रुचकर स्वादिष्ट हातावरच्या शेवया करण्याची पद्धत (Tasty handmade Noodles in Marathi)
Vložit
- čas přidán 21. 07. 2024
- हातावरच्या शेवया करण्याची घरगुती पद्धत (Hand made Noodles at home Recipe in Marathi)
ह्या आहेत चवीला अप्रतिम असलेले असे हातावरील शेवया. याला इंग्रजी मध्ये Noodles किंवा Ramen असं म्हणतात.
आपल्या सर्वांना माहिती आहे की विकत घेतलेले Noodles इतके चविष्ट नसतात जितके हातावरील असतात.
कृपया हा विडिओ पूर्ण पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.
अनुक्रमणिका (Index)
00:00:00 - फोटो (Photos)
00:00:12 - प्रस्तावना (Introduction)
00:00:22 - साहित्य (Ingredients)
00:01:17 - पीठ तिंबणे (Kneading Dough)
00:03:33 - पीठ कुटणे (Pestle)
00:10:04 - गोळे तयार करणे (Make small Balls)
00:13:03 - घासून पातळ करणे (Rubbing balls)
00:15:16 - शेवायची तार करणे (Making wires like noodels)
00:18:13 - फणी तयार करणे (Making noodle comb)
Credits :-
Anchor and Demonstration by Savita Hibare
Recipe by Savita Hibare
Video Editing & directing by Vaibhav Dhotre (Channel / @vaibhavdhotre )
पीठ मळताना मीठ का घालू नये कारण कळेल का
मीठ घालून पीठ मळले तर शेवायच्या तारा लवकर प्रसरण घेत नाहीत (लांब होत नाहीत). अगदी रबरसारखे नेहमी नेहमी आकुंचन घेत राहतील. म्हणून पीठ कुटतानाच घालावे.
Googlplay
@@ThePragatiHDTV
मला पण वाटते पीठ मळताना जास्त चांगले मिक्स होते मिठ.
ओके👍
अप्रतीम तुमचे शेवया बनवायचे कैशल बघुन थकक झालो. खुपच सुंदर आणि किती कसब लागत करायला. फारच कैतुका स्पद. आभार
राजश्री आंगणे
सलाम त्या गृहिणीला. ईतक्या धावपळीच्या जीवनात ईतके पेशन्स ठेवून सेवया करायच्या म्हणजे ...
धन्य ती माऊली. आणि हे काय एकदा करून येण्यासारखे नाही. कितीतरी सराव लागेल. त्यांचे हात काय सुंदर चालतात. Great Great Great
मी सुद्धा आज पहिल्यांदाच बनविण्याची पूर्ण कृती पहिली तुमच्या कौशल्याची करू तेवढी तारीफ अपुरी आहे
सुंदर केल्याच नाही अतिशय प्रमाने आणि अतिशय व्यवस्थित पद्धति ने एखाद्या घरच्या काकू मावशी ने मुलीला शिकावे तसे सांगितले .फार आवडले
मनःपूर्वक धन्यवाद. तुमचे गोड शब्द वाचून खूप छान वाटलं.
रेसीपी साठी नवा चॅनल तयार केलेला आहे. कृपया त्याला subscribe करा.
czcams.com/channels/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg.html
यात बेसन लाडूची रेसीपी सुद्धा आहे. तुम्हाला नक्की आवडेल.
अशा शेवया हल्ली कोणी करत नाही,ताई तुम्ही हा vdo बनवून एक प्रकारे चांगले काम केले आहे,हे हल्ली पाहायला ही मिळत नाही.खूप खूप धन्यवाद.
या शेवया अगदी केसा इतक्या बारीक ही करतात,खुप चविष्ट असतात.🙏
खूपच सुगरण आहात ताई तुम्ही!❤
तुमच्या शेवया बघून मला पण परत करावेसे वाटते! लहानपणी आमची आजी ,आई करायच्या!याची चव अप्रतिम लागते!आता बाजारात सहज मिळतात ,घरी करायला कोण एवढा वेळ घालवेल? याला कसब लागते सर्वांना नाही जमत!परत तुम्ही आठवण करून दिलीत! धन्यवाद!
धन्यवाद.
जर विडियो आवडला असेल तर रेसीपी साठी हा चॅनल तयार केलेला आहे. - czcams.com/channels/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg.html
त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - czcams.com/video/c1U-fKF_AxA/video.html
किती कलात्मक काम आहे हे
साध्या वाटणार्या स्त्रिया किती हुशार असतात
खरच कौतुकास्पद आहे
मनापासून धन्यवाद नमस्कार
मस्त
खूप सुंदर 👌
प्रथमच बघितली शेवयांची कृती 🙏
खूपच सुंदर बनवल्या शेवया ताई तुम्ही समजा विकत घ्यायच्या असतील तर आम्हाला तुमच्याकडून मिळतील का मी पुण्यामध्येच आहे
खुपच छान ताई.मी लहानपणी काकू बनवतांना पहिले होते.तुमची प्रत्यक्ष कृती बघायला मिळाली.मेहनतीचे काम आहे.तुम्ही खुप सुंदर बनवीले.👌👌👌🙏
czcams.com/video/vEvfSG7ivWw/video.html
खूप छान शेवयाआता असेपहावयासमिळत नाही खूप छान वाटले विकतमिळतील का कशाकिलो शोभा शेटे बार्शी
खूपच छान.ही पण कलाच आहे.तुम्हाला खूपच सराव दिसतोय.
खूप छान शिकवले खूप दिवसांची हात शेवया शिकण्याची इच्छा पूर्ण झाली
ताई आम्ही माहेरी खूप केल्या आहेत, शेजारी पाजारी पण करायला जायचो, आमची काठी खुंट्यांना बांधलेली असायची आणि आमच्या शेवया खुंटीपासून जमिनीपर्यंत लांब असायच्या, तुमच्या शेवया पाहून आठवण झाली.
ताई फार सुरेख प्रत्येक क्रुती छान छान सांगितली .धन्यवाद
Thank You!
Umm.
खूपच छान पद्धतीने दाखवले आज कळले हाताच्या शेवया बनवणे किती निगुतीने काम आहे.कमाल आहे तुमची बनवण्याचा प्रयत्न नक्की कररणार❤
Expert aahat ha tumhi..khupach ..chan ..barkave aahet..tumhi moti sugaran aahat ..aanand aahe ajunhi hi kala japali aahe..jenekarun aamhi tumchyakadun shiku...aasych Navin recipe pathvat Raha
ताई मस्त केल्या शेवया 👌👍
!
Salute to your hard work kaku .😊
खुप सुंदर अगदी माझ्या आई ची आठवण आली ती ही आपल्या सारखीच करत होती. आता वय झाले तेव्हा होत नाही तीला.
खूपच सुंदर माहिती दिली मावशी लहानपणाची आठवण झाली लहानपणी आम्ही अशाच करायचं
आपली प्रतिक्रिया पाहून खूप बरे वाटले. अभिप्राय दिल्याबद्दल आभार.
Outstanding work aunty God bless you❤❤❤❤ love the way you do such a great things
Thank you so much
खरच फारच सुंदर झाल्या शेवया आणि सोप्या पद्धतीने सांगीतले..... व्यायाम चांगल्या प्रकारे होतो
हो ना.
कमेन्ट केल्याबद्दल धन्यवाद.
जर विडियो आवडला असेल तर अशाच खास रेसीपी साठी खालील चॅनल तयार केलेला आहे. - czcams.com/channels/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg.html
त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - czcams.com/video/c1U-fKF_AxA/video.html
ताई काय सुंदर शेवया बनवल्या, अगदी सुंदर त्याला कष्ट ही आहेत पण अगदी अप्रतिम,
आजच्या पार्सल जमान्यात तुम्ही आई आजीचा वारसा पुढे चालवत आहात.
आणि तुमची समजून सांगण्याची पद्धत पण खूप छान. खूप अभिनंदन ताई.
आपण खऱ्याखुऱ्या सुगरन आहात. देव आपणास सुखी समाधानी दीर्घायुष्य देवो हीच सदिच्छा ताई ❤❤❤❤❤❤
खरच खुप सोपी पध्दत आहे. आम्ही पण अशाच प्रकारे हातावर शेवया करतो.खरच खूप छान.
वाह खूप चान केलेत नूडल्स, खूप मेहनत आहे 👍🏻👍🏻😊😍
👌czcams.com/video/ywkKHh4HaLU/video.html
Skillful work , needs hardwork and patience
खुप सुंदर हातावरच्या केल्यात ताई
आमची आई करायची अशीच
आता जुनं सारं सारं गेलं
पण त्या सुंदर आठवणी राहील्या
आपण सुगरण आहात कारण हे करण्यासाठी कमालीचा पेशन्स व हातात कला लागते. सर्वांना जमत नाही हे. पण तुम्ही सराईपणे शेवया केल्यात. आणि पांढर्याशुभ्र दिसताहेत. म्हणजे स्वच्छताही खुपच पाळलीत तुम्ही.
ग्रेट . 🙏🙌👌✌👍
माझी आई पण या हातावरील शेवया अतिशय सुंदर करित होती.आता वयोमानामुळे करत नाही.
अतिशय सुंदर च
Too good 🍝
शतशः नमन आन्टी...🙏🏻🙏🏻😌
धन्यवाद!
खुप मजा आली पाहतांना .सर्व व्यवस्थित पद्धतशिर सांगितले .
अशा शेवया करण्याची कलाच आहे खरी....
आपली ही कला पुढे नेण्यासाठी युट्यूबवर टाकल्या बद्दल धन्यवाद!
रवा विकटचा आहे का घरी तयार केलेला आहे ,? रव्या बद्दल खुलासेवार माहिती द्या , कारण रव्या वार सुद्धा खूप अवलंबून असते .
Kup Chan प्रकारे समजून सांगितले
आपला अमूल्य अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.
ताई खूप अवघड आहे सगळ पण तुमच्या हातात कला आहे खूप छान वाटले पाहून
कला वगैरे काही नाही. फक्त आवड.
खरंच खूपच छान समजावून सांगितले.धन्यवाद मानले तुम्हाला... खूप कष्टाचे आहे..
Atishay sunder 👌👌👌pn mehanat aani patience hawa..thanks Tai 🙏🙏😊
%
Hat's of you 🙏🙏🙏
Khup talent and mehanatahi khup pan tumchi padhadat Chan and shevaya hi chan
बापरे , काय कला आहे. जब्बरदस्त, छानच
धन्यवाद!
खूपच छान कौतुकास्पद असून खुप मेहनत आहे ताई, 👌👌
Khup khup dhanyavaad!👌👍atishay chan .......Khup barkavyasahit sangitale ahe tumhi!
खुप छान
खूप छान शेवाया केल्या काकु माझी आई पण करते हातावरच्या शेवाया खूपच मेहनतीचे काम आहे 🙏🙏
कमेन्ट केल्याबद्दल धन्यवाद.
जर विडियो आवडला असेल तर अशाच खास रेसीपी साठी खालील चॅनल तयार केलेला आहे. - czcams.com/channels/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg.html
त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - czcams.com/video/c1U-fKF_AxA/video.html
अप्रतिम,खूपच चिकाटी व श्रम साध्य कौशल्य.धन्यवाद.
धन्यवाद!
ताई तुमच्या हातात हि सुंदर कला आहे.अवघड आहेत करायला,पण तुम्ही छान सराईतपणे करत आहात.हि पद्धत दाखवल्याबद्दल धन्यवाद.
kiti mehnat aahe
Amazing👍👍
Thanks for your comment.
अप्रतिम 👌👌
मस्त शिकवल्या.आम्ही पाटावर वळून पाहिल्या आणि केल्या आहेत ताटात वळून.आणि काटीवर फण्या देखील केल्या आहेत.पण गहू भिजत घालून त्याची पिठी काढून.पण तुम्ही ज्या केल्या आहेत ते खूप कठीण आणि मेहनतीचे वाटले.❤.खूपच छान.
वा... सुरेख...
how i wish there is a translation so i could understand.
खुपच छान बनवलेत शेवया आम्हि पण सोलापुर ला असेच बनवायचो तुम्हि कर्नाटक मधले आहेत का👌👌
हो मी कर्नाटक मध्येच राहते. विडियो मधील स्त्री माझी आई असून तिचे माहेर सोलापुरच आहे.
खूप छान शिकवलं.खूप कौशल्याचं आणि चिकाटीचं काम आहे.
खरचलंहआन पणईआई करायची मी फक्त हातावर घेउन काठीवर टाकायची लहानपणीची आठवण आली खूप छान लागतात शेवया हवा पाणी खूप अचूक लागते याला मला खूप आवडल्या
खूपच वेळ खाऊ पद्धत आहे ही.
पण ह्या शेवयाची खीर खूपच मस्त होते,
तुमचे गाव कोणते आहे तुम्ही विकतात का शेवाळ्या .
देगलूर, जि. नांदेड
खुप लांब आहे तुमचे गांव . आम्ही खानदेशात राहतो . शेवाय्या हातावर कशा घेतात शिकायला आले असते .
खूप छान ताई. किती मेहनत आहे. इतका वेळ देऊन शेवया करणे म्हणजे विलक्षण च
खूप छान शेवया करण्याची पद्धत
ताई खरंच किती छान शेवया बनवल्यात तुमच्या कौशल्याला तोडच नाही किती तरी समजुन सांगितलं सद्याच्या युगात तुमच्या सारखी सुगरण मिळने कठीण तुमच्या कौशल्याला मानाचा नमस्कार सौ दर्शना राणे कोल्हापूर
🙆♀️😇 बाप रे मावशी खूप छान रेसिपी सांगितली तुम्ही मला अक्षरशः तुमच्याशेवाय बनवायची पद्धत बघून श्वास जागेवर थांबला माझा 😅😅 खरंच खूप छान 🙏🏻👌🙏🏻
खरोखरच खूप छान पद्धतीने बनवलं आहे 🙏🙏
धन्यवाद.
खूपच कष्ट आहेत पण खायला अप्रतिम असनार हे नक्की लाकडी फळीवर शेवया बनवतात ते मी पाहिले आहे हे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे 👍👍👍🙏
आम्हाला विकत मिळतील का
अजून ठरवले नाही. तरी भविष्यात संपर्कासाठी email / fb profile / फोन नंबर इत्यादि दिलात तर सांगणे सोपे होईल.
@@ThePragatiHD khup छान.विकत घेऊ na आम्ही.
माझी आई पूर्वी घरचे गहू ओले करून घरीच जात्यावर दळून मैदा आणि पीठ वेगळे करायची. आणि नंतर हातावरच्या शेवया बनवायची. खुंटीला बांबू बांधलेला असायचा. थेट जमिनीपर्यंत लांब लांब अशा शेवया बनवायची. खूपच सुंदर. आम्ही तिला मदत करायचं. गेला तो जमाना. दुकानावर चा मैदा किंवा रवा नसायचाच. ते खरे श्रम होते. आणि पदार्थांना चव पण असायची. आता आला रेडिमेड जमाना. पैसे फेका आणि विकत घ्या. स्वनिर्मिती चा आनंद तर मुळीच नाही
खूप छान माहिती दिलीत.आता हाताच्या शेवया कोणी करत नाही .कोणीही सहज करू शकेल .🙏👌👌👌👍
करून पहा. छान वाटेल.
ताई फारच सुंदर समजावून सांगितले.... मी जरुर करून बघून तुम्हाला नक्की कळवेन ❤
आमच्या विदर्भात आमची आई दोन्ही
हातावर बनून त्या दोरीवर टाकायच्या
व तोडून घ्याच्या तुम्ही खूप किचकट बनवताय 😊
Superb! हाता वरती येवढं बारीक आणि नाजूक काम करण म्हणजे... खूप छान
ताई धन्य आहात तूम्ही .खूप छान रीतीने समजावलत ,पण मला जमेल इतका आत्मविश्वास नाही.आपण अप्रतिम शेवया बनवल्या आहेत. आपण शेवया विकत देत असाल तर मी घेऊ इच्छिते.
धन्यवाद काकू इतकं सविस्तार आणि सहजतेने तुम्ही सांगितली विधी की मजा आली बघायला!😊😊😊
मनापासून धन्यवाद!
किती कौशल्याचं काम आहे.तुम्ही छान समजावलं, आणि शेवयापण छान बनवल्या.
अप्रतिम
कौशल्य👌👌👌👌👌
खूपच सुंदर
शिकवणं तर एकदम छान
ताई खूपच सुरेख झाल्या आहेत शेवया. रवा घरी काढला की विकतच आहे.
खूप सुंदर... छान केले.. तुम्ही छान मेहनती आहात... खाणारा भाग्यवान आहे.. अत्यन्त चिकाटी हवी... शाब्बास ताई....
खूप सुंदर पद्धतीने शिकवल्या शेवया काकू धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Apratim.. Perfection and patience superb.. Masta kelya shewaya.. 👌👌
धन्यवाद काकू खुप छान समजुन सगता त्यामुळे नवीन मुलीना शिकायला मिळाले
खूपच छान ताई..खूप सुंदर करता आहात..आजकाल बघायलाही मिळत नाहीत अशा हातावरच्या शेवाया
हो न. त्यासाठीच तर हा विडियो बनविलेला आहे. रेसीपी साठी नवा चॅनल तयार केलेला आहे. कृपया त्याला subscribe करा.
czcams.com/channels/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg.html
यात बेसन लाडूची रेसीपी सुद्धा आहे. तुम्हाला नक्की आवडेल.
आमच्या येथे करतात,विकत घेतल्या मी
खूपच सुंदर पद्धतीने केलेय
अतिशय सुंदर कलाकृती आहे
खुप छान
अगदी सहज सोप्या पद्धतीने शिकवले 🙏
धन्यवाद!
किती मेहनत आहे. खूप कला आहे तुमच्या हातात. सगळ्यांना नाही जमणार.
Khup chhan vikat miltil ka address sanga please
खूप छान
मला माझ्या लहानपणाची आठवण आली
आम्ही अश्याच शेव्या करत होतो.
खुप छान शेवया शिकवल्या ताई पण खूप वेळ आणि मेहनत पण खूप आहे🌹
खूपच छान.खूप कष्ट करून अप्रतिम ताई.सलाम तुम्हाला
खुप सुंदर, हातावरच्या शेवाया करण्याची सोपी पद्धत, आम्हाला हा तुमचा व्हिडिओ पाहून हातावरच्या शेवाया करण्याची उत्सुकता होईल असे हे व्हिडिओ आहे व बनवण्यासाठी पण सोपा.
छान माहिती दिली शेवया करण्याची
किती मेहनत आणि कमालि चे कौशल्य.!! बघून श्वास थां ब ला!!
धन्यवाद!
Bapre kiti mhenat aahe ya peksha krr mashin ni kelelya Brya.....🙏
ताई तुम्ही फारच सुगरण आहात किती छान सांगितले समजून आणि किती सुंदर नाजूक शेवया केल्यात आपण खूप छान ताई तुमचं अभिनंदन
कुशल व मेहनती आहात तुम्ही , खूप कष्टीक काम आहे हे
कमेन्ट केल्याबद्दल धन्यवाद.
जर विडियो आवडला असेल तर अशाच खास रेसीपी साठी खालील चॅनल तयार केलेला आहे. - czcams.com/channels/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg.html
त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - czcams.com/video/c1U-fKF_AxA/video.html
कमेन्ट केल्याबद्दल धन्यवाद.
जर विडियो आवडला असेल तर अशाच खास रेसीपी साठी खालील चॅनल तयार केलेला आहे. - czcams.com/channels/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg.html
त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - czcams.com/video/c1U-fKF_AxA/video.html
हिबारेबाई ,शेवया लयी भरी.
अतिशय सुरेख आणि छान👌🏻😍😍
खुप अवघड व कलाकुसरीचं, मेहनतीच काम आहे
धन्यवाद.
जर विडियो आवडला असेल तर अशाच खास रेसीपी साठी खालील चॅनल तयार केलेला आहे. - czcams.com/channels/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg.html
त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - czcams.com/video/c1U-fKF_AxA/video.html
Ashiyash pramanik sharing apratim koti koti dhnyawad
Thank You! 💖
Khupach chhan! 👌👌Tai Ekdam sugaran!! 👍👍
खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले👌
👌czcams.com/video/ywkKHh4HaLU/video.html
अप्रतिम शेवया ✨👏🏻🙏🏻
Wah,kai mast technique aahe,shivay sarv gharchech sahitya aahe
बापरे! सलाम तुमच्या आईला.किती कौशल्य आहे त्यांच्या हातात!नोकरी सांभाळून त्या हे करतात त्याबद्दल त्यांचे खरंच कौतुक आहे.नुसते पाहून दमायला झाले.
एवढ्या शेवया करायला किती वेळ लागला?
आपल्या स्तुतीबद्दल आणि अभिप्रायबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
Khupach chhan, paramparik paddhatine, khup mehanatine kelyat👌👌👌
Kharat khoob chhan 👌👌