घरातील हे पदार्थ खाल्याने होतात १०० पेक्षा जास्त आजार कॅन्सर हार्ट अटॅक चे कारण

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 06. 2024
  • घरातील हे पदार्थ खाल्याने होतात १०० पेक्षा जास्त आजार कॅन्सर हार्ट अटॅक चे कारण
    विरुद्ध आहार लिस्ट मराठी || Incompatible Food Combinations List (Marathi)
    विरुद्ध आहार लिस्ट मराठी
    १. मासे खाल्ल्यानंतर चुकूनही दूध, दही, ताक सेवन करू नये. अंगावर कोड फुटतात.
    २. दुधासोबत खारट, आंबट, तिखट-मसालेदार पदार्थ खाऊ नये. अनेक त्वचा विकार (skin diseases) होतात, पोट साफ होतं नाही.
    ३. रात्रीच्या वेळी दही खाऊ नका. कफ दोष वाढून शरीरात अनेक आजार वाढू लागतात.
    ४. केळी आणि दही एकत्र खाणे टाळावे.
    ५. मध गरम करू नये किंवा कोणत्याही गरम पदार्थांत मिक्स करू नये.
    ६. काश्याच्या भांड्यात तूप १० दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेऊ नये.
    ७. मध व तूप एकमेकांच्या विरुद्ध आहार आहेत. त्यांचे एकत्रित सेवन करणे टाळावे.
    ८. शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. पोटात गॅस होतात, पातळ जुलाब लागतात.
    ९. चहा, कॉफी अशी गरम पेये प्यायल्यानंतर लगेच थंड पदार्थ खाऊ नयेत.
    १०. मांसाहार केल्यानंतर किमान ४-५ तास दूध घेऊ नये.
    ११. नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर आंघोळ करू नये. खाल्लेले व्यवस्थित पचतं नाही.
    १२. आंबा वगळता दूध कोणत्याही फळांसोबत मिक्स करू नये.
    १३. कुळीथ (हुलगा), उडीद, पावटा, कच्चा मुळा यांच्यासोबत दूध घेतल्याने कुष्ठरोग होण्याचा धोका वाढतो.
    १४. दुधासोबत हिंग, खिचडी खाऊ नये.
    १५. गूळ आणि मध एकत्र खाऊ नये.
    १६. तेलकट, तुपकट किंवा आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही थंड पदार्थ खाऊ नये. चिकट कफ तयार होऊन घसा बसतो.
    १७. दही कधीही गरम करू नये किंवा गरम पदार्थांमध्ये मिक्स करू नये.
    शरीरात कॅल्शियम वाढविण्यासाठी कोणकोणते पदार्थ खावेत? हे जाणून घ्यायचे असेल, तर कमेन्ट मध्ये “कॅल्शियम” असे नक्की लिहा.
    “विरुद्ध आहार” हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर LIKE, SHARE व SUBSCRIBE नक्की करा.

Komentáře •