गजकर्ण,खरूज आणि नायटा ह्यामुळे त्रस्त आहात?| What is Ringworm?Fungal Infection Causes and Treatment

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • नायटा / गजकर्ण
    Fungal infection
    आजचा विषय आहे गजकर्ण. हा विषय घेण्याचं कारण म्हणजे खूप जणांनी request केली या topic साठी. आणि तसंही (फंगल इन्फेक्शन) नायटा ही खूप सर्रासपणे आढळणारी समस्या आहे.
    गजकर्ण म्हणजे नक्की काय??
    ज्या व्यक्तींना सतत घाम येतो आणि आणि शरीराचा ठराविक भाग हा ओलसर राहतो अशा व्यक्तींना गजकर्ण होऊ शकते.
    Microsporum trichophyton आणि epidermo trichophyton यांच्यामुळे गजकर्ण होत.
    सुरुवात कशी होते??
    जिथे घामामुळे सतत ओलसरपणा असतो तिथे सुरुवातीला एक किंवा दोन फोड येतात आणि त्याला खाज येते आणि मग गोल चट्टा तयार होतो.
    म्हणजेच ते ringworm सारख दिसत. त्याचा त्याला व्यवस्थित बॉर्डर असते आणि खाजवल्या नंतर तिथल्या त्वचेचे पापुद्रे निघतात. आणि खूप खाज येते आणि आग होते अशाप्रकारे तो चट्टा पसरत जातो.
    गजकर्ण कुठे कुठे होते??
    १. गळ्यावर, पाठीवर येणारा सुरमा हा देखील गजकर्णाचाच प्रकार आहे.
    २. गजकर्ण सर्रासपणे पोट, कंबर, पाठ, जांघांमध्ये, buttocks, काखेत ,छातीवर (breast च्या खाली) आढळून येते त्याला Tinea corporis असं म्हणतात.
    ३. कमरेखाली गुप्तांगाजवळ होणारे गजकर्ण म्हणजे Tinea cruris.
    ४. याव्यतिरिक्त गजकर्ण हाताच्या बोटांना , नखांना,पायाच्या बोटांना होऊ शकते.
    ५. डोक्याला केसांमध्ये देखील गजकर्ण होते त्याला Tinea capitis असे म्हणतात.
    पुन्हा पुन्हा होणारे आणि अजिबात बरे न होणारे गजकर्ण?
    सध्या गजकर्ण पुन्हा पुन्हा होणे
    म्हणजेच रेझिस्टन्स केसेस हा हा सर्वात मोठा प्रश्न आहे असं होण्याचं कारण म्हणजे गजकर्ण झाल्यानंतर टीव्हीमधील जाहिरात पाहून अथवा मित्रांच्या सल्ल्यानुसार परस्पर मेडिकलमध्ये जाऊन क्रीम्स घेतल्या जातात आणि त्या वापरल्या जातात बऱ्याचदा या क्रीम चुकीच्या असतात ज्यामुळे गजकर्ण बरा होण्या ऐवजी अजून पसरू लागते काही क्रीम्स (स्टेरॉईड) वापरल्यानंतर खाज कमी येते, चट्टा कमी झाल्या सारखा वाटतो, मात्र क्रीम थांबवली की पुन्हा गजकर्ण होत. म्हणून पेशंट कायम ती क्रीम वापरतात यामुळे अतिवापरामुळे तिथल्या भागाची त्वचा जास्त संवेदनशील होऊन लाल होते आणि कालांतराने तेथे skin atrophy म्हणजे त्वचा पातळ होते. Skin atrophy ला कोणताही इलाज नाही त्यामुळे परस्पर मेडिकल मधून क्रीम आणून वापरू नयेत.
    हे सगळं वापरून झाल्यावर मग पेशंट डॉक्टरांकडे जातात आणि फरक पडत नाही अशी तक्रार करतात. आणि मग एका डॉक्टर कडून दुसऱ्या डॉक्टर कडे असे फिरत राहतात. गजकर्णला फरक पडत नाही. कारण आधी चुकीच्या क्रीम्स वापरल्यामुळे गजकर्ण जास्त पसरलेल असत.यासाठी वेळीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार चालू केले तर रेजिस्टन्स केसेस होणार नाहीत.
    गजकर्ण होऊ नये म्हणून.......
    गजकर्ण होऊ नये म्हणून खालील उपाय आपण करू शकतो.
    १. ज्यांना सतत घाम येतो त्यांनी सैल आणि सुती कपडे वापरावेत.
    २. शक्यतो जीन्स , लेगिन (leggings)वापरू नये कॉटन ट्राऊझर्स, सलवार वापराव्यात.
    ३. घाम आल्यास तो सुती कापडाने टिपून घ्यावा.
    ४. घाम निथळत ठेवू नये.
    ५. शक्य झाल्यास दोन वेळा आंघोळ करावी आणि कपडे बदलावेत.
    ६. सर्वात महत्त्वाचं खाज आल्यास तिथे नखांनी खाजवू नये अन्यथा गजकर्ण पसरत जाईल.
    ७. शक्यतो जाड लोकांना घाम जास्त येतो, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करावा.
    ८. ज्यांना पाण्यात काम करावं लागत त्यांनी काम झाल्यावर हात कोरडे करावेत.
    ९. स्वतःच्या मनाने, परस्पर मेडिकल मध्ये जाऊन क्रीम वापरू नये.
    Homoeopathic medicine
    होमिओपॅथी औषध
    Sulphur, meserium, bacilinum या सारखी औषध गजकर्णवर छान काम करतात.
    अर्थात ही औषध देखील तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
    गजकर्ण झाल्यावर काय करायचं यापेक्षा आधीच गजकर्ण होऊ नये म्हणून काळजी घेणं फायदेशीर आहे....
    डॉ. अमृता कदम
    MD
    कोथरुड, पुणे

Komentáře • 81

  • @tanajimagdum7146
    @tanajimagdum7146 Před 5 měsíci +3

    अतिशय छान माहिती दिली

  • @vaishalijadhav3370
    @vaishalijadhav3370 Před 5 měsíci +3

    खुपचं छान बनवून दाखवली तुंम्ही बिर्यानी अत्ता घोळिचखार आणि वांग यांची रेसिपी नक्की बनवुन दाखवा

  • @kachrusure1969
    @kachrusure1969 Před 5 měsíci +12

    अंगावर चट्टे येतात व खास फार सुटते त्याच्यासाठी क्रीम हवी आहे

  • @meenabhosale5226
    @meenabhosale5226 Před 3 měsíci +1

    छान माहिती सांगितली ताई

  • @latakatore9114
    @latakatore9114 Před rokem +3

    धन्यवाद मॅडम खुप छान माहिती

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura

    Honourable Dr Madamji Thanks for your Best information about Skin deaces With lots of Blessings to you and your family With warm and Great regards ✨️

  • @dakshpatil2652
    @dakshpatil2652 Před 2 měsíci

    खूप छान माहिती मिळाली माझ्या मुलाला असे रिंग उठले आहे औषध काय लावायचा

  • @vishalkadam5824
    @vishalkadam5824 Před 3 lety +5

    Best information...👍👌

  • @RamdasSable-pn7pu
    @RamdasSable-pn7pu Před měsícem

    नायट्यासाठी उपयुक्त औषध

  • @ashvinikondhare2999
    @ashvinikondhare2999 Před rokem +1

    Khup chan 👌,yogya mahiti dili doctor

  • @JyotiMali-qx9qn
    @JyotiMali-qx9qn Před dnem

    औषध सांगा. मॅडम मला पण फगल इन्फेक्शन झाले आहे ताई

  • @meenabhosale5226
    @meenabhosale5226 Před 3 měsíci +1

    मीना भोसले बोलत आहे माझ्या मुलाला फगन इन्फेक्शन होऊन खुप दिवस झाले डॉ दाखवले आहे औषध चालू आहे पण फरक नाही उपाय सांगा ््््आणि तो जिन्स पॅट घालून ठेवतो

  • @mukundvkulkarni5315
    @mukundvkulkarni5315 Před měsícem

    Dr khup mahag zale aahet saglyana parvadat nahi, saglyana llavkar karodpati vhayche aahe barobar halka kartat

  • @kumbharabhishek3124
    @kumbharabhishek3124 Před rokem +5

    मॅडम जर त्रास जास्त दिवसा पासून असेल तर याचा परिणाम शरीरातील रक्तावर होतो काय

  • @rahulrathod3530
    @rahulrathod3530 Před 3 měsíci +1

    Madam gachkarn sathi kontk tablet ani cream use karawe
    Madam mala khup trass ahi gachkarnacha

    • @ajcfcc375
      @ajcfcc375 Před 3 měsíci

      Medical madhe Ringozone lotion bhetate...Liquid astey tey...Kapsane sandhyakali aani sandhyakali 2/3 days wapra..gachkarn khallas hoill..
      Ringozone lotion

  • @moresagar5258
    @moresagar5258 Před měsícem

    Isbagul sathi Kay treatment ahe

  • @vamanshewade
    @vamanshewade Před měsícem

    The best

  • @sanjaypawar-jt6nt
    @sanjaypawar-jt6nt Před 3 lety +4

    Khop chan info

  • @smithwarang1996
    @smithwarang1996 Před 2 měsíci

    Psoyrasis sati kay treatment aahe ka..?

  • @akashjaulkar97
    @akashjaulkar97 Před 10 měsíci +2

    Gajkarn sathi alopathi upchar kela ttr chalel ky

  • @asmitadeshmukh7481
    @asmitadeshmukh7481 Před 16 dny

    Dr.पायाचा गुढग्याला आणी हाताच्या कोपरया खुप खाज येते माझा मुलाच्या

  • @nileshkangude483
    @nileshkangude483 Před 4 měsíci +1

    sapat lotion?

  • @padmakulkarni416
    @padmakulkarni416 Před rokem +2

    नमस्कार डॉक्टर माझ्यावर मला ब्लॅक डाग आलेला आहे. ब्युटीशियन ना सांगितलं की हे घामाचे इन्फेक्शन आहे तर त्यासाठी मी काय औषध घेऊन किंवा डॉक्टरांना दाखवना गरजेचेच आहे का

    • @padmakulkarni416
      @padmakulkarni416 Před rokem +2

      आर्महोल मध्ये काळा डाग आलेला आहे आणि अधुनमधून खाज सुटते आहे

    • @DrAmrutasSkinCare
      @DrAmrutasSkinCare  Před rokem +1

      doctorana n dakhavta aushadh gheu naka. doctorancha salla ghya

  • @nitinpadole2078
    @nitinpadole2078 Před 5 měsíci

    Hi Madam lahan mulala gajkaran zala ahe khup treatment ghetli kai farak nhi hot

  • @user-jf2qc8vr5e
    @user-jf2qc8vr5e Před měsícem

    Cream konti lavaychi

  • @rajendradighe4721
    @rajendradighe4721 Před měsícem

    Aangavar khajavlyavar aag hote upay kay

  • @abhishingade1041
    @abhishingade1041 Před měsícem

    Nayta sthi medicine piz

  • @nmore2587
    @nmore2587 Před rokem

    सर्व बरोबर बोललात madam

  • @VithalBabar-yp5kg
    @VithalBabar-yp5kg Před 2 měsíci

    Vang.kami.honyasathi.konti.cream vaprvi

  • @dattasirsat6304
    @dattasirsat6304 Před 3 měsíci

    मॅडम तुम्हाला गचकरण कसं जाईल हे विचारले आहे कशामुळे होतो हे विचारलं नाही चांगलं औषध सांगा

  • @dadg4549
    @dadg4549 Před 5 měsíci

    माझा नातू बारा वर्षांचा आहे. त्याला nayata झाला आहे. चेहऱ्यावर आहे . उपाय सांगा.

  • @shardabonde333
    @shardabonde333 Před 6 měsíci

    फंगल इन्फेक्शन वर कोणती औषध घ्यावी

  • @kapilnikalje9407
    @kapilnikalje9407 Před 4 měsíci

    अहो काळजी आम्ही घेऊ पण ज्याला झालंय त्याला ईलाज सांगा

  • @rajbhandare9931
    @rajbhandare9931 Před 3 lety +1

    Nice video

  • @suvarnahatolkar5041
    @suvarnahatolkar5041 Před 3 lety +2

    👍👍

  • @akashjaulkar97
    @akashjaulkar97 Před 10 měsíci

    Homeopathy treatmentne kiti divsat aram pdel mam

  • @vinayakpatil4449
    @vinayakpatil4449 Před 6 měsíci

    Madam nonveg khalyane kahi effect hoto ky khup khaj hote

  • @laxmipawar1295
    @laxmipawar1295 Před 8 měsíci +1

    मॅडम माझ्या मुलाला इसबगोल आहे तर कोणते औषध वापरले पाहिजे

    • @user-ug3gy7qc5n
      @user-ug3gy7qc5n Před 6 měsíci +2

      आमच्या गावात औषध भेटतं

  • @anandshinde1542
    @anandshinde1542 Před 3 měsíci

    Chahan ahe

  • @vijaymore4801
    @vijaymore4801 Před 7 měsíci

    👍

  • @rambanait0099
    @rambanait0099 Před 9 měsíci +1

    Madam maza manewar ahe kay kru😭🥹 thod ahe ring khajwte te

  • @RohitPawar-nn2ey
    @RohitPawar-nn2ey Před 9 měsíci +1

    Mala kajakarana jasta ahe tari upaya sanga

  • @PranaliDakhane-by3cl
    @PranaliDakhane-by3cl Před měsícem

    Maza cheharaver gol cattaa alela ahe

  • @divyalkamble6888
    @divyalkamble6888 Před rokem

    Hii mla personaly bolaychay fungal infection badal

    • @DrAmrutasSkinCare
      @DrAmrutasSkinCare  Před 10 měsíci +1

      Dr. AMRUTA's Skin Care [ Skin | Hair | Cosmetics | Homoeopathy ]
      Dr. Amruta's Skin Care Radhakrishna Building , Shop No. 6 Near Hotel Rajmudra , next to INIFD Institute, Paud Rd, Kothrud, Pune, Maharashtra 411002
      096732 57960
      maps.app.goo.gl/uPYLE

  • @shamsundarmunde2507
    @shamsundarmunde2507 Před měsícem

    संध्याकाळ झाली की संपूर्ण अंगाला खाज सुटते

  • @sujatagawade
    @sujatagawade Před měsícem

    मला गचकरण आली आहेत एक वर्षापासून उपाय सांगा

  • @RohitPawar-nn2ey
    @RohitPawar-nn2ey Před 9 měsíci

    Hi

  • @adityawakalebloger662

    प्लीज चांगला उपाय सांगू शकता का

    • @DrAmrutasSkinCare
      @DrAmrutasSkinCare  Před rokem

      suti ani sail kapade vapra. gham alyas divsatun don vela anghol kara

  • @adityawakalebloger662

    Hello मॅडम मी पलूस मधून बोलतेय माझ्या बहिणीला खूप त्रास आहे फांगल इन्फेक्शन चे

  • @aniketmore2521
    @aniketmore2521 Před rokem +3

    औषध मिळेल का चांगलं

  • @yuvrajmote7040
    @yuvrajmote7040 Před 5 dny

    गुडघ्याच्या खाली नडगीवर नायटा आला आहे

  • @anjanawangde3415
    @anjanawangde3415 Před rokem

    Mala angala khup khaj yete yavar upay sanga

    • @DrAmrutasSkinCare
      @DrAmrutasSkinCare  Před rokem

      angavar kahi rash ahe ka?

    • @anjanawangde3415
      @anjanawangde3415 Před rokem

      Madam khaj yete natar chote dag yetat bahutek ratri purn angala khup khaj yete khup dava keliye pan temperary dava chalu aseparyant bandh hote

    • @dikshakasbe5862
      @dikshakasbe5862 Před 11 měsíci

      Mala pn same hot.. ratri khaj yete...ani atta payala ek chatta alay tyatun pani yeta

  • @ajaymorkhade4128
    @ajaymorkhade4128 Před měsícem

    Madam reply det ja

  • @nmore2587
    @nmore2587 Před rokem +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sudhakarkondlekar1753
    @sudhakarkondlekar1753 Před 3 měsíci

    Tumcha address pathava