कोकणातील जंगलात सापडल्या प्राचीन दगडात कोरलेल्या लेणी । आत आहेत शिवपिंडीच्या आकाराचे लहान पाषाणलिंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 05. 2023
  • कोकणातील जंगलात सापडल्या प्राचीन दगडात कोरलेल्या लेणी । आत आहेत शिवपिंडीच्या आकाराचे लहान पाषाणलिंग
    पांगरे बुद्रुक, राजापूर - रत्नागिरी
    महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात पांगरे बुद्रुक (१६० ३७’ १६” उ. ७३० ३४’ ५८” पू.) हे छोट्या वस्तीचे गाव आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेले राजापूर हे ठिकाण सायफन तत्वावर काही विशिष्ट कालावधीनंतर येणाऱ्या नैसर्गिक पाण्याच्या उगमासाठी आणि गंधकयुक्त गरम पाण्याच्या कुंडासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. मध्ययुगीन काळात राजापूर एक अंतर्गत बंदर म्हणून देखील प्रसिद्ध होते . वर्तमान राजापूर हे समुद्रकिनाऱ्या पासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर आहे. राजापूर पासून पूर्वेस सुमारे आठ किलोमीटर अंतरावर हे गाव स्थित आहे (फलक १). गावालगत अर्जुना नावाची नदी असून याच नदीच्या दक्षिण काठावर पांगरे बुद्रुक गाव छोट्या डोंगर रांगेत वसलेले आहे. गावाच्या मागील टेकडीत काही कातळ कोरीव लेण्या आणि एकाश्म मंदिरे प्रस्तुत लेखकास २०१६ साली पुरातात्त्विक सर्वेक्षणात आढळून आल्या (IAR २०१७-१८). राजापूरहून फक्त आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या अशा महत्वपूर्ण लेण्यांची पुरातत्त्वीय नोंद पूर्व प्रकाशित साधनांत घेतली गेलेली नाही हे परीक्षणांती निदर्शनास आले (फलक २). वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैली व शैव पंथाशी संबंधित असलेला हा लेणी समूह महाराष्ट्रातील ज्ञात प्रारंभिक शैव संप्रदायाशी संबंधित स्थळांमध्ये बराच प्राचीन असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने या लेणी समूहाचे अध्ययन व अन्वेषण करण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे केला गेलेला आहे. गावाच्या पूर्व-पश्चिम दिशेला पसरलेल्या टेकडीवर जांभ्या दगडात कोरलेली चार उत्खनने पहायला मिळतात. यात दोन लेणी व दोन एकाश्म मंदिरे आहेत. विवेचनाच्या सोयीसाठी या लेणी व एकाश्म मंदिरांना पूर्वेकडून पश्चिमेकडे असे क्रमांक दिलेले आहे. ही सर्व उत्खनने ईशान्य दिशेस तोंड करून आहेत.
    ref.
    Dr. Anjay Dhanawade
    Asso. Professor Archeologist and Historian
    M. M. Jagtap senior college.Mahad.
    ref - www.researchgate.net/publicat...
    #kokan #ancient #shiv #konkan #rajapur #leni

Komentáře • 41

  • @geetastimeandspace9410
    @geetastimeandspace9410 Před rokem +4

    खूप छान संचित . या लेण्यांसाठी आणि कोकणातील निसर्गासाठी हानिकारक प्रकल्प न येता . उच्च शिक्षणाच्या सोयी निर्माण व्हाव्यात . वृक्ष वेली आणि लेण्यांचे जतन केलेच पाहिजे. Save nature save kokan.❤️🌹👍🏻

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 Před rokem +2

    संचित खूप दिवसांनी तुझा विडिओ
    बरं वाटलं विडियो पाहून.
    संचित एकटाच फिरतोय कोणी तरी बरोबर घे .
    काही महिन्यांपूर्वी मी तुला म्हटलं होतं की आमच्या साळशी गावी जा कणकवली पासून जवळच आहे फक्त अर्धा तास लागतो आमच्या साळशी गावी संभाजी महाराज यांची आठवण आहे म्हणजे साळस महाल आहे बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी आहेत पण दुर्लक्षितच आहेत तुझ्या सारख कोणी गेलं तर लोकांना कळेल.आमच सिध्देश्वर पावणाइ मंदिर आहे.सिध्देश्वर मंदिरात नंदी आहे तो नंदी एक गोटा पुढे सरकत आहे.
    स्थानिक लोकांना सर्व माहिती आहे.
    बघ जमलं तर जा आणि असे विडीओ करत रहा स्वतः ची तब्येत सांभाळून.
    बापर्डे गावात सुध्दा कातळात लेणी सापडल्या आहेत.

  • @girishshrikhande
    @girishshrikhande Před rokem +1

    ही माहिती पुरातत्त्व विभागापर्यंत पोचली पाहिजे.

  • @deepaktupkar
    @deepaktupkar Před rokem

    हा प्राचीन अमूल्य ठेवा आहे....

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 Před rokem

    खूप छान आहे एक पिंडी आहे ती लोकांनीं चोरू नेलं काय म्हणावे पण विडिओ पाहून आवडला

  • @vinodbobhate1255
    @vinodbobhate1255 Před rokem

    खुप छान

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před rokem +1

    खूप छान संचित 👍
    गेल्यावर्षी पण दाखवला होतास....!

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Před rokem +1

    संचित तु छान दाखल माहिती पण छान दिली पण हे सगळ ठिकेल का कारण कोकणचा विनाश होण्यासाठी प्रकल्प कोकणात येतोय त्याच काय करायच सगळ्यानी गाराण घाला हा प्रकल्प कोकणातून जाऊ दे

  • @sindhudurgproperties1086

    Mast sanchit.....keep it up bro

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Před rokem

    La jawab,apratim.

  • @pradeepthakur-sp9cu
    @pradeepthakur-sp9cu Před rokem

    छान माहितीपूर्ण vlog👍👌 थैंक्स

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi Před rokem

    Apratim video

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před rokem

    संचित ठाकूर खुपच सुंदर आणि छान माहिती पुणँ विडियो जय महाराष्ट्र👏✊👍

  • @vrushalichavan2823
    @vrushalichavan2823 Před rokem

    Mast chan watle .Thanks Sanchit

  • @vinodbobhate1255
    @vinodbobhate1255 Před rokem

    जय शिवराय दादा आमच्या गावात माळरानात सद्द्यवर पांडव कालीन शिल्प आहे आणि दुसऱ्या ठिकाणी विहीर आहे

  • @krunalpujare8960
    @krunalpujare8960 Před rokem

    खूप छान माहिती दिली दादा

  • @snehalv186
    @snehalv186 Před rokem

    Chan video.lavkarlavkar video post karat ja.

  • @rajeshkadam3923
    @rajeshkadam3923 Před rokem

    Sanchit Kharch khup chan mahiti dakhavnyacha tu Prayatna karto.khup chan vlogs astatat tuze. asech chan chan vlogs banval ani swatachi kalji ghe.GBU.

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 Před rokem

    Very nice informative video

  • @kavitachalke2416
    @kavitachalke2416 Před rokem

    Mast😍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před rokem

    Amazing kokan swarga asa khup chaan video dada always with very informative contents

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga Před rokem

    👌👌

  • @ajaypalande
    @ajaypalande Před rokem

    👌👌👍

  • @prashantparab6754
    @prashantparab6754 Před rokem

    🙏🙏

  • @tawadep265
    @tawadep265 Před rokem

    👌👍👍

  • @sanketthakur1104
    @sanketthakur1104 Před rokem

    ❤❤❤

  • @smitam1299
    @smitam1299 Před rokem

    👍👍👌👌👍👍👌👌❤️❤️❤️❤️

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Před rokem

    What is the name of this dam ?

  • @yogibir1144
    @yogibir1144 Před rokem

    for long time no videos

  • @harshadanaik-mz2xx
    @harshadanaik-mz2xx Před rokem +1

    say NO to Refinery KOKAN vachva

  • @yogibir1144
    @yogibir1144 Před rokem

    Gavchyach lokani tyache jatan kele pahije

  • @ajaynagarkar3378
    @ajaynagarkar3378 Před rokem

    संचित...
    हे शिवलिंग सामन्या नाही वाटत नाही, ते बरेच पुरातन असून त्याची condition अजुन फार चांगली आहे. म्हणजे ते शिवलिंग च पाषाण समनी नाही.
    व्हिडिओ मध्ये तू दाखवल की तिथलं एक शिवलिंग गायब आहे...हे काही योग्य नाही.
    , पुरातत्व विभाग महाराष्ट्र यांना विनंती या जागेला भेट देऊन तिथे त्या वास्तू ची चाचणी करावी.🙏
    तिथल्या गाववाल्यानी... ग्रामपंचायतीने याची दक्षता घेतली पाहिजे..

  • @shashikantkolge695
    @shashikantkolge695 Před rokem

    Sanchit Tu Amchya gavi yekada tri ja katala madhe shilpa Aahe gavi janya sathi S.T chi soy Aahe he Thikan Lanja Talu kya madhe Aahe Lanja - katalgoan ST Shevat che Stop Aahe koni Goan madhe Dakhvel mala Bhetayche Aashel tar mi 10 Trakhe natar Bhetn mala Reply Dya

  • @bharatsadashivkurkurebhara7777

    Dada ethek divas kute hoths

  • @Kokankanya5761
    @Kokankanya5761 Před rokem

    हे बुद्ध विहार आहे

  • @nitinsargadeghatkonkanimah6525

    भावा शिवलिंगचा दगड हा काळा व भिंती या लाल हे एकाच दगडाचे प्रकार नाही म्हणजेच ह्या बौद्ध लेणी आहे हा प्रकार सर्वच लेण्यात आढळतोय म्हणजेच बौद्ध लेण्यात अतिक्रमण होतय.

  • @thugsmumbai1484
    @thugsmumbai1484 Před rokem +3

    शिवलिंग असं नसतं.
    हा बुद्धिस्ट स्तूप आहे

  • @mangeshgaikwad345
    @mangeshgaikwad345 Před rokem

    तो दगड नंतर बसवलाय आणि जबरदस्तीने शिवलिंग बनवलंय 😂

  • @maheshkhadye3009
    @maheshkhadye3009 Před rokem

    खुप छान भावा🚩🙏👌