कारणे नाहीत मोठी यार हो माझ्या पिण्याची ...| गज़ल आणि शराब | Gazal Nawaz Bhimrao Panchale

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • गज़ल आणि शराब ...
    रसिक मित्रांनो ...
    शराब , बादा , मदिरा , वारुणी इत्यादी अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या दारूचे मनभरून गोडवे गाणारे जसे खूप आहेत तसेच पोटभरून नालस्ती करणारेही भरपूर आहेत .
    उर्दू गज़ल मध्ये तर भरमार आहे या विषयाची . प्रत्येक शायराने आपापल्या परीने परिभाषित केले आहे दारूला . काही शेर साधारण तर काही इतके पराकोटीचे , त्यातली मदिराभक्ती इतकी टोकाची की मला तिव्रतेने वाटायचे , हे अंगुराचा अर्क आणि त्याने येणाऱ्या नशेच्या खूप पलिकडचे आहे .
    हा एक शेर वाचल्यावर तर खात्रीच पटली माझी.
    शायर म्हणतो की ,
    एखाद्या विशाल निद्रिस्त पापणीसारखा लांबच लांब पसरलेला जीवनाचा रस्ता - धुळीनं माखलेला . शीण आलाय चालून चालून . इतक्यात नजरेस पडते आबे-कौसर - स्वर्गातून अमृतजळाने भरून वाहणारी पवित्र नदी .. आणि थोडं पुढं गेलं की लागणार आहे मैकदा.
    चालत राहणं हेच खरं जीवन असेल आणि अमर होऊन स्वर्गात वगैरे जाण्याचा इरादा नसेल तर मग अमृताचे हे पाणी हात-पाय-तोंड धुवून फ्रेश होण्यासाठीच ठीक आहे , पुढच्या प्रवासासाठी लागणारी ऊर्जा मैखान्यातुनच मिळणार आहे...
    जिंदगी की दराज पलकों पर रास्ते का गुबार छाया है
    आबे-कौसर से मूह को धो ले , मैकदा करीब आया है..
    अहाहा , क्या कहने ... !
    आपल्या मराठी गज़लमध्ये या विषयाची उणीव भरून काढली आहे जेष्ठ गज़लकार डी. एन. गांगण यांनी . खूप दर्जेदार अशी रचना दिली त्यांनी मराठी गज़ल विश्वाला ...
    काय असते ही नशा सांगूनही कळणार नाही
    घेतल्यावर उरत नाही गरज काही सांगण्याची
    जिंदगी आहे सजा अन गरज आहे झिंगण्याची
    कारणे नाहीत मोठी यार हो माझ्या पिण्याची
    पेशे-खिदमत आहे मित्रांनो ही शानदार गज़ल.
    मागे कोरोना काळात साज-संगीताशिवाय ही रचना तुम्हाला ऐकवली होती .
    ' नेक्सस ' ने मुंबईत आयोजित केलेल्या एका मैफिलीचे ध्वनिचित्रण मिळाले आणि ही गज़ल साग्रसंगीत ऐकवणे आज शक्य झाले...
    शुक्रिया नेक्सस !
    शुक्रिया 9x झक्कास !!
    आपला ,
    गज़लनवाज़ भीमराव पांचाळे
    Gazal Nawaz #BhimraoPanchale
    For More Updates Follow Me At -
    ______________________________________________________________
    ★ Facebook bit.ly/Bhimrao...
    ★ Twitter bit.ly/Bhimrao...
    ★ Instagram bit.ly/Bhimrao...
    Subscribe To My CZcams Channel -- @Gazal Nawaz Bhimrao Panchale

Komentáře • 73

  • @bhushanshinde888
    @bhushanshinde888 Před rokem +8

    एखादाही मी पिण्याची वेळ नव्हती चुकवली....कोण घेतो दखल माझ्या वक्तशीरपणाची.....अप्रतिम वाक्यरचना

  • @diwakarsatpute7785
    @diwakarsatpute7785 Před rokem +14

    कोण घेतो दखल माझ्या, वक्ताशीर ह्या वागण्याची.... अप्रतिम 👌

  • @creativeartstudio7518
    @creativeartstudio7518 Před 2 lety +11

    गांगण सरांची ही नशीली गजल नाविन्यपूर्णच.
    पण दादा, खरी झिंग चढते ती तुमच्या गायकीने...

  • @girishjunankar8226
    @girishjunankar8226 Před rokem +4

    चखण्याचा ऊल्लेख सुटला सर 🤣😂😁😀😃😄😅😆

  • @abhimanyuparamane1469
    @abhimanyuparamane1469 Před 9 měsíci +3

    केवळ अप्रतिम रचना.... मी अनेकदा हा विचार करायचो की मराठीत या विषयावर गझल सापडत नाही... पण मिळाली ती अगदी 24कॅरेट सोनं...😊

  • @sureshbhagat7592
    @sureshbhagat7592 Před 4 měsíci +2

    अप्रतिम गझल आणि सादरीकरण

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 Před 16 dny +1

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉🎉🎉

  • @tanajimandale7962
    @tanajimandale7962 Před rokem +3

    अप्रतिम बोल व पेशकश आणि मधुर गोड आवाज व चेह्ऱ्यावरचे भाव लाजवाब!

  • @kishorbali
    @kishorbali Před 2 lety +6

    कारणे नाहीत मोठी ... एकूणच अप्रतिम दादा.

  • @rajuathawale3020
    @rajuathawale3020 Před rokem +5

    क्या बात है दादा....!!!! फक्त ऐकत रहावंसं वाटतं....👌👌👌👌👌👌👌

  • @sabirsolapuri2859
    @sabirsolapuri2859 Před 2 lety +3

    व्वाह
    कारणे नाहीत मोठी यार हो माझ्या पिण्याची...
    बहोत खूब

  • @ProfDrRahulMBhore
    @ProfDrRahulMBhore Před 2 lety +3

    व्वा व्वा क्या बात है दादा... काय कारणे आहेत आणि गरजही....👌👌👍👍👍🥀

  • @masudpatel400
    @masudpatel400 Před 2 lety +7

    क्या बात है दादा, जबरदस्त ! इस निवेदनसे गज़ल का नशा दुगना हो गया!
    लाजवाब गझल और लाजवाब गायकी!

  • @prakashmore8295
    @prakashmore8295 Před rokem +6

    आवाजात काही खास आवडण्यासारखं नसतं तर गुलाम अली ना ही कुणीही विचारलं नसतं. आवाजात जादू असणं ही गजल ची प्राथमिक गरज आहे.

  • @sanjayjoshi2878
    @sanjayjoshi2878 Před 6 měsíci

    वाह बॉस, आजच्या जमान्यात एक तरी भीम आहे ज्याचा आदर करावा

  • @deepakkambli4323
    @deepakkambli4323 Před 2 lety +3

    क्या बात है सर बढिया ❤️
    - दीपक कांबळी

  • @shamraomarne5550
    @shamraomarne5550 Před 2 lety +1

    भीमराव पांचाळे जबरदस्त घायाळ केले

  • @jayantchavan8089
    @jayantchavan8089 Před 6 měsíci

    व्वा दादा व्वा क्या बात है , आज शनिवार काहीही कारण नसताना मी घरी एकटाच घेत आहे... त्यात हे तुमची लाजबाब गझल ऐकत ऐकत, खूप जबरदस्त लिहिले आहे अप्रतिम रचना. त्यात तुमचा छान आवाज 😊. 👍👌👌👌

  • @balasahebshinde6830
    @balasahebshinde6830 Před 2 lety +2

    सर खरचं अप्रतिम गझल. ❤️❤️

  • @ashapande4394
    @ashapande4394 Před 2 lety +1

    Wa sunder awaj sunder gazal. Kaka ji.

  • @manjeetshahare4986
    @manjeetshahare4986 Před 6 měsíci

    अरे बाबा.... काय हाय काय हे... 🎉🎉🎉

  • @rahulsonawane9301
    @rahulsonawane9301 Před rokem

    झिंगण्याची खरी गरज सांगितील आपण ❤

  • @vilasraykar6713
    @vilasraykar6713 Před rokem

    लाजवाब गझल गायक आहेत.

  • @jagannathsurwade4160
    @jagannathsurwade4160 Před rokem

    अप्रतिम गझल अन् सादरीकरण

  • @haripawar2923
    @haripawar2923 Před 2 lety +3

    सर मी कविता लिहितो पण त्या कुठ प्रस्तुत कराव्यात ,त्यामध्ये काय सुधारणा करावी ,एक कवी म्हणून स्वतःला कसं घडवाव मला यात काही माहीत नाही कृपया आपण योग्य तो मार्ग दाखवावा.
    एक नमुना म्हणून मी आई वर लिहिलेली एक कविता सादर करतो. कृपया माझ्या नावेला दीपस्तंभ बनून किनाऱ्याला लागण्यास मार्ग दाखवावा .ही नम्र विनंती.
    "तुझ्याविण जीवन व्यर्थ म्हणावा"
    अंकुर फुटावा मातीच्या उदरी,मायेच्या कुशीत बहरावा
    तशी माय धरणी तू माझी, तुझ्याविण जीवन व्यर्थ म्हणावा !!
    नाळ जुळली मातीशी जशी, श्वासोच्छवासही तुझ्याच पदरी
    कैक जन्मे अपुरे आता, पांग फेडण्या तुझ्या चरणी !!
    शब्द ते काय असेल ,जे मायेची किंमत ठरवेल ?
    कातड्याची जोडे जरी करियले, न शक्य ते मोल चुकविने !!
    कसा होऊ उतराई यातून ? , हे बोलणे देखील व्यर्थ आहे
    धन्यता ही यातच माझी, जन्मोजन्मीचा श्वास करण्या तुला समर्पित !!
    त्रैलोक्याचा स्वामी देखील , मायेसाठी आतुर आहे
    हीच प्रार्थना त्या नाथाशी, तूच बनावी " माय माझी "
    येणाऱ्या त्या अनंत जन्मी !!
    - हरी पवार

  • @sharadpapshetwar9433
    @sharadpapshetwar9433 Před rokem +1

    खूपच छान

  • @bhartighude2637
    @bhartighude2637 Před rokem

    क्या बात है फारच छान गझल सर

  • @roshanvyawhare7690
    @roshanvyawhare7690 Před 2 lety +1

    खुप छान दादा

  • @happy4583
    @happy4583 Před 2 lety +5

    कुणी भीमरावजींचे कार्यक्रम कुठे कुठे होतात याची माहिती देऊन शकेल का ?

    • @ProfDrRahulMBhore
      @ProfDrRahulMBhore Před 2 lety +1

      16 July nagpur la

    • @happy4583
      @happy4583 Před 2 lety +2

      @@ProfDrRahulMBhore धन्यवाद ... कार्यक्रम पत्रिकांचे online वेळापत्रक असते का .. जवळ असेल लगेच जाता येईल ... पुण्या मधे जर कधी असेल तर सांगावे

    • @akashufade6073
      @akashufade6073 Před rokem

      Aaj dhulyala aahe program tyanacha

    • @Atul_Gurav_0137
      @Atul_Gurav_0137 Před rokem

      ​@@akashufade6073 kute samjat te....

  • @prashant.voiceover
    @prashant.voiceover Před rokem

    Kya baat hai....super class...👌👌

  • @user-lk9lp5qs1u
    @user-lk9lp5qs1u Před 2 lety +1

    जबरदस्त.......

  • @rajurandhir38
    @rajurandhir38 Před rokem

    व्वाह .. क्या बात हैं दादा

  • @shripadkulkarni6688
    @shripadkulkarni6688 Před rokem

    वा दादा तुमच्या गझल ची नशाच वेगळी आहे

  • @prashantraut7154
    @prashantraut7154 Před rokem

    क्या बात है..... sir.....हक हैं

  • @dipakpatil11
    @dipakpatil11 Před rokem

    वा वा दादा

  • @gulabiankhencoveredbysuren8336

    अप्रतिम

  • @sandeepushire8208
    @sandeepushire8208 Před rokem +3

    माणूस दुःखात ही पितो,,,, आनंदात ही पितो....
    कारण काहि असो

  • @bhumanandamaharaj8177

    Bahot khub

  • @sandeshfalke2684
    @sandeshfalke2684 Před 2 lety +2

    गझल झिंगली न पिता दारु कधीची
    गाता गाता तुम्ही नकळत नशा कधीची

  • @manojshedge602
    @manojshedge602 Před rokem

    व्हा... जबरदस्त

  • @sachinkumarkulmethe6149

    ❤ वाह वाह दादा

  • @sandipmane8438
    @sandipmane8438 Před rokem

    क्या बात है दादा!!!

  • @sahyputra_navnit
    @sahyputra_navnit Před rokem

    Fav गायक

  • @gkcreationssangli5471

    वाहवा दादा, जबरदस्त

  • @shivananddhumal2117
    @shivananddhumal2117 Před 2 lety

    wah ustaad wah..... 👌👌👌

  • @harshad24
    @harshad24 Před 2 lety

    लाजवाब 👌

  • @sharadpapshetwar9433
    @sharadpapshetwar9433 Před rokem

    अप्रतिम सर .

  • @rameshpotdar8382
    @rameshpotdar8382 Před rokem

    👌 अप्रतिम सर 👌

  • @sudhirmane3707
    @sudhirmane3707 Před rokem

    गुरू आहेत

  • @SURESHPATIL-ig4oo
    @SURESHPATIL-ig4oo Před 2 lety

    वा वा फार छान 🙏

  • @SURESHPATIL-ig4oo
    @SURESHPATIL-ig4oo Před 2 lety

    Namaskar sir 🙏 thanks

  • @sudarshanr.7205
    @sudarshanr.7205 Před rokem

    वा खूप छान...

  • @ashokshejwal5100
    @ashokshejwal5100 Před rokem

    Verygoodgazaldadapanchal

  • @prashantjamsandekar
    @prashantjamsandekar Před 24 dny

    इरशाद

  • @kundlikjaybhaye7266
    @kundlikjaybhaye7266 Před rokem

    छान

  • @ashokshejwal5100
    @ashokshejwal5100 Před rokem

    Allgazalarebeutifuldadapanchal

  • @aniruddhawaghchaware5094

    ❤️🔥🔥🔥😍

  • @milindjagtap6025
    @milindjagtap6025 Před 2 lety

    👍👍👍👍👌👌👌👌

  • @sunilgaikwad9837
    @sunilgaikwad9837 Před rokem

    Nice

  • @prasaddorle4968
    @prasaddorle4968 Před rokem

    डी ऐन गांगण यांच्याबद्दल माहिती कुठे मिळेल??

  • @prof.nileshathawale5267

    👍👍👍

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode2535 Před 2 lety

    ❤️🌿

  • @shalinikerkar6036
    @shalinikerkar6036 Před rokem

    Surekh

  • @sumukhhardikar7992
    @sumukhhardikar7992 Před rokem

    Hi gazal lihinara nkkich pit nsava
    Tyashivay itka ras bharane shakyach nahi.😂😂😂😂

  • @milindsumanashokdamodare

    🤍🤍🤍

  • @sumedhkumarhippargekar3526

    अप्रतिम

  • @ninadbhambid3948
    @ninadbhambid3948 Před 2 lety

    अप्रतिम