जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले | Marathi Gazal | Gazal Nawaz Bhimrao Panchale

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • जमवून घ्यावे लागले !
    मित्रांनो... ,
    जमवून घ्यावे लागले..पण कुणाशी ? .. तर आपल्याच जीवनाशी ! .. आणि जमवून तरी किती घ्यावे ?
    नेमकं हेच तर करत असतो आपण आयुष्यभर ..
    आणि हे मनकवडे शायर आपल्या मनातलंच नेमकं लिहून जातात ...
    जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले
    हुंदका दाटून येता .., मज हसावे लागले...
    'रिस रहा हो खून दिल से लब मगर हँसते रहे'... ही अशी हुंदका दाबून ओठांवर हसू फुलवण्याची कला शिकावीच लागते जगतांना..प्रत्येकाला .. अन्यथा जगणंच मुश्किल !
    जेष्ठ गज़लकार दिलीप पांढरपट्टे यांनी लिहिलेल्या या अप्रतिम गज़लमधून , तिच्या प्रत्येक शेरामधून जगण्यातली हीच अगतिकता उच्चारल्या गेली आहे . ही गज़ल म्हणजे एक विदारक अनुभव आहे , जो मी सुद्धा घेतोय गातांना .
    एखादी रचना मनासारखी जमून जाते मित्रहो , खूप आवडीचीही असते पण मैफिलीत पेश करण्याचा योगच फार कमी येतो .
    प्रकाशदादा व मंदाताई यांच्या हेमलकसा प्रकल्पासाठी गडकरी रंगायतन , ठाणे येथे आयोजित केलेल्या " ऋणानुबंध " मैफिलीत ही गज़ल गाण्याचा योग आला होता .
    दोघेही समोर बसले होते ऐकायला ...
    जिंदगीच्या मैफिलीचे हे असे झाले कसे
    काय मी गाणार होतो, काय गावे लागले...
    गज़लच्या सुरवातीला आलापी नंतर चार आशयघन ओळी गायलो , ( ' कळा त्या सोसतांनाही...' ) त्या आहेत रत्नागिरीचे गज़लकार मित्र देविदास पाटील यांच्या .
    किती मजबूत जमीन दिली आहे या ओळींनी गज़लला !
    रंगून गेलो होतो - गातांना मी आणि ऐकतांना माझे रसिक श्रोते ...
    तुमच्यासाठी प्रस्तुत आहे ही मनस्वी गज़ल..
    तुमची दाद चाहतो !
    स्नेहांकित ,
    गज़लनवाज़ भीमराव पांचाळे
    Gazal Nawaz #BhimraoPanchale
    For More Updates Follow Me At -
    ______________________________________________________________
    ★ Facebook bit.ly/Bhimrao...
    ★ Twitter bit.ly/Bhimrao...
    ★ Instagram bit.ly/Bhimrao...
    Subscribe To My CZcams Channel -- ‪@gazalnawazbhimraopanchale6816‬

Komentáře • 85

  • @unclebagpacker9406
    @unclebagpacker9406 Před 8 dny +1

    मुस्तच, सुरेख, हळुवार गझलं, थँक्यू भीमरावजी 👍👍

  • @sachinkumarkulmethe6149
    @sachinkumarkulmethe6149 Před rokem +6

    नाईलाजानेच तु म्हटलेस नातं सपंवू.. नाईलाजाने मलाही हो म्हणावे लागले... अप्रतिम रचना

  • @prafullabhujade
    @prafullabhujade Před 2 lety +12

    उपाशी मी जरी होतो... अधाशी वागलो नाही.. हा संयमी बांधच माणुसकी टिकवून आहे ..त्या बांधाला बुलंद करणारा शेर..व्वा पाटील साहेब..
    नाईलाजाने मलाही हो म्हणावे लागले..
    पांढरपट्टे साहेबांचे हे दुखा:चे गाणे ..आणि दादांची अलबेली मैफिल..आमच्या वेदनांवर फुंकर घालून जाते...या वाटेवर आपल्या सारखे अनंत वाटसरू आहेत..ही साथ बळ देणारी आहे..शुक्रिया दादा..

  • @creativeartstudio7518
    @creativeartstudio7518 Před 2 lety +16

    प्रत्येकाचा जीवनानुभव दिलीप पांढरपट्टे साहेबांच्या प्रत्येक शेरातून इतक्या समर्थपणे झरला की शब्द, सूर अन रसिक आपसूक एकरूप होऊन जातात...
    आणि देविदास पाटील साहेबांना तर दंडवतच...

    • @ravsahebkuwar6608
      @ravsahebkuwar6608 Před 2 lety +2

      दादांना ऐकणे ही एक अदु्भुत गोष्ट आहे.💚💐🙏

  • @naushadusman1354
    @naushadusman1354 Před 2 lety +4

    दिलीप पांढरपट्टे यांचे दुःखाने ओथंबलेले शब्द आणि भीमरावांचा आवाज ... काळजाचा ठोका चुकवणारी गजल , माशाल्लाह !

  • @babaraolwankhade
    @babaraolwankhade Před 2 lety +9

    ऊपाशी होतो जरी मी अधाशी वागलो नाही..किती मार्मिकता,किती हळूवार तरल वेदना शब्दबद्ध केली शायराने.शायराची वेदना भीमराव साहेबांनी बोलती केली.आर्त..एकदम आरपार काळजाच्या..व्वा वाह क्या बात है.

    • @DevidasPatilCreation
      @DevidasPatilCreation Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद सचिनजी ! आद. भीमरावजी हे खूप मोठ्या मनाचे आहेत आणि ते माझे हे शेर अनेक मैफिलींमधून रसिकांना गेली अनेक वर्षे ऐकवत आहेत. मी त्यांचा खरोखरच ऋणी आहे आणि तुमच्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल तुमचाही ऋणी आहे. खूप खूप धन्यवाद सरजी !!
      ....देवीदास हरिश्चंद्र पाटील .

  • @tusharisame1982
    @tusharisame1982 Před 2 lety +2

    हुंदका दाटून येता... मज हसावे लागले.
    अप्रतिम गज़ल. सर्वच शेर जीवनाचे मर्म सांगणारे. सलाम पांढरपट्टे साहेब आणी गजलनवाज पांचाळे साहेब 🙏🙏

  • @riteshtambe9681
    @riteshtambe9681 Před 2 lety +8

    दादा दोन दिवसांपूर्वीच ही गझल सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनल वर पाहिली... मनाला थेट भिडणारी❤️
    नाईलाजानेच तू म्हटलेस नाते संपवू
    नाईलाजाने मलाही हो म्हणावे लागले
    वाह वाह... क्या बात ❤️

  • @vitthallaxman788
    @vitthallaxman788 Před 2 lety +15

    असा मी तीर होतो....व्वा काय शेर, वाह दादा. तुमची गायकी नसानसात भिनते. धन्यवाद दादा. I love you 💕💕

    • @DevidasPatilCreation
      @DevidasPatilCreation Před rokem

      खूप खूप धन्यवाद श्री. विठ्ठलजी. 🌹🌹 हे शेर दादा बरेचदा गातात. हे दोन्ही शेर दादांचे स्नेही व रत्नागिरीचे आद्य गझलकार देवीदास हरिश्चंद्र पाटील यांचे आहेत. खरेच हा दादासाहेबांचा मोठेपणा आहे. त्यांना सलाम. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vijaydhakre
    @vijaydhakre Před 2 lety +9

    खरोखरच हुंदका दाटून आला दादा...🙏🙏🙏
    दादा तुमची गझल म्हणजे जीवन जगण्यासाठी टॉनिक असते..
    खूप खूप अभिनंदन दादा।🙏🙏

  • @ravirajpatil5264
    @ravirajpatil5264 Před 3 měsíci +1

    ही गजल प्रत्येकाच्या जीवनाला लागू होतेच..
    लेखकाचे आभार.. तसेच पांचाळे साहेबांचे देखील...
    अशीच गजल ऐकायला मिळव्यात.. काळजाच्या आरपार......❤

  • @Madhuriarts89
    @Madhuriarts89 Před 14 dny

    अप्रतिम रचना....काळजाला भिडणारी 👌

  • @milindkskills7748
    @milindkskills7748 Před rokem +1

    अवकाळी शब्द मी पेलले असेल कितीदा
    फाटता काळीज माझे मज शिवावे लागले
    हुंदका दाटून येता मज हसावे लागले

  • @masudpatel400
    @masudpatel400 Před 2 lety +6

    अप्रतिम शब्दांना अप्रतिम चाल आणि सुमधूर गायन दादा! ही गझल लाईव्ह ऐकण्याचा योग आला नाही, ती कमतरतेची आजच्या पोस्ट मुळे पूर्तता झाली दादा!
    लाजवाब दादा!

  • @venkateshkulkarni2989
    @venkateshkulkarni2989 Před 2 lety +5

    सर, तुम्हाला ऐकताना एक वेगळीच शांतता, समाधान, तृप्तता अंतरंगात खोलवर उतरत जाते. मन भरून येतं. नादब्रम्हाचा साक्षात्कार होतो.

  • @aniket_rawa4132
    @aniket_rawa4132 Před 2 lety +15

    कळा त्या सोसतानाही कुणाला बोललो नाही
    उपाशी मी जरी होतो अधाशी वागलो नाही
    असा मी तिर होतो जो चुकीने मारला गेलो जिथे मी पाहिजे होतो तिथे मी लागलो नाही
    जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले
    हुंदका दाटून येता मज हसावे लागले
    गजल लिहिन्याला न पुरले दुःख माझे अन तुझे
    दुःख दुनियेचे मला आपुले करावे लागले..
    !!धृ!!
    ना इलाजानेच तू म्हटलेस नाते समपवू
    ना इलाजाने मलाही हो म्हणावे लागले
    जीवनाशी....
    जिंदगीच्या मैफिलीचे हे असे झाले कसे
    काय मी गाणार होतो काय हे गावे लागले
    जीवनाशी...
    शेर.. स्वर्ग हि घरपोच त्यांच्या जाहला दररोज
    भाकरी साठी मला का ओरडावे लागले...
    जीवनाशी...

    • @sanjaykhadse6101
      @sanjaykhadse6101 Před 2 lety

      अप्रतिम गझल, जीवनाचा अर्थ शब्दबद्ध या गझलच्या माध्यमातून केला आहे, आदरणीय दिलीप पंढरपट्टे सर यांचे लेखन तेवढेच अप्रतिम , गझल नवाज भीमराव पांचाळे यांचे सुमधुर आवाजात गायन,, मनाला शब्द भिडले

    • @avinashagunde1068
      @avinashagunde1068 Před rokem

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai Před 4 měsíci

      🙏

  • @vitthallaxman788
    @vitthallaxman788 Před 2 lety +4

    स्वर्ग ही घरपोच...हा शेर कलेजा खल्लास करणारा. व्वा💕🙏💐

  • @samjesus4595
    @samjesus4595 Před 2 lety +8

    खुप रडलो सर, सात वर्षे झाली रडु दाबुन टाकले
    दोन्ही भाऊ आणि वडील अडीज वर्षात गेले आभाळ कोसळले
    अनाथ मुले नी भावाची चार मुले
    जबाबदारी स्वीकारली आणि रडलो तर सर्वच खचले असते
    100 पेक्षा जास्त वेळा ऐकली गजल सर

  • @madhukartambare5471
    @madhukartambare5471 Před 3 měsíci

    द ग्रेट गझल

  • @pritikubde2946
    @pritikubde2946 Před 4 měsíci

    खूप छान गझल आहे. काळजाला जाऊन भिळते 👌💐💐💐

  • @shesheraochopde7993
    @shesheraochopde7993 Před 9 měsíci +1

    अनेकांच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने अशीच अवस्था असते....

  • @ananddeshpande2049
    @ananddeshpande2049 Před rokem

    अप्रतिम👌👌

  • @yashwantchavan1835
    @yashwantchavan1835 Před 4 měsíci +1

    Good panderpatte

  • @pradeepsakpal7156
    @pradeepsakpal7156 Před 2 lety +2

    हुंदका दाटून येता...मज हसावे लागले....
    सुंदर वाह क्या बात है दादा.

  • @AmrutaPatil-ve3wp
    @AmrutaPatil-ve3wp Před 9 měsíci

    अप्रतीम

  • @nitinbansod8604
    @nitinbansod8604 Před rokem

    अप्रतीम सर

  • @dhananjaymhatre5594
    @dhananjaymhatre5594 Před 2 lety +2

    दादा बहोत खूब! अप्रतिम गज़ल!🙏🙏 जिंदगीच्या मैफीलीचे हा शेर बहुतेक सर्वांचीच कहाणी🙏🙏

  • @mohantelang5754
    @mohantelang5754 Před 3 měsíci

    Apratim Gagal

  • @sachinkumarkulmethe6149
    @sachinkumarkulmethe6149 Před rokem +2

    Miss you my life 💞

  • @anilkoshe9994
    @anilkoshe9994 Před 2 lety +2

    दादा🙏🙏🙏🙏🙏

  • @Educhange
    @Educhange Před rokem

    वाह... काय ती गजल.. काय ते शब्द... काय ती गायकी... सगळंच अप्रतिम... काळीज उघडणारंच..

  • @harshad24
    @harshad24 Před 2 lety +3

    क्या खूब 👌👌

  • @musicallaroundpravinpm462

    क्या बात
    नवीन गझल ऐकायला मिळाली
    खूप छान

  • @user-xd8hf1jw6t
    @user-xd8hf1jw6t Před 9 měsíci

    वा सर क्या बात है
    जिवनातले सत्य आज समजून घ्यावे लागले
    दु:ख माझे मलाच समजून घ्यावे लागले

  • @balajimunde1431
    @balajimunde1431 Před 2 lety +1

    उपाशी मी जरी होतो,अधाशी वागलो नाही.....बहोत बढिया !👌

  • @ninadbhambid3948
    @ninadbhambid3948 Před 2 lety +1

    गझल फार छान लिहले आहे......नंतर चे गोंदण भीमरावानी केले आहे सुंदर

  • @sachinumavane271
    @sachinumavane271 Před 2 lety +2

    Apratim sir👌

  • @nikhilfuse2794
    @nikhilfuse2794 Před 2 lety +2

    अप्रतिम सर..

  • @allthingsmelodious
    @allthingsmelodious Před rokem

    अप्रतिम सगळे काही, शब्द,सुर, गायन, उच्चारण, संगीत. केवळ अप्रतिम

  • @jayantchavan8089
    @jayantchavan8089 Před 6 měsíci

    खर सांगू दादा इतक्या गजल ऐकल्यात पण तुमची गझल आणि तेही खासकरून मराठी तर एक मी मराठी माणूस म्हणून खूप मनाला भावते आणि जी शब्द रचना केलीय ती सर्वांच्या जीवनानुसार समतोल साधुन विचार करून लाजवाब लिहिली आहे. तुम्ही ख अस्सल मराठी गझल गायक आहात. तुमची सर्व गझल्स काही सांगुन जाते....... शिवाय सोबत संतुर आणि तबला ह्यांचा सुंदर मिलाफ 😊👌👌👌

  • @DrSandeepPatil-mazirachana

    वाह! अप्रतिम

  • @gramgeetatv5273
    @gramgeetatv5273 Před 11 měsíci

    वा वा दादा जी शब्द ब्रम्ह रसांची लयलूट करणारे आपणं तुम्ही तुमच्या च सारखें.... कोठे नाही... असतील पंण सद्या आकाशात कुठे तरी लोपुन धन्यवाद दादा पांचाळे जी जय हो तुम्हारी जय हो भगवान आपको चिर आयुषी करे यही भगवान से प्रार्थना करता हुं जय गुरु माऊली

  • @ajayingole2884
    @ajayingole2884 Před 5 měsíci

    साहेब तुम्ही ग्रेट आहात..तुमच्या गझल ऐकून डोळ्यात अश्रु नाही आले अस कधीच झाले नाही.

  • @manishkhandare1586
    @manishkhandare1586 Před rokem

    कितीतरी व्यक्तींना वाटत असेल की ही गजल माझ्यासाठी बनवल्या गेली.व्वा व्वा अप्रतिम.

  • @SURESHPATIL-ig4oo
    @SURESHPATIL-ig4oo Před 2 lety +2

    Wah wah sir 🙏

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर गझल लिहिली साहेब. अभिनंदन

  • @user-xd8hf1jw6t
    @user-xd8hf1jw6t Před 9 měsíci

    स्वर्गही घरपोच त्यांच्याघरी पोहचू दे जरी
    मग मला का भावना माझ्याच ओरडून सांगाव्या लागल्या

  • @shankarnathjogi8912
    @shankarnathjogi8912 Před 10 měsíci

    Apratim...

  • @rajnishwaydande2294
    @rajnishwaydande2294 Před rokem +1

    1 nambar dada kay bat aahe

  • @uttamkhandagale3705
    @uttamkhandagale3705 Před rokem

    दादा मी तुमच्या गझलचा व गायकीचा फॅन झालो आहे तुम्ही अशेच गत राहावे वाटते आणि आम्ही आयकत राहावे🙏🙏💐💐💐💐💐

  • @pravinpawarsongssinger9030
    @pravinpawarsongssinger9030 Před 5 měsíci

    मला ही गझल तुम्ही इतकी छान गाताय ना म्हणून ती खूप आवडते आहे सतत ऐकतो मी

  • @deeprapatil800
    @deeprapatil800 Před rokem

    दादा गझलेतील शब्दांचे भाव नेहमीप्रमाणेच छळून गेले.

  • @sandeepjadhav5207
    @sandeepjadhav5207 Před rokem

    दादा काय बोलू शब्द गोठले, मन सुन्न झाले पण जगण्याची उभारी देऊन गेले

  • @MereSitare
    @MereSitare Před rokem

    क्या बात हैं, खुपच छान हृदय स्पर्शी

  • @martandpatil1823
    @martandpatil1823 Před rokem

    GREAT

  • @vitthalbabar9711
    @vitthalbabar9711 Před rokem

    कळा त्या सोसतानाही कुणाला बोललो नाही.
    उपासी मी जरी होतो अधाशी वागलो नाही.
    जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले.
    हुंदका दाटून येता मज हसावे लागले.
    असा मी तिर होतो..................🙏🙏🙏

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode2535 Před 2 lety +2

    ❤️❤️❤️

  • @vasantkamble8296
    @vasantkamble8296 Před rokem

    दादा काळजाचे ठोके वाढतात इतकं मन तृप्त होते

  • @rajeshjadhavrn7159
    @rajeshjadhavrn7159 Před rokem

    अप्रतिम शब्द,रचनात्मक भाव ! दादा, मन हेलावून टाकणारे गायन 👍🙏🙏

  • @prakashkshirsagar6743
    @prakashkshirsagar6743 Před 5 měsíci

    ❤❤❤❤❤

  • @himanshubure7104
    @himanshubure7104 Před rokem +1

    खुपच सुंदर

  • @kishorgaware4793
    @kishorgaware4793 Před 4 měsíci

  • @shankarkawale6369
    @shankarkawale6369 Před rokem

    वाह...अप्रतिम 👌👌🙏

  • @pranitkatkar5247
    @pranitkatkar5247 Před 2 lety +1

    Khup chan sir

  • @sharvariwagh4262
    @sharvariwagh4262 Před 2 lety +1

    खूप खूप आभार सर अप्रतिम 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌👌👌👌👌👌

  • @shalinikerkar6036
    @shalinikerkar6036 Před rokem

    Very soft,expressive n melodious present9ation

  • @kunaldahiwale7765
    @kunaldahiwale7765 Před rokem

    भाकरी साठी मला.....

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 Před rokem

    अतिशय सुंदर.

  • @krishnagaikwadmadhukar620

    Very nice sir

  • @geetvinasangit
    @geetvinasangit Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kunaldahiwale7765
    @kunaldahiwale7765 Před rokem

    🎉🎉🎉🎉👍👍😪😪😪

  • @BindassPihu3075
    @BindassPihu3075 Před 2 lety

    👏👏👏👌👌

  • @bhumanandamaharaj8177

    कृपा करून कोणी सांगावे की हा राग चारुकेशी तर नव्हे?

  • @bhumanandamaharaj8177

    मला वाटतं हा चारूकेशी असावा आणि गझल ठेका 8 मात्रा केहरवा चा प्रकार.....कोणी दुरुस्त करणे अगर चुकलो असेल तर.

  • @shardaingle5504
    @shardaingle5504 Před 2 lety +2

    Number dya sir

  • @mylifestylesuccesacademyya7760

    अप्रतीम

  • @user-xd8hf1jw6t
    @user-xd8hf1jw6t Před 9 měsíci

    स्वर्गही घरपोच त्यांच्याघरी पोहचू दे जरी
    मग मला का भावना माझ्याच ओरडून सांगाव्या लागल्या

  • @suyashWaghmare1
    @suyashWaghmare1 Před 2 lety +2

    ❤❤❤

  • @user-xd8hf1jw6t
    @user-xd8hf1jw6t Před 9 měsíci

    स्वर्गही घरपोच त्यांच्याघरी पोहचू दे जरी
    मग मला का भावना माझ्याच ओरडून सांगाव्या लागल्या