Video není dostupné.
Omlouváme se.

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या ? माझी कन्या कविता | kavita aathavanitalya | आठवणीतल्या कविता |

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 04. 2023
  • gai panyavr kay mhanuni alya , गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या ? |
    kavita aathavanitalya | आठवणीतल्या कविता |
    मराठी पाठयपुस्तकाच्या अभ्यासक्रमतील एक जुनी कविता.
    माझी कन्या कविता | mazi kanya |
    कवी- बी (नारायण मुरलीधर गुप्ते )
    श्रवणीय सुमधुर कविता आणि मुलांना सहजपणे गाता येईल अशी कविता.
    सादरकर्ते - Team - विठ्ठल स्वामी निर्मित काव्यगंध.
    Edited By : Shreya & Shrutant
    script writen by : उज्वला स्वामी .
    Note: Please use headphone for better experience and select full hd 1080p watch on big screen.
    इतर कविता :
    लाडकी बाहुली - कविता |
    • ladaki bahuli | लाडकी ...
    उठ मुला , उठ मुला , बघ हा अरुणोदय झाला,
    • uth mula uth mula | ka...
    घाल घाल पिंगा वाऱ्या
    • घाल घाल पिंगा वाऱ्या |...
    मला आवडते वाट वळणाची |
    • vat valanachi kavita ...
    या झोपडीत माझ्या कविता
    • ya zopadit mazya | kav...
    अनाम वीरा | कविता | इयत्ता ७ वी
    • Anamveera | kavita | अ...
    🌈 श्राववणमास 🦚 ७ वी
    • श्रावणमासी हर्ष मानसी ...
    गे मायभू तुझे मी | कविता ८ वी |
    • ge maybhu tuze me | k...
    गवतफुला रे ! गवतफुला !-इंदिरा संत. बालभारती इयत्ता सहावी.
    • gavatfula re gavat ful...
    गोमू माहेरला जाते हो नाखवा.इयत्ता ७ वी कविता
    • गोमू माहेरला जाते हो न...
    #kavitaathavanitalya, #आठवणीतल्याकविता, #@kavyagandh,

Komentáře • 2,2K

  • @kavyagandh
    @kavyagandh  Před rokem +175

    @kavyagandh ,🙏 नमस्कार,
    'काव्यगंध' प्रस्तुत 'कविता आठवणीतल्या' या उपक्रमाला आपण सगळे भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!🙏
    💐
    खरंतर, संगीताबद्दलचा शास्त्रशुद्ध अभ्यास नसतानाही केवळ ऐकून मिळवलेल्या ज्ञानाच्या बळावर कविता सादर करण्याचा हा प्रयत्न!
    आठवणीतल्या कवितांना उजाळा आणि मनाला आनंद देण्यासाठी कवितांना सोप्या व सहजपणे गाता येतील अशा चालींमध्ये संगीतबद्ध करून त्या आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत.
    कविता सादरीकरणामध्ये काही शब्दोच्चार व सांगीतिक
    चुका झाल्या असतील तर त्या आपण मोठ्या मनाने सांभाळून घ्याव्यात ही विनंती.
    आपणा सर्वांची मते व प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहतील व इतर कवितांच्या सादरीकरणाकरीता मार्गदर्शनपर ठरतील; तेव्हा like👍 ,share, comments आणि subscribe करायला विसरू नका आणि हो, या सोबतच आपणाला आणखी ज्या कविता ऐकायच्या आहेत त्या देखील कमेंट करून सांगा. त्या ही आपणापर्यंत पोहचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद! 🙏💐🌹

  • @subhashsonar4699
    @subhashsonar4699 Před rokem +4

    अतीशय सुंदर ऐकताना बालपण आठवले हुंदका आवरला रूसलेल्या मुलींची खुप आठवण आली खरंच नितांत सुंदर

  • @subhashpatil1060
    @subhashpatil1060 Před rokem +4

    आम्हाला होती ही कविता ऐकून शालेय जीवनात मन रमून गेले 🙏🙏

  • @diptinehar9400
    @diptinehar9400 Před 17 dny +2

    वर्ग सात मधील हि मला कविता होती
    पण मला ती पाठच नव्हती होत तेव्हा माझ्या वडिलांनी मला चाल लाऊन हि कविता वदऊन घेतली होती....आजही आठवते मला❤❤❤❤❤

  • @chhayamankar6847
    @chhayamankar6847 Před rokem +5

    खूप छान. मागील जुने दिवस आठवले. केवळ चारच ओळी आठवत होत्या. आज पूर्ण कविता ऐकायला मिळाली. धन्यवाद.

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 Před rokem +6

    फार जुनी आठवण करुन दिली, आम्हाला होती ही कविता,त्यावेळी ही कविता शिकवताना शिक्षक आणि विद्यार्थी अक्षरशः रडायचे, आजही कंठ दाटून येतो आणि डोळे पाण्याने डबडबतात, धन्य ते कवि !

  • @ArunaChaudhari-rz7ie
    @ArunaChaudhari-rz7ie Před 10 měsíci +35

    आम्हाला होती ही कविता व मी नेहमी माझ्या लहान बहिणीला ती रडत असतानां ही कविता म्हणायचे खूप छान वाटले इतक्या वर्षांनी ऐकायला मिळाली

    • @uttamshinde5195
      @uttamshinde5195 Před 6 měsíci

      मी पण्😂

    • @pramilashinde3622
      @pramilashinde3622 Před 6 měsíci

      मला टिकविता होती

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 Před 5 měsíci +1

      आम्हाला इयत्ता ६ वीला अभ्यासक्रमात होती.

  • @suhasinisawant8782
    @suhasinisawant8782 Před rokem +10

    मला खूप आवडायची,अजूनही आवडते ही कविता. आभारी आहे.

  • @chhayajoshi1867
    @chhayajoshi1867 Před měsícem +3

    माझे वय 60 वर्षे आहे मला ही शाळेत असताना होती आज ही मुखोदगत आहे
    आवडीची कविता आहे खूप दिवसांनी ऐकायला मिळाली

  • @narhariudgirkar9515
    @narhariudgirkar9515 Před 9 měsíci +4

    ❤ ही कविता आम्हाला होती ऐकवून ४९ वर्ष झाली आहेत आशा अर्थ पुर्वक कविता आता नाहीत त्यांचे खंत आणि दुःख वाटते, तो आनंद आनंदीगडे होता येथेच मी पूर्ण विराम घेतो.... व तुमचे काव्यगंधाचे धन्यवाद जय श्री हरि...🌹🌹🙏👏

  • @pandurangbagal7250
    @pandurangbagal7250 Před 2 měsíci +3

    अतिशय सुंदर आणि चपखल शब्द रचना. शालेय जीवनात अभ्यासलेली कविता एईकायला मिळाली. खूप बरे वाटले.

  • @sanjaytotre6691
    @sanjaytotre6691 Před rokem +2

    हि कविता खुप जुनी आहे आणि माझी आवडती कविता होती. खरच जुने सर्व काही अमूल्य होते

  • @madhurajoshi6671
    @madhurajoshi6671 Před rokem +2

    किती छान बाबा लेकीचे नाते
    माझी आवडती कविता परत उजळणी झाली धन्यवाद 🙏

  • @digambarsonawane5221
    @digambarsonawane5221 Před rokem +4

    चाल वेगळी आहे पण ते दिवस आठवले खूप छान

  • @sanjaytotre6691
    @sanjaytotre6691 Před rokem +5

    काय शब्द रचना आहे .एक एक शब्द असा आहे की हिऱ्या सारखा कोरून काढला आहे अणि हार बनवला आहे.

  • @sonikagosavi564
    @sonikagosavi564 Před 3 měsíci +2

    अतिशय सुंदर,मला आवडणारी माझी आवडती कविता❤❤

  • @girjuba8528
    @girjuba8528 Před 21 dnem +3

    1987 ला आम्हाला 6 वर्गात हि कविता होती फार छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @shivajichavan6435
    @shivajichavan6435 Před rokem +8

    1977 आम्हाला सातवीला ही कविता होती ही कविता गाताना तसेच ऐकताना अश्रू अनावर होतात

  • @renukakhaire7863
    @renukakhaire7863 Před rokem +5

    कवितेची चाल अतिशय सुंदर आहे. मला वाटतं यातील एक ओळ चुकून राहिलेली आहे. कारण मलाही ही कविता होती. त्यामुळे मला अजूनही या कवितेतील काही ओळी तोंडपाठ आहेत . म्हणूनच ती ओळ पटकन आठवली.
    ती ओळ म्हणजे
    उष्ण वारे वाहती नाshrikaant
    गुलाबाला फुलविti काश्मिरात
    नंदnaatil हलविt वल्लरीला
    कोण माझ्या बोलले छबीलिलa

    • @ashokkadam7424
      @ashokkadam7424 Před rokem +1

      बरोबर आहे ही ओळ

    • @varshagosavi3732
      @varshagosavi3732 Před rokem

      आहे की तुम्ही म्हणाताय ती ओळ

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.. 🙏
      बालभारती 7 वी पुस्तकामध्ये एवढीच कविता आहे.

  • @user-iq4wt1xk9h
    @user-iq4wt1xk9h Před 3 měsíci +2

    आमच्या गावी त्या काळी विजेचे दिवे नव्हते. बाबा मुंबई ला कामाला. आई शेती करायची. आम्ही भावंडे दिवसा तिला मदत करायचो. संध्याकाळी शेतातून आई घरी आली की लाटण (कंदील ) लावायची. मातीचे घर. सर्व बाजूला पसरलेला मंद कंदीलचा प्रकाश, बाहेर पाऊस आणि त्यात भर म्हणजे ह्या कवितेचे पाठांतर. सर्व आठवणीं जाग्या झाल्या.. आज आई बाबा पण हयात नाहीत. डोळे आणि मन दोन्हीही भरून आले. खूप छान आणि धन्यवाद तुम्हांला. 🙏🙏

  • @sunitarawate7044
    @sunitarawate7044 Před měsícem +2

    शालेय जीवनात ही कविता वाचली होती.माझ्या मुलांना व नातवंडांना मी दोन कडवी म्हणून झोपवत असे.खूप सुंदर भावपूर्ण कविता आहे.

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Před 3 měsíci +3

    कविता ऐकताना बालपण आठवलं किती गोडवा किती भाऊ कता होती कवितेमध्ये कवी आणि गायक यांना शतशा प्रणाम🙏🌹

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před 3 měsíci

      Many many thanks !🌼🙏🏼.

  • @lalita.9803
    @lalita.9803 Před rokem +8

    आपली खूप खूप आभारी आहे कविता ऐकून डोळे पाणावले शाळेतले दिवस आठवले बालपण देशी देवा कारण बालपण निरागस असते ह्या vayat माणूस सुख दुःखाच्या पलीकडे असतो अणि मोठे झाल्यावर कुणाच्या नशिबी सुख तर कुणाच्या दुःख येते असो हे तर magil जन्माचे भोग असतात ते संपवून ह्या जगाचा निरोप घ्यायचा माझे विचार आमच्या समवयस्क बंधू अणि भगिनी ना पटत असेल असो पुन्हा पुन्हा धन्यवाद.

  • @pradnyakshirsagar-dhole1694

    माझे बाबा शिक्षक असून मला शाळेत ही कविता शिकवत होते, त्याचीच आठवण आली. खूप छान शिकवायचे, त्यांनाही खूप आवडते ही कविता.

  • @yuvrajkhopde145
    @yuvrajkhopde145 Před 6 měsíci +3

    सुंदर, अप्रतिम कविता. त्याकाळी दर्जेदार कवी होते, हाडामासाचे शिक्षकही होते,
    विद्यार्थी आणि शिक्षकांचे एकसंध नाते होते

  • @jyotidewaikar296
    @jyotidewaikar296 Před rokem +3

    बालपणात घेऊन गेली ही कविता।खूप आवडीची एकमेव अविस्मरणीय कविता।😢

  • @sureshpable4467
    @sureshpable4467 Před 6 měsíci +3

    आम्ही ही कविता सातव्या वर्गात शिकलो.अक्षरशा डोळ्यात पाणी येतं होते.ही कविता आमच्या पाठांतर होती.खूपच सुंदर

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před 5 měsíci

      धन्यवाद 🙏🏻

  • @vaishaliraje772
    @vaishaliraje772 Před rokem +2

    हीकविता मला सातवीच्या पाठ्य पुस्तकात होती. माझे वय 78 वर्ष आहे. फारच सुंदर कविता. अजूनही तोन्डपाठ आहे. त्या वेळी कविता पाठांतर असायचे. अशा सुंदर जुन्या कविता ऐकायला खूप छान वाटते. धन्यवाद ही कविता ऐकवल्याबद्दल!

  • @sunitakapile754
    @sunitakapile754 Před 4 měsíci +2

    मस्त.माझी सगळी पाठ आहे अजून.आम्हाला सातवीत होती ही कविता.तोंडी परीक्षा असायची .ही कविता मी पाठ केली होती.

  • @manishanilekar8915
    @manishanilekar8915 Před rokem +3

    खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या .छान उपक्रम आहे

  • @narayanmanwar9335
    @narayanmanwar9335 Před rokem +6

    सर खूप छान, अशाच 1970 च्या दशकातील कविता एकवावं ही सदिच्छा ,घाल घाल पिगा वाऱ्या,या झोपडीत माझ्या ,मन वाडाय वडाय ई,
    अप्रतिम खूप छान

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem

      ok . comming soon . 🙏💐Thanks .

  • @vanitakirtane5091
    @vanitakirtane5091 Před rokem +2

    खूप खूप छान शालेय जीवन आठवून आनद वाटला मस्तचा❤

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.

  • @rohansalunkhe553
    @rohansalunkhe553 Před měsícem +2

    Agadi rudaysparshi kavita aahe hi balpanachi aathvan karun dili thank you so much ❤🎉

  • @balkrishnabhagat5442
    @balkrishnabhagat5442 Před rokem +3

    मला त्यावेळी ही कविता समजली नव्हती.
    आज मात्र डोळ्यातून पाणी आले.
    फारच मार्मिक कविता.

    • @sharadpipare1272
      @sharadpipare1272 Před rokem +1

      sir aai kavita रिलीज करावी

    • @amrutasagare2431
      @amrutasagare2431 Před rokem

      शाळेत बाईंनी पाठ करून घेतली होती पण अर्थ समजला नव्हता

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Před rokem +3

    शाळेतल्या आठवविणी ने भारावून गेलो..
    मन:पुर्वक धन्यवाद !❤❤

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem

      रमणीय बालपण 👍Thanks

  • @sudhakarjadhav2231
    @sudhakarjadhav2231 Před 12 dny +1

    कविता ऐकून डोळ्यात पाणी आले. कवी बी नां शतशः प्रणाम!!

  • @CmRamne
    @CmRamne Před měsícem +3

    1982 ला मीशिक्षक म्हणूनरुजू झालोमी ही कवितावर्गाततालावरगायली .फार वर्षानंतरआज ही कविताऐकलीखूप आनंद वाटला

  • @shakuntalasawant1476
    @shakuntalasawant1476 Před rokem +3

    खुपच सुंदर छान कविता आजही ही कविता माझी तोंडपाठ आहे.

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 Před rokem +4

    झाडाखाली बघून सावली बसतो चांभार
    ठाऊक आहे मजला त्याचा सर्व कारभार
    ही कविता एकदा ऐकवा
    उपकार होतील आपले

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem +1

      Ok .शोधतो.
      किती साली होती.

  • @user-bv4ws9hq3n
    @user-bv4ws9hq3n Před 4 dny +1

    कविता खूपच छान आहे. आणि सादरीकरण खूप छान आहे. खरच आठवण जागी झाली

  • @dilippande8677
    @dilippande8677 Před 3 měsíci +3

    माझे आजचे वय 54 वर्षे आहे मि शाळेत शिकत होतो तेव्हा,,,, माझी कन्या,,,, अनामिका,,,, संध्या रजनी,,, फुलराणी,,,, आईची आठवण,,,, भेटेन नऊ महिन्यानी,,,, सकाळ,,,अशा खुप कविता मरे पर्यंत अवश्यमरनीय आहे ,,,,गेले ते बालपण,, राहील्या त्या आठवणी,, धन्यवाद,,

  • @somnathudawant1322
    @somnathudawant1322 Před rokem +5

    माझे वय आज 80वषॅ आहे आम्हाला मराठी शाळेत सहावीत ही कविता होती मला बालपण व माझा शाळेत ला वगॅ,सवंगडी व शिक्षक आठवले.
    धन्यवाद सर

  • @rajarampandit8401
    @rajarampandit8401 Před 7 měsíci +4

    अजून ही कविता ऐकताना डोळ्यांतून येणारे अश्रू अनावर होतात, मी ह्या तूम्ही संग्रहीत करून, त्यांना गाते करून आमच्या सरत्या पिढीवर उपकार केले आहेत त्या.लाख लाख धन्यवाद आणि शतशः ॠणी आहे.

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před 7 měsíci

      🙏🙏💐धन्यवाद

  • @medhakulkarni8601
    @medhakulkarni8601 Před rokem +3

    खूप खूप छान, शुभेच्छा, धन्यवाद

  • @babankharat6057
    @babankharat6057 Před 26 dny +2

    खूपच सुंदर कविता आहे

  • @anjalipadawe2923
    @anjalipadawe2923 Před rokem +3

    परत वर्गातील आठवणी जागृत झाल्या
    खूप खूप धन्यवाद

  • @suryakantpednekar926
    @suryakantpednekar926 Před rokem +3

    मा झी सर्वात आवडती कवीता सादर केल्या बद्दल धन्यवादा .

  • @manishathavai
    @manishathavai Před 8 měsíci +4

    आमची आई आणि मावशी नेहमीच ही कविता गुणगुणत असत पण आता मी आई झाल्यावर माझे गरिबीत गेलेले जीवन आठवले .किती हतबल असतात आईवडिल काहीवेळेला इच्छा असुनही आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करता येत नाही जेवढ्या वेळेस ही कविता ऐकते डोळ्यातील अश्रु थांबत नाहीत.

  • @kalindigosavi992
    @kalindigosavi992 Před rokem +1

    खुप सुंदर मस्त कविता आठवणी जाग्या झाल्या ❤

  • @pratibhavichare8252
    @pratibhavichare8252 Před rokem +3

    खूप छान शाळे चे दिवस आठवले आणि बाबांची आठवण आली

  • @sandhyabagade1942
    @sandhyabagade1942 Před rokem +3

    मला होती ही कविता इयत्ता सातवी मध्ये.आमच्या शिंदे मॅडमनी ही कविता इतक्या छान पद्धतीने शिकवली होती की मी त्यावेळेस खूप रडले आणि खूप दिवस दुःखी होते.आज मी 59 वर्षाची आहे पण आजही त्या कवितेतील शब्द नी शब्द आणि त्यातला गर्भित अर्थ जसाच्या तसा आठवतोय.
    धन्यवाद

    • @jayshreebilurkar1684
      @jayshreebilurkar1684 Před rokem +1

      माला होती ही कविता पण या मधील एक कडवे गाळले गेले आहे ते फारच सुंदर आहे

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem

      ........प्रतिसाद मराठी कलाकृतीला दिलाच पाहिजे.
      मातृभाषा नेहमीच बळ देते.
      आपले मनापासून आभार. 🙏

  • @VarshaM-MH-12
    @VarshaM-MH-12 Před 16 dny +2

    1987 ला 10 वीला आमचे मराठीचे सर पवार सरांनी शिकाविलेली... शाळा ती शाळाचं, काय ते गुरु.. विध्यार्त्यांचे आपलेपणा.. माया जिव्हाळा, मारून मारून शिकवायचे सर, कधी कसले पालकांचे गाऱ्हाने नाही 💐💐💐खूप छान 🎉🎉🎉 कोरेगाव पार्क.. S S G M विद्यालय, पुणे.1

  • @kamalnirphale4596
    @kamalnirphale4596 Před měsícem +2

    साठ वर्षानंतरही अजूनही कविता पाठ आहे खूप सुंदर चालीवर गायला आवडते आजही.

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 Před rokem +3

    लहानपणी चे दिवस आठवले 👌🏻👌🏻😘

  • @suhasarondekar3899
    @suhasarondekar3899 Před 9 měsíci +3

    माझ वय आत्ता 75 आहे माझ्या लहानपणी मी ही ऐकलेली आहे त्या नंतर अजून पर्यंत पुष्कळ वेळा ऐकलेली आहे. दर वेळी डोळ्यात पाणी येत . कविता वाचना बद्दल धन्यवाद.

  • @RameshPatil-qe9gv
    @RameshPatil-qe9gv Před měsícem +2

    माझे आवडते गीत, एकदम साठ वर्षे मागे जाऊन,शाळेचे दिवस आठवले.मराठीत हि कविता होती.

  • @anantlondhe3987
    @anantlondhe3987 Před měsícem +2

    प्रत्येक वेळी ही कविता ऐकताना मला बालपण आठवते ! माझ्या ताईला हुशार असूनही परिस्थिती मुळे आठवी मधुन शाळा सोडावी लागली .
    परंतु आमच्या ऊमा ताईनी काम करुन माझे शिक्षन पूर्ण करण्यास मदत केली .
    Thank You उमाबाई
    Thank You Mankapur
    Thank You नि मु घटवाई जनता हायस्कूल वडनेर .
    🙏🙏
    अनंत लोंढे

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před měsícem

      धन्यवाद 🙏❤💐
      आठवणीतल्या कविता पहा ,ऐका व आनंद घ्या .

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 Před rokem +3

    माझ्या आवडती कविता होती ही
    आज सोमण सरांनी शिकवलेली हि एकुण खुप छान वाटले धन्यवाद 😊😊😊

  • @pratibhamhatre7463
    @pratibhamhatre7463 Před měsícem +4

    आरे आरे कलसा हसु नको पाहू पायरिचा मी दगड तुझाच कि भाऊ हि कविता मिलेल का ऐकायला.

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před měsícem

      करतो प्र्यत्त्न 🙏

  • @BhartiSonawane-ht1ug
    @BhartiSonawane-ht1ug Před 4 měsíci +2

    मला माझ्या वडिलांची आठवण आली माझे वडील नेहमी मला हे लहानपणी कविता बोलत असत तेही शिक्षक होते आता ते नाही आहेत ही कविता कधीही ऐकते तेव्हा मला खूप त्यांची आठवण येऊन रडायला येते❤❤

  • @ashokwaghmare257
    @ashokwaghmare257 Před 23 dny +2

    खूप जुनी आठवण शाळेत हे गीत ऐकताना मन हरपून जायचे. आजही मन हरपून गेले. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrakothawade9144
    @rajendrakothawade9144 Před rokem +6

    खरंच खुप छान कविता
    आम्हाला ही कविता होती
    अजून खूप कवितांची आठवण येते
    जशा - १) या बाळांनो या रे या
    २) या झोपडीत माझ्या
    ३) खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या

    • @aartimore8513
      @aartimore8513 Před rokem

      खूप छान... ही कविता मनात कायमची रूजली ती माझ्या आई मुळे..
      अजून काही कविता आहे... हे करी सर्व तो हरी,,
      .. तड ई त कडा डे कभिंन कळ्या,.. सुंदर आमुच्या फलाफुलांचा बाग बगीचा पाहुनी,...

    • @pandurangkajle2660
      @pandurangkajle2660 Před rokem +1

      आम्हला होती ही कावता खरच खुप छान कविता होती जुन्या आठवणीला उजाळा मिळाला 👌👌

  • @shraddhabhide4112
    @shraddhabhide4112 Před rokem +3

    वयाच्या साठाव्या वर्षी बालपणात जाऊन आले खूप छान कविता आहे डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem

      तुमच्या प्रतिसादासाठी धन्यवाद,🙏💐

  • @sujatachavan2577
    @sujatachavan2577 Před rokem +2

    माझी खूप आवडती कविता.
    आमच्या बाईंनी खूप छान शिकवली होती. अजून पाठ आहे. बालपणात नेल्या बद्दल धन्यवाद. 🙏🙏

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.

  • @rajendrasonavane2591
    @rajendrasonavane2591 Před rokem +2

    धन्यवाद.पुन्हा सातवीच्या वर्गात बसविल्या बद्दल.
    खुप स्तुत्य उपक्रम आहे आपला.अविरत चालू ठेवा.
    ❤❤❤

  • @vibhavariayacit1450
    @vibhavariayacit1450 Před rokem +3

    माझी कनया, मी 1961 ला11 वी पास झाले आमहाला ही कविता नवहती तरी ही माझया आठवणीतली कविता आहे मी आॅफीस मधे कामाला होते, कुणी लांबचया सुटी वरून हजर झाले की बरेच वेळा section बदलत असे अशीच एकदा माझया शेजारचया टेबलावर क्ष आली नाव लिहीले नाही, तया दिवशी जुजबी गपपा मारलया नंतर लागोपाठ दोन दिवस चिटाचे पोलके घालून आली महणून सहज चौकशी केली, तिला खूप राग आला ती महणाली मग काय आपटे....मुलींनीच घालायचे का महणजे,महणजे काय महणजे तेवढयात officer कडून बोलावणे आले तो विषय तेथेच संपला दुसरया दिवशी तिनी पुसतक आणून माझया समोर फेकले अग हे काय, तुझया महणजे चे उततर
    विभा विमला आपटे परधानांचया, अनय कनया श्रीमान कुलीनांचया, गौरचैत्रींची तशा सजुनि येती, रेशमाची पोलकी छिटें लेती मी तेवहाच ठरवले मिळवाला लागलयावर 'रेशमाची छिटें असलेलीच पोलके घालायची आता पाच बहिणीवर जुळया बहिणी ही तयातली सातवी पोलीओ मुळे पायात दोष पण तुरू तुरू चालायची वडिल लहान पणी गेलेले कोण हौस पुरवणार, पण एखादी कविता एखादयाचया मनावर एवढा खोलवर परिणाम घडवते याचे मला नवलावाटले.कविता पूरण महणावी हे कडव महटले नाहीये असो

  • @user-vz2vs1di6d
    @user-vz2vs1di6d Před 11 měsíci +5

    सन १९७५ ला मी शिक्षक म्हणून लागल्या वर ईयत्ता ७ वी ड च्या वर्गात ही कविता पहिल्या दिवशी शिकवली होती व मी नवीन असल्याने माझे गुरू तसेच सह शिक्षक कै. एल्. एस्. साळी सर यांचे मार्गदर्शन लाभले होते.

  • @NilimaJoshi-ho6dr
    @NilimaJoshi-ho6dr Před 4 měsíci +1

    फार सुंदर आमचं लहानपण आठवलं

  • @narendrapatil3430
    @narendrapatil3430 Před 24 dny +2

    सुंदर मस्तच जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤

  • @bebimore8273
    @bebimore8273 Před rokem +3

    १९७७ मध्ये मला इ. ७ वी ला ही कविता होती . आज युट्युब चॅनल मुळे एकायला मिळाली .मनाला खूप खूप भावली

    • @VaradPS36
      @VaradPS36 Před rokem

      खुप छान 👌👌👌
      आम्हाला सुद्धा ही ७वी ला होती
      आम्ही १९९६ ला ७ विला होतो👌👌

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Před rokem +3

    🎵शालेय जीवनापासूनच मला ही कविता फार आवडायची, पाठ होती व अजूनही आहे🎶
    ती आमच्या शिक्षिका बाईंनी एव्हढी उत्तम व परिणामकारक रीतीने शिकवली होती की मला त्याचा भावार्थ तेंव्हापासून आजवर पक्का मनांत ठसला ....
    मात्र ह्या व्हिडिओ मधील चाल-ताल-संगीत एव्हढे आवडले नाही.... तसेच निवेदनापासून ते शेवटपर्यंत मराठी उच्चार स्पष्ट शुद्ध असावेत असे सांगावेसे वाटते.
    { ऊर्मिला आपटे ; सतारवादक,संस्कृत-हिंदी शिक्षिका,श्रीमद् भगवद् गीता निरुपक,अभिवाचिका }

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem

      आपण दिलेले संदेश खरोखरच
      खुप अनमोल आणि मार्गदर्शक आहेत.
      आपले मनापासून आभार.🙏💐

  • @rk8156
    @rk8156 Před rokem +2

    Ho amhala hotya he kavita

  • @VijayNakhate-nn7qf
    @VijayNakhate-nn7qf Před 2 měsíci +1

    मला ही खूप आवडायची,ती आजही तोंडपाठ आहे, औदुंबर,स्वतं,,त्रय सैनीका पुढेच जायचे,मृग,एक तुतारी द्या मज आणुनी,अशा अनेक कविता मन हेलावून सोडतात.यामुळे मराठी भाषेची ओढ लागली,

  • @devidasjoshi6252
    @devidasjoshi6252 Před rokem +3

    खूप छान कविता आहे

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.

  • @MoreRamesh-ic9qi
    @MoreRamesh-ic9qi Před rokem +4

    त्यावेळी सर्वात आवडलेली व संपुर्ण पाठा आसलेली कविता आज सुध्दा पाठ आहे चाळीस वर्षा पुर्विची साहावीला सातविला आसलेली कवीता

    • @punammahaddev4411
      @punammahaddev4411 Před rokem +2

      1988 या वर्षाच्या जुन्या आठवणी चा ऊजाळा.खुप छान.

    • @kokareschannel8453
      @kokareschannel8453 Před rokem +1

      खर आहे सर ,,

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

  • @shailajapatil8205
    @shailajapatil8205 Před rokem +1

    मला ही कविता होती व ती मला आजही पाठ आहे दररोज शाळा सुटण्या अगोदर म्हणायचो खूपचं छान अशीच राजा सजी महाली ही कविताही खूप छान आहे लहान पणाची आठवणी झाल्या सर्व मित्र मैत्रनी आठवणीत आल्या डोळे ओले झाले

  • @sangitataloskar2162
    @sangitataloskar2162 Před měsícem +2

    खूप छान शाळेतली जुने दिवस आठवले

  • @shailamaindargi8192
    @shailamaindargi8192 Před rokem +23

    मे ही कविता सातवी ला शिकले मला अजून आठवते

  • @manojr.badole1599
    @manojr.badole1599 Před rokem +3

    मी त्या वेळी पुष्कळ लहान होतो,पण माझे मोठे बहिण भाऊ ही कविता घरी गायचे.कवितेचे शिर्षक वाचल्या बरोबर मी भुतकाळात रममाण झालो.जय भारत.,..

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem

      धन्यवाद 🙏🏻.मातृभाषा नेहमीच बळ देते.

  • @Jayamore-cf3ey
    @Jayamore-cf3ey Před 3 měsíci +1

    खुपचं छान जुनी आठवण खरोखर वेगळंच ते हायस्कूल जिवनम भरुन आले

  • @laxmanmugade2783
    @laxmanmugade2783 Před dnem

    खुप छान हि कविता अजुनही आठवते कांबळे सरांनी पाठांतर करून घेतली होती

  • @chhayaingle9029
    @chhayaingle9029 Před rokem +3

    Excellent poem of my memory

  • @surekhakirdat639
    @surekhakirdat639 Před rokem +3

    आम्हाला पण होती ही कविता सातवी ला खूप आवडली

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 Před měsícem +1

    ही कविता मलाही सातवीच्या वर्गास होती, शब्द ऐकून
    पूर्वीचे गरिबीचे जीवन आठवते ,आई वडिलांविषयी
    आदर वाढतो .

  • @mayaukey-vx6ou
    @mayaukey-vx6ou Před rokem +2

    अतिशय सुंदर कविता शालेय जीवनातील जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.
      रमणीय बालपण 👍

  • @ramnathtikhe4704
    @ramnathtikhe4704 Před rokem +3

    मला ही कविता खूपच आवडायची खूपच छान👌👌

    • @anaghabendre4962
      @anaghabendre4962 Před rokem +1

      खुप छान कविता आहे ह्याचा अनुभव घेतला आहे परिस्थिती नुसार मैत्रिणी वागत होत्या तसेच नातेवाईक पण वागत होते खरच हृदयस्पर्शी कविता आहे

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem

      धन्यवाद 🙏🏻.

  • @sulabhaborse4292
    @sulabhaborse4292 Před 6 měsíci +3

    खूप छान वाटले. आत्त मी ६१ वर्षाची आहे. सगंळी कंवीता पाठ आहे. पूर्वी पण पूर्वी पंण घळाघळा पाणी यायचं आजही तिच परिस्थिती !

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před 5 měsíci

      धन्यवाद 🙏🏻

  • @rajeshharne8328
    @rajeshharne8328 Před 28 dny +2

    !! माझी आईं मला लहानपणी माझ्या साठी मण्याची खूब खूब आभार!!

  • @swatideshpande983
    @swatideshpande983 Před 3 dny

    अति सुंदर मागच्या आठवणी जाग्या झाल्या. मलाही ही कविता होती. खुप आवडीची.

  • @shirishpatil6898
    @shirishpatil6898 Před rokem +3

    विभा विमला आपटे प्रधानांच्या
    अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या।।
    अशीही एक ओळ मध्ये होती असे वाटते.
    मी सुद्धा अशाच पद्धतीने ही कविता बरेच वर्ष शिकविली आहे.
    खरचं एक चित्र समोर उभ रहात असे.
    छान गायलात, मूळचालीने.धन्यवाद!!

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem

      Thank you so much. Wah !🌼🙏🏼👌..
      विभा विमला - हे कडवे सातविला नाही. पुढे 11 वीला आहे.

  • @user-pq5ho2hd4d
    @user-pq5ho2hd4d Před 2 měsíci +21

    मला माझ्या वडीलांची आठवण आली माझा साठी म्हणायचं अंगाला शहारे आलै आता वडील नाही

    • @pratikshamokal2167
      @pratikshamokal2167 Před měsícem

      माझ्या साठी सुद्धा माझे वडील हिच कविता म्हणायचे. आता वडील नाहीत , त्यांची खूप आठवण येते.

    • @varshapawar3539
      @varshapawar3539 Před 26 dny

      😢😊

    • @advnuzhatbegum2513
      @advnuzhatbegum2513 Před 24 dny

      Mi Jr ka rdatanna disle ki Mjhe wdil hi kwita mhnyache w swtaha dekhil radyche.

    • @advnuzhatbegum2513
      @advnuzhatbegum2513 Před 24 dny

      Maji pristhi aaply peksha wegli nahi.mjhy doly tun ghla ghla ashru wahtt aahet.

    • @nirmalashirsath1440
      @nirmalashirsath1440 Před 19 dny

      😢

  • @devidasjoshi6252
    @devidasjoshi6252 Před dnem

    खूप छान कविता आहे रामकृष्ण हरी 🎉🎉

  • @pushpachiplunkar1433
    @pushpachiplunkar1433 Před rokem +2

    खूप खूप आवडली व शाळेचे दिवस आठवले.

  • @RanggandhKalasaktNyas
    @RanggandhKalasaktNyas Před 4 měsíci +3

    शाळेचे दिवस आठवले 😊😊😊

  • @renukapatil7762
    @renukapatil7762 Před rokem +3

    माझी आवडती कविता

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Před 5 měsíci +1

    जुनी कवीता फार छान होत्या . माझी आई व आजी .ही कवीता म्हणायची फार जुन्‍या कवीता चांगल्या होत्या

  • @nsurabhiassociate
    @nsurabhiassociate Před měsícem +2

    आमच्या लहानपणी माझी आई आम्हाला भावंडांना म्हणून दाखवायची

  • @sunandashewale5597
    @sunandashewale5597 Před 2 měsíci +3

    आम्हांलाही होती ही कविता .शालेय जीवनाची आठवण झाली .❤

  • @san-ri3ep
    @san-ri3ep Před rokem +3

    हे सोन आहे हो, खूप धन्य झालो मी

    • @san-ri3ep
      @san-ri3ep Před rokem +1

      Me first time aikli ani धन्य झालो

    • @kavyagandh
      @kavyagandh  Před rokem +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

  • @kshamagore105
    @kshamagore105 Před 8 měsíci +2

    मला पण ही कविता सातवीला होती.माझी फार आवडती खविता आहे ही.