ITI Course काय असतो त्याचा स्कोप आहे का ?हा कोर्स करणाऱ्यांची सध्या काय अवस्था आहे | BolBhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 05. 2022
  • #BolBhidu #ITI #ITICourse #ITIAdmission
    दहावी, बारावीची परीक्षा होऊन आता रिझल्ट लागण्याची वेळ जवळ आलीय. हे विद्यार्थी करियरचे मार्ग शोधत असतात आणि त्याबद्दल माहिती मिळवत असतात.
    प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्यांच्या पालकांना वाटत असतं की आपण चांगल्या कोर्सला admission घ्यावी. नोकरी चांगली मिळवावी आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, आणि ह्यासाठी गेल्या २-३ पिढ्यांपासून एक ऑप्शन कायम चर्चेत राहिलाय तो म्हणजे ITI चा.
    म्हणून आज माहिती घेऊयात ITI या कोर्स बद्दलची.
    The time has come to get the result after passing the 10th and 12th exams. These students are looking for career paths and getting information about it.
    Every student and their parents think that we should take admission in a good course. Get a good job and start your own business, and for this, for the last 2-3 generations, one option that has been in constant discussion is ITI.
    So today let's learn about ITI course.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 1,1K

  • @pratikshinde1068
    @pratikshinde1068 Před 2 lety +565

    औदयोगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI...पण आजच्या काळात माझा सल्ला असेल की iti कोणी ही करू नये... कारण आता iti ला पूर्वी सारखे म्हणत्व राहिले नाही...कंपन्या iti झालेल्या मुलांना 1 वर्षे ट्रेनिंग पिरेड मध्ये हवं तसं काम करून घेतात आणि पुन्हा ब्रेक देतात..आणि आता तर स्किल इंडिया च्या माध्यमातून निम ट्रेनी हा नवीन उपक्रम आला आहे...आणि त्या मुळे प्रत्येक कंपन्या आता निम ट्रेनी म्हणुन भर्ती करतात...आणि मानसिक आणि शारीरिक पीडा देणारे काम करून घेतले जाते...iti करत असाल तर नक्कीच स्वतःचा व्यवसाय टाका नाही तर iti च खूळ डोक्यात आणु नका...गेले 10 वर्षा पासून iti ची मुल पर्मनंट होत नाही...

    • @rahultodkar9641
      @rahultodkar9641 Před 2 lety +5

      Right

    • @flankerff1761
      @flankerff1761 Před 2 lety +3

      R8t bro . relley true bolla bhawa.

    • @srikantsutar8003
      @srikantsutar8003 Před 2 lety +12

      आगदी बरोबर, iti krun kahi hi fayda nahi sadhya it cha jamana aahe ,तशेच कंपनी worker policy change zali aahe no parmenent.only temporary contract base work.

    • @ravikantsawant9162
      @ravikantsawant9162 Před 2 lety +5

      100%true

    • @vivekkhadpekar4227
      @vivekkhadpekar4227 Před 2 lety +5

      Ekdum perfect bolat

  • @vyankateshghodake5965
    @vyankateshghodake5965 Před 2 lety +503

    दादा मी एकच comment टाकली आणि लगेच तुम्ही video बनविल्या बदल धन्यवाद.

  • @chinmayvatekar8658
    @chinmayvatekar8658 Před 2 lety +32

    दादा मी स्वतः एक ITI चा विध्यार्थी आहे Electrician ट्रेड ला दुसऱ्या वर्षात शिकत आहे, आणि मी तर असं म्हणतो जे आमच्यासारखेच विध्यार्थी डिप्लोमा, डिग्री करतात त्यांची तरी अवस्था काय आहे, ते सांगायला नकोच,कारण जेव्हा B-tech करणारे विध्यार्थी नोकरी नाही म्हणून घरी बसतात तेव्हा ITI चा विध्यार्थी कमीत कमी दिवसाला 400 ते 600 रुपये कमवतोच, कारण त्याच्याकडे skills असतात, आणि राहिला विषय 50% डिग्री होल्डरचा त्यांना वाटतं आपण इतकं शिकलो मग, मजुरी का करायची.... स्टेटस चांगला हवा.. वैगरे,वैगरे... आणि असो नोकरी नाही यामध्ये विध्यार्थी मित्रांची चूक नाही कारण सगळीकडे चिखलच आहे आणि जर का चिखलात उभ रहायचं असेल तर पहिली विठ ठेवावी लागते....(आणि विठ म्हणजे लक्षात आलंच असेल.)
    म्हणून कायतरी शिकलंच पाहिजे... मग तो ITI असो किंवा अजून काही.....
    #Padhega India To Badhega India.... 🙂

  • @Somnath92111
    @Somnath92111 Před 2 lety +21

    कोणीही निराश होवु नका,9 वर्षानंतर आज मला ₹70,000 पगार आहे, मी आईटीआई इलेक्ट्रॉनिक आहे, सरकारी तेल कंपनी मध्ये स्पर्धा परीक्षा देवुन निवड झाली, ITI नंतर स्पर्धा परीक्षा दया, ONGC,SAIL,IOCL,HPCL,BPCL,RAILWAY अशा अनेक सरकारी कंपन्या मध्ये कमीत कमी ₹35,000 एवढा पगार मिळतो. इलेक्ट्रिशन,फ़िटर,इलेक्ट्रॉनिक ई. २ वर्षा च्या कोर्स ला प्राधान्य दया.

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 Před 2 lety +15

    ITI करण्यापेक्षा डिप्लोमा डिग्री करावी सरळ कारण या कोर्स ला फक्त कोर्स समजला जातो कोणतीही डिग्री समजली जात नाही, किंवा HSC समान ही समजल जात नाही, काही जणांना APPRENTICE सुद्धा मिळत नाही यापेक्षा सरळ एखादी BA BCOM BSC डिग्री घ्यावी, कारण ITI केल्यावरही डिप्लोमा नाही तर डिग्री करावी लागते मग उगाच वर्षे वाया घालवण्यात काय अर्थ, एक वेळ होती ज्यावेळी ITI ला महत्व होते मागणी होती सध्या डिप्लोमा डिग्री केलेल्या मुलांनाही जॉब मिळायला मुश्कील झालेय आणि मग अशी मुले सुरुवातीच्या काही वर्षे सर्व कामे करायला तयार असतात, जे ITI करतात त्यांना एकतर सुरुवातीला चांगला जॉब मिळाला तरच, नाहीतर पुढे जाऊन त्यांनी फील्ड बदललेली असते, मीही एका इंजिनीअरिंग कंपनीत जॉब करतोय मी बरेच इंजिनीअर कमी पगारात काम करताना पाहतोय आणि तसे म्हणाल तर बर्‍याच कंपनी यांमधे बिगर ITI केलेले अकुशल कारागीर काम करतात जसे फिटर turner इलेक्ट्रिशन ......पहिले तर सरकारने जॉब्स किती आहेत व त्यानुसार मागणी पुरवठा करता किती यासाठी एक अचूक साइट बनवली पाहिजे व त्यावर उपलब्ध छोट्या मोठ्या कंपनी नोकरी उपलब्ध माहिती टाकेल. सध्या ITI करायचे असेल तर side by side एखादी डिग्री देखील करावी

  • @kamleshphalne9452
    @kamleshphalne9452 Před 2 lety +26

    पूर्वी लेखी परीक्षा व्हायचा त्यामुळे maximum मुलं नापास व्हयची . पण आता marking ची परीक्षा असते . त्यामुळे खूप लोक पास होतात .

  • @manishmore5006
    @manishmore5006 Před 2 lety +32

    बोल भिडु आपण सध्याच्या परिस्थितीत "नोकरी बेस्ट की व्यावसाय बेस्ट" यावर व्हिडिओ बनवा 🙏

  • @goraksanap8332
    @goraksanap8332 Před 2 lety +45

    मी ही ITI केलाय आणि माज्या पूर्ण BATCH सह महाराष्ट्र भरातून 500 लोक पोलीस दलात HEAD कॉन्स्टेबल पदावर आहोत....... ITI BASIS वर..... PROUD ON ITI

  • @jacksparow1331
    @jacksparow1331 Před 2 lety +13

    ITI करून कोणीही MIDC मध्ये येऊ नका खूप हाल आहेत तात्पुरता पगार मिळतो मुलांना त्यात पण यांचे नाटक वयाची अट पाहिजे ..कमी वयाच्या मुलांनाच ही लोक वापरून घेतात आणि नंतर वय वाढल की घेत नाहीत कुठे तरी WORKSHOP वर 12 ....12 तास काम करावं लागतं...
    त्यामुळे जर परिस्थिती नसेल पुढे शिक्षण करण्याची तर ITI मधील एखादा व्यावसायिक कोर्स करा आणि स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासबंधी प्रयत्न करा.
    कंपनीत काम करून फक्त पोट भरू शकत बाकी काआआआही नाही.
    स्वानुभव...

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 Před 2 lety +49

    कुठलीही पदवी आपली किमान पात्रता असते. आपले प्रयत्न, आवड, जिद्द , गरज आपल्याला घडवते. केलेला कोर्स आपल्याला घडवेल असे नाही मिळालेली संधी सोडू नये. मी यशस्वी iti विद्यार्थी आहे.

  • @jacksparow1331
    @jacksparow1331 Před 2 lety +141

    TATA कंपनीत पण मोठ्या प्रमाणात6 महिन्यांसाठी कामावर घेतात आणि काढुन टाकतात .जी की सर्वात मोठी कंपनी आहे पुणे जिल्ह्यातील.😢

  • @nileshbhajane410
    @nileshbhajane410 Před 2 lety +10

    मित्रांनो ITI अजिबात करू नका.... काहीही किंमत नाही... फुकट आउष्य खर्ची होत आहे आमचा कंपन्यांत..स्वतःचा व्यवसाय सुरू करा कोणताही... .. कंपन्यांना फक्त मजदुर हवा असतो... उगाच डोक्यातला भ्रम काढून टाका रे .. कवडीमोल किंमत आहे ITI वाल्यांना... आम्हाला आता मागेही जाता येत नाहीं आणि पुढेही जाता येत नाही...

  • @ajitgogale5644
    @ajitgogale5644 Před 2 lety +13

    दादा मि iti करून garduatiom कंप्लेट केलं तरी जॉब मात्र एवढा खास् नाही लागला जिंदगी झंड 😁

  • @akshayrayate7489
    @akshayrayate7489 Před 2 lety +42

    पोलीस भरतीचा इतिहास आणि भरतीत होत गेलेले बदल आणि भरती करणार्या मुलांच आयुष्य याबद्दल एक विडीओ बनवा

  • @chetan5682
    @chetan5682 Před 2 lety +14

    मी पण एक iti पूर्ण केला आहे 2013ते2015 या वर्षी नंतर पास झाला नंतर iti तर्फेच जॉब साठी कंपन्या येतात tarde wise start freaser असल्या मुळे salary कमी असते पण तुम्ही तुमचे स्किल दाखवले तर तुमची increment होत जाते तुम्ही जेव्हा iti कराल तेव्हा जास्त करून प्रॅक्टिकल aattend करत जावं कारण कंपनी मध्ये तुम्ही जॉइंट होतात तेव्हा तुम्हाला जे काही असेल ते ऑपरेट करता येईल मी it electronic ha course घेतला होता iti complete झाला नंतर 2yr जॉब केला स्टार्ट पेमेंट 2016 7k hota next 3month nantar 10k next 3month नंतर 15k aani 2018 21k झाला नंतर मी जा company मध्ये होतो तिकडे सगळं शिकून 2019 साली जय महाराष्ट्र करून स्वतचं व्यवसाय सुरू केला आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की मी एक iti चा विद्यार्थी आहे आणि माझा वयवसाय पण सुरळीत चालू आहे माझा स्वतःच एक सोलर इलेक्ट्रिक लायटिंग च shop आहे लायटिंग ची manufacturing होते इलेक्ट्रॉनिक equipment repairing सुधा करतो असा माझा अनुभव आहे आणि नवीन मुला साठी सांगू इच्छितो की मार्केट मध्ये जे tranding वस्तू आहे जे आपण त्याची repair aani maintenance होतील असा trade मध्ये एडमिशन करून घ्यावे जाणे करून तुम्हाला जॉब नाही भेटला तर तुम्ही एक छोटं शोपतरी ओपन करू शकतात

  • @dipaknarote4735
    @dipaknarote4735 Před 2 lety +161

    ITI म्हणजे फुकट चा कामगार ,7000 द्या आणि काम करून घ्या👷🔫

  • @vickychandekar9361
    @vickychandekar9361 Před 2 lety +34

    बरेच जण प्रवेश घेतांना मेकॅनिक मोटार वेहिकल या कोर्स ला कमी समजतात पणं मी असे बरेच उदाहरण पाहिले आहेत ज्यांनी हा कोर्स करून आता ते दर महिना 50-60 हजार कमावतात. फक्त अट एकच आहे ; जे शिकलात ते तुम्हाला प्रविण्याने आल पाहिजे आणि दुकान स्वतःच पाहिजे.

    • @sanjayrasam4035
      @sanjayrasam4035 Před 2 lety +2

      आता जे शहाण्याने motor mechanic course करू नये कारण आता electric vehicle चा जमाना सुरू होतो आहे त्यात mechanic चि किंमत झिरो त्यात BLDC motor आणि battery बाकी इंजिन, गियर box काही नाही मग मेकॅनिक काय करणार.

    • @sanjayrasam4035
      @sanjayrasam4035 Před 2 lety +4

      आता bs 6 सुरू आहे ह्यात पूर्ण electronics आहे नुसत मेकॅनिक नाही तर त्याला electro mechanic म्हणतात थोडक्यात मेकॅनिक आणि auto electrician एकच तुम्हाला multi meter वापरता यायला हवा सगळे sensors आहेत आणि ते repair होत नाही use and throw त्यामुळे शहाण्याने या नादाला ला गू नये.

    • @vickychandekar9361
      @vickychandekar9361 Před 2 lety +9

      @@sanjayrasam4035 तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पणं मला सांगा आपण जेव्हा गाडी सर्व्हिस ला घेऊन जातो तेव्हा काय करतो ? ड्रम ब्रेक, डिस्क ब्रेक, वायरिंग प्रॉब्लेम, चैन स्प्रावकेट प्रॉब्लेम, रियर आणि फ्रंट suspension प्रॉब्लेम, ब्रेक केबल, मीटर केबल, आणि असे अनेक काम आहेत जे आपण रेगुलरली गाडी मध्ये करत असतो. आणि ते इलेक्ट्रिक गाडी असो किंवा आयसी इंजिन वाली प्रत्येक गाडी मध्ये करावीच लागतात. प्रत्येक वेळेस काय आपण फक्त इंजिन च काम करतो का ?? हे सगळं काम करण्यासाठी मेकॅनिक लागणारच की.
      आणि अजून दहा वर्ष नक्की लागतील आपल्याकडे पूर्ण पने इलेक्ट्रिक गाड्यांचं युग यायला. पण तोपर्यंत तर आपल्याला इंजिन वाल्या गाड्यांचं घ्याव्या लागतील ना आणि अजून दहा वर्ष घेत असलेल्या गाड्या पुढे वीस वर्ष रोड वर धावतील. मग त्याचं काम करायला का होईना मेकॅनिक पाहिजेच ना.

    • @vickychandekar9361
      @vickychandekar9361 Před 2 lety

      आणि उलट इंजिन वाल्या गाड्या फक्त ब्रँडेड कंपन्याच बनवतात पणं इलेक्ट्रिक गाड्या खूप साऱ्या लोकल कंपन्या बनवणार आहेत, आणि जेवढ्या विविध प्रकारच्या गाड्या तेवढीच जास्त विविध स्पेअर पार्ट मध्ये ग्राहकांची लूट होणार. आणि ती लूट करणार कोण मेकॅनिकच ना. म्हणून माज अस म्हणणं आहे की या क्षेत्रात पैसे कमवायचा खूप स्कोप आहे. आणि तो राहणार.

    • @vitthalrmane4785
      @vitthalrmane4785 Před 2 lety

      Saglech narenra modinay hot😁

  • @hiatharv8996
    @hiatharv8996 Před 2 lety +19

    Bolbhidu खूप खूप नमस्कार
    मागील 6 महिन्या पासून तुम्ही अतिशय सुंदर Concept बद्दल Videos बनवत आहात
    त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
    Bolbhidu हाच एक एकमेव Channel जो राजकारण, बॉंगे,नवनीत राणा,किरीट सोमय्या बद्दल न बोलता समाजाच्या विकासा बद्दल बोलतात।।
    Bolbhidu**

  • @plpatil2024
    @plpatil2024 Před rokem +5

    ITI अवश्य करा. आता महाराष्ट्रात परप्रांतीय येतात, त्यांना रोजगार दिला जातो. त्यांना प्राधान्य का मिळते याचा विचार करा. Iti चा कुठलाही तुम्हाला आवडेल तो कोर्स पूर्ण करा. दोन तीन वर्षे अनुभव घ्या. स्वतःचा धंदा काढा. खूप कमाई आहे. मी 35 वर्षे उद्योग क्षेत्रात आहे. गेल्या पंधरा वर्षांत बँकेचे कर्ज मिळणे सोपे झाले आहे. त्यामुळे उद्योगात नविन व्यावसायिक खूप आले आहेत आणि 95% जण यशस्वी झाले आहेत. पिंपरी चिंचवड उद्योग नगरीत iti करून उद्योग काढून श्रीमंत झालेले खूप जण माझ्या माहितीत आहेत. आता कष्ट तर करावेच लागतील. कष्टाला लक्ष्मी माळ घालते. कुणाचेही ऐकू नका. तुम्ही iti करा. आयुष्यभर उपाशी मरणार नाही, याची खात्री बाळगा. तुमच्या कष्ट व प्रामाणिक प्रयत्न यामुळे तुम्ही हमखास विजयी, सुखी होणार यात वाद नाही. फिटर, वेल्डर, टर्नर, machinisht, grinder, vmc CNC operator हे कोर्स पूर्ण करा. स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल. हात काळे करण्याची तयारी ठेवा. यश नक्की आहे.

  • @ethenhunt1654
    @ethenhunt1654 Před 2 lety +13

    Iti kara government che form bhara ani job ghya khup scope ahee..🔥

  • @rushikeshladke7634
    @rushikeshladke7634 Před 2 lety +17

    तुम्ही आयटीआय करा किंवा इंजिनीरिंग करा किंवा ग्रॅज्युएशन करा कंपनीत सगळ्यांचा पगार एकच असतो तोही सहा महिन्यांच्या पिरेड वर

  • @rohittathe84
    @rohittathe84 Před 2 lety +20

    हि बात खरी आहे. कंपनीमध्ये काम खूप करुन घेतात पण पगार खूप कमी देतात

  • @Tejaspatil465
    @Tejaspatil465 Před rokem +2

    हे अस सांगणारे सर्व बेरोजगार असतात यानी आईटीआई मधे असताना अभ्यास केला नाही म्हणून याना मार्क्स जस्त पडले नाही, व यान्या companit याना 10 ते 15 हजारच भेटतील करण यनु अभ्यास केला असता तर याना ITI वरच 60 ते 70 हजार बेसिक पर्यंत पगार असतो म्हणून अशे लोक दूसरांची हिम्मत खसवता याना बड़ी पडू नका अभ्यास करा 🙏🏻

  • @ayyazmujawar9839
    @ayyazmujawar9839 Před 2 lety +11

    खूप चांगला विडिओ आहे. 👍👍👍👍
    मी आय टी आय केलो आहे. एअर कंडिशन मध्ये. गेली 10 वर्षे अबू धाबी येथे आहे.
    From Abudhabi

    • @syedsaheb850
      @syedsaheb850 Před 2 lety

      Electrician ki jagah hai kya waha?

    • @ayyazmujawar9839
      @ayyazmujawar9839 Před 2 lety

      @@syedsaheb850 इधर तो हजारो vacancies है भाई. मुंबई मे जाके इंटरव्हिव देदो. जॉब मिलेगा.

    • @Welding-work516
      @Welding-work516 Před 2 lety

      Kuthe jaun bhetayach mumbai madhe ...maja Weldar tred zhala aahe

    • @ayyazmujawar9839
      @ayyazmujawar9839 Před 2 lety

      @@Welding-work516 गूगल मध्ये search करा. खूप ऑफिस चे पत्ते मिळतील.

    • @Balajimarde
      @Balajimarde Před 2 lety

      Bhai Mera MRAC trade chalu hai abhi 2nd year hai

  • @user-jq9lr7sp9k
    @user-jq9lr7sp9k Před rokem +12

    मी electrician ला admission घेतलय. पण एक महिना झाला अजून आम्हाला शिक्षक नाहीय शिकवायला .फक्त हजेरी लावली जाते. आम्ही बरेच जण परगावि लांब जाऊन रूम घेऊन एवढा खर्च करून राहतोय. पण आम्हाला कोण शिकवतच नाही.

    • @Shubhamautomobile499
      @Shubhamautomobile499 Před 10 měsíci

      😂

    • @prashantshinde8972
      @prashantshinde8972 Před 2 měsíci

      कॉलेज मध्ये प्रेस वाले बोलवा त्यानी खूप फरक पडतो

    • @beinghuman4427
      @beinghuman4427 Před měsícem

      शेवटी कोर्स संपल्यावर सर्टिफिकेट मिळणार ना

    • @collecterpotta121
      @collecterpotta121 Před 19 dny

      आमचं पण तुमच्या सारखंच आहे

  • @pranavdaphale6577
    @pranavdaphale6577 Před 2 lety +17

    बिन्दास्त करा,,,,स्वतःच स्किल वाढावा ,,,,,,,किमान उपाशी मारणार नाही,,,, फक्त 3 वर्षात पायावर उभा राहता येते नं तर इतर हवे ते शिक्षण घ्या,,,मग वेगाने पळा,,,,

  • @omkar_patil591
    @omkar_patil591 Před rokem +2

    एक गोष्ट सांगतो, भाऊ, आता तुम्हाला प्रत्येक कोर्सची मुलं बसलेली दिसतात. त्यामुळे जास्त पगाराच्या नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा तुम्हाला जे आवडते ते करायला सुरुवात करणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते.

  • @pranavbobde97
    @pranavbobde97 Před 2 lety +4

    ITI केल्यावर skilled पर्सन म्हणून ओडखले पाहिजे पण इथे तर नुसता मजूर च समजतात ..दुसऱ्या कोणत्या च क्षेत्रात संधी मिळत नाही

  • @dipaksanap
    @dipaksanap Před 2 lety +32

    दादा तुम्ही BA in journalism and mass communications or multimedia यावर एक व्हिडिओ बनवा
    हे करण्याचा फायदा सांगा

  • @premkankal9008
    @premkankal9008 Před 2 lety +36

    मी ITI केला आहे.... काय नाही जिंदगी झंड झाली 3वर्ष वाया गेले आयुष्यातील (2 वर्षाचा ट्रेड.. ऑगस्ट मध्ये सत्र संपते नंतर कुठं admission मिळत नाही,,, मग पुढच्या वर्षी जून महिन्याची वाट पाहावी लागते).... मास्तर पण येडझवे होते तिथले त्यांनाच काय यायचं नाही सगळा टाईमपास आहे
    मी 2014ते 2016 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक केला

  • @Wheels4feel
    @Wheels4feel Před 2 lety +26

    Iti असा करावा की त्याचा नोकरी व्यतिरिक्त व्यवसाय करता येईल असा ट्रेड घेणं गरजेचं...

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur Před 2 lety +2

      बरोबर

    • @sanketpatil461
      @sanketpatil461 Před 2 lety +4

      Barobar aahe tumacha.....pan aj var iti la pan vacancy full asaty ......jyla percentage jasat tylach ghetala jata

    • @Ramchandra_9021
      @Ramchandra_9021 Před 2 lety +1

      आता ऐका मि हाच विचार करून food processing हा ट्रेड घेतला होता
      admation घेतलं त्याच्या नंतर
      corona चालू झाला
      डायरेकट पेपर ला गेलो
      आता काय करायचं 😭🥲🥲🥲

    • @Wheels4feel
      @Wheels4feel Před 2 lety +3

      @@Ramchandra_9021 मी iti करून फक्त 4 वर्ष कंपनी मदे काम केलं त्यानंतर त्या iti चा काडीमात्र उपयोग झाला नाही मला

    • @Ramchandra_9021
      @Ramchandra_9021 Před 2 lety +5

      @@Wheels4feel हो भावा काय सांगणार आता 10000 हजार वर जीव jaipatyant कामं करतोय कंपनीत

  • @SAdrk
    @SAdrk Před 2 lety +8

    Real imformation👍कष्ट करण्याची तयारी पाहिजे.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Před 2 lety +7

    आपण कोणत्या शाखेत प्रवेश करतो हा नसून तो आपण किती आत्मीयता आणि कष्ट घेता या वर च भवितव्य अवलंबून असते

  • @vishaldoiphode2785
    @vishaldoiphode2785 Před 2 lety +58

    नमस्कार सर
    सध्या वाचन संस्कृती कमी होत आहे, 4 वर्षांपूर्वी jio इंटरनेट आले आणि त्यात भर पडल्यामुळे तरुणांमध्ये वाचनाबद्दल अनास्था निर्माण झाली
    वाचनाची आवड - या विषयावर एक video बनवावा
    ही अपेक्षा

    • @saliluddhav4859
      @saliluddhav4859 Před 2 lety +2

      Khup chhan vichar

    • @dipeshpatil978
      @dipeshpatil978 Před 2 lety +1

      व्यासंग नाहीसा होत चालला आहे

  • @gauravkhairnar5798
    @gauravkhairnar5798 Před rokem +2

    Iti म्हणजे कंपन्यांना कमी पगारात राबवून घेण्यासाठी मिळणारे कामगार आणी कामाचा लोड संपला की काढून टाकण्यात येते

  • @nishantbhoir7485
    @nishantbhoir7485 Před 2 lety +1

    मित्रांनो, ज्यांनी केला आहे, त्यानी अगोदर १ वर्ष काम करा.त्यानंतर त्या ट्रेड संबंधित व्यवसाय करा. कारण नोकरी मध्ये खुप घासावी लागते.
    ज्यांनी ITI करायचा ठरवलं आहे, त्यानी अजिबात करू नये. त्याऐवजी पदवीचं शिक्षण पूर्ण करा आणि साइड बाय साईड वडपावची गाडी टाका.

  • @govindaunawane8812
    @govindaunawane8812 Před 2 lety +31

    Up वाले भैय्या लोग कुठल्याही प्रशिक्षणा शिवाय या नोकऱ्या कमी पगारात करतात कुठलीही तक्रार नाही ना वेळ,ना पैसा, अगदी गुलामासारखे काम करतात. या क्षेत्राचे वाटोळे kele

    • @Sunilkadam12370
      @Sunilkadam12370 Před 2 lety +1

      हो भाऊ आपण आयटीआयचा कोर्स करतो आणि भैय्या लोकांना बिना कोर्सचे चे कंपनी घेतात मी अनुभवलेला अनुभव आहे

    • @kaustubhsangale9027
      @kaustubhsangale9027 Před rokem +1

      @@Sunilkadam12370 ho bhai majya company madhe bina iti che te 10 varsh kam karun permanent zale ahet

    • @chandraprakashtiwari9658
      @chandraprakashtiwari9658 Před rokem

      तु एडा आहे

  • @avdinformation9706
    @avdinformation9706 Před rokem +9

    ITI + competitive exams..... 100% gov jab hou shukto... Aasa maza vyaktik aanubhav aahe.

    • @girishgnile4893
      @girishgnile4893 Před 6 měsíci

      Compilation iti madhe jast ahe ki 12th vr government exam la

  • @balramjadhav6717
    @balramjadhav6717 Před 2 lety +145

    भावा सरळ सांग... ITI करू नका.... काय अवस्था असते पर्मनंट नाही केले कि त्यांना च माहित... कंपनी काम करते जे शिकायचे वय असते त्यात खूप कष्ट करतो.... वय वाया घालवून बसतो..... एक खूप शिका... तरी नाही तर शिकू तरी नका... ITI.. BA. किंवा 12... करुन 7000 ते 12000 पगार मिळतो... ते ही मुंबई पुणे सिटी तच..... किती तरी मुलं असे ITI करुन घरी बसलेत.....ITI केला तर जिथं mass production चालते तिथे काम नका करू.. जिथे शिकायला भेटेल आणि आपण आपल्या ट्रेड.. Use करुंन बजनेस टाकू शकतोस असे कंपनी बगा.....आपण 1रुपये च काम करू तेव्हा आपल्यला 25 पैसे भेटतात... कंपनी त... मग विचार करा.. आपल्याला किती पगार देतात आपण त्यांच्या साठी... किती घाम गाळून कष्ट करतो.... जेवयला तर 30 मिनिट असतात
    त्यात जायला 10 मिनिट याला 10मिनिट आणि जेवायला 10 मिनिट... असा वेळ असतो कधी कधी हात न धुता जेवावे लागते.. कॅन्टीन ला पण लाईन असते च ना.... खूप विचार करा.. शिका.. जास्त शिका.. कोणचे ऐकून सांगून ITI नका करू.. शिकाय च्या वायात.. शिका.. डिग्री घ्या
    मेडिकल फिल्ड घ्या.. बजनेस स्किल घ्या पण......

    • @ankushghagare07
      @ankushghagare07 Před 2 lety +3

      Barobar bol la tu bhava

    • @lakhanshinde8194
      @lakhanshinde8194 Před 2 lety +8

      अत्यंत खरीच परिसथिती आहे.....

    • @Ramchandra_9021
      @Ramchandra_9021 Před 2 lety +1

      अगदी खरं बोलतोय भावा मनातलं बोललास
      मि सुद्धा iti केलाय ,
      काय नाही बग सगळं वर्ष कोरोनात् गेलं शिकायला काहीच भेटलं नाही iti झाला कि aprintinship करावी लागते म्हणून एका company त् कामाला लागलोय 26 दिवस भरले तर 10,000 पगार मिळतो
      वरून एक वर्ष pf नाही
      खूप कामं करून घेतात शिकाय् च्या वयात अवघड आहे भावा तुला काय सांगू आता 😭💯

    • @vijaydhokane1686
      @vijaydhokane1686 Před 2 lety +4

      एकदम सत्य

    • @rudrad.2203
      @rudrad.2203 Před 2 lety +5

      ITI shikatanaa paise lubadnare teacher bharpur asatat Vaat lavali, Robot pramane Companyit kaame ghetaat. Manus mhanun Kimat naahi.

  • @borse104
    @borse104 Před 5 měsíci +1

    भावांनो ITI करण्यापेक्षा बिगारी कामाला जा...कमीत कमीत...500Rs रोज भेटतो कालांतराने बिल्डर व्हाल.... पण...इथ.... 60 Rs मेस चा डब्बा खाऊन 10000 कमवून जीवाचे हाल करण्यापेक्ष्या मस्त पैकी बिगारी कामाला... जावा.......🙏🏻

  • @pranavsinghparmar6929
    @pranavsinghparmar6929 Před 2 lety +20

    भिडू,
    पेट्रोल पम्प ची मालकी कशी मिळते आणि मालकाला नफा कसा मिळत असतो??
    हा विषय घ्या न.बऱ्याच लोकांना याबाबत क्लिअर माहिती नाही.हा विषय घेतला तर माझं नाव पण बोला विडिओ मध्ये..🙏

  • @AG__123
    @AG__123 Před rokem +3

    मला तर इंटरेस्ट पण नाही ये पण घरच्या मूळ बळ बळ जात आहे.💔😔 पण भविष्यात मी कोणती हि नोकरी नाही करणार हे तर नक्की

  • @ashaytayde7893
    @ashaytayde7893 Před 2 lety +1

    ITI केल्या नंतर govt ani private क्षेत्रात जॉब आहेत . त्यात ISRO, DAE NAVHAL DOCKYARD, RAILWAY, DRDO, CIL, ONGC, IOCL Etc. मधे vacancy येतात पण कमी संख्येने असतात. Govt ला salary चांगली असते पण exam ला compeition भरपूर राहते. Private ला salary 15-20 हजार मिळते.

  • @kumarmohite2741
    @kumarmohite2741 Před 2 lety +1

    ITI la प्रवेश घेणार असाल तर हे lakasht घेणे
    1. ITI हे कुशल कामगार तयार करणे साठी भारत सरकार चा उपक्रम आहे. त्यामुळे किमान 8 तास आयुष्य भर kasht करायचे आहे है समजून प्रवेश घेणे. ITI सुध्दा company सारखेच 8 तास चालतात
    2. कमी वेळात शिकुन रोजगार मिळवून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे(गरीब व कष्टाळू मुलांना)म्हणून दहावी नंतर लगेच प्रवेश घ्या. (बारावी साठी 2 वर्षे जातील )
    3. शासकीय ITI मधे Ch प्रवेश घ्या .
    4. आपली शरीर प्रकृती,कामाची मागणी,पाहुन ट्रेड chi निवड करा
    5..

    • @kumarmohite2741
      @kumarmohite2741 Před 2 lety +1

      5. Kam कारणासाठी Company निवड करताना
      जी company येणारा 5 वर्षात प्रगती करेल अणि तेथे तुम्च्या ट्रेड चेच काम तुम्हाला लावत असतिल तरच join करा (हंगामी,)

  • @kaspcmc5449
    @kaspcmc5449 Před 2 lety +6

    सर आपण आयटीआय बद्दल जी वस्तुस्थिती सांगितली आहे ती अगदी तंतोतंत खरी आहे. आज आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऍपरेटिन्सशिपची परीक्षा उत्तीर्ण होणे खूप महत्त्वाचे असते. परंतु, आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी किमान 50% विद्यार्थी हे परिस्थितीअभावी किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक पाठबळाची आवश्यकता असल्याने ऍपरेटिन्सशिप करत नाहीत म्हणजेच ऍपरेटिन्सशिपची परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत किंवा त्या परीक्षेला ते बसत नाहीत. कारण ऍपरेटिन्सशिप करत असताना मिळणारे विद्यावेतन (स्टायपेंड) हे 5-6 हजाराच्या आसपास असते तर तुलनेने कंपनीत काम करणाऱ्यांना 10-12 हजाराच्या आसपास वेतन मिळते. एखादा विद्यार्थी आयटीआय उत्तीर्ण आहे परंतु ऍपरेटिन्सशिप उत्तीर्ण नसेल तर त्याच्या आयटीआय उत्तीर्ण असण्याचा त्याला म्हणावा तेवढा काहीच फायदा होत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
    आता आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जेव्हा कंपनीत काम करतात तेव्हा त्यांना 6-6 महिन्यांसाठी नियुक्ती दिली जाते. 6 महिने पूर्ण झाल्यानंतर किमान 1 दिवसाचा व कमाल 6 महिन्याचा ब्रेक देऊन पुन्हा 6 महिन्यांसाठी नियुक्ती केली जात असते. कंपनीत एक ना एक दिवस पर्मनंट होऊ या आशेने तो जीव तोडून काम करत असतो. परंतु, तो शेवटपर्यंत कंपनीत पर्मनंट काही होत नाही किंवा त्याला कंपनीकडून पर्मनंट केले जात नाही. अशा प्रकारे त्यांना त्यांच्या वयाची 30 वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक 6-6 महिन्यांसाठी नियुक्ती केली जाते. वयाची 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याला कंपनीत नियुक्त करण्याचे कंपनीकडून टाळले जाते किंवा तोपर्यंत लग्न झाल्याने खर्च वाढलेला असतो व तुटपुंज्या वेतनात त्याचे काही भागत नाही. त्यामुळे, तो स्वतः होऊन कंपनीला रामराम ठोकतो व गावाकडे येऊन शेती असल्यास शेती करण्याचा प्रयत्न करतो किंवा नसल्यास, वेठबिगार म्हणून पडेल ते काम करून गुजराण करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी पर्याय म्हणून शासनाने आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अँप्रेटीसशिप करण्यासाठी विद्यावेतन (स्टायपेंड) मध्ये भरघोस वाढ करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, कंत्राटी का होईना पण आयुष्यभर म्हणजे वयाच्या किमान 60 वर्षापर्यंत तरी किमान वेतनासह कंपनीत काम करण्याची हमी कंपनीने घेण्यासाठी शासनाने कायदा केला पाहिजे व त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. अंमलबजावणी न करणाऱ्या कंपनीच्या संचालक तथा मालकांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे.
    दुसरीकडे आयटीआय उत्तीर्ण हे इंग्रजी व गणितात थोडेसे कच्चे असल्याने अशा विद्यार्थ्यांना मुळातच शासकीय नोकरी मिळण्याचे प्रमाण हे अत्यंत कमी असल्याने व त्यातच अँप्रेटिसशिप उत्तीर्ण नसल्याने व शासकिय नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण न झाल्याने शासकीय नोकरी मिळण्याचा मार्गही बंद झालेला असतो.
    तिसरीकडे आयटीआय मध्ये काही कोर्सेस असे आहेत की जे उत्तीर्ण होऊन स्वतःचा व्यवसाय, उद्योगधंदा जरी सुरू केला तरी एखाद्या आयएएस अधिकाऱ्यापेक्षाही अधिक उत्त्पन्न निश्चितपणे मिळू शकते. पण त्यासाठी सुरुवातीपासूनच तशा प्रकारचे ध्येय बाळगणे व मानसिकता तयार करणे अत्यंत आवश्यक व महत्त्वाचे असते.

  • @vassumhalsekar8985
    @vassumhalsekar8985 Před 2 lety +5

    Really sir I am Vassu from Goa ur bol bhedu giving nice information.. keep sharing..

  • @bhurkerajendra
    @bhurkerajendra Před 2 lety +1

    खूपच छान माहिती सांगितलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @yashwantkhamkar8638
    @yashwantkhamkar8638 Před 2 lety

    Bol bhidu la dhanyawad ase video mulana margdarshak aahet

  • @prafullkodag3127
    @prafullkodag3127 Před rokem +7

    कुठलेही छेत्र चांगले किंवा वाईट नसते आजकाल B. E. करणारे सुध्हा रडतातच माझे कितेक ITI मित्र आज ऑस्ट्रेलिया मधे डॉलर मधे कमवतात फक्त एकदा छेत्र निवडलं की त्याच्यकडे पाठ न फिरवता खोलवर अभ्यास करून उत्तमात उत्तम काय करू शकतो यावर लक्ष द्यायला हवे मी तर म्हणतो आजकाल iti वाल्यांचेच दिवस आहेत कारण प्रॅक्टीकली गोष्टी वर काम करण्याची धमक iti वाल्यान मधे असते.....

  • @geetanjalim4132
    @geetanjalim4132 Před 2 lety +6

    माझा ITI झालाय आणी ते पण govt कॉलेज ला उस्मानाबाद ला खूप मोठ कॉलज आहे आणी खूप सारे ट्रेड आहेत. पण प्रत्येकच् ट्रेड ला स्कोप नाही. मला वाटत COPA तर कोणीच करू नये अजिबात स्कोप नाही बाकी मोटार मक्यानिक,डिझेल मक्यानिक,इलेक्त्रियेशन आणी असे बरेच ट्रेड आहेत त्यांना मस्त स्कोप आहे माला तर पश्चताप होत तर copa करून उगाच 2 वर्ष वया गेल माझे 1 वर्ष कॉलेज आणी नंतर 1 वर्ष apryantiship मध्ये COPA मध्ये सर्व काम computer वर सर्व असत पण आम्ही जेवा कॉलेज कडूनच् apryantiship साठी गेलो तर तिथं अजिबात कॉम्पुटर चा काही संबंध नव्हता आमचा.

    • @shubhamshinde5873
      @shubhamshinde5873 Před 2 lety

      मोटार मक्यानिक ला स्कोप आहे....ऐकून मनाला बर वाटल.. 😁 धन्यवाद...

    • @geetanjalim4132
      @geetanjalim4132 Před 2 lety +1

      @@shubhamshinde5873 माझे काही फ्रेंड आहेत मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये 50, 55 हजार पेमेंट घेतात आणी काही बस डेपो मध्ये त्यांना पण 30, 35 पेमेंट आहे

    • @shubhamshinde5873
      @shubhamshinde5873 Před 2 lety

      @@geetanjalim4132 हे ऐकून अजून आनंद मिळाला.... 😁
      मेकॅनिक मोटार वेहिकल ट्रेड ला आहे....1st year ला.... ❤️

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur Před 2 lety

      @@shubhamshinde5873 गँरेज टाक किंवा midc चाकण.

    • @kannadghat
      @kannadghat Před 2 měsíci

      तुमची apprandship कुठे झाली aahe

  • @surajjadhav5783
    @surajjadhav5783 Před 2 lety +1

    भावानो iti करू नका कारण मी केला आहे माझ्या संगे असणारे permanent लोकांना 70,000 पगार अन् आम्हाला 11,000 पगार पडतो पण काम आम्ही दोघेही सारखेच करतो ,त्या पेक्षा डिग्री करा,आपला छोटासा व्यवसाय टाका
    कंपनी permanent करत नाही आणि आशेवर बसू नका कारण त्यांच्या 70,000 तुमच्यासारखे 7 पोर काम करतात त्यामुळे कंपनी permanent करत नाही 🙏🙏

  • @yoginimali5215
    @yoginimali5215 Před 2 lety +3

    मुलींसाठी *Basic Cosmetologi*हा ट्रेड उत्तम आहे!कमी गुंतवणूकीत व्यवसाय घरच्या घरी सुरु करता येतो!😍

  • @kirannalge2911
    @kirannalge2911 Před rokem +6

    दादा आता च्या 10th च्या मुलांनी 10th नंतर काय केलं पाहिजे . ITI करून रेल्वे मधे नोकरी मिळू शकते का. ह्या विषयावर 1 व्हिडिओ....

  • @DJsonumonu07
    @DJsonumonu07 Před 2 lety +41

    अजिबात रेकॅमेण्ट करू नका दादा पोरांना हा iti करण्या साठी खूप पस्तावलो आहे आम्ही हा कोर्स करून
    खूप वेळ वाया गेला आमचा
    Iti करायचा असेल तर फक्त मराठी आणि इंग्लिश स्टेनो ग्राफर चा करा बाकी काही करू नका आणि iti चा नाद सोडा त्यापेक्ष 4,5 वर्ष पोलीस भर्ती केलेली बरी

    • @akshaynaikactingkida5548
      @akshaynaikactingkida5548 Před 2 lety +1

      Barobar. Maze suddha 4 varsh vaya gele

    • @amjadpathan3954
      @amjadpathan3954 Před 2 lety +1

      Best idea bhao stenographer... Jejcha gandit dum toch BAJIRAO shingam

    • @mayurrakhonde.9701
      @mayurrakhonde.9701 Před rokem +1

      ITI Kara khup important course aahe . Today iti fitter chaya jaga Indian railways DRDO ISRO madye aahe.

    • @omwatekar6576
      @omwatekar6576 Před rokem

      Third class iti

    • @omwatekar6576
      @omwatekar6576 Před rokem

      Iti private college fees ahe 60000 hazar milte kai 8000 permonth

  • @User15106
    @User15106 Před 2 lety +3

    काही पण शिका काही पण करा पण दुसऱ्याच अनुकरण करायला जावु नका स्वत चे passion ठेवा मग ते कोणतेही काम असो दुसऱ्या चे ऐकून करू नका मग तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही स्वत च्या निर्णयावर ठाम रहा नकारात्मक विचारांपासून लांब रहा

  • @AvadhutPharakate
    @AvadhutPharakate Před 2 lety +1

    दादा मी स्वतः आयटीआय मध्ये 2010-11 साली कोपा या ट्रेडला अॅडमीशन घेतल होत त्यानंतर 2011ला ट्रेंड पूर्ण झाला.त्यानंतर आॅक्टोंबर 2011 ते आॅक्टोंबर 2012 या कालावधीत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ शिरगाव या ठिकाणी एक वर्षाची अप्रेंटिशिप केली तिथे मी तीन महिन्यात मॅकेनिकल विभागामध्ये टायपिंगची कामे करून घेतली त्यानंतर काँम्प्युटर विभागात काम करायची इच्छा होती परंतु मी मार्केटिंग विभागात प्रॉडक्ट ऑर्डर कशी घ्यायची ती गोकुळ शॉपीमध्ये कशी पाठवायची हे तीन महिन्यात शिकून घेतल त्यानंतर माझी गोकुळ शॉपी कोल्हापूर येथे तीन महिन्यासाठी बदली झाली. त्यानंतर गोकुळ दुध संघातून आलेला माल दुकानदार बेकरी यांच्याकडे कसा पोहोचवायचा हे मी गोकुळ शॉपीच्या गाडीतून जावून प्रत्येक दुकानदारांपर्यंत माल पोहोचवत होतो.त्यानंतर त्या प्रॉडक्टबद्दल समस्या काय आहेत हे मी शिकुन घेतल मग तीन महिन्यानंतर माझी बदली ट्रकशिट विभागामध्ये झाली. तिथे ट्रकशिट क्रेटमेळ दुध डेअरीची ऑर्डर कशी पास करायची हे शिकुन घेतल.त्यानंतर ट्रकशिट कोणत्या विभागात जमा करायच? चिलिंग सेंटरमधुन आलेले फॉर्म कसे मिळवायचे ते कुणाकडे द्यायचे असतात हे त्यातून मी शिकत गेलो. हे सर्व झाल्यानंतर अजुन पुन्हा गोकुळ दुध संघात पुन्हा काम कराव अशी इच्छा होती परंतु मला केलेल्या कामाच अप्रेंटिशिपच सर्टिफिकेट मिळाल.तसेच ट्रकशिट विभागामध्ये माझा सत्कार झाला.त्यानंतर मी गोकुळ दुध संघातून भावनिक निरोप देऊन बाहेर पडलो. तसेच 2013 नंतर पुन्हा गोकुळ दुध संघात रोजंदारी म्हणून मला प्रिपॅक विभागामध्ये सहा महिने काम केले त्यानंतर मी रोजंदारी कामगार म्हणून प्रिपॅक विभागामध्ये काम करण मला आवडत नव्हत त्यामुळे मी संघातुन कायमस्वरूपी बाहेर पडलो.हा असा अनुभव मी शेअर करतो कारण अस म्हणतात काँम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रॅमिंग
    असिस्टंट केल्यानंतर जाॅब भेटत नाही.अस म्हणतात तुम्ही स्वतःच आॅनलाईन सर्विसेस शाॅपी टाकून स्वतःच्या नावाचा बोर्ड लावून कामे घेऊ शकता हे मी एक वर्ष युट्यूब चॅनेलवरील वोटिंग कार्ड पॅनकार्ड आधार कार्ड अशी बरीच कामे तुम्ही करू शकता तुमच कौशल्य सिद्ध करू शकता एवढंच सांगु इच्छितो. माझ स्वतःच Avadhut Pharakate युट्यूब चॅनेल आहे त्यामध्ये नवनवीन व्हिडिओ अपलोड केले आहेत. ते नक्की बघा 🙏🙏🙏🙏.

  • @rushikeshghorpade1846
    @rushikeshghorpade1846 Před 2 lety +7

    Getting a job through ITI is like gambling because the chances are very low and even if you get it you will not get the salary you want.

  • @Akshay4723
    @Akshay4723 Před 2 lety +4

    Video बद्दल धन्यवाद दादा !
    मी स्वतः ITI in Mechanic Vehicle हा 2 वर्षाचा course केलेला आहे 2012- 2014 मध्ये . सुरुवातीस सगळं छान वाटते तसंच जसे बाकी Course ला Admission घेऊन , पण जसे जसे पुढे जातो तेव्हा Course चे रंग माहिती होतात ,असो हे सगळ्यात च असतात.
    नुसतं ITI course complete करून काही मिळत , course नंतर 1-2years ची Apprenticeship करणे जरुरी जर तुम्हला समोर जाऊन career करण्याचं विचार आहे.
    (मी स्वतः ITI झाल्या नंतर Tata Motors Service Station येते कामावर होतो जेमतेम 5000-6000 मिळत होते महिना)
    आणि ह्याच वेळेस मी निश्चय केला की काय feild मध्ये Job करून settlement नाही.
    आणि तुम्ही काही points miss out केलेत ITI ला 2 yrsTechnical Course (Fitter/Motor Mechanic/Electrician,etc) करून तुम्ही पुढे Polytechnic ला Mechnical/Eletronics, etc थेट 2year ला admission घेऊ शकता आणि पुढे Polytechnic करून Engineering ला सुद्धा 2year admission घेऊ शकता.
    (मी स्वतः ITI - Apprenticeship - Polytechnic - Engineering करून मोठ्या कंपनी मध्ये Software Engineer आहे)
    मूळात सांगायचं म्हणजे हेच की , जे कमी percentage मुळे अथवा कुठल्या कारणाने ITI ला admission घेतली तर Career फक्त स्वतःच Shop / MIDC ला मजूर म्हणून नाही , तर समोर करण्यासाठी साठी options आहेत.

    • @DipakGambhire2910
      @DipakGambhire2910 Před 2 lety

      Electrician फायद्याचा आहे का

    • @Akshay4723
      @Akshay4723 Před 2 lety +1

      @@DipakGambhire2910 हो फायदेशीर आहे पण समोर atleast Diploma करणे गरजेचे आहेत direct 2nd year ला admission मिळणार

    • @krishna_0777
      @krishna_0777 Před rokem

      Dhanyawad

    • @kaustubhsangale9027
      @kaustubhsangale9027 Před rokem

      @@Akshay4723 dada mi fitter trade kela ahe pn mla tyach company madhe future disat nahi changl tr diploma electrical karaycha vichar ahe age 21 ahe

  • @pravin8283
    @pravin8283 Před rokem +2

    कमी वेळे मध्ये नोकरीची अत्यंत आवश्यक असेल तर iti skill शिवाय पर्याय नाही..please do iti..now in miltry to private everywhete only iti..

  • @vijaysuryawanshi5717
    @vijaysuryawanshi5717 Před 2 lety +31

    कृपया कोणीही iti ला addmission टाकू नका
    जिंदगी झंड होती

    • @rameshwarpunde8742
      @rameshwarpunde8742 Před 2 lety +1

      का बर

    • @vijaysuryawanshi5717
      @vijaysuryawanshi5717 Před 2 lety +1

      @@rameshwarpunde8742 karun baga

    • @rameshwarpunde8742
      @rameshwarpunde8742 Před 2 lety +8

      केला पण आहे आणि सरकारी नौकरी पण लागली आहे.....सर्वसामान्य मुलांसाठी खूप छान आहे

    • @vijaysuryawanshi5717
      @vijaysuryawanshi5717 Před 2 lety +4

      @@rameshwarpunde8742 मला काय म्हणायचं आहे की आताच्या काळात iti करुन काय उपयोग नाही jobs सर्व contracta base aahet company पर्मनंट करुन घेत नाही फक्त वापर करुन घेतात

    • @anantyogi7659
      @anantyogi7659 Před 2 lety +2

      @@vijaysuryawanshi5717 अगदी बरोबर

  • @Cnt390
    @Cnt390 Před 2 lety +9

    One of the best course. Me ITI madhun Computer Hardware Networking keli aahe 2008 madhe. Me B.A graduate aahe.
    B.E karun kahi faida nahi. ITI madhe khup scope aahe. Neval Dockyard madhe pn khup openings nightat. Retire zhalele 70,000 pension ghetat aaj tikade

    • @omkarkolhe1749
      @omkarkolhe1749 Před 2 lety +1

      आता तिकडे कॉन्ट्रॅक्ट भरती करण्यात येते..

    • @fastindian8258
      @fastindian8258 Před 2 lety +2

      Naval Dockyard mumbai made apprentice keli aahe mi bhau MMTM stade aahe maza

  • @sahilmirje4269
    @sahilmirje4269 Před 2 lety +2

    अरुण दादा मी पण ITI Machinist पास आहे एक वर्ष शिकाऊ कामगार म्हणून ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड येथे काम केले आहे पण पर्मनंट होण्याचा लांब लांब पर्यंत काही चांस नाही जे पर्मनंट आहेत त्यांचीच नोकरी धोक्यात आहे कारण सगळ्या फॅक्टरी प्राइवेट कंपन्याना देण्यात आल्या आहेत आमच्याकडून पर्मनंट कामगार पेक्षा 3 पट जास्त काम करून घेतलं जायचं आणि पर्मनंट कामगार पेक्षा 6 ते 7 पट कमी पगार दिला जायचा
    त्यामुळे लोकांचं ऐकून कोणीही ITI करू नका

  • @hemantsaitwal5769
    @hemantsaitwal5769 Před 2 lety +2

    माझा आयटीआय 2015 मधे झाला मशिनिश्ट मधे ....माझ्या सोबत चे सगळे पोर घरी आहे ...नाहीतर अजून सुध्धा कंपनी बदलून बदलून पिरियड काढत आहे .....खूप वाईट अवस्था करून ठेवली आहे कंपनी वाल्यांनी युज अँड थ्रो चे धोरण राबवत कंपनी वाले तेजी आली की भरती करणार आणि नंतर काढून टाकतात .....त्यात भैये लोक कमी पगारात काम करत असता त्यामुळे महाराष्ट्रातील पोरांना जॉब मिळत नाही 100 मधून 1 पोराला चांगला जॉब मिळतो बाकीचे कंपनी पेक्षा शेतात मजुरी परवडत आहे ....बेरोजगारी चे दुसरे नाव म्हणजे आयटीआय

  • @pramoddudhe9966
    @pramoddudhe9966 Před rokem +14

    नमस्कार मित्रांनो!!!!!! 🙋.. ITI करू नका असे मी म्हणत नाही.. ITI करा...आपल्यामध्ये इतरांपेक्षा वेगळं SKILL येऊन जातो..भरपूर PRACTICAL KNOWLEDGE येऊन जातो.... पण, ITI करून कधीही कंपनीच्या नादी लागू नका..., आयुष्यभर कंपनीत काम करू नका....कारण 10-15 हजार रुपयांमध्ये तुमचे फक्त पोट भरणार.. तुमची स्वप्न पूर्ण होणार नाहीत😟...कारण कंपनी दुसऱ्याची...कंपनीचे मालक दुसरे लोक व आपण तिथले कर्मचारी... म्हणून स्वतःचे घाम गाळून कंपनीच्या मालकांना मालामाल करू नका😠.... यापेक्षा तुमच्या स्किलनुसार.... तुम्ही केलेल्या Course नुसार.....स्वतःचा व्यवसाय टाका व स्वतःच्या व्यवसायाचे स्वतःच मालक व्हा🤠😎
    .....खूप पैसे कमवा 🤑 व स्वतःची स्वप्न पूर्ण करा...
    🙏धन्यवाद!!!🙏

    • @devilsgamer5776
      @devilsgamer5776 Před 5 měsíci

      खरं बोलला भावा तू💯

  • @bharatdalavi2761
    @bharatdalavi2761 Před 2 lety +3

    मित्रांनो आय टी आय हा सामान्य विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला पर्याय आहे पण आपण जसं सरकारी आयटीआय म्हणून ऍडमिशन घेतो त्याचप्रमाणे आपण जेव्हा हा कोर्स पूर्ण केल्यानंतर कंपनीमध्ये जॉईन करतो अप्रेंटीशीप साठी त्यानंतर आपण आपल्या कोणत्यातरी कंपनीमध्ये परमनंट व्हावी या भविष्याच्या विचाराने कंपनी जॉईन करतो पण हल्लीच्या कालामध्ये परमनंट हा विषय असा राहिलेलाच नाहीये कारण सगळीकडे कॉन्टॅक्ट चालू आहे त्यामुळे सरकारने अशी तरतूद करावी की जे सरकारकडून आयत्या करून निघालेली मुलं साठी एखादा कोटा कंपनीमध्ये कंपल्सरी आणि शक्तीने कंपनी वाल्यांच्याकडून घ्यावा ही खूप म्होटा प्रश्न मुलांसमोर उभा आहे आणि ही रियालिटी आहे मी स्वतःही आयटीआय पर्सन आहे पण मला चार-पाच वर्षे कॉन्ट्रॅक्ट बेस वर काम केल्यानंतर ही लाईन बदलावी लागली...

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 Před 2 lety

    Tumhi correct bolat ahat Sir, karan mi suddha 90 cha pass out aahe aani saddhya Market maddhe asshe skill asanare lok naahi milat, Mhanun new SSC pass out asanarya mulana sangen ki jeh average kivha changalke suddha pass out asatil tar tyani nakki ITI karava tyatalya tyat Mech. Elec. Civil hyala faar dimand aahe sadhya.....

  • @mahendraghuge7297
    @mahendraghuge7297 Před 2 lety +2

    सर, नमस्कार आपल बोल भिडू हे चॅनेल कायम खूप छान आणि detail माहिती देत असतात....आपण ITI Trade Complete केल्या नंतर पुढे As a Instructor म्हणून जॉब मिळवायचा असेल तर CITS Course व CITS केल्या नंतर च्या नौकरी च्या संधी कश्या उपलब्ध होतात याबद्दल आपण video बनवावा अशी विनंती 👍☺️

    • @mayurrakhonde.9701
      @mayurrakhonde.9701 Před rokem

      Sir
      Tumhi cits course kart aahat ka . Tell me information about cits course.

  • @Rajesh.847
    @Rajesh.847 Před 2 lety +2

    अप्रेंटीशीप चा एक वर्ष काढता काढता दीड वर्षे गेली सहा महिने फुकट गेले .कॉन्ट्रॅक्ट वाल्यांनी फक्त एक वर्षाचा period पकडला सहा महिने7000वरती काम केले...year2018-2020

  • @jaypatil4959
    @jaypatil4959 Před 2 lety +3

    Iti करून नोकरी करत असाल तरं काहीच फायदा नाही.लहान मोठा स्वतःचा व्यवसाय केलं तर ठीक आहें.

  • @shankarbhandarge8158
    @shankarbhandarge8158 Před 2 lety +3

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @akshaymasane3018
    @akshaymasane3018 Před 2 lety +9

    सर बी.लिब. या कोर्स विषयी माहिती द्या! आणि त्याबद्दल स्कोप वगैरे ते सुद्धा कळवा!🙏🙏🙏

  • @duniyadarichaha4343
    @duniyadarichaha4343 Před 2 lety +1

    मुळात iti मध्ये आभास्याच्या नावाने बोंब पण त्यात आम्ही एक गोष्ट शिकलो , आम्हाला कोणत्याही कामाची लाज वाटली नाही.

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 Před 2 lety +2

    सरकारी टेंडर कस निघत आणि ते कोण कोण घेऊ शकत.. टेंडर.. पास कोण करत.. भिडू माहिती पाहिजे प्लीज यांच्या वरती व्हिडीओ 🙏🏻

  • @girish287
    @girish287 Před 2 lety +5

    आता डिप्लोमा पोराना काही कंपन्या मधे कामगार म्हणून कामाला घेतात ITI कालबाहय करण्यात येत आहे .

  • @_g.b_
    @_g.b_ Před 2 lety +5

    Thank you dada..
    Mi pn ITI Mech. course karun 6 varsh zale private company madhe job karat ahe.
    Maji initial salary 3500 INR per month hoti.. ani atta mla 47000 INR per month salary ahe.

    • @sunildudhe4361
      @sunildudhe4361 Před 2 lety

      Company ne break dilta ka Tula?

    • @_g.b_
      @_g.b_ Před 2 lety

      Mi 2 vela company change keli..

    • @pratik9356
      @pratik9356 Před 2 lety

      @@_g.b_namaskar bhau polytechnic machanical diploma valyanna 6 varshanantar andaje kiti salary milu shakte private company madhe

    • @youth5487
      @youth5487 Před rokem

      Which mech ?

  • @krushnatawre2624
    @krushnatawre2624 Před 2 lety +1

    ITI chya nanter कंपनीत काम करण्याऱ्या कामगार वर्गावर खूप छान बोलले अगदी बरोबर मी पण iti holder aahe aani eka कंपनीत कामगार आहे

  • @dhananjaysawant9168
    @dhananjaysawant9168 Před 2 lety +1

    Dada video mast aahe. Fakt aapan sangitaleli mahiti pustaki mahiti aahe, real madhe Ashi paristhiti bilkul nahi. Sarvach trade admission sathi graduate, 12th pass candidate che application yetat. Khoop tough merit lagate khas karun open category sathi. Aani nokari che mhanal tar fakt magas vargiya mhanaje reserved category candidates nach nokari sathi ghetale jate. Open category candidates na nokari sathi ghetach nahit. This is ground reality. If you have any doubts, please verify sir.

  • @tanajitech
    @tanajitech Před 2 lety +21

    मित्रांनो iti करा बेस्ट electrical फिटर करा
    Gov मध्ये barc ,Drdo, isro, npcil ,ecil जागा भरपूर निघतात iti नंतर फक्त 6 month मन लावून study करा जॉब पक्के
    कोणत्याही राजकारणत न पडता स्वतःच भविष्य घडवा
    कारण सेन्ट्रल government UP , bihar ,आणि south इंडियन लोक जास्त आहेत कारण ते फक्त study करतात प्रॅक्टिकल knowledge हा मराठी लोकांचा चांगला आहे पण अपुऱ्या माहिती मुळे मराठी माणूस मागे पडत आहे ऑनलाईन दुनिया आहे माहिती मिळवा आणि लागा कामाला midc मध्ये 7000 वर काम करत राहण्या पेक्ष्या सेन्ट्रल gov मध्ये कमीत कमी iti लोकांसाठी 40000 सॅलरी भेट तो सुरवातीला
    आपलं महाराष्ट्र मध्ये सेंट्रल gov unit भरपूर आहेत पण non maharshtrian जास्त येतात
    स्टडी हार्ड

  • @fastrackprostudy2700
    @fastrackprostudy2700 Před 2 lety +24

    सर D Ed , B Ed. करणारांची पण व्यथा दाखवा
    बऱ्याच वर्षापासून शिक्षक भरती नाही ,,,🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢

  • @nikhiltikone8322
    @nikhiltikone8322 Před 2 lety +1

    महाराष्ट्राचे बदलते राजकारण , त्याची योग्य अयोग्य दिशा , त्याचे देश पातळीवर चे परिणाम . ह्यावर video बनवा

  • @govindnavase4545
    @govindnavase4545 Před 2 lety

    Ek numbar samany mansach content banavta rao ek dam mast

  • @samanderson3923
    @samanderson3923 Před 2 lety +11

    Bol bhidu la विनंती आहे कि plane bsc वरती video बनवा 🙏
    Bsc नंतर काय career आहे 🙏

  • @sushantambhore3631
    @sushantambhore3631 Před 2 lety +3

    Thank you for making This type video because in many days we saw lot of unimportant and very hatred content on your channel.

  • @vishwajeetpatil8720
    @vishwajeetpatil8720 Před 2 lety

    Bol bhidu chanel khup changale aahe khup important information bhetee

  • @luckypawar4144
    @luckypawar4144 Před 2 lety

    Mi kelela tried Nivadnya aghodar
    1 mscit
    2 Typing
    3 Marathi Typing
    4 course furn hotach 2nd year
    Software engineer purn Kara
    3 varshst shikshan purn hot ani
    Khup fhayda hoil ani changlya thikani job bhetl sobat English spoken class kara

  • @luckypawar4144
    @luckypawar4144 Před 2 lety +3

    दादा मी 2020 ला पास. आहे. माझा ट्रेड होता कॉम्प्युटर प्रोग्रामिंग असिस्टंट
    आणि आता मी एका नामांकित कंपनीत काम करतोय ऑफिस मधे

  • @sumeshpawar8799
    @sumeshpawar8799 Před 2 lety +25

    thank you so much Arun Dada for speaking about the harsh reality of midc life

  • @user-di7sh9ux5k
    @user-di7sh9ux5k Před rokem

    सर ITI करून दोन वर्षे फुकट गेले याचा पस्ताव येतो. कंपन्या आता iti वाल्यांना काही महत्व देत नाहीत. बारावी वाले मुल घेतात. फक्त 1000 रु. चा फरक आहे. दोघांना सारखाच पगार आहे. फक्त नावाला iti चा गाजावाजा आहे.

  • @TheAllivin
    @TheAllivin Před 2 lety

    Sir ya channel var tumhi khup jawabdari che video banvata tya karita dhyanwad......

  • @vaibhavdamodhar5700
    @vaibhavdamodhar5700 Před rokem +4

    Contract base झालं तेव्हा पासून iti वाल्यांना काही किंमत नाही.

  • @santoshukarde
    @santoshukarde Před 2 lety +4

    शिक्षणाने जास्त अधिकार मिळतात, पण मेहनत सर्वाना च जास्त करावी लागते

  • @sangrambankar6931
    @sangrambankar6931 Před 2 lety +1

    मी पण आयटीआय कोपा ला अँडमिशन घेतले होते पण तिथे काही शिकवत नव्हते , मुले दिवसभर गेम खेळत होते त्यामुळे मी ते सोडून दिले,

  • @sachinshelar6653
    @sachinshelar6653 Před rokem

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @namdevkendre1130
    @namdevkendre1130 Před 2 lety +6

    अरुण सर, मी एक शिक्षक आहे, other income साठी काय करायला पाहिजे?? यावर एक विडिओ बनवा plz.. या विडिओ चा माझ्यासोबत सर्वांचा फायदा होईल...

  • @saurabhkale5042
    @saurabhkale5042 Před 2 lety +126

    No course (education) is good or bad it depends on people how they work on their knowledge.
    One of my friend did ITI in 2018 and now he's in Dubai and repair AC of Hotels near Burj khalifa, while some of his batchmates are still berojgar

    • @santoshpingale6886
      @santoshpingale6886 Před 2 lety +4

      Demand is changed.. बंधु...

    • @Bhushanwasnik.123
      @Bhushanwasnik.123 Před 2 lety +1

      @@santoshpingale6886 then what is currently & future demand

    • @deepchudasama9446
      @deepchudasama9446 Před 2 lety +3

      Bhava me 4 varsh quality madhe ghasli .....pan job gharapasun khup lamb hoto
      Jawalcha job aahe pan salery kami
      How they work bolun chukicha rasta nako dakhvu
      Contract system jhali aaje

    • @deepchudasama9446
      @deepchudasama9446 Před 2 lety +2

      Dubai la jaun kam karnya peksha deshasathi kaam kara

    • @saurabhkale5042
      @saurabhkale5042 Před 2 lety +1

      @@deepchudasama9446 Mi ITI la promote karar nahiye. Mi fakta sangtoy ki pratyek course madhye successful examples miltat, mhanun course karnya adhi ashya successful candidates kadhun complete guidance ghyava aani mangach pudhe continue karava

  • @r.d.jadhav5573
    @r.d.jadhav5573 Před rokem

    धन्यवाद दादा खूप छान माहिती दिल्या बद्दल.....

  • @anjalik3065
    @anjalik3065 Před rokem

    Tunch Chanel Chan ahe sarvangin vikas Ani mahiti milate

  • @user-zz7hl2gi6r
    @user-zz7hl2gi6r Před rokem +7

    ITI is the most instrumental course in the world
    and it has not been utilized for the full potential throughout the industry revolution. This is a foundational course to provide a skilled human capital to the industry globally and opportunities for young aspirants. Along with technical curriculum, more emphasis on the soft skills development will provide ITI holders successful careers. World is short of skilled labor and India can certainly take a big leap by providing talent with advanced ITI programs.

  • @priypankhu
    @priypankhu Před 2 lety +13

    ITI मधील stenographer & secretarial practice ह्या trade मध्ये scope कमीच आहे . खाजगी आणि सरकारी दोन्ही मध्ये खूपच कमी प्रमाणात नोकऱ्या.

    • @sameerkothale956
      @sameerkothale956 Před 2 lety

      Me tr Iti + Appranticship suddha keloy ya trade madhe tehi Kolkata mdhe jaun

    • @priypankhu
      @priypankhu Před 2 lety +1

      @@sameerkothale956 apprenticeship मी देखील केली आहे. पण apprenticeship ही ठराविक काळा साठी, १२ महिने किंवा १५ महिने. पण त्या नंतर ह्या trade मध्ये नोकरी मिळणं कठीण च आहे. apprenticeship म्हणजे नोकरी नव्हे. त्या मुळे ह्या trade मध्ये scope कमीच.

    • @AN-rt3ok
      @AN-rt3ok Před 2 lety

      आपण एकदम चुकीचा बोलताय आपल्याला स्टेनोग्राफी येत नसेल किंवा इंग्लिश कच्चा असेल तर नुसतं सर्टिफिकेटचा काही उपयोग होत नाही त्यासाठी ड्राफ्टिंग स्किल , इंग्लिश स्पिकिंग हे सुद्धा आलं पाहिजे. जनरल नॉलेज ची त्याच्याबरोबर गरज आहे . गेल्या सहा महिन्यांमध्ये स्टेनोच्या प्रचंड सरकारी जाहिराती आलेले आहेत .एमपीएससीची जाहिरात आहे ,रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची जाहिरात आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन सि व डी ग्रेड स्टेनोग्राफर , भागा आनुशक्ती केंद्राची जाहिरात आहे अशा अनेक जाहिराती आलेले आहेत . स्टेनो असा ट्रेड आहे की त्याच्या एवढ्या सरकारी नोकरीच्या जाहिराती इतरांना येत नाहीत . त्यामुळे चुकीचे काहीतरी समाजाला सांगून लोकांच्या दिशाभूल करू नये. जाहिराती पहाव्यात आजपर्यंत मुलं नोकरीला लागलेली माहिती काढावी मग बोलावे.लोकांनी सुद्धा सर्व कोर्सेसची माहिती व्यवस्थित घ्यावी , नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून सावध रहावे काही लोक स्वतः काय करत नाहीत व ते दुसऱ्यानाही काही करू देत नाहीत . अशा लोकांची संख्या आपल्या आजूबाजूला वाढत आहे .अशा निराशवादी लोकांकडून सावधान !

    • @priypankhu
      @priypankhu Před 2 lety +1

      @@AN-rt3ok दादा तुम्ही खूप छान पद्धतीने इथे तुमचं मत व्यक्त केले आहे. ज्या account वरून तुम्ही कमेंट केली आहे त्या account वर तुम्ही पुरावा म्हणून तुमचा experience share करावा व्हिडिओ च्या माध्यमाने सिद्ध करा. त्या मुळे इतरांना ह्या गोष्टी चा छान फायदा होणार आहे.

  • @devidasghule2180
    @devidasghule2180 Před 2 lety

    Khup chan
    Mahiti dili ahe dhanaywad