⁠ मराठा मंडळ सामाजिक संस्था नोंदणी, मुंबई(रजि.)

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 02. 2024
  • मराठा मंडळ सामाजिक संस्थेची स्थापना दि. ३०/०९/२०२२ रोजी करण्यात आली व नोंदणी क्र.- बृहन्मुंबई/००५४४/२०२३ अन्वये नोंदणी करण्यात आली. संस्थेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत व सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. मराठा समाजाची पार्श्वभूमी, ग्रामीण व शहरी भागातील मराठा समाजाची सद्यपरिस्थिती, मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील असलेले योगदान ह्या सर्व बाबी पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील मराठा समाजाचे अधिकारी व कर्मचारी संघटित करून एकमेकांना मदत करणे व समाजाचा विकास करणे, हे मंडळाचे ध्येय आहे.
    महाराष्ट्रातील, तळागाळातील व ग्रामीण भागातील, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले व सेवा निवृत्त झालेले, मराठा समाजाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, ज्यांची समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे, अशा भगिनींनी व बांधवांनी मंडळांमध्ये नोंदणी करावी, ही विनंती.

Komentáře •