Dnyaneshwari Adhyay 1 Shlok 1-47 Ovi 1-275 ( ज्ञानेश्वरी अध्याय १ श्लोक १ ते ४७ ओवी १ ते २७५)

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 1 Shlok 1-47 Ovi 1-275
    {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)सम्पूर्ण परायण अध्याय १ श्लोक क्र. १ ते ४७ ओवी क्र. १ ते २७५}
    नमस्कार.
    मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो तरी सुद्धा त्याच्या जीवनात तो समाधानी व आनंदी होत नाही, त्याला तृप्तीची अनुभूती येत नाही कारण,
    आनंदी जीवन जगण्याची कला त्याने महाकष्टाने मिळवलेल्या भौतिक साधनांमध्ये नसून त्याच्या आत्मिक ज्ञानामध्ये असते.
    मग आता प्रश्न हा उपस्थित होतो कि, आनंदी जीवन जगण्यासाठी अनिवार्यपणे लागणारे हे आत्मिक ज्ञान मिळवायचे कसे ?
    तर त्याचे उत्तर संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींच्याच शब्दात द्यायचं झाल तर माउली ज्ञानेश्वरीच्या चवथ्या अध्यायात म्हणतात
    ते ज्ञान पै गा बरवे | जरी मनी आथी आणावे | तरी संता यां भजावे | सर्वस्वेसी |
    आनंदी जीवन जगण्यासाठी संत विचारांची गरज अनिवार्य आहे. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात संत विचार जाणून घेण्यासाठी वेळ मिळणे कठीनप्राय होऊन बसले आहे.
    आणि म्हणूनच यावर उपाय म्हणून आजच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संत शिरोमणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माउली ज्ञानेश्वर महाराजांची खऱ्या अर्थाने मानवी जीवन आनंदि व समृद्ध करणारी श्रीमद भगवद्गीते वरील अमौलिक अशी टीका ‘श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ चे संपूर्ण पारायण युट्युब च्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत.
    या पारायणाचे वैशिष्ट हे आहे कि यात गीतेच्या श्लोकांचा मराठी अर्थ देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे.
    सुरवातीला कदाचित ग्रंथ समजायला अवघड जाईल परंतु नियमित श्रवणाने ग्रंथाचे चांगले आकलन व्हायला सुरवात होते हा अनेकांचा अनुभव आहे.

Komentáře • 65