कडेवर नातू,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशी केली सपत्नीक विठ्ठल महापूजा, पंढरपूर CM Vitthal Puja 2022

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2022
  • #EknathShinde #Pandharpur #ashadiekadashi Ashadhi Ekadashi 2022: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक महापूजा
    आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली.
    मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली.
    आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यास राज्य निवडणूक आयोगाने काही अटी व शर्तींवर संमती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होण्याचा मार्ग मोकळा झाला. शनिवारी रात्री उशिरा पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर पहाटे ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी उपस्थित होते.
    आज दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी पावणेबारा वाजता मुख्यमंत्री पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच दुपारी साडेबारा वाजता ते पक्ष मेळाव्यास उपस्थित राहतील.
    शिवसेनेतील बंडखोरीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील एकमेव सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील गेले आहेत. याशिवाय जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राहिलेले शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांड्याचे आमदार तानाजी सावंत हे शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील शिवसेना भक्कम असल्याचा दावा सेनेच्या स्थानिक प्रमुख पदाधिकारी करीत असतानाच करमाळ्याचे सेनेचे माजी आमदार नारायण पाटील हे त्यांचे राजकीय गुरू माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून भाजपच्या वाटेवर आहेत. तर सेनेचे माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, आमदार तानाजी सावंत यांचे बंधू असलेले सेनेचे माजी जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, माढ्याचे संजय कोकाटे, माजी उपजिल्हाप्रमुख करमाळ्याचे महेश चिवटे आदी मंडळी एकनाथ शिंदे यांच्या गटात गेली आहेत.
    या मेळाव्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन घडविण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. त्यासाठी सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांचा पुढाकार महत्त्वाचा मानला जात आहे. पंढरपुरात आषाढी वारीसाठी लाखो वारकरी दाखल होत असताना तेथे सर्व छोट्या- मोठ्या रस्त्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे फलक झळकावण्यात आले आहेत. या फलकांवर आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांची छबीसुध्दा लक्ष वेधून घेत आहे.
    pandharpur,pandharpur wari,pandharpur yatra,pandharpur temple,pandharpur darshan,pandhagpur wari,pandharpur live darshan,pandharpur vitthal mandir,pandharpur vari,pandharpur vitthal,pandharpur wari status,maher majhe he pandharpur,pandharpur ashadhi wari 2022,pandharpur live,pandharpur movie,pandharpur mandir,pandharpur palkhi,pandharpur chi wari,pandharpur warkari,pandharpur wari 2019,pandharpur wari song,pandharpur wari 2022
    eknath shinde,cm eknath shinde,pandharpur,eknath shinde pandharpur,eknath shinde in pandharpur,eknath shinde delhi,eknath shine in pandhapur,cm shinde in pandharpur,eknath shinde news,cm eknath shinde in vitthal rakhumai mandir,pandharpur yatra,chief minister eknath shinde,pandharpur darshan,eknath shinde big announcement for pandharpur warkari,vitthal live darshan pandharpur,eknath shinde cm,eknath shinde sarkar,eknath shinde maharashtra
    Don't Forget to SUBSCRIBE to our CZcams Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ------------------------------------------------------------------- ---------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► CZcams : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Komentáře • 2K

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Před 2 lety +254

    शिंदे साहेब भाग्यवान आहात. एक साधा माणुस आज मुख्यमंत्री बनून विठ्ठलाची शासकीय महापूजा करत आहे हे पाहून आनंद मनात माझ्या मावेना. खरोखरच डोळे आनंदाने पाणावले. तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी व्हाल हीच सदिच्छा आणि शुभेच्छा.

  • @sulochanakushekar2346
    @sulochanakushekar2346 Před 2 lety +249

    खरंच किति सुख आहे असे बघण्याचा देव करो व हा क्षन सर्वाच्या आयुष्यात येवो जे भाग्यवान असतात तेच हे बघतात आन्यथा नाहि जय विठोबा जय रूखमाई

  • @user-ey6gm8bt8c
    @user-ey6gm8bt8c Před 2 lety +147

    सर्वात महत्वाची गोष्ट अशी कि ह्यांच्या कडे पाहून असे वाटते कि हा आपलाच परिवार आहे.. खूप साधं व्यक्तिमत्व आहे साहेबांचं आणि संपूर्ण परिवारा च.. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा नवीन मुख्यमंत्री साहेबास.

    • @shethlokan
      @shethlokan Před 2 lety +2

      Te tyani natwala hatat ghetlay evadh manala bhavtay na khoop

    • @seemagoshi2567
      @seemagoshi2567 Před 2 lety

      साधं कुठे वाटले नाही नवरी सारखा नटल्य होत्या वारकरी संप्रदाय साधा होता cm पिरिवार नाही cm फक्त मिडी य साठी करत होते

    • @ravindraingle748
      @ravindraingle748 Před rokem

      Dev karu nako mahastrach cha votr cha vishvas chat kela

  • @mangeshtathe7789
    @mangeshtathe7789 Před 2 lety +146

    आज तो सुदिन उगवला...
    प्रत्यक्ष विठ्ठलाच्या दर्शनाला एकनाथ पावला...
    आणि इतिहास साक्षी झाला...
    💐🙏 जय हरी विठ्ठल 🙏💐

    • @yogandrajathar2443
      @yogandrajathar2443 Před 2 lety +1

      विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की विठ्ठलाची कृपा उभ्या महाराष्ट्रात करावी

  • @s.t.k.3123
    @s.t.k.3123 Před 2 lety +133

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥
    राम कृष्ण हारी||🚩🚩🚩🚩

  • @dheerajdeshpande9276
    @dheerajdeshpande9276 Před 2 lety +27

    महाराष्ट्रातील अत्यंत शुभ दिवस आहे.
    खूप चांगल्या आणि योग्य माणसांकडून पांडुरंगाची पूजा झाली. खरेच नशीब लागते.

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 Před 2 lety +53

    माऊलींच्या मनातील इच्छा मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे शुभहस्ते महापुजा व्हावी ती आज पूर्ण झाली. *रामकृष्ण हरि*

  • @PrashantDeshpande123
    @PrashantDeshpande123 Před 2 lety +91

    आज सोन्याचा दिन आला, श्री माऊली, विठ्ठलाच्या पूजेला एकनाथ आला... भाग्य लागतं देवाची अशी सुंदर पूजा करण्याचे

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 Před 2 lety +876

    देवा माझ्या महाराष्ट्रत शेतकरी बळी राजाला राज्यत सुखी दिवस येऊदे हिच तुझ्या चरणी पार्थना. 🙏🏻 राम कृष्ण हरी

    • @psb83
      @psb83 Před 2 lety +12

      देवामुळे सगळ्या गोष्टीचे समाधान झाले असते तर.. बळीराजाच काय तर प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या गुणवत्ते नुसार समाधानी असता...जे निःस्वार्थ राज्यकारभार चालवेल सर्व काही त्याच्या हातात असते... तेव्हाच प्रश्न मार्गी लागतील..

    • @vinodjadhav5563
      @vinodjadhav5563 Před 2 lety +5

      Ram krishn hari

    • @paithankarkaran3843
      @paithankarkaran3843 Před 2 lety +1

      Berojgaranna rojgar milu de

    • @tulshiramdane7625
      @tulshiramdane7625 Před 2 lety

      🙏🙏

    • @gajanandeshmukh4197
      @gajanandeshmukh4197 Před 2 lety

      रामकृष्ण हरी साहेब

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 2 lety +86

    विठ्ठल च ठरविणार पुजा कोणाच्या हातून करून घेणार .छान वाटले एकनाथ जी .खूप खूप शुभेच्छा.

    • @gudu8585
      @gudu8585 Před 2 lety +1

      एकदम खरे रामा ला माहित नव्हते सकाळी राज्य अभिषेक होणार होते वनवास झाले सगळे विधी लिखित असते आपण फक्त कठपुतली अहो देवाचे जय हरी विठ्ठल

  • @sahadevkarangutkar8316
    @sahadevkarangutkar8316 Před 2 lety +8

    स्वच्छ मनाचा, गोर गरीबांचा, धर्मवीरांच्या आणि हिंदुहृदयसम्राटांच्या आदर्शाचा भारत भर प्रसार करणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, स्वतःला सामान्य कार्यकर्ता बोलणारा- कर्मवीर एकनाथजी शिंदे साहेब. खुप खुप शुभेच्छा!

  • @reshmachavan8388
    @reshmachavan8388 Před 2 lety +8

    सर्वांच्या नशिबात हा क्षण येओविठू माऊलीचा कृपेने
    🙏🙏🙏

  • @sagarnaik827
    @sagarnaik827 Před 2 lety +101

    आनंदी क्षण...बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिकाच्या हातून महाराष्ट्राच्या आराध्यदैवत पुजन...धन्य झालो आम्ही🙏🙏 जय हरी विठ्ठल...हिंदुत्व सर्वप्रथम🚩

    • @ganeshmedha7423
      @ganeshmedha7423 Před 2 lety +2

      Ram kirshana hari

    • @ShubhamPatil-bj7ht
      @ShubhamPatil-bj7ht Před 2 lety +1

      इतका छान क्षण आहे पण राजकारणा पलीकडे तुमची गाडी जात नाही तर.

    • @sagarnaik827
      @sagarnaik827 Před 2 lety +2

      @@ShubhamPatil-bj7ht ज्याच्या अंगी हिंदुत्व त्याच्याशी आमच बंधूत्व...राजकारण गेल तेल लावत दादा..

    • @gulabraokatare7040
      @gulabraokatare7040 Před 2 lety

      🙏🙏

  • @rutushinde6533
    @rutushinde6533 Před 2 lety +213

    💫काय *भाग्य* असेल त्या व्यक्तीचे ज्याच्या हाताने विठू माऊली ची आराधना होतेय🌼💮🌺🌸
    🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏

    • @varsha.sharma567
      @varsha.sharma567 Před 2 lety +2

      अगदी बरोबर हे लोक पण स्पैशल च असतात म्हणून असले भाग्य मिलते

  • @vijaysisale9238
    @vijaysisale9238 Před 2 lety +92

    आज ची पूजा खरा अर्थाने मराठी माणसा कडून मराठी परिवारा कडून झाली. ह्याच्यात महाराष्ट्र ची संस्कृती दिसून आली 🙏🚩खूप छान, राम कृष्ण हरी 🙏

    • @abhishekchede6518
      @abhishekchede6518 Před 2 lety +2

      दर वर्षी मराठी कुटुंब कडूनच पूजा होते तुमी पहिलायंदा बघितली असेल वाटतं 😂😂😂

    • @vijaysisale9238
      @vijaysisale9238 Před 2 lety +1

      @@abhishekchede6518 होय 😂😂

    • @Appu...26
      @Appu...26 Před 2 lety +1

      Hoy na

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 Před 2 lety +16

    घरी बसल्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन आपणं ही नशीबवान आहोत 🙏🙏💐💐

  • @ajaykulkarni6670
    @ajaykulkarni6670 Před 2 lety +210

    माननीय एकनाथ शिंदे साहेब...विठू कृपेने तुमच्या हातून निःस्वार्थपणे जनतेची सेवा घडत राहो हीच प्रार्थना...

    • @anjanagiri791
      @anjanagiri791 Před 2 lety +1

      जय हरी विठ्ठल एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत

    • @vaibhav.v6403
      @vaibhav.v6403 Před 2 lety

      @@anjanagiri791 हे प्रूफ नाही झ्हाले आहे 1 वर्षा नंतर माहित पडणार

    • @ajaykulkarni6670
      @ajaykulkarni6670 Před 2 lety

      @@anjanagiri791 हो आणि हे ते सिद्ध ही करतील..आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत त्यांच्याबरोबर...

  • @bhagwatjadhav4993
    @bhagwatjadhav4993 Před 2 lety +1522

    नशीबतले कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही! राम कृष्ण हरी माऊली. ज्यांच्या नशीबात आहे त्यांना मिळतेच !💐💐💐

    • @shreyassutar5516
      @shreyassutar5516 Před 2 lety +21

      Right konala pan nahi milta

    • @macdeep8523
      @macdeep8523 Před 2 lety +25

      Khare Aahe , Dharmaveer Prasanna

    • @hkvddcbjkdh5679
      @hkvddcbjkdh5679 Před 2 lety +19

      अगदी बरोबर आहे राम कृष्ण हरी
      💐💐💐💐🌹🌹🌹🌹🙏🙏

    • @vishalraigadkar9325
      @vishalraigadkar9325 Před 2 lety +64

      पांडुरंग विठ्ठला ला जर आज पूजा एकनाथजी कडून करून घ्यायची असणार.
      # सगळी पांडुरंगाची इच्छा.

    • @dadazite2550
      @dadazite2550 Před 2 lety +24

      बाळासाहेब ठाकरे चा कार्यकर्ते

  • @rushikesh6432
    @rushikesh6432 Před 2 lety +30

    आज बा पांडुरंगही धन्य पावले असतील की अशा निर्मळ भक्ताच्या हातून माझी महापूजा झाली...

  • @anitachauhan9589
    @anitachauhan9589 Před 2 lety +297

    I am from Uttar Pradesh. Wishing all the brothers and sisters of Maharashtra a very Happy Ashadhi Ekadashi. I had come once to have darshan of Lord Vitthal but want to come again. Hare Krishna, Hare Ram

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 Před 2 lety +42

    जो नसीब मै नहीं होता वह चाहकर भी नहीं मिलता ।और
    जो मिलनेवाला है उसको कोई रोक नहीं सकता।
    🙏रामकृष्ण हरी 🙏

  • @arvindsuslade6162
    @arvindsuslade6162 Před 2 lety +84

    मातीला जुडुण असलेला मुख्यमंत्री साहेब असा पाहिजे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी माऊली मन प्रसन्न झाले सकाळ सकाळी दर्शन झाले माझ्या पांडुरंगाचे जय हरी माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 Před 2 lety +9

    फारच आनंद झाला हा सोहळा पाहुन. घरात बसून माऊली चे दर्शन घडते. महाराष्ट्र राज्य सुखी आणि संपन्न व्हावे हीच सदिच्छा. जय हरी विठ्ठल!! धन्यवाद.

  • @ankitmohpatra880
    @ankitmohpatra880 Před 2 lety +268

    I am from Orissa, settled since last 19 years in Maharashtra. I am in love with Beautiful Culture and traditions of Maharashtra. There is a general feeling of happiness I am seeing all around in Maharashtra after Shinde Sahab became CM. A very positive feeling for my Maharashtra. May he become the best CM.
    🙏🙏जय हरी विठ्ठल....राम कृष्ण हरी 🙏🙏

    • @sidheshwarshendge5846
      @sidheshwarshendge5846 Před 2 lety +9

      जय हरी विठ्ठल ,रॅम कृष्ण हरी

    • @aloochan22
      @aloochan22 Před 2 lety +1

      this is wrong. there is very sad feeling

    • @britestatus1196
      @britestatus1196 Před 2 lety

      czcams.com/users/shortsot86SAeOm5k?feature=share

    • @britestatus1196
      @britestatus1196 Před 2 lety

      @@sidheshwarshendge5846 czcams.com/users/shortsot86SAeOm5k?feature=share

    • @britestatus1196
      @britestatus1196 Před 2 lety

      czcams.com/users/shortsot86SAeOm5k?feature=share

  • @meenagokhale6211
    @meenagokhale6211 Před 2 lety +158

    खुप आनंद होतो आहे ...एक सामान्य माणूस या पदापर्यंत पोहोचला आहे ...आणि आमच्या विठ्ठलाची आमच्या सारख्या सामान्य जनतेच्या वतीने पुजा करतांना बघुन आनंद गगनात मावत नाहीये..

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 Před 2 lety +6

      Gadhari karun pochla tya kay shurpana tya bevarshacha

    • @sagarbawaskar4555
      @sagarbawaskar4555 Před 2 lety +1

      🚩🎋🎋🌹🎋🙏🙏🙏👍बाव्सकर मुबंई 🚩 न भूतो न भवीषतंती 🎋🎋🎋🙏🚩

    • @bhikajikumbhar7029
      @bhikajikumbhar7029 Před 2 lety +3

      Karodo sampati aslela samanya manus ..

    • @vk9359
      @vk9359 Před 2 lety +6

      @@bhikajikumbhar7029 मग गरीबानी काय कायम श्रीमंतांची चाकरी करायची काय दादा धण्य ते विचार अहो ठाकरे पेंटर होते एवढा पैसे कुटून आला ते विचारा उगाच एखादा सामान्य मानूस वरती गेला की झाली कुत्तर भूकी सुरू .. घरणेशाहीच गुलाम मानसिक गुलाम आहेत दादा तुम्ही आणि तुमच्यासारखे विचार

    • @bhikajikumbhar7029
      @bhikajikumbhar7029 Před 2 lety

      @@vk9359 sglich nete ata gabbar jhali ahet. Samnya manus mahagait horpalun night ahe ..

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Před 2 lety +43

    घरी बसुन विठुमाऊलीचं दर्शन झालं,शिंदे साहेबांचं संपूर्ण कुटुंब किती मनोभावे पूजा करतंय, त्यांचा नातु तर अगदी तल्लीन झालेला दिसतोय, खुप छान वाटलं बघून,
    अशा शुभ प्रसंगी मला त्यांच्या दोन मुलांची मात्र आठवण येते,

    • @umbarkarsiracademy4020
      @umbarkarsiracademy4020 Před 2 lety

      Ram Krishna Hari....🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌷🌷🌷🌷🌷 Pandurang vitthala 🙏🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @Chaitanya98
    @Chaitanya98 Před 2 lety +63

    माझ्या विठ्ठलाला पाहून डोळे भरून आले... अप्रतिम पूजा करून सजवले मायबाप विठ्ठलाला, रुक्मिणी मातेची पूजा पण दाखवा, जय हरि विठ्ठल!!🙏🙏

  • @rohitdalvi6812
    @rohitdalvi6812 Před 2 lety +4

    🚩🚩🙏🏻🙏🏻🌼🌸🐚🕉️माझा विठुराया आम्हा सर्वांना दीर्घायुष्य आणि सुखं समृद्धी देवो हिच विठ्ठलांच्या चरणी प्रार्थना जय हरी राम कृष्णा जय हरी विठ्ठल 🕉️🐚🌸🌼🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @yogeshjagtap3387
    @yogeshjagtap3387 Před 2 lety +89

    देवा श्री विठ्ठला माझ्या शेतकरी राजाला सुखाचे दिवस येऊ दे खूप भरभराट होऊ दे हीच प्रार्थना🙏

  • @pripen2674
    @pripen2674 Před 2 lety +107

    श्री पांडुरंगाच्या पूजेच्या मानामुळे श्री आणि सौ शिंदे किती आनंदी दिसत आहेत आपला आनंद असाच चिरंतन राहो आणि आपल्या हातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा होवो आणि जनतेला सुखी करणारा राजा अशी आपली किर्ती होवो हिच आपल्याला आजच्या शुभदिनी शुभेच्छा आणि पूजेच्या मानप्राप्त वारकरी पती पत्नीस नमस्कार
    👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐💐🚩🚩🚩🚩

  • @sanjayTECH04
    @sanjayTECH04 Před 2 lety +10

    आषाढ़ी एकादशी की शुभकामनाए 🙏❤️जय श्री हरी विठ्ठल ❤️🙏 , Best wishes CM sAHEB

  • @jaistar546
    @jaistar546 Před 2 lety +9

    देवाचा आशिर्वाद शिंदे साहेब पाठीशी सदैव राहो .रामकृष्णहरि 🥰🙏

  • @narayanshekade984
    @narayanshekade984 Před 2 lety +346

    खुप खुप शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब आपल्या हातून गरीबांची सेवा घडो खुप डोळे भरून आले होते आमचे बघताना मनात आनंद तृप्त झाला होता

    • @mangeshgurav4288
      @mangeshgurav4288 Před 2 lety +1

      Nice comments..

    • @shripadjamkhedkar3694
      @shripadjamkhedkar3694 Před 2 lety

      अगदी खरे..... 🙏🙏🙏🌹

    • @anantkadam3893
      @anantkadam3893 Před 2 lety

      खुप आनंद झाला

    • @chandusalunkhe2133
      @chandusalunkhe2133 Před 2 lety +1

      मनातला शब्द बोल्ले सर तुम्हि

    • @rahuljadhav2165
      @rahuljadhav2165 Před 2 lety

      डोळे भरून यायला काय पायी दिंडी केली का याने गुवाहाटी वरून
      खरे नशीबवान तर ते वारकरी दांपत्य आहेत
      या गद्दारांना पन्नास कोटी मोजयला जायचं असेल विसरलात का काय

  • @sunilmate6720
    @sunilmate6720 Před 2 lety +187

    अप्रतिम, नयनरम्य, पृथ्वीवरील स्वर्ग, डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण👌👌👌

  • @shlok3566
    @shlok3566 Před 2 lety +7

    साहेब ठाण्यात घरी बसून तुमच्या सोबत दर्शन घेतल्याचा आनंद झाला. 🙏🙏 तुम्हाला व सर्व भक्तांना दिर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो दे बा विठ्ठला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @309prakash
    @309prakash Před 2 lety +7

    अप्रतिम, पूर्ण अंगावर शहारे आणि डोळे भरून आले माऊलीचे दर्शन घेताच...गोर गरिबांची आम्हा लेकरांची तू विठू माऊली.

  • @swapnildesai5813
    @swapnildesai5813 Před 2 lety +102

    शिंदे साहेबांच्या तिन्ही पिढ्यांनी मिळुन विठुरायांची पुजा केली... हे पाहून मनाला खुपच आनंद वाटला...😊

  • @santoshkadam4897
    @santoshkadam4897 Před 2 lety +113

    शिंदे साहेब तुमच्या मुळे आम्हाला मुख दर्शन झाले आपणास दीर्घ आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @prakashmahekar5741
    @prakashmahekar5741 Před 2 lety +5

    राम कृष्ण हरी 🙏🙏विटू माउलीचे असेच आशीर्वाद साहेब आपल्या पाठीशी राहू देत 👌👌

  • @kundalmadke4395
    @kundalmadke4395 Před 2 lety +1

    आज बालासाहेब ठाकरे यांची इच्छापूर्ण झाली की एक सादा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनावा आनी आषाढी एकादशी च्या दिवशी विट्ठलाची पूजा एका सादा शिवसैनिकाचा हातून व्हावी आज एकनाथ शिंदे साहेब यांचा रूपात पूर्ण झाली बालासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब किती खुश झाले असतील जय हिंद जय महाराष्ट्र

  • @pramodkulkarni9397
    @pramodkulkarni9397 Před 2 lety +124

    जय पांडुरंग रुखमाई... पांडुरंगाच्या भेटीला एकनाथ... दुर्मिळ प्रसंग .... 🙏🏻🙏🏻

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 Před 2 lety

      🤣🤣🤣🤣🤣🤣🐕🐖

    • @balirammore2133
      @balirammore2133 Před 2 lety +1

      नशिबात असते पण वेळ लागतो रामकृष्ण हारी

  • @nilt9810
    @nilt9810 Před 2 lety +97

    कस नशीब पलटत कोणी म्हने फडणवीस कोणी म्हने उद्धव ठाकरे पण ज्याच्या नशीबात त्याला च देव आरती ला बोलावतो खेळ हा विठुरायाचा ❤️

    • @bhartiya777
      @bhartiya777 Před 2 lety +5

      लोक म्हणत होते मोदी आला आणि एकनाथ ला घेऊन गेला पण आज तोच एकनाथ विठ्ठला चे पाई पूजे चा मान घेण्यास आला कदाचित हीच विठ्ठला ची ईच्छा 🚩🚩🚩🚩🙏

  • @ganeshkhandge
    @ganeshkhandge Před 2 lety +1

    यशवंतराव चव्हाणांनंतर एक सच्चा भूमिपुत्र या महाराष्ट्राला लाभला आहे, विठूमाऊली तुझे आशीर्वाद असुदे, शिंदे साहेबांच्या रूपाने माऊली तुझाकडून आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांचे सेवा होऊदे.🙏

  • @phoolsinghgautam4800
    @phoolsinghgautam4800 Před 2 lety +1

    भगवान विट्ठल मां रुक्मणी की पूजा अषाढ़ी एकादशी के दिन वही भाग्यशाली इंसान ने किया है जिसको भगवान का आशीर्वाद प्राप्त होता है यह दृश्य यह दर्शन अद्भुत दर्शन है साक्षात भगवान का दर्शन है इतना सुंदर दर्शन करके मन को शांति प्राप्त हुई जय हिंद फूल सिंह गौतम

  • @rajeshtari1458
    @rajeshtari1458 Před 2 lety +93

    एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन प्रत्येक मराठी माणूस हा खरा शिवसैनिक आहे आपण जे काही केलं ते बरोबर केलं प्रत्येक मराठी माणूस हा आपल्या सोबत आहे जय महाराष्ट्र 🌟🌟🌟🌟🌟

    • @ANILSHARMA-hh2cb
      @ANILSHARMA-hh2cb Před 2 lety +4

      प्रत्येक हिंदू आणी मराठी माणुस

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 Před 2 lety

      Nahi khara hindu marathi manus ha gadhara barobar nahi gadharala shama nahi yala. Iputrik bevaras hi saja vittal denarch

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Před 2 lety +3

      कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक जातीच्या धर्माच्या लोकांना विठुराया आपलसं करतात. देवा तु सर्वांना आपली लेकरं मानली . सर्वांना सद्बुद्धी दे आणि जातीभेद, धर्म भेद मिटव.

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Před 2 lety +63

    खूप आनंद वाटला हा श्री विठ्ठल रखुमाई महापुजेचा क्षण बघून
    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून गोरगरिबांची सेवा घडो हिच श्री विठ्ठल रखुमाई चरणी प्रार्थना

  • @vishaltupe9045
    @vishaltupe9045 Před 2 lety +5

    जय हरी माऊली 🙏🚩शिंदे साहेब महाराष्ट्रातील जनतेची शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवाल ही आशा 🙏 🚩

  • @nanasahebjagtap9573
    @nanasahebjagtap9573 Před 2 lety +1

    मुख्यमंत्री शिंदे साहेब आपणास आशाडी एकादशी निमित्त खुप खुप लाख लाख मगंलमय शुभेच्छा तसेच आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो व आपल्या कडून महाराष्ट्र ची खूप सेवा घडावी यासाठी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो जय हरी माऊली

  • @ranimahajan679
    @ranimahajan679 Před 2 lety +6

    शेवटी अनाथांच्या नाथाला बोलवलच दर्शनाला विठू माऊलीने .....शेवटी नशिबातल कोणीच हिस्काऊ शकत नाही .....शिंदे साहेब फक्त जनतेच्या हितासाठी लढा माऊलींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असेल.....जय हरी माऊली 🥰🙏🌱

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 Před 2 lety +69

    आज सकाळीच विठू माऊलीचे डोळे भरून दर्शन सुंदर मिळाले..CM साहेब आपणांस व परिवारास आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा.

  • @Shyamkumar_Rathod
    @Shyamkumar_Rathod Před 2 lety +35

    I don't know why my eyes are tearful now day's.. while watching Eknath Shinde Sir and his speech.. Once again all the hope about farmers came truthful in Maharashtra,

    • @abhishekchede6518
      @abhishekchede6518 Před 2 lety

      Q bhai farmers ke liye kay acha kiya hai? 🤦‍♂️😂😂

    • @Shyamkumar_Rathod
      @Shyamkumar_Rathod Před 2 lety

      @@abhishekchede6518 bhai read comments ..I mentioned hope he will do good ... reason he himself farmers son

    • @poonamtupe2116
      @poonamtupe2116 Před 2 lety

      @@abhishekchede6518 va ani utthav ne tar khup bharbharun dil vath

  • @anantdangare1787
    @anantdangare1787 Před 2 lety +1

    माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक 💐शुभेच्छा महाराष्ट्राच्या जनतेची तुमच्या हातून चांगली कामे व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹

  • @gopalpatil2283
    @gopalpatil2283 Před 2 lety +48

    एका गरीब घरातील एका रिक्षा चालवून मुख्यमंत्री यांच्या हातून पुजा हाच क्षण मन भरून येते

    • @mohansarate9754
      @mohansarate9754 Před 2 lety

      Mohansarate

    • @sunillattu6761
      @sunillattu6761 Před 2 lety +1

      खरं आहे आपले. येवढा मोठा विचार करायला तितकेच मोठे मन असावे लागते नाहीतर काहीजण त्यांना रिक्शावाला म्हणुन हिणवत राहीले.

    • @aishwaryavaijapurkar9671
      @aishwaryavaijapurkar9671 Před 2 lety

      सत्य,खूप अभिमानाची गोष्ट

  • @manishraulgaonkar3513
    @manishraulgaonkar3513 Před 2 lety +111

    हा सोहळा पाहुन समर्थांची एक उक्ती आठवली - “संसार दुःखें दुखावला आणि त्रिविध तापे पोळला तोचि अधिकारी झाला परमार्थासी” ..... विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @RajeshMore-km9lt
    @RajeshMore-km9lt Před 2 lety +4

    आज खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री या पदाला शोभा आली आहे.
    🚩💐

  • @radhikawadekar485
    @radhikawadekar485 Před 2 lety

    खुप सुंदर आणि विलोभनीय रूप माझ्या विठुमाउलीचे. आणि माननीय मुख्यमंत्री यांनी सपत्नीक केलेली पुजाही छान वाटली. बरोबरचे पूजेचा मान मिळालेले वारकरी पती पत्नीही छान वाटलं हे सर्व

  • @pandurangkolhe3194
    @pandurangkolhe3194 Před 2 lety +44

    बर्याच वर्षांनी खर्या कष्टकरी वारकरी घरातल्या माणसाच्या हातुन महापुजा!

    • @mngldessai
      @mngldessai Před 2 lety +1

      खरेच हो! पण काही पुरोगाम्यांच्या पोटात दुखतेय की!

    • @mngldessai
      @mngldessai Před 2 lety +1

      खरेच हो!

  • @bhimraokamble884
    @bhimraokamble884 Před 2 lety +158

    माझे महाराष्ट्र राज्य! माझा विठ्ठल! माझा मुख्यमंत्री! सोहळ्यात सोबती माझी अंम्रुत मराठी भाषा ! सोहळा माया प्रेमाचा! जय महाराष्ट्र, जय भारत!!!!!!!!

    • @mngldessai
      @mngldessai Před 2 lety +3

      मातीतल्या पायाचा जनतेचा मुख्यमंत्री!

    • @mangalashishupal4495
      @mangalashishupal4495 Před 2 lety

      🙏jai Hari vithal 🙏

    • @digamberfadkari1521
      @digamberfadkari1521 Před 2 lety

      @@mngldessai थथथंथथथथथथथथथथथ

  • @ramchavan6508
    @ramchavan6508 Před 2 lety +1

    खूप छान वाटल..🙇🏻‍♂🙏. एक सामान्य माणसाचा विचार करणारा मंत्री विठ्ठलाची भक्ती/आरती साठी मान मिळाला. खरच नशीब आणि परमेश्वराची प्रार्थना.. आपल्या हातुन गरीब, कष्टकरी, शेतकरी तसेच सामान्य युवक आणि सामान्य जनतेची सेवा घडो हिच विठ्ठल चरणी प्रार्थना.. जय हरी विठ्ठल 🚩🙇🏻‍♂🙏

  • @balvantchavan2903
    @balvantchavan2903 Před 2 lety +36

    Vithumauli blessings always with our CM Shindesaheb and Maharashtra today's Pooja after seeing I feel very happy

  • @vijaykonde1742
    @vijaykonde1742 Před 2 lety +30

    खूप शुभेच्छा. पांडुरंगाच्या आशीर्वादने आपनाकडून महाराष्ट्राची प्रगती वेगाने व्हावी.याच सदिच्छा.

  • @rameshdeshmukh6942
    @rameshdeshmukh6942 Před 2 lety +116

    खूप नशीबवान आहात साहेब तुमच्या सारख्या एका साधारण माणसाला पांडुरंगा ने तूम्हाला मान पूजेच्या दिला 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 Před 2 lety

      🐖🐕🐕🐕🤣🤣🤣

    • @nileshsuryawanshi5314
      @nileshsuryawanshi5314 Před 2 lety +2

      Kasla sadharan manus gaddar chya hatun mahapuja.. Vitthall sodat nhi yana

    • @rameshdeshmukh6942
      @rameshdeshmukh6942 Před 2 lety

      उद्धव शरद पवार चे कुत्र कसला वाघ

    • @psb83
      @psb83 Před 2 lety +2

      गुवाहाटीतले हॉटेल बिल 8 दिवस 80 लाख आले आणि शिंदे साहेबांनी भरले सुद्धा त्यानंतर गोवा चे पण बिल... असे असलेलं साधारण माणूस. एकनाथ साहेब...नाही नाही देव माणूसच...

    • @Inlinezambu
      @Inlinezambu Před 2 lety +4

      @@psb83 Jara Ajit, Sharad pawar cha pan vichr karava khanyat yancha kon dhar nr hat 😂😂😂🤢

  • @IndianRouter
    @IndianRouter Před 2 lety +1

    भारतात मोठ्या नेत्याच मुलगा, मुलगी,पुतण्या, नातु ह्यांच्यातुन देवाच दर्शन घ्यायला सर्वसामान्य माणसाला बंड करावच लागत....बोला पंढरीनाथ महाराज की जय..! श्री ज्ञानदेव तुकाराम.....!!!

  • @akshayjadhav3692
    @akshayjadhav3692 Před 2 lety +3

    आदर्श शिंदे च्या आवाजात दुमदम ली ही पंढरी😍😍😍❤️❤️ काय आवाज आहे यार❤️

  • @bhikanshete4444
    @bhikanshete4444 Před 2 lety +45

    खूप आनंद झाला शिंदे साहेब,तुमच्या हातून विठुरायाची महापूजा पाहताना,

  • @anilbhoir375
    @anilbhoir375 Před 2 lety +106

    शेवटी महापूजा सन्मानाला पण भाग्य लागते.

  • @shubhangiparkar4094
    @shubhangiparkar4094 Před 2 lety

    सगळयाना सुबुद्धी दे देवा विठ्ठला।
    माझ्या महाराष्ट्राला, या राजकीय नेत्यांच्या
    सत्तालोलुपतेपासून वाचव बा विठ्ठला।
    शरण तुला विठूमाऊली 🙏🙏🙏
    जय जय महाराष्ट्र माझा।
    गरजा महाराष्ट्र माझा।

  • @gomathisharada6142
    @gomathisharada6142 Před 2 lety +3

    மிகவும் அற்புதமான பாண்டுரங்கதரிசனம்ஆஷாட
    ஏகாதசி சிறப்பான தொண்டு ,ஸ்ரீ சங்கரா டி விக்கு எங்கள் மனமார்ந்த நன்றியுடன் கூடிய நமஸ்காரங்கள் சிவகுமார், கோமதி

  • @mukundujalambkar3497
    @mukundujalambkar3497 Před 2 lety +24

    सामान्य शिवसैनिक आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते श्री विठ्ठल महापूजा झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. राम कृष्ण हरी.🙏🙏

  • @arunlakhpati3185
    @arunlakhpati3185 Před 2 lety +121

    आंनद दिघेना आता शांती मिळाली असेल कारण शिष्य एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला आहे

  • @bharatbothra314
    @bharatbothra314 Před 2 lety

    आज सामान्य जनेतला व्यक्ती मुख्यमंत्री झाला खूप आनंद झाला,ही रचना विठुमाऊलीचीच आह़े ह्यात तिळमात्र शंका नाही.काही वर्षांनी प्रथम येणाऱ्या वारकऱ्याला असा मान मिळावा हीच माऊली चरणी प्रार्थना.

  • @rupalimedage5666
    @rupalimedage5666 Před 2 lety +89

    Just Speechless seeing all this .....great to have part and a macro life of this matrubhumi🙏🙏🙏

  • @EknathBGore
    @EknathBGore Před 2 lety +38

    खुपच सुखद डोळ्याचे पारणे फेडणारे द्श्य , संगीत तर खुपच छान !

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 Před 2 lety +50

    जय जय विठ्ठल!
    जय हरी विठ्ठल!
    जयहिंद!
    जय महाराष्ट्र!

  • @balasahebkarwal8646
    @balasahebkarwal8646 Před 2 lety

    माझ्या पांडुरंगा या महाराष्ट्रातील शेतकरी बळीराजाला सर्व भरभरून दे, शेतकरी आत्महत्या करणार नाही असे वरदान दे कृपाळू पांडुरंग माऊली. तुझ्या चरणी मा. मुख्यमंत्र्यांसह आम्ही सर्व साष्टांग दंडवत घालतो पांडुरंगा.👏👏🌹💐💐

  • @shubhadange1427
    @shubhadange1427 Před 2 lety

    विठ्ठलाच्या चरणी सेवा अर्पण करून महाराश्ट्राचा उज्वल भवितव्याची अपेक्षा करावी. आणि सर्वधर्म समभाव मानून प्रामाणिक पणे काम करण्याची सर्व मंत्रिगणाना बुद्धी येवो हीच ईश्वचरणी प्रार्थना 🙏🌹🙏

  • @surajjadhavsrj7474
    @surajjadhavsrj7474 Před 2 lety +38

    खूप छान वाटलं हा सोहळा पाहून...जय हरी विठ्ठल....राम कृष्ण हरी👌💐

  • @bharatmokashe3126
    @bharatmokashe3126 Před 2 lety +9

    मा.मुख्यमंत्री साहेब आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏मन भरून आले श्री विठ्ठलांचा सोहळा बघताना.जनतेच्या कल्याणार्थ आपले मुख्यमंत्री पद सार्थकी लागो हि श्री विठ्ठल चरणी प्रार्थना. 🙏🌹राम कृष्ण हरी वासुदेव हरी 🌹🙏जय शिवराय जय महाराष्ट्र 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @mrunaligavali9293
    @mrunaligavali9293 Před 2 lety

    खरच खूप नशीबवान आहात सर तुम्ही....त्या विठ्ठल माऊलीची इच्छा होती तुमच्या हस्ते पूजा करून घ्यायची....जे काही आहे ते सगळं हा विठ्ठलच घडवतो.....खरच अभिमान वाटतो सर तुमचा....

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 2 lety +1

    श्री एकनाथराव शिंदे पाटील मुख्यमत्री भाग्यवान धर्म निष्ठ बाळासाहेबाचा आशिर्वाद

  • @user-jz1ev2ff1z
    @user-jz1ev2ff1z Před 2 lety +16

    मुख्यमंत्री साहेब साक्षात पांडुरंग तुमच्या खांद्यावर बसलाय देव पावशी गेलो तेथे देवच होऊन आलो ज्या अर्थी तुमचं प्रेम नातं वर आहे त्या अर्थी तुमचं प्रेम पूर्ण महाराष्ट्रावर पण आहे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 👍🙏🙏🙏🙏🌹

  • @cglimaye6331
    @cglimaye6331 Před 2 lety +45

    माय बाप पांडुरंगा मुख्यमंत्री एकनाथराव ह्यांना उत्तम राज्य करण्यासाठी पूर्ण आशीर्वाद दे माऊली.
    उत्तम कार्य करून घे त्यांच्या हातून.

    • @anaghakarnik9067
      @anaghakarnik9067 Před 2 lety

      देवा पांडुरंगा eknathjina खूप खूप आशिर्वाद दे जेणेकरुन हे राज्य कुशलतेने आणी सक्षम्तेने चालवायची ताकद मिळेल...🙏🙏

  • @manishapatil620
    @manishapatil620 Před 2 lety

    कर्णमधुर असं संगीत... आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुटुंबियांसोबत झालेली पांडुरंगाची पुजा.... सगळं काही नयनरम्य, मोहक .... आम्ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबांसोबत पांडुरंगाचे हात जोडून दर्शन घेतले 🙏🙏

  • @spatil4192
    @spatil4192 Před 2 lety +6

    हे देवा देशातील मंत्री लोकांना चांगली बुध्दी दे समाजात लोकांच्या साठी काही तरी करुदे नोकरी द्यावी मुलांना हीच प्रार्थना

  • @vijaydah9241
    @vijaydah9241 Před 2 lety +31

    खुप छान दर्शन झाले राम कृष्ण हरी माउली

  • @eknathkhandagale5009
    @eknathkhandagale5009 Před 2 lety +11

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 🙏 जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 Před rokem +1

    शिंदे साहेबांचं मोठं भाग्य आहे त्यांना विठू माऊलीची महापूजा करण्याचा योग आला त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @user-gw8dl9md6i
    @user-gw8dl9md6i Před 2 lety +1

    कोयणारत्न पुत्र मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब💐🙏🙏विठू माऊली🙏🙏

  • @Omtekane
    @Omtekane Před 2 lety +25

    आम्ही इतक्या लांबून पंढरपूर येथे आलो आपण जवळ जवळ १ ते १.३० तास पूजा केली लाखो भाविकांचा विचार केला पाहिजे

    • @swapnilchavan2200
      @swapnilchavan2200 Před 2 lety +3

      मान आहे आपल्या देवाचा सुध्दा राज्याच्या प्रमुखाने स्वतः येऊन पूजा करावी असे मानावे आणि देवाच्या सानिध्यात 1.5 तास अजून घालवायला भेटले असे मानायचे be positive

    • @ashokkarke1489
      @ashokkarke1489 Před 2 lety +4

      मुख्यमंत्री वर्षातून एकदाच ही पूजा करतात , आणि ही दरवर्षीची प्रथा आहे, सर्व भक्तांना याची कल्पना आहे.
      त्यामुळे आपण त्रास करून घेऊ नका.
      जय हरी विठ्ठल .

    • @vidya7134
      @vidya7134 Před 2 lety

      Tithale bhataji sagla instructions det aahet tyanusar pooja hot aahe mg kiti vel pooja hote he bhataji var depend aahe.

  • @sanjayramchandrakeluskar4442

    सोहळा आनंदाचा,जय जय विठ्ठल, जय हरी.🌻🙏🙏🙏

    • @rakhishrotri9025
      @rakhishrotri9025 Před 2 lety

      जय जय विठ्ठल जय हरी, शिंदे साहेबांना खूप शुभेच्छा

  • @sarikamahatme6714
    @sarikamahatme6714 Před 2 lety

    आम्हाला तुमच्यामुळे विठ्ठलाचे दर्शन झाले 🙏🏻🙏🏻🌹🌹💐💐🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻

  • @shampopattiwari229
    @shampopattiwari229 Před 2 lety

    पांडुरंगा तुच कर्ता आणि करविता आहेस आम्ही सर्व निमित्त मात्र आहोत....हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा... सर्वांना सुखात ठेव हीच सद्गुरु चरणी प्रार्थना 🌹🌿🚩👏👏👏

  • @tukaramsawant1440
    @tukaramsawant1440 Před 2 lety +10

    एक नंबर साहेब विठ्ठल आपल्या ला महाराष्ट्र राज्यातील विकास व शेतकरी व दूध उत्पादकाच्या अडचणी सोडवायला आशीर्वाद देवो

  • @nilimapatil9541
    @nilimapatil9541 Před 2 lety +114

    Pandurang Vitthal Hari 🙏🏻🙏🏻🙏🏻Shinde sir nd family 👍👍👍👍👍👍tumchya hatun Maharashtra cha vikas howo..jay Shivaji jay Maharashtra 🙏🏻

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Před 2 lety

    माननीय भारतरत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी ्मुख्य मंत्री उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना मंत्र्यांना विठूमाऊलीचा खुप खुप आशिर्वाद ्जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anushri007
    @anushri007 Před 2 lety +31

    Shinde saheb and his family is deserve for this. Happy ashadhi ekadashi to all

  • @user-yc7go5yn2q
    @user-yc7go5yn2q Před 2 lety +128

    शेवटी 'एकनाथांनी' च केली विठ्ठलाची महापूजा

  • @kohojtrekkers
    @kohojtrekkers Před 2 lety +188

    हा क्षण बघून उर भरून येतो डोळे पानावतात. किती सुख आहे यात ..

  • @chitrataikhadkikar3563

    आजची श्रीमानमुख्यमंत्रीसाहेब या उभयतांची अगदि भूतो न भविष्यती अशी शिस्तबद्ध पुजा झाली आहे. कोण दिवस येई कसा कोण जाणतो,अतिशय आनंद झाला अशी आशा आहे की साहेब जनतेसाठी काही करू शकतील .जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 2 lety +1

    खूप खूप शुभेच्छा दोघाना पांडुरंगाची कृपा झाली आता जनतेला दिलासा देण्यासाठी प्रयत्न करत राहणे जनतेचे आशिर्वाद मिळेल बाबासाहेबांनी आणि आनंद दिघे साहेब नी खूप खूप आठवण ठेवून गेले साहेबांकडे अनुभवाचे बोल क्षण क्षण आठवण झाली तुम्ही पुढे चला आमी आहोत आमच्या बरोबर आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या कृपेने सर्व गोड गोड आहे

    • @harshadakamat8420
      @harshadakamat8420 Před 2 lety

      असेच चांगले ऐकायला मिळाले खूप खूप शुभेच्छा छान काम करत रहा हाच जनतेचा विश्वास आशिर्वाद खरा आहे अनुभव भरपूर प्रमाणात आहे आनंद दिघे साहेब देव होते आज आमला चांगले ज्ञान दिले जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल खूप सुंदर विचार आहेत