Elephant Twins Birth : Thailand मधील एका हत्तीणीने एक नव्हे तर चक्क दोन पिल्लांना दिला जन्म

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2024
  • #bbcmarathi #elephant #ElephantTwins #thailand
    थायलंडमधील एका हत्तीणीने एक नव्हे तर चक्क दोन पिल्लांना एकाच वेळी जन्म दिला आहे. ही घटना इतकी दुर्मिळ आहे, की त्या हत्तीणीलाही दुसरं पिल्लू होत असल्याचं कळलं नाही, आणि घाबरून ती जन्मलेल्या दुसऱ्या पिल्लावर हल्ला करू पाहत होती. सुदैवाने तिच्या प्रसूतीत मदत करणाऱ्या माहुताने त्या नवजात पिल्लाला वाचवलं, मात्र यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
    ही थरारक आणि तितकीच चमत्कारीक डिलेव्हरी झालीय थायलंडमधील बँगकॉकच्या उत्तरेस असलेल्या अयुथ्या हत्ती महाल आणि शाही प्राणी संग्रहालयात 7 जूनच्या रात्री.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 13