कांदा पिकातील खतांचे वेळापत्रक | कांदा बेसल डोस | BharatAgri | भारतअ‍ॅग्री

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 10. 2022
  • टॉनिक, बुरशीनाशक आणि कीडनाशक घर बसल्या खरेदीसाठी आणि १००% कॅश व डिलिव्हरीसह मोफत होम डिलिव्हरी मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा आणि मिळवा प्रत्येक खरेदी वर आकर्षक डिस्काउंट.
    krushidukan.bharatagri.com/
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱कांदा पिकातील खतांचे वेळापत्रक जे देईल तुम्हाला 250 ते 300 क्विंटल उत्पादन👍
    महाराष्ट्रात नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा,जळगाव, धुळे आणि सोलापूर हे जिल्हे कांदा पिकवण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. कांदा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. कांद्याच्या रोपांना थंड हवा मानवते. मात्र कांदा लागवड करतांना खत आणि फवारणीचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते. अन्यथा कांद्याचे वजन कमी व गुणवत्ता कमी होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. कांदा पिकासाठी खतामधील अन्नद्रव्यांचे शोषण प्रामुख्याने कांद्याचे वाण, खतांचे प्रमाण, मातीच प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असते. कांद्याचे शेत तयार करण्यासाठी प्रथम खोल नांगरणी करावी त्यानंतर काही काळ शेत असेच उघडे ठेवावे. यानंतर शेतात सेंद्रिय खताच्या स्वरूपात प्रति एकर 2-3 टन कुजलेले शेणखत कंपोस्टिंग जिवाणूसह टाकावे. शेणखत टाकल्यानंतर शेताची पुन्हा नांगरणी करावी जेणेकरून शेणखत शेतातील जमिनीत चांगले मिसळले जाईल.
    ✅ कांदा पिकातील कांद्याची स्थिती आणि लागवडीच्या दिवसानुसार खत व्यवस्थापन पाहुयात:
    ✅ खत व्यवस्थापन (बेसल डोस): कांदा लागवडीच्या १ दिवस आधी:
    👉 डी.ए.पी. - 50 किलो प्रति एकर
    👉 एम.ओ.पी. (पोटाश) - 50 किलो प्रति एकर
    👉 सल्फर - 8 किलो प्रति एकर
    👉 मायक्रोनुट्रीएंट खत - 10 किलो प्रति एकर
    👉 नीमकेक - 50 किलो प्रति एकर
    ( सूचना - हि सर्व खते मिक्स करून मातीमध्ये मिसळावीत किंवा बेड वर लागवड करणार असल्यास बेड भरून घ्यावेत. )
    ✅ लागवडीनंतर १० दिवसांच्या आत ड्रीप द्वारे किंवा पाटपाण्याने खत व्यवस्थापन:
    19:19:19 - 2 किलो प्रति एकर
    ह्यूमिक एसिड (प्राइम 1515 ) - 1 लिटर प्रति एकर
    फायदा: रोपांच्या मुळांचा विकास होऊन मुळे खोलवर जातात, त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते.
    ✅ लागवडीनंतर 10 ते 30 दिवसांनी
    👉 फवारणी:
    19 : 19 :19 - 50 ग्राम
    समुद्री शेवाळअर्क (सी रुबी) - 15 ग्राम
    दोन्ही प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी
    👉 ड्रीप द्वारे:
    19 : 19 :19 - 3 किलो प्रति एकरी
    डॉ. बैक्टोज कॉम्बो - एनपीके बैक्टीरिया - 1 लिटर प्रति एकरी
    ड्रीप मधून देताना हे दोन्ही वेगवेगळे सोडावे एकत्र मिसळू नये.
    फायदा: रोपांची सर्वांगीण वाढ होते, दिलेली खते उपलब्ध होण्यास मदत होते.
    ✅ लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी:
    👉 फवारणी:
    12 : 61 :00 - 70 ग्राम
    चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - १५ ग्राम
    सिलिकॉन (टॅबसील) - 15 ग्राम
    ( सूचना - प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. )
    👉 ड्रीप द्वारे:
    19 : 19 :19 - 2 किलो प्रति एकरी
    12 : 61 :00 - 3 किलो प्रति एकरी
    फायदा: मायक्रोनुट्रीएंटची कमतरता भरून पिकाची सर्वांगीण वाढ होते, पिकाची रोग व कीड प्रतिकारक शक्ती वाढते.
    ✅ लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी:
    👉 फवारणी:
    13:00:45 - 75 ग्राम
    कॅल्शिअम बोरॉन (इन्स्टा सी.बी) - 15 ग्राम
    ( सूचना - प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. )
    👉 ड्रीप द्वारे:
    00:52:34 - 3 किलो प्रति एकरी
    चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 250 ग्राम प्रति एकरी
    बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 250 ग्राम प्रति एकरी
    फायदे: कांद्याची गाठ तयार होत असताना हि खते दिल्यास गाठीचा विकास चांगला होतो.
    ✅ लागवडीनंतर 60 ते 80 दिवसांनी:
    👉 फवारणी:
    00:52:34 - 75 ग्राम
    बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 15 ग्राम
    समुद्री शेवाळअर्क (सी रुबी) - 15 ग्राम
    ( सूचना - प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. )
    👉 ड्रीप द्वारे:
    00:52:34 - 3 किलो प्रति एकरी
    बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 250 ग्राम प्रति एकरी
    वनस्पति अर्क (प्राइम कायरॉन) 500 मिली प्रति एकर
    फायदे: कांद्याचा आकार रंग व वजन वाढण्यास मदत होते.
    ✅ लागवडीनंतर 80 ते 100 दिवसांनी:
    👉 फवारणी:
    00:00:50 - 75 ग्राम
    चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 15 ग्राम
    ( सूचना - प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.)
    👉 ड्रीप द्वारे:
    00:00:50 - 3 किलो प्रति एकरी
    चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 250 ग्राम प्रति एकरी.
    वनस्पति अर्क (प्राइम कायरॉन) 500 मिली प्रति एकर
    फायदे: कांद्याचा आकार रंग व वजन वाढण्यास मदत होते.
    ✅ महत्त्वाच्या गोष्टी -
    👉 फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा
    👉 फवारणी करताना शेतात ओलावा असणे आवश्यक आहे
    👉 नमूद केलेल्या खत जास्त प्रमाणात घेऊ नये
    👉 पिकावर सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी.
    👉 फवारणी मध्ये बुरशीनाशके आणि कीडनाशके मिसळताना कृषी तंज्ञानाचा सल्ला घ्यावा.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Komentáře • 136

  • @haribhaubhawar368
    @haribhaubhawar368 Před rokem +38

    कंपनीच्या जाहिरातीसाठी लोकांच्या खर्चाचा पण विचार करा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +3

      नक्की करू . आणि माझा प्रयत्न हाच आहे की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल

    • @sagarbagal9965
      @sagarbagal9965 Před rokem +1

      Thank

  • @pavan-ingle2
    @pavan-ingle2 Před 8 měsíci +2

    सर तुम्ही एखाद्या शेतकर्याला कांदा पिकाचे मार्गदर्शन करेल असेल ज्या शेतकऱ्याचे 250,ते300 किंटल कांदा निघालेला असेल त्या शेतकर्याची मुलाखत घेवून विडीओ बनवा

  • @rajendrapawar5888
    @rajendrapawar5888 Před rokem +7

    मार्गदर्शना बरोबरच आनंद अग्रो औषध विकु राहिले

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      अस काही नाही सर . रिजल्ट चांगले आहेत आनंद अग्रॉ चे

    • @rajendrakaiche2454
      @rajendrakaiche2454 Před rokem +1

      सर एकरी 300 400 kg निघत नाही

  • @milindsohoni5142
    @milindsohoni5142 Před rokem

    Sir, you have mentioned spray schedule and also drip schedule. Do we follow both or is it either

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Před rokem +3

    Thank you BharatAgri!

  • @bhausahebtupe8610
    @bhausahebtupe8610 Před rokem +6

    सर कांदा पिकात कोण कोणत्या प्रकारची बुरशीनाशकांची व किटकनाशकाची फवारणी करावी याबद्दल माहिती द्यावी.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ठीक आहे . त्याच्यावर देखील आपण एक विडियो बनऊ

  • @ramakantgarud5908
    @ramakantgarud5908 Před rokem +2

    Hi khate unhali kandyala vaparali v kanda shed madhe takla tar andaaje kiti divas rahu shakto

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      कांदा साठवणूक ही खतावर खूप कमी अवलंबून असते. कांदा जास्त दिवस साठवण्यासाठी साठवणूक व्यवस्थापन चांगले करावे.
      अधिक माहितीसाठी BharatAgri App ला भेट द्या . आम्ही सविस्तर माहिती देऊ

  • @kiranvidhate307
    @kiranvidhate307 Před rokem +1

    Ser asech favarnichepan velapatrak sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ओके , नक्की बनवतो. मला थोडा वेळ द्या

  • @sopankanse
    @sopankanse Před rokem +5

    सर एवढा खर्च करून कांद्याला बाजार काय भेटतो तर तो ५ रुपये किलो मग एवढा खर्च कसकाय परवडेल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      बरोबर आहे तुमच , जर भाव कमी असेल तर कृपया आपण इतका खर्च करू नये.

  • @sandiplalge3118
    @sandiplalge3118 Před 8 měsíci

    Mirchi che khat niyojan sanga

  • @vishalkedare9715
    @vishalkedare9715 Před rokem +5

    Sir कीटकनाशक बुरशीनाशक वेळापत्रक दय कांदा पिकाचे.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      चालेल , त्यावर आपण एक नवीन विडियो बनऊ

  • @mayursonawane391
    @mayursonawane391 Před rokem +1

    दादा MAC AGRO चे सेंद्रिय. आणि जैविक खते वापरले तर चालतील का?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      नमस्कार सर ! आपल्या अनुभवानुसार वापर करा त्याचा अनुभव नाही आम्हला . धन्यवाद सर !

  • @yogeshvaibhatt3029
    @yogeshvaibhatt3029 Před rokem +3

    Sir zendu pikavar video banva

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ओके . मी नक्की प्रयत्न करेन

  • @yogeshpawar1562
    @yogeshpawar1562 Před rokem +4

    रोप टाकण्याचे नियोजन कशे करावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      याची माहिती BharatAgri App मध्ये मिळेल.

  • @mahendrakasav2553
    @mahendrakasav2553 Před rokem +2

    Anand agroch ka vaparal pahije ki add karatay

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      रिजल्ट आहेत चांगले वापरुन पहा

  • @suhastele9594
    @suhastele9594 Před 6 měsíci

    कांदा पिकासाठी ड्रीप द्वारे खत व्यवस्थापन सांगा सर सुरवाती पासून ते शेवट पर्यंत

  • @vi4860
    @vi4860 Před rokem +2

    आनंद agro चे प्रोडक्ट आम्हाला कूठे मिलतील
    सातारा जिल्हा खटाव तालुका

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      तुम्हाला हे प्रॉडक्ट BharatAGri App मध्ये खरेदी करता येतील. घरपोच मिळतील तुम्हाला

  • @sandeepsalunke4643
    @sandeepsalunke4643 Před rokem +4

    शेवगा पिक =पावसाळा संपल्यानंतरचे नियोजन, लागवड =जुलै

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      ओके . एका नवीन विडियो मध्ये ही माहिती आपण देऊ

  • @santoshlanjewar4082
    @santoshlanjewar4082 Před rokem +2

    Bhat pikacha khat shedule sanga sair

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ओके , एक नवीन विडियो बनऊ . तूर्तास अर्जंट माहिती साठी आपण BharatAgri App ला भेट देऊ शकता

  • @sachinnawale264
    @sachinnawale264 Před rokem

    19.19.19 व समुद्री शेवाळ अर्क कांद्याला 28 दिवसानंतर फवारणी केली तर चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      नमस्कार सर , करू शकता काही हरकत नाही . धन्यवाद सर !

  • @moviejankari2158
    @moviejankari2158 Před rokem +4

    Sir kanda pika varti jastit jast video banavat ja please

  • @ganeshsarvade7294
    @ganeshsarvade7294 Před rokem +1

    Sir Limbuni sathi haat bahar sathi aasch video banva

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 Před rokem +4

    कोंबडी खतात नत्राचे प्रमाण जास्त असून ते कांदा पिकासाठी चांगले आहे का....?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आहे . आपण वापरू शकता पान कोंबड खत हे चांगले कुजलेले असावे

  • @monagavhane1674
    @monagavhane1674 Před rokem +2

    Sir nice information
    पेर कांद्याची खत व्यवस्थापन सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      ओके , एक नवीन विडियो बनऊ

  • @itsabboy4130
    @itsabboy4130 Před rokem +4

    आपल्या वेळापत्रकानुसार खतावरचा एकरी एकुण किती खर्च येतो

  • @Ganupalvi
    @Ganupalvi Před rokem +2

    Sir टोमाटो che pan shedul de na

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ओके , त्यासाठी एक नवीन विडियो बनऊ

  • @rK-ke8pw
    @rK-ke8pw Před rokem +6

    सर जर करपा असेल तर .... 19 19 19 ची किंवा नायट्रोजन ची मात्रा दिला तर करपा वाढण्याची शक्यता आहे...त्यामुळे थोड रोग नियंत्रण सुद्धा लक्षात घेणे महत्वाचे आहे....

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      बरोबर , तुमचं मुद्दा अगदी बरोबर आहे.

  • @user-ip1he6xf4j
    @user-ip1he6xf4j Před měsícem

    सर तुम्हाला नमस्कार मी विजय कार्ले मला लाल कांद्याची लागवड आणि खत व्यवस्थापन सांगितले तर बरं होईल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před měsícem

      आपण यावरती एक व्हिडिओ पाहू शकता - czcams.com/video/bd9no54gFo4/video.html

  • @sachinnawale264
    @sachinnawale264 Před rokem

    सर उन्हाळी कांदा ८० दिवसाचा झाला आहे. ० ५२ ३४ + boron+ tilt + sea रुबी + silicon + स्टिकर असे combination केले तर चालेल का कृपया या बाबतचे आपले मार्गदर्शन मिळावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ० ५२ ३४ + boron+ tilt हीच करावी फवारणी .

    • @sachinnawale264
      @sachinnawale264 Před rokem

      @@bharatagrimarathi सर सी रुबी अर्क यामध्ये घेतला तर चालेल का

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před rokem +1

    सुर्या दादा
    ड्रीप वर कंदा आहे
    सरी म्हणजे बेड न करता डायरेक्ट रोटा मारून करणार आहे
    तर चालल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      चालेल पण पानी व्यवस्थापन जपून करा. शेतात पानी सचून राहणार नाही याची काळजी घ्या

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Před rokem

      नेमकं काय करावे
      कसे ओळखावे की पाणी अधिक होतय

  • @vitthalagro9091
    @vitthalagro9091 Před měsícem

    रोग कीड नियोजन विषयी व्हिडिओ बनवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před měsícem

      आपण विरलेल्या प्रश्न आमच्या साठी खूप महत्वचा आहे लवकर याविषया वरती व्हिडिओ बनवला जाईल , धन्यवाद सर !

  • @harimurumkar8141
    @harimurumkar8141 Před rokem +3

    सर पेर कांद्याला किती दिवसानी खत टाकावे व ते कोणते टाकावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      पेर कांद्याला देखील तुम्ही विडियो मध्ये सांगितल्या प्रमाणे खत नियोजन करू शकता -

    • @harimurumkar8141
      @harimurumkar8141 Před rokem

      @@bharatagrimarathi कांदा पेरतानी खत टाकले तर जामतेका

  • @surajugaleagrilbiotech11
    @surajugaleagrilbiotech11 Před 8 měsíci

    आनंद अग्रो ने विकत घेतल की काय तुम्हाला.... हा हा हा

  • @yogeshpawar1562
    @yogeshpawar1562 Před rokem +2

    वाफा पद्धतीने कांदा लागवड कशी करावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      सविस्तर माहिती साठी कृपया BharatAgri App ला भेट द्या

  • @sachinnawale264
    @sachinnawale264 Před rokem

    १२ ६१ ०० व इन्स्टा कम्बी व सिलिकॉन टॅबलेट बरोबर आपले कोणते कीटक नाशक फवारले पाहिजे याची माहिती कृपया द्यावी कारण मी आपल्या माहिती नुसार वेळापत्रक तयार केले आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      अरेवा , हमाल , एडमायर , ही कीटकनाशक आपण वापरू शकता

  • @vijaykakade7838
    @vijaykakade7838 Před rokem +1

    Kharch jara kami hotoy as vatat nahi ka?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      तुमचं मुद्दा मला कळला नाही कृपया सविस्तर सांगा

  • @pawankabra6308
    @pawankabra6308 Před rokem +1

    Sar tarbuj baddal mahiti Daya

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      टरबूज वरती नवीन विडियो बनऊ आपण .
      थोडा वेळ द्या

  • @nileshkale5600
    @nileshkale5600 Před rokem +3

    अहमदनगर मध्ये कुठे मिळेल औषध हयुमिक ॲसिड

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      नजीकच्या कोणत्याही कृषि सेवा केंद्रात संपर्क करा

  • @dadasahebzinj9557
    @dadasahebzinj9557 Před rokem +3

    सर
    एकरी ३००ते ४०० क्विंटल कांदा निघु शकतो का....

  • @user-yf2ge9cg6c
    @user-yf2ge9cg6c Před rokem +1

    खूपच छान पण खर्च खूप मोठा आहे

  • @sharadasuryawanshi9520
    @sharadasuryawanshi9520 Před 7 měsíci

    आनंद ऍग्रो सोडून दुसऱ्या चांगल्या कंपन्या नाही आहेत का बाजारात 😂

  • @kellaspawar4718
    @kellaspawar4718 Před rokem +1

    मी नवीन शेतकरी आहे सर तर मला पूर्ण डोस.ची.माहिती द्या. पहिल्या पासून तर शेवट पर्यंत

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      नमस्कार सर , ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat आणि आपल्याला तिथे कांदा शेड्युल पूर्ण मिळू शकते . धन्यवाद सर !

  • @kailasjamkar4214
    @kailasjamkar4214 Před rokem +3

    तीन महिन्याच्या पुढे खत घेतले तर कांदा भुसार यामध्ये टिकणार नाही

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      बरोबर आहे, पण कमी मात्रे मध्ये खत देणे गरजेचे आहे

  • @s.anil.
    @s.anil. Před rokem

    विद्राव्य खते (सर्व)पिकाला दिल्यानंतर किती दिवसांनी लागू होतात व किती दिवसांपर्यंत चालतात

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      दुसऱ्या दिवसापासून ६ ते ८ दिवसापर्यंत लागू पडतात .

    • @dilipjadhav3436
      @dilipjadhav3436 Před rokem

      @@bharatagrimarathi favarni mhde 0 52 34 lagu hote

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 Před rokem +3

    Dalimb telya fawarni Sedul pathawa

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      कृपया या साठी आपण BharatAgri App ला भेट द्या

  • @navnathsonawane8934
    @navnathsonawane8934 Před 10 měsíci

    कृपया आपला नंबर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 10 měsíci

      तुम्ही मला bharatagri app मध्ये संपर्क करू शकता.

  • @samirshewale5997
    @samirshewale5997 Před rokem +2

    केरन कंपनीचे ओनिटोन सोडा

  • @sharadsudhakaralanjkar5039

    सगळा खर्च किती येईल

  • @mohitkshisagar9070
    @mohitkshisagar9070 Před rokem

    कांदा फुगवणि साठी काय

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ००:००:५० - ५ किलो / २०० लिटर पाण्याबरोबर सोडू शकता .

  • @poojasavkar6020
    @poojasavkar6020 Před rokem +1

    सर camposting bacteria शेतात खत टाकल्यावर टाकायचा आहे की उकिरड्यावर खत असताना टाकायचं आहे....
    कृपया रिप्लाय द्या....धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      शेतात खत मिसळताना त्याच्या मध्ये बॅक्टेरिया मिसळावे

    • @farminginnovation5530
      @farminginnovation5530 Před rokem

      उकिरड्यावर टाका दादा, शेता बाहेरच शेन कुजवले तर उत्तम

  • @ganeshbarde6084
    @ganeshbarde6084 Před rokem +2

    सर एकरी कोबडी खत किती टाकावा किंवा टाकावा की नाही

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      टाकावा पण ते चांगले कुजलेले व जून असावे. एकरी 1 टन टाकावे

    • @ramdasaware5458
      @ramdasaware5458 Před rokem

      या शेडूलने स्वतःच्या शेतामध्येस्वतः तीनशे ते चारशे क्विंटल कांदा काढून दाखवानंतर शेड्युल लोकांना सांगत चला

  • @saibhamare3
    @saibhamare3 Před rokem +2

    कमी खर्चात खत व्यवस्थापन सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +2

      बर . एक सेपरेट विडियो बनऊ

  • @mahendradeore633
    @mahendradeore633 Před rokem

    कांदा फुगवन साठी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ००:००:५० - ५ किलो / एकरी ड्रीप ने

  • @Kiran19949
    @Kiran19949 Před rokem +4

    पेरलेल्या कांद्यावर तणनाशक फवारणी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      टरगा सुपर आणि गोल वापरू शकता ।
      सोबटच आपण कांदा तन नियंत्रना वरती एक स्पेशल विडिओ बनउ

  • @shubhamkhedekar6148
    @shubhamkhedekar6148 Před rokem +1

    सर तुमच्या हिशोबाने एकरी किती खर्च होतो.

  • @surendrabhagwat4325
    @surendrabhagwat4325 Před rokem +1

    एवढे खते औषधे टाकून पिकवलेला कांदा काढणी नंतर किती दिवस टिकेल... शिवाय एकूण खर्च किती होईल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला रासायनिक खतांच्या मात्रा वाढवणे गरजेचे आहे, जर तुम्ही सेंद्रिय खते ताकत असाल तर या मात्रा कमी होऊ शकतात.

    • @pravinjadhav6825
      @pravinjadhav6825 Před rokem

      सर तुम्ही म्हणाल तसे नियोजन करू पण
      तुम्ही म्हणता 250 ते 300 क्विंटल 1 एकर मध्ये कांदा निघालाच पाहिजे ????

  • @sandipnavale5094
    @sandipnavale5094 Před rokem +2

    कांदा लागवड करून दहा दिवस झालेले आहेत सुरुवातीला कोणतेही खत वापरलेले नाही तर आता कोणते खत वापरावेत

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      जसे विडियो मध्ये सांगितले आहे तसे आपण वापरू शकता

  • @bhagwatkandekar9012
    @bhagwatkandekar9012 Před rokem +2

    सर यामध्ये कीटकनाशकांचा समावेश नाही केला

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      नाही केला. त्याच्या नवीन विडियो बनवणार आहोत आपण

    • @dattatraysahane122
      @dattatraysahane122 Před rokem

      फवारणी व आलवणी both are complasary

  • @ganeshbarde6084
    @ganeshbarde6084 Před rokem +2

    सर तुमचा whatsapp no दया

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +2

      9168911489

    • @nikhilbhot4821
      @nikhilbhot4821 Před rokem +2

      @@bharatagrimarathi खत मात्रा फवरणी आणी ड्रिप ने दोन्ही पन द्यायची आहे का की फक्त कोणताही एक पर्यय घ्यायचा

    • @ravimore839
      @ravimore839 Před rokem

      एकरी किती लाख रुपये खर्च करायचा का

  • @user-ip1he6xf4j
    @user-ip1he6xf4j Před měsícem

    सर तुम्हाला नमस्कार मी विजय कार्ले मला लाल कांद्याची लागवड आणि खत व्यवस्थापन सांगितले तर बरं होईल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před měsícem

      आपण पुढील लिंक क्लिक करून व्हिडओ पाहू शकता - czcams.com/video/bd9no54gFo4/video.html