Devak Kalji | Episode 4| Tuza Visar Na Vhava |

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • या series चा हा शेवटचा episode . पण खरंतर ही नव्या नात्यांची एक सुरुवातच नाही का? विनायक आणि गणेशला स्वतःच्या आयुष्यात आपल्या सगळ्यात मोठ्या ego ला बाजूला ठेऊन एक नवीन सुरुवात करता येईल का? त्यांच्यासाठी ही खूपच गरजेची गोष्ट झालीच आहे, पण गणपती बाप्पा ने त्यांच्यात संवाद घडवूण आणलच शेवटी. आता त्यांचं पुढे काय होईल, हे कळण्यासाठी episode पूर्ण बघा! आणि तुम्हाला ही series कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा!
    Embark on an emotional journey with our curated compilation of the finest Marathi web series. From riveting trailers to freshly brewed releases, immerse yourself in captivating storytelling and profound character portrayals that will leave you spellbound. As we gaze into the future, anticipate a surge of groundbreaking narratives and thought-provoking themes set to captivate audiences in 2023 and 2024. Whether you're a seasoned enthusiast or a newcomer, our handpicked selection promises an unforgettable viewing experience. Join us as we explore the unique charm and sheer power of emotions in Marathi web series, crafting an extraordinary escapade that will keep you riveted till the very end. Don't miss this chance to witness the ascension of Marathi web series as a dominant force in storytelling.
    About This Episode :
    The Finale !!!
    Get ready to embark on an emotional rollercoaster ride as we present the much-awaited *Finale* of our beloved Marathi Web Series "Devak Kalji"
    In this concluding episode, you will witness the intricate lives of Ganesh, Vinayak, and Jhila reaching a pivotal moment. Will they mend the cracks in their relationships, or will they drift further apart? The answers lie in this episode, waiting to be unveiled.
    Experience the power of love, friendship, and self-discovery as our characters confront their deepest fears and embrace their true selves. Witness the final moments that will leave you in awe and contemplation.
    We are profoundly moved by the overwhelming response and love you have showered upon us throughout this series. Your encouragement has been our driving force, and for that, we are eternally grateful.
    Now, we look to you, our incredible viewers, to help us spread the magic of "Devak Kalji." Share this episode with your friends, family, and social networks. Let's make this series a household name, reaching millions of hearts with its touching narrative and universal themes.
    Join us in celebrating the finale of a story that has become a part of us, a story that reminds us of the beauty of human connections.
    Thank you for being a part of our journey. Don't forget Subscribe to Aapali Sosal Vahini.
    Baki, Devak Kalji !
    Cast:
    Sameer Khandekar
    Vinod Gaikar
    Bhakti Desai
    Divyalaxmi Maisnam
    Mukesh Jadhav
    Credits:
    Producer: Vaibhavi Rane
    Writer & Director: Sameer Khandekar
    Director of Photography : Suyash Rajendra Mhatre
    Editor : Omkar Rane
    Music : Rahul Khade - Tejas Kale (Sameehan)
    Art Director : Saeesh Pednekar - Rushikesh Andre
    Costume : Aparna Khandekar
    Assistant Director : Ardra Desai
    Production Manager : Shubham Bhobaskar
    Line Producer : Rutvik Dhuri
    Assistant Cameraman : Dhiraj Sodaye
    Sync Sound Recordist: Kailas Bagde
    DI : Suraj Singh (Aryan Media)
    Graphic Designer : Vaibhavi Rane
    Camera Attendant : Ankit Varma
    Transport : Sudesh Kule
    Title Animation : Sebastian Reddy
    Title Graphics : Ganesh Sovani
    Legal Advisor :
    Adv. Rohan Munj (New Law Alliance)
    Adv. Jayesh Mestry
    Adv.Hrishikesh Ambre
    Digital Partner:
    POV Media
    Special Thanks
    Grampanchayat Naringre, Devgad
    Grampanchayat Dabhole, Devgad
    Restaurant Kokan Katta, Malad West
    Archana Sonde
    Tushar Rane
    Sunil Dabholkar and family
    Jagannath Rane
    Bhai Nare
    Shailesh Loke
    Mukesh Madhukar Sawant, Aachra Paarwadi
    Rupesh Satam, Aachra Parwadi
    Prasad Parab
    Nilesh Parab
    Raju Patil, Satwik
    Buva Tari
    Sainath Mathkar
    Sanket Walawalkar
    Abhishek Koyande
    Aadya Koyande
    Vijay Kadam
    Sham Gaonkar
    Moreshwar Narimgrekar
    Ramdas Mithbavkar
    Yogesh Kumbhar
    Sainath Jalvi (Sai Jalvi Films)
    Shubhangi Bhujbal
    #kokan #ganpatibappamoraya #ganeshchaturthi #ganeshotsav #kokani #kokanbeauty #marathiwebseries #webseries #marathicontent #aasova #sameerkhandekar #bhaktidesai #mukeshjadhav #gavgatagajali #malvan #malvanivideos #marathicomedyvideo #webseries

Komentáře • 1,5K

  • @abhaysurve6131
    @abhaysurve6131 Před 11 měsíci +66

    खूप छान वास्तववादी मालिका. डोळ्यात पाणी आणणारी व अंजन घालणारी मालिका. सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉💐💐💐

  • @saurabhpansare775
    @saurabhpansare775 Před 47 minutami

    आज पुन्हा एकदा सगळे भाग परत पाहिले…❤️❤️❤️
    डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही…

  • @suchitasaiya1439
    @suchitasaiya1439 Před 11 měsíci +27

    झिला चे character excellent... डोळ्यात पाणी आले... खूप सुंदर series

  • @VijaySupal
    @VijaySupal Před 2 hodinami

    खूप छान झाली आहे ही मालिका.. बरेच दिवसांनी डोळ्यांत पाणी आणले 😢

  • @AapaliSosalVaahini
    @AapaliSosalVaahini  Před 11 měsíci +12

    निरोप घेतो रसिकहो आता आज्ञा असावी,
    चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी🙏🏻
    “देवाक काळजी” चा आपला प्रवास इथेच थांबवत आहोत. या निमित्ताने “ आसोवा” कुटूंबात असंख्य रसिक जोडले गेले.
    आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा आणि आपली ही “देवाक काळजी” वेबसिरीज महाराष्ट्राच्या,जगाच्या कानाकोपर-यात पोहचवा❤️
    लवकरच भेटू..तोवर
    देवाक काळजी🙏🏻

    • @manishjathar7759
      @manishjathar7759 Před 11 měsíci

      कोकणात अजूनही खूप विषय आहेत, अशेच नव नवीन विषयाची मांडणी करा
      नवीन सिरीज ची वाट बघतोय..

    • @smallcaseproduction6399
      @smallcaseproduction6399 Před 11 měsíci

      खूप छान झाला 🎉

    • @Manju........444
      @Manju........444 Před 11 měsíci

      खूप खूप छान सिरीज बेस्ट बेस्ट बेस्ट मोरया मोरया नक्कीच millions व्हिवसला होणारर 🎉

    • @omkarnalawade4387
      @omkarnalawade4387 Před 5 měsíci

      जबरदस्त रचना वास्तविकतेच भान दाखवणारी सिरीज

    • @meenas826
      @meenas826 Před 4 měsíci

      Apratim,vastavache bhan teun kelele lekhan.

  • @ruchitasawant8693
    @ruchitasawant8693 Před 11 měsíci +1

    Seriously dolyat Pani aanlas... khupch sunder kathanak... devak kalji.. bappa asach saglyana ekatr thevo...

  • @jagruti153
    @jagruti153 Před 11 měsíci +117

    खुप छान झाला शेवट.....असाच घरोघरी च्या भाऊबंदकी चा होवो....हिच त्या गजानना ला प्रार्थना

    • @user-zq4ye7qs3p
      @user-zq4ye7qs3p Před 10 měsíci

      Aankhein pude pause vate

    • @prachimore6808
      @prachimore6808 Před 7 dny

      मस्तच आहे सिडीज घरोघरी ह्या गोष्टी घडतच आसतात हेच दाखवल आहात ह्यातून एकत्र यावे ही सिडी बघून ❤

  • @siddheshpingulkar6771

    अतिशय सुंदर आणि भावस्पर्शी सिरीज.....खूप कौतुक तुम्हा सर्वांचे....सर्वांनी बघण्यासारखी आणि मुद्दाम बघाच....पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन

  • @sumeetrane4384
    @sumeetrane4384 Před 11 měsíci +4

    पुढच्या वर्षी ११ दिवस जमले नाहीतरी ५ दिवस गौरी गणपती सोबत पुन्हा आमच्या भेटीस या. सर्वांनी अप्रतिम काम केलं आहे. गणपती बाप्पा तुमचं भलं करो. तुमची सर्वार्थाने प्रगती होऊन भरभराट होवो. बाकी देवाक काळजी🙏

  • @sohum18
    @sohum18 Před 20 dny

    मी ही सिरियल पुन्हा पुन्हा पहिली छान आहे अप्रतिमच. शेवटचा जो घराला पाया पडण्याचा क्षनाला डोळ्यात टचकन पाणी येते. हीच तुम्हाला पोच पावती.
    समीर अनभवणे मोंड देवगड

  • @ParPraRah
    @ParPraRah Před 11 měsíci +103

    Zhilla’s acting is remarkable. Loved this series. Everything is just perfect. So authentic Marathi writing Sameer. Lots of love and energy to you guys for your future work👏🏻👏🏻👏🏻

  • @abhishekrangnekar1533

    माझं गाव कोकणात सावंतवाडी वेंगुर्ला पण फक्त नावापुरताच आहे ना कोणी नातेवाईक ना घर परंतु आसोवा ची ही सिरीज पाहिल्यावर कोंकणात ज्यांची घरे आहेत तसेच गणपती बाप्पा पण बसतो त्यांचा आज खरंच हेवा वाटतोय, आयुष्यात खरंच कशाची कमी वाटत असेल तर त्याच उत्तर बहुतेक सापडलंय
    खरंच thank you aasowa
    ही सिरीज अशीच कायम राहील याचा प्रयत्न करावा
    आणि अश्याच आशयाची एखादी मालिका मराठी चॅनल वर करता आली तर पहावं खुपचं छान प्रतिसाद मिळू शकेल

  • @manjushreesahasrabuddhe7866
    @manjushreesahasrabuddhe7866 Před 11 měsíci +17

    मी वेब सिरीज कधीच बघत नाही पण ह्याचे चारी भाग लागोपाठ बघितले. असेच हृदयस्पर्शी विषय पाह्यला आवडेल❤

    • @smitakalamkar8391
      @smitakalamkar8391 Před 11 měsíci +1

      खरोखरच मनाला भावणारी वेब सिरीज. प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय मांडला.सगळ्यांची कामे अप्रतिमच.परत नवीन कलाकृती पहायला आवडेल

    • @vidyawaingankar6004
      @vidyawaingankar6004 Před 11 měsíci

      खूपच छान आहे सिरीज. डोळ्यांत टचकन पाणी आले. झिल्याचे पात्र बेस्ट

  • @Rahulshitap0509
    @Rahulshitap0509 Před 22 dny +2

    भावनिक विषयाला हात घातल्यामुळे डोळ्यातून पाणी आलं राव.....❤❤

  • @sandeepkelaskar4334
    @sandeepkelaskar4334 Před 11 měsíci +21

    खुपचं छान लेखणी ❤ आपल्या अभिनयातून खुप काही शिकण्यासारखे आहे... तुम्ही जिवंत अभिनय केला 👏👏👏 असेच व्हिडिओ बनवत रहा 🙏 देवाक काळजी 🙏 गणपती बाप्पा मोरया 🤩✨💫❣️

  • @supriyaredkar9317
    @supriyaredkar9317 Před 7 dny

    Khupch sunder khata😢😢😢😢..... Dole bharun ale .... Ganpati Bappa morya ❤❤❤

  • @swaminichavan_09
    @swaminichavan_09 Před 11 měsíci +9

    वाह...! समीर खांडेकरानचे आपल्या कोकणा बद्दल असलेला जिव्हाळा म्हणजे प्रश्नच नाही 🙏 लेखन आणि कॉन्सेप्ट खूप विचापूर्वक हल्लीच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आहे 👌👌 आणि प्रतेकाच्या आयुष्यात झीला ही व्यक्ती असावी.. शेवटी देवाक काळजी🙏🌸 #AsSoVa आणि पूर्ण देवाक काळजी च्या टीम चे मनपूर्वक अभिनंदन व खूप छान रीत्या आपल्या कोकणाला आपल्या कोकणातील सौंस्कृतिला दाखवले आहे त्या साठी पूर्ण टीम चे धन्यवाद 🙏👌...
    बा देवा महाराजा शंकर गजानना आपली सोसल वाहिनी या चॅनल च्या कलाकारांनी देवाक काळजी ही वेब सिरीज बनियली असा तिका खूप यश दी महाराजा .... व्हय म्हाराजा 🙏🙏🌸

  • @swapnilhalde4667
    @swapnilhalde4667 Před 11 hodinami

    अप्रतिम वेबसिरीज आणि झिल्या चे काम खूप सुंदर
    डोळ्यात पाणी आणलेत मित्रांनो ❤

  • @autisuresh
    @autisuresh Před 11 měsíci +12

    सर्व टीम चे अभनंदन 🎉🎉 लेखकाला मनाचा मुजरा, खूप सुंदर विषय , सर्व एपिसोड नी डोळ्यात पाणी आणलं काय बोलू अजून ... सर्वाचे पुन्हा अभिनंदन 🎉🎉

  • @MIKOKANINIKHIL
    @MIKOKANINIKHIL Před 6 dny

    निशब्द ❤😊

  • @maheshmuthe99
    @maheshmuthe99 Před 11 měsíci +16

    अतिशय छान शेवट.
    अप्रतिम सिरीज. सुंदर विषय आणि संकल्पना.
    दर्जेदार संगीत , लिखाण व अभिनय
    सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार 🙏🏼
    पुन्हा नवीन सिरीज ची आतुरता असेलच, तो पर्यंत....देवाक काळजी 🙏🏼🌺
    गणपती बाप्पा मोरया 🙏🏼🌺

  • @ommizunjarrao2000
    @ommizunjarrao2000 Před 27 dny

    अप्रतिम web series आहे खरंच रडायला आल, अशेच कौटुंबिक व मित्र मंडळ अश्याच web series बघून लोकांना मार्ग दाखवा 🫡♥️🙏 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ❤️ खरंच देवाक काळजी ❤

  • @shraddhapotdar5088
    @shraddhapotdar5088 Před 11 měsíci +7

    #AaSoVa धन्यवाद......इतकी भावस्पर्शी सिरीज बनवल्या बद्दल.....कौतुक करायला शब्द कमी पडतील इतका सर्व कलाकारांचा अभिनय सुंदर झालाय...झिला तर अप्रतिम.....संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🙏👌👍

  • @user-ed6bq6ug6q
    @user-ed6bq6ug6q Před 25 dny

    Season 2 👌👌👌👌👌🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉 Kiti Te Prem ❤❤❤❤❤

  • @akakki7447
    @akakki7447 Před 11 měsíci +33

    What a writing Sameer!! I must say that it this is true reflection of what Kokani Mumbaikar goes thru when you say bye bye to Ganapati Bappa and come back to Mumbai. Hats off to Sameer for remarkable writing and all actors are good special thanks to Zhila character. I still can’t get over this web series! I was eagerly waiting for episode -4 . Truly deserve for full fledge movie in future!!! I am from London but always miss Ganapati from Ratnagiri!!! Tremendous cinematography of Kokan! Please let us know which place this was shot in Kokan! Great work behind the lenses!

  • @markoyog
    @markoyog Před 11 měsíci +1

    मुकेश... किती छान भूमिका साकारलीस. खूप मोठा अभिनेता हो... संपूर्ण सिरीज, प्रत्येक एपिसोड छान आहे. कामंही सगळ्यांचेच छान. खूप शुभेच्छा तुम्हाला...

  • @pradnyachavan4702
    @pradnyachavan4702 Před 11 měsíci +5

    खुपचं छान....अनेक असे क्षण होते जेंव्हा डोळे वाहू लागले....गणपती बाप्पा मोरया... देवाक काळजी ❤❤❤

  • @umaraorane1235
    @umaraorane1235 Před 10 měsíci

    Khup sunder,Sameer,vastavvadi likhan.saglexh great actors,God bless you all.

  • @pradeepsale7674
    @pradeepsale7674 Před 11 měsíci +4

    अप्रतिम सादरीकरण अप्रतिम कथा अप्रतिम लोकेशन सर्व काही खूपच छान 👌👌
    मनात घर करून जाणारी गोष्ट...
    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...देवाक काळजी👍👍👌👌👌💐💐💐🫡🫡🫡

  • @pramodwalke3259
    @pramodwalke3259 Před 11 měsíci

    देवाक काळजी पहाणे ।
    योग आ सो वा 👌🥰
    सुदंर माडणी़ । उत्तम लेखन
    कोकणचा स्वाद । आणी आवशिक खाल्यान आमची मालवणी भाषा । पेजेबराबर आणखी काय व्हया ।
    बस पोट भरला मरे समीर। ।।

  • @preciouslife..withindianyo4826
    @preciouslife..withindianyo4826 Před 11 měsíci +9

    रडवलत रे तुम्ही लोकांनी.. असेच छान छान काय काय घेवून येत जावा.. उत्कृष्ट विषय... कलाकार.. अभिनय आणि picturization...❤❤❤❤❤❤..waiting for another new web series❤

  • @supriyasawant1469
    @supriyasawant1469 Před 11 měsíci

    Excellent writing,Zila is too good, dolyat pani ale . All character are.too good

  • @pramodshintre7367
    @pramodshintre7367 Před 11 měsíci +6

    खूपच छान....एकदम ह्रदयस्पर्शी खूप दिवसांनी काही चांगल पहायला मिळालं.... Hats off to zilas character...... Thank You For the heart melting web series 🙏🏼

  • @gharatepallavi318
    @gharatepallavi318 Před 9 měsíci

    देवाक काळजी... खरंच वास्तव विषय आणि तितकाच जिवंत, तगडा अभिनय. असं वाटत की सगळं आपल्या समोरच घडतंय. प्रत्येक पात्रात आपणच बोलतोय की काय असे जाणवते. कोकणाचं निसर्गसौंदर्य जेवढे वर्णावे तेवढे कमीच की.... मस्त मस्त असेच विषय घेऊन भेटत राहा. पुढील दैदीप्यामान वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @pratikshasawant4200
    @pratikshasawant4200 Před 11 měsíci +4

    जीवाला भावणारे संगीत आणि गोष्ट.पाठून येणारी संगीता ची साथ ही वेगळ्याच जगात घेऊन जाते.खूपच सुंदर.

  • @ritaparab8937
    @ritaparab8937 Před 11 měsíci

    सगळी सिरीज ज्याने टिपली आणि लेखक...दिग्दर्शक यांचे अगोदर खूप खूप कौतुक ...सगळी गोष्ट खूप सहजतेने मांडली होती..प्रत्येक वेळी प्रत्येक पात्रा बरोबर त्याच्या भावणांमध्ये गुंतत गेलो जणू स्वतः तिथे आहोत. विषय खूप नाजूक अगदी घरा- घरातलाच होताच. मुकेश यांचा अभिनय मनाला भावला आणि मनात घर करून गेला...सगळ्यांनीच खूप उत्तम पणे विषय पोचवला...सच्या तुला बघुन खूपच आनंद झाला... सगळ्यांचे आभार आणि अजून अश्याच खूप सिरीज साठी शुभेच्छा...आणि रडवलस मित्रा हे बोलण्या ऐवजी जिंकलस मित्रा हे वाक्य योग्य ठरेल.... बाकी तुम्ही यावेळेक उसळ दिलास न्हाय ता लक्षात ठेवा 😉

  • @rajsh9122
    @rajsh9122 Před 11 měsíci +10

    खूपच सुंदर, डोळ्यात पाणी आणलत मित्रांनो. Wonderful series with wonderful actors ❤ बाप्पा तुम्हाला भरगोस यश देवो 🙏🏻

  • @sandeshgharat642
    @sandeshgharat642 Před 11 měsíci

    खरचं खूप छान ... सुंदर विषय.... गणपती बाप्पा अशेच एकमेकांमधील क्लेश दुर करतो.

  • @user-gc4pe2qg5r
    @user-gc4pe2qg5r Před 11 měsíci +8

    गणपती बाप्पा मोरया ❤❤मराठी माणसं किती रागात असले तरी एक क्षण पुरेसा असतो मन जुळ्याला ❤❤ ASOVA ROCKS 🙏🏻🙏🏻देवाक काळजी रे

  • @user-cy3nn7rd2k
    @user-cy3nn7rd2k Před 11 měsíci

    झीलाचा अभिनय खरच मना ला स्पर्श करून गेला. (मुकेश जाधव) खरच खूप छान काम केलात.

  • @anjalishastri4624
    @anjalishastri4624 Před 11 měsíci +3

    खुप सुंदर....एका फटक्यात चारही episode पाहून टाकले.... अप्रतिम 👌👌👌👌🙏सगळ्या आघाड्यांवर उत्कृष्ट...पण सगळ्यात भावला तो झिला ❤️

  • @swatidesai7433
    @swatidesai7433 Před 11 měsíci

    Apratim.......sundar ....
    Aani shewat tar ekdam God.....khedekar sir....superb......excellent

  • @ajitraje1
    @ajitraje1 Před 11 měsíci +5

    मुकेश भाऊ तुमचा अभिनय कडक... लयभारी... अप्रतिम.... तुमच्या टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐

  • @sonusawant3242
    @sonusawant3242 Před 11 měsíci

    मालवणीतून बोलतय....... ऐक ते चार एपिसोड आसत ते ...एकदम भरी .. शब्द नाय माजा कडे.... डोळ्यासून पानी येण्या सारखे आसत....कोणी पण पाहुंदे....नक्की डोळ्यातून पाणी येणार..... सगळेच भरी आसत.....100 पैकी 100...आभार तुमचे येवडी चांगली सिरीज .... बनवलात.....❤ love u all

  • @diptisakharikar3121
    @diptisakharikar3121 Před 11 měsíci +5

    खूप अप्रतिम वेब सिरीज! सगळ्यांचा सहज सुंदर अभिनय! लेखन, दिग्दर्शन, फोटोग्राफी सगळंच अती उत्तम! खूप छान अनुभव दिल्याबद्दल सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @ketangadani5541
    @ketangadani5541 Před 11 měsíci

    अप्रतिम सागर खांडेकर रडू आला रे हे सीरीज बघून खूप छान ।।।। अशी सीरीज परत बघायला आवडेल आम्हाला।।।सगळांचा काम उत्तम होता।।।।गणपति बापा मोरिया मंगल मूर्ति मोरिया

  • @user-ch6bj9xw6g
    @user-ch6bj9xw6g Před 11 měsíci +4

    मन हेलावून टाकणारी कथा .....
    येवा कोकण आपलाच आसा ❤️❤️❤️

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Před 11 měsíci

    यार... यार... लय भारी.... खुप छान भावा.. भावा मध्ये असच प्रेम असुंदे.. रे महाराजा... पैसा.. संपती येते जाते.. पण एकदा माणूस गेला ना.. तर परत येत नाही..

  • @kmilind3660
    @kmilind3660 Před 11 měsíci +6

    खूप छान आणि सुंदर सिरीज आहे.. संपूर्ण टीम चे अभिनंदन ...🎉🎉🎉 ❤❤❤

  • @amod333
    @amod333 Před 11 měsíci

    रडवलतं मित्रांनो खुपचं अप्रतिम वेब सिरीज त्यात या वर्षी गणपतीला कोकणात जायला नाही मिळालं त्यामुळे अजूनच जिव्हाळ्याची झाली
    सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @prashantgavkar2678
    @prashantgavkar2678 Před 11 měsíci +5

    खूप लवकर संपवली webseries 😢.... १० episode तरी पाहिजे होते
    Climax ची कविता छान आहे...

  • @sudhir88able
    @sudhir88able Před 11 měsíci

    खूप छान आहे वेबसिरिज कोकणातल्या मातीतली समीर तुझा अभिमान वाटतो सर्वांना अभिनंदन ❤

  • @tejashreeshinde7403
    @tejashreeshinde7403 Před 11 měsíci +7

    Khupach chan Webseries… touched our hearts. Waiting for another season
    My fav character is Zhila 😊❤️

  • @anandgumaste6488
    @anandgumaste6488 Před 11 měsíci

    थुकरट इनोदी सिरीयल्स पेक्षा असा काहीतरी कसदार कन्टेन्ट हवा!! न्यायालयीन लढाईनंतरही इतका छान एपिसोड!! व्वा!! बहारदार!!! अभिनंदन आणि शुभेच्छा!!

  • @yogeshjogle5946
    @yogeshjogle5946 Před 11 měsíci +7

    एक अप्रतिम कलाकृती झाली आहे. सर्व च कलाकारांनी खुप छान काम केले आहे. विशेष उल्लेख झिला साकारणारे जाधव , समीर खांडेकर , दिव्या आणि भक्ती देसाई . समीर ची कविता पण एकदम मस्त. मालिकेच्या कित्येक प्रसंगात डोळ्यांतून नकळत पाणी तराळत आणि एक ओढ लागते आपल्या कोकण ची आणि तिथल्या गणपती उत्सवाची. गेली काही वर्षे मुंबईतला गणपती उत्सव खरोखरच हरवला आहे असे जाणवत होत त्याचं कारण बाप्पा ही कदाचित या मुंबई भूमी पासुन दूर होऊ पाहतोय आणि उत्सवाला आपल्या कोकणात च जातोय असे वाटत. तुमच्या सर्व टीम चे आभार आणि अभिनंदन. गणपती बाप्पा मोरया !🙏🙏🙏🙏

    • @yogeshjogle5946
      @yogeshjogle5946 Před 11 měsíci

      Poster boyz 2 aan Timepass ya madhil bhumike nantar ek vagala aani adhil saksham abhineta Samir Khandekar madhye disla ya web series madhyd

  • @user-rl3vm4hk9j
    @user-rl3vm4hk9j Před 11 měsíci

    Farach sundar kaljacha thaw ghenari gosht .....tachhkann dolyat pani aale....👌👌👏👏👏👏👍👍

  • @madhavidesai5420
    @madhavidesai5420 Před 11 měsíci +9

    सगळ्या कलाकारांचे अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤

  • @prashantnaik5576
    @prashantnaik5576 Před 11 měsíci

    शेवट गोड करी गणराया, शेवट गोड करी, खूप बारा वाटला, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @nandusawant3705
    @nandusawant3705 Před 11 měsíci +4

    Beautifully made all four episodes. Enjoyed it. 😊. After watching I really missed my village in Ratnagiri.
    Great work all.
    Nandu Sawant.
    Virginia, USA

  • @jayashrisawant4234
    @jayashrisawant4234 Před 11 měsíci

    आतून बाहेरून हलवून टाकले ,सर्व कलाकारांचे काम खूप अप्रतिम ,असेच सुंदर कोकणातील सिरीज बनवा,

  • @_kaivalyasamrajyachakravarti
    @_kaivalyasamrajyachakravarti Před 11 měsíci +8


    ||Ganpati bapa morya||
    🚩❤️✨

  • @manishadalvi8790
    @manishadalvi8790 Před 11 měsíci

    असेच घरोघरी एकी होऊ दे,मस्त खुप मनाला भावलं धन्यवाद 🙏

  • @nskanade
    @nskanade Před 11 měsíci +5

    Excellent story and very well scripted and executed.
    Hats off to all contributed.
    And more importantly, am glad this worked well even in the judiciary terms with you. Glad this came to us for view.
    Huge thanks to all.
    Love from Puneri heart residing in Melbourne ❤❤

  • @yugandharapage5674
    @yugandharapage5674 Před 11 měsíci

    खूप छान लेखन , दिग्दर्शन, अभिनय, विषय हृदयस्पर्शी होता , प्रत्येकाने आपली माणसं , बालपण , प्रेम , जिवलग मित्र , संस्कृती कधीच विसरू नये. बोधात्मक मांडली . असेच विषय हळूवार हाताळावे . पुढच्या एपिसोडची वाट पहातीये , ऑल द बेस्ट 😊😊

  • @jeevanshinde8490
    @jeevanshinde8490 Před 11 měsíci +7

    काही पण बोल पण एकदम कळीच्या मुद्याला हात घातला आहे आपण सगळेच मुंबईला राहत असलो 2035 पर्यंत हे असच राहील का इकडे विकास नको 2050 मधे लोक मागे वळून हेच शोधायला येतील विकास कितीही झाला मुंबईमध्ये तरीपण शांतता इकडेच मिळते असं नको व्हायला सगळे मुंबईकडे आणि तिकडे रान मोकळं झालय कोणी मारवाडी गुजरातीने आपले बंगले बांधले आहेत आणि आपण पैसे देऊन तिकडे राहतोय आणि हे आपल कोकण असं नको व्हायला कृपया काही करा घरे विकू नका

  • @veenamedhekar9668
    @veenamedhekar9668 Před 11 měsíci

    अतिशय सुंदर ,असेच उत्तरोत्तर व्हीडिओ येऊ देत ,🙏🙏 आणि देवाक काळजी ,असे अनेक व्हीडिओ येणार आणि प्रेक्षकांच्या पसंतीस येणार याची 100 टक्के खात्री आहे

  • @ashwinipatwardhan5539
    @ashwinipatwardhan5539 Před 2 měsíci

    मी मित्रम्हणेच्या एपिसोड नंतर पाहीली....खूप खूप सुंदर .सगळ्यांच्या भूमिका अप्रतिम .झिल्या खूप छान आणि खरा ..

  • @suvarnalatasonawane6455
    @suvarnalatasonawane6455 Před 11 měsíci

    Khup chhan story. Kakanatale Ganapati Bappache darshan n natural soundrya khup chhan.

  • @tusharnaik327
    @tusharnaik327 Před 9 měsíci

    खरंच खूप अतिशय सुंदर सिरीज.....एकदम डोळे भरून आले.......heart touching.

  • @user-pj2wl8kn6z
    @user-pj2wl8kn6z Před 11 měsíci

    झिला हा कोकणातील प्रत्येक घरातील एक भाग आहे आणि त्याचे उत्तम चित्रीकरण झाले त्यातच आमचा मुकेश एक गुणी कलाकार तसे आपण सर्वच उत्तम आहातच, मुकेश त्याच्या भूमिकेबाबत शंकाच नाही हृदय हालवून टाकल पोरांनी. आई जगदंबा तुमच्या पाठीशी आहेच.अशी मस्त मस्त विषय घेवून या. 🙏🙏🚩🚩 जगदंब 🙏🙏🚩🚩 पुढच्या वर्षी लवकर या.

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 Před 11 měsíci

    अप्रतिम बेबसिरीज काय लिहीणार शब्दच अपुरे पडतात सगळ्या कंमेंटस भारी खुप छान सिरीज मी खुप खुप रडले ही पाहताना खुप दिवसांनी कथा छान कलाकार छान लोकेशन छान काहीच कशात कमी नाही तुमची टिम भारी खुप खुप शुभेच्छा तुमच्या टिमला खुप यशस्वी व्हा आसोवा की जय हो

  • @tusharrane102
    @tusharrane102 Před 11 měsíci

    अत्यंत सुंदर अशी वेबसिरीज. आमच्या जिव्हाळ्याचा असलेला विषय खूप छान हाताळलात. आणि त्यात आमच्यासारख्या खेडेगावातल्या कलाकारांना कॅमे-यासमोर काम करायची संधी दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार... आणि या गोष्टीचा विशेष आनंद आहे की आपल्या नारिंग्रे गावात याचं चित्रीकरण झालं, आपल्या गावाचं सौंदर्य हजारो लोकांनी पाहिलं. ही वेबसिरीज लाखो लोकांनी पाहावी हिच परमेश्वर चरणी प्रार्थना... आणि आसोवाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.... यापुढेही असंच लोकांच्या काळजाला हात घालणारं काम करत राहा... आम्ही कायम सोबत आहोत...

  • @surajdevlekar2295
    @surajdevlekar2295 Před 11 měsíci

    भारी...खूप भारी....झीला या भूमिकेसाठी spl कौतुक ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vilasnarkar9870
    @vilasnarkar9870 Před 10 měsíci

    खुप सुंदर वेब सिरीज आहे.
    मला ही सिरीज आपलीशी वाटली.
    तुम्ही जे कलाकार घेतले ते जबरदस्त आहेत.
    माका ही सिरीज खुप खुप आवडली.
    तुम्ही शेवट सगळ्याका रडून सोडलास.

  • @neetashivalkar5907
    @neetashivalkar5907 Před 11 měsíci

    माका ही सिरीज लय आवाढली मच्छिंद्र कांबळी साहेब नंतर मालवणी माणसाचा काळीज जिंकणारी एक नंबर कथा सादरीकरण. अशेच मालवणी सिरीज, नाटक, चित्रपट, सीरियल बनवा. देव तुमचा भला करो

  • @pratikshapawar1280
    @pratikshapawar1280 Před 11 měsíci +1

    खूपच अप्रतिम खूपच अप्रतिम

  • @shanghaichinesecorner9273
    @shanghaichinesecorner9273 Před 11 měsíci +2

    ही सीरिज खुप वर्ष लक्षात ठेवली जाईल.

  • @rohit9860
    @rohit9860 Před 10 měsíci

    प्रत्येक कुटुंबाने बघावी अशी वेबसिरीज नव्हे तर प्रत्येक कुटुंबातील गोष्ट ,❤👌👌👌👌🙏

  • @pankajsalgaonkar2535
    @pankajsalgaonkar2535 Před 8 měsíci

    मस्तच ... कमाल लेखन दिग्दर्शन, कॅमेरा , अभिनय , मेकअप , सगळच अप्रतिम

  • @satyawansawant8575
    @satyawansawant8575 Před 11 měsíci

    साध्य कोकणातील घरघरात असलेली स्टोरी. खूप छान.

  • @shrutibane4104
    @shrutibane4104 Před 11 měsíci

    Khup mst ahe Webb डोळ्यात पाणी आलं.ganpati बाप्पा मोरया 🌺👍

  • @prashantk7671
    @prashantk7671 Před 2 dny

    निशब्द आहे सगळं काही ❤

  • @shaileshvaze3098
    @shaileshvaze3098 Před 11 měsíci

    Dolyat pani aale.... sunder....
    Love you to all....
    Ganpati bappa morya...

  • @vinayakgawas1556
    @vinayakgawas1556 Před 11 měsíci

    खूपच छान आवडला डोळ्यातून पाणी पण आलं आज आशा मालिकांची खरोखर गरज आहे जेणेकरून कुटुंब टिकतील

  • @anitashinde908
    @anitashinde908 Před 10 měsíci

    छान शेवट असे वाटले आपल्याच घरातील कथा आहे हृदय स्पर्शी कथा आहे फार छान

  • @amitmhaskar8128
    @amitmhaskar8128 Před 10 měsíci

    चारही एपिसोड्स अतिशय उत्कृष्ठ झाले आहेत सर्वांचे काम उत्कृष्ठ झाले आहे आणि विशेष म्हणजे झिला हया character चे काम अतिशय उत्कृष्ठ आणि नैसर्गिक झाले आहे मालिका खूपच टचिंग झाली आहे
    आपल्या सर्व टिमला धन्यवाद आणि अनेकोत्तम शुभेच्छा ❤

  • @shirishsarpotdar1025
    @shirishsarpotdar1025 Před 11 měsíci

    खूप छान .... कोकणात एकमेकाला लांबूनच साद घालण्यासाठी 'कुकारे'केले जातात..अगदी एका टेकाडा वरून दुसऱ्या टेकाडावरचा घरापर्यंत.. 'जीवंत मिसकॉल' प्रत्येकाचा कुकारा युनिक असतो बरं...मी सुद्धा अनुभवलेत कुकारे... हा कुकाराच एकमेकाला खुल्या मनाने जोडतो... प्रतिसाद द्यायला उद्युक्त करतो ...अगदी आतून मोकळं करतो.... पुन्हा एकदा शुभेच्छा💐

  • @pradnyaranshinge6167
    @pradnyaranshinge6167 Před 11 měsíci

    खूपच सुंदर... सगळेच कलाकार अप्रतिम...झिला तर बेस्टच....आसोवाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @adityaraorane2564
    @adityaraorane2564 Před 11 měsíci

    खूप छान वास्तववादी मालिका असेच छान हृदयाला स्पर्श करणारे मालिका दाखवा आणि कोकणचे निसर्ग बघुक मिलतला

  • @nitaraul1623
    @nitaraul1623 Před 22 hodinami

    ❤ touching episode missing my brother 😊

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 Před 11 měsíci

    Khup chan... Saglyani chan kam ... Bhumika kelya... All the best...ani Thanks.

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 Před 11 měsíci

    खूप खूप धन्यवाद अशी अशी च आपली वहीनी कार्यकरत राऊंदे

  • @sakharamgawade6970
    @sakharamgawade6970 Před 11 měsíci

    जय गणेश
    गणेश सर्वाना असाच आशिर्वाद देवो.

  • @user-up6ej5vc6l
    @user-up6ej5vc6l Před 11 měsíci

    Pratyek kokani manasashi nigadit gosht, khup chaan

  • @Megh6675
    @Megh6675 Před 11 měsíci

    खूप सुंदर सादरीकरण, कथा, संवाद, अभिनय, आणि फोटोग्राफी कॅमेरा शॉट्स उत्तम. झिला चं काम करणाऱ्या जाधव यांचा अभिनय अप्रतिम.

  • @vinayrane5022
    @vinayrane5022 Před 11 měsíci

    खरंच अप्रतिम विषय आपण सर्वांपर्यंत पोचवलात. सुंदर सादरीकरण प्रत्येकाच्या कामाचे अगदी मनापासून कौतुक...खूपच भावस्पर्षी अनुभव......धन्यवाद

  • @snehalsapte8748
    @snehalsapte8748 Před 11 měsíci

    खरच खूपच छान दाखवल.असाच शेवट कोकणातील घरा घरातील भा ऊबंदकीचा होवो आणि पुन्हा एक😅दा कोकण माणसांनी फुलून जाऊ दे.याबद्दल मि.समीर खांडेकरां चे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद! 😊कारण मीही लहानपणापासून कोकणात येते
    त्यामुळेच ही गोष्ट मनात खूपच भावली. माझ माहेर देवगड.
    एक गोष्ट इथे नमुद करावीशी वाटते की मी एकदा गोव्याला जात असताना तेजसच्या "वीस्टा डोंब "मध्ये मि.समीर हे माझ्या पुढच्याच सीटवर बसले होते .मला त्यांना हाय् करायची फार इच्छा झाली होती पण इतक्या महान व्यक्तीशी कस बोलाव? अस वाटल.

  • @tsrane
    @tsrane Před 11 měsíci

    फारच छान. सांगता अर्थपूर्ण असा हेची दान देगा देवा या अभंगाने केलीत खूप प्रसन्न वाटले. माझ्या आजोबांच्या आवडत्या अभंगापैकी हा एक.
    गणपती बाप्पास एकच गाऱ्हाणे की या आसोवाचा विसर आम्हास न व्हावा. आपल्या नवनवीन कार्यक्रमातून आपली भेट व्हावी. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👏👏🎉

  • @hanumantparab926
    @hanumantparab926 Před 11 měsíci

    Khup sunder mi char hi episode baghitale sarvachi bhumika apratim❤👌👌👌👌👌

  • @sayalibrid7772
    @sayalibrid7772 Před 11 měsíci

    खूपच छान ह्दयाला भावली वास्तवादी.पूढील कामासाठी शुभेच्छा