लिंबू हस्त बहार व्यवस्थापन नवीन तंत्रज्ञान - करा फक्त ३ फवारण्या आणि लिंबू काढणीस आणा उन्हाळ्यामध्ये

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2021
  • लिंबू बागेचे हस्त बहार व्यवस्थापन केले तर लिंबू बाग फेब्रुवारी ते मे महिन्यात म्हणजेच उन्हाळ्यात काढणीस येते. यावेळी बाजारभावही चांगला मिळतो. यासाठी कृषि विद्यापीठाने शिफारस केलेले फवारणीचे नवीन तंत्रज्ञान वापरले तर हस्त बहार व्यवस्थापन करणे शक्य होते.
    पहिली फवारणी : जून महिन्यामध्ये जिब्रेलिक अ‍ॅसिड ची ५० पीपीएम ची फवारणी
    दुसरी फवारणी : ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये क्लोरमॅक्वेट क्लोराईट म्हणजेच सायकोसील ची १००० पीपीएम ची फवारणी
    तिसरी फवारणी : ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये १३ :००: ४५ म्हणजेच पोटॅशिअम नायट्रेट (KNO3) ची १% टक्क्याची फवारणी
    #कागदीलिंबू #लिंबू #हस्त #बहार #व्यवस्थापन #नियोजन #लिंबूखतव्यवस्थापन #फवारणी #तंत्रज्ञान
    #कृषिमंत्र #आरएसपाटील
    Farmer can earn good income if he follows proper practice of Hast Bahar Management of Kagzi Lime. Kagzi lime i.e. lemon, nimbu, limbu
    Agriculture University has given new technology for kagzi lime hast bahar management, it includes 3 sprays of PGR :
    First Spray: In June month Gibrelic Acid 50 ppm
    Second Spray: In August & September, Cycocel/ Chlormaquet Chlorite 1000 ppm
    Third Spray: In October & November spray Potassium Nitrate i.e. 13:00:45 @1%
    #KagziLime #HastBaharVyavasthapan #Limbu #hastbaharniyojan #limbukhatvyavasthapan #unhalyatlimbukadhanisaananyachetantradnyan #limbutantradnyan #krushimantra #krushimantra #rspatilkrishimantra

Komentáře • 140

  • @prashantraut1172
    @prashantraut1172 Před 5 měsíci +2

    फार उत्कृष्ट माहिती आहे जेणेकरून हस्तबार फोडणे शेतकऱ्यांना सोपे होईल. धन्यवाद

  • @sharadghalke2336
    @sharadghalke2336 Před rokem +3

    धन्यवाद सर आपन दिलेली माहिती खुप महत्वाची ठरली।आता नोहेंबर महीना चालू आहे।चांगल्या प्रकारे फुलधारना झालेली आहे।मनापासून धन्यवाद।

    • @FVBU1DK4jo887N_jGA
      @FVBU1DK4jo887N_jGA Před 9 měsíci

      हस्त बहर म्हणजे काय?
      मार्च एप्रिल मे महिन्यात जे लिंबु विक्रीस येते त्यास लिंबु हस्त बहारातील योग्य नियोजनातून मिळाले असते.उन्हाळ्यात लिंबाला बाजार नेहमीच्या बाजारभावापेक्षा अधिक असते आणि याच दिवसात आपल्याकडे लिंबु बागेत लिंबु नसते.लिंबु का नसते तर हस्त बहराचे योग्य नियोजनाचा अभाव ,कोणाच्याही सांगण्यावरून औषधाचा बेसुमार वापर ,परिणामी हानिकारक औषधे फवारल्याने बागेतील मधमाशी नाहीसे होणे या मधमाशीमुळे परागीभवन व्यवस्थित होत असते आणि तेच हानिकारक कीटक नाशकामुळे नाहीसे होतात .या सर्व अघोरी उपाय योजनेमुळे लिंबाचा हस्त बहर आपण गमवुन बसवतो.
      या सर्व गोष्टींचा गेली ४ वर्षे अभ्यास केल्यावर‌ असे लक्षात येते की हस्त बहर व्यवस्थापन करण्यास आपण कमी पडतो म्हणून लिंबु उत्पादक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ने लिंबु स्पेशल हस्त बहर व्यवस्थापन किट आणले आहे.
      या किट मध्ये
      ४ फवारणी प्रत्येक फवारणी पहिली फवारणी पासुन ५ दिवसांनी घेयाची.
      उन्हाचे तापमान ३०डिग्री सेल्सिअस च्या आतच फवारणी घेणे .
      आळवणी २ आहेत
      पहिली फवारणी झाली की लगेच त्याच दिवशी की दुसर्या दिवशी आळवणी सोडावी .
      पहिली आळवणी नंतर ५ दिवसांनी दुसरी आळवणी द्यावी .
      हा सर्व‌ प्रोग्राम २० दिवसांचा आहे .या किट व्यतिरिक्त बागेत काहीही फवारून नये अथवा कोणतेच वर खत टाकवु नये .
      किटसाठी संपर्क करा.
      8766437619

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 Před 8 měsíci +2

    पाटील साहेब आपण निंबू फल धारणा कशी करावी शेतकरीना खुपच चागंले मार्गदर्शन केले धन्यवाद साहेब. जयसियाराम

  • @SanjayJadhav-hj7ri
    @SanjayJadhav-hj7ri Před 11 měsíci +2

    खूप छान माहिती सांगितली. आम्ही आपले आभारी आहोत.

  • @bdk286
    @bdk286 Před rokem +2

    खुपच छान मार्गदर्शन मिळाले.

  • @user-wz3qr7qd5q
    @user-wz3qr7qd5q Před 2 lety +2

    धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली

  • @rambhaupatil43
    @rambhaupatil43 Před 2 lety +5

    धन्यवाद! खुप सुंदर माहीती आणि सांगण्याची पद्ध खुप छान

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल..

    • @bhaskarsadgir
      @bhaskarsadgir Před rokem +1

      काही झाडांना लिंबू लागत नाही काय करावे

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem

      खत व्यवस्थापन करावे लागेल. तसेच दिली जाणारी खते शेण खतात मिसळून द्यावीत.

  • @user-pf1pi4hw9w
    @user-pf1pi4hw9w Před rokem +2

    Thank sir

  • @pushprajghadge7033
    @pushprajghadge7033 Před rokem +1

    Thanks sir

  • @maheshmahajan2491
    @maheshmahajan2491 Před 2 dny

    धन्यवाद सर

  • @pravinnimbalkar1697
    @pravinnimbalkar1697 Před rokem +1

    खूप छान माहिती सांगितली सर 🙏

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल...

  • @shivajiwalke6389
    @shivajiwalke6389 Před rokem +1

    Super info !!

  • @RameshPatil-yl8sf
    @RameshPatil-yl8sf Před 5 měsíci +1

    छान मार्गदर्शन केले

  • @bhalchandrakunte952
    @bhalchandrakunte952 Před rokem +1

    Good

  • @sharadghalke2336
    @sharadghalke2336 Před rokem +2

    Sir mazya lihocin chya 2 fawarnya zalet.ata kuthe tari ful disat ahet.pan bagela tan basla nahi.tar kay karave ful lagnyasathi

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před 2 lety +1

    Sir I am Heartly salute your excellent information

  • @ramchandrasapakal5172
    @ramchandrasapakal5172 Před rokem +1

    खूप छान

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 Před 2 lety +1

    Chhan

  • @ishwargodbole5516
    @ishwargodbole5516 Před rokem +1

    Nice information sir🙏🙏

  • @ganeshakat6107
    @ganeshakat6107 Před rokem

    Sir pan kurdye zale aahet

  • @kirangutal4548
    @kirangutal4548 Před 2 lety +2

    मला माहिती चांगली पटली फोन नंबर भेटला तर भारी काम होइल

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल.. आपले काही प्रश्न असतील तर आपण मला ईमेल करू शकता.. rspatil599@gmail.com

  • @munjajibhalerao8676
    @munjajibhalerao8676 Před rokem +1

    ग्रेट सर... धन्यवाद सर आ.संपर्क नं ...

  • @Kbj0345
    @Kbj0345 Před 2 lety +2

    Sir , August and September madhhe CCC chi spaying kelyavar
    Pruning and tan kadhi v kiti days dyava

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      झाडाच्या मुळांना इजा होऊ नये याची काळजी घेऊन तण काढणी करावी. Pruning म्हणजे झाडाच्या फांद्यांची छाटणी, ती बहार धरल्यानंतर करू नये.

  • @arunfadtare7123
    @arunfadtare7123 Před 2 lety +2

    लिंबूची साइझ वाढण्यासाठी आणि शाईन साठी काय करावे मार्गदर्शन करावे.

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      ००:५२:३४ अथवा ००:००:५० या विद्राव्य खताची फवारणी ५ ग्रॅम प्रति १ लिटर पाणी याप्रमाणे करावी.
      अथवा
      ठिबक सिंचन व्यवस्था असल्यास आठवड्याला ५ किलो प्रति एकर ००:५२:३४ अथवा ००:००:५० ठिबक द्वारे झाडाला द्यावे.

  • @madanjaybhay3524
    @madanjaybhay3524 Před rokem

    Sir mi Jun che fhwarni Keli nahi mg August la kelywar Jamel ka

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem

      फळधारणा मोठ्या प्रमाणात असेल तर, यावर्षी नियोजन करून नका.. पुढील वर्षी उन्हाळ्यात पाणी चालू ठेवा आणि व्हिडिओ मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे जून पासून फवारणीचे नियोजन करा

  • @karunamore2344
    @karunamore2344 Před rokem +1

    नमस्कार आमची पण लिंबुची बाग आहे लिंबू लावून जवळ जवळ साहा वर्ष झाली या दोन वर्ष पासून आम्ही उत्पन्न घेतोय पण बरोबर उन्हाळ्यात काही ही उत्पन्न येत नाही उन्हाळ्यात फळ यावे यासाठी काय करावे लागेल कृपा करू सहकार्य करावे. धन्यवाद.

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem

      कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे हस्त बहाराचे नियोजन करावे.

  • @user-kv5wm5gb4h
    @user-kv5wm5gb4h Před 4 měsíci

    लिंबू बागेची छाटणी कधी करतात

  • @niketrikame7170
    @niketrikame7170 Před rokem +1

    नमस्कार सर, आपण दिलेल्या नियोजनानुसार हस्त बहराचे नियोजन केले आहे. मार्च महिना चालू झाला तरी सुध्दा लिंबू झाडाला फुले व फळ येत नाही. काय करावे मार्गदर्शन करा.

  • @Sidjdnlalsdhnsk
    @Sidjdnlalsdhnsk Před 2 lety +2

    June महिन्यातील सर्व खाते एक सोबत दिले तर चालतील का सर

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल..
      शास्त्रीय दृष्टीकोनातून खते विभागून दिले तर, खतांची उपयुक्तता वाढते आणि पिकाला किंवा झाडाला ते चांगल्या प्रकारे लागू होतात. त्यामुळे दृश्य परिणाम चांगले दिसतात.

  • @hrishikeshdeore1718
    @hrishikeshdeore1718 Před 2 lety +5

    सर तुमचा मोबाइल नंबर मिलेल का

  • @Uday2310
    @Uday2310 Před rokem +1

    म्हणजे जीए ची १ फवारणी ... CCC च्या २ फवारण्या ... आणि पोटॅशिअम नायट्रेट KNo३ ची १ फवारणी किंवा जास्त फुलगळ झाली तर NAA ची १ फवारणी.म्हणजे पाटील साहेब १+२+१ ( १ ) असे एकंदर चार फवारे.असे मला हा व्हिडिओ बघून समजले आहे. ते बरोबर आहे का ? ते कृपया सांगावे.

  • @nitinpatil157
    @nitinpatil157 Před 2 lety +1

    सर प्लॅनोफीक्स ची मात्रा 1 पंपासाठी किती घ्यावयायी , तसेच १ ३००४५ + प्लनोफिक्स एकत्र चालेल का

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      प्लानोफिक्स ६ मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करा..

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      १३:००:४५ एकत्रित फवारले तर चालू शकते, परंतु शक्य असल्यास वेगवेगळ्या फवारण्या घ्या.

  • @krishnaphad3328
    @krishnaphad3328 Před 2 lety +2

    सर माहिती खूप चांगली आहे .. धन्यवाद..सर आपला फोन नंबर द्या सर

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल.. आपले काही प्रश्न असतील तर आपण मला ईमेल करू शकता.. rspatil599@gmail.com

  • @bhikanpatil9437
    @bhikanpatil9437 Před 2 lety +1

    जमिन काडी आहे तरी ओलावा जास्त दिवस असतो कोरडी करण्या साठी काय उपाय करू बाग ताणावर येत नाही उपाय सांगा सर

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      झाडांच्या मुळांना इजा होणार नाही याची दक्षता घेऊन दोन वर्षांतून एकदा ट्रॅक्टरचलित व्हायब्रेटिंग मोल नांगर दोन झाडाच्या ओळीतून चालवावा, पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होऊन वापासा लवकर येईल. तसेच लिंबू बागेत आंतरपीक म्हणून तागासारखे पीक घ्यावे व ते फुले लागणीच्या अगोदर जमिनीत गाडावे. सेंद्रिय, कंपोस्ट खताचा वापर वाढवावा.

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Před rokem +1

    1acre mdhe kiti limbu lagwad hoil?

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem

      लिंबू लागवडी साठी शिफारस केलेले अंतर,
      ५ मीटर X ५ मीटर (१६ फूट x १६ फूट) प्रमाणे १६२ झाडे बसतील.
      ६ मीटर X ६ मीटर (१९ फूट x १९ फूट) प्रमाणे ११२ झाडे बसतील.

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 Před rokem +2

    Amhi he vyavasthapan Kel pan fulora alach nahi

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem

      झाडाला पाण्याचा पाहिजे तितका पाण्याचा ताण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात बसला नसेल.
      येणाऱ्या हस्त बहार व्यवस्थापनासाठी मार्च - मे महिन्यात जो नैसर्गिक ताण बसतो, तो बसू न देता बागेला पाणी चालू ठेवा व व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे बाकी व्यवस्थापन करा

  • @grs349
    @grs349 Před rokem +1

    सद्या झाडांना बऱ्यापैकी फळे आहे , हस्त बहाराचे नियोजन शक्य आहे का?

  • @shobhasudrik2614
    @shobhasudrik2614 Před 2 lety +2

    मि घराच्या अंगणात लिंबाचे झाड लावले आहे व नंतर त्यात माती भरली आहे त्यामुळे त्याची मुळे खूप खोल गेले आहेत त्यामुळे त्याला खत पोहचत नाही त्यासाठी काय करावे लागले

    • @shobhasudrik2614
      @shobhasudrik2614 Před 2 lety +1

      त्यामुळे त्याला फुले लागत नाही

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      फुले न लागण्याची दोन कारणे असू शकतात - १) झाडाला अतिरिक्त पाणी देणे
      २) जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर, लागलेली फुले गळतात व फळाचा आकार वाढत नाही.
      - तुमच्याकडे असलेल्या झाडाला पाण्याच्या ताणावर जाऊ द्या, म्हणजे नत्र: कर्ब गुणोत्तर समतोल होऊन फुले व फळे लागतील.
      - झाडाच्या मुळांच्या कक्षेत गोलाकार म्हणजे रिंग पद्धतीने सेंद्रिय खते अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ये द्या.

    • @shobhasudrik2614
      @shobhasudrik2614 Před 2 lety +1

      @@rspatilkrishimantra धन्यवाद🙏🙏

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd Před rokem +1

    साहेब पाच वर्षाचीमोठी मोठीझाडे शेंड्याकडून वाळतआहे .बुंध्यातून डिंक निघत आहेपाना भुईमुगाच्या पानाप्रमाणेकरपून गेलीआहेत काय करावे .

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem +1

      तिथे बागेत कुठे वाळवी किंवा वारूळ असेल तर ते प्रथम नष्ट करा. तसेच जमिनीत कॅल्शिअम चे प्रमाण १०% पेक्षा जास्त असेल तरीही झाडे वाळू शकतात. आता डिंक्या या बुरशीजन्य रोगासाठी मेटालॅक्सील किंवा फोसाटाईल या बुरशीनाशकाची आळवणी तसेच झाडावर फवारणी करून घ्या.

    • @MB-lw4fd
      @MB-lw4fd Před rokem +1

      @@rspatilkrishimantra 🙏

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 Před 5 měsíci

    फळा ची साईज कशी वाढेल

  • @shivajigaikwad4730
    @shivajigaikwad4730 Před 2 lety +1

    सप्टेंबर महिन्यात लिवोसीन ची फवारणी केली आहे पण आता बागेत खूप पाणी आहे काय करावे लागेल?

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      पाणी शेताच्या बाहेर काढून द्यावे व आणखी एक लिव्होसीन ची फवारणी घ्यावी.

    • @kanif8405bhos
      @kanif8405bhos Před 2 lety

      Livocin August and sept. madhe sadharanpane kiti date chya aaspaas karne garjeche ahe

  • @suvarnajangam865
    @suvarnajangam865 Před 2 lety +1

    लेंडी खत कसे तयार करावे व पाण्याचे. व्याव स्थापन कसे करावे कृपया मार्गदर्शन करावे

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      लेंडी खत एका सपाट जागेवर झाडाच्या किंवा शेड च्या सावलीमध्ये टाकून त्यावर ट्रॅक्टर फिरवा, म्हणजे त्याची पावडर तयार होईल. नंतर, एक टन लेंडी खतासाठी त्यात सिंगल सुपर फॉस्फेट 10 किलो, 8 किलो युरिया, वेस्ट डीकॉम्पोझर कल्चर 100 लिटर (पावडर असेल तर, 1 किलो) किंवा एस -9 कल्चर 1 लिटर, झिंक सल्फेट 2 किलो, फेरस सल्फेट 2 किलो, गंधक 10 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, बोरॉन 500 ग्रॅम हे सर्व घटक एकजीव करून घ्यावेत. या मिश्रणाचा ओलावा 30 ते 35 टक्के एवढा 8 ते 10 दिवस ठेवावा. नंतर हे तयार झालेले लेंडी खत आपण वापरू शकता.

    • @suvarnajangam865
      @suvarnajangam865 Před 2 lety

      धन्यवाद 🙏

  • @hrishikeshdeore1718
    @hrishikeshdeore1718 Před 2 lety +1

    आता जर हस्त बहाराचे नियोजन केले तर चालेल का

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      जून पासून हस्त बहराचे नियोजन करावे.

  • @krishnaphad3328
    @krishnaphad3328 Před 2 lety +1

    सर माझ्या झाडांना सध्या ला लिंबू लागलेले आहे ..लवकर मार्केट मध्ये आण्यासाठी सर फळ लवकर मोठे होण्यासाठी उपाय सांगा सर

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety +3

      ५ ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे ००:००:५० ची फवारणी करा, सोबत बोरॉन १ ग्राम प्रति लिटर पाणी घ्या.

    • @FVBU1DK4jo887N_jGA
      @FVBU1DK4jo887N_jGA Před 9 měsíci

      हस्त बहर म्हणजे काय?
      मार्च एप्रिल मे महिन्यात जे लिंबु विक्रीस येते त्यास लिंबु हस्त बहारातील योग्य नियोजनातून मिळाले असते.उन्हाळ्यात लिंबाला बाजार नेहमीच्या बाजारभावापेक्षा अधिक असते आणि याच दिवसात आपल्याकडे लिंबु बागेत लिंबु नसते.लिंबु का नसते तर हस्त बहराचे योग्य नियोजनाचा अभाव ,कोणाच्याही सांगण्यावरून औषधाचा बेसुमार वापर ,परिणामी हानिकारक औषधे फवारल्याने बागेतील मधमाशी नाहीसे होणे या मधमाशीमुळे परागीभवन व्यवस्थित होत असते आणि तेच हानिकारक कीटक नाशकामुळे नाहीसे होतात .या सर्व अघोरी उपाय योजनेमुळे लिंबाचा हस्त बहर आपण गमवुन बसवतो.
      या सर्व गोष्टींचा गेली ४ वर्षे अभ्यास केल्यावर‌ असे लक्षात येते की हस्त बहर व्यवस्थापन करण्यास आपण कमी पडतो म्हणून लिंबु उत्पादक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ने लिंबु स्पेशल हस्त बहर व्यवस्थापन किट आणले आहे.
      या किट मध्ये
      ४ फवारणी प्रत्येक फवारणी पहिली फवारणी पासुन ५ दिवसांनी घेयाची.
      उन्हाचे तापमान ३०डिग्री सेल्सिअस च्या आतच फवारणी घेणे .
      आळवणी २ आहेत
      पहिली फवारणी झाली की लगेच त्याच दिवशी की दुसर्या दिवशी आळवणी सोडावी .
      पहिली आळवणी नंतर ५ दिवसांनी दुसरी आळवणी द्यावी .
      हा सर्व‌ प्रोग्राम २० दिवसांचा आहे .या किट व्यतिरिक्त बागेत काहीही फवारून नये अथवा कोणतेच वर खत टाकवु नये .
      किटसाठी संपर्क करा.
      8766437619

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 Před rokem +1

    Aasitone kite ghacha dada

  • @dhananjayshinde6680
    @dhananjayshinde6680 Před rokem +1

    सर लिंबूनी झाड पिवळी का पडत आहे

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem +1

      सध्याच्या वातावरणामुळे पिवळेपणा येऊ शकतो. त्यासाठी १९:१९:१९ ची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्या. सोबत बुरशीनाशक फवारणी सुद्धा घ्या. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली नसतील तर शेणखतात मिसळून प्रत्येक झाडाच्या मुळाजवळ रिंग पद्धतीने द्या.

  • @mets_school
    @mets_school Před 2 lety +2

    यामध्ये सप्टेंबर पासून पाणी देणे बंद करावे का ?

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      झाडावर मृग बहार नसेल तर, पाणी बंद केले तर चालेल

    • @mets_school
      @mets_school Před 2 lety +2

      आत्ता फुले आहेत ? काय करावे मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      या वर्षी आहे तसा बहार राहू द्या. पुढच्या वर्षी हस्त बहार चे नियोजन व्हिडिओ मध्ये सुचाविल्याप्रमाणे करा.

  • @dilipagale9074
    @dilipagale9074 Před 2 lety +1

    फांनदया खुप वाळत म्हणजे सोकत आहेत उपाय सांगा.

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      शेतात पाणी साचून राहिल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव झाला असावा, याकरिता फोसेटाईल अल्युमिनयम ८०% डब्लूपी हा क्रियाशील घटक असलेल्या बुरशी नाशकाची (व्यापारी नाव - एलीएट) आळवणी करा. तसेच १% डीएपी (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी घ्या.

  • @hrishikeshdeore1718
    @hrishikeshdeore1718 Před 2 lety +2

    सर कँकर चे नियंत्रण कसे करावे कोणती फवारणी घेयायची कँकर हा जातच नाही आहे बागेतुन

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety +1

      कॉपर ऑक्सीक्लोराईड २.५ ग्रॅम प्रति लिटर +. स्ट्रेप्टोसायक्लीन ६ ग्रॅम प्रति ५० लिटर पाणी
      याच्या दोन फवारण्या ८ ते १० दिवसांनी घ्याव्यात. तसेच झाडाच्या खोडांना बोर्डो मिश्रणाची पेस्टींग करावी.

  • @rameshkirtane3733
    @rameshkirtane3733 Před rokem +1

    सर लीबु ऊनाळात येनासाठी कधी धरावे

  • @aslampathan555
    @aslampathan555 Před 11 měsíci +1

    सर माझी बाग सहा वर्षे झाली आहेत त्या ला कळी फुलली आहे 😢 ऑक्टोबर महिन्यात कळी निघेल यासाठी काय करावे

    • @aslampathan555
      @aslampathan555 Před 11 měsíci

      उपाय सांगा 😢

    • @aslampathan555
      @aslampathan555 Před 11 měsíci

      सर तुमचा नंबर मिळेल का

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 11 měsíci

      पाण्याचे व खतांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे..
      आपण अधिक माहतीसाठी rspatil599@gmail.com या मेल वर संपर्क करू शकता.

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 Před rokem +1

    Amchya limbala limbu alet ly pn pikat ny upay saga

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem

      योग्य खत व्यवस्थापन करा

    • @narayandhanawade1548
      @narayandhanawade1548 Před rokem +1

      Khat pani galun sudha pikat nahit k br

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem

      लिंबू बागेच्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण अधिक असू शकते.

  • @tanajiyadav5470
    @tanajiyadav5470 Před rokem +1

    सर 100 लिटर पाण्यात 1 ग्रॅम म्हणजे 10 ppm

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem

      हो, बरोबर

    • @FVBU1DK4jo887N_jGA
      @FVBU1DK4jo887N_jGA Před 9 měsíci

      हस्त बहर म्हणजे काय?
      मार्च एप्रिल मे महिन्यात जे लिंबु विक्रीस येते त्यास लिंबु हस्त बहारातील योग्य नियोजनातून मिळाले असते.उन्हाळ्यात लिंबाला बाजार नेहमीच्या बाजारभावापेक्षा अधिक असते आणि याच दिवसात आपल्याकडे लिंबु बागेत लिंबु नसते.लिंबु का नसते तर हस्त बहराचे योग्य नियोजनाचा अभाव ,कोणाच्याही सांगण्यावरून औषधाचा बेसुमार वापर ,परिणामी हानिकारक औषधे फवारल्याने बागेतील मधमाशी नाहीसे होणे या मधमाशीमुळे परागीभवन व्यवस्थित होत असते आणि तेच हानिकारक कीटक नाशकामुळे नाहीसे होतात .या सर्व अघोरी उपाय योजनेमुळे लिंबाचा हस्त बहर आपण गमवुन बसवतो.
      या सर्व गोष्टींचा गेली ४ वर्षे अभ्यास केल्यावर‌ असे लक्षात येते की हस्त बहर व्यवस्थापन करण्यास आपण कमी पडतो म्हणून लिंबु उत्पादक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ने लिंबु स्पेशल हस्त बहर व्यवस्थापन किट आणले आहे.
      या किट मध्ये
      ४ फवारणी प्रत्येक फवारणी पहिली फवारणी पासुन ५ दिवसांनी घेयाची.
      उन्हाचे तापमान ३०डिग्री सेल्सिअस च्या आतच फवारणी घेणे .
      आळवणी २ आहेत
      पहिली फवारणी झाली की लगेच त्याच दिवशी की दुसर्या दिवशी आळवणी सोडावी .
      पहिली आळवणी नंतर ५ दिवसांनी दुसरी आळवणी द्यावी .
      हा सर्व‌ प्रोग्राम २० दिवसांचा आहे .या किट व्यतिरिक्त बागेत काहीही फवारून नये अथवा कोणतेच वर खत टाकवु नये .
      किटसाठी संपर्क करा.
      8766437619

  • @sharadghalke2336
    @sharadghalke2336 Před 2 lety +1

    पाणावर कर्प्या पडायला लागलाय।तर lihocin सोबत कर्प्या वरचे फवारले तर चालेल का आणी चालत असेल तर काय फवारावे

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety +2

      करपा साठी वापरणारे बुरशीनाशक कॉपर युक्त असेल तर त्यासोबत लिओसीन नाही चालणार..

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety +1

      शक्यतो लिवोसिन च्या फवारणी सोबत बुरशीनाशक घेऊ नका

    • @sharadghalke2336
      @sharadghalke2336 Před 2 lety +1

      धन्यवाद सर

    • @sharadghalke2336
      @sharadghalke2336 Před 2 lety

      Antracol चालेल का

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety +1

      घ्या

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 Před 10 měsíci +1

    सर जास्त पाऊस असल्यास काय करावे

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 10 měsíci

      बागेतून पाणी बाहेर काढून देण्याची व्यवस्था करावी. दुसरा पर्याय नाही.

  • @hrishikeshdeore1718
    @hrishikeshdeore1718 Před 2 lety +1

    आता जर लिव्होसीन ची फवारणी केली तर चालेल का

  • @pravinborse7611
    @pravinborse7611 Před 2 lety +1

    पाणी व्यवस्थापन सांगा सर

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      czcams.com/video/Q9ag7rP6WbE/video.html
      वरील लिंक वर क्लिक करून फळबाग पाणी व्यवस्थापन व्हिडिओ बघा

  • @rajpalyadav7635
    @rajpalyadav7635 Před 2 měsíci +1

    Bhai hindi mai video banaye

  • @ramdasbchondhe
    @ramdasbchondhe Před rokem +1

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे फवारणी केली पण आत्ता फुलं आली नाहीत.

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem

      बागेला पाण्याचा योग्य ताण बसला नसेल.

    • @FVBU1DK4jo887N_jGA
      @FVBU1DK4jo887N_jGA Před 9 měsíci

      हस्त बहर म्हणजे काय?
      मार्च एप्रिल मे महिन्यात जे लिंबु विक्रीस येते त्यास लिंबु हस्त बहारातील योग्य नियोजनातून मिळाले असते.उन्हाळ्यात लिंबाला बाजार नेहमीच्या बाजारभावापेक्षा अधिक असते आणि याच दिवसात आपल्याकडे लिंबु बागेत लिंबु नसते.लिंबु का नसते तर हस्त बहराचे योग्य नियोजनाचा अभाव ,कोणाच्याही सांगण्यावरून औषधाचा बेसुमार वापर ,परिणामी हानिकारक औषधे फवारल्याने बागेतील मधमाशी नाहीसे होणे या मधमाशीमुळे परागीभवन व्यवस्थित होत असते आणि तेच हानिकारक कीटक नाशकामुळे नाहीसे होतात .या सर्व अघोरी उपाय योजनेमुळे लिंबाचा हस्त बहर आपण गमवुन बसवतो.
      या सर्व गोष्टींचा गेली ४ वर्षे अभ्यास केल्यावर‌ असे लक्षात येते की हस्त बहर व्यवस्थापन करण्यास आपण कमी पडतो म्हणून लिंबु उत्पादक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ने लिंबु स्पेशल हस्त बहर व्यवस्थापन किट आणले आहे.
      या किट मध्ये
      ४ फवारणी प्रत्येक फवारणी पहिली फवारणी पासुन ५ दिवसांनी घेयाची.
      उन्हाचे तापमान ३०डिग्री सेल्सिअस च्या आतच फवारणी घेणे .
      आळवणी २ आहेत
      पहिली फवारणी झाली की लगेच त्याच दिवशी की दुसर्या दिवशी आळवणी सोडावी .
      पहिली आळवणी नंतर ५ दिवसांनी दुसरी आळवणी द्यावी .
      हा सर्व‌ प्रोग्राम २० दिवसांचा आहे .या किट व्यतिरिक्त बागेत काहीही फवारून नये अथवा कोणतेच वर खत टाकवु नये .
      किटसाठी संपर्क करा.
      8766437619

  • @hrishikeshdeore1718
    @hrishikeshdeore1718 Před 2 lety +2

    लिंबुची फुगवन करण्यासाठी काय करावे लागेल?

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      ००:५२:३४ अथवा ००:००:५० या विद्राव्य खताची फवारणी ५ ग्रॅम प्रति १ लिटर पाणी याप्रमाणे करावी.
      अथवा
      ठिबक सिंचन व्यवस्था असल्यास आठवड्याला ५ किलो प्रति एकर ००:५२:३४ अथवा ००:००:५० ठिबक द्वारे झाडाला द्यावे.

  • @minalpatil9561
    @minalpatil9561 Před 2 lety +1

    तुम्ही आता जे सांगताय हे किती झाडा्साति फवारणी चे प्रमाण आहे

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety +1

      फवारणीसाठी औषधाचे प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी आहे.

  • @sharadghalke2336
    @sharadghalke2336 Před 2 lety +1

    सर आता जून महिन्याची GA ची फवारनी केली आहे।पन बागेत आता फुल लागलेत् थोड़े थोड़े।तर आता नविन फुल तर लागणार नाहि ना

  • @harshadgaikwad9056
    @harshadgaikwad9056 Před 8 měsíci +1

    ल फांद्या खूप जळतात सर

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 8 měsíci

      जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असू शकते किंवा वाळवी कीड असू शकते. त्यानुसार उपाय करावेत.

  • @ravindragavhane4228
    @ravindragavhane4228 Před rokem +1

    Sir tumcha no daay

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem

      आपले काही प्रश्न असल्यास कृपया ईमेल करावा. rspatil599@gmail.com
      उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

  • @harishdave9841
    @harishdave9841 Před 2 lety +1

    जून महिन्यत जी ए ची फवारणी केली नाही तर पुढील लिवोसिन किंवा चमत्कार ची फवारणी आता केली तर चालेल का?

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před 2 lety

      मृगाचा बहार आणि फळे नसायला पाहिजे झाडावर तरच लिव्होसिन वापरा, नाहीतर पुढच्या वर्षासाठी हस्त बहराचे नियोजन केले तर योग्य राहील.

  • @somnathgaykwad5322
    @somnathgaykwad5322 Před rokem +1

    सर नंबर पाटवा

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem

      आपले काही प्रश्न असल्यास ईमेल करा.

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 Před 2 lety +2

    Chhan

  • @somnathgaykwad5322
    @somnathgaykwad5322 Před rokem

    सर नंबर पाटवा

    • @rspatilkrishimantra
      @rspatilkrishimantra  Před rokem

      आपल्याला काही विचारायचे असल्यास कृपया इमेल करा