Eating disorders खाण्याचे आजार |Khuspus with Omkar|Dr.Bhooshan Shukla & Amita Gadre|Marathi Podcast

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 08. 2024
  • Eating Disorders म्हणजे काय? खाण्याच्या आजाराची लक्षणं काय आहेत? कुठल्या प्रकारचे आजार यामध्ये आढळतात? याबद्दल चे misconceptions काय आहेत? कुठल्या वयोगटात eating disorders चा धोका जास्त आहे? यावर उपाय काय करू शकतो? कुठल्या stage ला डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे? Calorie counting महत्वाचं आहे का? Social media वरचं diet follow करणं योग्य आहे का? पालकांनी मुलांच्या diet साठी काय केलं पाहिजे? या आजारावर काय उपाय असू शकतात या सगळ्यावर आपण डॉ.भूषण शुक्ल (Adolescent and child psychiatrist) आणि अमिता गद्रे (Clinical Nutritionist) यांच्याशी चर्चा केली आहे.
    अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
    What are eating disorders? What are the symptoms of these disorders? What types of disorders fall under this category? What are the common misconceptions about eating disorders? Which age groups are most at risk? How can we address and treat these disorders? When is it necessary to consult a doctor? Is calorie counting important? Is it appropriate to follow diets found on social media? What should parents do to ensure their children's diet is healthy? What are the possible treatments for these disorders?
    In this discussion, we discuss these questions with Dr. Bhooshan Shukla (Adolescent and Child Psychiatrist) and Amita Gadre (Clinical Nutritionist).
    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
    Amuktamuk.swiftindi.com
    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
    Guests: Dr. Bhushan Shukla (Adolescent & Child Psychiatrist) & Amita Gadre (Clinical Nutritionist).
    Host: Omkar Jadhav.
    Creative producer: Shardul Kadam.
    Editor: Rohit landage.
    Edit Assistant: Sangramsingh Kadam.
    Content Manager: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savani Vaze.
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: open.spotify.com/episode/1FB7...
    #AmukTamuk #marathipodcasts
    Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
    00:00 - Introduction
    03:18 - What is an eating disorder
    07:53 - Eating disorder age group
    13:53 - Not eating is also eating disorder
    24:11 - How dieting leads to eating disorders
    33:07 - Impact on children and adults
    43:07 - Symptoms of eating disorders
    56:55 - Strictly disciplined diet and effects
    01:02:10 - Junk food and eating disorders
    01:07:22 - Binge eating and eating disorder
    01:08:45 - Eating disorder treatment

Komentáře • 349

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Před 15 dny +15

    डॉ भूषण शुक्ल बेस्ट माणूस आहे… प्रचंड आदर

  • @radhikakshirsagar2655
    @radhikakshirsagar2655 Před 23 dny +76

    केवळ अप्रतिम episodeझाला .सगळ्या गोष्टी अगदी पटत होत्या.भूषण शुक्लांच स्पष्ट बोलाण खूपच आवडल अणि पटल.❤मनापासून धन्यवाद .एकदम जिव्हाळ्याचा विषय.बारीक दिसण्यापेक्षा फीट राहाण्याला महत्त्व आहे .ते तरुण पीढीला कळल पाहीजे.दोघांनीही अगदी कळकळीनी माहीती सांगितली .

    • @vrindadiwan4779
      @vrindadiwan4779 Před 21 dnem +4

      बाहेरचे packedबंद व्हायला हवेतततेव्हांच सगळ्यांची वजने कमी होतील,बेतात येतील ।

    • @rohinigowande4500
      @rohinigowande4500 Před 15 dny +2

      Chan

    • @manjuchimote1356
      @manjuchimote1356 Před 13 dny +1

      तसेच लग्नाचे वय किंवा.करिअर, सेटल होणे, लाईफ म्हणजे फक्त पार्टी,खाणे पिणे या व्यतिरिक्त पण आहे...असे काही विचार घेऊन विविध लोकांचे विचार आम्हाला ऐकवा...सगळेच एपिसोड्स खूप छान असतात...फार आवडतात 👍🏻🙏🏻 धन्यवाद चांगले कार्य करताय असेच चालू ठेवा🙏🏻🙏🏻

  • @harshadanalawade2023
    @harshadanalawade2023 Před 23 dny +76

    एकच मन आहे आमचं..... किती वेळा जिंकाल..... टीम अमुक तमुक thank you very much........ Great going... 🙌

    • @rujutamorey8680
      @rujutamorey8680 Před 22 dny

      😂❤❤❤

    • @sunitadeshpande2195
      @sunitadeshpande2195 Před 21 dnem

      अगदी माझ्या मनात हीच प्रतिक्रिया होती. अमुक तमुक खूप भारी आहे.

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před 20 dny +1

      बापरे!❤ खूप खूप धन्यवाद! असचं प्रेम करत रहा.

    • @PriyankaParkar-cf5on
      @PriyankaParkar-cf5on Před 19 dny

      Q​@@sunitadeshpande2195

    • @smitaldalavi1374
      @smitaldalavi1374 Před 17 dny

      अगदी हेच विचार आले ❤ एक नंबवर

  • @kanchannene
    @kanchannene Před 23 dny +33

    अमुक तमुक.. तुम्ही भारी आहात. कुठून माणसं शोधता.. आणि कसे interview प्लॅन करता... तुम्हाला ही हॅक जमली आहे फक्कड... चिरायू व्हा. अतिउत्तम एपिसोड..

  • @namratakhare8798
    @namratakhare8798 Před 19 dny +26

    आमचं घर सुदैवाने ह्या सगळ्यापासून लांब आहे. Packed food, cold drinks आणि इतर गोष्टी फ्रिज मधे खचाखच खाऊ भरलेला , ice cream सतत घरात हे आमच्याकडे अजिबात नाहीये... इच्छाच नाही होत ह्या सगळ्या गोष्टी खायची सतत ....पूर्वापार जे चालत आलं आहे तेच रूटीन 😊

    • @prajaktasoman5787
      @prajaktasoman5787 Před 14 dny +1

      Same here ❤

    • @JayPatil877
      @JayPatil877 Před 13 dny

      एकतर तुमचं घर दुर्गम भागात असेल नाहीतर पुरातन काळात तरी😂😂😂😂

    • @namratakhare8798
      @namratakhare8798 Před 12 dny +3

      @@JayPatil877 दुर्गम भागात तर त्यांना पर्यायच नसतो ...आम्ही शहरात राहून हे follow करतो.... आणि जे पूर्वापार चालत आलेलं आहे .... आणि शेवटी सगळं करून लोक ह्याच जीवनशैली वर येतात शेवटी 😄

  • @swatikulkarni8284
    @swatikulkarni8284 Před 15 dny +7

    फारच छान अन्नाचे भान हवे हा डोळे खाडकन उघडणारा विचार. डॉ. शुक्ला आणि डॉ.अमिता दोघेही उत्तम. डॉ. शुकलांची विषयाबद्दलची पोट तिडीक जाणवते.

  • @rkathale
    @rkathale Před 22 dny +24

    शक्यतो एकटं खाऊ नये, हा खूप मोठा आणि डीप विषय आहे.. जुळून राहा हा खूप मोठा संदेश आहे. Thank you डॉ शुक्ला...

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 Před 22 dny +17

    विषय भारी आहे,चर्चेतून कळलं,जगात काय सुरू आहे.आमची आई तर म्हणायची "जेवा रे पोटभर .मोजमाप करू नका."प्रत्येकाची भुक वेगळी असते.

  • @harshadapadhye6259
    @harshadapadhye6259 Před 22 dny +11

    खूप खूप छान.
    डाॅ. भूषण आणि अमिता , खूप तळमळीने, सविस्तर आणि उगाच काही राखून न ठेवता बोललात. मनःपूर्वक धन्यवाद.
    तुम्ही जे सांगताय ते करणार्‍या पालकांना आणि मुलांना गावंढळ समजतात इतर माणसं.
    आयुर्वेदातील आहार पद्धतीत ही अशी अनेक मूलभूत तत्वे आहेत. पण आपण fad diet करणार! वाहवत न जाता जगता आलं पाहिजे.
    ओंकार, मस्त मुलाखत घेतलीस. ❤

  • @mayurianap6907
    @mayurianap6907 Před 23 dny +18

    आपली विषयाला धरून प्रभावी विचार मांडण्याची जी डॉ. सरांची शैली आहे ती आकर्षित करून विचार करायला भाग पाडते.

  • @nitee2100
    @nitee2100 Před 23 dny +25

    भारतात आणि त्यात मराठी मध्ये असे विषयांवर क्वचितच चर्चा होते. धन्यवाद अमुक तमुक. आपलं culture खूपच food based आहे. आणि त्यात हा एपिसोड पालकांनी खूप लक्ष पूर्वक बघावा. पालक मुलांच्या नात्यामध्ये empathy असणं खूप गरजे आहे.

  • @vidhidhakate5825
    @vidhidhakate5825 Před 23 dny +19

    I personally feel that this topic is not touched enough in India. Thank you for the precious content that too in Marathi.❤

  • @kvkothale
    @kvkothale Před 18 dny +6

    डॉक्टर शुक्ला यांनी आजच्या ज्वलंत विषयाला सायंटिफिक भाषेत सोप्या साध्या पद्धतीने उलगडून सांगितला वेळप्रसंगी चांगल्या कानपिचक्या ही दिल्यात आणि डॉक्टर अमिता यांनी तर सहजतेने हा विषय ( चुका व त्यावरील उपाय) परिणामकारक रित्या प्रेक्षकांच्या मनात उतरवला .आपणा दोघांनाही धन्यवाद🌹🌹

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 Před 16 dny +3

    खूप दिवसानंतर एवढी छान चर्चा ऐकता आली. डॉक्टर शुक्ला आणि डॉक्टर अमिता दोघांनीही खूपच सहज सोप्या शब्दात चांगली माहिती दिली आणि समाजातील एका अत्यंत महत्वाच्या विषयावर छान चर्चा रंगली.धन्यवाद

  • @nilimakashikar6354
    @nilimakashikar6354 Před 20 dny +2

    आगदी तंतोतंत खर आहे..आपण डॉक्टरांच्या मर्सिडीज चा हप्ता भरतो..
    खूप भावला.. कसं खायला पाहिजे,त्याचे तारतम्य समजलं..
    खूप आभारी आहे...

  • @ashvineekhair9226
    @ashvineekhair9226 Před 22 dny +4

    Dr भूषण शुक्ल जे आणि जसं सांगतात ते अफलातून आहे ,अमिता पण खूप छान बोलल्या आहेत आणि एकूण विषयाची हाताळणी यामधे अमुक तमुक टीम चं खूप कौतुक आहे. हा सामाजिक मुद्दा आणि मराठी मधून त्यामुळे खूप लोकांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा आणि तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद🙏

  • @smitaldalavi1374
    @smitaldalavi1374 Před 17 dny +3

    मी स्वतः दुसऱ्या बाळंतपणा नंतर २० किलो वजन कमी केलं आणि मी ते व्यवस्थित भान ठेऊन केलं हे कळल पण मी आता अति करते का असं वाटायला लागलाच होत आणि हा एपिसोड पाहिला. खूप खूप धन्यवाद

  • @MadhuraJoshi2382
    @MadhuraJoshi2382 Před 15 dny +5

    खाडकन डोळे उघडणारा एपिसोड आहे हा. आणि खूप माहितीपूर्ण सुद्धा..मी स्वतः 'स्ट्रेस इटिंग' मध्ये अडकलेली व्यक्ती आहे, त्यावर प्रयत्नही सुरु आहेत. ह्या एपिसोड मधून खूप टिप्स मिळाल्या. भान ठेवूनच खाल्लं पाहिजे हे पटलं. जसं आपण म्हणतो कि बॉडी imaging वर सध्या फार फोकस आहे लोकांचा तसंच मला वाटतं एखाद्याचं disordered इटिंग दिसलं तरी त्याच्यावर ताशेरे पण खूप मारले जातात. आणि त्या व्यक्ती ला असं होतं की हो मान्य आहे चुकीचं आहे पण मला माझं ते सुधारायला वेळ द्या ना. आणि ह्या ताशेऱ्यांमुळे त्या व्यक्ती चा स्ट्रेसही अजून वाढत जातो. म्हणजे इतक्या स्तरावर , की एखाद्या व्यक्तीची आहारशैली बिघडली आहे तर त्यांच्याकडे लोक (जवळचे लांबचे मित्रवर्ग ई.) जेवायला / खायला जाणं पण टाळतात. अगदी सतत ह्या घरात वाईटच खातात किंवा आम्हालाही unhealthy फूड खावं लागेल की काय किंवा ह्या विरुद्ध situation मध्ये एखाद्या घरात कमीच खायला मिळेल की काय किंव्हा चांगलं काही खायला मिळेल की नाही ह्या फाजील भीतीने. आणि अश्या अनुभवाने त्या व्यक्ती चं मन किती दुखावलं जात असेल ह्याची कल्पना कोणाला येत नाही. आजचा एपिसोड खरंच सुंदर आणि अर्थपूर्ण.

  • @umasawant3015
    @umasawant3015 Před 21 dnem +1

    अतिशय प्रभावी एपिसोड.परखड आणि कळकळ दोन्हीचा समन्वय.
    पालक आणि संस्कार ही मूल्य महत्वाचे

  • @vibs99
    @vibs99 Před 15 dny +2

    खूप गरजेचा विषय घेतल्याबद्दल खरंच आभार. दोन्ही consultants नी खूप frank आणि महत्वाचे सल्ले दिले या बद्दल खूप Thank you..

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před 22 dny +1

    खुपच महत्वाच्या विषयावर चर्चा झाली आहे. जी की मला वाटते खुप टाॅप लेवलवर हयाचा विचार होणे महत्त्वाचे आहे जे की होत नाही. पाहुण्यांचे खुप खुप आभार की आम्ही ह्यातून खुप काही शिकलो. सरांचे थेट बोलणे🔥🔥🔥🔥 अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️❤️. अमुक तमुक टीमचे सुद्धा खुप खुप धन्यवाद 🙏🏼

  • @sakshipatekar9627
    @sakshipatekar9627 Před 21 dnem +2

    अतिशय माहितीपूर्ण चर्चा, भूषण सरांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टी विचार करायला भाग पाडतात,भूषण सरांबरोबरचा प्रत्येक एपिसोड हा उत्तमच असतो

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 Před 18 dny +2

    खूप छान podcast झाला, नेहमीच्या प्रमाणे. आता विरुद्ध आहाराबद्दल एखादे अमिता मॅडम आणि सरांचे podcast करा.

  • @vanashreesahasrabudhe3897

    खूप छान झाला हा episode. मला वाटतं प्रत्येक मुलगी आपल्या आयुष्यात एकदा तरी self conscious होऊन काहीतरी विचित्र diets वगैरे करतेच. आणि त्यावेळेस दुसरे आपल्याला काय सांगू पाहतात, समजावू पाहतात हे ऐकण्याची मनस्थिती पण नसते. मी देखील असे एकदा केले आहे. आपल्या मनावर ताबा ठेवायलाच हवा या समजुतीत मी पूर्ण झापड लावून घेतली होती. सुदैवाने lockdown आले आणि तो प्रकार बंद पडला. अमिता ताईंची तर मी विशेष fan झाले आहे. Thanks @amuktamuk for introducing us to her!! तुमचे सगळेच episode खूप छान असतात. ❤

  • @vattamma20
    @vattamma20 Před 23 dny +3

    खूप छान पॉडकास्ट.
    बारीक राहणं अणि हेल्दी असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
    बारीक राहणं हा च एक गोल असतो आजकाल..
    हे खूळ गावापर्यंत पोहचल आहे. मुली तिथे रिल्स बघतात आणि कमी खायला लागतात. त्यांचं काम खूप असतं तिथे अणि त्यांनी सकस आहार घ्यायची गरज आहे.

  • @sampadadiwan1
    @sampadadiwan1 Před 23 dny +6

    Dr. Shukla , your speaking skills are also commendable

  • @shreyasi-aneesh2014
    @shreyasi-aneesh2014 Před 6 dny

    अप्रतिम episode होता. डॉ. भूषण शुक्ला यांचे परखड बोलणे खूप भावले. आजकाल समाजात तरुण वर्गात खाण्याच्या सवयीमुळे जे भयंकर घडत आहे त्याची कल्पना आली. आणि या सगळ्यापासून कसे स्वतःला दूर ठेवले पाहिजे ते ही कळले.
    Thank you so much Amuk Tamuk Team !

  • @shilpaahirrao1043
    @shilpaahirrao1043 Před 18 dny +1

    एकूण एक गोष्ट मावशी तुम्ही मोलाची सांगितली हो.तुमचे खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ टाकत जा.🙏👌👌👌

  • @ujwalabag7183
    @ujwalabag7183 Před 22 dny

    Khup khup sunder episode. Ek vyakti mhanun ani Aai mahnun dogha guests che vichar patatat. Hats off to Omkar and both the guests.

  • @saurabhmalsoor5218
    @saurabhmalsoor5218 Před 16 dny +2

    ओंकार तुम्ही खऱ्या अर्थाने मराठी संस्कृती चा वारसा पुढे चालवत आहात. आशयघन विषय आणि मूलभूत वस्तू वर काम केलेले वक्ते यांचा सुरेख समतोल साधला आहे तुम्ही. सध्याच्या podcast चा सुळसुळाट झालेल्या काळात असा सुसंस्कृत पणे संवाद साधणे आणि विषयाची खोली गाठून पण साधेपणाने व्यक्त होता येणे हे तुमचे खरे यश आहे. ही संवादाची शृंखला अशीच कायम राहू देत आणि भूषण शुक्ल यांसारखे उत्तुंग प्रतिभेचे पण जमिनीवर पाय असणारे व्यक्तित्व प्रत्येक संवादाला असावेत हीच शुभेच्छा ..

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 22 dny

    खुप च सुंदर एपिसोट . ऐकावे जनाचे करावे मनाचे . तुमची एक एक गोष्ट मात्र ऐकली आणी पटली .

  • @anuradhayeolekar3906
    @anuradhayeolekar3906 Před 15 dny +1

    खूप छान माहिती डाॅ. भूषण आणि अमिता तुम्ही दिली .प्रत्येक पालक आणि मुलामुलीनी ऐकली पाहिजे .अमुक तमुक टीमने हा विषय घेतल्याने त्यांचे कौतुक 😊
    ओंकार मस्त मुलाखत घेतलीस
    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sadhanaashokkumarmeshram3524

    फारच सुंदर विषय होता.पालकांनी मुलांकडे खरच लक्ष द्यायला हवं.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Před 19 dny

    फंडालमेंटल फरक आपण आणि पश्चात्य हा मुख्य फरक छान सांगितलात 👌🏻 जो अत्यंत दुर्लक्षित केला जातो.फार छान आणि पटणारे दाखले दिलेत. "उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म " याची आठवण करून दिलीत. धन्यवाद 🙏🏻

  • @shitaldighaokar6751
    @shitaldighaokar6751 Před 23 dny +2

    खूप महत्त्वाची महिती... डोळे उघडवणारा पॉडकास्ट

  • @pradnyapetkar1759
    @pradnyapetkar1759 Před 16 dny +1

    दोन्ही डॉक्टरांनी अतिशय सुरेख पद्धतीने विषय मांडला. धन्यवाद

  • @surekhababar477
    @surekhababar477 Před 22 dny

    खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण विवेचन..... 👏👏👏👏👏
    सरांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टी खरंच अगदी पटणा-या , विचार करायला लावणा-या होत्या ....!!! 👌👌👌👌मॅडमनी सुद्धा अगदी आत्ताच्या पिढीच्या गोष्टी सांगितल्या नक्कीच त्या खूप महत्त्वाच्या आहेत....!!!
    अमुक तमुक.... 🎉🎉🎉खूप खूप खूप धन्यवाद.....! 🙏

  • @snehamondkar9637
    @snehamondkar9637 Před 22 dny

    खूपच सुंदर एपिसोड झाला . डॅाक्टरांनी आणि अमिताजींनी दिलेली माहिती अगदी उपयुक्त
    तरूण पिढीला यातून बरेच काही घेण्याजोगे आहे 👍

  • @aparnaterkar8081
    @aparnaterkar8081 Před 7 dny

    खुपच छान होता हा एपिसोड खाण्याबद्दल जे काही मनात गोंधळ होते ते clear झाले thank to all team😊

  • @peeyushthombare
    @peeyushthombare Před 23 dny +1

    Amazing podcast yet again. Dr Bhooshan is outstandingly bold, direct and to the point. Amita maam is equally good and balancing the point of view. Superb episode one more. Amuk Tamuk cha karava titka kautuk kami aahe. You guys keep making this better and bigger. Pls consider breaking this into short videos which will be easy to share and spread among people for the relevent contents. I fear 1+ hour video might not be seen throughout by some. Kudos again to the Amuk Tamik team. Keep growing guys, you are making a huge difference.

  • @kirtimardikardegloorkar1104

    अप्रतिम मांडणी, महत्वपूर्ण विषय... भूषण सर आणि अमृता मॅडम ह्यांना खूप खूप धन्यवाद. ओंकार खूप खूप अभिनंदन ❤❤

  • @anjalishirwadkar7954
    @anjalishirwadkar7954 Před 17 dny

    खूपच सुंदर होता हा एपिसोड,मी फॅन आहे अमुक तमुकची, अत्यंत कठीण विषय खूपच छान समजावलं आहे,हल्लीची तरुण पिढी आपली संस्कृती विसरली आहे
    आपला आहार हा ऋतू,काळानुसार, आयु्वेदानुसा आयु्वेदानुसार असा पूर्वापार जो आहे तो उत्तमच आहे,पण.,
    उत्तमच मार्गदर्शन सरांचा परखड विचार ❤

  • @ruchalonkar4499
    @ruchalonkar4499 Před 18 dny

    मस्त च episode. Thank you team Amuk Tamuk.
    नेहमीचे food बद्दलचे तेच तेच विषय n घेता, एक एकदम वेगळा विषय घेतलात. यात सांगितलेल्या गोष्टी सगळ्यांना समजणं अतिशय गरजेचं च होतं.उत्तम निवड, उत्तम सादरीकरण
    प्रश्न चांगले विचारले आणि त्या वर दोन्ही तज्ञांनी दिलेली उत्तरं आवडली, पटली.
    डॉ शुक्ल आणि डॉ अमिता दोघेही छान बोलतात ❤

  • @geetanjalinaik4688
    @geetanjalinaik4688 Před 21 dnem +1

    खुप चांगली माहिती / मार्गदर्शन मिळाल , या विषयावर सतत बोलणं आवश्यक आहे

  • @snehal1968
    @snehal1968 Před 22 dny

    अमुक तमुक टीमचे खूप खूप आभार, यावर आणखी एक भाग व्हायलाच हवा 🙏

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd Před 23 dny +2

    डॉक्टर भूषण यांनी जबरदस्त माहिती दिली❤❤❤❤

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 Před 13 dny

    खूप खूप छान आणि उत्तम आरोग्याचे बद्दल फिटनेस बद्दल माहिती देणारा एपिसोड ....dr. चे स्पष्ट म्हणणे खूप पटले, चंगळवाद आणि जिभेचे चोचले हेच याला कारणीभूत असल्याचे जाणवते, तरुण पिढी नी जर आत्ताच वेळेवर हे समजून नाही घेतले तर पुढील काळ खूपच कठीण वाटतो ....मॅडम ने म्हटल्याप्रमाणे थोडक्यात गोड, समाधान असावे कायमच ती गोष्ट मिळत राहिली तर तिचे महत्त्व तेवढे राहत नाही उदा.पुरणपोळी... श्रावणात खावी,एक किंवा दोन पण हल्ली जे सहज उठसूट हॉटेलिंग हे घातक तर आहेच आणि मग पैसे बजेट सगळे ढासळले की येणारा स्ट्रेस हा वाढत जातोय, आपले पोटेन्शियल आपल्यातली ऊर्जा चांगल्या गोष्टींसाठी वापरायला शिकले पाहिजे ...उत्तम एपिसोड...असेच अजून छान छान विषय घेऊन या ....एखादा episode हल्ली US मध्ये किंवा आऊट ऑफ प्रचलित असलेल्या DINK (double income no kids)., मुल जन्माला घालायला नको बाकी, पेट्स la खूप जीव लावा पण स्वतचे बाळ नको... यावर करा...👍🏻🙏🏻🙏🏻

  • @yogitadesale9060
    @yogitadesale9060 Před 22 dny

    Amuk Tamuk
    Thanks for bringing such unique useful and informational content ......
    Dr tr khup ch chhan boltat त्यांचं सांगितलेलं एक n एक बाब पटते 😊😊
    अमिता गद्रे ❤❤

  • @ShubhashreePatwardhan
    @ShubhashreePatwardhan Před 21 dnem +1

    सर्व पालक आणि मुलांना मकरंद बुवा सुमंत यांसारख्यांचे आदर्शभुत प्रवचन आणि कीर्तन ऐकायला सांगा सगळा खुळचट पणा व्यर्थ कसा आहे ते कळेल.आपली भारतीय ध्येयासक्ती अध्यात्मिकतेच्या माध्यमातून नक्कीच मार्गी लागू शकते.

  • @artimane4008
    @artimane4008 Před 14 dny

    अतिशय सुंदर एपिसोड❤ अमुक तमुक च्या निमित्ताने डॉक्टर भूषण सर यांसारखे प्रभावी व्यक्तिमत्व भेटले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @aartizagade7885
    @aartizagade7885 Před 17 dny

    अप्रतिम एपिसोड ❤❤❤ 🙏🏻✨ खूप धन्यवाद इतक्या चांगल्या विषयावंर प्रकाश टाकल्याबद्दल.

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Před 23 dny +1

    Dr bhushan faar chan bolalat. Great people. Amita madam, great.

  • @seemanitsure9605
    @seemanitsure9605 Před 16 dny

    फार माहिती पूर्ण आहे. अनेक नवीन गोष्टी कळल्या. सौंदर्य म्हणजे केवळ शरीर नाही हे समजलं पाहिजे

  • @nabhathakur1387
    @nabhathakur1387 Před 6 dny

    खूप छान episode. भान असणे खूप महत्वाचे. शुक्ल आणि गद्रेनी खूप छान कान उघडले.❤🎉

  • @truptikhadse1804
    @truptikhadse1804 Před 22 dny

    Amuk Tamuk - what a brilliant podcast ! This information and knowledge will definitely help many people develop healthy food habits and holistic approach towards our food choices and nutrition. Hats off to your team !! 🎉

  • @vineetakshirsagar5807

    खरेच dr. शुक्ला खूप छान आणि परखड बोलतात...मस्त दोघेही.. छान मुलाखत आणि विषय पण छान hatalay

  • @vasudhamitragotri1459
    @vasudhamitragotri1459 Před 23 dny +1

    Atishay informative hota aajacha podcast.Thanks Omkar.

  • @gauripotdar616
    @gauripotdar616 Před 21 dnem

    टीम अमुक तमुक... ❤️❤️❤️... नेहमी प्रमाणे अप्रतिम podcast... Keep it up... 👏🏽👏🏽👏🏽

  • @shraddhasohoni12767
    @shraddhasohoni12767 Před 16 dny +1

    जगाला कळतच नाही भूक आणि तहान ह्या आपल्या नैसर्गिक भावना आहेत आणि आपलं पारंपरिक जेवण हेच उत्तम...

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 Před 21 dnem

    जगण्यासाठी खाणे हे समजले. अतिशय महत्त्वाचा विषय❤❤❤❤धन्यवाद

  • @PoojaKorte
    @PoojaKorte Před 23 dny +1

    खरच जबरदस्त विषय घेऊन अलात आज👍🙏

  • @trishikagonate1368
    @trishikagonate1368 Před 23 dny

    खूप खूप धन्यवाद अमूक तमूक, तुम्ही जे काही कार्य करीत आहात त्याला तोड नाही

  • @madhavirajpurohit2300
    @madhavirajpurohit2300 Před 10 dny

    सरांनी सांगितले तसे भान आणि तारतम्य ह्याचा विचार प्रत्येक गोष्टीत होन गरजेचं आहे.....जे आता सुटल आहे.
    एपिसोड अप्रतिम.,मनापासून तिघांचे आभार 🎉

  • @user-om6bo2qi2e
    @user-om6bo2qi2e Před 22 dny

    This is absolutely amzing podcast ever i have seen amazing . i think everyone should watch it . Including from every language speaker.

  • @mrs.shrilekhajitendrajoshi9418

    Dr Bhushan आणि Dr Amita both are TheBest

  • @ogayatri
    @ogayatri Před 20 dny

    खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली. नवनवीन विषय हाताळणी मस्त.

  • @dhanashrinaik1174
    @dhanashrinaik1174 Před 17 dny

    Khupch sunder ani mendula avashyak asaleli mahiti darvelela pohchavalyabaddal dhanyawad.Sagle speakers tumche khupch sunderpane vishay mandatat.Very impressed.High quality content.Thank you.❤❤❤

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 Před 21 dnem +2

    फारच उत्तम, ❤, हल्ली लोकं बाहेरून खूप मागवू लागलेत, तुलनेत बराच वर्ग चीझ , अमुल पनीर आणि खूप सारे ब्रेड खाण्यात पुढे आहे, ते ही चुकीचेच वाटते, घरचं ताजं सात्विक जेवण, पोषक आहार फार पूर्वीपासूनच नियोजित केलेला आहे आपल्या पूर्वजांनी, त्यामागे शास्त्र आहेच पण ते किती उत्तम आहे आणि तेच कसं योग्य आहे हे हल्ली खूप जाणवतं, आता सतत बाहेर आणि बाहेरचं खाण्याकडे खूप कल आहे, आणि त्यात लोकांना आनंद मिळतो हे विशेष, मेनापॉझ मधे पण खूप चढ उतार होतात मुड चे, त्यावेळी पण कधी खूप खावे वाटते किंवा सतत गोड खात रहावे वाटते, तर कधी अन्नावरची वासना पूर्ण उडून जाते, त्यावर ही एक एपिसोड कराल का plz, त्या काळातले डाएट किंवा फूड habbits?

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před 20 dny +1

      czcams.com/video/uy3Se8XoGWo/video.html हा एपिसोड नक्की बघा

    • @aishwaryavaijapurkar9671
      @aishwaryavaijapurkar9671 Před 20 dny

      @@amuktamuk sure 👏, thanks

  • @shivajipise681
    @shivajipise681 Před 15 dny

    Dr sh bhushan shukla he atyant hushar
    Atyant. Premal aani khup khup manusaki aslele. Tadnya Dr aahet. Great Dr

  • @poonammane1639
    @poonammane1639 Před 22 dny +2

    मस्तच याचा part 2 बघायला खूप आवडेल नक्की प्रयत्न करा या दोघांना परत बोलावण्याचा .
    खूप छान बोलतात सर अजून माहिती ऐकायला नक्कीच आवडेल

  • @poorvalele2892
    @poorvalele2892 Před 22 dny +1

    नमस्कार!नी कार्यक्रमाला सुरुवात खूप छान वाटले.👌👍🙏🌹

  • @user-yj7ym7fx8b
    @user-yj7ym7fx8b Před dnem

    खूप छान episode, Dr. Shukla, The Best

  • @saritakulkarni7313
    @saritakulkarni7313 Před 20 dny

    फारच real गोष्टीची जाणीव झाली.दोघे geust उत्तम.आणी अमुक तमुक च किती कौतुक करू

  • @shubhadabhangre7469
    @shubhadabhangre7469 Před 23 dny

    Simply fabulous .... And worthy discussion thanks for actual....clear and direct highlights

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 Před 19 dny

    खूप माहितीपूर्ण आणि वेगळा विषय आमच्या पोचवला ... धन्यवाद संपूर्ण टीमचे

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 Před 21 dnem

    अतिशय उत्तम विषय,उत्तम वक्ते,उत्तम मांडणी ! धन्यवाद.याचा दुसरा भाग सुध्दा ऐकायला आवडेल.

  • @nitapanchal-im6mn
    @nitapanchal-im6mn Před 20 dny

    Dr.bhushan is outstanding bold, directly to point

  • @yogitakulkarni8950
    @yogitakulkarni8950 Před 14 dny

    Team अमुकतमुक...... You all are fabulous..... किती माहीती पुर्ण पॉडकास्ट आहे हा......डॉक्टर्स are so expert.... काय काय लिहु..... Too good too good

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před 22 dny

    अप्रतिम आहे विदियो...सर्वांना धन्यवाद..👌👌😊

  • @BTSARMY-tg2qy
    @BTSARMY-tg2qy Před 23 dny +1

    खूप छान episode...Dr. शुक्ला सर 🙏🏻👍🏻

  • @shilparao1559
    @shilparao1559 Před 22 dny

    खूप खूप खूप उत्तम विषय, अतिशय उत्तम वक्ते आणि खूप उत्तम माहिती ❤क्या बात है l अमुक तमुक टीम फार उत्तम कामगिरी 👌👌👌👌

  • @sangitabhagwat3730
    @sangitabhagwat3730 Před 23 dny

    नेहमीप्रमाणे खूप छान आणि माहितीपूर्ण एपिसोड झाला 👌🏻

  • @sushant309
    @sushant309 Před 21 dnem

    खूप छान माहिती मिळाली. ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी डायट कसा कराव असा पण एक पोडकास्ट करा.ज्यांचं वजन आधीच कमी आहे आणि आजारपणामुळे अजून वजन कमी होत पण मग ते नॉर्मला आण्यासाठी जेव्हा थोडा जास्त खाल्लं जात तेव्हा शुगर कोलेस्ट्रॉल वाढू शकता.

  • @snehalmahajan2164
    @snehalmahajan2164 Před 10 dny

    thank u so much Dr. Shukla and Amita khup chhan margdardhan kele

  • @rutujahardas5454
    @rutujahardas5454 Před 23 dny

    Excellent topic omkar , Kudos to your team for choosing this one !!

  • @manjusharane1223
    @manjusharane1223 Před 16 dny

    Ya podcast mule dr. Ekdam viral zale aahet. Khup chhan episode zala.

  • @ambrishdeshpande8264
    @ambrishdeshpande8264 Před 12 dny

    काय भारी बोलता तुम्ही भूषण सर..खूपच छान आणि स्पष्ट पणे विषय समजावलात..नेहमीप्रमाणे ...thanks अमुक तमुक टीम❤

  • @mrunamol5753
    @mrunamol5753 Před 20 dny +1

    ❤ खूपच छान विषय निवडलाय तुम्ही.... खूप खूप आभार....🎉..great going

  • @nikitaerande8421
    @nikitaerande8421 Před 17 dny

    Superb! कित्ती छान बोललेत डॅा. शुक्ल आणि अमिता!

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Před 23 dny +3

    Khup Bhari ek number🎉Dhanyavaad

  • @TanmayeePatwardhan
    @TanmayeePatwardhan Před 9 dny

    अप्रतिम. It’s a complete eye opener.

  • @saylipatil7549
    @saylipatil7549 Před 22 dny +1

    Dr bhushan tumcha bolana anekanche dole ughadnara aahe. Agdi mojaka ani mahatvacha bolta tumhi. Khupach chan.

  • @anandbhagawat7348
    @anandbhagawat7348 Před 14 dny

    खूप छान वाटला भाग....
    दोन्ही तज्ञ अतिशय मार्मिक बोलले आहेत...

  • @umabhorkar1609
    @umabhorkar1609 Před 22 dny

    Khup chan informative podcast
    Thank you 🙏
    He ase vishay charche saathi aanlya baddal

  • @sugandhbhatia758
    @sugandhbhatia758 Před 19 dny

    Wonderful episode, very well orchestrated. Both speakers got equal opportunity to share their valuable opinions and experiences.

  • @sohamranadepersonal2733
    @sohamranadepersonal2733 Před 22 dny +1

    This video perfectly explains the severe degree of deficiency in mindset of society. The society just does not know the difference between appropriate and in-appropriate behaviour.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Před 22 dny

    खूपच छान विषय चर्चा केली आहे. 😊

  • @user-jm4eo6ox7y
    @user-jm4eo6ox7y Před 22 dny

    Thank you Amuk Tamuk special thanks Bhooshan sir❤❤❤

  • @sanket10915
    @sanket10915 Před 13 dny

    अमुक तमुक चा सर्वात बेस्ट एपिसोड ❤️❤️ Thanks a lot

  • @anjalisawant1782
    @anjalisawant1782 Před 16 dny

    Hi,खूप छान प्रकारे गोष्टी समजावल्या. धन्यवाद. अन्न आणि शरीर यांच एकमेकांशी असलेले पूरक नात मुलांना समजावून सांगणे खूप गरजेच आहे. लहान मुलांना होणारे रोग बघितले की खूप दुख होत 😢