कुरळे केस व त्यांची काळजी कशी घ्याल ? । How to take care of Curly Hairs?

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • कुरळ्या केसांची कशी काळजी घ्यावी???
    कुरळे केस लुक वाईज खूप मस्त दिसतात पण खूप हाय मेंटेनन्स असतात. थोडा वेळ दिला तर त्यांची छान काळजी घेता येते.
    १. केसांना तेल लावताना तेल मुळांशी लावा आणि तेल थोडे जास्त लावा कारण कुरळे केस हे बऱ्याचदा फार शुष्क व कोरडे असतात.
    २. तेल लावून नीट मसाज करायला हवा कुरळ्या केसांच्या scalp मध्ये खूप तेल शोषले जाते.
    ३. केस धुताना शाम्पू चाच वापर करा इतर कोणतीही गोष्ट जसं की शिकेकाईने केस अजून राठ होतील.
    ४. ज्यांचे केस कुरळे आहेत त्यांनी शाम्पू पण अगदी एक ते दोन मिनिटेच scalp वर ठेवावा.
    ५. कंडीशनर - कुरळे केस जर flaunt करायचे असतील जर ते हाताला मऊ लागावे असं वाटत असेल तर, कुरळ्या केसांसाठी कंडीशनरला पर्याय नाही.
    ६. कंडिशनर लावताना केसांच्या length ला आणि शेंड्याना लावावे. केसाच्या मुळांना कंडिशनर लावू नये.
    ७. कंडीशनर केसांवर जास्त वेळ ठेवावे. (साधारण तीन ते पाच मिनिटं)
    ८. या तीन ते पाच मिनिटांच्या वेळेमध्ये बोटांनी केसांचा गुंता काढावा. मग मोठया दातांच्या कंगव्याने गुंता काढावा. केसांना कंडिशनर असल्यामुळे केस फार तुटत नाहीत.
    ९. कंडिशनर धुताना खूप जास्त वेळा केस पाण्याने धुऊ नयेत. थोडा कंडीशनर केसात राहिला तर काही अपाय होत नाही. कंडिशनर मुळे curls freezy होत नाहीत.
    १०. केस ओले असताना त्याला कॉटनच्या कापडाने गुंडाळण्या ऐवजी टी-शर्ट अथवा होजिअरी चे कापड गुंडाळावे. कॉटनच्या कापडामुळे पाणी पूर्ण शोषले जाते आणि केस जास्त कोरडे होतात तर होजिअरी च्या कापडामुळे पाणी थोड्या प्रमाणातच शोषले जाते आणि केस ओलसर राहतात.
    ११. अशा ओल्या केसांना सिरम लावावे जे केसांवरच राहते ते धुण्याची आवश्यकता नाही.
    १२. Hairstyle - ओले कुरळे केस मुळातच इतके सुंदर दिसतात की फक्त केस धुतले आणि आहे असे ओले ठेवले तरी ते आकर्षक दिसतात.
    १३. केस ओले असताना त्यांचे शेंडे हातामध्ये घेऊन scrunch केले की defined curls दिसतात.
    १४. हाच लूक दिवसभर हवा असेल तर काही स्प्रे बाजारात उपलब्ध असतात तात्पुरते वापरू शकता मात्र त्यानंतर केस धुवायला हवेत असे स्प्रे जास्त वेळ केसांवर ठेवल्यास केस अजून जास्त कोरडे आणि निर्जीव होतात.
    १५. ज्यांचे केस कुरळे आहेत त्यांनी hair coloring वारंवार करू नये.
    १६ hair starightening, hair smoothening मुळे पण केस अजून गळायला लागतात. आणि रुक्ष होतात.
    डॉ. अमृता कदम
    पुणे

Komentáře • 10

  • @VaishnaviGawde-em2vi
    @VaishnaviGawde-em2vi Před 5 měsíci

    खूप चांगली माहिती दिलीत. धन्यवाद

  • @rameshkadam29
    @rameshkadam29 Před 3 lety

    Very nice information about curly hair 👍👍

  • @bapusawant6715
    @bapusawant6715 Před 5 měsíci

    लहान मुलांसाठी कोणते शाम्पू/ क्रीम वापरावेत

  • @akshatagorad2788
    @akshatagorad2788 Před měsícem

    केस वाढीसाठी उपाय सांगा ना please

  • @NileshPawar7127
    @NileshPawar7127 Před měsícem

    G🙂🙂d

  • @ajaykadam9675
    @ajaykadam9675 Před 3 lety

    कपाळावरती जास्त ओईली होत आहे आणि खूप dark hot आहे त्या साठी चे उपाय योजना सांगा मॅडम🙏

    • @amrutadok3190
      @amrutadok3190 Před 3 lety +1

      Skin jar khup oily hot asel tar facewash vaprava lagel... Darkness sathi treatment ghyavi lagel

    • @ajaykadam9675
      @ajaykadam9675 Před 3 lety

      @@amrutadok3190 Konta facewash vaprava lagel madam?

  • @ranjitpatil4378
    @ranjitpatil4378 Před 2 lety

    महिलांच्या अंगावरील नको असलेले केस कायमस्वरूपी जाण्यासाठी उपाय सांगा ना मॅडम..