बार्शीच्या ठोंबरे यांचा सुपर गोल्डन सीताफळ ब्रँन्ड !

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 01. 2019
  • #YesNewsMarathi #thombresitafal #supergoldensitafal
    सोलापूर : बार्शी भगवंतांची नगरी. मराठवाड्याचं प्रवेशद्वार.. याच बार्शीने राज्याला अनेक नेते आणि प्रशासकीय अधिकारी दिलेत. इथल्या उद्योजकांनी, शेतकर्‍यांनी आपल्या उत्पादनावर ठसठशीत मोहोर उमटवली आहे.
    कष्ट हेच भांडवल समजून आपल्या घामाच्या जोरावर ठोंबरे कुटुंबीयांनी खामगावात सीताफळाची शेती करून आपला ब्रॅन्ड तयार केला आहे. गुणवत्ता, प्रयोगशीलता, मार्केटींग नॉलेज याचा मिलाप घालून त्यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
    बार्शीमधील खामगाव हा त्यांचा फार्म हाऊस आता जणू शेतकर्‍यांसाठी एक प्रयोगशाळाच बनली आहे. नाविन्यपुर्ण प्रयोग करीत ठोंबरे बंधूंनी सीताफळामध्ये बार्शीचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. त्यांचे सीताफळ आकर्षक तर आहेच, शिवाय वजनाला देखील एक-एक किलो भरत आहेत. त्यांचा हा प्रयोग निश्‍चित कौतुक करण्या सारखा आहे. पहा...ठोंबरे यांची सीताफळाची शेती
    सोलापूर जिल्ह्यात बार्शीपासून अवघ्या 13 किलोमीटरवर खामगाव आहे. कांदा, भाजीपाला या पिकांची खामगावात पहिल्यापासून आघाडी आहे. खामगाव सिलेक्शन नावाच्या कांद्याच्या अनुषंगाने काही वर्षांपुर्वी या गावाने मोठे नाव कमावले होते. याच गावातील प्रयोगशील शेतकरी राजेंद्र आणि उद्योजक संतोष या ठोंबरे बंधूनी कष्टातून सीताफळाची शेती केली.
    राजेंद्र स्वत: पुर्णवेळ शेती पाहतात तर संतोष व्यवसायात मग्न असतात. दोन्ही बंधूंना पहिल्यापासूनच शेतीत सर्वाधिक रस असल्याने सातत्याने नवे प्रयोग ते करीत असतात. आधुनिक पद्धती आणि नवतंत्रज्ञानाचा वापर हे त्यांच्या शेतीचे वैशिष्टय राहिले आहे. ठोंबरे यांची 20 एकर शेती आहे. त्यात सर्वाधिक 10 एकरांवर सीताफळ आहे.
    पुर्वी ठोंबरे यांची द्राक्षबाग होती. द्राक्षशेतीत मजूर खर्च अधिक होता. एकरी उत्पादन व दर यांचा मेळ बसत नव्हता. त्यातच दोन वर्षांपुर्वी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेले उत्पादन पुर्ण नुकसानीत गेले. मोठा फटका बसला होता मात्र यातून सावरणे गरजेचे होते. प्रतिकूल परिस्थितीतून कायमचा तोडगा काढणे गरजेचे होते. त्यादृष्टीने मग सीताफळाचा विचार त्यांनी केला.
    गेल्यावर्षी आंतरपीक म्हणून घेतलेल्या सोयाबीनचे एकरी तीन क्विंटल तर हरभर्‍याचे चार क्विंटल उत्पादन मिळाले. त्यातून पहिल्यावर्षी मुख्य बागेचा वरखर्च किमान भागला. एकुणच खते आणि कीडनाशके यांच्या अनुषंगाने खर्च कमी राहिला.
    खर्च उत्पादन
    पहिल्या वर्षी रोपे व ठिबक असा 70 हजार रूपये खर्च झाला. त्यावेळी प्रतिझाड उत्पादन 8 ते 9 किलो मिळाले. यंदाचे उत्पादन सुमारे 10 एकरात 19 टन आहे. अजून सुमारे 15 टन उत्पादनाची आशा आहे. सीताफळाचा बहर संपत आल्याने दर चांगले मिळत आहेत. हैद्राबादच्या मार्केटमध्ये त्यांना किलोला 125 ते कमाल 160 रूपये दर मिळाला.
    पॅकिंग, ब्रॅन्डींग
    सीताफळाच्या पॅकिंग आणि ब्रॉण्डिंगकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी ठोंबरे फार्म अँन्ड नर्सरी नावाने खास ब्रँन्ड तयार केला आहे. दोन, चार, सहा नगांचे छोटे आणि आवश्यकतेनुसार 20 किलो वजनाचे बॉक्स पॅकिंगसाठी उपलब्ध केले आहेत. बॉक्स हाताळताना कोठेही खराब होऊ नयेत याची काळजी घेतली आहे. सीताफळाला दिल्ली, बंगळूर, हैद्राबाद, पुणे, मुंबई बाजारपेठा चांगल्या आहेत.
    शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या या सीताफळाची रोपे देखील नर्सरीमध्ये वाढून हजारो शेतकर्‍यांसाठी दिली जात आहेत. ज्यांना याच वाणाच्या सीताफळाची रोप हवी आहेत त्यांनी खामगावच्या ठोंबरे फार्म हाऊसमध्ये मो.9011915959 या क्रमांकावर संपर्क साधावा.
    ★Follow us, Share, Support★
    Website:- yesnewsmarathi.com/
    Facebook:- / yesnewsmarathi
    Twitter:- / yesnewsmarathi
    ★Contact us★
    mobile- 9881748329
    Email:- yesnewsmarathi@gmail.com
    येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Komentáře • 40

  • @dattatraydhope6418
    @dattatraydhope6418 Před 5 lety +18

    नवनाथ कसपटेच्या नर्सरीला सुध्दा अजून शासकीय मान्यता नाही.आपल्या नर्सरीला ती शासकीय मान्यता आहे का ? असेल तर ते जाहीर करा कारण शेतकरी फसवला जातोय शेतकरी लोकांना अनुदान मिळत नाही, आणि रोपांची किंमत पण सांगून टाकाकी एकदाची

    • @baliramdongare9753
      @baliramdongare9753 Před 5 lety +4

      चांगला प्रश्न विचारला आहे, शेतकर्‍यांच्या हिताचा प्रश्न विचारल्या बद्दल धन्यवाद

    • @KG-km8st
      @KG-km8st Před 4 lety

      Than what is the honest solutions.

  • @umeshkarale1074
    @umeshkarale1074 Před 5 lety +2

    तुमची सीताफळाची बाग अप्रतिम

  • @vikrampatilshelke4624
    @vikrampatilshelke4624 Před 4 lety

    Very nice

  • @sunilmuchwad9924
    @sunilmuchwad9924 Před 2 lety

    12 महिणे फळ लागणारे सिताफळ रोप उपलब्ध आहे का

  • @farmbhagavantdarshan4513

    🌳🌳🌳🌳🌳

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 Před 5 lety +7

    मी एक सामान्य शेतकरी आहे, मी रेशीम उद्योग सुरू केलता पण त्यात काही परवडल नाही. आता सिताफळ लागवड करावी वाटते पण परवडेल की नाही तेच कळत नाही.

  • @ganeshshedge6135
    @ganeshshedge6135 Před 5 lety +5

    अंतर किती ठेवायचं

  • @sunilmuchwad9924
    @sunilmuchwad9924 Před 2 lety

    सिताफळ रोपांची किंमत काय आहे

  • @user-jg5hm5tw6y
    @user-jg5hm5tw6y Před 5 lety +1

    Bav 1 kyare podoka

  • @vaijinathmisal5043
    @vaijinathmisal5043 Před 3 lety

    सिताफळ लागवड करायची आहे

  • @prakashchavan1740
    @prakashchavan1740 Před 4 lety

    what is the cost of plant? I wish to plant 500 initially

  • @tanujajoshi1661
    @tanujajoshi1661 Před 5 lety +1

    मुंबई त रोप कुरियर ने पाठवु शकता का ?

  • @vijaykumarsingh1494
    @vijaykumarsingh1494 Před 3 lety

    Hme 100 powda cahiye mee bihar ka rhne wala hu mee hindi jantahu.
    Aap ki vasa hmare smgh me nhi aata.
    Apna beenk khata nmbr veje.powda ka ret(kimt)kya hai.wovi btaye.

  • @ganeshshedge6135
    @ganeshshedge6135 Před 5 lety

    Price for sitafal

  • @rajabhaugiri249
    @rajabhaugiri249 Před 4 lety

    सर मला 2एकर सीताफळ लागवड करायची आहे .पण त्यासाठी अनुदान किती असते व त्याची प्रोसेस तुम्ही करता का ...

  • @madhavbagfarmnursarynursar4532

    Sagale fal he balanagari ahe.. thoda tya madhe Uttam shodhun sagale vegvegale nav theun aapn jat nirman keli asa dava karat ahe.. residue ,nmk 1, super goldan sagale balanagriche plant ahe...fasavale jau naka

  • @somnathaher5098
    @somnathaher5098 Před 5 lety

    बियाणे मिळेल का आनी बियाणाची किंमत काय आहे

  • @drdattatrayakhune6807
    @drdattatrayakhune6807 Před 5 lety +2

    Ropachi kimat kay

  • @shankarmane3381
    @shankarmane3381 Před 4 lety

    सर मला पण लागवड कराची आहे रोप किती रुपयाला आहे

  • @user-jg6bw3wg7m
    @user-jg6bw3wg7m Před 4 lety

    काय रुपये आहे एक कलम. वीडियो मध्ये किम्मत सांगा. सगळ्यांना माहिती होईल. फोन सगळ्यांना करायची गरज पडणार नाही

  • @vikasgaikwad5928
    @vikasgaikwad5928 Před 3 lety

    लागन किती भाय असावी

  • @omkarnursery1686
    @omkarnursery1686 Před 5 lety +11

    शासन मान्य नर्सरी
    🌲🌲ओमकार नर्सरी🌳🌳
    पिंपरी राजा तालुका जिल्हा औरंगाबाद.
    आमच्याकडे खालील प्रमाणे कलमे/रोपे उपलब्ध आहे. तसेच लागवडी सहित ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील. घरपोहोच सेवा
    1)🍊🍊
    मोसंबी(न्यू शेलार जमबेरी खुंट)50 _₹
    मोसंबी (न्यू शेलार रंगपूर लाइम) 60_ ₹
    मोसंबी काटुन गो्ड 70 _₹
    2) 🥭🥭
    आंबा केशर ,दशहरी ,लंगडा, रत्ना 40/80_₹(उंचीनुसार)
    3) 🍇🍇
    जांभूळ (कोकण बहाडोली) 70_ ₹
    4)
    सिताफळ सुपर गोल्डन 35_ ₹
    सीताफळ बालानगर व चांद सिली 30 _₹
    5)
    अंजीर बेंगलोर व दिनकर 45_ ₹
    6)
    लिंबू साई सरबती कागदी 25 _₹
    7)
    चिकू कालीपत्ती 70_₹
    8)
    पेरू लखनऊ _(49) व सरदार 35 _₹.
    VNR 100_₹
    G -विलास 40_₹
    थाई 1Kg 40_₹
    9)
    एप्पल बोर
    ग्रीन एप्पल 25_₹
    रेड एप्पल 25_₹
    काश्मिरी एप्पल, सिंदुरी एप्पल 90_₹
    🌴🌴🌴आमचा पत्ता ओमकार रोपवाटिका पिंपरी राजा औरंगाबाद महाराष्ट्र पिन नंबर👒 431007
    मोबाईल नंबर 9604928856/9711101211/98881757194🌱🌱🌱🌱

    • @yugpravartakvlogs8185
      @yugpravartakvlogs8185 Před 4 lety +1

      रोप सांगलीस पोहच करायची व्यवस्था आहे का गोल्डन सीताफळ

    • @deepakbadgujar5741
      @deepakbadgujar5741 Před 4 lety

      Sir khup chhan mahiti Dili... 🙏🏻

    • @Patil504
      @Patil504 Před 4 lety

      Bhettto bhau..

    • @trimbakkatkar7614
      @trimbakkatkar7614 Před 4 lety

      मोसंबी 300 कलम (रंगपूर) जून महिन्यात पाहिजेत,
      हिशोबाने दर लावले तर घेऊ.

    • @manojborkar1306
      @manojborkar1306 Před 4 lety

      रोपांची किंमत किती आहे व अनुदान किती मिळते

  • @vitthalpatil1457
    @vitthalpatil1457 Před 5 lety

    Shitafal

  • @chandrakantdeshmukh5853

    रोपे विक्रीसाठी व्हिडिओ बनवू नका तर या जातिच्या फळा मघे पिक्ल्ल्यावर आळया का निघतात याचा अगोदर व्हिडिओ बनवून शेतकरयाणा मार्गदर्शन करा