महाराष्ट्र दुष्काळ सन १९७३ | Maharashtra Drought in 1973 | कधीही न पाहिलेला original व्हिडिओ batmya

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 03. 2021
  • चॅनेल ला Subscribe करा.
    Facebook - / batmya.press
    Twitter - / batmya_press
    Website - batmya.press
    १९७३ हे महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सलग तिसरे वर्ष होते. औरंगाबाद, उस्मानाबाद, बिड, सोलापूर, अहमदनगर, परभणी, नांदेड आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. मार्च १९७३ च्या अखेरीस महाराष्ट्र शासनाने दुष्काळ निवारणाच्या विविध योजनांवर १५०० कोटी रुपये खर्च केल्याचा अंदाज आहे. या चित्रपटात भीषण दुष्काळाने सर्वाधिक पीडित लोकांना मदत करण्यासाठी विविध अधिकृत आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्य दर्शविले गेले आहे.
    भारत सरकार कडून, माहिती मंत्रालय, चित्रपट विभाग.
    #maharashtra
    #batmyapress
    #dushkal

Komentáře • 529

  • @ashabankar131
    @ashabankar131 Před 3 měsíci +800

    मी आशा गोविंद पोळ १९७३ला 4 वर्र्षाची होते दुष्काळात माझी आई तळ्याच्या कामाला जायची उपासमार झाली वडील वारले हाल हाल झाले आम्ही भावंडे कसे तरी जगलो आज मी class two cha पगार घेते, अनेक गोर गरीब लोकांना मदत करते दुष्काळाने जगण्याची किंमत शिकवली ,, asha, govt medical college baramati, govt medical college ambajogai

  • @appakharade6216
    @appakharade6216 Před 2 měsíci +32

    हे संकलन आणि व्हिडिओ ज्यांनी तयार करून त्याच जतन केलं त्यांना खुप खुप धन्यवाद

  • @bhagwatbansode6379
    @bhagwatbansode6379 Před 3 měsíci +247

    मी भागवत बनसोडे १९७२_७३ च्या दुष्काळात मी आठ वर्षाचा होतो. मला दुष्काळाच्या वेदना आजही आठवतात.आमचं कटूंब त्यावेळी जळगाव जिल्ह्यातील पाडळी या गावी होतो. शेतकर्यांच्या केळीच्या मळ्यातील घोळात भाजी खाऊन जगलो. मी माझ्या आई - वडीलांचे ऋण विसरु शकत नाही. त्यांनी त्या कठीण काळात आम्हा सर्वांना जगवले धन्य धन्य ते आईवडील.

    • @vasuwankhede3354
      @vasuwankhede3354 Před 3 měsíci +1

      Aata tumcha वय kiti dada

    • @raghunandafarms3706
      @raghunandafarms3706 Před 3 měsíci

      🙏 Naman tumchya Aai wadilana ani tumhala

    • @syogeshmpatil3006
      @syogeshmpatil3006 Před 2 měsíci

      तुम्ही आपल्या जवळ चे पाळधी

    • @ibcnews7100
      @ibcnews7100 Před 2 měsíci +2

      😂१९७२/७३ कवठे पिरान सांगली जिल्हातील एक फार मोठं नावजलेलं गांव यांच गावाला आजपर्यत अनेक नावाने ओळखले जाते पिराचं कवठं खंबाळेच कवठं आणि सदा म्हदा मागंच कवठं त्ानंत हिदकेसरी मारूती मानेचं कवठं आणि आत ते कवठे पिरानं या नावानंओळखलं जातं जोतिराम पाटील यांच याचं गावात वास्तव्य होतं खूप जमिन असून सुद्धा होसाबाई पाटीलीनं या्च्या सासरे चुलतं यांनी ते जमिन बेकायदेशीर नावावर करून घेतले होते.त्याचं परेड मध्ये दुष्काळ पडला ४ मुलं २ मुली याचं हे छोट कुटूंब दुखानं व्याकूळ झालं होतं त्या काळातील आमचे वडील व चुलते बाळासो पाटील वंसत पाटील या दोन भावाच्या मुखातून ७२ च्या दुष्काळासंद्रभात मी बराच वेळ ऐकलं आहे ते आपल्या मोठ्या भावाच्या महिमा सांगतात दादा उर्फ व्याकूब पाटील किसन यां नावाचा व्य्तीने आम्हाला खूप चाकरी करून सांआळलं आहे पण ते ऐकोपा आता या कलयुगी संपला आहे त्यांचे बहीण सखुबाई थोरवत हिला मौजे वडगांव या ठिकाणी दिली आहे तर आक्काताई भंडारी नरंदे या ठिकाठी आणि एक भाउ शंकरराव त्यांच्या वागण्यात काहीचं फरक नाही.असू खूप वाईट होते वेळ खाणं पिनं नव्हतं म्हणून आमचं वडील दिवसातून चहा १० का पितात ते त्यांनी ते कथा सांगून झालेलं हाल व पराकाष्टा यामुळे चहा आणि बिडीची सवयी लागले आहे .

    • @Hindustani..143
      @Hindustani..143 Před měsícem

      खरंच दादा आई वडिलांचे उपकार आम्ही कधी ही कसे ही काही केले तर फेडू शकणार नाही...🙏

  • @gokulmunavat5806
    @gokulmunavat5806 Před 2 měsíci +190

    तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक। यांनी ही दुस्काळाची परीस्थिती अगदी सहज हाताळली...आणी पुढे मोठ्या कष्टाने महाराष्ट्रात हरित क्रांती घडवून आणली......

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 Před 3 měsíci +151

    मी त्यावेळेस 19 वर्षाचा होतो धान्य चा काळा बाजाराने गुपचूप विकले जात होते ज्याच्या जवळ पॆसे होते ते घेत होते परंतु त्यावेळेस परदेशातून लाल ज्वारी एलो मिलो असे धान्य येत होते खुप कठीण काळ होता नंद्या आटल्या होत्या आमच्या गिरणा नदीत खोलवर वाळूमध्ये खड्डे खोदून त्यात लोखंडी टाक्या गाडून त्यातून पाणी काढत होते ते पण नंबर लावून वस्ती लोकसंख्या कमी होती म्हणून कसेतरी निधवले आता त्या आठवणीने डोळ्यात पाणी आल्या शिवाय रहात नाही आताच्या मुलांना पटणार नाही काहीही सांगता असे म्हणतात

    • @pradipsatav7759
      @pradipsatav7759 Před 2 měsíci +1

      पैसे देऊनही धान्य,माल मिळत नव्हता,फार दैना झाली,4/5 वर्षे.त्या आठवणीने सुध्दा आज काबीज करपत.फार मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून पुण्या-मुंबईत स्थलांतर झाले.😢😢😢

    • @shraddhabhojane715
      @shraddhabhojane715 Před 2 měsíci

      Majhe papaa sangtaat... Me aaj 26 years chi aahe...
      Vadil majhe 76 years che asnaar sadharan..vadilanchaa janma 1953 cha aahe. ..1972 chya veli vadil majhe 9th vaigre pass keli asnaar...aani majhya mummy cha janma 1972cha.....mhanun ki kay tichya vatyla surwaatch संघर्षात सुरू झाली..अजून ही संघर्षात चालू च आहे...Pn generation gap asun pn I can understand ..

    • @user-ky5lq9oe5n
      @user-ky5lq9oe5n Před 2 měsíci

      फोन नंबर पाठव बोलारच आहे

    • @bhimraogajbhiye7271
      @bhimraogajbhiye7271 Před měsícem

      Kaala baajar kon karit hote aathawa. Indiraji ni duskali kaame kadhali hoti. 100 foot maati khodun bandhara kinwa sadakewar takanyakarta ₹4 milayache.

  • @GaneshShinde-tx8bh
    @GaneshShinde-tx8bh Před měsícem +4

    तो दुष्काळाचे सन जरी आठवले तरी आमच्या अंगावर काटे उभे राहतात आणि जे आमचे पूर्वज होते त्यांनी किती कष्ट केले आडतील हा विचार पण आम्ही करू शकत नाही ज्यांनी हा व्हिडिओ जतन करून ठेवला त्यांना माझा सलाम कारण आमचा जन्म पडन नव्हता त्या काळामध्ये पण हा व्हिडिओ बगून आम्ही त्या दुष्काळा मिधील परस्तीती अनुभतो आत्ता

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 Před 3 měsíci +144

    १९७२/७३ ला धान्यं आणि जनावराचा चारा मिळत नव्हता,पण पाणी मात्रं चार पाच परसावर होते, मोटेन मका,घास,बटाटे आणि गाजरं भिजवली जायची, मी पाणी धरायचो,आज ११ परस विहीरी झाल्यात पाणी नाही, ४०० /५०० फुट बोर कोरडे आहेत, पिण्यासाठी टँकरने पाणी येते, घरात कामापुरते भरपुर धान्यं आहे,रेशनची तर मात विचारू नका, तेव्हा लोक भर ऊन्हात खडी फोडत होते, आता झाडाखाली पंखे लावुन बिसलरी/ बियर पिऊन पत्ते खेळतात,कामाला माणुस मिळत नाही,४०० रूपये देऊनसुध्दां,मोठमोठे हरीनाम सप्ताह होतात,चारी धाम केले जाते,फक्त पाणी नाही

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 Před 3 měsíci +5

      मित्रा काळानुसार difficulties वाढत जातात..एक दिवस आपल्याला ही पृथ्वी सोडावी लागणार आहे.

    • @gulshanbeetamboli1592
      @gulshanbeetamboli1592 Před 2 měsíci +1

      Mi 3rd madhe hote 8 varsachi maze bahin bhau dushakali kamala jat hote dhoghe engineeringala walchand collage la.tar ak bahin bhau wilingdonla hote gav hatnur Tasgav taluka shikshan sangali Visharambagala amachi panmalachi sheti hoti 12 bail hote panmala wakun gela.bail vikalp kahi kailasale gele maze baba radat.hote momne matra.na.ghabarata.bangari dhanda chalu thevala maka.hulaga konda vaparun bhakarichya kelyaa pan.shikshan thambwale nahi mothe bhavanene sangalitach joga lekar class madhe nokari keli amachaya.gavhache lok buliyanrifinari karat.yanchi khup madat zali gavala.sukadicha shira lasanachi amati khaun divas kadale kontahi bhedbhav nahata o sheth nnachatukada fekalanahi sukavun khat hoto 🌹☪️🚩🇮🇳🙏🙏🏻

  • @A.J926
    @A.J926 Před 3 měsíci +359

    मातीच्या धिगरावर खेळणारा मी आहे या व्हिडिओ मध्ये... माझे आई बाबा पण ❤❤❤❤ 😢😢😢😢

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v Před 3 měsíci +221

    दुष्काळ चा अनुभव बापाला असल्यामुळे आता सुद्धा घरात 40 पोती गहू, ज्वारी, हरभर याचा साठा करून ठेवतात... दुष्काळ मध्ये घराचे खुप हाल झाले होते...

  • @ravichate9833
    @ravichate9833 Před 2 měsíci +9

    गावातील वयस्क व्यक्ती यांच्याकडून 1972 च्या दुष्काळाचे ऐकले होते आज तुम्ही प्रत्यक्षात दाखवले धन्यवाद

  • @ganeshdike1022
    @ganeshdike1022 Před 2 měsíci +92

    कोणत्याही मनुष्य जातीला शिक्षा देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त निसर्गालाच आहे

    • @user-dh8hf4zg3q
      @user-dh8hf4zg3q Před 2 měsíci +2

      अगदी बरोबर . मानवाने निसर्गावर मात केली हि निव्वल कल्पना आहे .

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 Před 2 měsíci +1

      आप कहां थे ज्ञानी बाबा 😂😂😂😂

    • @Mi_ekmaratha
      @Mi_ekmaratha Před 2 měsíci +1

      ​@@anandshinde1255बरोबर मला वाटतंय तू आरक्षण घेऊन जगाला असेल ना म्हणून हसतोय

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 Před 2 měsíci

      @@Mi_ekmaratha माझं नशीब तुझ्यासारखं नाही रे बाबा,,,, तुज्या माईला वाड्यावर बोलवून घोड्यावर घेतलेलेय म्हणून तुज्या डोक्यावर परिणाम झालाय ...🤪😝🤪😂🤪😝
      झाकण झुल्या

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 Před dnem

      पण त्यात जास्त गरीब होरपळाला जातो...
      कधी कधी श्रीमंत पैसाच्या जोरावर तागून जातो...

  • @satyashodhak123
    @satyashodhak123 Před 3 měsíci +226

    आदरणीय इंदिरा जी च्या काळात खुप संकट येऊन गेली , या दुष्काळावर मात करत महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने स्वामीनाथन साहेबांच्या मदतीने हरीत क्रांती घडवून आणली ❤❤❤

    • @indianfarminglife8382
      @indianfarminglife8382 Před 3 měsíci +4

      Haritkranti.।। Manje bimari khukhau marat aahet lok bimari ne.।।

    • @vinayp8040
      @vinayp8040 Před 3 měsíci

      Taripan thatavik loka hya aapdancha upayog fakt virodhi rajkaran karnya sathich kartat

    • @sh09976
      @sh09976 Před 3 měsíci +5

      Haritkranti mhanje Cancer 👹👺
      Full chemical Ani fertilizers cha bhadimaar 👹👺

    • @nehasahane5151
      @nehasahane5151 Před 3 měsíci

      Ho

    • @prafullashelar6997
      @prafullashelar6997 Před 3 měsíci

      Fukat raste banun ghetle amhi dagad fodli ahet rastyachya kamache, congress che sthanik netyani khup lutalay tya kalat

  • @serab2616
    @serab2616 Před 3 měsíci +122

    आज च्या पिढी ला काहीच किंमत नाही, सगळ्या गोष्टी सहज मिळतात, त्या मुळे ना अन्नाची ना पाण्याची, ना भावनेची किंमत 😢😢

    • @anisattar4848
      @anisattar4848 Před 3 měsíci +2

      Rait

    • @arcreation8818
      @arcreation8818 Před 2 měsíci

      Pan ka bar watat as whav changal aahe na aamachya nashib changal aahe te

    • @serab2616
      @serab2616 Před 2 měsíci

      @@arcreation8818 : तसं नाही फ्रेंड, माझे म्हणणे असे होते की आज च्या पिढी ला सगळं सहज मिळते, फास्ट फूड, फास्ट लाईफ त्या मुळे सहनशीलता patience नाही. Very few of you think for Others, for society. Rest of them are self centred. Save water, save soil, not to use plastic, have less carbon footprint, thinking for others, accomodating Poor's etc seldomly thought by them

    • @user-ci5jl9fc3l
      @user-ci5jl9fc3l Před 2 měsíci +2

      आजची पीढी ही एकदम बेकार आहे गरीबी काय असते ते त्यांना माहीत नाही

    • @will-kf1li
      @will-kf1li Před 2 měsíci

      Tyat tyancha dosh nahich...apan tyana vadhavtana kashachi jhal lagu dili nahi

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Před 3 měsíci +150

    1973 च्या दुष्काळ च्या खूप करुण कहाण्या ऐकल्या होत्या त्यावेळी, मुख्यमंत्री वसंत नाईक यांनी रोजगार हमी योजने द्वारे, पाझर तलाव बनवून दुष्कळ वर मात केली.😊😊

    • @nrendralandge8043
      @nrendralandge8043 Před 3 měsíci

      शेवटी काम करून च पोट भराव लागत होत सरकार फुकट फोसत नव्हत .

  • @shrikantb8962
    @shrikantb8962 Před 2 lety +106

    १९७३चा अनुभव असूनही मराठवाड्यात दुष्काळ पडतोच काही मतलबी राजकारण्यांनमूळे

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 Před 3 měsíci +48

    मी 4 फेब्रुवारी 1973 ची आहे माझ्या आईवडिलांनी आम्हा सहा भावंडाना फार कष्ट करून सांभाळले

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 Před 3 měsíci +66

    त्या वाईट परिस्थितीत माझ्या आईने खूप खूप कष्ट करून
    मोठया मुश्किलीने आम्हाला कुटुंबातील सर्वाना आणि
    येणाऱ्या पाहुण्यांना सांभाळले. खूप वाईट दिवस होते ते.
    अश्या। त्या माझ्या आईला सादर प्रणाम!🙏🙏🙏🙏🙏

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Před 3 měsíci +60

    असल्या उन्हातान्हात बायाबापड्या आपल्या लहानग्याला कडंवर पायाशी नाहीतर मांडीवर ठेऊन असली कष्टाची कामं करताना पाहून -हदयाचा ठोका चूकत होता बाळाला लागणार तर नाहीना.

  • @user-dh8hf4zg3q
    @user-dh8hf4zg3q Před 2 měsíci +11

    पूढच्याला ठेस लागली तर मागचा शाहाना होतो म्हणून पाण्याचे महत्व पटले पाहिजे . 🌳झाडे लावा झाडे जगवा 🌳🙏

  • @balasahebjadhav4357
    @balasahebjadhav4357 Před 2 měsíci +47

    एवढी संकटे भोगून पण आम्हीं संपूर्ण भारतात आघडी वर आहोत..जय महाराष्ट्र ❤❤

    • @yogeshnikode1701
      @yogeshnikode1701 Před 2 měsíci

      संकट भोगले म्हणून आघाडीवर आहो

  • @sadashivteke5736
    @sadashivteke5736 Před 3 měsíci +16

    इचलकरंजी मध्ये मी त्यावेळी 10 वर्षाचा होतो त्यावेळी आमच्या गावामध्ये दुष्काळी कामे म्हणून रस्त्यासाठी लागणारी खडी फोडायचे काम चालू होते आम्ही त्यावेळी आई-वडील व आम्ही भाऊ-बहीण कामाला जात होतो त्यावेळी दिवसाला तीन रुपये हाजरी व सुकडी मिळत होती

  • @satishaswale9880
    @satishaswale9880 Před 2 měsíci +33

    या सर्व कमेंट वाचल्यावर त्या काळातील माणसांमुळे आजची पिढी ला थोडे तरी संस्कृती एकमेकांनची माया दिली जाते.

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Před 2 měsíci +5

    मि सुद्धा 1972 चा दुष्काळ वयाच्या 9व्या वर्षी पाहिला त्यावेळेस पंतप्रधान स्व इंदिरा गांधी होत्या आणि स्व यशवंतराव चव्हाण साहेब हे सुध्दा होते त्यावेळी सुकडी सातू इलो मिलो हे धान्य परदेशातून आणून जनता जगविली होती

  • @Eating_45
    @Eating_45 Před 3 měsíci +8

    हा व्हिडिओ माझ्या दोन-तीन दिवस फीड वर येतो होता पण आज हा व्हिडिओ पाहिला जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @AshokJogdand-yw6to
    @AshokJogdand-yw6to Před 2 měsíci +12

    हरित क्रांती पासून मराठवाडा आजही कोसो दुर आहे.पाणीटंचाई, वनराई, तळयाचा अभाव,लहान सहान बंधारे कमी प्रमाणात, राजकिय ईच्छा शक्तीचा अभाव या मुळे आजही बीड उस तोडणी साठी जग प्रसिद्ध आहे.केंद्र सरकार ची उदासीन भुमिका निधी खर्च न करणयाची भुमिका नाही.

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 Před 2 měsíci +8

    खूपच रह्रदय स्पर्शी अनुभव कॉमेंट मध्ये सगळ्यांनी सांगितली आहेत.

  • @dasshelke5500
    @dasshelke5500 Před 3 měsíci +20

    🚩 मला आठवत सोलापूर ला 1972 साली भयंकर दुष्काळ पडला होता, त्या वेळचे जिल्हाधिकारी बट ब्याल होते त्यानी आपल्या अधिकारात सोलापूरच्या रेल्वे स्टेशन वर धान्य उतरविले होते 🚩

  • @user-dv2ru5md4x
    @user-dv2ru5md4x Před 3 měsíci +7

    माझ्या वडिलांनी सुद्धा हा दुष्काळ पाहिलाय अनुभवलाय आणि आम्ही त्यांच्याकडून तो ऐकलंय तसा दुष्काळ परत कधीच नाही येवो अशी देवाकडे प्रार्थना करतो

  • @yogeshnikode1701
    @yogeshnikode1701 Před 2 měsíci +31

    संकटे भोगली म्हणून महाराष्ट्र आघाडीवर आहे
    जय शिवराय
    जय जिजाऊ
    जय महाराष्ट्र

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 Před 5 měsíci +28

    पुणे जिल्ह्यात 1973 ला दुष्काळ नव्हता पण आलेल्या पिकात व रानात ही कधी पाहिले नव्हते ईतके उंदीर मात्र झाले होते,मी स्वत: पाहिले आहे, अगदी त्यावेळच्या पुणे शहराजवळच्या गावात.

  • @aniljagtap8677
    @aniljagtap8677 Před 3 měsíci +20

    महत्वाची माहिती देणारा विडिओ पाहायला मिळाला, सरकारी यंत्रणा कामकरतआहेत ,लोकांची आर्थिकपरिस्थिती अंदाजआला

  • @vijaykumarhudge2216
    @vijaykumarhudge2216 Před 3 měsíci +9

    मी हा.दुष्काळ पहिला आहे माझे आई वडील खडी फोडण्यासाठी कामावर जात होते आतिष्य भयंकर परस्थिती होती माकणी ता उमरगा.जिल्हा उस्मानाबाद त्यावेळचा

  • @AshaChitale-hh8pl
    @AshaChitale-hh8pl Před 3 měsíci +40

    मी हा दुष्काळ अनुभवलाय तेरा वर्षाचा होतो. भयानक परिस्थिती होती. खाण्यासाठी लाल ज्वारी आणि ती ही कमी. शाळेत सुकडी. रस्त्याची कामे मजुरी अडीच तीन रू. बाजारात धान्य नसे. पिण्यासाठी पाणी होते. एक लक्षात घ्या. त्या काळात बोर वेल नव्हत्या, विहिरी चार पाच परस. त्यामुळे पाणी फक्त पिण्यापुरते. शेतीत संकरित पीके नव्हती त्यामुळे उत्पादन कमी. आज संकरित बियाणे वापरून धान्य मुबलक आहे. लोक काही म्हणोत पण बाजारात पाहा, सरकार देत असलेले धान्य बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जाते. मजुरी सरासरी पाचशे रू. पूर्वीसारखी कामे मजूर प्रामाणिकपणे करत नाहीत. ग्रामीण भागात चौकशी करा. आज विहिरी सत्तर ८०फूट खोल, बोर पाचशे सहासे फूट. त्याची संख्या अफाट त्यामुळे पाणी उपसा जास्त. त्यामुळे पाण्याची टंचाई पण अन्न धान्य आहे, लोकांना मिळत ही आहे. फुकट बरेच मिळते त्यामुळे प्रामाणिकपणे काम करण्याची बऱ्याच जनाची प्रवृत्ती दिसत नाही.

    • @priyankabehere741
      @priyankabehere741 Před 3 měsíci +1

      लाल ज्वारीला millo म्हणत होते.

    • @satyawanbhagat7143
      @satyawanbhagat7143 Před měsícem

      एकदम सत्य परिस्थिती आहे आपण जे लिहिलं आहे ते

  • @kataresir2291
    @kataresir2291 Před 3 měsíci +65

    1972 च्या दुष्काळाचे चटके सहन करत सुद्धा आपल्या लेकरा बाळांना सांभाळले.ह्या दुष्काळा बद्दल माझ्या आजी आजोबा कडून सर्व ऐकले आहे.ऐकताना खूप वाईट वाटायचं.
    बरबड्याची भाजी खाल्ली,रोजगार हमी योजनेवर मिळणारे धान्य काम संपल्यानंतर भेटायचे मग ते संध्याकाळी घरी आल्यावर घराच्या जात्यावर दळून काढायचे त्याची एक दोन भाकरी बनवून मुलं बाळांना खाऊ खालून उरलेली ते खायचे.कधी भाकरी शिल्लक राहत असे कधी नसे....😢 खूप वाईट वाटायचे आजी आजोबा हे सर्व सांगत असताना...😢

    • @rampedgulwar925
      @rampedgulwar925 Před 3 měsíci +3

      आजी आजोबा सांगितले ते सत्य आहे

  • @krishnatkumbhar1326
    @krishnatkumbhar1326 Před 2 měsíci +3

    मी दोन वर्षाचा होतो. माझे आई बाबा त्या वेळी जी परिस्थिती होती त्याबद्दल नेहमी सांगत असत. आज सर्वांच्या कमेट्स वाचून मला रडायला आले. माझे आई बाबा आता नाहीत पण मी मात्र माझ्या मुलांना याविषयी नेहमी सांगत असतो.

  • @Anilkatore-eu2hw
    @Anilkatore-eu2hw Před 3 měsíci +27

    श्रीगोंदा तालुका उकडगाव आमचं गाव होतं 1972 च्या दुष्काळात गावात पाणी हाताला काम नाही त्यामुळे आमचे आजोबा वडील कामाच्या शोधात प्रवरा नदी काठी चिंचोली या ठिकाणी आलो आणि आज स्थायिक झालो आजही गावाची आठवण येते

    • @rajendraithape8399
      @rajendraithape8399 Před 3 měsíci +1

      शिवरात्रि ला यात्रा असते उक्कडगावची मुंजाबा महाराजांची येणे होते का तुमचे यात्रेला.

    • @SagarShinde-cd6wb
      @SagarShinde-cd6wb Před 3 měsíci

      Chicholi gurav ka amhi devgav che

  • @alankartarde1404
    @alankartarde1404 Před 3 měsíci +39

    पूर्वीचे लोक मायाळू आणि इमानदार होते म्हणून सर्व लोक त्यातून सावरले गेले . पुढील काळामध्ये अशी परिस्थिती येऊ नये .

    • @omkarpatil3877
      @omkarpatil3877 Před 3 měsíci

      आता एकमेकाला मारून टाकतील पोटासाठी

    • @sachinsgiri
      @sachinsgiri Před 2 měsíci +1

      अशी नव्हे याहून भयंकर परिस्थिती येणार आहे. तेव्हा तर ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा बसत नव्हत्या. आता तर तापमान ३ अंशाने वाढेल असे अंदाज आहे. पॉइंट ऑफ नो रिटर्न आपण पार केलेला आहे. त्यामुळे बघा तशी व्यवस्था करून ठेवा

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 Před 3 měsíci +31

    खर आहे ,माझ्या वडिलांनी पण 1972 चा दुष्काळ ची झल बसली होती ,अनेक कामे विहिरी कामे करून उदरनिर्वाह केला !🙏🙏

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před 2 měsíci +1

    जुनी आठवण ही फिल्म काढण्या साठी ज्या ना परीश्रम घेतले त्या चे खूप खूप अभिनंदन व मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🙏🏅📢✍️

  • @sattupamungurkar4491
    @sattupamungurkar4491 Před 3 měsíci +25

    मी स्वता त्या वेळी साली दोन वर्षाचा होतो आम्ही सहा भावंडे पण माझ्या आई वडिलानी कसे जगवले असेल 😢😢

  • @dr.sindhutaikhandare9718
    @dr.sindhutaikhandare9718 Před 3 měsíci +6

    माझी आई त्या परिस्थितीत कसे जगलो ते सांगते. आज ती 101 वर्ष वयाची आहे. तेव्हा राजकारण असे गलिच्छ नव्हते, सरकार मायबाप होतं. शिक्षण नसलेल्या लोकांना तळं, नाला बंडींग, कोल्हापुरी बंधारे असे काम दिले. आजचं सरकार कामाहून काढून टाकतय.

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 Před 3 měsíci +101

    सुकडी व लाल ज्वारी खाऊन दिवस काढले.नको त्या आठवणी परत😢

    • @Prasadkardile1
      @Prasadkardile1 Před 3 měsíci +10

      Zade lawa ata tari Pani tikun rahil ny tar parat ahe tech divas

    • @kailasshinde5610
      @kailasshinde5610 Před 3 měsíci +1

      खरं उआहेभावा

    • @user-bm4mk6kb5j
      @user-bm4mk6kb5j Před 3 měsíci +1

      निळा पण खावा लागला

    • @akshaymatade
      @akshaymatade Před 3 měsíci +1

      मिठ भाकर खाल्ली भाu

  • @vishalwaykule
    @vishalwaykule Před rokem +26

    मी 1972 चा दुष्काळ ऐकला आहे आणि आता पहात आहे.

    • @sonufunandshort9998
      @sonufunandshort9998 Před 2 měsíci +1

      नेहा दुष्काळ ऐकला आहे आज ऐकला आहे आजची कडून आणि आज पाहत आहे आणि मला रडायला येत आहे

  • @user-fp3lo4wz7g
    @user-fp3lo4wz7g Před 2 měsíci

    हे दिवस जरी आम्ही अनुभवले नसेल पण हा विडीयो बघून खरच खूप वाईट वाटले, आमची आजी या वेळेच्या गोष्टी आम्हाला सांगायची तेव्हा समजले त्यांनी एवढे कष्ट , मेहनत करून जे आपल्यासाठी ठेवले खरच त्यांचे उपकार न विसरण्यासारखे आहे😢😢

  • @chandrabhagakhamkar4962
    @chandrabhagakhamkar4962 Před 2 měsíci +26

    मी त्यावेळेस नवीत होते लहान भाऊ मोठ्या दोन बहीणी सर्व जन कुपनावर मिळालेल्या लाल मिलो आणि हुलगे यांच्या भाकरी खाल्ल्या आईवडिलांच्या बरोबर उन्हात कामाला जायचों खुप कठीण काळ होता तो. आता ते दिवस आठवल्या वर खुप वाईट वाटते..

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 3 měsíci +28

    मि हा दुष्काळ अनुभवला आहे. या दुष्काळत 30 एकरापैकी आमची 15 एकर जमीन फुकट भावात विकल्या गेली होती. परंतु आता 100 एकर कमावली आहे.

    • @adinathghule8531
      @adinathghule8531 Před 3 měsíci

      हरामाचा पैसा असावा,नेते मंडळीसारखा,१०० काय ५०० एकर वालेपण आहेत.दादा सद् उपयोग करा,थोडे बहुत अन्नदान करा फक्तं गरजुनां,

    • @user-kp5id4tz4i
      @user-kp5id4tz4i Před 3 měsíci

      बर

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 Před 2 měsíci +1

      100 एकर कशी कमावली? एक एकर 40 लाख सांगतात गावात आमच्या. मी 20 पर्यंत घेऊ शकतो

    • @Yog481
      @Yog481 Před 2 měsíci

      आजोबा तुमचं वय किती😂

    • @marketwatch03
      @marketwatch03 Před 2 měsíci

      😂

  • @rajaramgawde-se8iq
    @rajaramgawde-se8iq Před 3 měsíci +20

    मी २री किंवा ३री ला होतो.... काही काही अजुनही आठवते... विहिरीत उतरुन वाटी वाटीने गढुळ पाणी 'मीळवने,..लाल ज्वारीच्या कडकडीत भाकरी.. घरातील सर्व माणसे तळ्याच्या कामावर जायची... सरकारी सुकडी हे माझे, आमचे खास आकर्षण होते... काहीही असो.. पण सुकडी खरोखरच पौष्टिक चविष्ट दर्जेदार असायची.... कुटुंबीयांनी आम्हा लहानग्यांना कुठलीही झळ लागू दीली नाही..!!!! जय भारत जय महाराष्ट्र सरकार ❤

    • @user-ue3og8ll1w
      @user-ue3og8ll1w Před 2 měsíci

      बरोबर आम्ही सुध्दा

  • @gurunathshingva8089
    @gurunathshingva8089 Před 3 měsíci +14

    मी आदिवासी कुटुंबातील आहे माझे वडील त्या काळी रान केळीचे कंद खाऊन आपले पोट भरतं होते अस माझे वडील म्हणतात खूप भीषण दुष्काळ होता त्यांचा या कष्टाची मला नेहमी जाणीव होत असते😢

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Před 3 měsíci +20

    या दुष्काळाचे वैशिष्टय म्हणजे पावसाचा एकही थेंब न पडल्याने कसलीही पेरणी झाली नाही.

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 Před 3 měsíci +7

    1972 साली महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना बाकीच्या राज्यांनी काय केलं ???? का कायम देश अडचणीत असताना महाराष्ट्रानेच पुढं पुढं यावं जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @DipakTayade-qu2wz
      @DipakTayade-qu2wz Před 3 měsíci

      आता दुसरे राज्य आणि परप्रांतीय लोकांनी महाराष्ट्र जवळपास चोरलाच आहे येथील पुढाऱ्या न च्या मदतीने 🙏🙏🙏

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz Před 3 měsíci +31

    आता सारखे पुढारी त्यावेळी असते तर जनता उपाशी संपून गेली असती

    • @dadapatole9341
      @dadapatole9341 Před 3 měsíci +1

      100%बरोबर, आताचे सरकार बोल घेवडे

    • @subhashchavan6554
      @subhashchavan6554 Před 2 měsíci

      Aagdi.brobar.sadhya.madhyachya.taluwarche.loni.khanare.pudhari.paida.zale.aahet.

  • @user-xu6rf3gl1j
    @user-xu6rf3gl1j Před 6 měsíci +3

    धन्यवाद सर

  • @sarlakunde304
    @sarlakunde304 Před 3 měsíci +4

    हा दुष्काळ बघितलेला माझी आजी अजून आहे.खूप वेदना सहन केल्या त्यांनी.

  • @DipakMali-jj7gc
    @DipakMali-jj7gc Před 3 měsíci +22

    त्या दुष्काळात परदेशातून आयात केलेल्या धान्यामधून वेगवेळ्या तनाचे ( गवताचे) काँग्रेस गवताचे बियानेही आलें होतें...

  • @bhimraomugdal1650
    @bhimraomugdal1650 Před 2 měsíci +14

    आज मी ५९ वर्षाचा झालो आहे
    दुष्काळात ७ /८ वर्षाचा असेल
    या काळात लोकाच्या हाताला सरकारने काम दिले
    सडक
    तळे पाट बांधून धरणे उभारणी केली
    खडी सेंटर यांच्या माध्यमातून काम
    मी स्वतः या काळात
    शाळा सोडून गाई म्हशी ओळल्या
    सरकारने दुजाभाव केला नाही
    आज लोकांचे वागणे पाहिले की डोळ्यात पाणी येते
    लोकांना
    जव गहू
    सुगडी
    डॢम ने पाणी पुरवठा केला
    लोक त्या काळात प्रेमाने एकोप्याने राहत होते
    जयभीम🙏🙏🙏
    जय महाराष्ट्र

  • @aashamatimane7690
    @aashamatimane7690 Před 3 měsíci +7

    माझी आई वडील सांगत होते 72चादुष्काळ अतिशय कठिण काळ होता तेंव्हा तरवट्याची नुसतीच भाजी मिठ लावून खायची व कधीकधी उपाशीच झोपावे लागायचे आमच्या आई वडील आजींना अन्नासाठी खुपच त्रास सहन करावा लागला😢😢😢😂

  • @sudhirshelke1899
    @sudhirshelke1899 Před 3 měsíci +5

    1971/72 अतिवृष्टी मुळे अन्नधान्याचा दुष्काळ पडला होता, परंतु पाणी व गुरांच्या चाऱ्याचा सुकाळ होता.
    1972/73 मध्ये पडलेला दुष्काळ हा पाऊस नसल्यामुळे होता. पिकं/ गुरांचा चारा नसल्यामुळे लोकांना खायला अन्नधान्य नव्हते, पिण्यासाठी पाणी नाही आणि महत्त्वाचे म्हणजे गुरांना चारा मुळीच नव्हता.
    त्या वेळी महाराष्ट्रात रोजगार हमी योजना राबवून सगळी कडे रस्ते, तलाव निर्मिती झाली, विदेशातून अन्न धान्य मागवून जनता जगवली गेली.
    तत्कालीन नेतृत्व दूरदर्शी असल्यामुळे भुकमारी झाली नाही.
    पुढील वर्षापासून संकरित बियाण्याची लागवड करून देश अन्न धान्य साठी स्वयंपूर्ण झाला.

  • @ranjitsinhpawar7752
    @ranjitsinhpawar7752 Před 2 měsíci

    माझ्याही मोहोळ तालुक्यातील अंकुल या गावातील जनावरे जगवण्यासाठी शेतकरी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये गेलेले होते जनावरांना तिथले गवत सपक लागत असल्यामुळे नेलेल्या जनावरापैकी पैकी निम्मी जनावरे मरण पावली व शेतकरी शेतकरी जड अंतकरणाने दुष्काळ संपल्यानंतर गावी परतले हा अनुभव अविस्मरणीय आहे माझे आजोबा देखील त्यावेळी पाटणला जनावर घेऊन गेले होते तेव्हा तिथले हैबतबाबा नावाचे इसम आणि सर्वांना मदत केली होती

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 Před 2 měsíci +1

    हे देवा हे पाहून खूप दुःख झाले अशी वेळ कधीच कुठल्या देश राज्य गावावर येऊ नये 🙏🏻🙏🏻

  • @marthaadhav8197
    @marthaadhav8197 Před rokem

    Thanks sir

  • @sudhirshelke1899
    @sudhirshelke1899 Před 3 měsíci +4

    मी 11 वर्षाचा होतो. EGS चे कामावर काम करणाऱ्या मजुरांना सुकळी ( शीरा) वाटायचे काम करीत होतो.😮

  • @darkdevil9245
    @darkdevil9245 Před 3 měsíci +19

    मी स्वतः ७२ /७३ चा दुष्काळ अनुभवला आहे त्या वेळी कामावर सुकडी वाटप करायचे पाझर तलावांची कामे सरकारने सुरु केलेली होती .

  • @user-rx3fp9pt8w
    @user-rx3fp9pt8w Před 3 měsíci +2

    Tya saglya sahan kelelya mansana maza pranam😢😢

  • @nanasonawane-zx3so
    @nanasonawane-zx3so Před měsícem

    I was working in this drought 2.5 Rs per day ,we suffer very much,very shortage of water food,we eat sukadi maka nilava,iwas in 10 th std ,my teacher help me in education, i can't forget those difficult drought days,

  • @dattatrayapawar3790
    @dattatrayapawar3790 Před 4 měsíci +1

    Thank you sir for predicting real condition. I was in 6th class at that time. I was involved in such type of hard work..

  • @sanjayc5431
    @sanjayc5431 Před 2 měsíci

    सर... खरच मागील किमान 100 ते 200 वर्षा पासून दुष्काळ असतो उन्हाळ्यात.....किमान महाराष्ट्रात तरी..... बऱ्याच जिल्हा मध्ये....आज आपण शून्य प्रगती केली असच म्हणाव लागेल.....आणि ह्याला आपण सुध्दा तितकेच जबाबदार आहोत.... राजकारणी तर आहेतच..

  • @saritad6655
    @saritad6655 Před 3 měsíci +2

    मी पण पहिला दुष्काळ मी 10वर्षांची होती मला थोडं थोडं कळत होत लाल मिलो ज्वारी मिळायची माझ्या आई दादा नि खूप कष्ट केले t

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Před 4 měsíci +10

    महाराष्ट्राचा साठी भयानक दुष्काळ १९७२/. १९७३

  • @ganpatiajitkar4465
    @ganpatiajitkar4465 Před 3 měsíci +12

    खुप भयंकर वातावरण,,, तेव्हा बारामती मधे होतो वय वर्ष 10 😢

  • @Mango-il4zj
    @Mango-il4zj Před měsícem

    मी❤राजेश्वरी त्या वेळी १०वषौंची होते मि ही दुष्काळ अनुभवल्या
    जव् खात्यात चपाती

  • @kirankatore7824
    @kirankatore7824 Před 2 měsíci +1

    जुन्या पिढीने खूप त्रास सहन केला असून अतिशय कठीण दिवस काढले आहे , आपण ही तशी जाणीव ठेवून वागलो पाहिजे....

  • @Gmgm189
    @Gmgm189 Před 3 měsíci +19

    आज येवढ्या सुख सुविधा आहेत पण आज ही वडील.
    म्हणतात दुष्काळ पडेल पुढील काळात त्या वेळी पाणी तर मिळत होत आता पुढे पाणी ही मिळणार नाही सरकार अन्न आणून घालेल पण पाणी कोठून आणणार

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 Před 2 měsíci +1

    असे अडाणी लोक होते म्हणून राज्यकर्त्यांचे त्यावेळी चांगलेच फावले.आता सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही पण लोकांना आपल्या हक्काची थोडीफार जाणीव आहे, म्हणून लोक आवाज उठवत आहेत.

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před 2 měsíci

    1972 किंवा 1973 हा दुष्काळ मि जवळुन पाहीला माझे संरबा येथील मावसा व मावशी आमच्या येथे होते
    व दुसरबीड माळावर गिटी फोडण्यासाठी ते कामावर जायाचे मी पण त्या च्या सोबत जायचो मका ची सुकडी मिळत असे 🏅📢🙏🥇

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 Před 3 měsíci +12

    मी लहान असताना हा दुष्काळ खुप जवळुन अनुभवला , आज ही ते चित्र डोळ्यासमोरुन जात नाही ,

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 Před rokem +2

    Harder than hardest. Only Maharashtra. ❤

  • @sudhakarghavale8487
    @sudhakarghavale8487 Před měsícem

    या वेळेस मी तीन वर्षांचा होतो मला काही दुष्काळ आठवत नाही पण ऐलो मिलु ज्वारी मी पण खाल्ली आहे सुकडी

  • @saniltare
    @saniltare Před 3 měsíci +5

    आपले पुरवजाने फार कष्ट् केले सरव काही सहनही केले दुशकाळ ही सहन केल आणि प्रगती आपल्या पुरवजानी केलि परप्रतीय फुकट खायायला आले
    आपल्या आताच्या पिडीला महिनत करायला नको फक्त 8 तासाचि नोकरी पाहिजे जेसहन केले आपल्या पुरवजानि ते आपन नाही सहन करू शकनार भविष्यात असा दुशकाळ येऊ शकतो
    झाडे🌲🌳🌴 लावा तोडु नका

  • @digambarpote378
    @digambarpote378 Před 2 měsíci

    मी दिगंबर पोटे,रा. माळीण.. त्यावेळी सहा वर्षांचा होतो... सगळीकडे रोहयो ची कामे चालू होती... लोकांना सुकडी रवा मिळायचा... रेशनिंग कार्ड वर मका ज्वारी मिळायची... अतिशय भिषन दिवस...

  • @dattatraykasabe
    @dattatraykasabe Před 3 měsíci +5

    सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री 1972 ला शरद पवार होते

  • @Prakashpatilchitalkar
    @Prakashpatilchitalkar Před 2 měsíci

    पुसटचा दुष्काळात आठवत दुसरीत होतो.प्रचंड हाल झाले असावेत. आम्ही मोठे शेतकरी कामाला जाता येईना आणि भाकरीची सोय नाही.पण दुष्काळानंतर चे हाल खुप दिवस सोसले.

  • @vijaypaigude
    @vijaypaigude Před 3 měsíci +17

    परत एकदा असा किंवा या पेक्षा जास्त भीषण दुष्काळ पडायला पाहिजे.. आता खरंच गरज आहे.

  • @Vpakhale
    @Vpakhale Před 3 měsíci +3

    .मी 1972 ला हे काम केले.... सरकारी आधिकाऱ्याने रोजगार हमी कामात ब्रस्टाचार केला बोगस मजूरच्या नावावर पैसे कमवले

  • @ganeshshinde-zs3qi
    @ganeshshinde-zs3qi Před 3 měsíci +3

    जुने लोक आठवणी सांगतात. आपल्या आजी आजोबांनी बरबड्या खाऊन पाटाचे कामं केले.😢

  • @AjayRathod-mu8ci
    @AjayRathod-mu8ci Před 2 měsíci

    Video पाहूनच डोळ्यात पाणी आले, त्या वेळी लोकांनी जीवन जगण्या साठी काय काय सहन केले असेल. आपण कल्पना ही करू शकत नाही.

  • @KondibaChopwad
    @KondibaChopwad Před 3 měsíci

    Great people great government

  • @kaustubhdhanvat5344
    @kaustubhdhanvat5344 Před 3 měsíci

    अतिशय भयानक स्थिती

  • @balasahebkshirsagar8912
    @balasahebkshirsagar8912 Před 3 měsíci +3

    लाल ज्वारी ला मिलो म्हणायचे ती ज्वारी व सुकडी खाल्ली खूप वाईट काळ होता

  • @user-gx8lw3mg1c
    @user-gx8lw3mg1c Před 2 měsíci

    आज आपण किती सुखी आहोत..

  • @bhagirathbhoir8201
    @bhagirathbhoir8201 Před 3 měsíci +21

    स्व. इंदिरा गांधी खूप कणखर व अभ्यासू अशा पंतप्रधान होत्या त्यांच्या नेतृत्वामुळेच महाराष्ट्रा 1972 साली या दुष्काळातून सावरला. अन्यथा.......

    • @raghunathsatale5388
      @raghunathsatale5388 Před 3 měsíci

      कणखर नाही,निर्दयी होती ती बाई,खरी डाक्युमेंटरी अजून आहेत पहा,गुजरात आणि महाराष्ट्रात कित्येक जनावर पाण्याविना तडफडुन मरत होती,मी त्या वेळी अकरा वर्षाचा होतो,एकदम भयानक परिस्थितीच्या डाक्यूमेंटरि न्यूज रिल पडद्यावर दाखवत होते पण इंदिरा गांधीने त्या मधले कांही चित्रिकरण कट करून टाकायला सागितल्या,नंतर 1972नंतर ही काम लोकांना देऊन ,त्या बदल्यात अमेरिकेतून आणलेली सडकि बार्ली,व लाल मिलो ज्वारी देऊन उपकार केल्या प्रमाणे बाई वागत होती,

  • @gajananjadhav9835
    @gajananjadhav9835 Před 3 měsíci +5

    बाई मी धरण धरण बांधीते गं.. माझं मरण कांडीते गं...

  • @anthonysalve4023
    @anthonysalve4023 Před 3 měsíci +2

    1972 because of Shrimati Indira Gandhi and her team we Maharashtra survived that time. I was 14 years old.

  • @balwantgambhirrao1147
    @balwantgambhirrao1147 Před měsícem

    मला थोडासा आठवतय मि पाच वर्षांचा होतो ,शाळेत जाण्यासाठी कपडे नसल्याने मला त्या वर्षी शाळेत टाकल नाही .

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 Před 3 měsíci +2

    माझा जन्म झाला तेव्हा 27 / 1/73 आई खुप आठवणी सांगत होते की खाण्या साठी काही धान्य नव्हते लाल ज्वारी व भेंडी अस माझ जेवण होत खुप हाल झाले होते

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l Před 3 měsíci +2

    मी 72 चा दुष्काळ पाहिला नांही कारण दुष्काळ नंतर माझा जन्म झाला पण आमची आई नेहमी 72 च्या दुष्काळाची परिस्थिती सांगायची लाल ज्वारीची भाकरी खात असे

  • @AnilMarathe-xj5hz
    @AnilMarathe-xj5hz Před 2 měsíci

    माझ्या वडिलांकडून ऐकलेली आहे ही कहाणी माझे वडील त्यावेळी चार ते पाच वर्षांचे होते माझी आजी बाबा मॉल मजुरी करत असत आणि त्या लेडीज लाल ज्वारी खाऊन आम्ही सर्व भावंडे वाचले आहे असे माझे वडील सांगायचे आणि त्यावेळेस त्या लालच्या वारीला जेवलीस चव होती तेवढी आता कोणत्याच धान्यातनाही

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před 2 měsíci

    मी बघीतला हा दुष्काळ आमी दुसरबीड येथे माळावर गीठी फोडली
    सुकडी मिळत असे 📢🏅🙏🥇

  • @aaplamaharashtra29
    @aaplamaharashtra29 Před 3 měsíci +1

    झाडे लावा झाडे जगवा... 🌴 🎄.. असे दिवस परत ना यावे असे वाटत असेल तर झाडे लावणे गरजेचे.. झाडे पाणी ची पातळी टीकाऊन ठेवतात..

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 Před 3 měsíci +11

    १९७३ चा नाही १९७२ चा दुष्काळ असे शिर्षक हवे

    • @er.shubhamjagdalecivilmech2463
      @er.shubhamjagdalecivilmech2463 Před 2 měsíci

      1972 ला पाऊस झाला नाही त्याची झळ 1973 च्या उन्हाळ्यात जास्त बसली असावी

  • @user-cdhaknex2qc8g
    @user-cdhaknex2qc8g Před 2 měsíci

    कमेंट वाचुन खूप रडायला आलं
    या गोष्टी खूप ऐकल्या माझ्या
    बाबा कडुन
    पण आता ते सुद्धा या जगात राहीले नाही
    मिस यु दादा