मनःशांतीसाठी करुणात्रिपदी

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2019
  • आपल्या शीतल प्रभावाने सकलजनांचे कल्याण करणारी कृष्णामाता आणि तिच्या भगिनींचा प्रकोप झाल्याने महाराष्ट्रावर महापुराचे भीषण संकट आले आहे. महापूर ओसरला असला तरी सर्वांगीण पुनर्वसन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असणार आहे. या संकटात सापडलेल्या बंधू भगिनींचे पुनर्वसन व्हावे, त्यांच्या वेदनांचा भर हलका व्हावा यासाठी सर्व महाराष्ट्र त्यांच्या मदतीस धावून आला आहे. भौतिक मदतीबरोबरच त्यांना आत्मिक बळ लाभावे, मनःशांती लाभावी, त्यांच्या जीवनाची विस्कटलेली घडी सावरावी यासाठीं यासाठी आपण श्रीदत्तप्रभूंशिवाय आणखी कोणाची आळवणी करणार? यासाठी प्रभावी उपायही प. प. वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामीमहाराजांनी ‘करुणात्रिपदी’च्या स्वरुपात उपलब्ध करून दिला आहे. संकटात सापडलेल्या आपल्या बंधूभगिनींच्या कल्याणासाठी, त्यांना मनःशांती लाभावी यासाठी सर्व सद्भक्तानी करुणात्रिपदीचा पाठ शक्य तितक्या अधिक संख्येने करावा असे आवाहन श्रीवासुदेव निवासतर्फे करण्यात येत आहे.
    ।।श्रीकरुणात्रिपदी।।
    शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आतां।।ध्रु०।।
    तूं केवळ माता जनिता। सर्वथा तूं हितकर्ता।।
    तूं आप्तस्वजन भ्राता। सर्वथा तूचि त्राता।।
    (चाल) भयकर्ता तूं भयहर्ता। दंडधर्ता तूं परिपाता। तुजवाचुनि न दुजी वार्ता।
    तूं आर्ता आश्रय दत्ता।। शांत हो श्रीगुरुदत्ता. ।।१।।
    अपराधास्तव गुरुनाथा। जरि दंडा धरिसी यथार्था।।
    तरि आम्ही गाउनि गाथा। तव चरणीं नमवूं माथा।।
    (चाल) तूं तथापि दंडिसी देवा। कोणाचा मग करूं धावा? सोडविता दुसरा तेव्हां।
    कोण दत्ता आम्हां त्राता? शांत हो श्रीगुरुदत्ता. ।।२।।
    तूं नटसा होउनि कोपी। दंडितांहि आम्ही पापी।
    पुनरपिही चुकत तथापि। आम्हांवरि नच संतापी।।
    (चाल) गच्छतः स्खलनं क्वापि। असें मानुनि नच हो कोपी। निजकृपालेशा ओपी।
    आम्हांवरि तूं भगवंता।। शांत हो श्रीगुरुदत्ता. ।।३।।
    तव पदरीं असता ताता। आडमार्गीं पाऊल पडतां।
    सांभाळुनि मार्गावरता। आणिता न दूजा त्राता।
    (चाल) निजबिरुदा आणुनि चित्ता। तूं पतीतपावन दत्ता। वळे आतां आम्हांवरता।
    करुणाघन तूं गुरुनाथा।। शांत हो श्रीगुरुदत्ता. ।।४।।
    सहकुटुंब सहपरिवार। दास आम्ही हें घरदार।
    तव पदी अर्पुं असार। संसाराहित हा भार।
    (चाल) परिहरिसी करुणासिंधो। तूं दीनानाथ सुबंधो। आम्हां अघलेश न बाधो।
    वासुदेव प्रार्थित दत्ता।। शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आतां।।५।।
    श्रीगुरुदत्ता जय भगवंता। तें मन निष्ठुर न करी आता।।ध्रु०।।
    चोरें द्विजासी मारीतां मन जें। कळवळलें तें कळवळो आतां।। श्रीगुरुदत्ता।।१।।
    पोटशूळानें द्विज तडफडतां। कळवळलें तें कळवळो आतां।। श्रीगुरुदत्ता।।२।।
    द्विजसुत मरता वळलें तें मन। हो कीं उदासीन न वळे आतां।। श्रीगुरुदत्ता।।३।।
    सतिपति मरता काकुळती येतां। वळलें तें मन न वळे कीं आतां।। श्रीगुरुदत्ता।।४।।
    श्रीगुरुदत्ता त्यजि निष्ठुरता। कोमल चित्ता वळवी आतां।। श्रीगुरुदत्ता।।५।।
    जय करुणाघन निजजनजीवन। अनसूयानंदन पाहि जनार्दन।।ध्रु०।।
    निजअपराधें उफराटी दृष्टी। होउनि पोटीं भय धरूं पावन।।१।।जय०।।
    तूं करुणाकर कधीं आम्हांवर। रुसशी न किंकर-वरदकृपाघन।।२।।जय०।।
    वारी अपराध तूं मायबाप। तव मनीं कोपलेश न वामन।।३।।जय०।।
    बालकापराधा गणे जरी माता। तरी कोण त्राता देईल जीवन।।४।।जय०।।
    प्रार्थी वासुदेव पदिं ठेवी भाव। पदीं देवो ठाव देव अत्रिनंदन।।५।।जय०।।

Komentáře • 58

  • @raviudas7762
    @raviudas7762 Před 23 dny

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🎉🎉

  • @RajeshRSurve
    @RajeshRSurve Před 3 lety +8

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹चांगले वाटले .
    श्री टेंब्ये स्वामी महाराज यांनी लिहलेला प्रत्येक शब्द दत्त आहे , सार्थ आहे आणी कल्याणकारी आहे. 🙏🌹

  • @jayshrishinde4664
    @jayshrishinde4664 Před měsícem

    Jay Shri Gurudev Datta 🙏

  • @travelwithusfeelthemoment
    @travelwithusfeelthemoment Před 4 měsíci

    श्री गुरुदेव दत्त ❤❤

  • @suchitashealthylifestyle
    @suchitashealthylifestyle Před 3 měsíci

    Khup chan 👌👌🙏🙏

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 Před 3 lety +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    🌿🌿🙏🙏🙏🌿🌿

  • @freefirefire1603
    @freefirefire1603 Před 3 lety +1

    गुरू माऊली मला करुणात्रिपदी खूप आवडते जास्तीत जास्त आम्हां सर्वांना अध्यात्मात वाटचाल करण्यासाठी मार्ग दर्शन करावे 🙏 ही नम्र विनंती. धन्यवाद

  • @hrishi-jagtap
    @hrishi-jagtap Před rokem

    श्री गुरुदेव दत्त

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 Před 3 lety

    श्री गुरूदेव दत्त
    जय गुरूदेव दत्त

  • @yamininaik8621
    @yamininaik8621 Před 10 měsíci

    Shree gurdevdatta

  • @prabhakarsant8735
    @prabhakarsant8735 Před 4 lety +1

    Shri Gurudev Datta

  • @balkrishnakshirsagar5070
    @balkrishnakshirsagar5070 Před 4 lety +1

    || श्री गुरुदेव दत्त ||

  • @Sadhanaasar
    @Sadhanaasar Před 3 lety +1

    Jay gurudev datta

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz Před 4 lety +2

    Shri Gurudev datta

  • @amolvarkute
    @amolvarkute Před 3 lety +1

    श्री गुरु शरणं 🙏

  • @sitaramkengar4783
    @sitaramkengar4783 Před 3 lety

    Shri gurudev datt 🙏🙏🙏🙏🍓🍓🍓🍎🍎👍🏼👍🏼👍🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Před 4 lety +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर ा

  • @vedikasarmokadam1530
    @vedikasarmokadam1530 Před rokem

    Shri Gurudev Datta🙏🙏

  • @pushkarumrekar8652
    @pushkarumrekar8652 Před 4 lety +2

    👏श्री गुरुदेवदत्त👏

  • @santoshlohar8241
    @santoshlohar8241 Před 2 lety

    || श्री गुरुदेव दत्त ||🙏🙏🙏

  • @vinayakjadhav1216
    @vinayakjadhav1216 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ

  • @atharvakulkarni2975
    @atharvakulkarni2975 Před 4 lety +1

    Shree gurudev datt

  • @shalinirana5585
    @shalinirana5585 Před 3 lety

    जयश्री गुरु देवदत्त

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 2 lety

    श्रीगुरू:sharanam!👌💐👌

  • @preetamvyawahare1244
    @preetamvyawahare1244 Před 4 lety +3

    Jai shree Gurudev Datt

  • @dattatrypathak5030
    @dattatrypathak5030 Před 2 lety

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @prajaktapatki7439
    @prajaktapatki7439 Před 4 lety +2

    CharanSparsh 🙏🙏

  • @anujasalvi5104
    @anujasalvi5104 Před 3 lety

    जय गुरुदेव!!!!!!

  • @deepagaidhani7107
    @deepagaidhani7107 Před 4 lety +1

    Jay Gurudev datt 🙏🙏

  • @piyushdindorkar4798
    @piyushdindorkar4798 Před 3 lety +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा

  • @meerajoshi7402
    @meerajoshi7402 Před 3 lety

    गुरुदेव दत्त.

  • @yanchalwadshridhar7108
    @yanchalwadshridhar7108 Před 4 lety +3

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 Před 4 lety +1

    Shree gurudev datta 🙏🙏🙏

  • @pramodbaradkar3408
    @pramodbaradkar3408 Před 11 měsíci

    🙇🏼‍♀️🌷☘️🎊🪔❤️🚩
    अर्चना दत्तात्रेय बारडकर

  • @saritathenge5309
    @saritathenge5309 Před 3 lety

    Shri gurudev dutt

  • @LoveAndFaith1
    @LoveAndFaith1 Před 3 lety

    Atishay sundar ❤

  • @PRADIP94
    @PRADIP94 Před 4 lety

    जय गुरू देव

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Před 3 lety

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @vandanadoshi4159
    @vandanadoshi4159 Před 4 lety +2

    🙏🙏🙏

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 Před rokem

    🙏

  • @hrishikeshnanadikar1834

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAY GURUDEV

  • @nirajw9958
    @nirajw9958 Před 3 lety

    🙏🙏🙏 Pranam Guruji 🙏🙏🙏

  • @prakashgiramkar5319
    @prakashgiramkar5319 Před 4 lety +1

    Omm drammm....

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 Před 2 lety

    👌🏻🙏🌹🙏

  • @swaropainamdar2355
    @swaropainamdar2355 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏😃👌🙏🙏

  • @balkrishnakshirsagar5070

    ।। जय जय रामकृष्ण हरी ।। 🙏राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे |
    सहस्र नाम ततुल्यं राम नाम वरानने ||

  • @manojpajiyawala3773
    @manojpajiyawala3773 Před rokem

    Jay guru devdutt
    Shree Swami Samarth
    Hindi or Gujarati available this stort ?

  • @jogeshwarimahida8307
    @jogeshwarimahida8307 Před rokem

    Please, हिन्दीमें महिति देनेकि कृपा क़रो. गुरुदेवदत्त 🙏🙏

  • @shraddhatambe2443
    @shraddhatambe2443 Před 3 lety +1

    Karuna Tripadicha Arth milel ka pl

  • @pravinparab3274
    @pravinparab3274 Před 4 lety +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @amitmodak5654
    @amitmodak5654 Před 3 lety

    Shri Gurudev Datta

  • @such_ss
    @such_ss Před 2 lety

    🙏🙏🙏

  • @jyotichavan145
    @jyotichavan145 Před 4 lety +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @shinde4839
    @shinde4839 Před 3 lety

    श्री गुरुदेव दत्त

  • @jitendrasundare975
    @jitendrasundare975 Před 3 lety

    श्री गुरुदेव दत्त