नंदूरबार तहसीलदारांविरुद्ध शिवसेना उबाठातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले, लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • नंदुरबार येथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे, महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर तहसीलदारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी, शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात आले. नंदूरबार तहसीलदार नितीन गर्जे यांच्याविरुद्ध शिवसेना उबाठा पक्षामार्फत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे, मागणी पूर्ण न झाल्यास 10 ऑगस्ट रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी आंदोलकांकडून देण्यात आली, नंदुरबार येथील तहसीलदार नितीन गर्जे यांचा मनमानी कारभार, व सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणी करिता शिवसेना उबाठा पक्षातर्फे जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्त्वाखाली येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले, दुपारी दोन वाजता अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, तहसीलदारांविरुद्ध कारवाई न झाल्यास 10 ऑगस्ट रोजी शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे,
    आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नंदुरबार जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी, महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, उप तालुकाप्रमुख सुनील सोनार, शहर महिला आघाडी प्रमुख चेतना माळी, उप तालुकाप्रमुख चारू बागुल, उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी, शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे, मीडिया प्रमुख राज पाटील, जिल्हा सचिव दिनेश भोपे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते, येथील शिवसेना उबाठा पक्षामार्फत तहसीलदार नितीन गर्जे यांच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले होते, यांनी निवेदनाची दखल न घेतल्याने शिवसेने मार्फत आंदोलन करण्यात आले, यावेळी सकाळी 11 वाजेपासून आंदोलन सुरू झाले होते, दुपारी दोन वाजता नायब तहसीलदार राजेश अमृतकर व नितीन पाटील यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या चौकशी संदर्भात लेखी आश्वासन देण्यात आले, त्यानंतर लिंबू पाणी देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली, यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व सामान्य नागरिक उपस्थित होते, ज्यांचे काम नाही झाले असणार व तक्रार घेऊनपण काम करत नसतील, त्यांनी शिवसेना जिल्हा कार्यालय येथे पंडित माळी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पंडित माळी यांनी केले आहे.

Komentáře •