Video není dostupné.
Omlouváme se.

आपले विचार घडवतात आपले भविष्य - Our thoughts create our future

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 04. 2023
  • निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे साध्य करण्याची पद्धत आपण गेले वर्षभर ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते.
    कर्माचा सिद्धांत समजून घेणे का आवश्यक आहे? सोळा संस्कार व प्राचीन भारतीय शास्त्रांचा जीवनात अवलंब केल्यास काय लाभ होतात? ऋतुचर्या व दिनचर्या म्हणजे नेमके काय? दिवसाची सुरुवात शारीरिक, मानसिक व आत्मिक शुद्धीने कशी करावी? पूजा, क्षमा प्रार्थना, शास्त्रोक्त भोजन व निद्रेचे काय महत्त्व आहे? जन्म-मृत्यूच्या चक्राबद्दल भारतीय तत्त्वज्ञान काय सांगते? 'मन निरामय'च्या या शेवटच्या भागात उज्ज्वल भविष्यासाठी जीवनात पाळायचे काही निकष अधोरेखित करीत आहेत श्री. योगेश व सौ. अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि इतरांना पाठवून भौतिकातील समस्यांचे समाधान सूक्ष्मात शोधण्यासाठी मदत करा!
    -----
    Our thoughts create our future
    The Samskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay - we have been learning about the right conditioning of the mind and balancing of the Panchtattvas (five elements) over the past one year. The Swayampurna Upchar method can completely remove the disease causing negative energy from the body. Our future is dependent upon today’s thoughts and emotions. Action done today is important because it decides the direction of not just this; but even the next birth.
    Why is it necessary to understand the Law of Karma? What are the benefits of undergoing the Solar Sanskars and implementing the holistic Indian sciences in life? What is the importance of seasonal lifestyle changes and daily routine? How to begin the day with physical, psychological and spiritual cleansing? What is the significance of worship, forgiveness prayer, scientific eating and sleep? What does the Indian philosophy say about the cycle of birth and death? In this last episode of Mann Niraamay, Mr. Yogesh and Mrs. Amruta Chandorkar highlight some criteria that should be followed for a bright future. Watch the video for details, and share it with others to help them find solutions in the physical world through the subtle realm!
    #thoughts #future #spiritual
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    --------
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 125

  • @anantnimkar958
    @anantnimkar958 Před rokem +12

    डॉ. चांदोरकर जोडी जीवनात गोडी.🎉

  • @smitashah6044
    @smitashah6044 Před rokem +3

    कर्माचा सिद्धांत*साक्षात ती परमशक्ती तुमच्या तोंडून* वदवून घेत आहे असा भास झाला.

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před rokem +5

    तुम्हा दोघांना मनःपूर्वक धन्यवाद, गेली वर्षभर आपण खुप छान मार्गदर्शन केले.आणि त्यामुळे मन सकारात्मक विचार करायला लागले.खुप छान अनुभूती येते.असेच मार्गदर्शन आम्हाला सदैव करावे हि विनंती.पुर्ण निरामय परिवारातील सर्वांना 🙏
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐 🙏
    आपली कृपाभिलाषी 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      मनःपूर्वक आभार 🙏 ,
      आपण नवीन मालिकेसोबत नवीन आणि नवीन विषयासह नक्कीच भेटणार आहोत. यासोबतच आपल्या उत्सवांचे शास्त्रीय, पण रंजक असे ज्ञान आपण ‘सण हर्षाचे’ या नव्या मालिकेतून घेणार आहोत. सण का व कसे साजरे करावे, याबद्दल बोलणार आहोत. तेव्हा पाहायला विसरू नका नवीन मालिका ‘सण हर्षाचे’.

  • @jyotikalekar6513
    @jyotikalekar6513 Před rokem +6

    खरंच खूपच छान मार्गदर्शन. कर्माचा सिद्धांत या हीराभाई ठक्कर यांच्या पुस्तकाची उजळणी झाली. खूप खूप धन्यवाद! आजपासूनच तुम्ही सांगितल्याप्रमाणे परमेश्वराला प्रार्थना करायला सुरुवात करणार. शुभस्य शीघ्रम!!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      वा! खूपच छान!!!! परमेश्वराला प्रार्थना करायला सुरुवात करणार. शुभस्य शीघ्रम!!
      आपला विचार एकून निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @gourimali4019
    @gourimali4019 Před rokem +8

    खुप छान जीवनाचे सार सांगितले, आपण देवापुढे उभारुन काय आणि कसे मागावे हेच न कळल्याने कधी कधी आपणच आपल्या वर संकट ओढवून घेतो.सोप्या भाषेत हे सांगितले, खुप खुप धन्यवाद,दोघांचे.

  • @sunitadhebe705
    @sunitadhebe705 Před rokem +2

    Shree Swami Samarth.

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 Před rokem +3

    *नमस्कार डॉक्टर* 🙏🙏
    *मनःपूर्वक धन्यवाद* 🙏🙏

  • @jaysingnikam4158
    @jaysingnikam4158 Před rokem +2

    Ex army khup chhan life changing program proud of 🙏🏼🙏🏼

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před rokem +2

    तुम्हां दोघांचे मनापासून धन्यवाद

  • @ashwinipatil3389
    @ashwinipatil3389 Před rokem +3

    खूप छान माहिती मिळाली ताई बर्‍याच गोष्टी समजावून सांगितल्या त्यामुळे मनाचे कोंडून ठेवलं होतं त्याची उत्तरे मिळत आहेत ,मनापासून धन्यवाद, मला आपल्या रोजच्या आयुष्यात आसक्ती आणि विरक्ती यांचा मेळ कसा साधायचा याच्यावर मार्गदर्शन हवआहे बर्‍याचदा असं होतं आपण कुठली तरी गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत असतो जिवाचा आटापिटा करतो पण काही कारणाने ती गोष्ट होत नाही मग आपण उदास होतो त्यातच अडकून पडतो स्वतःला त्रास करून घेतो यातून लगेच बाहेर कसं पडायचं म्हणजे रोजचं जगणं आनंदानं कसं जगायचं...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +2

      नमस्कार,
      शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते.

  • @subodhkadam7698
    @subodhkadam7698 Před 4 měsíci

    खूपच छान सांगितलं तुम्ही. मनाचं समाधान झाल्यासारखं वाटलं. मन कुठेतरी हलकं झाल्यासारखं वाटलं आणि हे सर्व ऐकल्यावर वाटतं कि परमेश्वरच तुमच्यासारखी माणसं; नाही प्रत्यक्ष परमेश्वरच तुमच्या रुपात येऊन आम्हा सर्वांचं मार्गदर्शन करत असतो व आम्हाला उभारी देत असतो. जेणेकरून आमचं जीवन सुखमय होवो व येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती मिळो. आपल्या उभयतांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा..!!!! मागील एका व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपलं काही देणं घेणं लागतं म्हणून आपण एकमेकांना भेटतो. आपलीही भेट ही अशाच प्रकारची आहे असं मला वाटतं.❤❤❤❤❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी स्वतःचे विचार व मन यांना योग्य मार्ग दाखविणे खूप आवश्यक आहे. जीवन यशस्वी होण्यासाठी तिच्या मुळाशी असलेले योग्य विचार हे खूप मोठी भूमिका बजावित असतात.
      आपण आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल,प्रेमाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद …आपला हा बंध असाच वृद्धिंगत होवो, हे प्रेम अविरत राहावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हीच
      सदिच्छा🙏. निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा. आपला स्नेह असाच कायम ठेवा

    • @subodhkadam7698
      @subodhkadam7698 Před 4 měsíci

      @@NiraamayWellnessCenter नक्कीच..!! मी करतोच आहे..!!

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před rokem +2

    इतकं सुंदर मार्गदर्शन करता तुम्ही

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Před rokem +2

    फारच छान मार्गदर्शन
    खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा 🙏🌹

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 Před rokem +2

    फारच सुंदर विवेचन ! 🙏🙏🙏

  • @anuradhadeshpande5224
    @anuradhadeshpande5224 Před rokem +2

    अप्रतिम अप्रतिम

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Před rokem +4

    अतिशय सुंदर झाली ही मालिका. प्रत्येक भागात मनाचे व स्वभावाचे पैलु समजले. आजच्या भागात आपले कर्म व आपण कसे क्षमा प्रार्थना करावी हे छान समजले.असेच आम्हास मार्गदर्शन नेहमी करावे . त्यामुळे आमच्यात नक्कीच बदल होईल.
    मनापासून धन्यवाद🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      खूप खूप आभार 🙏 ,
      आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते.आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते. आपल्यात झालेल्या बदलाचे अनुभव आम्हाला नक्की कळवा.

  • @priyatupake1482
    @priyatupake1482 Před rokem +2

    सत्य वचन

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 Před rokem +1

    नमस्कार जय श्रीराम खूप छान

  • @nalkurganapathiprabhu9255

    Khoop chhan Malika.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏,
      निरामयचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @user-nj2oh9eo7z
    @user-nj2oh9eo7z Před rokem +1

    Sunder mahiti

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před rokem

    ❤❤❤❤❤ Far sundar information given by Doctor 🏥 Amruta Chandorkar madam and Doctor 🏥 o Yogesh Chandorkar sir Survaat Eshwara la dhanyawad deto and prayer 🙏 🤲 karun karya la survat dhyan karato and ratri kshama sadhana karato. Ha episode late baghitala tumachi kahama maghato

  • @vaishalikhatal763
    @vaishalikhatal763 Před rokem +2

    खूप छान मार्गदर्शन. मनापासून आभार.🌹🌹🌹

  • @shubhangiyewale5033
    @shubhangiyewale5033 Před rokem +2

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 Před rokem +1

    खुप छान like from Vita Sangli Maharashtra

  • @amitkadu6332
    @amitkadu6332 Před 5 měsíci

    खूप छान महिती सांगीतली

  • @mrudulajoshi6228
    @mrudulajoshi6228 Před rokem +1

    Khup chhan margdarshan karta 🙏cancer sarkha maha bhayankar rog talnyasathi kahi margdarshan kelat tar bar hoil 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +2

      नमस्कार,
      आपण अधिक माहितीसाठी स्वयंपूर्ण उपचारांनी कॅन्सरवर मात हा व्हिडिओ पाहा.
      czcams.com/video/scFuG3z_wmc/video.html

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před rokem +3

    खूप छान🙏🙏

  • @shubhangigujar2904
    @shubhangigujar2904 Před 5 měsíci

    Khup Chan sangitala 🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před rokem +2

    खरच खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर आणि मॅडम 🙏🙏🙏🙏🙏🙏👍

  • @sanjivanichougule8459
    @sanjivanichougule8459 Před rokem +1

    Khup chhan 👌👌

  • @ashwinigidh2524
    @ashwinigidh2524 Před rokem +1

    Atishay sunder margdarshan,anmol margdarshan

  • @archnashinde2388
    @archnashinde2388 Před měsícem

    खुप छान

  • @nalkurganapathiprabhu9255

    Khoop khoop Dhanyavad 🙏

  • @alkapanse1427
    @alkapanse1427 Před 9 měsíci

    खूप छान!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaishalidesai7695
    @vaishalidesai7695 Před rokem +2

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🌹

  • @sampadashimge1425
    @sampadashimge1425 Před rokem +1

    Khup sundar ase vatate asech shravan karat rahave

  • @jayshreekulkarni9568
    @jayshreekulkarni9568 Před rokem

    अप्रतिम. किती सुंदर सोप्या शब्दात सांगता.उभयतांचे अभिनंदन.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Před rokem

    खुप छान संस्कार मार्गदर्शन, धन्यवाद आणि आभार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏,
      निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @wono1390
    @wono1390 Před rokem

    Kiti chaan sangitla tumhi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏.
      निरामयचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @ashatarunvorani3569
    @ashatarunvorani3569 Před rokem

    God bless both of you beta with good wishes

  • @ratnamalalandge9526
    @ratnamalalandge9526 Před rokem +2

    Thank you🙏🙏🙏

  • @nilkanthtapole1044
    @nilkanthtapole1044 Před rokem

    खुप खुप आभार 🙏सर आणि मॅम 🙏 माझे विठ्ठल रुक्मिणी 🌹

  • @sunitamahimkar5113
    @sunitamahimkar5113 Před rokem

    खूप छान सांगितलेत, खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @rajanibhiwankar5994
    @rajanibhiwankar5994 Před rokem +2

    खूप छान मार्गदर्शन लाभले
    पण यापुढे तुमचे नविन व्हिडिओ येणार नाहीत का?
    तसे न व्हावे ही इच्छा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार 🙏 ,
      काळजी नसावी , आपण नवीन मालिकेसोबत नवीन आणि नवीन विषयासह नक्कीच भेटणार आहोत. यासोबतच आपल्या उत्सवांचे शास्त्रीय, पण रंजक असे ज्ञान आपण ‘सण हर्षाचे’ या नव्या मालिकेतून घेणार आहोत. सण का व कसे साजरे करावे, याबद्दल बोलणार आहोत. तेव्हा पाहायला विसरू नका नवीन मालिका ‘सण हर्षाचे’.

  • @adarshgoral3266
    @adarshgoral3266 Před rokem +1

    🙏👌

  • @manisharaul8351
    @manisharaul8351 Před rokem

    Khup chan❤😊

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem +2

    🙏🌹

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Před rokem +1

    🙏🙏

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Před rokem

    धन्यवाद🙏🙏

  • @jyotimulchandani2065
    @jyotimulchandani2065 Před rokem +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @17-jivishabhoir54
    @17-jivishabhoir54 Před rokem +1

    खुप छान माहिती मिळाली ,खुप खुप धन्यवाद.ताप येतो तेव्हा कोणती मुद्रा करावी.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      ताप नेहमी येतो का व येण्याचे मूळ कारण काय हे देखील समजून घेणे आवश्यक आहे .
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @pinkimane7739
    @pinkimane7739 Před rokem +1

    Halo doctor sciatica sathi mudra sanga please please sir Ani madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      पृथ्वी मुद्रा केल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होईल. या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घ्यावा.
      पृथ्वी मुद्रा - czcams.com/video/CsBAm7MicJM/video.html
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.
      निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारामुळे मणक्याचे ऑपरेशन टळलेल्या पेशंटचा अनुभव आपण जरूर पहावा.
      czcams.com/video/6ZKKqwf1t9A/video.html

  • @yummy_tastytales
    @yummy_tastytales Před rokem

    Plz Man Niramay he series suru theva 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      काळजी नसावी आपण नवीन विषयासह नक्कीच भेटणार आहोत. " सण हर्षाचे" या नवीन मालिकेत आपले सहर्ष स्वागत आहे आपण पुढील लिंक वर क्लिक करून सदर मालिका पाहू शकता. czcams.com/play/PLK6fPNvsQ0ydVFSBXBS1ogL-xztZUCaEC.html
      धन्यवाद 🙏.

  • @mrunalnandrunkar1159
    @mrunalnandrunkar1159 Před rokem +1

    Hi malika krupaya band karunaka ajunputhe mahiti milat rahavi hich vinanti please hyawar vichar vhawa

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार 🙏 ,
      काळजी नसावी , आपण नवीन मालिकेसोबत नवीन आणि नवीन विषयासह नक्कीच भेटणार आहोत. यासोबतच आपल्या उत्सवांचे शास्त्रीय, पण रंजक असे ज्ञान आपण ‘सण हर्षाचे’ या नव्या मालिकेतून घेणार आहोत. सण का व कसे साजरे करावे, याबद्दल बोलणार आहोत. तेव्हा पाहायला विसरू नका नवीन मालिका ‘सण हर्षाचे’.

  • @11thbprathameshghodke59
    @11thbprathameshghodke59 Před rokem +1

    मी neet ची डॉक्टरेट साठी exam देणार आहे.याचा मला खूप उपयोग होईल.🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      अरे वा!!! मग नक्की उपयोग करा आणि येणारा अनुभव जरूर कळवा.

  • @shivajiroundal20
    @shivajiroundal20 Před rokem +1

    नमस्कार चांदोरकर म्या डम मी वर्ष भर तुमच्या कडे द्रिटमेंट घेतली पण मला कसलाच फरक पडला नाही म्हणून मी द्रिटमेंट बंद केली कमेंट बघता खुप चांगल्या आहेत मग मला का फरक पडला नाही

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपणास उपचार घेऊनही फरक पडला नाही असे आपण म्हणत आहात तरी याबद्दल आपण निरामय सेंटरच्या तज्ञांशी संपर्क करू शकता. आपला उपचार क्रमांक किंवा पेशंट चे पूर्ण नाव आपण नमूद न केल्यामुळे असे होण्यामागचे कारण इथे स्पष्ट करता येत नाही . तरी आपला ( Form Number) कळवाल का?

  • @JyotisChannel097
    @JyotisChannel097 Před rokem +1

    🙏🙏🙏👌🏼👌🏼

  • @atulhadgale8003
    @atulhadgale8003 Před rokem +1

    4 ashram?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      १) ब्रह्मचर्याश्रम
      २) गृहस्थाश्रम
      ३) वानप्रस्थाश्रम
      ४)संन्यासाश्रम

  • @aparnathakre9838
    @aparnathakre9838 Před 5 měsíci

    ह्या थेरपी ने व्यक्ती व्यसनमुक्त होतो का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      नमस्कार,
      हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      अधिक माहितीसाठी आपण पुढील Video पाहू शकता.
      व्यसनमुक्तीसाठी प्रभावी स्वयंपूर्ण उपचार! - czcams.com/video/y5M-qJLuIPc/video.html

  • @harishnikam1777
    @harishnikam1777 Před rokem +1

    खूप छान🙏🙏🙏

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před rokem +1

    🙏🙏

  • @siddharthwaghmare1820
    @siddharthwaghmare1820 Před rokem +1

    🙏🙏