilkar00
      @prafullgovilkar00 Před 4 lety +2

      camera thodda changla vapra baki tumche sagle video chhan asatat

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +1

      @@sachinjadhav3154 धन्यवाद, सचिन जी.

  • @rekhalopes8454
    @rekhalopes8454 Před 4 lety +134

    सुनील,
    आमच्या नानाच्या जीवनावर आधारित वसईचा केळीवाला हा माहितीपट बनवून तुम्ही नानाच्या कामाचा गौरव करून त्याना विश्वपरिचीत केले आहे, म्हणून आम्ही *ख्रिस्तविराज* आणि *समृद्धी* कुटूंबीय आपले सदैव ऋणी आहोत.
    नानाने ह्याच व्यवसायातून आम्हा पाच भावंडांचे संगोपन, शिक्षण, लग्ने करून स्वत:चे घरही बांधले. नानाचा हा व्यवसाय आजही अविरतपणे चालू आहे, आणि त्यांच्या ह्या कामाचा आम्हा दोन्ही कुटूंबांना रास्त अभिमान आहे.
    सुनील पून्हा एकदा आमच्या बय (आजी) कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून तुमचे मनस्वी आभार.
    रेखा

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +5

      रेखाबाय, नानाला खरोखर सलाम हाय. तो ग्रेट हाय. त्याव आपल्या आख्ख्या समाजाला अबीमान हाय. आबारी.

    • @smitabandivadekar4742
      @smitabandivadekar4742 Před 4 lety +12

      आम्ही विरारलाच राहतो.
      *आपण खुपच भाग्यवान आहात की...काकांसारखे पालक आपणांस लाभले..त्यांना कधीच अंतर देऊ नका.
      *अगदी पूर्ण व्हिडिओने जागीच खिळवून ठेवलं. खरंच कमेंट्स करण्यासाठी शब्दच उरले नाहीत. ओठातले शब्द ओठातच स्थिरावले. ह्या वयात एवढं थोर, मेहनती व्यक्तिमत्त्व...काकांचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
      *आपल्या सुंदर आवाजात अगदी आपल्या प्रामाणिक मेहनतीने ज्या भाऊंने हा व्हिडिओ बनविला त्यांचेही खूपच कौतूक आहे.
      आजच्या तरूणांनी खरोखरच हा मार्गदर्शनापद व्हिडिओ जरूर पहावा..ही गरज आहे. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +1

      @@smitabandivadekar4742 जी, तुमच्या प्रोत्साहनपर शब्दांसाठी धन्यवाद.

    • @prasadjoshi7373
      @prasadjoshi7373 Před 4 lety +2

      मायकल काका तुमचे वडील आहेत ही फारच सौभाग्याची गोष्ट आहे.

    • @ashokjoshi1834
      @ashokjoshi1834 Před 4 lety +5

      नानांचा आदर्श घेण्यासारखा आहे .तुम्ही ते लिहून कृतज्ञता व्यक्त केलीत .अशी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत .

  • @sangitasarang3551
    @sangitasarang3551 Před 4 lety +176

    डोळे भरून आले हो संपूर्ण विडीओ पाहुन
    खरंच आजच्या काळात ही एवढी मेहनत कोणाला ही न झेपणारी आहे ..सो काकांना पुन्हा एकदा साष्टांग दंडवत .ग्रेट,ग्रेट, आणि ग्रेटच 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +10

      हो संगीताजी. काकाजी मेहनत ह्या वयात घेत आहेत ती आपल्याला जमणे कठीण आहे. मी काहीही वजन न घेता त्यांच्यासोबत फिरलो तरी खूप थकलो, मात्र काका इतकं वजन वाहूनही थकले नव्हते. सलाम आहे त्यांना, धन्यवाद.

    • @govindagunjalkar3176
      @govindagunjalkar3176 Před 4 lety +2

      काका ग्रेट आहेत.

    • @vaishalideshmukh7810
      @vaishalideshmukh7810 Před rokem +2

      काका सलाम तुमच्या मेहनतीला.🙏❤

  • @mrs.sanjumesh7874
    @mrs.sanjumesh7874 Před 6 měsíci +3

    खूप कष्टाळू काका आहेत हे, बघून डोळ्यात पाणी येत आहे, इतका अवघड प्रवास सोप्या पद्धतीने करून कष्ट करतायत, पण पायऱ्या चढताना पाय किती थकत असतील काकांचे, येवढ्या वयात इतकं कष्ट करतायत, देवा सुखी ठेव काकांना नेहमी, शतायुषी ठेव🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 6 měsíci

      खूप खूप धन्यवाद, संजुमेश जी

  • @rebeccalewis3947
    @rebeccalewis3947 Před 3 lety +25

    If there is any documentary I've watched in my 23 years, then it is this video that really touched me and brought tears to my eyes..
    My generation wouldn't even think of doing 1% of the effort he's doing...
    Huge huge huge respect to Uncle Michael..
    And thank you for documenting this Sunil..

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +2

      Thanks a lot for your kind words, Rebecca Ji

    • @ryandsouza4482
      @ryandsouza4482 Před 2 lety +1

      I just watched it, share your sentiments

  • @nitinnarkhede2642
    @nitinnarkhede2642 Před 4 lety +67

    सुनील भाऊ, यु ट्यूब वर काकांचा व्हीडीओ पाहताना पहिल्यांदा डोळे भरून आले. काकांच्या काबाडकष्टाला साष्टांग दंडवत. तुझेही मनापासून आभार 🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +1

      हो, नितीनजी काकांची मेहनत पाहून आपण भावनिक होतो हे खरंय. धन्यवाद.

  • @maggituscano2741
    @maggituscano2741 Před 4 lety +78

    आपण केलेला वसईचा केळी वाला हा माझ्या नानांचा माहिती पट पाहुन आमचे नाना करत असलेल्या मेहनतीला थोडेफार फळ मिळाले किंवा त्या मेहनती चे चीज झाले असे मला वाटते आणि हा व्हिडिओ पहात असताना डोळे भरून आले कारण लहान असताना मला सुध्दा आमच्या नानांनी तीन चार वेळा मुंबईला नेलेले आणि मला एका गि-हाईंकांच्या घरी बसवून ते पुर्ण माल कितीतरी जिने चढुन उतरून विकुन यायचे, हयाची कल्पना आज तुमचा व्हिडिओ पाहताना आली, तुमचे खुप खुप आभार व वसईची संस्कृती जतन केल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +2

      नानाला सलाम, त्या मेहनतीला आन सातत्याने कार्यरत ऱ्याश्या स्वभावाला सलाम!!!

    • @vaishalidabholkar5321
      @vaishalidabholkar5321 Před 4 lety +2

      Heart touching

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      @@vaishalidabholkar5321 जी, धन्यवाद.

    • @devramshirole9308
      @devramshirole9308 Před 8 měsíci +1

      नानांच्या मेहनतीला सलाम यांच्या नंतर हे काम कोणीच करनार नाही खूप खूप धन्यंवाद

    • @vinitvaskar9655
      @vinitvaskar9655 Před 6 měsíci

      मित्रा ते काका आता काय करतात??
      त्यांची शारीरिक व आर्थिक स्थिती कशी आहे ??
      सांगू शकशिल का ?

  • @dhananjaydorle5789
    @dhananjaydorle5789 Před 3 lety +22

    कुठल्याही शासकीय पुरस्काराचा खरा मक्तेदार ....very motivating ....सलाम Michel काका धनंजय नागपूर

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद, धनंजय जी

    • @atulraykar3107
      @atulraykar3107 Před 2 lety +1

      होय भाऊ बरोबर तुमचे, पण दुःख आहे भारतात चमचेगिरीलाच पुरस्कार मिळतो

  • @prajakta3010
    @prajakta3010 Před 2 lety +3

    सुनील, खूप मोठा video म्हणुन नंतर आरामात बघेन असा विचार करून इतके दिवस मी हा video पाहिला नव्हता, पण परवाच्या मुलाखतीत तू त्याचा उल्लेख केला आणि मी वेळ काढून तो पाहिला. आता बोलायला शब्दच उरले नाहीत. मायकल काकांना साष्टांग दंडवत. या वयात ते जे मेहनतीचे काम करत आहेत ते आपल्याला ह्या वयात देखील जमणार नाही. त्यांचा हा प्रवास दाखवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद, प्राजक्ता जी

  • @archanapatil3948
    @archanapatil3948 Před 4 lety +38

    काकांचं काम, कष्ट समाजासमोर आणल्याबद्दल आपलं अभिनंदन.
    भाज्या / फळांचे भाव विचारताना घासाघीस करणारे हा माहितीपट बघितल्यावर दहा वेळा विचार करतील ही अपेक्षा!

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      अगदी खरं अर्चना जी, धन्यवाद.

  • @shailacarval2177
    @shailacarval2177 Před 4 lety +26

    सुनिल सर धन्यवाद . हा व्हिडिओ पाहताना माझ्या डोळयांत पाणी आले . कारण माझे बाबा पहाटे पाहिल्या गाडीने दादरला असेच भाजी घेऊन जायचे . पण ते कशप्रकारे भाजी विकत असतील याची कल्पना आज मला व्हिडियो पाहून आली .आज माझे बाबा हयात नाहीत पण त्यांच्या कष्टाला मी सलाम करते .सर आपला व्हिडियो अप्रतिम !भाषा अतिशय सुंदर !हा व्हिडियो सर्वांना मनापासून आवडेल यात तिळमात्र शंका नाही ,

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      हो, शैलाजी आपल्या पूर्वजांनी खरोखर खूप मेहनत घेतली आहे. धन्यवाद.

    • @sarojsatam1326
      @sarojsatam1326 Před 4 lety

      Namashkar kaka

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 Před rokem +3

    माहिती पट पाहून डोळे तर पाणावले पण अतिशय मेहनती मायकल काका ह्या वयात केवढे ते कष्ट..आपण विचारच करू शकणार नाही. सलाम त्यांच्या मेहनतीला 🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, सुजाता जी

  • @yaminiborkar5993
    @yaminiborkar5993 Před 2 lety +6

    खूप खूप आभारी आहे सुनिल कि तुम्ही ही डॉक्युमेंटरी बनवून अतिशय कष्टाळू,सचोटीने व मनापासून काबाडकष्ट करणारया काकांना न्याय दिला व साठ वर्षांपासून चाललेल्या त्यांच्या अमाप कष्टांचे चीज केले.सर्व लोकांना त्यांची ओळख झाली.ह्यासाठी तुम्हीही फार मेहनत घेतली.दोघांनाही माझा मानाचा मुजरा.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, यामिनी जी

  • @pritithale4536
    @pritithale4536 Před 4 lety +64

    मायकल काका तुम्हाला मानाचा मुजरा खरच आज येवढ्या वयात सुध्दा खुुप कष्ट करतात

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      धन्यवाद प्रितीजी

    • @bhaskarzemse6659
      @bhaskarzemse6659 Před 4 lety

      Very Hardworker dedicated person n real nature lover maintaining Environment .Young generation must take active part in maintaining our environment.No dobut this is his livelyhood.Hats off to both Kaka as well Sunil for making nice video

    • @bhaskarzemse6659
      @bhaskarzemse6659 Před 4 lety

      P

    • @bhaskarzemse6659
      @bhaskarzemse6659 Před 4 lety

      By mistake p toched

  • @balashebshinde3856
    @balashebshinde3856 Před 4 lety +9

    खरच डोळे भरून आले काकांची मेहनत बघून. ह्याच्यामुळे मुंबई कराना ताजा आणि नैसर्गिक माल मिळतो. सो एक विनंती आहे की या मालाची किंमत करू नका. कमी पैशात. योग्य तो मोबदला द्या आणि काकांच्या कष्टाला सलाम. सर तुम्हाला ही. कारण असे व्हीडियो कोण बनवत नाही. ग्रेट जाब

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद, बाळासाहेब जी.

  • @satishjoshi4174
    @satishjoshi4174 Před 4 lety +6

    मायकल काका चे कष्ट बघुन खुप आश्चर्य वाटले. येवढे ओझे ते कसे या वयात उचलू शकतात खरोखर कमाल आहे. हिंदू कॉलनीतील लोक भाग्यवान आहेत..ज्यांना असा without pesticide चा माल मिळतो. देव करो आणि काकांना उदंड आयुष्य लाभो.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद, सतीश जी

    • @vinitasawant4800
      @vinitasawant4800 Před 3 měsíci

      मायकल काकांना नमस्कार,या वयात कामाची जिद्द,कावड घेऊन जो प्रवास ,आणि या वयात मानले बुवा,मला तर या वयातला प्रवास पाहून रडू कोसळले,आता या वयात त्यांच्या मुलांनी त्यांना मदत करावी.त्यांना आराम द्यावा.
      आमच्या bandra chya घरी कावड घेऊन वसईचे काका ताज्या भाज्या यायचे विकायला त्यांची आठवण झाली,खूप मेहनती असतात .
      🙌🙌🙌🙏🙌🙌🙌

  • @purushottam647
    @purushottam647 Před 8 měsíci +3

    अतिशय कष्टाचं काम आहे.काकांना व तुम्हाला प्रेमाचा नमस्कार! अनवाणी पायांनी चालताना बघून वाईट वाटले.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 8 měsíci

      खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी

  • @somnathgoje9299
    @somnathgoje9299 Před 4 lety +36

    खरंच प्रनाम ह्या माऊलीला किती कष्ट घेताय ते ह्या
    वयात

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      हो, सोमनाथजी खरोखरच खूप कष्टाचं काम आहे.

    • @chandrakantambekar3026
      @chandrakantambekar3026 Před 4 lety

      तूमचा म्हनंतीला सलाम

    • @ravindranarvekar3283
      @ravindranarvekar3283 Před 4 lety

      खरेच नाननचाया मेहनतीला मानाचा मुजरा

  • @priyadeshpanderajan
    @priyadeshpanderajan Před 4 lety +110

    आजच्या पिढीला लाजवतील असे त्यांचे काम आहे जोवर हात पाय चालतात तोवर कष्ट करायचे ही शिकवण देत आहेत
    देव त्यांना खूप बळ आणि भरभराट देवो ही देवा चरणी प्रार्थना

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      हो, प्रियाजी. काका खरोखरच आजच्या पिढीला खूप काही शिकवून जातात धन्यवाद.

    • @prasadjoshi7373
      @prasadjoshi7373 Před 4 lety +1

      @@sunildmello तुम्हाला नाताळ chya शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +1

      @@prasadjoshi7373 जी तुम्हालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

    • @rajeshwarkalge632
      @rajeshwarkalge632 Před 4 lety +1

      Bhau tumchey khup abhar.
      Tumhi khup durmil gosti dakhwalat.
      Mi vachley hotey ki Velchi keli chey variety naamshesh zali.
      Tumchy kadi ashich vanaspati va rural life prt dakhwa.
      Tumhala khup khup shubhechha.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      @@rajeshwarkalge632 जी, धन्यवाद.

  • @sanjaysawant232
    @sanjaysawant232 Před rokem +2

    धन्यवाद. किती प्रामाणिक, किती कष्ट डाेळे आेले हाेतात. उदंड आयुष्य लाभाे हीच आई भवानी चरणी प्रार्थना.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, संजय जी

  • @seemaraut2404
    @seemaraut2404 Před 3 lety +2

    वसईचा केळीवाला ही तुमची डाॅक्युमेंटरी अतिशय आवडली.लोकांना फक्त वसईची केळी,भाजी माहित आहेत.पण ती वाडीतून थेट त्यांच्या दारापर्यंत आणणारा मधला दुवा त्यासाठी किती मेहनत घेतो हे माहित नसेल.तुम्ही या डाॅक्युमेंटरीद्वारे यावर छान प्रकाश टाकलात .श्री.मायकेलकाका हा व्यवसाय करताना जी अपार मेहेनत घेतात त्याला तोड नाही.खरोखरीच ही एक साधना आहे त्यांची.बरं कुठेही मी काही मोठं काम करतोय याचा लवलेशही त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत नाही.ग्रेट माणूस!! 🙏
    माझे माहेर आगाशीचे असल्यामुळे त्यांच्याविषयी अधिक आपुलकी.तसेच माझी मोठी बहिणही ( सौ.चौधरी )हिंदू काॅलनीत राहते.तिच्याकडे नित्यनेमाने काका भाजी देत आलेत.मीही त्यांना बरेचदा भेटलेय.म्हणून पाहताना खूप आनंद झाला. आणि सुनिल डिमेलो,तुम्ही या Unsung Heroes ना प्रकाशात आणण्याचे फार मोठे काम केलेत.तुमचेही खूप कौतुक. व अभिनंदन! !

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सीमा जी

  • @divinepropertydealernalaso9860

    असा व्यावसाय करणारे ज्येष्ठ व्यावसायिक आपल्या समाजात आजही आहे...

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      धन्यवाद, जिमिजी.

  • @chhayalobo4773
    @chhayalobo4773 Před 4 lety +29

    खूपच छान .डोळयात पाणी आले.काका तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार।

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      हो, छायाजी, काकांचे हे मेहनतीचे काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. धन्यवाद.

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 Před rokem +2

    खरच डोळ्यातून पाणी आलं ‌काकांच्या असेच बालबुद्धी ताकत राहू दे देवा त्यांना कायमस्वरूपी ठणठणीत राहुदे मनापासून नमस्कार थँक्यू सुनील दादा

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, अंकुश जी

  • @neetashinde538
    @neetashinde538 Před 2 lety +2

    या काकांच्या कष्टांना शब्दच नाही खूप खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या परिवाराला सुध्दा धन्यवाद सहयाद्रीचा कार्यक्रम पाहीला विरार पश्चिम

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद, नीता जी

  • @meenatuscano2854
    @meenatuscano2854 Před 4 lety +30

    Thanks Sunil , for giving Recognition to my Nana. Keep it up of giving knowledge to our young generation of our traditional farming business.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      आबारी मीनाबाय.

    • @shivprasadgavli8204
      @shivprasadgavli8204 Před 3 lety +1

      फक्त नतमस्तक होवून ह्यांच्या कष्टाचा आदर्श घ्यावा आत्महत्या करू इच्छिणाऱ्या किंवा तसा विचारात असलेल्या सर्वांनी हा व्हिडीओ पाहायला हवा। व्हिडिओ ला हा विषय निवड केली त्याबद्दल सुनील तुझे आभार मायकल काका ना परत एकदा मानाचा मुजरा काकूंना साष्टांग नमस्कार

  • @aniljoshi6933
    @aniljoshi6933 Před rokem +3

    खरंच काकांच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम महाराष्ट्र मधील शेतकरी वर्गासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे काका आपलं कौतुक करावे तेवढं कमी आहे तुमचे कष्ट खूप आहेतच आणि आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा 👍🙏💐

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      अगदी बरोबर बोललात, अनिल जी. धन्यवाद

  • @vikasbagwe5055
    @vikasbagwe5055 Před 5 měsíci +1

    मी हा व्हिडिओ आज अपलोड केल्यानंतर चार वर्षानंतर बघत आहे, अप्रतिम व्हिडिओ वसईच्या कावड वाला एवढी मेहनत घेतो हे आम्हाला तुमच्या व्हिडिओमुळे कळलं मायकल काकांच्या मेहनतीला सलाम

    • @sunildmello
      @sunildmello  Před 5 měsíci

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विकास जी

  • @poojaraykar2793
    @poojaraykar2793 Před 2 lety +1

    असे अतिशय कष्टाळू प्रामाणिक काका त्या
    दादरकरना भेटले हे त्यांचे भाग्य आहे. काकांच्या कष्टाला सलाम. आणि सुनील तुझी कळकळ दिसते त्यालाही अभिवादन.
    डोळ्यात अश्रू आणणारे काका. त्यांच्या मेहनतीला तोड नाही.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      आपल्या प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पूजा जी

  • @rameshmehta9013
    @rameshmehta9013 Před rokem +4

    I am just talking about may be year 2010 and before. After visiting Hindu Colony, Dadar, probably he would come to my building, just sale some remaining Banana and sometimes vegetables. Just Hat's off, a hard working Vasai wala. Happy to see a very familiar face in documentary. Resident of Matunga (east), very
    known building
    in Matunga & Dadar area.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      Thanks a lot for sharing this wonderful memory, Ramesh Ji

  • @astrillrodrigues4846
    @astrillrodrigues4846 Před 4 lety +7

    अचाट , अफाट व भन्नाट कल्पना आणि तितकेच अफलातून सादरीकरण !
    या व्हिडीओ द्वारे तुम्ही 'सुवर्ण काळोखावर ' प्रकाश टाकला आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्या साठी 'वाहिलेल्या ' अथक प्रयत्नांना झळाळी प्राप्त करून दिली आहे . हा व्हिडीओ पाहून आज वसई नक्कीच आनंदात उजळली असेल.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      तुमच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण कमेंटसाठी धन्यवाद, एस्ट्रीलजी.

  • @milinddonde4413
    @milinddonde4413 Před 2 lety +1

    मराठी माणूस मेहनत करत नाही.. असे म्हणणाऱ्या साठी हि एक चपराक आहे.. प्रेरणादायी आणि भावनिक व्हिडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      धन्यवाद, मिलिंद जी

  • @pravindabholkar1455
    @pravindabholkar1455 Před 3 lety +1

    सुनील तुम्ही हा व्हिडीओ बनवल्या बद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो कारण आपला मराठी माणूस कष्ट करू शकत नाही असं म्हणणाऱ्या पर प्रांतीयांच्या आणि काही स्वकीयांच्या ही थोबाडात तुम्ही चांगलीच मारलेली आहे. मायकल काकांच्या कष्टाला माझा तरी मनापासून सलाम. मी आज साठी कडे आलेला गृहस्थ असून साधं ट्रेन मध्ये चढण आता अवघड वाटत.
    यापुढे माझ्या खिशात जर पुरेपूर पैसे असले तर काका सारख्या माझ्या स्थानिक शेतकऱ्यांकडून अधिक घासाघीस न करता त्यांच्या कडील माल खरेदी करेन.
    काका तुम्हाला माझा शतशः मराठी सलाम.
    हिंदू कॉलनी ठीक आहे पण आज मुंबईत अनेक अशी मराठी लोक आहेत की ज्यांना पुढच्या सात पिढ्यांची काळजी करावी लागणार नाही इतकी सम्पत्ती आहे. त्यांनी ही ह्या आपल्या अशा अनेक काकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यास आपली वसई-विरार चे शेतकरी स्वताच्या वाड्या बिल्डरांच्या घशात न घालता अभिमानाने आपला पारंपारिक शेती व्यवसाय कायम ठेवतील, पर्यायाने मुंबई च्या जवळपास असणारा हरित पट्टा कायम राहील, आणि मुंबई गिळंकृत करण्याचे परप्रांतीयांचे डाव फेल होतील.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      आपल्या ह्या विस्तृत व अभ्यासपूर्ण प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी

  • @2887raj
    @2887raj Před 2 lety +6

    फक्त एकच शब्द ...सलाम ....तुम्हाला काका... आणि सुनील तुमचे पण आभार... 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety +1

      खूप खूप धन्यवाद, राज जी

  • @PSMVIDEOBLOG
    @PSMVIDEOBLOG Před 4 lety +6

    सुनील जी आपण खूप चांगला व्हिडिओ टाकला आहे आणि मायकल अंकल यांना सलाम गेल्या 60 वर्षापासून जे त्यांच्याकडे पिकते ते थेट ग्राहकापर्यंत पोचवत आहेत याची प्रेरणा खर तर सर्व शेतकर्‍यांनी घ्यायला हवी.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      हो, काकांपासून खूप काही शिकण्यासारखे आहे. धन्यवाद.

  • @CreativeWorld-ot1po
    @CreativeWorld-ot1po Před 4 měsíci +2

    व्वा छान, हे एक शूर वक्तीची ओळख करून दिल्याबद्दल आभार
    आणि एवढ्या प्रचंड मेहनतीने पिक्चर शुट केल्या बदल.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 měsíci

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @sandeepjadhav2009
    @sandeepjadhav2009 Před 3 lety +1

    गेली साठ वर्षं काका खूपच या वयात आपली मेहनत करून आपले पोट भरतात हे बघून डोळ्यातून पाणी येते हे काम म्हणजे खूप कष्टाचे आहे अशा या काकांना साष्टांग नमस्कार ग्रेट काका

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @SanjayJD-pu1hz
    @SanjayJD-pu1hz Před 4 lety +8

    खरोखर सलाम बाबांच्या अफाट मेहनतीला 🙏🙏 माझ्या डोळ्यात फक्त आणि फक्त अश्रु होते ❤️ ह्या व्हिडीओसाठी खुप मेहनत घतल्या बद्दल खुप खुप धन्यवाद... ह्या व्हिडीओ बद्दल बोलायला झाले तर शब्द तोकडे पडतील💖

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      खूब आबारी, संजयसायेब.

  • @kunaltathare2135
    @kunaltathare2135 Před 4 lety +7

    खुप छान उपक्रम माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏
    मायकल काकांच कौतुक कराव तेवढे थोडेच आहे मायकल काकांची मेहनत हि तरूणांना लाजवेल अशीच आहे मायकल काका तरूणांन साठी आदर्शवत आहेत तुमचा हा आगळा वेगळा माहिती पट पाहून मायकल काकांना भेटण्याची खुप ईच्छा झाली आहे मी गिरगावात राहायला आहे आधी गिरगावात हि वसई चे भाजीवाले दुधवाले खुप यायचे ते आता ऐणे कमी झाले आहेत आम्हला त्याची कमी नेहमीच जाणवते माझी आई सांगते कि मला माझ्या बाबांनी लहान पणी वसईच लावल होत. खरच वसई करांचे आम्हा मुबंई करांवर खुप उपकार आहेत कि ज्यांनी आम्हाला ताजी भाजी फळ दुध हे नेहमी अगदी लेकरा सारख पुरवल. तुम्ही दादरला आल्यावर हिंदू काॅलनीत पहीला थांबा कुठे घेतलात हे सांगितलं तर बरे होईल मला मायकल काकांना भेटण्याची खुप ईच्छा झाली आहे. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +1

      कुणाल जी, तुमच्या विस्तृत कमेंटवरून तुमचे आम्हा वसईकरांवर असलेले प्रेम जाणवते. काका दर बुधवारी दुपारी २ च्या सुमारास दादरला हिंदू कॉलनीत पहिल्या गल्लीत इराणी हॉटेलच्या मागे असतात, पण ह्या बुधवारी नाताळ असल्याकारणाने ते गुरुवारी येतील. धन्यवाद.

    • @kunaltathare2135
      @kunaltathare2135 Před 4 lety +1

      @@sunildmello धन्यवाद सुनिल भाऊ. 🙏

  • @shalinimarathe7131
    @shalinimarathe7131 Před 6 měsíci +1

    अतिशय हृदयस्पर्शी video ! मायकेल काकांना, त्यांच्या हा organic भाजीपाला पिकवण्याच्या आवडीला आधी सलाम ! त्यानंतर सगळ्या हिंदू coloney तल्या रहिवाशांच्या भाग्याचा खूप हेवा वाटतो.सगळ्यांनी खूप मनापासून कौतुक केलं आहे त्यांचं ! फारच सुंदर video !

    • @sunildmello
      @sunildmello  Před 6 měsíci

      खूप खूप धन्यवाद, शालिनी जी

  • @urmilaapte9198
    @urmilaapte9198 Před 3 měsíci +1

    त्रिवार सलाम आहे काकांना ग्रेट व्यक्तीमत्व, अशी प्रामाणिक माणस मिळणार नाहीत बघायला. छान माहिती दिलीत आपल्यालाही धन्यवाद @

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 měsíci

      खूप खूप धन्यवाद, उर्मिला जी

  • @smileman3161
    @smileman3161 Před 4 lety +22

    मेहनत करून केळी विकणारा मराठी व्यापारी पडद्याआड गेला व पावडर टाकून केळी विकणारे भैय्या गब्बर झाला

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      धन्यवाद, विवेक जी.

  • @tukarampatil8579
    @tukarampatil8579 Před 4 lety +16

    मायकल काका ला सलाम सुनील ङिमेलो तुमी आपले वसईची माहीत आपली माणसे आपली माती.दिली धन्यवाद मित्रा तू दिलेल्या माहिती.बद्दल

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      धन्यवाद तुकारामजी.

    • @sanjaydalvi8279
      @sanjaydalvi8279 Před 4 lety +1

      काका च्या मेहनती ला सलाम 👍🙏🙏🙏🙏🙏

  • @rohangawad6251
    @rohangawad6251 Před 3 lety +1

    ह्या काका ना मी ओळखतो नेहमी स्तपाळा बस मध्ये दिसायचे, हा व्हिडियो बघुन समजले काका किती कष्ट करतात, मला तर कधीच जमणार नाही.
    काका बदल खुप आदर वाटत आहे .काकांच्या कामाला सलाम...

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, रोहन जी

  • @chitrarawool8913
    @chitrarawool8913 Před 3 lety +1

    सर्व प्रथम सुनील भाऊ मी आपल्याला धन्यवाद देतो व आभार मानतो. मायकल काकांंच्या जीवनावर तुम्ही ही डॉक्युमेंटरी बनविली. त्यांच्या सलग दोन दिवसांचा दिनक्रम चित्रित केलात. केवढे कष्ट उपसताहेत काका आणि तेही गेली साठ वर्षे? आज ७४ व्या वर्षी ही हा माणूस प्रामाणिकपणे काम करतोय. कोणताही शॉर्ट कट नाही! धन्य झालो! मी सहज मध्ये जागा झालो. मोबाईल चाळला आणि हा व्हिडीओ अव्याहतपणे पाहिला आता रात्रीचे अडीच वाजून गेलेत. डोळे भरुन आलेत . मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून निव्रुत्त झालोय. त्यामुळे वसईशी जवळचा संबंध आहे. तरीही या शेवटच्या मालुसऱ्याला त्रिवार मानाचा मुजरा!

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, चित्रा जी

  • @ajinkyaaher
    @ajinkyaaher Před 4 lety +12

    I don’t have words to write down here, people like him will never stand a chance to record their life, you did a great job by recording this I hope someday this documentary will reach to some medium where he will get recognition he deserves.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +1

      Thank you for your kind words, Ajinkya Ji.

  • @inacinfernandes6847
    @inacinfernandes6847 Před 6 měsíci +3

    uncle Michael May God bless you always.pure soul very hard working.❤

    • @sunildmello
      @sunildmello  Před 6 měsíci

      Thanks a lot, Inacin Ji

    • @charupatki5867
      @charupatki5867 Před 6 měsíci

      Enjoyed watching the video very much Hats off to Michal kaka

    • @sunildmello
      @sunildmello  Před 6 měsíci

      @@charupatki5867 Ji, thank you

  • @maharashtradharma
    @maharashtradharma Před 2 lety +1

    काकांच्या अपार मेहनतीला साष्टांग दंडवत. व आपण या माणसाची मेहनत इतक्या मेहनतीने जगासमोर आणली त्या बद्दल आपलेही अभिनंदन . माझ्या आई चे वडीलही चंदनसार विरार येथून दादरला कावड घेऊन दूध विकायला जात असत.अशी कष्ट करणारी माणसे पाहिले की लाज वाटते आपली आपल्याच . काकांना उत्तम दीर्घायुष्य मिळो .

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety +1

      अगदी बरोबर बोललात आपण. खूप खूप धन्यवाद

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 Před rokem +1

    सुनील ,मायकल काकांना माझा नमस्कार सांग, एवढे वजन घेऊन पायऱ्या चढणे आम्हाला ही जमणार नाही,पण काकांनी एवढ्या वयात हे सगळे करत आहेत त्यांना सलाम आणि तुला ही thank you🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, सना जी

  • @pjd7635
    @pjd7635 Před 4 lety +5

    Hats off to Micheal Kaka!!!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 So much hard-working, honest, determined, disciplined!! Khup kahi shikayla milale Micheal kaka la pahun! Thanks a ton Sunil for bringing his story to us. Micheal Kaka is real Hero!🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      Yes, Michael Kaka is really great. Thanks.

  • @milind4426
    @milind4426 Před 4 lety +9

    पोच देण्यास उशीर झाला. क्षमस्व. खुप छान काम. तुमची चित्रफित बरेच सांगुन जाते, अजुन काय बोलावे. काका तर कर्मयोगी.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +1

      धन्यवाद, भारत जी. काका खरोखरच कर्मयोगी आहेत.

  • @ashapingle983
    @ashapingle983 Před rokem +1

    तुमच्या मेहनतीला व. निगेवार ठेवलेल्या मांडणी ला सलाम किती प्रेम आपल्या व्यवसाया बद्दल.
    आपल्या ला ही धन्यवाद. आपण अगदी सामान्य. माणसाच्या मेहनीचा व्हिडिओ. बनवला. आपल्या ला. धन्यवाद सर.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, आशा जी

  • @milindakerkar2350
    @milindakerkar2350 Před 5 měsíci +1

    एवढ्या वयात कोणीच असं काम करू शकत नाही मानलं या काकांना सलाम काकांना

    • @sunildmello
      @sunildmello  Před 5 měsíci

      खूप खूप धन्यवाद, मिलिंद जी

  • @novinaalphanso-dias4736
    @novinaalphanso-dias4736 Před 4 lety +13

    Hats off to his hardwork....we know him as a relative, he is very honest and kind hearted person...really touching and inspiring....
    Thanks for making this video....first time kalala ki apla adsha lokai mal netana kodi mehnat ghetli...

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +2

      हा नोविना जी, काकाआ मेहनती आन प्रामाणिक ते हायुस पान तो त्या कामोर ज्याप्रमाने प्रेम करते ता अद्वितीय हाय. आबारी.

  • @shrishwaghmare4679
    @shrishwaghmare4679 Před 4 lety +15

    खरच अप्रतिम सादरीकरण काकांचा उत्साह तरुण मुलाला लाजवेल 🙌

  • @purushottam647
    @purushottam647 Před 8 měsíci +2

    आपले मराठी अतिशय स्वच्छ आणि शुद्ध ऐकून छान वाटले.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 8 měsíci

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी

  • @ninadbhambid3948
    @ninadbhambid3948 Před 4 lety +1

    आपले आभार कि एवढ्या मेहनती माणसाचा व्हिडिओ दाखवला, किती मेहनत करतात मायकल डोळ्यात पाणी आले ,वय वर्ष 74 कमाल वाटते, स्वतःची लाज वाटते , चेहऱ्यावर आपण फार मोठे करतो हे पण भाव नाही , साष्टांग नमस्कार या अवलीयाला.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      धन्यवाद, निनाद जी.

  • @deepakgoilkar885
    @deepakgoilkar885 Před 4 lety +4

    खरच खूपच मोठं काम आहे हे मी पहिल्यांदा च काही लिहत आहे कारण मला राहवलं नाही. कामाशी असणारी जबरदस्त बांधिलकी,प्रामाणिकपणा, कष्ट,आणी खूप मोठा प्रवास......👍
    सलाम तुमच्या कामाला.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      धन्यवाद, दीपक जी.

  • @raviusare4269
    @raviusare4269 Před 4 lety +4

    सुनील दा, खूप खूप धन्यवाद हा विडिओ बनवल्याबद्दल . आजच्या पीडी ला लाजवेल असा हा विडिओ आहे . मायकल काका ला मनापासून सलाम 🙏🙏🙏.
    बाहेरून आलेली यूपी, बिहारची जे लोंढे आहेत, खास करून जे शॉर्टकट, भेसळ पद्धतीने मुंबई, महाराष्ट्रात राहून माल विकतात. अशा लोकांच्या बुढावर लात मारून त्यांना हकलवून द्यायला हवे आणि मायकल काका सारखे लोक जे खऱ्या अर्थाने इमानदारीने, खऱ्या कष्टांनी काम करतात अश्या लोकांना प्रतिसाद दिला पाहिजे .

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      धन्यवाद, रवी जी.

  • @sindhusarode9671
    @sindhusarode9671 Před 3 lety +2

    सलाम , सास्टांग दंडवत , देखील कमी आहेत, नानासाहेबा साठी , प्रचंड मेहनत आहे, आवाक व्हायला. झाले, त्याच्या मेहनती पुढे, यावयात कुणी ही असे काम करणार नाही , मी तर जबरदस्त साधना म्हणिन, दादा तुमचे कौतुक आहे, आमच्या पर्यंत हि माहिती पोहचवल्या बद्दल धन्यवाद ग्रेट

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      हो, सिंधू जी काका खरोखर जबरदस्त मेहनत घेतात. धन्यवाद.

  • @bharatibhaskar4194
    @bharatibhaskar4194 Před 2 lety +1

    खरंच धन्यवाद. बरेच जण विविध प्रकारचे व्हिडीओ अपलोड करतात. परंतु तुमचा प्रयत्न खूपच छान. नानांनी ह्या वयात काम सुरू ठेवून आदर्श ठेवला आहे आणि त्या कामाची तुम्ही दखल घेऊन लोकांसमोर माहिती आणली त्या बद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद, भारती जी

  • @prashantmayekar1921
    @prashantmayekar1921 Před 4 lety +20

    मायकल काकांच्या या मेहनतीला सलाम , देव त्यांचं कल्याण करो , रक्षण करो , भरभराट करो आणि त्यांना दीर्घायुष्य देवो 👍 .

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +1

      धन्यवाद, प्रशांत जी.

  • @johnsonlopes9020
    @johnsonlopes9020 Před 4 lety +3

    सुनील ने खूपच मेहनत घेतलीय या व्हिडिओ साठी यात शंका नाही. या अगोदर फर्नाडीस काकाचा व्हिडिओ सुधा खूप मस्त होता. खूप छान सादरीकरण केले आहेस आता. पण पूर्ण व्हिडिओ पाहून डोळे पाण्याने भरून आले मायकल काकाची अपार मेहनत बघून. वयाच्या 74 व्या वर्षी हा अवलिया इतकी मेहनत करून कावड वाहतोय. खरोखर कमाल आहे काकाच्या कष्टाला, मेहनतीला. त्यांना मानाचा मुजरा आणि त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे जावो ही प्रभू चरणी प्रार्थना.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      तुमच्या विस्तृत कमेंटबद्दल धन्यवाद, जॉन्सनजी.

    • @chandukatkar
      @chandukatkar Před 4 lety +3

      मी अनेक वर्षे हिंदूकाॅलनीत राहिले आणि मायकेल काकांच्या कडून अस्सल वेलची केळी आणि भाजी घेत होते. त्यांचे कष्ट पाहून दरभावाची घासाघीस करणार्यांचा राग येत असे. आता तरी लोकांचे डोळे असतील ही अपेक्षा.

    • @chandukatkar
      @chandukatkar Před 4 lety +1

      डोळे उघडले असतील ही अपेक्षा

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +1

      हो, चंद्रकांतजी. काकांचे कष्ट पाहून दरभावाची घासाघीस करू नये असंच वाटतं. मी जेव्हा त्यांच्यासोबत गेलो होतो तेव्हा कुणीही घासाघीस केली नाही हे विशेष.

    • @vaishalidabholkar5321
      @vaishalidabholkar5321 Před 4 lety +1

      Weldon Sunilji ,keep it up

  • @vijaychandmare7644
    @vijaychandmare7644 Před rokem +1

    पाच दिवस लगातार सुट करुन कमालीची मेहनत केली या विडीओ बनावन्या साठी सलाम है भाई तुला लाईक तो बनता है

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विजय जी

  • @deepikarain2131
    @deepikarain2131 Před 2 lety +1

    सुनिलजी तुमची दूरदर्शन वरील मुलाखत बघून
    हा व्हिडिओ मी पहिला काकांची मेहनत पाहून खरंच डोळे भरून आले पूर्वी च्या लोकांची आपल्या कामाबद्दल असलेली आत्मीयता लक्षात येते काकांना सलाम आणि तुम्हांला धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद, दीपिका जी

  • @AdinT1217
    @AdinT1217 Před 4 lety +9

    Nana you set an example for us and a standard for work ethic. You teach us that a real man works hard for money and there is no easy route to get money. We know work is your passion and we all salute you for your hard work and we all love you nana 😘....
    Proud to be your daughter in law, you are and you will always be a great inspiration for us all...
    Sunil a big thanks to you for taking so much efforts to make such a wonderful and inspirational documentary.... 🙏

  • @joelgonsalves7507
    @joelgonsalves7507 Před 4 lety +12

    Baba you are the great. Great work. Great presentation

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      Baba is really great. Thanks a ton, Joel ji.

  • @ashoktodankar473
    @ashoktodankar473 Před 4 lety

    74 वर्षांच्या मायकेल काकांना मनापासून सलाम!
    वसईची केळी, नारळ आणि इतर ताजी भाजी कावडीतून वाहून वसई ते दादर असा ट्रेन आणि चालत प्रवास त्यांनी केला. ते पाहून थक्क झालो.
    काकांना उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभो, ही परमेश्वराकडे प्रार्थना!

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      धन्यवाद, अशोक जी.

  • @sanjananeroy6495
    @sanjananeroy6495 Před 4 lety +1

    पहिला काकांना माझा नमस्कार, काका ज्या प्रकारे काम करीत आहे त्याला माझा सलाम आहे ही केळी ज्या पद्धतीने पिकवतात ती पद्धत पहिल्यांदा पाहिली. ज्यानी हा माहितीपट तयार केला आहे त्याला पण माझा सलाम

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      धन्यवाद, संजना जी.

  • @prashantd3492
    @prashantd3492 Před 4 lety +6

    Motivational video.
    Mi Michel kakana baryach vela dadar hindu colony madhe pahila ahe, te khup mehnati ani polular ahet.
    Tyanchi mahiti publish kelya baddal dhanyavad.
    Amchi Maati Amchi Manase. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      खूप धन्यवाद, प्रशांत जी.

  • @themac89
    @themac89 Před 4 lety +13

    खुप छान व्हिडिओ सुनील दादा...
    काकांच्या मेहनतीला लाख लाख सलाम...

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      धन्यवाद, मॅकसनजी.

  • @ivana.gonsalves7368
    @ivana.gonsalves7368 Před 4 lety +1

    काकांना खरोखर दि घायुष्य मिळो हीच इश्वरचरणी प्राथना🙏🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      धन्यवाद, आयवन जी

  • @kanchanmishal8234
    @kanchanmishal8234 Před 3 lety +1

    काका चे काम बघुन .डोळे भरून आले सलाम काकाना कष्टकरी माणसांच्या मागे देव मदत करतो.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, कांचन जी

  • @kbatwe55
    @kbatwe55 Před 4 lety +4

    Hats off to Vasai farmers, you u are most hard working farmer in all over the India, I have seen ur hard work during my tenure as veterinary doctor Vasai Taluka.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद, डॉक्टर साहेब.

  • @anitakundap6799
    @anitakundap6799 Před 4 lety +5

    सुनील तुमचे खूप खूप आभार हा विडिओ केल्याबद्दल.
    आत्ताच्या पिढीने त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. त्यांची मेहनत जिद्द ह्याला सलाम.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      हो, अनिता जी. खूप काही शिकण्यासारखं आहे काकांकडून. धन्यवाद.

  • @travelwithviraj7908
    @travelwithviraj7908 Před 3 lety +1

    अप्रतिम सुंदर असा केळी काढण्या पासून ते पिकवून पारंपरिक पध्दतीने ते विकतांना मेहनत अशी अप्रतिम डॉक्युमेंटरी. आम्ही youtube तर नाही आणि प्रत्यक्ष तर पाहीली नाही.आजच्या लोकांना अशी मेहनत कष्ट होणार नाही .खुप सुंदर माहितीपूर्ण व्हीडीओ. मी 7 year छोटा youtuber आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, विराज जी. तुम्हाला शुभेच्छा

  • @sunilgawade5502
    @sunilgawade5502 Před rokem +1

    खुप सुंदर व्हिडीओ बनविल्याबद्दल धन्यवाद. वसईची भाजी ऐकून होतो.दादरला गेलो तर आवर्जून या वसईच्या लोकांकडूनच घासाघिस न करता पुष्कळ प्रमाणात घेतो.कारण शेतीतली मेहनत काय असते ते आम्हालाही माहित आहे. त्यामुळे सर्वांनीच या वसईच्या माणसांकडूनच शक्यतो या वस्तू आवर्जून घ्याव्यात.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, सुनिल जी

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 Před 4 lety +6

    अप्रतिम... भारी video, असा कधी बघायला मिळणार नाही, असा दाखवाल आहे really great Thanx to you n काका , काकांना साष्टांग दंडवत 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +1

      हो, अश्विनीजी काकांचे काम खरोखर साष्टांग दंडवत करण्यासारखेच आहे. धन्यवाद.

  • @rajeshreeabdar9005
    @rajeshreeabdar9005 Před 4 lety +31

    आपल्या गावाची माणसं खूपच. कष्टाळु आहेत . माझे बाबा पण ९० वयाचे आहेत आताहि ते सुताराचे काम करतात. घरी बसुन

    • @shundi5
      @shundi5 Před 4 lety +3

      सलाम तुझ्या बाबाला

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +2

      अरे बाप रे, ९० व्या वर्षी सुतारकाम? कमाल आहे बाबांची. कुठे राहतात ते राजश्रीजी.

    • @rajeshreeabdar9005
      @rajeshreeabdar9005 Před 4 lety +3

      @@sunildmello सत्पाळा सोनार आळी माझा बाबाना आम्ही नाना बोलतो त्याचे नाव प्रभाकर रा. भट्टे माझा भाऊ पण तेच काम करतो महेश त्याला ते मदत करता नागराचे काम तेच करतात महेशला नाही येत ईसण (सिडी)पण बनवतात

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      ओह्ह, खूपच प्रेरणादायी आहेत तुमचे बाबा. मला त्यांचा किंवा तुमचा नंबर मिळू शकेल का?

    • @rajeshreeabdar9005
      @rajeshreeabdar9005 Před 4 lety +1

      @@sunildmello9321642108

  • @dilipdevdhar6069
    @dilipdevdhar6069 Před 4 lety +1

    मायकल काकांना कडक सॅल्यूट. इथे लक्षात घेण्यासारखं आहे की सध्याच्या जगात अधिकच्या पैशाच्या हव्यासापायी ते आपल्या ग्राहकांच्या जीवाशी खेळत नाहीत.इतकी मेहनत करतात.शिवाय कुठलही केमिकल वापरत नाहीत.त्यांना आणि परिवाराला खुप सारया शुभेच्छा.तुम्ही सुद्धा इतके श्रम घेऊन हे सर्वांना दाखवलत,त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार.🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +1

      ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, दिलीप जी.

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 Před 4 lety +1

    खरचं आम्ही काकांची मेहनत पाहून निःशब्द झालो. सलाम. आणि हो वसईची केळी अश्याप्रकारे पिकवली जातात हे आज पहिल्यांदाच पहायला मिळाले. तुम्हीही अगदी आवडीने एक अत्यंत मोलाचा माहितीपट बनविलात म्हणून आम्ही तुमचे आभार मानतो. परत एकदा काकांना शि. सां. नमस्कार आणि निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      तुमच्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद, स्वाती जी.

  • @suchetanaik
    @suchetanaik Před 3 lety +4

    My goodness Sunil D'Mello this is awesome 👌 I feel like I haven't done anything in life. Salute to Michael kaka and sashtaang namaskar to him. 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      Thanks a lot for the wonderful comment, Sucheta Ji.

  • @romeodcosta4913
    @romeodcosta4913 Před 4 lety +3

    खूपच छान ! 🙏
    🌱निसर्ग जपला वसई ने .
    🏃🧗 मेहनत दाखवली वसई ने .
    चांगलं उदाहरण आमच्या सारख्या रस्यानिक☢️☣️ खानपान करणाऱ्यांना सुसुक्षित लोकांना ..
    लाँग लिव्ह वसई ...

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      अगदी खरं, रोमिओ जी. धन्यवाद.

  • @rohanmavlankar2235
    @rohanmavlankar2235 Před 4 lety +1

    खूप छान माहिती खूप छान व्हिडीओ आहे. आजोबांचं काम नवीन पिढीला प्रेरणा आहे. आजोबांचा काम अंगामध्ये शक्ती निर्माण करणार आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      अगदी बरोबर रोहन जी. धन्यवाद.

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 Před 2 lety +2

    सुनीलजी, आज हा व्हिडीओ पाहताना डोळे कितीवेळा भरून आले, त्याचा हिशोब नाही!😥
    हा फक्त व्यवसाय नाही, ही तर तपश्चर्या आहे,.. आणि अशा काबाडकष्ट करणाऱ्या व्यक्तींसोबत कुणी कधीही मोलभाव करू नये, ही जाणीव करून देणारा हा व्हिडीओ आपण बनवला, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
    -प्रसाद मडगांवकर.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety +1

      आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रसाद जी

  • @rjohnyutube
    @rjohnyutube Před 4 lety +13

    Sunil, this is awesome. I religiously watched the whole video. I commend your efforts in producing this video. Hats off to Michael baba. What a hard work. At times, my eyes filled with tears. It reminded me of my mama who used to do the same work when I was a child. Thank you so very much from the bottom of my heart for what you do. Keep it up.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +2

      Thanks a ton for your appreciation. Yes. Michael Kaka really works hard. He is a motivation to the younger generation. Thank you once again, Johny Ji.

    • @rakeshnangia2400
      @rakeshnangia2400 Před 4 lety +3

      Johny Rodrigues I am sure one can make a small film of this. The money earned could be used for his old age.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      @@rakeshnangia2400 Ji, what a nobel thought. Thank you.

    • @housapalm4952
      @housapalm4952 Před 3 lety

      Ho ani hi keli kashi piktat hyache mahit milali gret vido thanks so much to you to

    • @MariaFernandes-bd5fg
      @MariaFernandes-bd5fg Před 3 lety

      @@housapalm4952 but why he steamed? Why not natural way as we enjoyed fifty years ago?

  • @rovildapereira9255
    @rovildapereira9255 Před 4 lety +8

    Hats off to kaka and for his hardwork at this age. He is an inspiration for the youngsters.
    He has shown us how bananas can be ripen in a natural way rather than using chemicals. This video should be seen by those people who play with our health by using chemicals.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      Yes, Rovilda ji. Kaka is really an inspiration to all youngsters. Thanks.

  • @ganeshsawant2856
    @ganeshsawant2856 Před 4 lety +1

    काकांचं काम, कष्ट समाजासमोर आणल्याबद्दल आपलं अभिनंदन

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      धन्यवाद, गणेश जी.

  • @cgiri901
    @cgiri901 Před 4 lety +1

    आज आमच्या कर्म योगी सज्जनाचे दिव्य दर्शन जाले
    अचाट परिश्रम कई असते ह्यची देहि ह्यचे डोळा दखवाल्या बद्दल सुनील सहेबांचे कौतुक।
    धन्य ते michal महाशय।
    आणि धन्य ति जननी।
    God bless him

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद, चंद्रशेखर जी

  • @sandipmitragotri5523
    @sandipmitragotri5523 Před 4 lety +7

    Salute to micalji for his extraordinary work even at the age of 74 as well thanks to Mr.D'mello sir who introduced mical uncle to public at large by shooting this short film. I am from solapur but lived at Thane and Palghar area for 8 yrs.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      Thank you for your kind words, Sandipmitra Ji.

  • @shubhangiacharekar9177
    @shubhangiacharekar9177 Před 4 lety +4

    Mr.Sunil realy u r great ...eka young age ne ashya vishyacha video evdhi mehnt gheun bnwla, tumhala kakanchya bhrlelya pati evdhe ashirwad. Amchyakde fkt vasai chi velchi kelich khalli jatat pn ata khatana prtyek ghasala kakancha chehra dolya smor yeil .aapn vikt ghetana kiti bargening krto tyaptine kiti ksht kaka ghetat.
    आणि वाईट वाटतंय आता केळ्यासाठी सुपीक असलेल्या जमिनीवर bulidigs उभ्या रहात आहेत. मायकेल काकांना 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety +1

      धन्यवाद, शुभांगीजी. काका खरोखर खूप कष्ट घेतात.

  • @swapnilkhedekar3312
    @swapnilkhedekar3312 Před 9 měsíci

    ६० वर्ष अत्यंत चिकाटीने आणि प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या ७४ वर्षीय काकांना खरच सलाम..
    व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आज ३ वर्षांनी हा व्हिडिओ माझ्या दिसण्यात आला पण पाहून त्यांच्यासाठी कमेंट करण्याचा मोह आवरला नाही..
    काका तुम्हाला उत्तम निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, स्वप्नील जी

  • @mayachaudhari4250
    @mayachaudhari4250 Před 3 lety +1

    मी दादरच्या किंग जॉर्ज शाळेत, तुम्ही ज्या पाटकर गुरुजी विद्यालय येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होते . मायकल काका आम्हाला देखील भेटायचे . मी विरारला राहणारी असून देखील आम्ही त्यांच्याचकडून वेलची केळी, भाजी घ्यायचो . त्यांना या video मध्ये पाहणं हा सुखद धक्का. स्वप्नीलसर तुम्ही आपली संस्कृती, आपला परिसर दाखविण्याचा म्हणण्यापेक्षा जतन करण्याचा जो प्रयत्न करीत आहात तो अत्यंत स्तुत्य आहे . तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि आभार

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, माया जी

  • @pjd7635
    @pjd7635 Před 4 lety +10

    Sunil I really loved the way you speak marathi and explaining in detail!

  • @sandy222197
    @sandy222197 Před 4 lety +10

    आजच्या पिढीला लाजवतील असे त्यांचे काम आहे ........

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      अगदी खरं बोललात आपण, धन्यवाद.

  • @priyankamane93
    @priyankamane93 Před 3 lety +1

    तुमचे व्हिडिओज खूप छान असतात... हा व्हिडिओ पाहताना मात्र डोळ्यात सारखं पाणी येत होत . तुमचा हा व्हिडिओ मी खूप लोकांना शेअर केला आहे..आजच्या पिढीने त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखे आहे...किती मेहनत, कमावरची निष्ठा..सलाम Michael काकांना 🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      अगदी खरं प्रियंका जी, काका खरोखरच खूप मेहनती आहेत. धन्यवाद

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Před 4 lety +1

    सुनिलभाऊंनी मायकेलकाकांचा जिवनपट
    उत्कृष्टपणे सादर केला आहे. मायकलकाकांच्या मेहनतीला सलाम आणि सनिलभाऊंना मनापासून धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      धन्यवाद, शरद जी.

    • @sharadsohoni
      @sharadsohoni Před 4 lety

      @@sunildmello
      माझे मित्र परेरा वसईला राहातात. त्यांना तुमचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यांना बघण्यास सांगितले आहे.
      असेच उत्तमोत्तम व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला कळवा.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद, शरद जी.

  • @rakeshnangia2400
    @rakeshnangia2400 Před 4 lety +4

    Oh what a super man. At this age it is just unbelievable. We can’t even lift 25 kgs. God give him good healthy life.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 lety

      Yes he is indeed a superman, Rakesh Ji. Thank you.

  • @vinnasequeira3478
    @vinnasequeira3478 Před 2 lety +5

    Thanks Sunil for your efforts for bringing out a beautiful motivational video of a simple living, humble family selflessly working out to make others lives easy and happy. Salute uncle Michael for all his efforts at such a ripe age, He and his family deserves all the blessings . God bless them with good health throughout their life's journey. I was teary eyed throughout the whole documentary. Kudos to all. Devache Krupa sadaiva ya kutumbhavar labo, mazya tarfene Michael kakana salaam. Kaka , apan mahaan ahot.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वीणा जी

  • @amolkhandekar1563
    @amolkhandekar1563 Před 3 lety +1

    खुपचं छान ,मी पण वसईकर आहे पण आता नवीन पीढीला या बाबत काहीच माहिती नसते आपला उपक्रम खूप छान आहे आपले खूप खूप आभार 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद, अमोल जी