या फोटोत दिसणारी ही युरोपियन तरुणी पहा...

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 07. 2023
  • या फोटोत दिसणारी ही युरोपियन तरुणी पहा...
    या फोटोत दिसणारी ही युरोपियन तरुणी पहा. चप्पल दुरुस्ती करणाऱ्या चांभारापुढे कोणताही संकोच न बाळगता, किती सहजपणे बसली आहे! ....आणि आपल्याच देशातील लोक तिच्याकडे कुतूहलाने पाहत आहेत.
    युरोपमध्ये श्रमाला प्रतिष्ठा आहे. याउलट आपल्या देशात व्यवसाय आणि कामधंदा बघून माणसाची किंमत ठरवली जाते. आपला देश जरी विविधतेने नटलेला असला, तरीही इथे असणारा भेदभाव, उच्च-नीचता, असमतोल मान्य करावाच लागतो.
    श्री. महेश नावाचे इसम सांगतात, “नुकताच मी युरोपियन ट्रेनने प्रवास केला. तेथील टीसीने तिकीट चेकसाठी दोन-चार फेऱ्या मारल्या. गाडीचे गंतव्य स्थान अर्ध्या तासावर आले असताना एक व्यक्ती हातात मोठी काळी प्लास्टिकची बॅग घेऊन प्रवाशांचा कचरा गोळा करत आली. तिच्याकडे पाहून मी चकाकलोच!! कारण हा तोच होता, जो गेली 4 तास तिकीट चेक करणे, रिझर्वेशन चेक करणे ही कामे करत होता. त्याने असा विचार केला नाही की मी अधिकारी आहे. मग मी कचरा गोळा करण्याचे काम कसे करू? काम हे काम असते ते छोटे-मोठे नसते..!”
    यावर “तुमचे मत” कॉमेंट मध्ये अवश्य नोंदवा.
  • Jak na to + styl

Komentáře • 5

  • @rajaniramchandrawaghmare4528

    एकदम बरोबर, भिक मागणाऱ्यापेक्षा कोणतही काम करणारे नेहमी श्रेष्ठच असतात. कोणताही काम उच नीच नसते .

  • @amitoswal9897
    @amitoswal9897 Před rokem

    Ek dum barobar

  • @vitthalgadekar7442
    @vitthalgadekar7442 Před rokem +1

    आम्हच्या देशात
    फक्त एकच होते ते म्हणजे
    गद्दारी

  • @subhashdeshmukh8284
    @subhashdeshmukh8284 Před rokem

    आपली मानस। हा हा हा
    अधजल गगरी छलकत जाये