Video není dostupné.
Omlouváme se.

आठवणीतल्या कविता ❤️| नीज नीज माझ्या बाळा | कवी दत्तात्रय कोंडो घाटे |

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 04. 2020
  • निज नीज माझ्या बाळा
    बा नीज गडे नीज गडे लडिवाळा निज नीज माझ्या बाळा ॥ ध्रु ॥
    रवी गेला रे सोडुनी आकाशाला । धन जैसे दुर्भाग्याला ।।
    अंधार वसे चोहिकडे गगनात । गरिबांच्या जेवी मनात ।।
    बघ थकुनी कसा निजला हा इहलोक । मम आशा जेवी अनेक ।।
    खडबड हे उंदिर करिती । कण शोधायाते फिरती ।
    परी अंती निराश होती । लवकरी हेही सोडतील सदनाला । गणगोत जसे आपणाला ।। २ ।।
    बहू दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती । कुजुनी त्या भोके पडती ।।
    त्यांमधुनी त्या दाखविती जगताला ।दारिद्य्र आपुले बाळा ।।
    हे कळकीचे जीर्ण मोडके दार । कर कर कर वाजे फार ।।
    हे दुःखाने कण्हुनी कथी लोकांला । दारिद्य्र आपुले बाळा ।।
    वाहतो फटींतून वारा । सुकवीतो अश्रूधारा ।
    तुज नीज म्हण सुकुमारा । हा सूर धरी माझ्या ह्या गीताला । निज नीज माझ्या बाळा ॥ ३ ॥
    जोवरती हे जीर्ण झोपडें अपुले। दैवाने नाही पडले ।।
    तोवरती तू झोप घेत जा बाळा । काळजी पुढे देवाला ।।
    तद्नंतरची करू नको तू चिंता । नारायण तुजला त्राता ।।
    दारिद्य्र चोरिल कोण? । आकाशा पाडिल कोण? ।
    दिग्वसना फाडिल कोण? । त्रैलोक्यपती आता तुजला त्राता । निज निज माझ्या बाळा ॥ ४ ॥
    तुज जन्म दिला सार्थक नाही केले । तुज काही न मी ठेविले ।।
    तुज कोणी नसे, छाया तुज आकाश । धन दारिद्य्राची रास ।।
    या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा । गृह निर्जन रानीं थारा ।।
    तुज ज्ञान नसे अज्ञानाविण काही ।भिक्षेविण धंदा नाही ।।
    तरी सोडुं नको सत्याला । धन अक्षय तेच जिवाला ।
    भावें मज दीनदयाळा । मग रक्षिल तो करुणासागर तुजला । निज नीज माझ्या बाळा ॥ ५ ॥
    कवी - दत्त (रचना : सन १८९७)
    #आठवणीतल्याकविता
    #athwanitlyakavita
    #marathipoem
    #marathikavita
    #balbhartikavita
    #yuvakbhartikavita
    #kavidatta
    #neejneejmazyabala
    #neejneejmazyabalakavita
    #baneejgadeneejgadeladiwala
    #aparatrichaprahar
    #madhuragharpuredeshpande

Komentáře • 318

  • @suhasmodhave2243
    @suhasmodhave2243 Před 19 dny +2

    माझे वडील ही कविता अतिशय छान, ताला सुरात म्हणायचे आम्ही लहान असताना, खूप सुखद आठवणी जाग्या झाल्या

  • @smartsupport2911
    @smartsupport2911 Před rokem +7

    आजोबांची आठवण आणून दिली तुम्ही पण इतके जुनी अंगाई संग्रह करून ठेवणे ,त्याला ताल सुरात म्हणून दाखवणे. हीच महाराष्ट्राची संस्कृती होय । खूप छान

  • @RameshPatil-qe9gv
    @RameshPatil-qe9gv Před 6 dny

    शालेय जीवनातील एक हृदय स्पर्शी, गेय, कारुण्य मय कविता.

  • @bhaskarbansode260
    @bhaskarbansode260 Před rokem +5

    खूप छान...४० वर्षांपासून ही कविता ऐकत आलो, अगोदर मुलांना गात होतो,आता नातवाला गातोय....तोच करुण स्वर.... खूप छान मधूरा... जून्या स्मृतींना उजाळा मिळाला

  • @maheshshirsath4254
    @maheshshirsath4254 Před 3 lety +24

    माझे आजोबा मला 30 वर्षांपूर्वी हि कविता (अंगाई गीत ) म्हणायचे आज त्यांची 4 थी पिढीला ही आम्ही ऐकवतो आहे ते फार आनंद झाला ...पुन्हा आपल्याकडून एकूण ह्याच चालीत म्हणायचे.👌

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 3 lety +1

      धन्यवाद 🙏🏻

    • @avinashshirgire3717
      @avinashshirgire3717 Před 2 lety +1

      आमचे आजोबा पण मनायचे

    • @trdeepalichandwade.8401
      @trdeepalichandwade.8401 Před 2 lety +1

      हो, माझेही आजोबा हि कविता म्हणायचे, आमच्या घरातही 4 थी पिढी ही कविता ऐकतेय, नविन अँड्रॉइड फोन घेतल्यापासून मी हि कविता शोधत होते, आपले खूप खूप आभार, खूप छान वाटलं पूर्ण कविता ऐकून.

    • @khushalsinhagarud7095
      @khushalsinhagarud7095 Před rokem

      Same here bro

    • @self16
      @self16 Před 25 dny

      खूप बरं वाटलं तुमचे आजोबा ही कविता , अंगाई गीत तुम्हाला ऐकवयचे हे वाचून खरंच खूप छान वाटलं 🙏

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep Před rokem +1

    साध्या, पारंपरिक चालीत कविता म्हणून तुम्ही बहार आणली आहे.‌
    👍

  • @meenabasakhetre7718
    @meenabasakhetre7718 Před 14 dny

    जुनी शाळेतील कविता ऐकून खूप आनंद झालाय.धन्यवाद ताई 🙏👌🌷

  • @sureshghongde8189
    @sureshghongde8189 Před 2 lety +2

    हि ऋदयसपरशी कविता लहानपणी वाचली होती आज पुन्हा पुर्ण ऐकली खुप आनंद झाला.

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Před rokem +2

    मी माझ्या नातवंडांना आणि त्यांच्या मुलांना म्हणजेच पण तू आणि पणतींना झोपवताना ही कविता म्हणत होती. 👌👌👌

  • @moreshwarvidhye9456
    @moreshwarvidhye9456 Před rokem +1

    खूपच सुंदर कविता, खूप जुनी कविता आज बऱ्याच दिवसानंतर ऐकली,गोड आवाज

  • @arunpatil7297
    @arunpatil7297 Před 4 lety +9

    दत्तात्रय कोंडो घाटे, यांची ही कविता , मधर च्या करुण स्वरातील सादरीकरण मनाला व हृदयाला चटके लावून गेले
    😢😢
    धन्यवाद ! बेटा मधुरा
    👌👌💐💐

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 4 lety +2

      काका तुमचे अभिप्राय मला अजून छान करण्याची स्फूर्ती देतात

    • @vijayabhave2279
      @vijayabhave2279 Před 3 lety

      ही कविता मनापासून म्हटलीस! डोळ्यात पाणी आलं! अशा कवितांबरोबर विनोदी कविता सादर करू शकशील का? ही सूचना आवडली का? खूप शुभेच्छा आणि शुभशीर्वाद !👌👌🌹🌹

  • @mrunalnawarange6588
    @mrunalnawarange6588 Před rokem +2

    खुप दिवसांनी ही कविता ऐकून लहान पणीची आठवण झाली. खुप गोड गाईले. आमचे बाबा नेहमी आम्हा भावंडांना झोपवतांना नेहमी गायचे. आज पुन्हा एकदा ऐकतांना डोळे भरून आले.

  • @laxmanwadgire8611
    @laxmanwadgire8611 Před rokem +2

    वर्ग ४मध्ये असतांनाच ही कविता गुरुजी कडून ऐकून डोळे ओले झाले होते.सदर कविता ऐकण्यासाठी कान आसुसले होते. आपण ते पूर्ण केले.आपले अभिनंदन.

    • @GuruRajivD
      @GuruRajivD Před 4 měsíci

      कोणत्या वर्षी ही कवीता होती हे जरा सांगाल का प्लीज..... 🙏

  • @sanjaykamalapurkar8725
    @sanjaykamalapurkar8725 Před rokem +1

    धन्यवाद ताई, आता मी ६६ वर्षाचा आहे.पण लहानपणी शाळेत शिकलेली कविता ऐकून खुप रडु आले. अंगाई गीत खुपचं छान आहे.

  • @vaibhavibudukh8234
    @vaibhavibudukh8234 Před rokem +1

    खुप छान

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Před rokem +2

    खूप खूप आनंद होतो या कविता ऐकायला. आम्ही लहान असताना ही कविता माझ्या आईला आणि आजीला म्हणून दाखवत असे, खूप खूप आवडायची त्यांना सुद्धा. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. धन्यवाद बेटा मधुरा. 👌👌👌

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 Před rokem +1

    फार जुनी आठवण अगदी विस्मरणात गेलेली; कविता ऐकवली ..धन्यवाद मधुरा.

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 Před měsícem

    अति सुंदर , भावपूर्ण !

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 Před měsícem +1

    अप्रतिम खरच लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या ताई डोळे पाणावले

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Před rokem +3

    दारिद्र्य असून सुद्धा आईचा भगवंतावर विश्वास कष्ट करण्याची जिद्द आहे त्या परिस्थितीत आनंदी राहून बाळाला चांगले उपदेश करणे अशा अर्थाची ही कविता किती छान वाटते ऐकून. धन्यवाद मधुराताई माझ्या बालपणात नेल्याबद्दल 👌👌👌

    • @dinkarwamanacharya6418
      @dinkarwamanacharya6418 Před rokem

      सर्वच मराठीतून प्रतिक्रिया !!! आनंद झाला आहे !!!

  • @vidyakulkarni4704
    @vidyakulkarni4704 Před 2 lety +1

    फार सूंदर कविता ,एकताना डोळ्यात कधी पाणी येते तेच कळत नाही, पण खूप वेळा ऐकाविशी वाटते,👌👌

  • @AshaKurkute
    @AshaKurkute Před 2 měsíci

    त्या काळातील सज्जनांनी दिवस काढलेत.त्यांनी किमान आजच्या पिढीला 10/..5% तरी 5:33 संस्कार दिले तरी भरपूर झाले.कारण आजचे जिने भरकटले आहे.

  • @AnuradhaGhadge-vz9yf
    @AnuradhaGhadge-vz9yf Před rokem +1

    खूप खूप छान कभी शांता शेळके यांची सकाळ ही कविता ऐकवा ऐ अवखळ पोरी आज समान सकाळ तोडीत गळ्यातील सोन्याची फूलमाळ

  • @vidyakulkarni4704
    @vidyakulkarni4704 Před 2 lety +2

    ही कविता फार छान म्हंटली आहे, आवाजही छान आहे,👌👌

  • @vasantmhaisdhune8590
    @vasantmhaisdhune8590 Před měsícem

    Heart touching poem!
    Thank U Madam!

  • @santoshlokhande7178
    @santoshlokhande7178 Před rokem

    खूप सुंदर कविता धन्यवाद ताई

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Před rokem

    आमच्या पुढे पाच वर्षे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या कविता होत्या. दुपारी तालासुरात आम्हास ऐकावयास मिळत असतं. फार समृध्द आठवणी.

  • @KirtiBhorde
    @KirtiBhorde Před 13 dny

    माधुरीताईबाळझोपतयघुपछान

  • @arunchaudhari4438
    @arunchaudhari4438 Před rokem +1

    आम्हाला ही ह्रदय स्पर्शी कविता सातवी ला होती , बालपण आठवलं.

    • @GuruRajivD
      @GuruRajivD Před 4 měsíci

      please jara he hi saangal ka kontya varshi hi Kavita tumhala hoti...?

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665 Před rokem +1

    कविता सुंदर, तुमचा आवाजही खूप छान आहे.

  • @mitasave8119
    @mitasave8119 Před 2 lety +10

    आनंदाश्रू आले जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमची आई तिच्या नातवंडा साठी म्हणायची 50 वर्षा पूर्वी खूप खूप धन्यवाद

  • @poojasonar9282
    @poojasonar9282 Před 4 měsíci

    माझे आजोबा रोज माझा साठी ही अंगाई गायचे या शिवाय मी झोपायची नाही आज आजोबा नाही पण ही अंगाई अजून ही आठवते❤

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Před rokem +2

    अतिशय सुंदर आवाज.कविता सुंदर.

  • @sureshsutar6766
    @sureshsutar6766 Před 4 měsíci

    SUNDAR post

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 Před rokem

    खुप छान., आनंद वाटला.

  • @self16
    @self16 Před 25 dny

    आठवणीतल्या कवितांवर फुंकर घालायची तुमची आस खूप स्तुत्य आहे.
    भावनिक साद घालणाऱ्या ह्या अर्थपूर्ण कविता नक्कीच सरळ सोपे आयुष्याचे अर्थ सांगतात

  • @KavitaWalekar-vz8qw
    @KavitaWalekar-vz8qw Před rokem

    Khupch Chan mam bahinabaichy kavita sadar Kara 😊😊

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Před 2 lety

    खूपच छान व ह्रदयस्पर्शी अशी कविता आहे.तुम्ही छान सादर केलीत.माझे सासरे हि कविता रोज म्हणायचे,त्यामुळे ऐकून ऐकून मलाही बरीचशी पाठ आहे.आता सासरे हयात नाहीत. त्यामुळे बरेच दिवसांनी ऐकली .जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. धन्यवाद.

  • @harishdeo5578
    @harishdeo5578 Před rokem +1

    ह्रदयस्पर्शी बोल. 👌👌

  • @umakantkulkarni4503
    @umakantkulkarni4503 Před rokem +2

    Very nice poem 🙏🙏

  • @rajendraiwarkar4994
    @rajendraiwarkar4994 Před 2 lety

    फारच सुंदर कविता सादर करता तुम्ही जुना काळ आठवतो

  • @nandapachpore8946
    @nandapachpore8946 Před rokem

    माझे वडील हे अंगाई गीत नेहमी म्हणायचे त्यांच्या आठवणी ने मन खूप भरून आले

  • @jyotsnashinde9536
    @jyotsnashinde9536 Před 5 měsíci

    खूप छान. मनात घर करून गेली
    जुन्या आठवणी करून देणारी.

  • @sandhyakanade2642
    @sandhyakanade2642 Před 3 lety +1

    Khup chan aani hrudaysprshi aahe hi kavita. Mala khup aavadte aani tai dhanyavad. 🙏🌷

  • @sanjeevanideshpande5212

    मला फक्त दोनच कडवे आठवत होते खुप खुप आनंद मीळाला

  • @dilipkinhekar8996
    @dilipkinhekar8996 Před 11 měsíci

    Ati sunder

  • @vasantmhaisdhune8590
    @vasantmhaisdhune8590 Před měsícem

    Excellent!

  • @manishachaudhari7502
    @manishachaudhari7502 Před rokem +3

    मी कधी पासून हे अंगाई गीत शोधत होती. कारण माझी आई नेहमी हे गीत म्हणते🙏🏻

  • @gayatripotdar3869
    @gayatripotdar3869 Před rokem

    Really heart touching

  • @gouriovhal8835
    @gouriovhal8835 Před 5 měsíci

    अत्यंत ह्रदयस्पर्शी गाणे
    आमचे बाबा नेहमी म्हणत आज ते नाहीत .... ऐकताना खूप भरुन आले
    खूप relate करते हे गाणं..

  • @rajendraiwarkar4994
    @rajendraiwarkar4994 Před 2 lety

    एवढ्या जुन्या कविता तुम्ही कशा संग्रहित केल्या मला सुद्धा जुन्या कवितेची आवड आहे

  • @dnayneshwarahire5263
    @dnayneshwarahire5263 Před 2 lety

    खुफ chan

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 Před 3 lety +4

    लहानपणी ही कविता वाचताना जी भावना आजही ही कविता ऐकताना उचंबळून आली, गलबलून आले, आणि डोळ्यात कधी पाणी तरळले समजलेच नाही 😢 सुंदर कविता आणि सादरीकरण 👌💐👏👏

  • @smitabhave8031
    @smitabhave8031 Před rokem

    फारच सुंदर खूप वर्षांनी ऐकली कविता.

  • @anupamakulkarni1801
    @anupamakulkarni1801 Před rokem +1

    Very nice poem,heart touching.😴😴

  • @supriyagorhe8268
    @supriyagorhe8268 Před 2 lety

    खूप छान अंगाई आवाजही खूप गोड

  • @surekhabonde5335
    @surekhabonde5335 Před 2 lety

    रचना सुरेख आहे कविता खूप आवडली पण गायन खूप छान केले डोळे भरून आले आहेत खूप छान आहेत पूर्वी cha rachana kavi आणि गायक यांन नमस्कार

  • @rajeshhasotkar869
    @rajeshhasotkar869 Před 2 lety

    KHUPACH chhan.👌

  • @vikramjolhe7644
    @vikramjolhe7644 Před 3 lety +2

    वाह काय सुंदर कविता आहे.आणी ताई तुझा आवाज सुधा सुंदर आहे.

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 3 lety

      धन्यवाद 🙏☺️. Channel subscribe करा आणि बाकी सगळे video बघा आपल्याला नक्की आवडतील बाकी कविता आणि कथा

    • @smitakd4620
      @smitakd4620 Před 2 lety

      फार छान.एकदा आजीचे घड्याळ हि कविता ऐकायला आवडेल.

  • @prakashkute6416
    @prakashkute6416 Před 2 lety

    आता खूपच सुंदर व उच्चारही योग्य 👌👌👌

  • @sharayupendse3012
    @sharayupendse3012 Před 2 lety

    मी ती शाळेत असताना शिकले. विसरले होते. हृदयाचा ठोका चुकतो. खुप छान गायले आहे.

  • @sujatapokharkar7182
    @sujatapokharkar7182 Před 4 měsíci

    Mazi aaiee pan he gana bhavandana zopvtana manat asel tichi khup athvan zali

  • @sharayurothe5732
    @sharayurothe5732 Před 2 lety

    Speech less 👌 Thanks

  • @popatpalve7584
    @popatpalve7584 Před rokem +1

    In the year1961,I was studying class iv. Our teacher was teaching with singing .while singing this poem, tears came out of teacher's eyes.I was forgotten some lines of the poem. Very thankful to you for uploading this poem as I went 62 years back and now remembered the sweet poem ..

  • @jyotsnajagtap8735
    @jyotsnajagtap8735 Před 2 lety +2

    छान 🌹💙

  • @vandanadamle3379
    @vandanadamle3379 Před rokem

    लहानपणीची आठवण झाली माझे बाबा मला झोपवताना ही अंगाई गीत गाऊन मला झोपवत असत मला ते रतन म्हणत असत

  • @archanakadu2050
    @archanakadu2050 Před 3 lety +1

    ४८ वर्षांपूर्वी माझे वडील मला हे अंगाई गीत म्हणायचे. नंतर मी माझ्या भाच्यांना, मुलीला म्हटले. खूप छान वाटले 🙏🙏🙏

    • @mahendradusane6615
      @mahendradusane6615 Před 3 lety +1

      खरोखर त्या कवीता तश्या असायच्या .
      त्यांची गोडी वर्षानु वर्ष तशीच
      राहते .

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 3 lety

      मी पण आता माझ्या मुलाला झोपावंतांना म्हणते. त्यांनी त्याच्या मुलानंसाठी म्हणवा अशी इच्छा आणि म्हणून youtube channel चां छोटासा प्रयत्न.

  • @chhabutaimohod1584
    @chhabutaimohod1584 Před rokem

    माझी आई माझ्या लहानबहिण भावाना हेच अंगाई म्हणत असे

  • @anaghatambe2821
    @anaghatambe2821 Před rokem

    माझी एक महिनाची मुलगी ही कविता ऐकून लगेच झोपते किती पण रडत असली तरी शांत होऊन ऐकते आणि झोपते thank you madam

  • @govindbachute3918
    @govindbachute3918 Před 3 lety +1

    👌👌👌👌👌 अजरामर,अवीट गोडीची ही कविता ( अंगाई गीत ) फारच छान आहे.👍👍👍👍👍

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 3 lety

      धन्यवाद 😊🙏

    • @aaratiranade7987
      @aaratiranade7987 Před 2 lety +1

      वाहतो फटीतुनी वारा असे आहे फाटूनी नाही

    • @aaratiranade7987
      @aaratiranade7987 Před 2 lety

      गणगोत जसे आपणाला
      जसा नाही

  • @narhevijay9646
    @narhevijay9646 Před 2 lety +1

    खूप सुंदर कविता आहे

  • @sunitamokasdar1751
    @sunitamokasdar1751 Před 2 lety +1

    मला शाळेत होती माझी भाची तसेच मुलगी आणि दोन नातु यांना हेच अंगाई गीत म्हणायचे आणि हे माझ्या आवडीचे

  • @nilimapatil4466
    @nilimapatil4466 Před 3 lety +1

    खूपच छान, मधुरा
    👌👌💐💐

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 Před 3 lety

    आता थोड्या वेळेपूर्वीच ही कविता मी दुसऱ्या एका चॅनेल वर ऐकली आहे. तेच मनात आलेले विचार मी येथेही प्रदर्शित करत आहे. तिसरीला किंवा चौथीला असताना आम्हाला ही कविता होती. त्यातील कांही ओळी अजूनही माझ्या ध्यानात आहेत एव्हढेच नव्हे तर वेळोवेळी ही कविता मला नेहमी आठवत राहिली. आज इतक्या वर्षानंतर ही कविता मी पुनः संपूर्ण ऐकत आहे. गरीब आईचे दुःख काळीज पिळवटून टाकणारे आहे. हृदय गलबलून गेले आहे.

  • @kiranshirke4558
    @kiranshirke4558 Před 3 lety +1

    खुपच सुंदर

  • @mangalundre7939
    @mangalundre7939 Před rokem

    ही कविता आम्हाला सातवीत होती ऐकुन जुन्या आठवणी आल्या धन्यवाद धन्यवाद

  • @mangalapatil2942
    @mangalapatil2942 Před rokem

    Chan Madhuri

  • @rrekhe3754
    @rrekhe3754 Před 3 lety +1

    मधुरा बेटी खूपच मधुर आवाज आहे आणि कवितेमधील भावना हृदय स्पर्शी आहेत मी दिवसभरात 10 12 वेळ तरी कविता ऐकतो आणि डोळ्यातून आसवे येतात आणि माझी आई मला अंगाई घालत आहे असं वाटतं

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 3 lety

      तुम्हाला तुमच्या आई ची आठवण झाली यातच मला सगळं मिळालं. सगळ्यात सुंदर अभिप्राय ☺️🙏

  • @rameshagarwal1486
    @rameshagarwal1486 Před 2 lety

    Chan sadrikaran,
    Amhala Marathi chya pustkat hoti hi kavita 1965 sali

  • @santoshgaikwad9329
    @santoshgaikwad9329 Před rokem

    Mazi aai mala lahanpani bolaychi
    Khupch sunder shabdh aahet maza mulana hi me manat asato me

  • @user-xy6mx3kk6g
    @user-xy6mx3kk6g Před rokem

    मी वृद्ध आहे. बेटा तू खूप भावूक होऊन ही अंगाई गायली. छान

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 Před rokem

    १९६२/६३ ची कविता! आइला म्हणून दखवयाचो नेत्र पानावले खरच!!!

  • @sheelakalpund5983
    @sheelakalpund5983 Před 3 lety +2

    Tai khup sunder Kavita aahe. Mazya aajine mhatleli. Aamchya lahanpani👌👌

  • @arunpatil7297
    @arunpatil7297 Před 4 lety +4

    दत्तात्रय कोंडो घाटे यांचे चिरंजीव श्री. विठ्ठल दत्तात्रय घाटे, यांच्या " आई " ह्या लेखाचे रसग्रहण करतांना वडील आणि मुलाने जपलेली संस्कृती अभिनंदनीय आहे

  • @ishwarshelke1342
    @ishwarshelke1342 Před rokem

    माझे आजोबा मला 30 वर्षापुर्वि हि कविता मला लहनपनी ऐयकावायचे । 6 महिन्यपुर्वि ते वारले । तुमचि कविता ऐकुन माला ट्यंचि आठवन आली।

  • @poonampitrubhakta9852
    @poonampitrubhakta9852 Před 3 lety +1

    Mazya ajobanchi athavn ali..hi angai te khup sundar mhnayche..

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 3 lety

      खुप प्रसिद्ध कविता आहे ही आणि अत्यंत सुंदर कविता 😊

  • @madhurajoshi4539
    @madhurajoshi4539 Před 2 lety

    भूतकाळात खूप वेळ रमले.

  • @hotelsamudracity4664
    @hotelsamudracity4664 Před 3 lety +5

    सुन्दर कविता

  • @vasantzendfale876
    @vasantzendfale876 Před rokem

    नावाप्रमाणेच आवाज छान👌👌👌

  • @maltimorankar1815
    @maltimorankar1815 Před rokem

    Very nice

  • @latabenwagh2292
    @latabenwagh2292 Před 4 měsíci

    मला फार आवडते ही कविता मी आठवण झाली की बोलते

  • @runjinaik3540
    @runjinaik3540 Před 3 lety +2

    खूप छान अप्रतिम !!! माझ्या आईने मला गायलेले..... शब्द आठवत नव्हते माझ्या लेकीला गाण्यासाठी...... आज बालपण आठवलं

  • @crjj6156
    @crjj6156 Před 3 lety

    ताई, खूपच छान खजिना शोधून काढला । लहानपणी आईच्या कुशीत झोपताना बरेच वेळा आईकडून ऐकायचो । खडतर परिस्थिती पालटन्याची शक्ती त्यावेळच्या मातांनी नकळत सर्व बाळांमध्ये पेरली । म्हणून आजची पिढी आहे । त्या कवीना सुद्धा विनम्र अभिवादन । आपले सुद्धा खूप अभिनंदन । पुढच्या पिढीत हि संस्कारांची ऊर्जा नकळत देत आहात ।

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 3 lety

      😊🙏

    • @vijayabhave2279
      @vijayabhave2279 Před 3 lety

      हा कवितांचा खजिना तू छान उघडला आहेस ! माझ्या लहानपणी या सर्व कविता तोंडपाठ होत्या! तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद!👌👌🌹🌹👏👏

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Před 3 měsíci

    अतिशय भावपुर्ण गायन

  • @shrirangpradhan486
    @shrirangpradhan486 Před měsícem

    ह्याची सुरवात अशी आहे का
    सुतार उत्तम सा तुज साठी अनविला
    पाळणा रंगीत बनविला
    चहू बाजूला राघू मोर

    • @ashokchiudhari5195
      @ashokchiudhari5195 Před měsícem +1

      अगदी बरोबर लहानपणी आजोबा ही कविता म्हणायचे मगच आम्ही झोपायचो

    • @ashokchiudhari5195
      @ashokchiudhari5195 Před 17 dny

      अशीच आहे

  • @bhagya3766
    @bhagya3766 Před 3 lety +1

    Kharach khup chan...Dhanyawad

  • @abishekramadoss
    @abishekramadoss Před 3 lety +4

    माझे वडील नेहमी म्हणायचे .डोळ्यात पाणी आले

    • @vanitabhadhane5685
      @vanitabhadhane5685 Před 3 lety

      Maje pan manayche

    • @vijayabhave2279
      @vijayabhave2279 Před 3 lety

      ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ! बेटी सर्व कविता छान म्हणतेस!थँक्स!अशाच छान छान कविता म्हण! शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद!👌👌🌹🌹👏👏

  • @baljagtap5997
    @baljagtap5997 Před 10 měsíci

    तुम्ही कविता छान गाता, मला राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांची "दसरा" ही कविता ऐकायची आहे फार अर्थपूर्ण आणि प्रबोधनात्मक कविता आहे.

  • @anjuarekar8317
    @anjuarekar8317 Před rokem

    माझ्या वडिलांची आवडती कविता, ते नेहमी म्हणायचे,त्यांची खूप आठवण आली

  • @mohitladse1302
    @mohitladse1302 Před 3 lety

    खूप सुंदर गाता तुम्ही याच प्रमाणे अभिमन्यु ची कविता ऐक वा

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 2 lety

      हॊ मला अभिमन्यू च्या कवितेची चाल येतं नाही. तरी लौकरच सादर करीन