Video není dostupné.
Omlouváme se.

शर आला तो धावुनी आला काळ ll एके काळी अतिशय गाजलेली मराठी कविता ll प्रत्येकांच्या ओठावरची कविता

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 02. 2023
  • गीतकार :- ग. ह. पाटील
    गायक :- सूरज कुमार धनजोडे
    व्हिडिओ :- विशाल धनजोडे
    नमस्ते मित्रांनो
    अनेकांची इच्छा होती की दादा तुमचे गीते आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे आहेत . त्यामुळे या चॅनल चा माध्यमातून आम्ही आपल्याला आमचे लिखित गीते पुरवणार आहोत ....
    आपल्या आवडी निवडी चे गीते आम्हाला स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकांवर sms द्वारे कळवू शकता , किव्वा या व्हिडिओ च्या comment मध्ये सुद्धा कळवू शकता .....
    धन्यवाद 🙏🏻

Komentáře • 834

  • @vijayas4945
    @vijayas4945 Před měsícem +10

    धन्यवाद दादा
    एक वर्षापूर्वी मीच बोलली होती तुम्हाला शर आला तो धावूनि आला काळ पाठवा म्हणून
    धन्यवाद बेटा, एक आजी
    वनी खेळते बाळ ते बल्लवांचे तुरे खोविती मस्तकी पल्लवांची 🎉🎉
    शोधा आणि युट्युब वर पाठवा

  • @balirambhaske2054
    @balirambhaske2054 Před 2 měsíci +9

    मी सहा वर्षाचा असताना ही कविता वाचली होती पण आम्हाला ही कविता अभ्यासक्रमात नव्हती .फारच भावपूर्ण कविता आहे मी 1968 ला पहिली ला असताना ही कविता माझ्या मामाच्या अभ्यास क्रमातील ही कविता होती .कविता वाचताना डोळे पाणावतात .या कवितेचे संगीतमय वाचन केल्याबद्दल धन्यवाद.अश्याच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा उपक्रम चालू ठेवावा .

  • @harishchandraparab7034
    @harishchandraparab7034 Před 2 měsíci +9

    माझा जन्म 1942 चा. ही कविता माझी अर्ध्याहून अधिक पाठ आहे. अजूनही एकांतात गुणगुणतो. डोळे भरून येतात.

  • @KailasGawali-we8ej
    @KailasGawali-we8ej Před měsícem +10

    श्रावण बाळाची कविता आईसाठी वडिलांसाठी हृदयस्पर्शी कविता मला आठवले ते बालपण मला आठवले श्रावण बाळाचे आई बापासाठी पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर दशरथ राजाने हरीण म्हणून बाण सोडला आणि तो बाण श्रावण बाळाला लागला ही कविता अत्यंत हृदयस्पर्शी आहे अशाच कविता तुम्ही सादर करीत सादर करीत राहा हीच विनंती गवळी सर

    • @NmathobaPanjabi-sf4kw
      @NmathobaPanjabi-sf4kw Před měsícem +1

      हां प्रसंग हरताळें (चांगदेव) तलावाच्या तिरावर घडला होता त्याच तळ्याचे पाळिं एका तिर्थस्थान आहे महानुभाव पंथाचे (सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे)

  • @user-nq9vo8uy8z
    @user-nq9vo8uy8z Před 5 měsíci +46

    माझा जन्म सन १९५३ चा. तिसर्‍या किंवा चवथ्या वर्गात शिकत असतांना ही कविता शिकवली जात होती. राजा दशरथ व श्रावण बाळ यांच्यावर आधारित ही कविता मनाला गहिवरून आणनारी ही कविता माझ्या खुपच आवडीची. ही कविता म्हणत म्हणत मी माझ्या दोन्ही मुलींना झोपवीत होतो. आता नातवंडे सुध्दा हीच कविता ऐकून झोपी जातात.

    • @vilasgurav8580
      @vilasgurav8580 Před 3 měsíci +1

      😊😊😊😊😊😊

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale Před 3 měsíci +5

      अशीच एक कविता.प्रेम स्वरूप आई
      वात्सल्य सिंधू आई बोलावु तुज आता मी कोणत्या ऊपाई.
      ही कविता आम्हाला आमच्या बाई शिकवायच्या,अन् सुंदर आवाजात तालात गात असत .व गाता गाता त्यांच्या डोळ्यात अश्रु वहात असत.
      आमच्या त्या शिक्षीका बाईंचं नांव शांता बाई होते . आणि त्यांच्या मिस्टर चे नांव केशवराव होते.
      या कवितेत मुळे त्यांचे नांव लक्षात राहीले.
      तान्हाजी मुधळे, औंढा (नागनाथ )

    • @GangaDharrao-gz4vg
      @GangaDharrao-gz4vg Před 3 měsíci +1

      This peom was sung by all of us who are aged above sixty now.Evening time was leisure time.Then all of us were singing proms taught in school.Elder sisters or brothers too sung as extra peom.Those golden days. canno rise now.Gangadhar Kanole Nanded

    • @sambhajilingayat3343
      @sambhajilingayat3343 Před 24 dny

      चौथीच्या वर्गात होती मला सुद्धा इ.स. 1970

  • @vijayas4945
    @vijayas4945 Před 28 dny +3

    बऱ्याच जणांनी गायली
    पण तुझ्यासारखा आवाज कोणाचाच नाही ✅
    आम्ही ज्या आवाजात ऐकली ,गायली तोच आवाज आमच्या गुरुजींनी शिकवलेला🎉
    👌👌🌹💐💐👍

  • @anantapawar2601
    @anantapawar2601 Před 2 dny +1

    माझे वय सहासष्ट वर्षे आहे आम्हा दोघं पतिपत्नी ही कविता शिकलोय आणि आज ही कविता आमची तोंडपाठ आहे आमच्या दोन्ही मुलांच्या लहानपणी त्यांना झोपवण्यासाठी हे काव्य आम्ही रोज म्हणायचो . आज सर्व आठवणी जागृत झाल्या

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 Před 14 dny +1

    ही कविता शाळेत लहानपणी ऐकली होती. आज आपल्या गायनाने डोळयातून अश्रूंची रांग लागली. आपले सादरीकरण उत्तम व उत्कृष्ठ आहे. या कवितेचा अर्थ जसा जसा समजतो तस तसा श्रावण बाळ आपल्या हृदयापाशी येतो. अप्रतिम, भावस्पर्शी, हृदय पिळवटून टाकणारी कविता. 👌👌👍

  • @satishbhokardole6638
    @satishbhokardole6638 Před rokem +16

    पन्नास वर्षापुर्वी आम्हास ही कवीता होती.अप्रतिम आणी आमचे शिक्षक ही आठवणीत आहेत ,त्याना मानाचा मुजरा,

    • @GangaDharrao-gz4vg
      @GangaDharrao-gz4vg Před 24 dny

      @@satishbhokardole6638 Me dusarit Astana hi Kavita shikvit Astana shikshak chlivar mhanun ghet.Aamhi sagale bhavande sayankali anganat basun saglech anek Kavita chlivar mhanat hoto.Shar aala to saru zale ki aae baba aamchi Kavita laksh devun aeikayache.Hi kavita anekana60 70age zale tarihi tondpath aahe Karan tenha chavathiche vargatach vahit lihit asat.Mhanunach anek kavita tondpath karun ghet.Maj maghari kara tumhi sambhal aeikun aae baba gahivarat hote.Hi chal Pilu ragatil aslyamule sagalyanna aavadte.He aatta samajale.Ya sarva god god aathavine balpan kiti Ramya hote.Hech khare aahe.Gangadhar Kanole Nanded

  • @vandanaaarekar1054
    @vandanaaarekar1054 Před 3 měsíci +9

    आम्ही लहान असताना माझी आई हि कविता सुन्दर गात असे कारण आमची अक्षिशीत असून सुद्धा उत्तम गात असे आज हि कविता ऐकून माऊली ला आठवले जी या जगात नाही

  • @ruchitawde2932
    @ruchitawde2932 Před 10 dny +1

    वाटलं नव्हतं ही लहानपणीची कविता ऐकायला मिळेल खूप सुंदर डोळे पाणावले😢😢

  • @user-cd1gr8tb3i
    @user-cd1gr8tb3i Před 2 měsíci +7

    खूपच सुंदर कविता आहे आणि आवाज पण खूपच सुंदर आहे भाऊ आपला खूप आवडली मनापासून धन्यवाद

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Před 2 měsíci +7

    खुप हृदय स्पर्शी कविता.🙏🙏

  • @vinaygadgil
    @vinaygadgil Před 3 měsíci +9

    1नंबर धन्यवाद
    बरेच दिवसांनी चांगल काही ऐकायला मिळालं

  • @shivajipawase382
    @shivajipawase382 Před 19 dny +1

    मी1967साली सातवी ला असताना हे गीत वाचले तसेच त्या काळात ऐक गीत भारत माते पुत्र शहाणे अमीत तुला लाभले हे गीत सादर केले तर आनंद होईल

  • @rimalanjekar4299
    @rimalanjekar4299 Před měsícem +2

    ❤🙏❤ अप्रतिम गायन बरेच वर्षांनी ही कविता यैकली .कोरड्या डोळयांनी ही कविता ऐकू शकतच नाही म्हणू तरी कसे शकणार पण आपण खूपच भावपूर्ण गायलात .👍😊❤🙌❤

  • @anildeshmukh3112
    @anildeshmukh3112 Před 14 dny +1

    ग ह अप्रतिम लिहायचे, गुरुदेव अतिशय सुंदर गायलीत, मी लहानपणी ऐकली होती आईकडून 🙏 😫😫😵😭

  • @ninadprabhu763
    @ninadprabhu763 Před 18 dny +1

    कीती वर्ष झाली ही हदय स्पर्शी कविता ऐकून .आज तुमच्या मुळे पुन्हा स्मृती जागृत झाल्या.धन्यवाद.

  • @ashokpawaskar7043
    @ashokpawaskar7043 Před 2 měsíci +4

    मनात कुठेतरी घर करून असलेली कविता ऐकण्याचे भाग्य मिळाले.धन्यवाद!

  • @dr.sonajilandepatil10
    @dr.sonajilandepatil10 Před rokem +23

    मी 65 वर्ष मागे गेलो.
    गायका बरोबर गाउन संपूर्ण कवितेचा पुन्हा मुग्ध आनंद घेतला.
    धन्यवाद....

    • @bhimraopatil4744
      @bhimraopatil4744 Před rokem

      फार छान गाईली‌ जुन्या काळातील कवितांची आठवण झाली ‌धन्यवाद.

    • @user-bm2ze5fe6f
      @user-bm2ze5fe6f Před 2 měsíci

      जुन्या काळचे कविता ची आठवण करून दिली खूप खूप धन्यवाद सर

    • @vasantpawar2152
      @vasantpawar2152 Před 2 měsíci

      खुप धन्यवाद 8:22

  • @punamchandjagdale5402
    @punamchandjagdale5402 Před 2 měsíci +9

    सन्माननीय,आपण मला पंचावन्न वर्षे मागे नेवून मला माझ्या लहान पणाच्या आठवणीने भावूक करून माझे हृदय सद्गदीत करून मन हेलावून टाकले. मी प्राथमिक शाळेत ४थी च्या वर्गात असताना हि माझी सर्वात आवडती कवीता होती. मी अजूनही मला कधी कधी आठवण आली की,मी मनापासून भावूक होऊन गुणगुणतो.

  • @somnathudawant1322
    @somnathudawant1322 Před 2 měsíci +8

    मी 1953साली तिसरीत जीवन शिक्षण विद्या मंदिर कोपरगाव शाळा नं दोन मधे शिकत असताना आमचे वगॅ शिक्षक कै. धामणे गुरूजी आम्हा मुलाकडून सुंदर चालीत म्हणून घ्यायचे ही आठवण आज जागरूत झाली.

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 Před rokem +39

    साधारण 60वर्षा पूर्वी,ही कविता आम्हाला आमचे शिक्षक अगदी तनमयतेने शिकवीत होते, व आमच्या नायानातून अश्रूंचा बांध फुटत असे.

    • @HambirraoWalunj
      @HambirraoWalunj Před 10 měsíci

      खूप छान होती कवीता

    • @sudhirj.9676
      @sudhirj.9676 Před měsícem

      आता अशा आशयपूर्ण कविता नाहीत.

  • @sureshlale6675
    @sureshlale6675 Před 14 dny +1

    फारच भावपूर्ण कविता आहे. मला लहानपणी होती

  • @kirti8946
    @kirti8946 Před rokem +17

    खूप छान ...मला चवथीला होती ही कविता खूप वर्षापासून ची इच्छा तुमच्या मुळे आज पुर्ण झाली..खूप खूप धन्यवाद..।।।

  • @surendraugale287
    @surendraugale287 Před 21 dnem +1

    हि कविता ऐकताना मला माझ्या आईची आठवण आली माझ्या चिमुकल्या भाच्याला पाळण्याला झोका देत ति झोपवायची खरच हि कविता ऐकताना आईची खुप आठवण येते.आज आई नाही या जगात. जणु काही तिचे बोलच कानावर पडले असे वाटते.धन्यवाद. कविता छान वाटते ऐकायला मन प्रसन्न होते..तसेच डोळे भरून येतात.😢

  • @sureshkaskar8589
    @sureshkaskar8589 Před 3 měsíci +7

    अतिशय सुंदर कविता 🙏🙏

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar Před 2 měsíci +5

    हि कविता आम्हाला होती मी अजून म्हणत असतो

  • @bomkarj
    @bomkarj Před 3 dny +1

    ही कविता माझे वडील सुंदर आवाजात म्हणायचे..तो काळ 1967 चा होता..त्यांची आठवण आली की ही " कविता " दाटून येणाऱ्या ह्रदयाचे म्हणतो.

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 Před měsícem +4

    ही कविता मला सुध्दा होती आणि एक कविता बा नीज गडे नीज गडे लडीवाळा नीज नीज माझ्या बाळा
    रवी गेला सोडून आभाळा नीज नीज माझ्या बाळा। 🙏 🙏

  • @ranjanakamble9221
    @ranjanakamble9221 Před 3 měsíci +7

    माझी आई आम्हाला लहानपणी ही कविता नेहमी ऐकवत असे, आजही तिच्या पंच्याहतरीत तिला ही कविता पाठ आहे व म्हणते सुद्धा. खूप छान वाटते.

  • @vaijayantikulkarni8296
    @vaijayantikulkarni8296 Před rokem +10

    अप्रतिम कविता मनाला भावणारी व छान सादरीकरण . खुप आवडली.

  • @ujjwalajadhav1094
    @ujjwalajadhav1094 Před rokem +16

    खुप सुंदर कविता आहे माझ्या खूप आवडीची कविता आज पुर्ण ऐकायला मिळाली. खूप खूप आभार.

  • @user-nk2oz9ky4p
    @user-nk2oz9ky4p Před 2 měsíci +11

    माझी आई ही कविता खूपच छान म्हणायची गळा छान निघायचा आईचा आज आई नाही जगात पहिल्या सगळ्या कविता कविता च वाटायचे आता तर काही ठिकाण नाही आईसाठी आठवण राहून गेली सशिल आई होती माझी जुनी सातवि झाली होती विडिओ मुळे आठवण जागी झाली धन्यवाद

  • @popatraopatil1739
    @popatraopatil1739 Před měsícem +2

    आज माझे वय 68 वर्षे आहे.आजही माझी कविता पाठ आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या आजही मी माझ्या नातवंडांना झोपणे वेळी ही पूर्ण कविता म्हणून त्यांनाझोपवतो तशीच अजून एक कविता आहे ती ज संगीतमय केली तर बर होईल . पोर खोटेवर मृत्यूच्या दारा कुणा गरीबाचा तळमळे बिचारा दूर आई राहीली कोकणात सेविकेचा आधार एकचतो . धन्यवाद

  • @namdeoraosdhanwate2271
    @namdeoraosdhanwate2271 Před rokem +14

    60 वर्ष झाली शाळेत असताना ही कविता वाचताना डोळ्यात पाणी यायचे ,अशीच दुसरी कविता, क्षणोक्षणी पडे उठे परि फळे उडे बापडी या दोन्ही कविता आजही ऐकताना डोळ्यात पाणी येते.

  • @shashikantrdhokane593
    @shashikantrdhokane593 Před rokem +14

    अतिशय भावपूर्ण सादरीकरण. खूप दिवसांनची इच्छा पूर्ण झाली, धन्यवाद.

  • @rameshsaindane2022
    @rameshsaindane2022 Před rokem +7

    छान मी लहान असताना ही कविता पाठ केलेली होती आज पुन्हा एकदा मिळाली खूप खूप आभार

  • @nalinigolar810
    @nalinigolar810 Před měsícem +2

    खुप छान कविता आहे आम्हाला चवथीत होती हिकविता

  • @hanmantbiradar1075
    @hanmantbiradar1075 Před 3 měsíci +3

    माझा जन्म 1964 चा.आमच्या अभ्यासक्रमाला ही कविता नव्हती,पूर्वी होती.परंतु लहानपणापसून कविता ऐकत आलो आहे.खुपच भावपूर्ण!अतिशय ह्रदयद्रावक प्रसंग!!
    धन्यवाद👏👏

  • @umadankh3723
    @umadankh3723 Před rokem +9

    खुपच छान कविता बरेच दिवसांनी ऐकायला मिळाली धन्यवाद

  • @mangalgore2831
    @mangalgore2831 Před 27 dny +2

    आम्हाला पण होती.
    खूप खूप आवडती कविता.

  • @vishnushinde1237
    @vishnushinde1237 Před 8 dny +1

    कविता ऐकून शाळेतील आठवण झाली❤🎉🎉

  • @SubhashLaulkar
    @SubhashLaulkar Před 3 měsíci +9

    1957 -58 मध्ये मी इयत्ता चौथी असताना ही कविता आमच्या पाठ्यपुस्तकात होती ही कविता शिकवताना गुरुजी आणि आम्ही सर्व विद्यार्थी अतिशय भावविवश होत होतो मातृ - पितृ प्रेमाचे खोल संस्कार विद्यार्थ्यांवर होत होते ते अजून पर्यंत आमच्या मनात घर करून आहेत आई बाप हे दैवत दोन्ही असं का माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी हा भाव त्या कालच्या मुलांमध्ये आयुष्यभरासाठी कोरला जायचा 🙏

  • @sadshivjagtap2052
    @sadshivjagtap2052 Před rokem +4

    धन्यवाद कविता लीहणाऱ्या कविना इतका करुण रस भरलेली कविता लिहिली व गायकानेही त्याच भावनेतून गायली धन्य वाद . जय श्री राम.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před 10 dny +1

    माझी आई अशिक्षित होती पण् ती ही कविता गायची आणि रामायणातील कथा सांगताना श्रावण बाळाची ही कथा सांगत असे...

  • @someshwarkale5143
    @someshwarkale5143 Před 3 měsíci +9

    आमच्या लहानपणी आम्ही शाळेत ही कविता अशीच सुरात गात होतो.खुप छान आठवण करून दिली.धन्यवाद.🙏

  • @kalpanaketkar1424
    @kalpanaketkar1424 Před 16 dny +1

    खूप सुंदर कविता,गायन हृदयस्पर्शी, माझी आई नेहमी गायची

  • @AlkaJoshi-i1i
    @AlkaJoshi-i1i Před 23 dny +2

    मला खूप आवडते हि कविता.❤🎉

  • @vilashindurao7708
    @vilashindurao7708 Před 5 dny +1

    माझे वडील म्हणायचे खूप वर्षापासून मी शोधत होती आज सापडली

  • @siddharthmore6110
    @siddharthmore6110 Před rokem +6

    फार सुंदर कविता
    माझे वडील नेहमी ही कविता गायन करायचे. सर्व जण आम्ही मनःपूर्वक ऐकायचे. तुम्ही माझ्या वडिलांना माझ्या समोर आणले. जे आज हयात नाहीत. डोळ्यात पाणी आले. 🙏

  • @user-pl6vc3ck2q
    @user-pl6vc3ck2q Před 3 měsíci +6

    मला तिसरी ला ही कविता होती। आज पर्यंत ही मुखोदगत होती।

  • @shubhangijadhav2990
    @shubhangijadhav2990 Před rokem +5

    फार सुंदर कविता. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला. कवितेचा अर्थ असा आहे की रुदय भारावून गेले. कवीला सुधा सलाम.

  • @lalitthenge2634
    @lalitthenge2634 Před rokem +6

    बापरे,किती वर्षानी कविता ऐकली, अंगावर काटा आला, कविता शिकवणाऱ्या आमच्या बाई संपूर्ण डोळ्यासमोर उभ्या राहिल्या 😢😢😢😢

  • @mangalrawal876
    @mangalrawal876 Před 2 měsíci +1

    कविता ऐकून मन गहिवरून आले डोळ्यात पाणी आले.खूपछान लहान पण आठवले.😂 8:22

  • @ashwinilanjekar4772
    @ashwinilanjekar4772 Před rokem +8

    अतिशय उत्कट, हृदयस्पर्शी काव्य.. शालेय जीवनात मराठी च्या शिक्षकांनी मनापासून उत्तमरीत्या सादरीकरण करून शिकविल्या मुळे इतक्या वर्षांनंतरही ती मनात तशीच झालेली आहे.. अजूनही कविता ऐकताना डोळे भरून येतातच..

    • @sharadpipare1272
      @sharadpipare1272 Před rokem

      सर जी कृपा करून आपण आई ही कविता एे कवावी

    • @prasadchitale6589
      @prasadchitale6589 Před rokem

      बाळ जातो दूर देशा मन गेले वेडाऊन आज सकाळपासून ही कविता उपलब्ध झाल्यास कृपया गाण्याचा प्रयत्न करावा

  • @Sukramsavkare_1991
    @Sukramsavkare_1991 Před 2 měsíci +3

    मी लहान असताना मी आमचे पुस्तकातील कविता म्हणत असताना माझी आई त्यांचे काळातील ही कविता मला नेहमी म्हणून दाखवायची. त्यावेळी ही कविता व कवितेची चाल मला खूप आवडायची.
    आता मी जरी मोठा झालो असलो तरी माझी आई मला सोडून गेली आहे.....😢😢😢
    ही कविता ऐकली तेव्हा जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात. पार भूतकाळात निघून गेलो आई जणू माझ्या जवळ बसून ही कविता म्हणत आहे असा जिवंत भास झाला आणि माझे डोळे अश्रू नयनांनी केव्हा ओले होवून ओघळले कळालेच नाही......

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad6106 Před rokem +9

    ही कविता 1967_68 मध्ये मी अभ्यासली आहे. किती हृदयद्रावक आहे ही कविता! अजुनही आठवते आणि डोळ्यात अश्रू तरलतात.

  • @darshanasawant4786
    @darshanasawant4786 Před 8 měsíci +5

    मला माझ्या शाळेची आठवण झाली मनापासून धन्यवाद डोळ्यातून पाणी आले धन्यवाद

  • @pratidhnyamahajan6049
    @pratidhnyamahajan6049 Před rokem +6

    खूपच सुंदर.आम्हाला.ही कविता.होती पूर्ण.आठवत नव्हती.त्याबद्दल आभार

  • @ujjwalkundaikar2596
    @ujjwalkundaikar2596 Před měsícem +1

    धन्यवाद!कविता ऐकवल्याबद्दल. माझी आई नातवंडांना झोपवताना ही कविता म्हणायची.आज नातवंड मोठी (30-35 वर्षाची) आहेत.तरी आजीला ही कविता म्हणायला सांगतात

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před rokem +9

    किती सुंदर कविता होती का आभ्यासक्रमातुन काढली शिक्षण विभागाण अक्कल दिवालखोर झाली वाटत आपण खुप चांगल गायलात धन्यवाद 🙏🚩

  • @jidnyesharmy2281
    @jidnyesharmy2281 Před 4 dny +1

    माझं वय 55आहे मला सुद्धा तिसरी चौथी ला आम्हाला कविता होती माझा जन्म 1969चा मी सुद्धा वर्गात रडायचो

  • @madhuradhotre487
    @madhuradhotre487 Před 17 dny +1

    Khup khup chan avajahi Ani Kavita tar aprtimach🙏🙏👌👍🙏

  • @manishasurve9591
    @manishasurve9591 Před měsícem +1

    असा जुन्या कवितांचा संग्रह

  • @sunandadixit9474
    @sunandadixit9474 Před rokem +8

    मला ही कविता फार आवडते, अगदी रडू येते, खुप छान आवाज आहे तुमचा

  • @dattatraykelkar3373
    @dattatraykelkar3373 Před rokem +4

    हो, मलाही ही कविता प्राथमिक शाळेत असताना पाठ केल्याचे स्मरते.
    आपल्या मराठी भाषेत अशा किती तरी कविता आहेत जी ज्यातून समाज शिक्षण आणि आरोग्य, अर्थ कारण आपल्याला शिकविले गेले.
    माला आठवतात त्या, घेवूनी आरती हाती, पातल्या नर्मदेकाठी,
    छन खळखळ धूम पट धूम लेझिम चाले जोरात, वसंत वनात जनात हासे, सृष्ठी देवी जणू नाचे उल्हास,
    गातात संगीत पृथ्वीचे भाट.
    या आणि अशाच कितीतरी कविता, उत्तमोत्तम धडे, प्रवास वर्णने, निबंध, रसग्रहण या गोष्टी आठवतात.
    पण हे सगळे ७७+ वयो गटातील लोकांच्या करीता एक विरंगुळा.
    धन्यवाद, या श्रावण बाळ कविते निमित्त थोडा वेळ छान गेला हेही नसे थोडके.
    जमल्यास या माध्यमातून परत परत भेटूही.

  • @makarandlingayat9862
    @makarandlingayat9862 Před rokem +4

    लहानपणी ऐकलेली कविता, शब्दरचना अप्रतिम ‼️ चाल पण अप्रतिम ‼️ ऐकताना अंगावर काटा उभा राहिलाच पाहिजे ‼️🙏🙏🙏

  • @abhijeetpande5295
    @abhijeetpande5295 Před měsícem +2

    धन्यवाद। बंधु. अप्रतिम गायलात.

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Před měsícem +2

    आज माझे वय 75 पूर्ण आहे तरीही ही कविता पाठ आहे. माझे नातवंड नवल करतात. इतक्या वर्षात तुमची ही कविता पाठ कशी राहिली. असे नेहमी म्हणतात.

  • @vasudeoification
    @vasudeoification Před rokem +5

    खूप वर्षांनी संपूर्ण कविता ऐकायला मिळाली. मी ही सत्तरीचा आहे. पण त्यावेळी सर्वानाच ही कविता पाठच होती.

  • @shardadhikle703
    @shardadhikle703 Před rokem +3

    आमचे लहानपणी माझी आई अतिशय सुंदर म्हणायची. शब्दच असे आहेत की श्रावण बाळ आणि ते दृश्य समोर उभी होतात. आम्ही सगळे भावंडे देखील ऐकताना रडत असायचो.

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale Před 12 dny +1

    अतिशय सुंदर कविता.

  • @suryakantmulye6205
    @suryakantmulye6205 Před 2 měsíci +1

    माझा जल्म 7/4/1951 चौथी.. साहव्या वर्षी मला मुन्सिपलतीच्या शाळेत घेतलं पहिली इयत्ता मध्ये व चौथी मध्ये ही कविता पाठ करून घेत... आज त्यानंतर मी ही श्रावणबाळाची कविता वयाच्या 74 वर्षी मला ऐकायला मिळाली... खूप आनंद झाला आणि जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या बाळ तूला खूप खूप धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hemantkshirsagar1139
    @hemantkshirsagar1139 Před rokem +6

    सर खूप सुंदर कविता गायली आहे आणि आपला आवाजही खूप सुंदर आहे. कविता ऐकून खरंच मन भरून आलं आणि डोळ्यात पाणी सुद्धा आलं. राम कृष्ण हरी.

  • @sanjaykhairnar4965
    @sanjaykhairnar4965 Před měsícem +1

    आमचे वडील शिक्षक होते ते आम्हाला रात्री झोपताना ही कविता ऐकवयाचे जे आज आमच्या त नाही कविता ऐकूण जुनी आठवण मात्र तुम्ही जागे केली धन्यवाद दादा 😢😂

  • @gajanansarjerao5402
    @gajanansarjerao5402 Před rokem +6

    👌 खरोखरच काळजाला भिडणारी कविता.धन्यवाद 🌹🌹🙏🙏🌹🌹खुपच छान 👍🚩

  • @darshanaathavale237
    @darshanaathavale237 Před rokem +4

    खूपच छान कविता. अगदी ऐकून डोळ्यात पाणी आआले.

  • @umeshvasantmurudkar5481
    @umeshvasantmurudkar5481 Před rokem +4

    ही कविता माझी आई म्हणायची मी तेव्हा 5...ते 6 वर्षे चा असेन आज मी 60 वर्षाचा आहे मला माझी आई आठवली. 4थी 5वी लाख कशी असेल त्या वेळी ही कविता नव्हतीच ती त्या पुर्वी 1962 पुर्वी असणार

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 Před rokem +1

      येसस बरोब्बर..माझी आई म्हणत असे नेहमी..तेव्हा मी लहाण होते .आई आता 78 च्या आस पास आहे .

    • @prabhusonavale2325
      @prabhusonavale2325 Před 11 měsíci

      ही कविता माझी आवडती होती आजही कविता ऐकून मला रडायला येतं आज मी 65.वयाचाआहेमला पंडीत बाई ना श्री साष्टांग नमस्कार 😂❤😂❤❤ आहे जयमनसे जयशिवराय जयमहाराष्ट्र जयभिमनमोबुध्याय मी दहीसरकर आहे

    • @leenasatam4595
      @leenasatam4595 Před 4 měsíci

      @६७ वर्ष मागे गेले मी. कविता अजून विसरले नाही श्रावण बाल डोळ्यासमोर आला रडू आले

  • @namdevilhe4977
    @namdevilhe4977 Před rokem +4

    जय शिरोमणी संत रविदासजी महाराज..धन्यवाद. ...फारच छान....

  • @kumudiniaasodekar3095
    @kumudiniaasodekar3095 Před 3 měsíci +2

    फारच सुंदर🎉
    लहान पणीची आठवण झाली. घरोघरी हे गाणं ऐकायला यायचे. आमची आजी तर गाणं म्हणतांना खुप रडायची तीला रडतांना पाहून आम्ही भावंड तीला घट्ट बिलगून रडायचो

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 Před 3 měsíci +3

    अप्रतिम च...करुणामय ...😓😢

  • @jyotiraul1395
    @jyotiraul1395 Před rokem +3

    खुप सुंदर शाळेतील कवीता ऐकुन धन्य झाले कान तृप्त झाले

  • @pratibhadagale6727
    @pratibhadagale6727 Před rokem +4

    🙏🙏 खूप छान आम्ही सुद्धा लहानपणी ऐकलेली आहे ही कविता

  • @irasart2232
    @irasart2232 Před 3 měsíci +10

    आम्हाला पण होती कविता.शिकवताना टीचर रडायच्या मग आम्हाला पण रडायला यायच

  • @chhayajoshi1867
    @chhayajoshi1867 Před měsícem +2

    खूप सुंदर कविता लहानपणी माझा भाऊ गायचा ही कविता

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 Před rokem +5

    शाळेची आठवण झाली
    सुंदर कविता

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před rokem +2

    खूपच छान, बरेच वर्षा पासून ऐकायची होती ही कवीता माझे पती कधी कधी आठवले ही म्हणत असायचे तीस चाळीस वर्षांपूर्वी त्याच्या कडूनच ऐकली होती त्याच्या शाळेत त्यानी शिकलेली होती आमच्या वेळी नव्हती. धन्यवाद ही कविता तुम्ही घेऊन आलात ही कविता ऐकून त्याना त्याचे शाळेतील दिवस डोळयासमोर आले खूपच धन्यवाद

  • @amitavaidya427
    @amitavaidya427 Před rokem +5

    अप्रतिम गायन ऐकून मन हेलावून गेले.

  • @kamalakarpatil1484
    @kamalakarpatil1484 Před 20 dny +2

    पूर्वी कविता पाठ म्हणून घ्यायचे कविता पाठ नाही झाली तर गुरुजी त्याची सुट्टी करत नव्हते असा तो काळ होता अजूनही आठवतो आहे

  • @vishwasraowalsinge2041
    @vishwasraowalsinge2041 Před rokem +6

    अशा कविता आज रोजी अभ्यासक्रमात पाहिजे

  • @mitasave8119
    @mitasave8119 Před rokem +6

    अजून ही ऐकताना डोळ्यात पाणी येते धन्यवाद

  • @babasahebjawale6538
    @babasahebjawale6538 Před rokem +4

    ह्दय ला भिडणारी काव्य श्रावण बाळाची महती ऐकुन मन दुःखी होते.राम कॄष्ण हरी🙏🙏

  • @ranjanasonar1967
    @ranjanasonar1967 Před rokem +3

    फारच सुंदर व अर्थपूर्ण कविता, सादरीकरण अतिशय सुंदर, माझी आई हि कविता नेहमी म्हणायची.

  • @anjalikelkar2288
    @anjalikelkar2288 Před 11 měsíci +2

    धन्यवाद, आपण अशा जुन्या कविता ,अंगाई गीते सादर करून आम्हांला आमच्या बालपणीचा काळ पुन्हा एकदा समोर उभा केलात.खूप बरे वाटले.असाच जुन्या साहित्याचा खजिना पुन्हा एकदा आपल्याकडून आमच्यासाठी उघडला गेला तर खूप छान होईल.पुन्हा एकदा धन्यवाद अभिनंदन आणि शुभेच्छा आणि आशीर्वाद घरातील मोठ्याना नमस्कार लहानांना आशीर्वाद .

  • @sulbhatawde1112
    @sulbhatawde1112 Před 3 měsíci +2

    ही कविता मला शाळेत होती.
    मला पूर्ण पाठ आहे
    मला ही खूप वाईट वाटायच
    आता हे शिक्षण शाळेत नसते
    मी माझ्या आई साठी धो धो पावसाळ्यात मुंबई हून धावून गेले
    शांती आई हा सिनेमा पण असाच आईवर प्रेम करायला शिकविले

  • @sadshivjagtap2052
    @sadshivjagtap2052 Před měsícem +1

    गायकाने चांगल्या स्वरां मध्ये ही कविता गायली लहानपणी आमच्या अगोदरचे मुले शाळेमध्ये ही कविता म्हणत असत आमच्या अभ्यासक्रमात ही कविता नव्हती परंतु आमच्यापेक्षा मोठे मुलं कविता अर्थ स्वरात गात असत धन्य ते कवी ज्यांनी श्रावण बाळाची कविता लिहिली जय श्रीराम

  • @renukakagne7015
    @renukakagne7015 Před rokem +2

    मी चार पाच वर्षे वयाची असताना माझी मोठी बहीण चौथ्या वर्गात होती तेव्हा शाळा सुटण्या अगोदर शेवटच्या तासात वर्गातील सर्व विद्यार्थी हयाच चालीवर ही कविता म्हणत असत तेव्हा ऐकलेली ही कविता त्या कवितेतील काही ओळी आजही मला आठवतात आणि मी हया ओळी गुण गुण ते कारण कविता आणि कवितेची अतिशय सुंदर आणि अविट गोडी देणारी आहे 👌👌👌🙏🙏🙏

  • @ashokkamble8571
    @ashokkamble8571 Před měsícem +2

    ही कविता 1960ला मला 4थी ला होती खूप छान कविता होती

  • @umakantbaviskar8372
    @umakantbaviskar8372 Před rokem +3

    तुझा आवाज छान आहे आज 67 वर्षा पुर्वी ची शाळा आठवली गुरूजी आठवले जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद