विठुरायाला 'कानडा राजा' असं का म्हणतात? | Story Kanada Raja Pandharicha | कानडा राजा पंढरीचा

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • 'कानडा राजा' असं का म्हणतात? | Story Kanada Raja Pandharicha | कानडा राजा पंढरीचा |
    पंढरपूर आणि विठोबा याच्या स्थानाविषयी आणि तो मुळचा कुठला हा वाद त्याच्या जन्माइतकाच जुना असावा. त्यात त्याच्याविषयी केलेले कानडा, कर्नाटकू, कानडे हे उल्लेख त्याचे मूळ रूप कानडी असावे हे दर्शवितात की काय असा प्रश्न पडतो. अनेक संतांच्या अभंगात त्याच्या कानडीपणाविषयी उल्लेख आहेत.
    पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंडरी अशी नावे वेगवेगळ्या काळात देण्यात आली. पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वांत जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर 516 मध्ये जयद्विठ्ठ नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो. सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी तुळईच्या तिन्ही बाजूंवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषांतील शिलालेखांत पंढरपूरला पंडरंगे म्हटले असून होयसळ वीर सोमेश्वर याने विठ्ठल देवाचे अंगभोग आणि रंगभोग यांसाठी आसंदी नाडामधील हिरिय गरंज (कर्नाटकातील चिकमगळूर जिल्ह्यातील कट्टर तालुक्यातील हिरे गरंजी गाव) हे गाव दान केल्याचे म्हटले आहे. बेळगावजवळच्या बेंडेगिरी गावाच्या सुसंस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरीकक्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे.
    पंडरगे हेच या क्षेत्राचे मूळ नाव असून ते कर्नाटकी असल्याचे काही पुरावे आढळतात. हिप्परगे, सोन्नलिगे, कळबरगे या कन्नड नावप्रमाणे पंडरगे हे नाव आहे. पंडरगे या क्षेत्र नावाचा अपभ्रंश होऊन पांडूरंग हे विठ्ठलाचे नाव झाल्याचेही एक मत आहे.
    ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातही विठ्ठलाच्या कानडेपणाचे उदाहरण आढळते.
    कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु|येणे मज लाविले वेधीं ||
    असे ते म्हणतात. ज्ञानेश्वरांनी त्याला कानडा म्हणताना त्याच्या कर्नाटक प्रांताचाही उल्लेख केला आहे. याशिवाय एकनाथांनी तर तीन अभंगात विठ्ठल आणि कानडा हे नाते रंगविले आहे. कानडा विठ्ठल असे त्याला संबोधून नाथ म्हणतात.

Komentáře • 2

  • @venkatkautkar6310
    @venkatkautkar6310 Před 2 měsíci +1

    राम कृष्ण हरी

    • @Thebatataguy
      @Thebatataguy  Před 2 měsíci

      राम कृष्ण हरी माऊली ♥
      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏
      आपल्या महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील आपल्या सुंदर संस्कृतीचे दर्शन आम्ही आपल्याला करवू, चैनलला सबस्क्राइब करायला विसरू नका .
      धन्यवाद 🙏♥