जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे यांची सोलापुरातील संपुर्ण मुलाखत

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 08. 2019
  • तामिळनाडू राज्यातील जनतेच्या मनावर कित्येक वर्षापासुन एक मराठी माणुस अधिराज्य गाजवत असुन तेथील जनतेच्या गळातला तो ताईत झाला आहे. या मराठी माणसाचे नाव म्हणजे शिवाजी गायकवाड अर्थात तामिळनाडूचा 'रजनीकांत'. तामिळनाडूत जाऊन तिथे अभिनय क्षेत्रात स्व:ताची वेगळी ओळख निर्माण केली. आता अश्याच प्रकारे एक मराठमोळी रणरागिणी तामिळनाडू राज्यात आपल्या प्रशासनातील कर्तव्यनिष्ठ कामगिरीने महाराष्ट्र राज्यांचा डंका वाजवत आहेत. त्यांच्या प्रशासकीय कामकाजाबरोबर त्या सामाजिक कार्यात जास्त अग्रेसर असल्याने. तेथील लोकांना त्या "लेडी रजनीकांत" वाटतात.
    मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रूकच्या रहिवासी असलेल्या रोहिणी भाजीभाकरे-बिदरी या शेतकरी कुटुंबातल्या असल्याने एका शेतक-याची काय अवस्था असते याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. शेतीसंबंधित येणार्यां अडचणी फक्त जिल्हाधिकारी सोडवू शकतो असे त्यांचे वडिल म्हणत असायाचे. त्यामुळे रोहिणी यांनी जिल्हाधिकारी व्हावे असे स्वप्न त्यांच्या वडिलांनी बाळगले होते. शासकीय महाविद्यालयात रोहिणी यांनी अभियांत्रिकीत पदवी मिळवुन नंतर कुठल्याही खाजगी शिकवणी न लावता त्या २००८ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ११८ व्या क्रमांकाने आयएएस म्हणून उत्तीर्ण झाल्या होत्या. प्रशिक्षणानंतर त्यांची नियुक्ती तामिळनाडू केडरमध्ये करण्यात आली. भाजीभाकरे यांनी मदुराई जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी व तिरूमेलवेलीच्या उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. आरोग्य आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवरचा 'भाजीभाकरे' पॅटर्न तामिळनाडू राज्यात प्रसिध्द झाला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत तामिळनाडू राज्यात मदुराई येथे कार्यरत असताना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते मनरेगा' या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच द बेटर इंडिया या वेबसाईटने जाहिर केलेल्या सर्वात्कृष्ट दहा जिल्हाधिकार्यांमध्ये देखील त्यांची निवड झाली होती.
    तामिळनाडू राज्यातील सालेम जिल्ह्यात १७० वर्षात २२७ जिल्हाधिकारी होऊन गेले. पण रोहिणी भाजीभाकरे यांना पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून मान मिळाला. भारतीय नोकरशाही ही अजगरासारखी आहे. ती हलतच नाही. अशी ओरड जनसामान्यात केली जाते. पण सालेम जिल्ह्यात रोहिणी या आपल्या कामामुळे कमालीच्या लोकप्रिय झाल्या आहेत. एकदा एक कार्यक्रम आटोपून जात होत्या. वाटेत राजपल्लयमगावातील शाळेत वर्ग चालू असण्याच्या वेळेत विद्यार्थी बाहेर खेळत होते. शिक्षकेतर कर्मचा-यांकडे विचारणा केली असता त्यांना कळले की, शिक्षक संपावर गेले आहेत. वेळ न दवडता त्यांनी १५ मिनिटे मुलांना इंग्रजी आणि तमिळचे धडे दिले. मिळालेला वेळ त्यांनी असा सत्कारणी लावला. नंतर राज्याच्या शिक्षण खात्यात संपर्क साधून तिथे शिक्षकांची सोय करून दिली. सरकारी नोकरांची मने आटून गेलेली असतात, नियमांवर बोट ठेवून आपले काम करणारे जिल्हाधिकारी लोकांनी पाहिलेले असतात. पण नियम हे सु-शासनासाठी असतात. आपला बचाव करण्यासाठी नाही, याचा विसर ब-याच अधिका-यांना पडलेला असतो. ग्रामीण भागातल्या असल्याने त्यांना ग्रामीण प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. त्या रुग्णालयाला अनेपक्षितपणे भेटी देतात.
    सेलम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांनी शाळेत जाऊन लहान मुलांसोबत पंगतीत बसून जेवण करणे, ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जनता दरबार घेऊन सोडवणे, डेंग्यू रोगाची लागण झालेल्या गावात पहाटेच्या वेळी जाऊन खबरदारीसाठी उपाय सुचवणे तसेच व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून सक्रीय असून त्याचा आढावा घेत असतात. आता त्यांनी प्लास्टिकमुक्त जिल्ह्याचा संकल्प केला आहे. एखाद्या परराज्यात काम करायचे म्हटले की भाषेची अडचण येते. तामिळनाडू सारख्या राज्यात तर अधिकच. रोहिणी यांनी तमिळ भाषेवर प्रभुत्व मिळवत लोकांशी संवाद साधला आणि लोकांच्या जिल्हाधिकारी झाल्या. या संपूर्ण यशात त्यांच्या वडिलांचा आणि पतीचा सिंहाचा वाटा आहे. पती शासकीय सेवेतच असल्याने आपल्या पत्नीचे कार्य त्यांनी समजून घेतले. सेलमच्या लोकांनीही त्यांना आपले मानले आहे. मातीशी घट्ट असलेल्या रोहिणी भाजीभाकरे त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीवरून सेलमच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी असल्याने स्थानिक लोकांना त्या 'सेलेब्रेटीपेक्षा' कमी वाटत नाहीत. त्यामुळे तामिळनाडू बरोबर महाराष्ट्र राज्यातील जनतेने त्यांना "लेडी रजनीकांत" म्हटल्यास नवल वाटू नये.
    #महाराष्ट्र #रोहिणी_भाजीभाकरे
  • Zábava

Komentáře • 25