Video není dostupné.
Omlouváme se.

माझी कन्या ll गाई पाण्यावर काय म्हणूनि आल्या ll कवी बी. यांची अतिशय गाजलेली सुंदर मराठी कविता

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 06. 2023
  • गीतकार :- कवी बी. ( नारायण मुरलीधरजी गुप्ते)
    गायक :- सूरज कुमार धनजोडे
    व्हिडिओ :- विशाल धनजोडे
    संपूर्ण कविता :-
    गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?
    का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
    उभय पितरांच्या चित्तचोरटीला
    कोण माझ्या बोलले गोरटीला ?
    उष्ण वारे वाहती नासिकात
    गुलाबाला सुकविती काश्मिरात,
    नंदनातिल हलविती वल्लरीला,
    कोण माझ्या बोलले छबेलीला ?
    शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची
    दूड रचलेली चिमुकली मण्यांची
    गडे ! भूईवर पडे गडबडून,
    का ग आला उत्पात हा घडून ?
    विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
    अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
    गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
    रेशमाची पोलकी छिटे लेती.
    तुला ’लंकेच्या पार्वती’ समान
    पाहुनीया, होवोनि साभिमान
    काय त्यातिल बोलली एक कोण
    ’अहा ! आली ही पहा, भिकारीण!’
    मुली असती शाळेतल्या चटोर;
    एकमेकीला बोलती कठोर;
    काय बाई ! चित्तांत धरायाचे
    शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे !
    रत्‍न सोने मातीत जन्म घेते,
    राजराजेश्वर निज शिरी धरी ते;
    कमळ होते पंकांत, तरी येते
    वसंतश्री सत्कार करायाते.
    पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
    धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
    सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
    कशी तूही मग मजमुळे भिकारी ?
    बालसरिताविधुवल्लरीसमान
    नशीबाची चढतीच तव कमान;
    नारिरत्‍ने नरवीर असामान्य
    याच येती उदयास मुलातून.
    भेट गंगायमुनास होय जेथे,
    सरस्वतिही असणार सहज तेथे;
    रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे,
    भाग्य निश्चित असणार ते अपेसे.
    नेत्रगोलातुन बालकिरण येती,
    नाच तेजाचा तव मुखी करीती;
    पाच माणिक आणखी हिरा मोती
    गडे ! नेत्रा तव लव न तुळो येती.
    लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
    त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
    तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
    उचंबळुनी लावण्य वर वहावे !
    गौरकृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
    छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या
    सवे घेउनि तनुवरी अद्‌भुतांचा
    खेळ चाले लघु रंगदेवतेचा !
    काय येथे भूषणे भूषवावे,
    विविध वसने वा अधिक शोभवावे ?
    दानसीमा हो जेथ निसर्गाची,
    काय महती त्या स्थली कृत्रिमाची !
    खरे सारे ! पण मूळ महामाया
    आदिपुरुषाची कामरूप जाया
    पहा नवलाई तिच्या आवडीची
    सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.
    त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे
    प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये;
    विश्वभूषण सौंदर्यलालसा ही
    असे मूळातचि, आज नवी नाही !
    नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
    सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
    तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
    विलासाची होशील मोगरी तू !
    तपःसिद्धीचा ’समय’ तपस्व्याचा,
    ’भोग’ भाग्याचा कुणा सभाग्याचा;
    पुण्यवंताचा ’स्वर्ग’ की, कुणाचा,
    ’मुकुट’ कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा.
    ’यशःश्री’ वा ही कुणा महात्म्याची,
    ’धार’ कोण्या रणधीर कट्यारीची;
    दिवसमासे घडवीतसे विधाता
    तुला पाहुन वाटते असे चित्ता !
    तुला घेइन पोलके मखमलीचे,
    कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे,
    हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
    परी आवरि हा प्रलय महाभारी !
    ढगे बळकट झाकोनि चंद्रिकेला,
    तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,
    हास्यलहरींनी फोडुनी कपाट
    प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट !
    प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे,
    कोड किंचित पुरविता न ये त्यांचे;
    तदा बापाचे ह्रदय कसे होते,
    न ये वदता, अनुभवि जाणती ते !
    माज धनिकाचा पडे फिका साचा,
    असा माझा अभिमान गरीबाचा
    प्राप्त होता परि हे असे प्रसंग
    ह्रदय होते हदरोनिया दुभंग !
    देव देतो सद्‌गुणी बालकांना
    काय म्हणुनी आम्हास करंट्याना ?
    लांब त्याच्या गावास जाउनीया
    गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !
    "गावि जातो," ऐकता त्याच काली
    पार बदलुनि ती बालसृष्टि गेली !
    गळा घालुनि करपाश रेशमाचा
    वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !
    नमस्ते मित्रांनो
    अनेकांची इच्छा होती की दादा तुमचे गीते आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे आहेत . त्यामुळे या चॅनल चा माध्यमातून आम्ही आपल्याला आमचे लिखित गीते पुरवणार आहोत ....
    आपल्या आवडी निवडी चे गीते आम्हाला स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकांवर sms द्वारे कळवू शकता , किव्वा या व्हिडिओ च्या comment मध्ये सुद्धा कळवू शकता .....
    धन्यवाद 🙏🏻

Komentáře • 6

  • @shobharaikar1273
    @shobharaikar1273 Před 2 měsíci +1

    ही कविता आजही माझी पाठ आहे

  • @latashelar1678
    @latashelar1678 Před měsícem +1

    मला ही कविता सहावीला होती. विटी दांडूचा खेळ मजेदार ही कविता ऐकवा सर.

  • @vikaskanhe
    @vikaskanhe Před rokem +3

    माझी खूप आवडती कविता आहे खूप छान

  • @shobharaikar1273
    @shobharaikar1273 Před 2 měsíci

    आमच्या वेळी फार सुंदर कविता असायच्या

  • @latashelar1678
    @latashelar1678 Před měsícem +1

    मला ही कविता सहावीला होती. विटी दांडूचा खेळ मजेदार ही कविता ऐकवाल का सर .

  • @vinitashinde8008
    @vinitashinde8008 Před rokem +1

    Khup sundar kavita aahe aani khup sundar gaylit