केळीमध्ये २८ महिन्यांमध्ये ११० टन एवढे विक्रमी उत्पादन घेणारे कपिल जाचक | जाचक पॅटर्न | बारामती IFE

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 11. 2019
  • Follow us:
    Facebook: / indianfarmerentrepreneurs
    Instagram: / aniketgharge23
    Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com
    ----------------------------------------------------------------------------------------------
    कपिल जाचक.
    जाचकवस्ती बारामती,पुणे.
    मो.9422205661
    कपिल जाचक सर हे गेल्या अठरा वर्षांपासून आपल्या शेतामध्ये केळी या पिकाची लागवड करत आहेत.आपल्या 40 एकर क्षेत्रामधील 12 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी केळीची लागवड केली आहे.कपिल जाचक सर हे स्वतः उच्चशिक्षत आहेत. पहिल्यापासून शेतीची आवड असल्याने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून ते आज उत्पादनाबाबतीत विक्रम प्रस्थापित करत आहेत.
    G9 या केळीची लागवड त्यांनी विकसित केलेल्या जोड ओळ पद्धत वापरून करत आहेत.जाचक पॅटर्न म्हणून प्रचलित असणाऱ्या या पद्धतीमध्ये एका एकरमध्ये जवळपास 1450 रोपे घेता येतात. या पद्धतीमध्ये दोन ओळींमधील अंतर साडेतीन फूट तसेच मुख्य दोन ओळींमधील अंतर 12 फूट ठेवले जाते.या पद्धतीमध्ये ते कोणत्याही प्रकारचे आंतरपिक घेत नाहीत.केळीच्या रोपांमध्ये उसाच्या पाचतीचे आच्छादन ते करतात तसेच केळीच्या फांद्यांपासून ते कंपोस्ट खत तयार करतात. केळीमध्ये ते लागण,खोडवा व निडवा हे तिन्ही पिके 28 महिन्यात घेतात.या केळी पिकांना आधारासाठी बांबूची गरज लागत नाही.केळी बांधण्यासाठी पॅकिंग पट्टीचा ते वापर करतात. पाच ते सहा महिने झाल्यानंतर लगेच ते खोडवा धरतात यामुळे 18 महिन्यातच खोडवा हार्वेस्टिंगला येतो.
    केळीमध्ये यावर्षी त्यांनी लागणी मध्ये 54 टन उत्पादन घेतले आहे.तिन्ही पिकामध्ये 28 महिन्यात एकूण 110 टन उत्पादन मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. केळीमध्ये सर्वाधीक असा 92 किलो वजनाचा केळी घड उत्पादन करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.केळीमध्ये तसेच शेतीमधील त्यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांना आजपर्यंत बरेच ऍवार्डस मिळाले आहेत. नवीन पिढीला शेतीबद्दल आवाड निर्माण व्हावी यासाठी ते शेतावर मुलांना यांबद्दल माहिती देत असतात.महाराष्ट्रासह देशभरातील बरेचसे शेतकरी त्यांच्या फार्मवर भेट देत असतात.आज कित्येक शेतकर्यांना त्यांनी मार्गदर्शन करून सक्षम बनवले आहे.
    कपिल जाचक सरांनी स्वतः तयार केलेला "जाचक पॅटर्न"चा अवलंब महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. केळीबरोबरच त्यांनी डाळिंब,ऊस या पिकांची लागवड आपल्या शेतामध्ये केली आहे.तसेच एकून 14 प्रकारची फळझाडे त्यांनी आपल्या शेतामध्ये लावली आहेत.त्यांच्या विहिरीमध्ये असलेले परदेशी जातीची मासे सर्वांचे लक्ष वेधून घेतात.शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यावर त्यांचा नेहमी भर असतो.परिनिता या नावाने त्यांनी ऍग्रो टुरिझम आपल्या शेतामध्ये सुरू केले आहे. कपिल जाचक यांनी केळी या पिकामध्ये एक वेगळी उंची गाठली आहे.टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करून शेती आपण केली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल.

Komentáře • 213

  • @vaibhavshah5946
    @vaibhavshah5946 Před 4 lety +21

    खूप खूप धन्यवाद कपिल जी तुमच्यासारखे शेतकरी महाराष्ट्राला मिळाले हे आमचं नशीब आहे , खूप खूप छान अतिशय योग्य व स्वच्छ मन आणि माहिती दिली

  • @bharatwadkarjain8628
    @bharatwadkarjain8628 Před 4 lety +6

    अतिशय सुंदर नियोजन ,आणि केळीची बाग सुद्धा.👌👌👏👏

  • @bharatkumarrane9938
    @bharatkumarrane9938 Před 3 lety +1

    अत्यंत सोप्या भाषेत संपूर्ण माहिती दिली आहे. फारच सुंदर.

  • @vinodbagade2526
    @vinodbagade2526 Před 3 lety +5

    खुप चांगली माहिती दिली सर त्या बद्दल खुप खुप धन्यवाद

  • @dattatrayargade9441
    @dattatrayargade9441 Před rokem +1

    खूप सुंदर माहिती दिली त्यामुळे सरांचे खूप हार्दिक अभिनंदन

  • @dilipkhade5184
    @dilipkhade5184 Před 8 měsíci +1

    सर्वसाधारण शेतकरी माणूस 1 नंबर माहिती देतात

  • @ashishpatil2078
    @ashishpatil2078 Před 2 lety

    खुप छान माहिती दिलीत..उत्कृष्ट नियोजन

  • @mukundjadhav4385
    @mukundjadhav4385 Před 4 lety

    खूपच सुंदर माहिती दिली सरांनी .....
    Thanks.....

  • @onway7830
    @onway7830 Před 4 lety +3

    Super informetion sir thank you

  • @dhananjaylingade190
    @dhananjaylingade190 Před 2 lety

    छान माहिती मिळाली आहे, अभिनंदन.

  • @anwarhussainlukade2845
    @anwarhussainlukade2845 Před 3 lety +4

    श्री. जाचक सरांचे मार्गदर्शन अती ऊत्तम प्रकारे दिले आहे त्यामुळे सर्व सामन्य शेतकऱ्यांना निश्चित प्रेरणा मिळेल
    धन्यवाद... !

  • @anupamathorat
    @anupamathorat Před 2 měsíci

    खूप धन्यवाद आपण फार चांगली माहिती दिली याबद्दल आभार

  • @sachinkhartode6445
    @sachinkhartode6445 Před 4 lety

    खुप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @dipakgatade7307
    @dipakgatade7307 Před 4 lety

    खुप चांगली माहिती मिळाली, धन्यवाद सर ... चुनखडी बद्दल ची माहिती मिळावी ही विनंती

  • @bharatmagar545
    @bharatmagar545 Před 4 lety

    Mast upyukt mahiti sangitali...

  • @vishanushinde2943
    @vishanushinde2943 Před 4 lety +1

    फारच छान माहिती आहे दादा

  • @rahulnangare1062
    @rahulnangare1062 Před 4 lety +2

    Bhava tuzhe introduction khupach Chan ahe😍🤝

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 Před rokem

    Thanks ....very nice information of banana Plantesion

  • @sohelpatel2381
    @sohelpatel2381 Před 4 lety +1

    Khup chaan mahiti dili saheb

  • @maheshmulik9360
    @maheshmulik9360 Před 4 lety +2

    Khup study aahe sir tumchi video chan vatala

  • @vilaschavan6775
    @vilaschavan6775 Před 3 lety

    Sir khupach chan mahiti dili dhanyavad

  • @samghadge8986
    @samghadge8986 Před 4 lety +1

    Chan mahiti dili dhanywaad

  • @rahulnangare1062
    @rahulnangare1062 Před 4 lety +1

    Chan mahiti dilit tumhi

  • @apparaoandhale7831
    @apparaoandhale7831 Před 3 lety +1

    Super margdarsen 🙏🙏👌👌

  • @ramkrishnapatil7284
    @ramkrishnapatil7284 Před 3 lety

    खूप छान माहिती व बारकावे सांगितले

  • @tejesharage6001
    @tejesharage6001 Před 4 lety +2

    अत्यंत उपयुक्त माहीती दिलेबद्दल धन्यवाद...

  • @pradipgadhave1992
    @pradipgadhave1992 Před rokem

    Very nice information.. keep it up.

  • @shantanumisal646
    @shantanumisal646 Před 9 měsíci

    खूप मस्त आणि महत्त्वाची माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @marotikendre3845
    @marotikendre3845 Před 4 lety +20

    1400झाडात 54 टन एकरी किती झाडे लावली होती मी नवीन केळी लागवड करणार आहे, आपला व्हिडीओ खूपच सुंदर आहे

  • @fathersfarming
    @fathersfarming Před 4 lety +3

    छान आहे.

  • @mahendarpukale4217
    @mahendarpukale4217 Před 4 lety +2

    khupach chan

  • @pankajnalawade507
    @pankajnalawade507 Před 4 lety +2

    Khup chan mahiti sangitali

  • @sureshkabade7620
    @sureshkabade7620 Před 4 lety +2

    मस्तच माहिती दिला 👌

  • @vishwasbagalpatil9096
    @vishwasbagalpatil9096 Před 4 lety +2

    छान.

  • @aniketsuryawanshi5024
    @aniketsuryawanshi5024 Před 4 lety +1

    Great efforts sir

  • @babasobhosale1685
    @babasobhosale1685 Před 3 lety

    Kupach chan mahithi aahe

  • @mukeshdasgaonkar7876
    @mukeshdasgaonkar7876 Před 4 lety +1

    Atishay sundar mahiti dili aahe

  • @lahurajpawar8616
    @lahurajpawar8616 Před 4 lety +1

    खुप छान सर

  • @sopankale5906
    @sopankale5906 Před 3 lety +1

    You give very nice information to banana tree

  • @VanossGaming465
    @VanossGaming465 Před 3 lety +1

    kapil.bhai.great kisan

  • @shivanandbole586
    @shivanandbole586 Před 4 lety +5

    धन्यवाद सर मराठवाड्यात तापमान सरासरी 38-39 परयंत जाते तर आपण जे अंतर सांगितले ते येथे योग्य होईल काय?

  • @yashsawant520
    @yashsawant520 Před 4 lety +2

    Nice video

  • @ageinglish347
    @ageinglish347 Před 4 lety +3

    Match👌👌

  • @sahadeoshinde272
    @sahadeoshinde272 Před rokem

    Very nice your speech

  • @chintamaniparkale4748
    @chintamaniparkale4748 Před 3 lety

    Super talented farmer

  • @RameshSingh-ff6qr
    @RameshSingh-ff6qr Před 4 lety +1

    Jachak pattern good pattern

  • @mohanzanpure9676
    @mohanzanpure9676 Před 4 lety

    Very nice video 👍👏🙏

  • @shetkariraja6616
    @shetkariraja6616 Před 4 lety +1

    Khupch chan

  • @SammerShaikhwai
    @SammerShaikhwai Před 4 lety +2

    खूप छान जाचक सर आणि आपले सहकारी

  • @samadhanmore2274
    @samadhanmore2274 Před 4 lety +1

    Mast👍👍

  • @omdgodse
    @omdgodse Před 4 lety

    मस्त माहिती दिली आहे सविस्तर व छान माहिती दिली मार्केटिंग बाबत माहितीसाठी पण एक व्हिडिओ पाठवा

  • @sachinanbhule8406
    @sachinanbhule8406 Před 3 lety

    लईभारी सर

  • @rameshfarakate4530
    @rameshfarakate4530 Před 4 lety +1

    Nice

  • @ajinkyasawant2223
    @ajinkyasawant2223 Před 4 lety +3

    एकदम छान

  • @sarodevijendra
    @sarodevijendra Před 4 lety +1

    Lay bhari mitra

  • @sandeepthorat4141
    @sandeepthorat4141 Před 4 lety +5

    खुपच छान माहिती दिलीत सर.खत व्यवस्थापन आणि ट्रेनिंग बाबत अधिक माहिती दयावी.

  • @sanskarjagdale3217
    @sanskarjagdale3217 Před 3 lety

    khup mast

  • @vikaspatil9270
    @vikaspatil9270 Před 10 měsíci +1

    खूप सुंदर माहिती धन्यवाद सर

  • @AdinathDGarje
    @AdinathDGarje Před 4 lety +7

    bunch management schedule..?

  • @pandurangband6097
    @pandurangband6097 Před 4 lety

    एक नंबर

  • @sunilmohite6680
    @sunilmohite6680 Před 3 lety

    ग्रेट sir

  • @eshantchikte2066
    @eshantchikte2066 Před 4 lety

    Nice sir

  • @vinodbisen5936
    @vinodbisen5936 Před 4 lety +1

    ३.६ ft anntarawar zigzag zade lawli tar kontya prakarche परिणाम होनार?

  • @prasannat4172
    @prasannat4172 Před 4 lety +7

    छान माहिती! पानाचे कटिंग, पिल्लांचे कटिंग तसेच खत व्यवस्थापनाबद्दल विस्तृत माहिती सांगावी........

    • @kapiljachak5518
      @kapiljachak5518 Před 4 lety +3

      आपल्याला ट्रेनिंग मध्ये सर्व काही शिकायला व बघायला मिळेल...9422205661

    • @swapnil3835
      @swapnil3835 Před 4 lety

      @@kapiljachak5518 when you start the training program please info me

    • @prkashkad8233
      @prkashkad8233 Před 3 lety

      कपिलसर फार छान माहिती आहे फारच उपयोगी पडेल 🙏 🙏

  • @kamalakarbhosale3093
    @kamalakarbhosale3093 Před 2 lety

    फार चांगली माहिती दिली साहेब, पण झाडे वाऱ्याने किंवा वजनाने पडू नये यासाठी पण माहिती द्यावी धन्यवाद

  • @tusharchoudhary8667
    @tusharchoudhary8667 Před 3 lety

    nice

  • @nilkanthbandal2027
    @nilkanthbandal2027 Před 8 měsíci

    Mast mahiti

  • @amolmahajan2748
    @amolmahajan2748 Před 4 lety +3

    १ नं दादा छान मेहनत केली .आपन मला आवळले.

  • @sunildhande2602
    @sunildhande2602 Před 4 lety +1

    Sir kelila 1 da ch Keli lagte ka. 2 veles. Lagte

  • @adharmali4749
    @adharmali4749 Před 2 měsíci

    आमच्या जळगाव जिल्ह्यात तापमान जास्त असल्यामुळे 8:50 फुटाचा पट्टा चालत नही

  • @RahulSingh-tg4he
    @RahulSingh-tg4he Před 11 měsíci

    Distance between plant to plant and row acre mein kitna plant lagta hain is method se

  • @khizerdeshmukh4650
    @khizerdeshmukh4650 Před 3 lety

    Nutrition management ksa karaych yavr video banva sir

  • @divyakantunhale7474
    @divyakantunhale7474 Před 3 lety

    माहिती खुप छान आहे सर ..पण लागवडीचे अंतर काय ठेवावे

  • @rushikeshdevkate2043
    @rushikeshdevkate2043 Před 4 lety

    Nutrition management cha pn video karun pathva

  • @prashantkshirsagar2957
    @prashantkshirsagar2957 Před 4 lety +2

    छान माहिती होती

  • @swarnimjain4128
    @swarnimjain4128 Před rokem

    एका सरी मध्ये दोन खोडांमधील अंतर किती आहे? आणि जोड साऱ्यांमध्ये खोड zig-zag पद्धतीने लावले आहेत का?

  • @hareshpatil2534
    @hareshpatil2534 Před 4 lety +1

    चुनखडी युक्त जमिनीचं केळीच नियोजन सांगा

  • @pandurangband6097
    @pandurangband6097 Před 4 lety +3

    अंतरं १२फुट रुंद लांबिचे अंतर किती आहे एकुन झाडाची संख्या किती आहे

    • @adharmali4749
      @adharmali4749 Před rokem

      लांबीच अंतर 5 फुट आहे..व झाडांची संख्या एकरी 1450 आहे

  • @durgadaspatil4958
    @durgadaspatil4958 Před 3 lety +1

    सर नमस्कार 🙏;दोन रोपांतील अंतर किती असते

  • @rajeshjawanjal4608
    @rajeshjawanjal4608 Před 4 lety

    नमस्कार , जाचकदादा ४.५ ची जोड ओळ व दोन जोड ओळी मधे ९फुटांचा पट्टा चालेल का?

  • @avinashp5536
    @avinashp5536 Před 4 lety

    Sir apan survati lagvad pasun te shevatparyant cha sampurn mahiticha video banva
    Namr vinanti

  • @anilgadade104
    @anilgadade104 Před 5 měsíci

    जाचक साहेब एकच नंबर मार्गदर्शन केले
    धन्यवाद

  • @suraj752
    @suraj752 Před 2 lety

    Hii sir,
    पान छाटणी कधी करायची म्हणजे किती महिन्या नंतर लागवडी पासून ?

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ Před 2 lety

    Soil charger technology vapra.....

  • @swamirasvemali7638
    @swamirasvemali7638 Před 10 měsíci

    जाचक साहेब पाच महिन्यांमध्ये केळीची निस्वड आमची झालेली आहे आमची बाग पण पाण्यासारखे आहे नक्कीच कॉन्टॅक्ट करा

  • @vishalpatel7590
    @vishalpatel7590 Před 3 měsíci

    Shevat cha binch spray kasla katrava

  • @nevaseclasses1308
    @nevaseclasses1308 Před 4 lety

    Eka zadala sadharan kiti litre Pani lagel

  • @mohangawande4704
    @mohangawande4704 Před 2 lety

    खूप सुंदर
    सर मला एक विचारायचं होतं मधला जो आठ फुटाचा गॅप राहतो त्यामध्ये कोरडेपणा जास्त असणार तर तिथे पाण्याची गरज भासत नाही का धन्यवाद

  • @status_9021
    @status_9021 Před 2 lety

    Mi Navin Keli lagavd karnar ahe Keli Madhil plant to plant antar kiti aasav

  • @PANKAJ7993
    @PANKAJ7993 Před 3 lety +2

    Your system was working then you can give me your information about your technology

  • @nareshpk2638
    @nareshpk2638 Před 2 lety

    1acre mdhe kiti keli lagwad hoil keli ????

  • @avinashtakale6421
    @avinashtakale6421 Před 3 lety

    सर पावसाळ्यात पाणी साचणार्या जमिनीमध्य केळी येऊ शेकते का

  • @dinkaraware9248
    @dinkaraware9248 Před 3 lety

    दोन झाडातील अंतर किती ठेवले , लागवड झिग जाग पद्धतीची आहे का

  • @vijaygadhe1385
    @vijaygadhe1385 Před 3 lety

    सर चुनखडी युक्त जमिनीत केळी पीक येईल का?

  • @gopalsatav9090
    @gopalsatav9090 Před 5 měsíci

    बेडवर किती अंतरावर रोप लावावे

  • @sunilchaudhari236
    @sunilchaudhari236 Před rokem

    Chhan

  • @sachinanbhule8406
    @sachinanbhule8406 Před 3 lety

    राम राम भाऊ

  • @ashishpatil2078
    @ashishpatil2078 Před 2 lety

    उभ्या ओळीतील खोडांमधील अंतर किती ठेवले

  • @arunnana823
    @arunnana823 Před 3 měsíci

    👌👌👌🙏💯

  • @naneswarbansode258
    @naneswarbansode258 Před 2 lety +1

    केळी मध्ये मिरचीचे आंतरपीक घेऊ शकतो का psl 🙏🙏