संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान.दि.22 जून 2022.

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 06. 2022
  • संत श्री.ज्ञानेश्वर महाराज व संत श्री.तुकाराम महाराज यांच्या पादुका व पालखी महाराष्ट्र राज्यातील पुणे स्थित आळंदी आणि देहू या गावाहून 250 km अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील पंढरपूरला श्री विट्ठलाच्या/पांडुरंगाच्या दर्शनाला नेण्याची प्रथा/परंपरा गेली सातशे पन्नास वर्षां पासुन अखंड पणे सुरू आहे.
    दर वर्षी 10 ते 15 लाख वारकरी आषाढी एकादशी ला पंढरपूर च्या पांडुरंगा च्या दर्शना साठी आळंदी,देहू वरुन 250 km चा प्रवास पंधरा वीस दिवस पायी/चालत जातात.
    कोणतेही निमंत्रण नाही.कोणिही बोलावले नाही,तरी सर्व जण एकत्र जमतात.वैष्णवजनां चा मेळावा भरतो.
    अखंड उत्साहाने,पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनात ठेउन ऊन,वारा,पाऊस सहन करत...पारिवारिक गरजा मागे सारुन,खिशात पैसे नसताना हसत हसत आपापले घर सोडतात.पंधरा वीस दिवस भिक्षा न मागता, लोकांच्या घरी माधुकरी न मागता कुणी आपण हून अन्न दिले तरच प्रसाद म्हणून ग्रहण करतात.आणि पुढे आपल्या वाटेला चालू लागतात.
    350 ते चारशे दिंड्या (groups)अत्यंत नियोजन बद्ध स्वत:ची व आपल्या दिंड्यां ची काळजी घेतात.
    कुणी भाकर्या करतंय,कुणी मेडिकल कीट उपलब्ध करुन देतय तर कुणी वारकर्याची दाढी मोफत करुन देतो.
    कुणी मोतीबिंदू चं opretion मोफत करतो.तर कुणी डॉक्टर वारकरीं लोकांना चष्मे वाटतो.
    दिवसभर अभंग गात गात,नाचत,जल्लोषात, रात्रीचा विसावा/मुक्काम करीत ते वाटचाल करीत जातात.
    नदीवरचे स्नान,करुन ओले कपडे अंगावर सुकावण्यात सुद्धा त्यांना आनंद मिळत असतो.कारण पुढे बरीच चाल उर्कायची असते.विठू माऊली च्या,आपल्या पांडुरंगा च्या दर्शना शिवाय दुसरे काहीही विचार यांच्या मनी ध्यानी नसतातच.
    अशी वारी दरवर्षी खूप आनंद घेउन येते,आणि जवळपासच्या गावांना भरपुर आनंद देऊन जाते.
    इथुन पुढे अशीच हजारो वर्ष ही परंपरा अखंड पणे सुरू राहो...हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
    🙏माऊली 🙏
    चित्रीकरण/प्रसारण:
    लक्ष्मीकांत इनामदार
    9822375346.

Komentáře • 2