होशियार... अत्रे उवाच.... झाला 'च' पाहिजे !

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाच्या स्वातंत्र्याची पहाट उगवली , भाषावार प्रांतरचनाही झाली, मात्र अनेक वर्षे लोटली, तरी मराठी भाषिकांना आपलं हक्काचं राज्य मिळत नव्हतं. ह्याउलट द्वैभाषिक राज्याच्या माध्यमातून आपल्यावर अन्यायच केला जातोय , हे लक्षात आल्यावर अवघा मराठी माणूस जागा झाला, आणि १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाची किंमत मोजून , १ मे १९६० रोजी , संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.
    ह्या संपूर्ण लढ्यात सर्व मराठीजनांना एकत्र आणून त्यांच्यात मराठी अस्मितेचा हुंकार फुलवणाऱ्या आचार्य अत्रे आणि शाहीर अमरशेख , ह्या दोन दिग्गजांचं आज महाराष्ट्रदिनी स्मरण करूया .
    " मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला'च' पाहिजे " ह्या घोषणेसह ' मराठा ' ह्या वृत्तपत्रातून रोजच्या अग्रलेखांमधून अत्र्यांनी हा संघर्ष धगधगता ठेवला,
    तर शाहिरांनी " मुंबईसह बेळगाव, गदग , हुकेरी , गोकाक , कारवार , निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ' ह्या घोषणेतून जणू बृहदमहाराष्ट्रनिर्मितीचं स्वप्नच महाराष्ट्रीय जनतेसमोर ठेवलं .
    ह्या दोन्ही दिग्गजांच्या अफाट कर्तृत्वाचा मागोवा त्यांच्या कलाविष्कारातून घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्न 🙏
    जय महाराष्ट्र !!!
    .....
    Pic courtesy - संयुक्त महाराष्ट्र चळवळ fb page, google stock photos
    Music: Youth
    Musician: @iksonmusic
    ......
    Follow us on
    Instagram
    / akashaypaatra_1
    CZcams
    / @akshaypaatra8990
    Facebook
    / profile.php
    #akshaypaatra #maharshtraday #achryaatre #shahiramarshaikh

Komentáře • 6

  • @jayantghate8613
    @jayantghate8613 Před 4 měsíci

    वा समर्थ खूप छान खूप खूप शुभेच्छा 🎉 ❤

  • @shivanigondal2566
    @shivanigondal2566 Před 4 měsíci

    आवाज आणि स्क्रिप्ट छान आहे 👌👌..पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹💐💐

  • @kajalkiran1694
    @kajalkiran1694 Před 4 měsíci

    खूपच छान !