कडेवर नातू.. एकनाथांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा..

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2022
  • कडेवर नातू.. एकनाथांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा..
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा..
    आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली. यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी श्री. मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी सौ. जिजाबाई नवले या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मनाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला.
    यंदा राज्यभरात चांगल्या पावसाला सुरुवात झालेली असल्याने सगळीकडे पेरण्या सुरू झाल्या आहेत. काहीसा उशिरा का होईना पण राज्यातील शेतकरी सुखावला आहे. हा पाऊस असाच कायम राहून सगळीकडे उत्तम पीकपाणी येऊ देत तसेच राज्यातील बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ देत हीच मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पांडुरंगाच्या चरणी केली.
    यानंतर झालेल्या मंदिर समितीच्या कार्यक्रमात देखील त्यांनी सहभागी होऊन पंढरपूर शहराचा तिरुपतीच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करून सादर करण्याचा सूचना संबंधित अधिकाऱ्याना दिल्या.
    विशेष म्हणजे महापुजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते मानाचे वारकरी असलेल्या नवले पती पत्नीचा यथोचित सन्मान करण्यात आला.
    यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांच्यासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह- अध्यक्ष ह.भ. प. श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. गजानन गुरव आणि मंदिर समितीचे इतर सदस्य देखील उपस्थित होते.
    #ThaneLive #eknathshinde

Komentáře • 25

  • @ankushkapse3917
    @ankushkapse3917 Před 2 lety +15

    काय ते विठू माऊली, काय तो थाट सजावट, आणि पूजेला एकनाथ राव, सगळ कस एकदम Ok मधी हाय...!

  • @ommehta3442
    @ommehta3442 Před 2 lety +3

    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...🙏 पूजा फारचं सुंदर केली.... 🙏🚩

  • @srushteeeng
    @srushteeeng Před 2 lety +3

    जय जय राम कृष्ण हरी 🌿
    माझि विठू माउली
    पांडुरंग हरी 🌿🪔🚩🙏

  • @shnkB446
    @shnkB446 Před 2 lety +4

    निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई...
    एकनाथ...
    नामदेव, तुकाराम

  • @aniket6980
    @aniket6980 Před 2 lety +9

    अस वाटतंय अडीच वर्षांनी राज्याला मुख्यमंत्री लाभलाय

    • @Babasaheb777-Ramu1
      @Babasaheb777-Ramu1 Před 2 lety

      Feku

    • @oms.gvlogs2793
      @oms.gvlogs2793 Před 2 lety

      जो माणूस आपल्या पक्षाचा नाही बनू शकला तो सामान्य जनतेचा कसा होऊ शकतो? त्यांनी पदा साठी गदारी केली ते उद्या जनतेसी पण गदारी करायला मागे पुढे बगणार नाही हे जनतेने लक्षात असुंद्या जय महाराष्ट्र

    • @sangitabambale777
      @sangitabambale777 Před 2 lety

      गद्दार अनाजीपंत व शिर्के वाटोळच करणार ईतिहास साक्षीदार आहे

  • @pranavkenjale4557
    @pranavkenjale4557 Před 2 lety +1

    महापूजा एकदम ok 👍🙏

  • @Digambarpawar-n3d
    @Digambarpawar-n3d Před 2 lety

    माऊली

  • @smitadeshpande5135
    @smitadeshpande5135 Před 2 lety

    Ram Krishna hari

  • @somnathpatil6628
    @somnathpatil6628 Před 2 lety +6

    sarkar tikel ka nahi he mahiit nahi pn , Ya aashadhi Ekadashi chi pooja CM Eknath shinde yanchya haatun vhavi hi icchha vithu mauli chi hotii 🙏🙏🚩🚩

  • @pranavkenjale4557
    @pranavkenjale4557 Před 2 lety +3

    राज्यात सुख समरुद्धी ok असुदेत विठ्ठला हीच तुझ्या चरणी प्रार्थना 🙏👍

  • @dashrathhajari8788
    @dashrathhajari8788 Před 2 lety +5

    शिंदे खुप नशीबवान आहे एकाच वेळेस आख्या चार पिढ्याचां उद्धार केला

  • @chandrakantrupnawar6333

    🙏🙏💐

  • @pramodtambat2675
    @pramodtambat2675 Před 2 lety

    🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @vidyaghumare4181
    @vidyaghumare4181 Před 2 lety

    🙏🙏🙏🙏🙏

  • @apeksharathod225
    @apeksharathod225 Před 2 lety

    🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @shivshakti5064
    @shivshakti5064 Před 2 lety

    🙏🚩🌼🌺🚩🙏

  • @pranavkenjale4557
    @pranavkenjale4557 Před 2 lety +1

    रूप तुझं dolyamandi साठलं 🙏

  • @ramchaudhari4822
    @ramchaudhari4822 Před 2 lety

    🚩🙏🚩

  • @rahuljadhav9695
    @rahuljadhav9695 Před 2 lety +1

    Asa Neta hone nahi......

  • @oms.gvlogs2793
    @oms.gvlogs2793 Před 2 lety +1

    जो माणूस स्वतःचा नाही बनू शकला तो देवाचा कधीच नाही बनू शकत

  • @rajendrapatil4084
    @rajendrapatil4084 Před 2 lety

    Saheb changle kam karun dakhava lokana 2.5 warsh

  • @vitthalborude6580
    @vitthalborude6580 Před 2 lety

    विरोध करणारे पक्ष, माणसं जमल्यास मस्जिद पाडणं ,आणि राममंदिर इ,इ,हे2022 मध्ये घडत आहे?विद्वानांनी झोपेची गोळी घेतली आहे का?-हेमा, स्मृती, कंगना, इ,इ.अभयसू मंडळी?