म्हातारपणी वाटते...मरण चांगले यावे

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2023
  • म्हातारपणी वाटते...मरण चांगले यावे
    #म्हातारपणी वाटते
    #afterage60
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

Komentáře • 133

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 Před 2 měsíci +1

    तुम्ही एक महत्त्वाचा विषय हाताळला आहात

  • @satishtamhane5523
    @satishtamhane5523 Před rokem +3

    सुंदर कथा. मी बडौदाला रहातो, माझे आईवडील पण बडौदा रहातात, त्याच वात्स्तवय आमच्या मुळ घरी माझ्या लहानया भावा बरोबर असायच. वडील गेल्यानंतर मी आईला माझ्या घरी घेउन आलो. काही काळानंतर ती आजारी पडली, ती सीरियस झाली, तिच एक च म्हणण मला माझ्या मुळ घरी घेऊन जा. डॉक्टरने hopes सोडल्यास आईला मुळ घरी नेले आणि दोन दिवसात वारली.
    मला वाटत म्हातारपणी जेथे दीर्घकालीन संसार थाटले असेल तेथे रहाण्यास इच्छा असते.

  • @sanjeevdalvi5578
    @sanjeevdalvi5578 Před rokem +9

    फार छान विषय होता. जीवनातील कटू सत्य.हल्ली माणसे एकमेकांशी बोलायला येत नाही तिथे भेटायला कोण येणार. परिस्थिती स्वीकारली की त्रास होत नाही.

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 Před rokem +22

    नमस्कार. छान बोधप्रध विडिओ. माझी आई लग्न झाल्यावर 1949 साली गावाकडून मुंबईत आली आणि आता 17 एप्रिल 23 ला वयाच्या 94 व्या वर्षी मुंबईत माझ्या घरी अलझायमर ह्या आजारात, शेवटचं 1 वर्ष बिचान्यात पडून वारली. ती मला ओळखू शकत नव्हती पण ती दिवसातून अनेकदा म्हणायची चल गावाला जाऊया. मी म्हणायचो चल उठ घे तुझं लुगडं चोळी, ती उठायचा प्रयत्न करायची, जमेनास व्हायचं. मग म्हणायची, मला उठता येत नाही तर चालू कशी, नको जायला गावाला, मी बरी झाली की जाऊ. कधी ती प्रचंड बडबड करीत राही आणि कधी झोपून राही. भेटायला बरेच नातेवाईक येत पण ती कोणाला ओळखत नसे. पण एक प्रश्न त्याला विचारी, तु कसा आहेस, बायको कशी आहे, मूल किती? मला ती विचारी तुझी आई कुठे असते, शेती किती आहे, काय पेरलंय, पीक कस आहे. मी उत्तर दिल तरी दोन मिनटात पुन्हा तेच प्रश्न तीच उत्तर. तिला दिवसा एक व रात्री एक असे दोन diapher लावत असू. ती विष्टा करी, आणि त्याचे गोळे करून बिचान्यात घरभर फेकी. वास आला की आम्ही पहिला diapher बदलत असू, मग वासावरून विष्टेचा गोळा शोधून टॉयलेट मध्ये टाकत असू. असं वर्षभर चाललं. आता ती नाही पण तिचे आमच्यासाठी घेतलेले कष्ट आणि निरक्षर असून आमच्या कुटुंबासाठी केलेलं कार्य आठवत. अंत्ययात्रेला बरेच नातेवाईक आले, पण तिरडी कशी बांधतात, काय विधी करतात, कोणालाच माहित नव्हतं, मग सुखात्म अंतिम संस्कार ह्यांना फोन केला, त्यांनी ऍम्ब्युलन्स आणि चार जाणकार पाठविले. सगळे विधी रीतसर झाले, मनाला शांती मिळाली. हल्ली कोणी कोणाकडे जात नाही. कोणी मेल तरी वेळ नाही हे कारण सर्रास. ते स्वतः तशी वेळ आली तर.... ह्याचा विचार करत नाहीत, हे दुःख आहे. दुसर हिंदुत घरातल कोणी मेल तर नातेवाईक त्यांना जमेल तस भेटायला येतात. त्या घरातील माणसानी पुन्हा पुन्हा तेच सांगायचं आणि रडायचं. नाही रडलं तर बोंब आम्ही भेटायला गेलो, कोणीही रडलं नाही, कसलं आलंय त्यांना दुःख? मला सांगा, वेळ जाईल तस दुःख रडणं कमी होत, हे नैसर्गिक पण भेटणारा ते लक्षात घेत नाही. आपण प्रथा बदलून मृत्यू नंतर दुसरा दिवस अस्थी गोळा करने व चौथा दिवस एका ठराविक वेळी, सर्वानी भेटून प्रार्थना करणे ह्यासाठी ठेवला तर बरे होईल. तस सिंधी आणि जैन लोक आजही करतात आपण अनुकरण केल तर?🙏

    • @nayanarathod8932
      @nayanarathod8932 Před rokem

      तुमी खरच श्रवण सारख आई ला संभाळलें...अश मुल आता खूप कमी झाले आहे..जे आई बाबा चे मन समजत..त्यालां जवळ ठेवतात काळजी घेतातं...🙏🙏 नाहीतर हे आजार झाला वर..आपले मुल सून मुली..नातेवाईके कंटाळतात...तुमाला खूप आशी्वाद मिळेलं...आमी बघा दोन मुल होते..ऐक वारला..😢 दुसरा लग्न झालं नी वेगळा राहायला लांगला...ते पण काही नाही..पर आमाला भेंटायलां येत नाही बोलत नाही..बघत नाही..आमालां तीचा करना काही नको ..आमचा घर आहे...पेंशन आहे आमाला पूरत...फक्त आमाला हे च हव की ते येवुन आमाला मिळुन जा ..बोलुन जा..तीला छोट बाळ पण आहे..तीला बघायच तीचा बरोबर खेळावा अश वांटते..पत संगळे संबध तूटले अश बोलतो आणी ऐक शहेरात असून ..आमी ऐकटं राहते...अश नसीब देवा कोणाचा पण असु नये...🙏🙏😭😭

    • @sarithau7628
      @sarithau7628 Před rokem

      heart touching

    • @poojamhalaskar4366
      @poojamhalaskar4366 Před rokem

      Heart touching

    • @sheetalmestry382
      @sheetalmestry382 Před měsícem

      तुमचे म्हणणे मला पटले,एक दिवस ठरवून सर्वांनी
      भेटायला यावे.

  • @user-up4jp9xm2e
    @user-up4jp9xm2e Před rokem +7

    त्या बाईंचे बरोबर आहे.इथे भेटीचे महत्व आहे.सगळ्या नात्यांचे पदर आहेत वेगवेगळे.प्रेमाचे वेगळे धागे आहेत प्रत्येकाचे.खरच माणसं गेल्यावर माणसे एकत्र येतात थोडा वेळ तरी. गेलेल्यांच्या आठवणी जागवतात.त्याच्या कामाचे मोठेपण सांगतात.त्याच्याबद्दल त्यांना आजपर्यंत जाणवलेल्या चांगल्याच गोष्टी सांगतात.त्याच्या जाण्याचे चांगल्या अर्थाने मोल करतात जे शब्दात सांगणे अवघड आहे.आणि जो जिव्हाळा माणसाला अपेक्षित आहे तो खरच तेंव्हा थोडातरी जाणवतो.लोक हळवे होतात.थोडीतरी आपल्या
    मुखवतट्यातून बाहेर येतात.गेलेल्याला अर्थात हे जाणवत नसले तरी जिवंतपणी तो ya सगळ्याची एक कल्पना मनात करत असतो आणि हे सगळे फक्त आपल्या aolkhichya जगातच घडणार आहे हे त्याला माहीत असते म्हणून अनोळखी ठिकाणी त्याला बेवारस मरण नको वाटते असे मला वाटते.

  • @vasudevkulkarni666
    @vasudevkulkarni666 Před rokem +2

    डाॅ . खुपच मनाला भिडणारी गोष्ट सांगीतली मन भरून आले तुम्ही जेंव्हा बोलता‌ तेव्हा सारखे ऐकतच राहवेआशे वाटते तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @dilipbhide7089
    @dilipbhide7089 Před rokem +5

    घरोघरी ....हे असंच आहे.नाईलाज आहे.नाईलाज अर्थातच सगळ्यांचाच.

  • @sudhakardamle7849
    @sudhakardamle7849 Před rokem +8

    सरकारने स्वेच्छा मरणाला परवानगी द्यावी.

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 Před rokem +3

    मुलाच्या आईची आपल्या देशात येवुनच मरणाची गाेष्ट आपण फार चांगली ऐकवली आभारी आहे सध्या माणसाचे आयुष्य फार वाढले आहे व नंतर ते कंटाळवाणे हाेते

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 Před rokem +2

    खरंच आहे. अहो गावातल्याच मुलीकडे रहायला आलेली आई सारखी तिला म्हणत असते की मला मुलाकडे नेऊन सोड. कारण तेच घर तिला आपलं वाटत असतं आणि तिचं जे काही व्हायचं असेल ते तिथं होऊ दे. तुमचा विडिओ अगदी खरा वाटला. 🙏

  • @sindhudeshpande1784
    @sindhudeshpande1784 Před rokem +3

    खूप छान सांगितली गोष्ट असे मरण येणार हे समजले आणि घडले यासाठी पुण्यायी लागते

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Před rokem +12

    अनघाताई आजचा विषय ह्रदयाला स्पर्श करून गेला,तुम्ही छान मुद्दे मांडले आहेत. मुलं नोकरीनिमित्त परदेशात असतात तेव्हा वयस्कर लोकांचे प्रश्न खरंच गंभीर असतात
    नाईलाजाने केअरटेकर ठेवायला लागतो, खुप वेळा केअर टैकर चांगले असतात,ती काळाची गरजही आहे,पण एकुण सध्याची
    परीस्थिती बघीतली तर हिंडतो फिरतं असतानाच मरण यावं असं वाटतं पण ते आपल्या हातात नाही हेच खरं
    आज तुम्ही"वारल्यानंतर,/गेल्यावर" असे शब्द वापरले ते ऐकायला बरे वाटले.

  • @priyashikhare8055
    @priyashikhare8055 Před rokem +2

    खरेच आज तुम्ही भाऊक झालात. पण हा चांगला विषय शेअर केलात धन्यवाद.

  • @akshatatondwalkar1995
    @akshatatondwalkar1995 Před 3 měsíci

    खूप छान. असे नवीन subject ऐकावेसे वाटतात. मन भरून येते.

  • @mangalaparekar2990
    @mangalaparekar2990 Před rokem +1

    मॅडम खुप चांगला विषय मांडला सत्य परिस्थितीत आहे ती तुम्हि मांडली धन्यवाद

  • @pradeepkulkarni1536
    @pradeepkulkarni1536 Před rokem

    khup khup chhan. ek uttam ghatana eikavalya baddal tumche khup kautuk.

  • @user-se3zj2op2u
    @user-se3zj2op2u Před rokem +1

    आपण सद्य परिस्थिती चे वर्णन खुप छान केले डाॅ मेम

  • @pushpanandanwar6436
    @pushpanandanwar6436 Před rokem +1

    विषय खुपच छान मांडता मनाला खूप भिडतं

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Před 11 měsíci

    डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप छान विषयावर बोललात शेवटि प्रतेकाची ईच्छा असते मला माझ्या घरीच मरण यावे आपली माणसे नातेवाईक शेजारी जवळ्चे असावेत छान वाटला व्हिडिओ आवडला शुभ संध्याकाळ धन्यवाद

  • @mangalabhat9706
    @mangalabhat9706 Před rokem +2

    तुम्ही खूप छान विषयावर बोललात ताई खरचं आहे आज काल मुले बहुतेक बाहेरगावी असतात मग इथे आई बाबा नी लावारिस असल्या प्रमाणे मरायचे

  • @shobhakhalokar2985
    @shobhakhalokar2985 Před rokem

    ❤ खुप स्पष्ट आणि अगदी ह्रदयस्पर्शी अगदीच खर

  • @vrushalibaji-er2lo
    @vrushalibaji-er2lo Před rokem +1

    खूपच छान मांडवात विषय

  • @mugdhagokhale4134
    @mugdhagokhale4134 Před rokem +2

    Wa Madam,khup vegala Ani changala vichar mandala ahe tumhi.Dolyat Pani ale kharach.

  • @shruti609
    @shruti609 Před rokem +1

    Khup sundar bhavnatmak samvedanshil vishay mandla

  • @raghunair3549
    @raghunair3549 Před rokem +2

    Very nice and touching. Do post such motivational video.

  • @shubhadaghosalkar1684
    @shubhadaghosalkar1684 Před rokem +5

    आजचा विषय हा वास्तविकता सांगणारा होता... उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याची सध्या फॅशन झाली आहे.... Prestige issue झाला आहे. ही पालकांची जी स्पर्धा चालू आहे त्यातून हे असे प्रश्न उद्भवत आहेत. लोकांनी मोठे मोठे पॅकेज बघुन मुलांना परदेशी पाठवणे कमी केले पाहिजे. त्यात सध्या पुर्वी सारखी जास्त अपत्ये नसतात. एखाद दुसरं मुल असतं... त्यात त्याच्या मनात परदेशाचे आकर्षक आपण पालकच निर्माण करीत असतो..... हे आधी कुठेतरी थांबलं पाहिजे.... तरच पुढे जन्माला आल्या नंतरच्या या अंतिम सोहळ्यात जवळच्या व्यक्तींचा सहभाग लाभेल..... अनघा ताई धन्यवाद तुम्ही हा विषय घेतलात म्हणून आम्हाला ही व्यक्त होता आलं.

  • @vandanaabhade8885
    @vandanaabhade8885 Před rokem +3

    डॉक्टर खूप छान बोललात.

  • @sangitagurjar843
    @sangitagurjar843 Před měsícem

    आपली जर ईच्छा प्रभळ असेल तर असं होऊ शकतं घर आपल्या माणसांची ओढ असते

  • @vasantphojari7108
    @vasantphojari7108 Před rokem +3

    Thumcha topic Khoop Chan Watla ani vichar karne Sarkhe Aahe

  • @vilaspawar-vp6xv
    @vilaspawar-vp6xv Před rokem +1

    आतापर्यतं आपन विडीओ दीलेफफा फार छान माहीती दीली।

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 Před rokem +1

    ह्रदयस्पर्शि विषय ❤🙏

  • @user-up4jp9xm2e
    @user-up4jp9xm2e Před rokem +2

    माझी आई सहा वर्षांपूर्वी गेली.पण तिच्या सहवासातील मंडळी आजही तिची खूप आठवण काढतात.रडतात प्रसंगी.केवढी मोठी कमाई आहे तिची.

  • @sangeetapawar6125
    @sangeetapawar6125 Před rokem

    Kharach aahe...Tumache vichar khupach chan asatat mam....

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 Před rokem +1

    Tumche vishay kharch far chan v touching astat.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před rokem +2

    मला तुमचे सर्व ch vishay आवडतात

  • @GOLAR1000
    @GOLAR1000 Před rokem +2

    Thanks I enjoyed your narrated storey
    .Highly touching.I am also 83 alone with wife and many times many thoughts comes to mind.I felt so good of your narration. The feelings are unable to exprssable.
    Now pl tell about PUNAR JANM as a Hindu thoughts.

  • @preranavedak5003
    @preranavedak5003 Před rokem +2

    अनघा ताई खूप छान विषय मंडलात.

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Před rokem

    खूप छान विषय आणि सत्य परिस्थिती

  • @prabhasonawane5346
    @prabhasonawane5346 Před rokem

    मरण ही अटळ घटना! मुलं परदेशात असणं ही गोष्ट ही सार्वत्रिक! प्रॅक्टिकल विचार करायला हवा ! चांगला विषय मांडला!

  • @shubhadajadhav997
    @shubhadajadhav997 Před rokem +1

    खूप छान माहिती सांगितली 🙏🙏

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Před rokem +1

    Good subject chosen by you mam its.very true

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Před 4 měsíci

    डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप खुप छान व्हिडीओ करता आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे प्रतेकाची ईच्छा असते मला माझ्या घरीच मरण यावे तेही खरेच आहे त्यामुळे नातेसबंद चांगले राहतील पुढिल विधी सगळे सोपस्कार चांगल्या प्रकारे एक मरणाचा सोहळा होईल आणि त्या व्यक्तीची ई ईच्छा पुर्ण होईल त्यासाठी थोडे आध्यात्मिक देव धर्म केले पाहिजे त तुमचा व्हीडीओ पाहीला आलडला धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @teshrisalaskar688
    @teshrisalaskar688 Před rokem +1

    अगदी बरोबर आहे Madam

  • @meenazmusic9442
    @meenazmusic9442 Před rokem +1

    एक आई म्हणून तुमची तळमळ जाणवते..

  • @shivajibelkar1102
    @shivajibelkar1102 Před rokem +1

    ताई खूप छान बोललात

  • @vrishalijoshi3602
    @vrishalijoshi3602 Před rokem +1

    मुंबई मधे सुखात हि संस्था आहे ती सर्व मदत करते अगदी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापासून ते अंतिम विधी करण्यात पर्यंत सगळे करतात

  • @seemakalle433
    @seemakalle433 Před rokem +2

    Super topic!which is needed to talk.very touching short story.your presentation is always very useful. I like your vlogs.

  • @VidyaVirokar-zg9zp
    @VidyaVirokar-zg9zp Před rokem +1

    खुप छान विषय आहे कालजाला भिडणारा

  • @bhagyashrishewale8798
    @bhagyashrishewale8798 Před rokem +3

    मरणाचा सोहळा छान आहे.

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 Před rokem +10

    अनायासेन मरणं
    विना दैन्येन जिवनम्
    देहांते तव सानिध्यम्
    देहीमे परमेश्वरम्

    • @jyotisonawane2171
      @jyotisonawane2171 Před rokem

      छानच...

    • @vidyakhapli1832
      @vidyakhapli1832 Před rokem

      अनायासेन मरण, विना दैन्येन जीवनम , देहांते तव सानिध्यंम , देहिमे परमेश्वर .

  • @nayanabhusari3477
    @nayanabhusari3477 Před rokem

    खूप च छान विषय होता

  • @shubhadanandeshwar5337
    @shubhadanandeshwar5337 Před rokem +1

    I Cant speak Madam This vdo is very touching You are also very emotional

  • @charushilamarrathe9820

    Khupch chan vishay hota ajcha vegala

  • @jayashreesontale1271
    @jayashreesontale1271 Před rokem +1

    Best subject

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Před rokem +1

    Mam tumhi khup emotional zala Aaj 😢

  • @meeraraval8714
    @meeraraval8714 Před rokem +1

    मॅडम अस वाटत नाही का आपणच या सर्व गोष्टींनाजबाबदार आहे नुस्त शिक्षण मुलांना द्यायचे आता विचार karana आपल्या देशात काय कमी आहे पण लोक समाधानी नाही आता तरी आपण आपल्या देशाचा घराचा लोकांचा मुलांना कधी विचार करायला लावणार आपणच आपला देश दुसऱ्यांना मोकळा करून देत आहोत यावर मला फार तुमच्याशी बोलाव वाटते यावर तुम्ही बोलाव

  • @jonitalobo4352
    @jonitalobo4352 Před rokem +2

    Aamchya gavala aaj 10 divas zale mazya culth dirala bar nahi manun gavatli ak kaki pahayla geli tjtech hart attack ne geli the tich konich nvte mul mumbee la hote sav gavaealani kel punh rat sabali bodi mul Next day la aali aamchya gavala i am proud fill manuski jivanth aahe ha aahe aamcha desh

  • @anjalibamnelkar394
    @anjalibamnelkar394 Před rokem +1

    tai khup chan bolala man bharun ale

  • @yogitakulkarni8048
    @yogitakulkarni8048 Před rokem +1

    Kay mast vishay nivadlay dr tumhi..maza vay 48 ani maze aai vadil sasu sasre chaugh pan eka varshat eka mage ek gele... Tyancha baghun mhatarpanachi khup bhiti basliye manat.. Ani hech vatta ki maran changla yava deva

  • @sulbhakhanzode2607
    @sulbhakhanzode2607 Před rokem +1

    खूप सुंदर ❤

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před měsícem

    आपल्या कडे चांगल्या सुविधा मिळाल्या तर कोण कशाला बाहेर जाईल

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 Před 3 měsíci

    Chan vishay ghetalat

  • @sujatabhoje1926
    @sujatabhoje1926 Před rokem

    Khup chan

  • @kishorideshpande3106
    @kishorideshpande3106 Před rokem +1

    Short film hart touching astat true🙏

  • @appasahebpunde5982
    @appasahebpunde5982 Před 7 měsíci

    Ajibai khup chanla video*young agemaday khup kankhar asato pan last stagemaday to

  • @user-nl7yi7xz3t
    @user-nl7yi7xz3t Před rokem +2

    अनघाताई मला तुमचे विचार आवडतात

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo Před rokem +5

    Nice. Such talks need to be listened with choiceless awareness. We all need to bow before death and prepare patiently to embrace him.

  • @dineshsonar4796
    @dineshsonar4796 Před rokem

    Nice heart touching

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před rokem +3

    आजचा तुमचा विचार चांगला आवश्यक आहे तुम्ही मांडलेल्या सुचना विचार करायला लावणारा. आणि सगळीकडे हेच आहे़ धन्यवाद 🙏🌹

  • @rubabmujawar8849
    @rubabmujawar8849 Před rokem +1

    खूप छान माझा मुलगा कनडालाआहे

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 Před rokem +4

    या शॉर्ट फिल्म च नाव सांगा plz.

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 Před rokem +1

    अंतिम सोहळा......

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 Před rokem +1

    Majh ak aattya ahe ninty five yearchi ahe purn ayushy tine ak yashashsvi mahila mhanun kadhale pan aatta mhatarpani akti ahe mothe ghar pisa sarv ahe don mule ak mulagi welset ahet yamadhe lagan mulaga aaichi purn kalaji geto tichya sevela nokarchakr thevale ahet swataha sarkha puntahun yet asto tichi dekhabhal karato tiche piasehi vaparat nahi aaplech paise vaparto. Ajunahi aattya ahet mulagahi tilabaghato ahe ashihi mule ta jagat ahet

  • @pritammengade9889
    @pritammengade9889 Před 2 měsíci

    What is the name of short film?

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Před rokem +1

    शॉर्ट फिल्म मला पण आवडतात एखादी लिंक पाठव की प्लीज

  • @ujwalavarpe6670
    @ujwalavarpe6670 Před rokem +2

    काय लिहावे समजत नाही

  • @shivsambhvaijwade7478
    @shivsambhvaijwade7478 Před rokem +1

    NAMASTE sir JI OMNAMOSHIVAY

  • @vaishalidongre7025
    @vaishalidongre7025 Před rokem +1

    छान विषय

    • @laxmipawar4163
      @laxmipawar4163 Před 2 měsíci

      अनघा ताई खूप छान विषय मांडला

  • @VaishaliWaghmare-gm9rs

    खरच swecha maran yayla पाहिजे

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 Před 3 měsíci

    Mazi aai pan 98 varsha jagali v samadhanane geli

  • @mangalavate8060
    @mangalavate8060 Před 19 dny

    Kharach govt kadunach yasathi faculty nighali pahije

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před rokem +1

    मला अश केर करतात तीचा पता् नं कोणी देणार कां....🙏🙏

  • @mohinitikhe8972
    @mohinitikhe8972 Před měsícem

    Sole melyaver bhaghato aikato deep dtudy karave

  • @SwatiGore-ys3qw
    @SwatiGore-ys3qw Před rokem +2

    तुम्ही विषय समजाउन सांगता....

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 Před rokem +1

    useful subject

  • @jyotiparmar3874
    @jyotiparmar3874 Před rokem +1

    ❤😢

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 Před rokem +1

    Dear kaku,aajcha vishay kharach khup laghvi hota,mazi aai 2021 madhye geli,tila carona jhala hota tila aamhi ghari cha quarantine kele hote pan corona jhalya var 4 mahine cha rahili,tenva aamhi pan cartaker tehvle hote katan shevtla 2 mahine ti javal- javal bedridden cha hoti.mi school teacher aahe,majhe mulgi tnvha college madhye hoti tyani duparchya 1:30 vajtor ti cartaker ani majhi mulgi avdech ghari aasyche.chhan.vishay.👌👌👌👌

  • @mohinitikhe8972
    @mohinitikhe8972 Před měsícem

    Maza bhacha 90 lakh che package ahe lahan pani vadil varale to nahi gala ķaran ai verkhare prem va jababdari punuat rahat ithe pan roji roti ahe 90 lakh kami zale ka ego sathi perdeshat jayache ahe na

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 Před 2 měsíci

    तुमचे विचार खूप पटतात

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏

  • @poojakhamkar5613
    @poojakhamkar5613 Před rokem +1

    तुमचा जेष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे ना मला आज जायचं आहे चा फोन नंबर केव्हा पत्ता मिळेल का

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 3 měsíci

    Pardesh far durchi gosht aahe jya gawat kinwa jya gharat aapan rahato te sodayla lok tyar nastat

  • @shobhanatalekar1161
    @shobhanatalekar1161 Před rokem

    मला असं वाटतं कोणी जवळ नसेल तर आपली बॉडी हॉस्पिटलला दान द्यावी हे मरणाआधी लिहून ठेवावे माझं हे वैयक्तिक मत आहे येथे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.

  • @chayamane6368
    @chayamane6368 Před 4 měsíci

    😢

  • @dharamdasshende3175
    @dharamdasshende3175 Před rokem +1

    How about the death of a wife of Raghunath Karve? Do you remember it?

  • @vandanaabhade8885
    @vandanaabhade8885 Před rokem +2

    मणिकर्णिका घाटाचे व्हिडिओ बघितले आणि कमर्शिअलायझेशन, ऑप्टिमायझेशन म्हणजे काय हे दिसले.

  • @urmilapathak8535
    @urmilapathak8535 Před rokem

    तुम्हाला जाणवत का कि हव्ली.सगळीकडेच.नात्यात कोरडेपणा आलाय
    Practical approach वाढलाय .ओलावा भाग्यवानांनाच.मिळतो.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před měsícem

    बऱ्याच मुलांना परदेशात जायला आवडते असे नाही पण आपल्या कडे आताशा मुलांना खुप टेन्शन असतात पैसे मिळाले तरी कामाच्या वेळा खुप जास्त असतात माझा मुलगा मुंबई ला कंपनी मधे नोकरी करत होता येणे जाणे आणि कामात बारा ते चौदा तास जात शिवाय तो खुप थकत असे आता तो इंग्लंड ला गेला आहे तिथे आठ तास म्हणजे आठ तास काम असते रस्त्यात गर्दी नसल्याने घरी पण वेळेत येतो त्याला तशी जाण्याची इचछानव्हती पण आत्ता तो तिथे खुश आहे

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před měsícem

      Population pollution कमी ...त्यामुळे बाहेर छान वाटत असावे

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 Před 4 měsíci

    Tai marn aaplya hatat nahi

  • @surekhaky
    @surekhaky Před rokem +2

    चांगले मरण नशिबात असावे लागते. १० ते १४ दिवसापर्यंत लोकांना आठवण येण्यासाठी तेवढा
    जनसंपर्क असावा लागतो,तेवढे आयुष्य असावे लागते याही गोष्टी नशिबाचाच भाग आहेत, आजकालच्या धावपळीच्या युगात मला नाही वाटत एवढा क्लोज जनसंपर्क प्रत्येकाचाच असेल....नसेलच तेवढा जनसंपर्क तर ....हा तो आ मक्याचा आमका ...तो तमक्याचा तमका किंवा ती ...एकदा इथे पहिली होती..किंवा तो एकदा अश्या ....अश्या समारंभात दिसला होता एवढेच बोलले जाते .असो तो ज्याचा त्याचा पर्सनल पार्ट आहे.