केळफुलाची भजी भंडारी पद्धतीची/ kelfulachi bhaji kurkurit/ Banana flowers/kelfulachi bhaaji

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • पारंपरिक भंडारी मसाला =
    • पारंपरिक भंडारी मसाला/...
    केळफूल कसे साफ करायचे?? पहा हा व्हिडिओ
    केळफुलाची भजी आणि वड्या
    साहित्य:
    केळफूल एक
    कांदा दोन मोठे
    मसाला
    हळद
    बारीक चिरलेल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या
    मीठ
    तेल
    बेसन
    तांदळाचे पीठ दोन मोठे चमचे
    कृती:
    प्रथम व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे केळफुलाच्या पाकळ्या निवडून घ्या त्यातील जाड दांडा (केशर) आणि पापुद्रा काढून घ्या; नंतर बारीक चिरून घ्या आता चिरलेले केळफूल पाण्यात घालून शिजवून घ्या ,त्यात थोडे मिठ घाला केळफुल दहा मिनिटे शिजल्यावर चाळणीत काढून घ्या ,आता पूर्ण पाणी निघून गेल्यावर एका बाऊलमध्ये घ्या ,त्यात मीठ, कांदा ,मसाला, हळद ,हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला आता लहान दोन चमचे तेल घाला; सारखे एकजीव करा नंतर दोन चमचे तांदळाचे पीठ आणि थोडे थोडे बेसन घाला व भजीचे बॅटर तयार करा (आवश्यक असल्यासच थोडे पाणी घाला) आता कढईत तेल घालून भजी तळून घ्या; डिपफ्राय करायचे नसल्यास तव्यावर घालून खरपूस वड्या तळून घ्या, बाजूने थोडे तेल सोडा चविष्ट केळफुलाची भजीचा व वडीचा आनंद घ्या.
    टीप:
    केळफूल सोलताना हाताला तेल लावून घ्या म्हणजे हात व नखे काळी पडणार नाही

Komentáře • 60

  • @mitalipotnis9659
    @mitalipotnis9659 Před 8 měsíci

    Me pan karte....

  • @TheMandardange2011
    @TheMandardange2011 Před 11 měsíci

    Khup Chan ...mi karun baghat ahe

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před 11 měsíci +1

      Nakki , thanks for comment 😊 stay tuned

  • @maryrodrigues6353
    @maryrodrigues6353 Před rokem

    Aparna khup shan bhaji. Mary madam here

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před rokem

      Thanks madam ☺️ stay tuned 🙏 kasha aahat tumhi❤️

  • @nayanawairkar1896
    @nayanawairkar1896 Před rokem

    खूपच छान आहेत भजी आणि वड्या करून बघायलाच हव्या आहेत धन्यवाद अर्पणा मॅडम आपण अशाच उपवासासाठी पण करू शकतो का उपवास भाजणी किंवा वरीचं पीठ वापरून ?

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, हो उपवास भाजणी घालून करायला हरकत नाही

  • @roshantiwarekar1189
    @roshantiwarekar1189 Před 3 lety +2

    jai bhandari tai 🙏🙏🙏 me nakkich try karin ghari🌷🌷🌷🌷👌👌👌👌

  • @ashwinipatil8503
    @ashwinipatil8503 Před 2 lety +1

    Khupach chhan... Looks yummmmy.. try keli pahije😇

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před 2 lety

      Ho nakki kara, thanks for comment 😊 stay tuned

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 Před 4 lety +2

    सुंदर केळफुलाचीभजीछान

  • @ritaraut7181
    @ritaraut7181 Před 4 lety +1

    बघुनच ईतकी छान वाटते आहे.. खायला तर मज्जा येईल 😍😋😋👌👍

  • @RajDmasti
    @RajDmasti Před rokem

    Masala kuthla

  • @ujwalabhawsar3233
    @ujwalabhawsar3233 Před 3 lety

    छान एकदम मस्त! टिप्स सुद्धा छान आहेत. जसे आंबट केलं असल्यास भाजी चांगली लागत नाही आणि भजी! Excellent आयडिया. थालीपीठ !
    Wow ग्रेट 👌❤👌❤👌

  • @smitanaik3792
    @smitanaik3792 Před rokem

    Very nice and different easy testy helthy instant thanks

  • @TheMandardange2011
    @TheMandardange2011 Před 11 měsíci

    केळफूल कोणता घ्यावं कारण भाजी आणि भजी दोन्ही कडू लागले

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před 11 měsíci +1

      OOO ....😌 भाजीचा केळ असतना त्याचं फुल कधी कधी कडू लागतं त्यामुळे करण्याआधी चव घेऊन बघावी

  • @tanajinikam3492
    @tanajinikam3492 Před rokem

    छान केल्यात

  • @meghamalvankar9730
    @meghamalvankar9730 Před 4 lety +1

    केळफुलाची भजी आणि वडी दोन्ही छान झाल्या आहेत. पण मला केळफुलाची भाजीची रेसिपी करून दाखवली तर बरे होईल. थन्यवाद.

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před 4 lety +1

      नक्की , लवकरच दाखवेल. आभारी आहे.

  • @monapereira3718
    @monapereira3718 Před 3 lety +1

    Very nice👌👌👌👌

  • @ujwalabhawsar3233
    @ujwalabhawsar3233 Před 3 lety +1

    माझा हा पदार्थ एकदा बिघडला आहे परंतू त्याचे कारण समजत नव्हते (आंबट केली) जसे तुम्ही सांगितले. तेव्हापासून नादच सोडला बनवण्याचा.
    Like 👍

  • @rekhavichare7127
    @rekhavichare7127 Před 3 lety +1

    I like it

  • @deepalirecipes7223
    @deepalirecipes7223 Před 3 lety +1

    Very nice recipe👍👍👍

  • @Nutryyum
    @Nutryyum Před 4 lety

    Mi ashi bhaji kaddhich khalli nahi.. Mast idea!!

  • @shripaddixit5754
    @shripaddixit5754 Před 3 lety

    भजी मस्तच आहेत आता केळाचा कोका कींवा स्टेम / खोडाची भाजी ची रेसिपी व्हिडिओ तयार करावा.

  • @gamingstreamofficial7092
    @gamingstreamofficial7092 Před 4 lety +1

    Tasty

  • @poojashikarkhane1908
    @poojashikarkhane1908 Před 3 lety

    Chhan navin recipe

  • @mitalipatil4250
    @mitalipatil4250 Před 4 lety

    Chhan ahet donhi recipes

  • @karishmakadu8953
    @karishmakadu8953 Před 4 lety

    छान रेसिपी 👌

  • @smitakulkarni7576
    @smitakulkarni7576 Před 2 lety

    भाजी उकडून घेतल्या मुळे पोषक तत्वे निघून जातात ना चोथा घेतला

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před 2 lety

      नाही केळफुलाला चिक असतो आणि त्यामुळे ते उकडून घेणे गरजेचे असते.

  • @parabcatering7674
    @parabcatering7674 Před 2 lety

    छान

  • @umamulik1219
    @umamulik1219 Před 3 lety

    Arpana mi pahilanda hi receipe bagitali. Try karayla harkat nahi ho na.

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před 3 lety

      Ho barobar,nakki try kara aani kashi zali te hi kalva,😊👍

  • @ruchitaraut7693
    @ruchitaraut7693 Před 4 lety

    Kup yummmmmmmy 😋

  • @prerana4941
    @prerana4941 Před 2 lety

    ताई तुम्ही सांगितलेल्या सर्व सुचनेनुसार भजी केली पण भजी कडू झाली 😥

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před 2 lety

      ताई केळफुल भाजीच्या केळीचे असेल म्हणून कडू झाली . बनकेळ्याचे केळ फुल कडू असते

    • @pallaviyadav6871
      @pallaviyadav6871 Před rokem

      Jo kavala bhag cut krun chirun ghetlay to ghevu Nka

  • @kalpanakadapa4947
    @kalpanakadapa4947 Před 3 lety

    Madhe asalela kala danda pan kadhatat na.