अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 09. 2021
  • भास्कर पेरे पाटील हे पाटोदा गावचे सरपंच आहेत. सरपंच असताना पाटोदा गावाला महाराष्टातील सर्वोत्कृष्ट गावचा पुरस्कार मिळाला. त्यांना आदर्श सरपंच म्हणून ओळखले जाते. त्यांनी गावच्या विकासाची अनेक कामे केली
    भास्कर पेरे पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी मराठवाडा विद्यापीठाकडून आणि अमरावतीच्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज संस्थानाकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे
    पेरे सरपंच असताना पाटोदा गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे, प्रथम राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि दुसऱ्या वेळेला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हातून. महाराष्ट्र सरकारजढूनही पुरस्कार मिळाला. पाटोदा गाव शंभर टक्के उघड्यावर शौच्यमुक्त आहे. पेरे यांच्या कारकिर्दीत गावामध्ये झाडे लावली गेली आणि गावाला हरित केले गेले. भास्कर पेरे पाटील पाटोदा ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या पदांवर राहिलेले आहेत जसे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य. ते गाव कसे असावे, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी अश्या अनेक विषयांबद्दल मार्गदर्शनसुद्धा करतात.
    #मराठी_तडका #Marathi_Tadka
    आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (मराठी तडका - 8100007744)
    All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
    Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
    ☛ You tube : / marathitadkaofficial
    ☛ Facebook : / marathitadkaofficial
    ☛ Instagram : / marathitadkaa
    ☛ Twitter : / marathitadkaa
    ☛ Website : marathitadka.com/
    ☛ Write us : marathitadkateam@gmail.com
    ☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
    Thank You!!
  • Zábava

Komentáře • 415

  • @Harmony989
    @Harmony989 Před 5 měsíci +10

    पुस्तकी ज्ञानापेक्षा आयुष्याचं पुस्तक चांगलं वाचलं यांनी..प्रशंसनीय काम..

  • @jlkathole
    @jlkathole Před 3 měsíci +10

    आजचे खरे संत असे लोकं आहेत. समाजाने वेळीच यांचे महत्त्व ओळखले पाहिजे.

  • @lakysuradkar1985
    @lakysuradkar1985 Před 7 měsíci +21

    लई भारी बोलतात राव
    पेरे पाटील सत्य बोलणारे
    आज अशा पुढाऱ्यांची खरी गरज आहे समाजाला 🎉

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 Před 6 měsíci +15

    🎉🎉🎉🎉🎉 Good sandesh पेरे पाटील साहेब भारतीय जनतेने एक करावे येणाऱ्या २०२४,cha निवडणुकीत भास्करराव पेरे पाटील यांना PM करावं अशी जनतेची अपेक्षा आहे

  • @Vitthalkokate093
    @Vitthalkokate093 Před rokem +13

    पाटोदा गाव खूपच नशीबवान म्हणावं लागेल , असा दर्जेदार, अभ्यासू, दूरदृष्टी असलेला, स्वाभिमानी, सकारात्मक विचारी, सरपंच मिळाला . एक आदर्श व्यक्तिमत्व,
    शब्द कमी पडतील यांचं कौतुक करायला.
    साष्टांग प्रणाम
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gorakshsontakke8493
    @gorakshsontakke8493 Před rokem +29

    सरपंच असावा तर असा ग्रेट सलाम तुमच्या कार्याला यांचा आदर्श घेतला पाहिजे .

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 Před rokem +8

    क्रांतिकारी म्हणजे बदल घडवून आणणारे व्यक्तीमत्व. सलाम दादा

  • @user-vc6gr3eq2k
    @user-vc6gr3eq2k Před 6 měsíci +19

    असा सरपंच प्रत्येक गावाला मिळाला पाहिजे देशाचे सोनं होईल.

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 Před 2 lety +34

    सलाम खरंच पेरे साहेबांना 🙏🙏

  • @akalpitakore2122
    @akalpitakore2122 Před 6 měsíci +4

    आपले कार्य विलक्षण प्रभावी
    व आदर्श घेण्या सारखे आहे.
    आपले प्रामाणिक प्रयत्नांतून
    आपल्या गावाचा विकास झाला.
    आपले वक्तृत्व आणि विचार
    यातून सुद्रुढ समाज निर्माण
    निर्मिती होईल व ग्रामीण
    भागांचा विकास होईल.

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 Před rokem +7

    पेरे साहेब तुम्ही भाषणाची सुरुवात थोर पुरुष आणि संत यांना स्मरून त्यांना वंदन करून करता हे खूप कौतुकास्पद आहे तुम्हाला दीर्घायुष्य लाभावे ही परमेश्वराला पार्थना

  • @user-ui4nc2ku2j
    @user-ui4nc2ku2j Před 12 dny +1

    जमिनीशी नातं असणारा सच्चा माणूस, ह्याच्या मधील प्रत्येकाने एक गोष्ट जरी स्वीकरली तरी खूप झाले

  • @shaikhminhaj9171
    @shaikhminhaj9171 Před rokem +25

    आदर्श. शिल्पकार. भासकराव. दादा.पेरे.पाटील.
    अभिनंदन. काय.लिहावे.शब्द अपूर्ण पडतात.
    धन्यवाद.

  • @dineshukhale1170
    @dineshukhale1170 Před 9 měsíci +8

    खूप खूप धन्यवाद साहेब, तुम्ही एवढं मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल... तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी खरंच आम्हा सर्वांची मनापासून खूप इच्छा आहे....

  • @gajanankhodke8947
    @gajanankhodke8947 Před 2 lety +20

    दर्जेदार सरपंच असावा तर पेरेसाहेबा सारखा.gold 🌟 thinking.

  • @shivajinanaware9700
    @shivajinanaware9700 Před 2 lety +34

    स्वच्छ मनाचा मोकळ्या मनाचा माणूस. चांगलं काम करायला ज्यास्त बुद्धी नाही लागत नाही, फक्त भावना आणि मला समज्या साठी जगायचं आहे असे वाटले पाहिजे.

  • @rajashreeshaligram8982
    @rajashreeshaligram8982 Před 2 lety +23

    धन्य वाटले तुमचे भाषण ऐकून ,काय नाही करु शकत माणूस जर सद इच्छा असेल तर

  • @bhaskarsamudre3507
    @bhaskarsamudre3507 Před 9 měsíci +13

    खरोखर भास्करराव पेरे पाटील साहेबांना पाच वर्षे मुख्यमंत्री करा बघा कसा धुरळा पडत्यात

  • @samadhanpatil4082
    @samadhanpatil4082 Před rokem +29

    ग्रेट भाषण आहे भास्करराव पाटील साहेब तुमचं आणि कार्यही तुमचं खरोखरच वाखण्याजोग आहे सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏 आणि विचारांना 👍👍🙏🙏

  • @pratapithape2379
    @pratapithape2379 Před 5 měsíci +2

    आपल्या सारखे प्रामाणिक महापुरुष जन्माला यावे आणि आपल्या हातून अशीच समाज सेवा घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @anujwaghmare9311
    @anujwaghmare9311 Před rokem +10

    उत्तुंग विचारसरणी आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन आहे पेरे पाटील यांचा.
    असा सरपंच प्रत्येक गावात जन्माला येवो

  • @sanjayghadge5950
    @sanjayghadge5950 Před 2 lety +9

    सरपंच पेरे पाटील साहेब प्रथम आपणास नमस्कार ..
    आपण एक महान विचारवंत आहात आपल्यासारखा माणूस भेटणे आता अशक्यच...जर आपण पंतप्रधान झाले तर ...आणि आपणास ती संधी यावी . साधारण कमी शिकलेल्या माणसामध्ये असे महान गुण असावे. व निर्मळ मन असावे. हे खूप अभिमानाची बाब आहे...आपले व आपले विचाराचे बाबतीत लिहावे तेव्हढे कमीच आहे साहेब...सल्यूत साहेब आपणास...

  • @satishjadhav5757
    @satishjadhav5757 Před 2 lety +91

    असा सरपंच अख्या भारतदेशात होने नाही
    कधी झाला नाही आणि भविष्यात होणारही नाही
    🙏🙏🙏🙏

    • @mycraftchannel8933
      @mycraftchannel8933 Před 9 měsíci

      होयाला पाहिजे नायतर आताचे मंत्री सर्व ऊमेदार देश विकून ,विदेशात जातात

  • @rupeshlokhande7210
    @rupeshlokhande7210 Před rokem +24

    प्रेरणा देणारे भाषण

  • @babasahebshinde9857
    @babasahebshinde9857 Před 2 lety +47

    खुपच टॅलेंट भरलय या माणसात. सलाम तुमच्या कार्याला.

    • @namdevhirave5042
      @namdevhirave5042 Před rokem

      अशा सरपंचाची मुलगी देखील निवडणून दिली
      जनतेचे आभार मानतो धन्यवाद

  • @anitadarade3825
    @anitadarade3825 Před 11 měsíci +2

    कल्युगातील चाणक्य _______
    स्पष्ट 'निस्वार्थी ' परखड 'साध ' सरळ ' अभ्यासू वृत्ती ' नम्र ' सत्य वृती ' निखळ हास्य वृत्ती..
    कामात राम शोधणारे देव माणूस..
    आयुष्यात असे गुरू केले तर नक्कीच जीवनाला अर्थ मिळेल..
    नसलेल्या मृगजळामागे धावण्या पेक्षा आहे त्या गोष्टीतून स्वतः नी सर्वांच्या बुध्दीचा विकास करणारे अश्टपैलू व्यक्तिम्त्वातील खरा हिरा🙏🌹
    डिग्री घेऊन अहंकार वाढतो परंतु सहेबांसारखा रोजच्या आयुष्यातल्या अनुभवी अभ्यासाने जाणीव आणि कृतज्ञता वाढून माणुसकी वाढते..
    तुमच्यासारखे लोक या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा जन्माला यावेत स्वतः सोबत गावाचा नी देशाचा विकास व्हावा ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏...
    अमूल्य मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व 🙏..

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 Před 4 dny

    खरं वाटत नाही अशा देवमाणुस आज आपल्या महाराष्ट्रात आहे पण आहे.शतशः प्रणाम......

  • @babankhade5232
    @babankhade5232 Před rokem +4

    सरपंच पेरे पाटील,
    प्रत्येक गांवात गटा-तटाच राजकारण करुन
    होतात सरपंच. तुम्ही नक्कीच निस्वार्थाने सेवा करीत असाल. परंतु तुमच्या सारखे नेते गांव, तालुका, जिल्हा, राज्य व देश यांना मिळाले तर जनता स्वर्गातील सुख अनुभवतील. असो तुम्हास दिर्घ व निरोगी आयुष्य लाभो व आपल्या हातुन असेच कार्य घडत राहो अशी देवास विनंती शिवाय आमच्या हाती काय आहे?

  • @AmeerKhan-ix4zr
    @AmeerKhan-ix4zr Před 10 měsíci +4

    भास्कर राव, सलाम आपल्या विचारसरणीला व कार्यशैलीला.
    सध्याच्या युगात धार्मिक पुस्तकांत वाचनात आलेल्या देव,देवी,पैगंबर प्रमाणेच आपण कार्य केलेत असे बोललो तर वावगं ठरू नये 🎉

  • @latibkhan3114
    @latibkhan3114 Před 2 lety +25

    या व्यक्ती ला माझ्या घरा पासुन साष्टांग दंडवत घालून आदर व्यक्त करतो

  • @kaluramphadke6034
    @kaluramphadke6034 Před rokem +19

    👌👌✌✌👍👍 no. 01च नंबर प्रबोधन भाषण केले आहे. मी आत्तापर्यंत दहा वेळा हे भाषण पाहिले आहे.

  • @kishorbodade3612
    @kishorbodade3612 Před rokem +4

    प्रामाणिक काम करण्याची शैली म्हणजे पेरे पाटील साहेब.
    धन्यवाद.

  • @shantakunjir5257
    @shantakunjir5257 Před 2 lety +47

    सगळ्या गावातल्या सरपंच लोकांनी यांचा आदर्श घ्यावा. सगळी गाव वांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. खरच साहेब तुमचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे....👍👌

    • @user-qi9jj6it7p
      @user-qi9jj6it7p Před 10 měsíci

      सरपंच ।हवाय युटूबर नको

    • @user-qi9jj6it7p
      @user-qi9jj6it7p Před 10 měsíci

      विकास विकास युटूबर तुमचा विकास
      भाई विकास सरपंच विकास पण तुमच्या गावाचा पण विकास लय माघे राहीलात विकास करूनघ्या

    • @santdarshancreation
      @santdarshancreation Před 9 měsíci

      ​@@user-qi9jj6it7pपाटोदा गाव बघितले का???

    • @sumitdavhale3400
      @sumitdavhale3400 Před 8 měsíci

      ओओनौ😅 नवं

    • @user-sandip128
      @user-sandip128 Před měsícem

      आमचा सरपंच भिकारी आहे

  • @ranjitsabale3741
    @ranjitsabale3741 Před 9 měsíci +3

    Aaj mi 28वर्षांचा झालो आहे पण आज पर्यंत मी असे इतके हुशार सरपंच पहिलेच नाहीत किती sharp बुद्धी आहे ... आपल्या अप्रतिम कार्यास माझा कोटी कोटी प्रणाम

  • @GopiTalks
    @GopiTalks Před rokem +10

    आदर पूर्वक सलाम, सर 🙏🙏🙏

  • @pramodmane1050
    @pramodmane1050 Před rokem +11

    आदर्श सरपंच आपली देशाला खुप गरज आहे आपला सारखा कोणी होणार नाही पण बाकीच्या नीं आपला आपला आदर्श समोर ठेवून वाटचाल सुरू करावी हि सदिच्छा नमस्कार

  • @aadinathkamble3046
    @aadinathkamble3046 Před 2 lety +11

    खूप छान साहेब.....तुमचे विचार खूप मोठे आणि प्रेरणादायी आहे.....तुमच्या दूरदृष्टी सलाम

  • @avinashraut9075
    @avinashraut9075 Před 2 lety +34

    भास्करराव पेरे पाटील आपल्या कार्याला सलाम

  • @dyaneshwarnamdas8832
    @dyaneshwarnamdas8832 Před 2 lety +5

    भास्करराव पेरे पाटील तुमच्या कार्याला सलाम

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f Před 4 měsíci +3

    यासाठी गावातील भ्रष्टाचारमुक्त गावाचे हित पाहणारे नेतृत्व, प्रशासनाला व्यवस्थित चालवणारे कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी व या दोघांनाही मोलाची साथ देणारे तत्पर ग्रामस्थ या तिघांची साथ एकत्र आल्यानंतर कोणीही गावचा विकास थांबवू शकत नाही हे त्रिवाद सत्य आहे.

  • @onkarnajan2947
    @onkarnajan2947 Před rokem +22

    सरपंच असावा तर साहेबांसारखा भास्करराव पेरे पाटील

  • @arunchandekar2433
    @arunchandekar2433 Před rokem +2

    आदर्श सरपंचाला माझ्याकडून नमस्कार. दंडवत प्रणाम

  • @madhuargaikwad8587
    @madhuargaikwad8587 Před 2 lety +25

    असे सरपंच सध्या तरी महाराष्ट्रात सध्या तरी नाही
    सलाम !👍👍👍

  • @hstomar3135
    @hstomar3135 Před 2 lety +12

    खरोखर उत्कृष्ट वक्ता।माझा रीतिसर प्रणाम भास्कर जी ला।

  • @vijayshinde9244
    @vijayshinde9244 Před 6 měsíci +1

    जय हरी माउली जय शिवराय जय शंभुराजे...पेरे सर एकच नंबर भाषणं... मानलं तुम्हाला...

  • @kaluramdaroda8728
    @kaluramdaroda8728 Před rokem +9

    आदर्शवादी सरपंच.👌👌 साहेब इतर खाऊवादी सरपंचांना सुद्धा तुमच्याकडील थोडंसं ज्ञान द्या, जेणेकरून त्यांना थोडीसी कामं करण्यासाठी सुबुद्धी सुचेल. हे फक्त गावाला लुटून स्वतःचे पोट भरण्यासाठी कार्यशील असतात.

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 Před 6 měsíci +1

    Jay Ho भास्करराव पेरे पाटील सरपंच यांचा, सार्थ अभिमान तुमचा कार्याला कोटी कोटी प्रणाम

  • @tukaramgaikwad5668
    @tukaramgaikwad5668 Před 2 lety +18

    सर्वांनी आदर्श घ्यावा असे भाषण.👌👌👌

  • @nishakapgate4460
    @nishakapgate4460 Před 8 měsíci +2

    लय भारी भाषण आहे साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aadharstambhdivyangfoundat6525

    खरच खुप छान ,,,,विचारच महत्वाचे ,,, 100 मला आवडले,,🙏🙏🙏🙏

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před rokem +2

    खूप खूप शुभेच्छा पेरे साहेब भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🌹🤹‍♀🎖📢

  • @hemantmankame70
    @hemantmankame70 Před rokem +3

    भास्कर पाटील नमस्कार.
    यांनी जे मार्गदर्शन फार छान दिले.
    👍👌

  • @Aryankadam6771
    @Aryankadam6771 Před 4 měsíci +1

    मस्त बोल ला त पेरे पाटील साहेब

  • @user-ui4nc2ku2j
    @user-ui4nc2ku2j Před 12 dny +1

    रोल मॉडेल आहे , देशातल्या प्रतेक गावाने असे करून दाखवाव , देश प्रगती करण्यास सुरुवात होईल

  • @shailavyas2469
    @shailavyas2469 Před 6 měsíci +1

    Khup chhan bhashan. Ekda ह्याची bhet ghyachi ईच्छा आहे.🙏🙏

  • @pramodmahadik7764
    @pramodmahadik7764 Před 10 měsíci +1

    खूप चांगले भाषण असे प्रत्येक सरपंचाने.ठरविले.तर गावांचे नंदनवन.zaleyashivay राहणार नाही

  • @abasahebkudale4132
    @abasahebkudale4132 Před 2 lety +13

    मानावच लागेल, लई भारी

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 Před 2 lety +8

    ऐकून अंगावर शहारे येतात सर खूप छान

  • @dnyad8756
    @dnyad8756 Před rokem +1

    खरं आहे पाटील सर्वात कठीण काम आहे गावातले लोक सांभाळन

  • @ashishpadwal4348
    @ashishpadwal4348 Před 5 měsíci +1

    Khup chan

  • @prasadbirajdar8480
    @prasadbirajdar8480 Před 2 měsíci

    मा.सरपंच साहेब आम्ही आपल्या कार्यास नतमस्तक आहोत❤

  • @maheshkadam4753
    @maheshkadam4753 Před 6 měsíci +1

    मी आज श्री भास्कर पाटील यांना आज ऐकल मला वाटत मला ह्या व्यक्ती ला ऐकायला उशीर झाला

  • @prashantkadam5496
    @prashantkadam5496 Před 2 lety +4

    एक नंबर उदाहरण सांगितल सीतेच आतापर्यंत कोणत्या कीर्तनकाराने सुद्धा नव्हत सांगितल

  • @shampawar2369
    @shampawar2369 Před 8 měsíci +1

    खुपचं छान.

  • @hirupatil8943
    @hirupatil8943 Před 2 lety +21

    लय भारी आहे भाषण

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 Před rokem +3

    खुपच छान विचार आदर्श घ्या सरपंचानी

  • @anilpawar1589
    @anilpawar1589 Před 5 měsíci +1

    My favourite sarpanch only king ❤❤❤

  • @shrikrushnapudke5990
    @shrikrushnapudke5990 Před rokem +2

    खरच आहे अतिशय सुंदर भाषण आणि वास्तविकता आहे,काळाची गरज आहे,

  • @arunsarode
    @arunsarode Před rokem +1

    धन्यवाद साहेब

  • @dnyaneshwarnarwade1694
    @dnyaneshwarnarwade1694 Před 6 měsíci +1

    पेर पाटील साहेब आपल्या कार्याला सलाम

  • @pancshilabachhav6390
    @pancshilabachhav6390 Před 10 měsíci +2

    खुपचं छान भाषण

  • @deepakkasabe9914
    @deepakkasabe9914 Před 5 měsíci +1

    Bhaskar per E patil.असे सरपंच सर्व गावात असो.

  • @hirupatil8943
    @hirupatil8943 Před 2 lety +16

    लय भारी भाषण आहे

  • @gajanankesarekar7608
    @gajanankesarekar7608 Před 9 měsíci +2

    Lai bhari sarpanch ❤

  • @PrathameshMore-li5iu
    @PrathameshMore-li5iu Před 8 dny

    दोन दिवसांपूर्वी मला भोर जिल्हा पुणे येथे भेटले खरंच देव माणूस

  • @subravsarvde6946
    @subravsarvde6946 Před 11 měsíci +2

    Great🎉

  • @progameplay3809
    @progameplay3809 Před 6 měsíci +1

    आगदी बरोबर पेरे सरानां मूख्यमंत्री करावे ❤❤❤❤❤❤❤❤

  • @SharadKaurati-zz9mn
    @SharadKaurati-zz9mn Před 8 měsíci +1

    आप महान हो शिक्षीत होतें तो विश्व में महान् होते

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 Před 6 měsíci +2

    पेरे पाटील साहेब , तुम्ही कुणाला न दुखवता,हास्य विनोद करत लोकांच्या डोक्यात ज्ञानाची बीज पेरता म्हणूनच तुमच्या आडनावात चं सर्व काही आले असे मला वाटते

  • @uttamugale9978
    @uttamugale9978 Před 10 měsíci +10

    खरोखरच यांना मुख्यमंत्री व्हायला पाहिजे महाराष्ट्र पुढे पुढे गेल्याशिवाय राहणार नाही

  • @kanchanpatil5111
    @kanchanpatil5111 Před rokem +3

    Lai bhari ek number saheb🤠🤠

  • @nitinkanakdhar6153
    @nitinkanakdhar6153 Před 2 lety +6

    लय भारी

  • @divyabhosale7157
    @divyabhosale7157 Před 11 měsíci +3

    आदर्श व्यक्तिमत्व 👌🙏🏻

  • @JagtapPR
    @JagtapPR Před 2 lety +11

    सन्माननीय भास्कर राव पाटील साहेब .
    तुम्ही खरंच खूप कौतुकास्पद काम केले आहेत.

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 Před 3 měsíci +1

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री वनवनववनवन धन्यवाद 🎉🎉

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 Před rokem +2

    ,,,,, खुप छान सर,,,,,,,

  • @Aniketwalunj95
    @Aniketwalunj95 Před 11 měsíci +2

    शिक्षण कमी आहे पण तुम्ही तुमच्या गावाचे नाव महाराष्ट्रात गाजवले आहे 🎉🎉

  • @rameshgurav4625
    @rameshgurav4625 Před 4 měsíci +1

    खुप सुंदर

  • @rajubarve7328
    @rajubarve7328 Před 2 lety +6

    सुपर भाषण

  • @ganeshshelar6260
    @ganeshshelar6260 Před rokem +3

    यांना सरकारचा सल्लागार म्हणून ठेवा

  • @anuradhaprakash8121
    @anuradhaprakash8121 Před 2 lety +4

    Bahot badhiya bhau

  • @nileshpatil7297
    @nileshpatil7297 Před 6 měsíci +1

    Khup chan❤

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 Před rokem +5

    Aap ki muskaan badi pyari hai

  • @shamrawusendi3773
    @shamrawusendi3773 Před rokem +3

    सर तुम्हचे विचार खुप महान आहेत

  • @warekanha4341
    @warekanha4341 Před rokem +3

    Aadarsh sarpanch bhaskarrav pere patil🙏🙏🙏

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 Před 2 lety +8

    सर आप जैसे व्यक्तियों को सेल्यूट है आप महाराष्ट्र सरकार में सी एम होना चाहिए था।
    जय श्री राम जय श्री राम

    • @rekhamayekar96
      @rekhamayekar96 Před 2 lety

      Pere Patil Sir khar shikshan kay te tumhi sangta 🙏🙏

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 Před 2 lety +7

    तुमचं काम नंबर वन आहे, पाटील 🙏🙏

  • @RambhauJadhav-xs8sm
    @RambhauJadhav-xs8sm Před 9 měsíci +1

    खरोखर यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनवलं पाहिजे तरच शेतकरयांना भलं होईल

  • @prabhakarughade2686
    @prabhakarughade2686 Před 2 lety +7

    खुपच छान

    • @anandaroman673
      @anandaroman673 Před 2 lety

      लय भारी भाषण राम कृष्ण हरी आनंदा प. रोमण

  • @mohanpagade6809
    @mohanpagade6809 Před 4 měsíci +1

    Very good