Raag Darbari kanada Bandish on Chatrapati Shivaji Maharaj in Shivtaal

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • राजा कसा चालेल? भरभर चालेल का? रेंगाळत चालेल का? नाही! राजाची चाल ठायी मध्यलयीत असेल. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा दिवस आहे, गेल्या अनेक वर्षांमधील मोहिमा, रयतेसाठी केलेली कामगिरी उभ्या रयतेच्या डोळ्यासमोरून सरकत जाते. शिवराय ठायी मध्यलयीत पावले टाकत सिंहासनाकडे जात आहेत-
    "महामेरू, बलवंत, भुषणम् दाता"
    प्रत्येकाच्या डोक्यात एक विशेषण येईल. कित्येक वर्षे मोगलांनी जगणं नकोसं केलं असताना, रयतेच्या पाठीशी हा बलवंत महामेरू सारखा उभा राहतो काय आणि रयतेची भिती नष्ट करतो काय! राजाची कर्तव्य पूर्ण करणारा दाता सर्व विशेषणांसाठी भूषणावह आहे म्हणायला हरकत नाही. त्याच्या कार्याची स्थायी सिंहासनावर पोहोचते तोच एका नव्या सूर्योदयाचा अंतरा दिसतो. तत्क्षणीं शिवराय छत्रपती म्हणून संबोधले जातात.
    "जनभय हरत, तेजःपुंज छत्रपती...!"
    धीरगंभीर महामेरूचे वर्णन करायला जसे ताल ठायी हवा, तसे स्वरांनी देखील खोल गंभीर स्वरूप धारण केले पाहिजे. त्यामुळे रागसंगीतातील रचनेत हा विचार (ख्याल) दिसला पाहिजे. दरबारीतील गंधार राजाचे विशेष गुण दर्शवेल, तर पंचम त्याचे अढळ स्थान!
    आपण तानांसाठी लय वाढवतो तशी या बंदिशीत वाढत नाही, कारण राजाचे चालणे अखंड असते. ही रचना शिवतालात बांधली हे आणखी एक विशेष! हा थोडा मत्त तालासारखा असला तरी शेवटच्या तीन मात्रांनंतर विशिष्ट प्रकारे समेवर येतो. बंदिश जशी तालात असावी तशी ती तालाच्या खंडात असावी लागते.
    राग- दरबारी कानडा | ताल- शिवताल
    स्थायी
    महामेरू बलवंता भूषणम् दाता |
    अंतरा
    जन भय हरत, तेजपुंज छत्रपती ||
    संपूर्ण अल्बम ऐकण्यासाठी मेसेंजर वा व्हॉट्सॲप (+91-9768210039) वर संपर्क साधावा.
    - वाचस्पती निर्मिती
    तेजस ©
    स्वर- सौ. सीमा दामले
    स्वररचना - सौ. सीमा दामले आणि तेजस
    रचना - तेजस
    तबला-अजिंक्य गलांडे
    संवादिनी - श्रीकांत पिसे
    संगीत संयोजन - श्रीकांत पिसे
    ध्वनिमुद्रण - नहुष बडगे
    साऊंड बेट्झ स्टुडिओ, नागपूर

Komentáře • 3