वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहितीपट | A documentary on Betel leaves of Vasai

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 10. 2020
  • वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहितीपट
    एकेकाळी वसईतील केळी व सुकेळींसोबतच वसईची विड्याची पानं सुप्रसिद्ध होती व ही पानं लाहोर आणि पेशावरला निर्यात केली जायची ह्यावर कदाचित आज कुणाचा विश्वास बसणार नाही. पानवेल हा वसईचा मुख्य व्यवसाय होता व हिंदू व ख्रिश्चन वाडवळ समाज ह्यात अग्रेसर होता. आता हे वैभव लयास जात आहे व केवळ एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतके पानवेल शेतकरी वसईत उरले आहेत.
    आज वसईतील देवाळे ह्या गावातील श्री. नरेंद्र पाटील ह्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत व जाणून घेणार आहोत,
    १. पानवेलींची लागवड
    २. ह्या व्यवसायाचा इतिहास
    ३. सद्यपरिस्थिती
    ४. ह्या व्यवसायासमोरील आव्हाने
    ५. ह्या व्यवसायाचे भवितव्य
    आपल्याला हा व्हिडीओ आवडला तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद.
    विशेष आभार,
    श्री. नरेंद्र पाटील, देवाळे ९७३००७३१०७
    श्री. हरिष पाटील, मांडलय
    श्री. मनीष म्हात्रे, नाळे
    डॉ. नॅन्सी डि'मेलो, गास
    छायाचित्रण व संकलन
    अनिशा डि'मेलो
    वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
    वसईचा केळीवाला - एक माहितीपट
    • वसईचा केळीवाला - एक मा...
    वसईच्या ऑर्किडची कहाणी
    • वसईच्या ऑर्किडची प्रेर...
    सफर वसई किल्ल्याची
    • सफर वसई किल्ल्याची | व...
    प्राचीन वसईचा इतिहास
    • प्राचीन वसईचा इतिहास |...
    वसईतील बैलगाडीवाले शेतकरी
    • २०२० मध्ये बैलगाडी वाप...
    #vasaiculture #betelleaf #vasaifarming #vasaidocumentary #sunildmello

Komentáře • 835

  • @joyfargose9416
    @joyfargose9416 Před 3 lety +15

    सुनील डिमेलो जी आपण वसईतील शेतीच्या माहितीचे संकलन करता ते अत्यंत स्तुत्य आहे, या वसईतील शेतीच्या माहितीच्या संकलनाबरोबरच वसईतील शेतीच्या संवर्धनासाठी वसईतील स्थानिकांना प्रयत्न करण्याचे आवाहन देखील करावे हि विनंती विनंती.👍👍 कारण आजकाल शेतजमीन विका आणि पैसे कमवा अशी स्थिती निर्माण झालेली आहे..स्थानिकांनो शेती करा ,शेती टिकवा व शेत जमिनी विकू नका 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      ह्या माध्यमातून हेच सर्व दाखवायचा प्रयत्न असतो. आम्ही अजून प्रभावीपणे हा मुद्दा मांडायचा प्रयत्न करू. शेती टिकायलाच हवी. धन्यवाद.

    • @suryakantbhoir9133
      @suryakantbhoir9133 Před 2 lety

      sir ha video uplode करून नगवेल ची माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. Sir मला हा गाव नकाशा मध्ये मिळत नाही काही मदत करू शकता का जेणे करून ह्या वेळी बदल माहिती घेऊन तिथून रोपे विकत घेऊन लागवड करावी असा विचार चाललय

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 Před 3 lety +4

    सुनिलजी नमस्कार. श्री. नरेन्द्र पाटील काकांच्या पानांच्या माळ्याचा एपिसोड मी आणि माझ्या बायकोने आज पाहिला.योगायोग म्हणजे, माझे आजेसासरे देखील पानवेलीची शेती मौजे काळसे, तालुका मालवण जिल्ला सिंधुदुर्ग येथे करत होते. श्री. पाटील काकांच्या कष्टाला आणि जिद्दीला लाख लाख सलाम. शेतमालाला मागणी नसताना देखील प्रामाणिकपणे आपल्या पानांच्या माळ्याची मशागत श्री. पाटील काका करतात हे पाहून त्यांचा अभिमान वाटतो. काहीसे दुःखं ही होते कारण आज पारंपरिक शेती आणि शेतकरी लुप्त होणाच्या मार्गावर आहे. खरं तर आज काळाची गरज शेती आणि शेतकरी ह्यांना वाचविणे होय.पुन्हा एकदा पाटील काकांचे व तुमचं खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा. शक्य झाले तर तुमच्या सारख्या स्थानिक जिद्दी तरूण मंडळींनी ह्या कामी पुढाकार घेतला पाहिजे तरंच ही पारंपरिक शेती आपण वाचवू शकू. ह्या कामी माझ्या कडून काही मदत होऊ शकल्यास कृपाकरून मला सांगा . मला शेतीची खूप आवड आहे पूण माझे गाव फारच दूर सावंतवाडीला आहे त्यामुळे माझें शेती करण्याचे चे स्वप्न केव्हा साकार होईल ते माहित नाही. पण श्री. पाटील काका सारख्या लोकांनी पारंपरिक शेती चालू ठेवावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. परमेश्वराकडे प्रार्थना की ह्या देशातील शेती आणि शेतकरी हयांना चांगले दिवस येवोत.

  • @rkrkrkrk6665
    @rkrkrkrk6665 Před rokem +3

    एका वसईत किती विविधता आहे कितीतरी व्हिडिओ एका वसई वर बनू शकतात ,
    खूप सुंदर मन जिंकलंस भावा

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद

  • @sachinlimaye6006
    @sachinlimaye6006 Před 2 lety +3

    सुनील जी नमस्कार
    आपण माहिती दिल्यामुळे खूप सार ज्ञान झालं
    धन्यवाद
    ईश्वर तुम्हाला तुमच्या कार्यात यश देवो

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद, सचिन जी

  • @kishorvartak3819
    @kishorvartak3819 Před 3 lety +41

    सुनीलजी आपण फारच चांगली माहिती जतन करत आहात त्याबध्दल आपले खास अभिनंदन.
    आमच्या देवाळे गावातील पानवेल ही एकेकाळी फारच प्रसिध्द होती.त्यावेळी बिबला म्हणजे बदामाच्या आकाराचे मोठे पान,त्यानंतर आडक् म्हणजे मिडीयम आकाराचे पान आणि छोट्या पानाला मोडवण असे संबोधले जात असे.आमचे आजोबा कै.पदमणशेठ वर्तक हे त्याकाळी पानवेली ,केळी व सर्व प्रकारच्या भाजीपाला ह्या मध्ये बागायती शेती करण्यात प्रसिध्द होते.त्यावेळी पाने पाकिस्तानला पाठविली जात असत त्यामुळे चांगला भाव मिळत असे.पुढे पुढे भारत सरकारने पाकिस्तान बरोबरचे संबंध बिघडल्याने हा व्यापार बंद केला.त्यामुळे देशा अंतर्गतच सिमीत राहिला.पुढे पुढे होळीच्या बाजारामध्ये माल जास्त व व्यापारी कमी झाले.काही सदन शेतकरी एकत्र येऊन सोसायटी स्थापन केली परंतु फार काळ टिकली नाही.त्यावेळी देवाळे गावात घरोघरी पानवेल लावली जात असे.लिहीण्या सारखे पुष्कळ आहे 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      किशोर जी, आपण आपल्या प्रतिक्रियेतून पूर्ण इतिहास उभा केलात. खूप खूप धन्यवाद.

    • @SaratGodbole
      @SaratGodbole Před 3 lety

      देवाळे गावाकडे वसई स्टेशनवरून कोणती बस जाते? देवाळे गाव कुठून जवळ पडेल? नालासोपारा/ नायगाव/वसई स्टेशन?

    • @sunitapatil7860
      @sunitapatil7860 Před 3 lety

      @@SaratGodbole वसई

  • @nandkumarnalawade5439
    @nandkumarnalawade5439 Před 3 lety +2

    त्रयोदशी - गुणी आरोग्यवर्धक पानविडा !
    घालवी मुखदुर्गंधी व कफाची पीडा !!
    सुरेख व ज्ञानवर्धक माहिती !!!
    कोणे एके काळी एखादे कठीण काम करण्यासाठी ' पैजेचा विडा '
    उचलत असत !!!!
    त्याकाळी ह्या विड्याला असणारं महत्त्व ही बाब अधोरेखित करते .
    सुरेख माहिती , धन्यवाद .

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      वाह! आपल्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, नंदकुमार जी

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 3 lety +3

    सुनील,खरंच बाबा कमाल तुमची किती अस्खलित मराठी बोलता. ऐकत राहावंसं वाटतं आणि हे नरेंद्र काका पण खूप छान माहिती सांगतात.पानवेलीची लागवड आणि मळे मी पहिल्यांदाच पाहिले.धन्यवाद..पण एक मनोमन इच्छा आहे जमल्यास एकदा तुमच्या वसई गावाला भेट देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायची.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      वसईला आपलं स्वागत आहे, संदीप जी. नक्की या, धन्यवाद

  • @lavetdabre9116
    @lavetdabre9116 Před 3 lety +5

    उत्तम माहितीपट... वसईत राहूनही वसई बद्दलची अज्ञात बाजू तुमच्यामुळे नेहमी पुढे येते.
    👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूब खूब आबारी, लवेट

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Před 3 lety +11

    सोमवंशी क्षत्रिय पाठारे हया समाजातील ‌लोक......पण वाडीत जे काम करत त्यांना वाडवळ म्हटले जाते आणि जे पानांची लागवड करत ... त्यांना पानमाळी असे संबोधले जाते...बिंबराजाचे वंशज आम्ही...!! छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...

  • @mohanchipte4612
    @mohanchipte4612 Před 3 lety +14

    सूनिलजी अभिनंदन .खूपच छान माहिती दिली आपन खेळीमेळीने घेतलीली मुलाखत मनाला भावली.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद, मोहन जी

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 Před rokem +2

    वसई माझ आवडते ठिकाण आहे
    कारण मी वज्रेश्वरी ला वसतिगृहात
    शिकायला होते.एके दिवशी
    आई म्हणाली आपण वसई वरून
    ट्रेन ने जाऊ आणि आम्ही दोघी
    निघालो ट्रेन हळू हळू निघाली
    आणि पाहते तर काय ते वसई च
    रूप हिरवा शालू च जणू पांघरूण
    नटली आहे खूपच सुंदर तो देखावा होता
    मी दोन मुलांची आई झाले .पण ते
    वसई च सौंदर्य अजून ही
    माझ्या डोळ्यात साठवून ठेवले आहे.
    Thank you, and God 🙌bless
    You my small brother. Love you

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem +1

      वाह, आपल्या आठवणी सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी

  • @durgakulkarni4802
    @durgakulkarni4802 Před 5 hodinami

    खुपचं छान माहिती दिलीत आपण नरेंद्र काकांनी आणि दादांनी आमच्या पर्यंत पोहचवलीत खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @pratiksalvi2217
    @pratiksalvi2217 Před 3 lety +1

    प्रेसेंटेशन स्किल अप्रतिम.... भाषा शुद्ध.. आणि त्यावरील प्रभुत्व एकदम झक्कास....

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, प्रतीक जी

  • @ashokjadhav2394
    @ashokjadhav2394 Před 3 lety +3

    👌मातीचा सुगंध जपनारे आपल्या निरमळ कोकंणी माणसांची परीसरतील पध्दती व भाबडेपणा पाहून मन हेलावले.😢💐
    👋आमचा आशीर्वादच सर्वाना.🌷🌿🌷🇮🇳

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अशोक जी

  • @ashieshsarpotdar2270
    @ashieshsarpotdar2270 Před 3 lety +3

    नरेंद्रकाका खरंच ग्रेट आहेत किती प्रसन्न आणि उत्साही आहे त्यांचं व्यक्तिमत्त्व! ..खूप आवडला व्हिडीओ👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      हो, काका खूपच उत्साही आहेत. धन्यवाद, आशिष जी

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 Před 3 lety +4

    नेहमीप्रमाणेच अतिशय सुन्दर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ!
    सुनीलजी तुम्ही ज्याप्रकारे मुलाखती घेता तशा सुन्दर, ओघवत्या आणि शुद्ध मराठीतील मुलाखती मोठमोठ्या टीव्ही चॅनेल्सच्या अँकर्सनाही जमत नाहीत. आणि वर त्यांची मराठी भाषाही तुमच्या इतकी शुद्ध नसते.
    तुमचे उच्चार म्हणजे घासून लखलखीत केलेल्या शुद्ध स्फटीकासारखे नितळ आणि सुंदर असतात. 👌
    आणि आपल्या प्रत्येक मुलाखतीत तुम्ही प्रत्येक बारीक सारीक मुद्दा टिपता हेही खूप कौतुकास्पद आहे. उत्तम निरीक्षणशक्ती असल्याशिवाय हे शक्य नाही. आणि प्रत्येक मुलाखतीअगोदर तुमचं त्या मुलाखतीबाबतचं Home Work ही नक्कीच असणार. ते तुमचं Home Work ही नक्कीच वाखाणण्याजोगं आहे.
    Keep it up! 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      जयदीप जी आपण नेहमीच खूप छान प्रतिक्रिया देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

    • @jaideepshinde7492
      @jaideepshinde7492 Před 3 lety +1

      @@sunildmello धन्यवाद.

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 Před 3 lety +12

    🙏👍सुनील सर आणि अनिषा ताई यांस अभिवादन....!!!!
    सदर वसई गावातील देवाले गाव आणि त्यातील नरेंद्र पाटील यांची विड्याची पाने, पानवेल, नागवेलीची पाने याची शेती म्हणजे पारंगत बागायतदार यांच्या शेती विषयक अहर्निश मेहनतीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल.👍अप्रतिम, छान, सुंदर अशीच चित्रफीत. काकांनी सुंदर असे वर्णनात्मक माहिती सुनील सराना दिली आणि सरांनी अतिशय धूर्तपणे, चतुराईने, जिज्ञासू वृत्तीने काकांकडून माहिती मिळवली आणि अविस्मरणीय असा माहितीपट प्रदर्शित केला.🙏❤️👍👍👍
    सदर चित्रफीत याचा स्तर म्हणजे जादुई म्हणजेच ऑस्ट्रेलिया चे नामवंत , सुप्रसिद्ध गोलंदाज ग्लेन McGrath यांची तुफानी भेदक ,स्विंग, जादुई गोलंदाजी.भले भले त्यांच्या गोलंदाजी समोर नांगी टाकत असे, अक्षरशः ढेपाळायचे👍❤️🙏
    सुनील सर या यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर असे दुर्मिळ चित्रफिती कार आहेत की त्यांची एक चित्रफीत, माहितीपट, लघुपट म्हणजे १०० चित्रफीत एवढी बरोबरीची आहे असे माझे मत आहे.🙏अनिशा ताई यांचे चित्रीकरण आणि सुनील सरांची, सौहार्द पूर्ण, जिव्हाळा युक्त, प्रेमळ, ह्रदयस्पर्शी,👍👍❤️👍🙏👌💯✌️❤️✌️
    मंत्रमुग्ध अशी संवाद शैली यांचा समन्वय म्हणजे यश चोप्रा यांच्या चित्रपटातील आरस्पानी सौदर्य सारखे असते.👍❤️
    👍मांडव तील उतरण, हरल, धाड हे शब्द अनोखे , विस्मयचकित करणारे असेच.👍
    म्हणूनच ज्यावेळी सर्व शांत असते त्यावेळी सुनील सरांसारखे दुर्मिळ चित्रफीत कार रुपी वादळ अश्या आशय, विषयाचे रोचक, रंजक माहितीपट, लघुपट, वैविध्यपूर्ण चित्रफिती अश्या स्वरूपात घेऊन येते. या यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर हे वादळ घोंघावत असते त्यावेळी भले भले आश्चर्यचकित होऊन पाहत बसतात..👍❤️👍🙏.असो..👍 देव बरे करो 👍 बेस्ट ऑफ लक 👍 लक का गेम 👍 श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏 चूक भूल असेल तर क्षमस्व 👍🙏 Free Lancer Conference Stenographer 🖲️💻⌨️🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      गिरीश जी, आपल्या प्रतिक्रियेची मी नेहमी वाट पाहत असतो कारण आपण पूर्ण व्हिडीओ पाहून विस्तृत आणि मार्गदर्शनपर प्रतिक्रिया देता. खूप खूप धन्यवाद.

  • @deephalayedeshmukh5246
    @deephalayedeshmukh5246 Před 3 lety +4

    Sunil Dimelo Thanks Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan Sunil bhau pudil karyas hardik shubhecha 👍💐🌹⚘🚩🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, दीप जी.
      जय हिंद!
      जय महाराष्ट्र!!
      जय कोकण!!!
      वंदे मातरम्!!!!

  • @anantparayane927
    @anantparayane927 Před 3 lety +5

    नष्ट होत चाललेल्या वसईतील शेती वाडीची तुझी आस्था खरोखरच प्रशंसनीय आहे...धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, अनंत जी

  • @NehaThakur-wj8us
    @NehaThakur-wj8us Před 3 lety +4

    खूप छान माहितीपट...प्रथमच एवढी नागवेलीची पान पहिली..… आपुलकीने माहिती सांगण्याचा काकांचा उत्साह आवडला.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, नेहा जी

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Před 6 měsíci +4

    नागवेळी पानाबाबत चांगली माहिती मिळाली.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 6 měsíci +1

      धन्यवाद, दिगंबर जी

  • @manohargarmale4054
    @manohargarmale4054 Před 3 lety +3

    खुप छान वाटलं. आवडीने पाहीले व
    ऐकले, नरेंद्र साहेबांनी खूप छान माहिती दिली.
    धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, मनोहर जी

  • @Nishan29nandaimata
    @Nishan29nandaimata Před 3 lety +3

    सुनिल दादूस तुमच्या चॅनेल मुळे वसई वरील प्रेम द्विगुणित झालं👌👌
    काकांचे सुद्धा विशेष आभार. ज्यांनी सविस्तरपणे अप्रतिम माहिती दिली.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, निशांत जी

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Před 2 lety +1

    शेतकरयांचया समस्यांकडे कोणीही लक्ष देत नाही.त्यांना हमी भाव मिळायलाच हवा.तरच शेतकरी तग धरुन राहील,नाहीतर पुढचा काळ आणखी कठीण असेल त्यांच्यासाठी असच वाटत राहत.
    सुनिल तु काकांना चांगल बोलत केल,योग्य प्रश्न विचारले त्यामुळे
    सविस्तर माहीती पानवेलीच्या शेतीबाबत मिळाली.काकांनाही धन्यवाद.
    वसईच्या लौकिकात भर टाकणारा हा शेतकरी आणी बागायतदार टिकला पाहीजे त्यासाठीच्या तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाव.येणारया पिढीने
    हा निसर्ग आणी परंपरा जपायला हव्यात हीच आशा बाळगुन आहोत आम्हीही.
    नेहमीप्रमाणेच हाही विडिओ छान होता.
    खुप खुप..... धन्यवाद
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
    khup khup... DHANYWAD

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      हो, शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळायला हवा. धन्यवाद, मंगेश जी

  • @tejaswidharnaik7839
    @tejaswidharnaik7839 Před 3 lety +3

    खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकर्‍यांची इतके वाईट वाटते पण तुमचा विडिओ खुपच आवडला छान वाटले हिरवी हिरवी पाने पाहून 🙏🙏👏👏👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, तेजस्वी जी

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 Před 3 lety

    अशी चांगली शेती व चांगल्या गोष्टींची लागवड..आता नामशेष होताना पाहून खूप वाईट वाटते...मागच्या पिढीकडून शिकून जरा नव्या पिढीने पुढे नेले नाहीतर हे त्यांचे अनुभव व कला फुकट जाणार...वसईत तरी हे टिकून राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना...छान video

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      अगदी बरोबर बोललात, रश्मी जी. धन्यवाद

  • @nutanmhaske84
    @nutanmhaske84 Před 5 měsíci +2

    मी तुमचे video नेहमी बघते
    वसई तील शेती चे video दाखवता मस्त आहे माहिती मिळते असेच नविन व्हिडिओ दाखवा

    • @sunildmello
      @sunildmello  Před 5 měsíci

      खूप खूप धन्यवाद, नूतन जी

  • @manojpatil2024
    @manojpatil2024 Před 3 lety +4

    सुनील,अप्रतिम आपल्या शेतकरी मित्राचे वास्तव जगासमोर आणले,अभिमान वाटला .👍👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, मनोज जी

  • @unnikrishanan6434
    @unnikrishanan6434 Před 3 lety +13

    हो आम्ही नेहमीच तांदुळ,केळी आणि आमच्या आत्या काकी आणायला स्पेशल वसईला यायचो.एकोणीसे पच्याहत्तर पर्यंत येत होतो.नंतर आई पण वारली. आईला खूप वेड होत वसईच.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      हा व्हिडीओ पाहून आपल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या...धन्यवाद, ऊन्नी जी

  • @kolisandesh260
    @kolisandesh260 Před 3 lety +41

    पनवेल ला सुद्धा पूर्वीच्या काळी पानवेलांची प्रचंड लागवड व्हायची....त्यावरूनच पनवेल हे नाव पडले

    • @krutantsatam1310
      @krutantsatam1310 Před 3 lety +4

      Good information

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +4

      ह्या महत्वपूर्ण माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, संदेश जी

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      @@gayatripatil3165Ji, thank you.

  • @ashokdawande9542
    @ashokdawande9542 Před 3 lety +3

    भाऊ तोरसेकर, आपण आजारी असल्याचे स्वतः सांगीतले.आपण या आजारातुन लवकर बरे व्हावे हिच परमेश्वर चरनी प्रार्थना. अशोक दवंडे, वर्धा.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      अशोक जी, बहुतेक आपल्याला ही प्रतिक्रिया भाऊंच्या चॅनलवर टाकायची होती ती चुकीने येथे टाकली गेली आहे. धन्यवाद

  • @ashwinipokle8089
    @ashwinipokle8089 Před 3 lety +3

    सुनील जी तुम्ही जो हा उपक्रम चालवला आहे तो फारच स्तुत्य आहे , आता आयुर्वेदिक उपचारासाठी विड्याची पाने वापरण्यावर भर दिला आहे। त्यामुळे व चुना ह्यामुळे आपले शरीर स्वास्थ्य वाढते। तेव्हा हा उद्योग दिवसेंदिवस वाढो हीच प्रभू चरणी प्रार्थना।

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी

  • @prashantbarde2189
    @prashantbarde2189 Před 3 lety +1

    सुनील बाबा किती रे छान मुलाखत घेतो किती रे डिटेल माहिती खूप छान , पार वंशज पासून ची माहिती शेती ची ही खूप सारी माहिती

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रशांत जी

  • @francisdsouza7556
    @francisdsouza7556 Před 3 lety +3

    Thanks so much for Nice Sunil D Mello Vasai Thanks Again God bless you

  • @sanketchaudhari7539
    @sanketchaudhari7539 Před 3 lety +6

    सुनील व नरेंद्र , सुंदर माहिती विशेषतः नव्या पिढीला या विडीओतून दिल्याबद्दल खूप खूप आभार .सध्याच्या तरुणावर वाडीत जाऊन काम करण्याचे संस्कार झाले नाहीत अर्थात त्याला आमची पिढीदेखील जबाबदार आहे .
    आमचे गाव किरवली.एकेकाळी फुलांचे गाव म्हणून सुप्रसिद्ध होते.पण आज जास्वंदी शिवाय दुसरी फुले दिसत नाही . केळी, नारळ सुपारी सर्वत्र दिसते . फुलांची शेती परवडत नाही . एक हौस म्हणून वाडी करतोय फुलांच्या वाडीची गत पानवेलीसारखी होईल अशी भिती वाटते .मी दिलीप चौधरी. (संकेत चे बाबा )नरेंद्र माझे मित्र आहेत .

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      दिलीप जी, आपण जी व्यथा व्यक्त केली आहे ती थोड्याफार प्रमाणात सर्वच वसईकर शेतकऱ्यांची व्यथा आहे. आपण वेळीच जर योग्य पावलं उचलली नाहीत तर हळूहळू वसईतील शेतीव्यवसाय नामशेष होण्याची भीती आहे. धन्यवाद.

    • @ketanpawar1335
      @ketanpawar1335 Před 3 lety +1

      Kaka, kharokhar Vasaikarnchi vyatha Sunil aani Tumhi mandli aahe. Pan aatta baryach lokana hya naisargik gostinche aani sendriya shetiche mahatva patale aahe. Far lavkar hi paristhiti badlel. Thode netane chalu theva. Swatah aamchya sarkhe barech lok aasha vyavsayat utartil aani hya sendriya shetiche samvardhan pan hoil aani Vasaikar shetkari pan sukhi hoil. We have positive hope. Thanks.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      @@ketanpawar1335 Ji, wow! what a positive attitude you have got. Such approach will definitely boost the moral of the farmers. Thanks a lot.

  • @bandya1000
    @bandya1000 Před 3 lety +6

    सुनील, उत्तम माहिती आणी मेहनत घेत आहेस त्याबद्दल तुझे आभार

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, सचिन जी

  • @jyotipatil4257
    @jyotipatil4257 Před 3 lety +4

    आमच्या विदर्भात सुध्दा पानमळे आहेत त्या शेतीला पानाचे शेती ऐवजी तांडेे म्हणतात आणि शेती करणार्या जातीला बारी समाज म्हणतात .
    बाकी विडीयो 👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +2

      वाह, ह्या नाविन्यपूर्ण माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, ज्योती जी

  • @dhirajvartak9827
    @dhirajvartak9827 Před 3 lety +4

    खूप छान माहिती
    आपली वसई सुंदर हिरवीगार वसई

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      आपली वसई, सुंदर वसई
      धन्यवाद, धीरज जी

  • @nixonrod
    @nixonrod Před 3 lety +6

    छान माहिती दिलीत, आभारी आहोत 🙏🙏👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूब खूब आबारी, निक्सन

  • @shundi5
    @shundi5 Před 3 lety +1

    अप्रतिम माहिती. किती सुपीक आहे वसईची जमीन. काकांना मनापासून सलाम. आम्ही जेवल्यावर रोज पान खातो क्लोरोक्विल मिळत त्याने. हळहळ वाटली या धंद्याचं गणित आता बिघडत चाललंय हे ऐकून.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, शुंडी जी

  • @vmcontent
    @vmcontent Před 3 lety +3

    मला वाडवळ शब्दाचा अर्थ आता कळला. हा खरोखर खूप माहितीपूर्ण विडिओ आहे. धन्यवाद दादा.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, विकी जी

  • @prabhavativartak5369
    @prabhavativartak5369 Před 3 lety +5

    वसई बागायती चा हा अनमोल ठेवा जपायला हवा .शासनाने दखल घेऊन हमी भाव द्यावा. शेतकरी हा सगळ्यांचा पोशिंदा आहे. तोच असा दुर्लक्षित राहिला तर.......
    खूप छान माहिती दिलीत काका तुम्ही. त्याबद्दल धन्यवाद.

    • @oslerpereira1262
      @oslerpereira1262 Před 3 lety +1

      V true

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      अगदी बरोबर बोललात तुम्ही, प्रभावती जी व ऑस्लर जी. धन्यवाद

  • @hedvijusrumao7899
    @hedvijusrumao7899 Před 3 lety +3

    खूप छान माहिती दिलीत . बर्याच प्रकारची शेती कमी होत चालली आहे. त्यात पानवेलची सुध्हा. ती टिकायला पाहिजे.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      एकदम बरबर...आबारी हेडविजस जी

  • @florydais9955
    @florydais9955 Před 3 lety +7

    I am glad to tell i have got this plant in my garden.
    Garden is my passion.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      Yes, this is a very useful plant and one should have it in the garden. Thank you, Flory Ji.

  • @shailapereira2276
    @shailapereira2276 Před 3 lety +1

    तुमचा व्हिडीओ पाहून लहानपणची आठवण झाली. आम्ही लहान पणी पनवेलीत लुपाछुपी खेळायचे. खरोखरचं तो सोनेरी काळ होता. Thank you very much.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      हो, शैला जी. गेले ते सोनेरी दिवस व राहिल्या त्या आठवणी. धन्यवाद.

  • @smitam6856
    @smitam6856 Před 3 lety +1

    सुंदर video.छान माहिती .

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, स्मिता जी

  • @cinderellamiranda9864
    @cinderellamiranda9864 Před 3 lety +4

    I hv seen this Panvali when I used to go for Holiday in Giriz. Ladies in lugra used to sit on the big verandah and stack the beetle leaves. Brought back my memories. Thks Sunil

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      Yes, good old days and memories. Thank you, Cinderella Ji.

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 Před 3 lety +3

    विड्याची पान बद्दल खूप छान माहिती दिली आपण, विड्याची पाने फक्त दुकानात पहिली पण त्याची शेती कधीच पहिली न्हवती किंवा त्याची लागवड कशी करतात माहीत न्हवते, आपण ती माहिती दिली व शेतकरी काका यांची व्यता मांडली त्या बद्दल धन्यवाद. छान वाटले हिरवीगार शेती पाहून😊👍👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

  • @royalart3002
    @royalart3002 Před 3 lety +4

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूब खूब आबारी, रॉयल

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Před 3 lety +1

    Khupacha sunder niga rakhaliy.🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      हो, खूळ काळजी घेतात काका. धन्यवाद, चारु जी

  • @ankitamanjrekar3730
    @ankitamanjrekar3730 Před 3 lety +2

    Mazi sasaruwadi mulchi naigaon koliwadyachi ahe. Mumbaicha wadhtya Seema ani wadhatya shaharikaranamule lupt hot chalalelya sthanik goshti, parampara, nisarga pahun faar wait watate. Tumhi tumcha video madhun he mahiti pudhachya pidhisathi sathi jatan karun thevtay tyabaddal Khup khup abhar ani shubbheccha tumchya pudhchya watchalisathi.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अंकिता जी

  • @sonalsawant3729
    @sonalsawant3729 Před 3 lety +1

    सुनिलजी तुमची बोलण्याची पद्धत . भाषा उत्तम

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, सोनल जी

  • @pralhadbhople4564
    @pralhadbhople4564 Před 3 lety +1

    Khup Chhan Mahiti dili Panvelichi,Sunil bro Thanks!

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, प्रल्हाद जी

  • @SuhasMali
    @SuhasMali Před 3 lety

    सुनील भाऊ मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात तुमच्या सगळ्या व्हिडिओ मुळे मी वसईच्या प्रेमात पडलो आहे वसई पालघर जिल्हा मला फार आवडले

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, सुहास जी

  • @preetijs9629
    @preetijs9629 Před 3 lety +2

    वाह... खूप सुंदर माहिती दिली काकांनी!
    व्हिडिओ बनवल्या बद्दल तुमचे आभार 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, प्रीती जी

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 Před 3 lety +1

    खूप छान माहिती. त्यासाठी धन्यवाद, तुम्हाला आणि नरेंद्र काकांनाही. 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, शेखर जी

  • @madhumativarma232
    @madhumativarma232 Před 3 lety +3

    Sunil thank you so much for this wonderful video, I enjoy the history of plantation and the know how of it. Thanks. God bless.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      Thanks a lot for your kind words, Madhumati Ji

  • @radhikadiksha1507
    @radhikadiksha1507 Před 2 lety +1

    खुप सुंदर माहीती👌🙏 सुनील

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      धन्यवाद, राधिका जी

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Před 3 lety +1

    छान माहिती दिली आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, राजेश जी

  • @anandkargutkar3206
    @anandkargutkar3206 Před 3 lety +1

    फारच छान सुंदर माहिती

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, आनंद जी

  • @tejasghag9465
    @tejasghag9465 Před 3 lety +4

    Sunil khup chan mahiti Dil Badaltujhe aabhar🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद, तेजस जी

  • @jyotikishorrewatkar2262
    @jyotikishorrewatkar2262 Před 3 lety +1

    Khupch chhan mahiti.aawadali.kakacha anubhav,mehanat prachand aahe.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      अगदी खरं, धन्यवाद, ज्योती जी

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 Před 3 lety +3

    Khup Chan ani Vegla ahey Video, khup avadla hi, Tujhya Navin Video chi Vatt baghat hotech Thanks Sunil

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, माया जी

  • @swapnilg006
    @swapnilg006 Před 3 lety

    सुनील खूप मस्त video

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, स्वप्नील जी

  • @-lj2nl7in8j
    @-lj2nl7in8j Před 3 lety +1

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे . बावीस दिवसात परत पाने येतात .....असे काका म्हणत आहे आमचा तर कुंडीत लावलेला वाढतच नाही .....😀 काकांनी एवढी मोठी वेलं तोडून आणली जीव जडून गेला ते बघून....😀
    ...

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      हो, ह्या वेली व त्यांचा रंग खरोखर मनमोहक आहेत. धन्यवाद, चारुलता जी

  • @joedmello8406
    @joedmello8406 Před 3 lety +1

    Excellent video
    Lovely place full of greenery
    Thanks

  • @maryfalcao8822
    @maryfalcao8822 Před 3 lety +6

    Wah, sunil u r doing very nice work,I appreciated u, great, keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      Thanks a lot for the kind words, Mary Ji

  • @nishavasaikar2805
    @nishavasaikar2805 Před 3 lety +2

    Thank you for this informative video. It does resound with the early days of Vasai.

  • @sameerraut9754
    @sameerraut9754 Před 3 lety +1

    Khupch Sundar mahiti dilit tumhi ani kakani pan changla explain kela about wadval ani panvelichya vyavsayabaddal.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद, समीर जी

  • @jayantnaik9338
    @jayantnaik9338 Před 3 lety +3

    खूप छान माहिती
    धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, जयंत जी

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 Před 3 lety +1

    खुप चांगली माहिती, छान

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, वैष्णवी जी

  • @Gamerzone-fg3qu
    @Gamerzone-fg3qu Před 3 lety +1

    Khup chaan mahiti panveli chi.
    Paane dry karun Kahi via product kele tar Khup change ahe.
    Fakt dry karun Sugandhi pan supari banavili jate.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      हो, पाने सुकवून त्यापासून काही पदार्थ करता येईल का ही कल्पना खूप छान आहे. धन्यवाद

  • @arundeshmukh4382
    @arundeshmukh4382 Před 3 lety +5

    Too good. We must preserve our culture. And mr. Sunil is doing a great job in doing so.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      Thanks a lot for your kind words, Arun Ji

  • @sniperking4901
    @sniperking4901 Před 3 lety +9

    Sunil sir..U shoukd Start Some initiative to Help These Farmers reach good and Effective markets

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      Yes, there are certain bodies who are already working on this. Thank you for your suggestion.

  • @subhashkesarkar5291
    @subhashkesarkar5291 Před 3 lety +1

    खूप छान माहिती

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, सुभाष जी

  • @akash338
    @akash338 Před 3 lety +1

    Thank you for this video....
    This leaf is one-off the best antioxidant for human body

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      Thank you for the valuable information, Akash Ji

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 Před 3 lety

    धन्यवाद सुनिल सर आपण छान माहिती दिली आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, शशिकांत जी

  • @sureshhulawale9483
    @sureshhulawale9483 Před 3 lety +2

    खुप छान माहिती दिली आहे ✌️✌️✌️✌️✌️🆗

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, सुरेश जी

  • @sweendias8908
    @sweendias8908 Před 3 lety +4

    It is very healthy, one must plant in backyard !

  • @sangramkachare5586
    @sangramkachare5586 Před 3 lety +1

    खूप सुंदर माहिती दिली आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, संग्राम जी

  • @vijayshenoy3636
    @vijayshenoy3636 Před 3 lety +1

    Khoop sundar mahiti Diljit tumi dhanyavad ...

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, विजय जी

  • @neenasalvi2090
    @neenasalvi2090 Před 3 lety +1

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, नीना जी

  • @tinasoureen2595
    @tinasoureen2595 Před 3 lety +1

    Beautiful video and pretty detailed information never knew about this🙏🙏

  • @nayannarvekar7198
    @nayannarvekar7198 Před 3 lety +1

    उत्तम माहिती, छान व्हिडिओ, चित्रीकरणही उत्तम.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      धन्यवाद, नयन जी

  • @mohanpatil2467
    @mohanpatil2467 Před 3 lety +1

    खूपच छान

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, मोहन जी

  • @kaminihule1336
    @kaminihule1336 Před 2 lety

    Khup vait vatle Sunil tumche logs mala Khup Khup avadtat 🙏❤️

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद, कामिनी जी

  • @sayliyadav7681
    @sayliyadav7681 Před 3 lety +1

    Khup chan video

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, सायली जी

  • @harshdesai6854
    @harshdesai6854 Před 3 lety +1

    Wah mast khup chan mahiti👍

  • @imprasann
    @imprasann Před 3 lety +3

    हे सर्व पाहून मला तुमचा हेवा वाटतो.
    माझं सर्व आयुष्य सिमेंट काँक्रीट च्या जंगलात गेलंय.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +2

      या कधी वसईला...स्वागत आहे

    • @imprasann
      @imprasann Před 3 lety +2

      नक्की!
      आयुष्य इतकं सुंदर असू शकतं
      Can't imagine !!!

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      @@imprasann या, पहा, अनुभवा व विश्वास ठेवा!

  • @SandeepGaonkar51
    @SandeepGaonkar51 Před 3 lety +2

    काका भारी 😊👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, संदीप जी

  • @souzaskitchenbynamratadsouza

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद !!

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, सोजा जी

  • @nitinpawar2505
    @nitinpawar2505 Před 3 lety +1

    Khupach chhan

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, नितीन जी

  • @g.rupesh5043
    @g.rupesh5043 Před 3 lety +2

    Vasai khupch bhari aahe.... Kaay mast gaon aahe...

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, रुपेश जी

  • @gurunathkale8895
    @gurunathkale8895 Před 3 lety +1

    फारच छान छान माहिती मिळाली मागे तुमचा वसईचा केलेवाला हा पण व्हिडीओ छान होता सविस्तर माहिती मिळते शेतकऱ्याचे दुःख पण समजले काळाचा महिमा दुसरे काय तरुण पिढीला यातुन बरेच शिकण्यासारखे आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      अगदी खरं बोललात गुरुनाथ जी. आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @BackpackerTraveler
    @BackpackerTraveler Před 3 lety +1

    खूप मस्त व्हिडिओ भावा 👌✌️❤ #BackpackerTraveler

  • @mu9974
    @mu9974 Před 3 lety +1

    Khoop Sundar Aahe.👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, मनोज जी

    • @satishbandivadekar9364
      @satishbandivadekar9364 Před 3 lety

      Sunil sir , ur all videos on Vasai activities & personal information it is really adding our knowledge to us it is great.....

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      @@satishbandivadekar9364 Ji, thanks a lot for your kind words.

  • @chandrashekharjakhalekar1746

    उत्तम माहिती मिळाली. आभारी आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, चंद्रशेखर जी

  • @SanjayJD-pu1hz
    @SanjayJD-pu1hz Před 3 lety +1

    खुप सुंदर माहिती...

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      आबारी संजय सायेब

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 Před 3 lety +1

    अरेरे दादा पानवेली / नागवेली / विड्यांची पाने / खाण्यांची पाने वेलींचा हा अमुल्य ठेवा कोणत्याही परिस्थीतीत नामशेष होता कामा नये . किती सुंदर हिरवीगार वेली आहेत ह्या . आणि आपण जी माहीती सुंदररित्या सादर केली . त्या बद्दल धन्यवाद .

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      हो, विलास जी हा ठेवा कायम राहावा हीच मनोकामना. धन्यवाद

  • @umeshsalunke35
    @umeshsalunke35 Před 3 lety +1

    Khup Chan mahiti saheb

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, उमेश जी