40.Narmada Prikrama with Prashant Mane/नर्मदा परिक्रमा प्रशांत माने सोबत : आश्रमात परिक्रमावासी असे.

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 05. 2022
  • परिक्रमा करणारे परिक्रमा वासी बहूतेक वेळा आश्रमात गेल्यावर आपण परिक्रमा करतोय म्हणजेच त्या आश्रमातील सेवा करणा-या लोकांवर जणू काही उपकार करतोय असे वागताना मला आढळले. त्याचे वाईटही वाटले.
    आश्रम हा दानावर चालतो. तो चालवण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात.ते आपल्याला दिसत नाहीत.
    मी काही मदत करु का? हे एक वाक्य आश्रमातील व्यक्तींना उर्जा/बळ देण्यासाठी पुरेसं असतं.
    आजकाल बरेच आश्रम परिक्रमा वासियांना तयार भोजन देतात. पुर्वी सदाव्रत दिले जायचे. तसेच ग्रहित धरुन थोडीफार मदत केली तर त्यांना किती बरे वाटेल?
    सेवा नाही तर नाही निदान त्रास होईल असे वागणे टाळले तरीही पुष्कळ आहे.
    हे या भागात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
    या व्यतिरिक्त दिवसभरात आणखी काय काय घडले हे सर्व या भागात सांगितले आहे.
    माझा संपर्क नंबर व व्हाॅट्स ॲप नंबर ९७३०३०५४५७ आहे जर फोन उचलला गेला नाही तर मेसेज करुन ठेवावा म्हणजे मी तुम्हाला परत फोन करु शकतो.

Komentáře • 166

  • @dineshshingare9170
    @dineshshingare9170 Před 2 lety +11

    🚩🙏🌺 नर्मदे हर हर 🌼🙏🚩🚩महाराट्राच्या परिक्रमा वाशी यांच्या कडून आश्रमातील व वाटेतील गांवातील मंडळी यांच्या तक्रारी आहेतच आपण सांगितले ते बरोबर आहे. ईतरानी बोध घ्यावा हि नम्र विनंती🙏

  • @nalinirasal8036
    @nalinirasal8036 Před rokem

    नर्मदे हर सुंदर अनुभव आहेत भारतीयांना शिस्त लागण्यासाठी किती काळ लागेल राम जाने. असो आपणा सर्वांना शुभ स्वास्थ्य कल्याण असो.

  • @dilipbhutada5708
    @dilipbhutada5708 Před 8 měsíci

    विचार पटले. नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर

  • @user-kb6yk9pz5f
    @user-kb6yk9pz5f Před 2 lety +3

    बाबाजी लॉ मध्ये गोल्ड मेडल मिळविलेले आहेत...
    आम्हाला संकष्टी असल्याने छान व भरपूर खिचडी व मठ्ठा दिला होता त्याची आठवण झाली...
    मराठीत संभाषण आणि स्वामी महाराज बघून अतिव समाधान लाभले...
    नर्मदे हर....

  • @nehachavan5937
    @nehachavan5937 Před 11 měsíci

    Mast sangitle anubhav, marathi lokani niyam v tal tantra bagun vagayala pahije Narmade har नर्मदे हर् chaan.

  • @varshalatkar3911
    @varshalatkar3911 Před 2 lety +4

    खूपच सुंदर! Unmeshanand महाराज कोल्हापूरचे असून त्यांचे शिक्षण सातारा, सांगली,पुणे,बारामती ,मुंबई येथे झाले आहे. त्यामुळे ते सर्वांना आपलेच वाटतात.

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      ✅ माऊली,
      खुपच उमदे व्यक्तीमत्व.
      🙏 नर्मदे हर 🙏

  • @kalpanakshatriya4244
    @kalpanakshatriya4244 Před 2 lety +1

    नर्मदा परिक्रमा ला जाण्या अगोदर असे अनेक व्हिडीओ पाहून जावे म्हणजे कसे वर्तन करावे हे सर्वांना कळेल.बऱ्याचं जणांना अध्यात्म म्हणजे काय हेच माहित नाही.फक्त एन्जॉय करायला प्रत्येक ठिकाणी जातात.काहींच्या तोंडात तर अपशब्द ही खूप येतात.जेव्हा त्यांना सांगितले कि थोड कळत सुद्दा..नर्मदे हर..🙏🏻🙏🏻🚩

  • @user-en6hl6qf7s
    @user-en6hl6qf7s Před 11 měsíci

    अतिशय छान माहिती दिली नर्मदे हर

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 Před 2 lety +2

    सद्गुरू कृपेने मैयेने माझी परिक्रमा पूर्ण करून घेतली. दुर्दैवाने, परिक्रमावासींचे एकंदरीत attitude असेच आहे असे मलाही ध्यानात आलंय. कृपया, पुण्य कमवायला , केवळ सगळे करतात म्हणून , मज्जा म्हणून परिक्रमा करू नका. काठावर स्वस्थ बसा, मैया बघा, तिचे सुख - दुःख जाणून घ्या. नसत्या अपेक्षा ठेऊन केवळ फिरू नका. केवल आनंद घ्या .... 🙏🇮🇳🚩 नर्मदे हर 🙏🚩

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 Před 2 lety +4

    आपण आपल्या परिक्रमेतील अनुभव उत्तम रितीने कथन करीत आहात नर्मदे हर

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      🙏 नर्मदे हर 🙏

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      माऊली,
      जे काही करतो आहे ते मैय्या करवून घेते आहे.🙏

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 Před 2 lety

      मी बोलू शकेन तुमच्या शी

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      @@rohineematange2446 नक्कीच. का नाही? फोन उचलला गेला नाही तर मेसेज करुन ठेवावा म्हणजे मी तुम्हाला परत फोन करु शकतो.
      🙏 नर्मदे हर 🙏

  • @shobhatilekar1637
    @shobhatilekar1637 Před rokem

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @prssd72
    @prssd72 Před 2 lety +3

    🙏नर्मदे हर🙏
    मी पण इथं थांबलो होतो...
    इथून नर्मदा मैय्येच खूप सुंदर अर्धचंद्राकृती दर्शन होते !
    खूपच छान सेवा व स्वामी समर्थ आश्रम....!
    इथले स्वामी उन्मेशानंद महाराज कोल्हापूरचे आहेत असे मला म्हणाले होते असे आठवते 🙏

  • @madhavrao1745
    @madhavrao1745 Před 2 lety +4

    I am following your channel for past few days. I liked your presentation nd inspiring thoughts. As said it is not Marathi people's attitude But generally found in all Indians. I will share my experience in a trekking programme some 30yrs back. In the afternoon in the summer we took rest under a small hut. A lady came from far away nd offered water nd gud. I enquired from where she brings water. She told that she has to walk for 1hour daily. Still one of my friends wasted water by pouring it on his head nd face. My observation is we from city are a pampered lot.

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety +3

      माऊली,
      जसे की मी मराठीत बोललो आहे आणि म्हणून केवळ महाराष्ट्रीन लोक मला बघत आहेत/ वाचत आहेत म्हणून मी महाराष्ट्र म्हंटले.
      आपण म्हणत आहात ते बरोबरच आहे. मध्यप्रदेशातील परिक्रमा वासी पण वाईट वागतात हे पण मी पाहिले आहे.
      पण पहिल्यांदा आपण व आपले घर सुधारुया या धारणेनी हे सांगितले आहे.
      🙏 नर्मदे हर 🙏

    • @gajananpandit7961
      @gajananpandit7961 Před rokem

      ​@@Prashant_Mane❤❤❤

  • @AB-bn2ig
    @AB-bn2ig Před 2 lety +1

    नर्मदे हर बाबा जी, मी याच वर्षी परिक्रमा केली आणि हाच अनुभव आला, जरा सखोल अभ्यास केल्या वर काही बाबी निदर्शनास आल्या, सकाळी 3.30 ते 4 ला चालायला सुरवात करणे आणि सूर्यास्ता नंतर आश्रमात येणे, ज्या मुळे आश्रमधारीना नियोजन करता येत नाही, भोजना बद्दल उलट सुलट बोलणे, आणि कुठल्या ही करणा साठी वाद घालत बसणे, मी ह्याचा पदो पदी अनुभव घेतला आहे, आपण परिक्रमेत आहोत, आपल्या घरी नाही, घरी पण आपले हट्ट सारखे पूरवले जात नाहीत, खुप काही सांगता येईल पण वरील ठळक गोष्ठीचा आपण विचार करायला हवा, नर्मदे हर

  • @sudhakarmandrekar9828
    @sudhakarmandrekar9828 Před 2 lety +1

    क्या बात है! सेवा भाव हा असावाच लागतो. जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर.

  • @ravindrasinhrajput9434

    चांगलं अथवा वाईट वर्तन संस्कार दर्शवतात .आईवडील किंवा गुरूचे !

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Před 2 lety +1

    नर्मदे हर जिंदगी भर

  • @sureshkulkarni7988
    @sureshkulkarni7988 Před 2 lety

    फार सुंदर शब्दाकन आहे. नरमदे हर. या

  • @ajaykale6344
    @ajaykale6344 Před 2 lety +1

    . ||शुभ्ं भवतू||
    🚩🚩🚩
    बंधू प्रशांतराजे,
    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
    या भागात तुम्ही आपल्या भावना, उद्वेग आणि अपेक्षा रास्त रित्या मांडल्यात...
    हे नक्कीच स्पृहणिय आहे...
    आपली तगमग होणे, साहजिकच आहे... असे प्रकार पाहून मनाला खूप यातना होतात...
    असो...
    मानवी स्वभावांचे आणि कर्मांचे हेही पैलू परिक्रमेत पहायला आढळतात...
    त्यामूळे परिक्रमा अधिकाधिक सर्वव्यापक होतीय असे आपण आपल्या मनाला समजावयाचे...
    ||नर्मदे हर||
    ⚜️⚜️⚜️

  • @rudravader908
    @rudravader908 Před 2 lety

    बहूत बडीया माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajukhadakban9912
    @rajukhadakban9912 Před rokem

    नर्मदे हर

  • @sudiphunnur5502
    @sudiphunnur5502 Před 2 lety

    जबरदस्त आणभव 🙏

  • @mohandol7896
    @mohandol7896 Před rokem

    Good mr mane ,from pune

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Před 2 lety +1

    नर्मदे हर 🌹🌹🙏🙏💐💐👌👌👌

  • @sanjaykatdare4081
    @sanjaykatdare4081 Před 2 lety

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर..🌺🌺

  • @suhasgodbole1590
    @suhasgodbole1590 Před 2 lety

    ॥ ॐ राम कृष्ण हरी ॥🌷🌺🌷🙏
    ॥ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ॥🌷🌺🌷🙏

  • @chandrakantkulkarni1920

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
    नमस्कार
    मी आपले आजपर्यंतचे सर्व श्रवणीय व्हिडिओ ऐकलेले आहेत.आपण ज्या भक्तिभावाने परिक्रमेतील अनुभव /प्रचिती कथन करीत आमचीही त्याक्रमाने परिक्रमा घडवून आणत आहात याबद्दल शतशः धन्यवाद.हा कथनाचा उपक्रम असाच तपशीलवार सुरू राहू दे.आपली प्रत्यक्ष भेट घेण्याची इच्छा आहे.नर्मदामाता ती पूर्ण करीलच.आपणास हार्दिक शुभेच्छा.
    जय भोलेनाथ

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 Před 2 lety

    स्वामी जी खुप प्रेमळ व सेवाभावी आहेत.

  • @dineshshingare9170
    @dineshshingare9170 Před 2 lety

    या आश्रमाचे ऊन्मेशानंदमहाराज हे कोल्हापूरचे आहेत . 🙏🚩🌼नर्मदे हर हर🌹🚩🙏

  • @shubhamkoli7725
    @shubhamkoli7725 Před 8 měsíci

    आनुगोरा जनकेशवर शिवलिंग आहे आश्रमाच्या खाली आपणं तिकढंण येतं असताना आपलं लक्ष वेधून घेत ते शिवलिंग

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 Před rokem

    🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 Před 2 lety

    कित्येक महाराष्ट्रीयन परिक्रमा वासी परिक्रमा ही पर्यटन समजून करतात.मैयाची इच्छा.नर्मदे हर.

  • @sashikantsonawane4826
    @sashikantsonawane4826 Před 2 lety

    नर्मदे हर🙏🙏

  • @sunildeshpande9594
    @sunildeshpande9594 Před 2 lety

    🙏 नर्मदे हर

  • @rudravader908
    @rudravader908 Před 2 lety

    ॥नर्मदे हर ॥

  • @ganeshnamekar4775
    @ganeshnamekar4775 Před 2 lety

    मी pan yethe thambalo होतो khup sundar ashram आहे तिथे far prachin pimplache vruksh आहे तसेच chotya chotya chan sunder कुटी banavalale ahet bagichya pan chan ahe

  • @user-eq1nb8hs8h
    @user-eq1nb8hs8h Před 2 lety +4

    माझी परिक्रमा नाही झाली ,परंतु वैराग्यभाव कसा निर्माण होईल याचा आजपासुनच प्रयत्न करतो आहे.
    🔱नर्मदे हर🌼

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      🙏 नर्मदे हर 🙏

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 Před 2 lety

      वैराग्य येण्या साठी पूर्ण उपभोग ही घेतले ला हवा

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      @@4in1kkkk78 🙏 नर्मदे हर 🙏

    • @dvp322
      @dvp322 Před 2 lety

      🙏 नर्मदे हर 🙏 वैराग्य येण्यासाठी किमान दोन तिनदा परिक्रमा व्हावयास पाहिजेत. त्यानंतर ती वैराग्या कडे वळते असे मी पुस्तकात वाचले आहे.

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      @@dvp322 आपण हा प्रश्न प्रश्नोत्तराच्या भागात घेऊया.
      🙏 नर्मदे हर 🙏

  • @dvp322
    @dvp322 Před 2 lety

    🙏 नर्मदे हर 🙏

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 Před 2 lety

    नर्मदे हर !!!

  • @seemapatharkar6341
    @seemapatharkar6341 Před 2 lety

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🌹🙏🌹

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 Před 2 lety

    अतिशय सुंदर अनुभव आहे छानच वाटत होते ऐकायला मन प्रसन्न झाले नर्मदे हर हर 🙏🙏

  • @sulit584
    @sulit584 Před 10 měsíci

    Narmade Har

  • @bhanudasalhat5738
    @bhanudasalhat5738 Před 10 měsíci

    chan

  • @shashikantshegaonkar6256

    👌

  • @ajaypol6612
    @ajaypol6612 Před 2 lety

    Narmade Har Har 🙏 🙏

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 Před 2 lety

    Narmade har 🙏🙏🙏🚩

  • @sudhakarmandrekar9828
    @sudhakarmandrekar9828 Před 2 lety +1

    सेवाभाव, परिपुर्ण गुरुंच आज्ञापालन आणि अखंड सेवामावाने आध्यात्मिक प्रगती गुरुंच्या इच्छेनेच होत राहते.
    By offering pure services to Sadguru, Following Pure Gurus Orders will make any one Spiritually progressed.

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      हरि ॐ तत्सत् 🙏
      🙏 नर्मदे हर 🙏

  • @gopinathraval2932
    @gopinathraval2932 Před 2 lety

    आपण सांगीतलेला भाग ऐकूण नर्मदा परिक्रमेचीओढ मनात निर्माण झाली!82 वर्षाचे वयात कसे शक्य होईल!ही शंकाही तीतकीच खरी! भाग्याचा आंदाज नाही!पण मनात ओढ आहे!चारचाकी आहे!
    पण मनाला पोखरतोय!
    एक वेळ सवडीने संपर्क करन्याची/होन्याचीईच्छा आहे!नर्मदे हर!जय भिमाशंकर!

  • @solelysoul8543
    @solelysoul8543 Před 2 lety

    Narmadee Haar.

  • @vijaydhane7057
    @vijaydhane7057 Před 2 lety +1

    true

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 Před 2 lety

    नर्मदे हर. 🙏

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      🙏 नर्मदे हर 🙏

    • @sangitakalbhor8252
      @sangitakalbhor8252 Před 2 lety

      आपण आपल्या परिक्रमेतील अनुभव एकदम उत्तम प्रकारे मांडली कीअस वाटतं होते की आपणच प्रत्यक्ष परिक्रमा करत आहोत 🙏👌👌

    • @sangitakalbhor8252
      @sangitakalbhor8252 Před 2 lety

      🙏नर्मदे हर🙏

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      @@sangitakalbhor8252 माऊली,
      मी काहीच करत नाही. जे काही मांडतो ते मैय्या करवून घेते.
      🙏 नर्मदे हर 🙏

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 Před 5 měsíci

    हाच हेतू असू शकतो.

  • @dhanajiardalkar6832
    @dhanajiardalkar6832 Před 2 lety

    बाबाजी नर्मदे हर . महाराष्ट्रातील सर्व परिक्रमावाशी यांना नम्र विनंती कि त्यांनी कोणालाही न दुखवता चांगल्या पद्धतीने परिक्रमा करावी . जेणे करून . पुढे परिक्रमा करु इच्छिणाऱ्या साधकांना त्रास न होईल

  • @sanjaydarade1606
    @sanjaydarade1606 Před rokem

    अश्या बाबी विस्तृत प्रसिद्धी देऊन आदर्शवत आचार संहिता कशी अमलबजावणी करणे बंधन कारक करणे आवश्यक आहे

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 Před 2 lety +1

    गुरुजी, मला पण अशाच अन्य पवित्र स्थानी हा अनुभव आलेला आहे की त्या स्थानावर जे महान सत्पुरुष होऊन गेले किंवा त्यांच्या दैवी अनुसंधानाने आज कोणी सत्पुरुष व्यवस्था चालवत आहेत, त्यांच्या उदात्त, विश्वकल्याणाच्या आर्ततेची कणभरही जाणीव नाकारून काही व्यक्ती या चिंतनाला सोडून नको त्या विषयांच्या जंजाळात भरकटूं लागतात व कलहाच्या आवडीने विकृत रीतीने वागत रहातात व अकारण वातावरणातील पावित्र्य घालवत रहातात. तेव्हां मला आश्चर्य वाटतं कीं ही काय यांची विकृत बुद्धी..? स्वतः कामधेनू दूध पाजायला आली आहे आणि ह्यांना आवड कसली तर सैतानी कलहाच्या नशाबाजीची... 😢 वाईट वाटतं की अशा
    लोकांमुळे साधनेत मन रमवणं कठीण होतं.... पण तरी श्रीसद्गुरुकृपेवर भिस्त ठेवतां मार्ग काढता येतो... तरी हे सर्व गूढ वाटतं की अशी माणसं कशाला अशा ठिकाणी येतात.
    🙏🏼ॐ श्रीसद्गुरुनाथायनमः🙏🏼

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      माऊली,
      मला असे वाटते की "परमेश्वर स्वतःवर कोणताही दोष येऊ देत नाही" या वाक्याला जर बरोबर म्हंटले तर तो अशा व्यक्तींना असे वागू देतो व योग्य वेळी बरोब्बर तुम्ही काय केलेत/कसे वागलात याची आठवण करुन देऊन शिक्षा देतो.
      🙏 नर्मदे हर 🙏

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 Před 2 lety

      @@Prashant_Mane 🙏🏼🙏🏼🙏🏼🚩

  • @uttamchougale8588
    @uttamchougale8588 Před 2 lety +1

    नर्मदा परिक्रमा केली की प्रत्येक जण युटुबवर चेनल काढतो व बिझनेस चा प्रयत्न करतो

  • @malini7639
    @malini7639 Před 2 lety

    नर्मदे हर ओम नमो शिवाय श्री स्वामी समर्थ . त्या स्वामीजींन विषयी व शिवपिंड विषयी पण तुम्ही काहीच सांगितले नाही .

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      🙏 नर्मदे हर 🙏

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      🙏 मी सखोल काहीही सांगितले/सांगणार नाही. तशी आज्ञा नाही.
      🙏 नर्मदे हर 🙏

  • @uttamchougale8588
    @uttamchougale8588 Před 2 lety +1

    मराठी लोकांविषयी बोलला आणि सर्वांना दोष लावला आणि मार्गदर्शन करुन गुरु झाला पण हे इथे बोलण्यापेक्षा त्यालोकाना बोलला का. चुका ज्याच्या त्याला सांगा तर त्याचा उपयोग होईल.

  • @shirishkavathekar3596
    @shirishkavathekar3596 Před 4 měsíci

    मराठी माणसांना इतके दोष देऊ नका. सर्व राज्यातील लोकांची हीच मानसिकता असते फक्त आपणास ती दिसली/जाणवली नाही कारण त्यांची भाषा आपणास समजत नाही. नुसती नावे ठेऊ नये. नर्मदा परिक्रमेत ही माहिती विनाकारण publish करीत आहात असे वाटते.

  • @sasodekar
    @sasodekar Před 2 lety

    czcams.com/video/OgtW3d-ds4g/video.html&lc=UgxXPbVAUOsFGNMDrEJ4AaABAg.9cmjRJI0PNP9ctDQWKOAOa Narmade Har, Ya video madhye suddha kaahi nirikshan khup parkhad pane mandaleli aahet. Krupaya Pahave. Narmade Har.

  • @infinity6246
    @infinity6246 Před rokem

    Narmade Her! 🙏🏼🙏🏼 Maharashtriy log...ashi survat karat ...aise hote hai...vaise hote hai....1) Bahot bhagte hai....
    2) Khud bhojan pakane me aalas karte hai
    3) Expectations jyada rakhte hai
    4) Bahut sare Maharashtriy log kahin bhi gandgi kar dete hai
    ...(mhanje toilet kuthehi kartat)
    Ase khup kahi aikla ahe tithe! 🤦🙆

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Před 2 lety +1

    तुमच्याशी मी सहमत आहे परंतू महाराष्ट्रातले येतात ते मला अनूभव आला दृष्टांत झाला हे यु ट्यूबवर दाखवत बसतात हे ईतके प्यूण्यवान आहेत का? दूसरं आसं की जे मनापासून परीक्रमा करतात त्यांना आपला मोठेपणा जाहीर करायची आवश्यकता का आहे? आपण परीक्रमा करता ते नर्मदे माईवर उपकार करता का?हे आपल्या बद्दल मत नाही.महाराष्ट्रातील लोकांचं प्रसिद्धी मिळाली की पोट भरत ते या साठी करतात भाव नाही तिथे......प्रसिद्धी हाव.

  • @sunilpansare4268
    @sunilpansare4268 Před 2 lety

    🙏🌹नर्मदे हर...
    अगदी छान
    हेही वाचा
    czcams.com/video/OgtW3d-ds4g/video.html

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 Před 5 měsíci

    महाराज, तुम्ही मराठी माणसा बाबत सांगितलेला अनुभव अन्य vidio मधूनही ऐकायला मिळाला. वाईट वाटले. पण maharastrian म्हणुन पाणी वापराबाबत तुम्ही त्यांना नम्र पणे सांगू शकले असतात. त्यात जाणीव करून देणे हा हा 4:37

  • @chandrakantsupekar999
    @chandrakantsupekar999 Před 2 lety

    Narmade har

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 Před 2 lety

    मराठी मानुस ताठ ------- चा 😆😆😆

  • @harshadmehta253
    @harshadmehta253 Před 2 lety

    नर्मदे हर🙏🙏

  • @madhavsatpute9495
    @madhavsatpute9495 Před rokem

    Narmade Har

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 Před 2 lety

    नर्मदे हर

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 Před 2 lety

    नर्मदे हर

  • @atulkhiste9345
    @atulkhiste9345 Před 2 lety

    नर्मदे हर

  • @ishwarjagtap378
    @ishwarjagtap378 Před 2 lety

    नर्मदे हर